माबोवरी आला | अत्यानंद झाला |
काव्याचा उमाळा | उसळला !!
मिळेना वेलांटी | मात्र्याची कोलांटी |
व्याकरणाची घंटी | वाजविली ||
शब्दामागे शब्द | उभा केले स्तब्ध |
फुटके प्रारब्ध | वाचकांचे ||
जिगाच्या रुपाने | दैत्यांची थैमाने |
वाद, घमासाने | सोकाविली ||
आप चा दणका | तोंड रका रका |
काव्याचा मणका | चुराडिला ||
वाचकांचा मेळा | कवितेशी आला |
कळ्ळोळ जाहला | माबोवरी ||
सैन्यामाजी विपू | शब्द शब्द मापू |
"या रे याला कापू | कवी म्हणे" ||
टोमण्यांच्या लाथा | टीका बुक्की खाता |
चोपली कविता | निर्दाळीली ||
दिली नाही साथ | एकानेही हात |
गेला काव्य वात | विरून गे ||
पेंगुळला कवी | अंधारला रवी |
घ्यायलाच हवी | निवृत्ती बा ||
म्हणोन सांगितो | मंत्र उच्चारतो |
मार्ग हा दावितो | नवागता ||
आभार मानावे | स्तुतीगीत गावे |
चांगला म्हणावे | अमितही ||
सर्वांचे आभारी | नसावेच तरी |
ठेऊनी ते उरी | चेकळावे ||
बोलला विशाल | बोलुदे खुशाल |
प्रगोनेही हाल | करावे का?||
डॉक्टरांची सुई | नेमकीच जाई |
शिरोनिया राही | मनामधे ||
बेफिकीर बोल्ला? | करा प्रतिहल्ला |
कुणीही का जल्ला | शिकवायचे! ||
सोबत मंद्याची | दोन्ही बाजू गोची |
दोन दगडाची | कथाच तो ||
त्राता एक हबा | तुझ्या मागे उभा |
कितीही तू डबा | लिही गड्या ||
शेवटी कळेल | कष्ट हे फळेल |
ओळ आठवेल | ही खालची ||
माबोवरी यावे | पघळ नसावे |
आवरते घ्यावे | हेची खरे ||
आवरते घ्यावे | हेची खरे ||
- ह बा
हबा मिळेना वेलांटी |
हबा
मिळेना वेलांटी | मात्र्याची कोलांटी |
व्याकरणाची घंटी | वाजविली ||>>>>>>
हणमंतराव, तडाखेबंद सेहवागी
हणमंतराव,
तडाखेबंद सेहवागी फलंदाजी!
धमाल
धमाल
मस्त लिहिले आहेस हबा !
मस्त लिहिले आहेस हबा !
घ्यायलाच हवी | निवृत्ती बा
घ्यायलाच हवी | निवृत्ती बा ||
घ्यायलाच हवी | निवृत्ती हबा ||
कैच्याकै वाचूनि | आनंद झाला ||
(No subject)
आभार मानावे | स्तुतीगीत गावे
आभार मानावे | स्तुतीगीत गावे |
चांगला म्हणावे | अमितही ||
सर्वांचे आभारी | नसावेच तरी |
ठेऊनी ते उरी | चेकळावे ||
काय काय राव हे वा वा
काय काय राव हे वा वा
हबा, मस्तच रे!
हबा, मस्तच रे!
हबा ___/\___ घ्या
हबा ___/\___ घ्या
मस्तच !
मस्त मस्त मस्त!!!!!
सॉलिड रे...जबरी
सॉलिड रे...जबरी
<<मिळेना वेलांटी | मात्र्याची
<<मिळेना वेलांटी | मात्र्याची कोलांटी |

व्याकरणाची घंटी | वाजविली <<
मस्तंच आहे.
मस्तंच आहे.
मस्त मस्त !! सैन्यामाजी विपू
सैन्यामाजी विपू | शब्द शब्द मापू |
"या रे याला कापू | कवी म्हणे" ||
thanks to all!!!!
thanks to all!!!!
रामदास स्वामींच्या ओव्या
रामदास स्वामींच्या ओव्या वाचतोय की काय असा भास झाला. ह.बा., मजा आगया.
ह बा बोध बोधप्रद वगैरे छान
ह बा बोध

बोधप्रद वगैरे छान लिहीतोस रे हब्या
हबाजी, जबरदस्त दणका!!! नाद
हबाजी,
जबरदस्त दणका!!! नाद खुळा!!
झणझणीत अंजन.
झणझणीत अंजन.
आवडली.
आवडली.
कुणाला वाटली असेल त्याला मस्त
कुणाला वाटली असेल त्याला मस्त वाटो बापडी पण मज पामरासी विषयुची ना कळाला... ना... ना... जमलेच ना हे....
लै भारी !
लै भारी !
ह बा.. सहिये बॉस !
ह बा.. सहिये बॉस !
हबा ....... तू म्हणजे
हबा ....... तू म्हणजे हरहुन्नरी बाबा आहेस.......
(No subject)
जबरी आहे. छान!
जबरी आहे. छान!
(No subject)
धमाल रचना आहे. काही काही
धमाल रचना आहे. काही काही संदर्भ नीट कळाले नाहीत पण एकूण मस्त जमली आहे.
Pages