उत्खनन

Submitted by nikhilmkhaire on 2 November, 2010 - 05:44

आलं आलं आलं
(चाल : पाडाला पिकलाय अंबा, पण फक्त या तीन शब्दांसाठीच.)

तर
आलं आलं आलं...
"अरं पण कोण आलं?"

पारावरच्या चोंबड्यापासून
खुडूक साल्या कोंबड्यांपर्यंत
आणि मरतुकड्याशा गुरापासून
मरतुकड्याशा पोरापर्यंत!

सगळ्या गावात उठली बोंब
आलं आलं आलं...

कुणी म्हणालं विटांसंगट माती फुकाट
कुणाला घावलं मातीसंगट शिमिट फुकाट

"सरकारदेव पावला! त्येची माणूसकी हाये म्हणायची अजून!"
"तर! गाव सारा नासवला इथं तिथं हागून- मुतून!"
"आयला, कसं वाटलं रं?"
"काय वाटायचं? मध्येच साल्या तुझं पाणी संपल रं!" हॅ हॅ हॅ
सटार्‍या सांगे भपार्‍याला आन भपार्‍या आणखी कोणाला!

दिवस सरला चर्चेत-
सरकारदेवाच्या,
फुकटच्या सिमेंटाच्या आणि
घरोघरी येऊ घतलेल्या नव्या कोर्‍या संडासाच्या!

सकाळ आली दुसरी
उसनीच घेऊन पोटात कळ!
पाणीच नाही तिथं कसा वाहेल नळ?

"कालच नाय का ठरलं, उघड्यावर हगायचं नाय!"
"दिसला कोणी चोर जरी, त्याला असा सोडायचा नाय!"
"पाटील पाटील ... बामन गेला जानवं टाकून कानावर!"
"धरा रे, मारा रे!
"पर्यावरणाचा नाश करणार्‍या समाजकंटक, धर्मभ्रष्टाला कापा रे!"

कापण्याआधीच फुटला बामन
वड्याच्या खालच्या अंगाला!
सैनिक आले हात हालवत
कळ जाणवे ढुंगणाला!

सरला पुढचा दिस तो नाही,
जरशानंही होई घाई

सदूभाऊची म्हातारी तर बहुदा झाली वेडी
"म्हणे पोटात नाही दाणा
सरकारदेवाला आधी तो दे म्हणा!"
म्हातारीला काढून खुळ्यात गाव झाला निर्धार!
करू तर "तिथं"च नाही तर "यल्गार"!

पंच जमले पुरते सोळा
सटारे, भपारे, भपारे अन् सटारे
"आज काढा वाईच कळ, हा घ्या बोळा!"
पंच पुरते होते शहाणे,
हसून म्हणाले, " पोटच शेका बोळ्याने!"

आला आला आला
(चालः पाडाला पिकला अंबा; पण याच तीन शब्दाला!)

वाईट माणसं गावात फार
बरं त्यांना कधी ना दिसणार!
चांगलं स्वच्छ होतं गाव
देवाचं जर हे ना घेती नाव

घटनाही तशीच घडली
सदूभाऊची म्हातारी चचली

"अपशकून झाला अपशकून झाला!"
"उघड्यावर जर असती गेली तर म्हातारी नसती मेली!"
"मागत होती खायला दाणा"
"चला खड्डा खाणा!"

"देव कोपला, देव कोपला!"
"माती उगवे सारे! मातीतंच त्याने जावे!
न उतावे न माजावे! मातीवर या!"
सटारे भपारे, भपारे अन् सटारे!

सारा गाव झाला जागा
धरून धोतराचा सोगा,
"ते गेले वरती अन् मी राहीले खालती!"

आपराधी जो कालचा
ठरला तोच दिशादर्शक
वरच्या वड्याच्या अंगाला भरली मोठी जत्रा
डबडी मोठी घावली मागाहून सतरा!

दूर दिसता माणसाचा मेळा
आरडे कुणी
आलं आलं आलं!

..
निखिल

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

!!!!!

हे काय आहे ??? Uhoh

भरत जी यात !!!! देण्यासारखं काय दिसलं आपल्याला ? Uhoh

(अवांतर :
"कालच नाय का ठरलं, उघड्यावर हगायचं नाय!"

यावरुन आठवलं => आमच्या शेजारच्या खेडे गावातही ही मोहीम चालु झाली होती अन दुसर्‍या दिवशी पेपरला बातमी होती :

" गावच्या सरपंचाला "रंगेहाथ " पकडले !! "