lagnachya rukhwatasathi mandaychya wastu kaay karta yetil yachi mahiti havi aahe

Submitted by कुचि on 17 November, 2010 - 01:45

koni jar lagnachya rkhwatchya wastunchi mahiti deu shakat asel tar please dyal ka?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्याची मला फारशी माहिती नाही पण तुळशीबागेत मिळायला पाहिजे तयार रुखवताचे जिन्नस. मुंबईत आयडियल बुक डेपोच्या गल्लीत दुकान आहे रुखवताच्या सगळ्या वस्तु मिळणारे.

रुखवतात काय ठेवतात हे काळाप्रमाणे आणि प्रांताप्रमाणे बदलते बहुतेक... Happy १५-२० वर्षांपुर्वी कोकण भागातील लोकांच्या लग्नात रुखवतात नव-यामुलीने स्वतः बनवलेली तोरणे, विणकाम, चित्रकला हस्तकला इ.इ. ठेवायचे. जवळजवळ ७५% भाग मुलीने/घरच्यांनी बनवलेले सामान असायचे आणि बाकी भांडी वगैरे. सातारा/नाशिक वगैरे ठिकाणच्या लग्नात मुलीला माहेरच्या मंडळींनी आहेर म्हणुन दिलेले अगदी पलंगा/कपाटासकटचे सामान रुखवतात पाहिले आहे. हल्ली काही लग्नात रुखवत अजिबातच नसते. जिथे असते तिथे जवळजवळ सगळे विकतचे आणलेले असते. त्यात मोठे लाडु, फराळाचे पदार्थ, वेगवेगळ्या पद्धतीने सजवलेले सप्तपदीचे बोर्ड वगैरे पाहिलेत.

पुठ्ठ्यावर कागद चिकटवून केलेली साडी व खण मला येते. तसेच गुलाब रंगविलेले आभ्रे व बेड्शीट असत.
गोळ्या लावून करायचे घर पण जमेल. त्या अकुच्या नात्यातल्या बाई डेकोरेटिव थाळ्या वगैरे बनवितात त्यांना छान येत असतील गोष्टी.

पुण्यात तुळशीबागेत मिळतं सगळं.. खाऊवाले पाटणकरांकडेदेखिलं मिळतात सगळे जिन्नस.. त्यांचे पॅकेज मात्र मला महाग वाटले होते.

thanks Happy पन कोनि माला साखरेच्या वस्तु कशा बनवितात ते सान्गेल का? बाउल, दिश ईत्यादि.

कुची तो सगळा सेट बनवुन मिळतो. तुळशीबागेत विचारलस तर कळेल नक्की. रच्याकने मला वैयक्तित नाही आवडत नंतर ती २-३ किलो साखर वाया जाते आणि अक्षरशः फेकुन द्यावी लागते.

कुची ते पदर्थांबद्दल मुळ पुण्यातल्या मिठाइवाल्याकडे चोकशी कर. साखरेचे पदार्थ खातात. शिवाय रुखवतातील खण्याच्या पदर्था बद्द्ल विचारशील तर. कजुचा, बुंदिचा मोठ्ठा लाडु ठेउ शकतेस. मोठ्ठी चकली इ. घिवर ठेवता येतो. शिवाय आजकाल वेगवेगळ्या फळा फुलांच्या आकारात मावा / कजुची मिठाइ रेडीमेड मिळते. ते पण तु वापरु शकतेस.

कु

दादर saubhagya म्हणुन दुकान आहे मस्त वस्तु मिलतात

माझ्या आई ने दिलेल्य वस्तुंची यादी
१. सुके खोबरे उलटे करुन त्या वर पीन ने squre नक्शि करायची , पुढे थोडी खोच पडुन आक्रोड चे बाहेरील कवच लावावे न बाजुच्या भागाना काजु लावावे हात पाय समजुन झाले कासव तयार

आणी शेपटी म्हनुन पिस्त्या चे कवच लावायला विसरु नका म्हण्जे झाले

Happy

माझ्या लहानपणी मी एक व पाच पैशाच्या चौकोनी नाण्यान्चे केलेली तुळशीवृन्दावने बघितली आहेत, तीनचार इन्च ते एक-दीड वीत लाम्बीरुन्दीची होती. मस्त दिसायचे. मला पण करायचे होते, राहूनच गेले, तेवढी नाणी जमवणे अवघड होते त्या काळी (त्या नाण्यान्ना किम्मत होती). तर मुद्दा हा की नाण्यान्चे काही बनवले तरी चालेल Happy

आई गं काय मस्त मूर्ती आहेत!! अगदी रिअ‍ॅलिस्टिक Happy
बाकी लग्नात हल्ली अजून रुखवत ठेवतात हे माहित नव्हतं मला. मला वाटले आता बंद झाले असेल रुखवत वगैरे.

मिनी काय खर वाटतय सार... भाव पण मस्त आलेत चेहेर्‍यावरचे
>>> टॉपीक >>दादर ला आयडीअल च्या गल्लीत मिळेल

मस्त आहे हा सेट Happy

साखरेमध्ये जरा पातळ केलेला डिंक मिसळून ती साखर बाऊलमध्ये दाबून बसवायची. खडखडीत सुकली की बाऊल उलटाकरुन साखरेचा बनलेला आकार बाहेर काढायचा व हलक्या हाताने आतील बाजूने साखर कोरुन काढायची. म्हणजे साखरेचा बाऊल तयार. अशीच बाकिची भांडीही करता येतात. हे खाणेबल असते.

साखरेमध्ये जरा पातळ केलेला डिंक मिसळून ती साखर बाऊलमध्ये दाबून बसवायची

हा डिंक कसला असतो बाई? आपण डिंकाच्या लाडवात वापरतो तो की फेविकॉल का मजबुत जोड??? Proud (आमचे दात शाबुत राहतील की साखरेबरोबर बाहेर पडतील ही चिंता )

अगं खायचा डिंक वापरायचा. माझ्या आईने कितीतरी अशी साखरेची भांडी केल्येत नातेवाईकांच्या रुखवतात ठेवायला.

साबणाच्या वड्यांची कोरुन कपाटं, टेबलं, सोफा वगैरेही करता येतो रुखवतासाठी. नंतर साबण वापरुन टाकायचा.

हे भारि आहे... मी करेन साखरेची भांडी तयार... माला नाशिक मधला पत्ता द्या ना प्लीज. माझी मावशी राहाते तिकडे. मी तिला सागेल आनायला त्या वस्तु... किवा त्या काकाचा फोन न. असेल तरी चालेल.

मनुका व सोनेरी `जिग' (बहुतेक हेच नाव आहे त्या स्प्रिंग सारख्या सोनेरी जरी चे. तुळशीबागेत मिळते.) चे मंगळसुत्र पाहिले होते. मधल्या वाट्या पण दोन मनुकांना `जिग' ने सर्कल करुन लावल्या होत्या.

Sakharache rukhwat kashe taiyar kartat tyachi maheti milel ka? ani tyachi banvaichi rit milel ka?