'घरमालक'

Submitted by निंबुडा on 21 October, 2010 - 07:20

माझंच एक जुनं विडंबन इथे नव्याने पोस्टतेय. पूर्वी मनोगतावर पोस्टले होते.

प्रेरणा - अजब यांची पक्षी ही कविता!

आज निराळी
सकाळ होती...
'घरमालक' येउन
बसला होता
दारावरती...

नुकता पगार
झाला होता
देणी भागवण्यातच
संपला होता...

मला वाटले,
त्या घरमालकाला
घरात घ्यावे...
अन एखाद्या
चाबकाने
कोरडे ओढावे (त्याच्या पाठीवर)...

कोनाड्याशी
उभी असावी
एक छडी...
रट्टे तिचे त्याला

खाऊ द्यावे...

'घरमालक' पण तो
'घरमालक' होता
'मनुष्य' नव्हता...(??)
पैसे टेकवता (आधीचे थकलेले)
पसार झाला
बघता-बघता...

त.टि. : खरं म्हणजे हे लौकिकार्थाने विडंबन नाही. जशी काहीच्या काही कविता असते तसे हे काहीच्या काही विडंबन आहे, पण माबोवरती गुलमोहरात असा विभाग नसल्याने मी ते विडंबन या साहित्य प्रकारात टाकले होते. परंतू आता मी ते संपादित करून काकाक मध्ये हलवतेय. ते खरोखरीचे विडंबन वगैरे अपने बस की बात नही बॉस!! Proud

अतिशय टुकार.
यात काय काव्यमूल्य आहे.
अगदी गद्य आहे हे. असो.स्पष्ट प्रतिसादाबद्दल गैरसमज नसावा.

किती छान कवीता आहे...

ना कसला अर्थ...
ना कसले टेन्शन...
डोकेदुखीला आराम...
निंबुडा काव्यबाम!!!

सदिच्छा!

काव्यबाम Rofl

काकावि सदर असले असते तर तिथे पोस्टले असते हे विडंबन. पण असो.

गोटॉल नंतर आता काव्यबामाचे ही पेटंट घ्यावे लागणार मला असं एकंदरीत दिसतंय Biggrin

अरेच्या,हे काहिच्या काहि विडंबन असे आहे होय? मग मी माझे शब्द मागे घेतो. काहीच्या काही विडंबनात हे सारे क्षम्य असावे.

माफ कर निंबुडा, पण मलाही हे विडंबन फसल्यासारखे वाटतेय. नाही आवडले. स्पष्टोक्तीबद्दल क्षमस्व Happy