मैत्री कशी असावी ....
पोळीहूनही लुसलुशीत ; जिभेला गोंजारणारी
दुधाहूनही स्निग्ध ; जिभेला मऊसूत करणारी
दह्याहूनही कवडी ; जिभेवर टिकून राहणारी
तुपाहूनही रवाळ ; जिभेवर रेंगाळत राहणारी
श्रीखंडाहूनही निघोट ; जिभेवर मुरत जाणारी
चिवड्याहूनही कुरकुरीत ; जिभेला सोकवायला लावणारी
चकलीहूनही खुसखुशीत ; जिभेला अतृप्त करणारी
पिठीसाखरेहूनही गोड ; जिभेवर विरघळत जाणारी
अन मधाहूनही घट्ट ; जिभभर पसरत जाणारी
मैत्री अशी हवी !
मैत्री कशी हवी ....
मोरासारखी नाचणारी ; निखळ आनंद देणारी
कोकीळेच्या स्वरात गाणारी ; सुखसंवाद करणारी
प्राजक्तासम नाजूक ; हळूवार सुगंधी पखरण
रातराणीसम गंधीत ; मस्त धुंद करणारी
प्रवाहासम वाहती ; हवी तिथे नेणारी
खडकाहूनी अचल ; खंबीर आधार देणारी
मेणाहूनी मऊ ; हवी तशी दबणारी
सोन्यासारखी झळाळणारी ; मैत्रीचा कस दाखवणारी
अन आरशासम पारदर्शी ; जणू तुमचीच प्रतिकृती
मैत्री अशी असावी !
मैत्री कशी असावी...
ढगांसारखी आपल्याच मस्तीत ; हवे तेथे भटकणारी
विजेसारखी लखलखून ; चकीत करून सोडणारी
पावसासारखी भिजवणारी ; प्रेमात चिंब करणारी
न दुभंगणार्या पाण्यासारखी ; सलग, सजग, निखळ वाहती
वार्यासारखी स्वच्छंद ; बंध मुक्त करणारी
उन्हासारखी चमचमणारी ; लख्ख लख्ख उजळवणारी
इंद्रधनुसारखी सप्तरंगी ; जीवनाला रंगवून जाणारी
सावलीसारखी शीतल ; जणू मायेची पाखर
धरतीसारखी सृजन ; एक एक बी फुलवणारी
मैत्री अशी असावी !
आवडली.
आवडली.
ही पण आवडली, थोडी मोठी
ही पण आवडली, थोडी मोठी वाटत्ये, पण तरी छाने
वा वा .. खूप आवडली... मैत्री
वा वा .. खूप आवडली... मैत्री कशी असावी... ???? फार छान.:)
छान गं आरती! हलकी फुलकी
छान गं आरती! हलकी फुलकी कविता!!
मस्तच! मला आवडेल अशी मैत्रीण
मस्तच! मला आवडेल अशी मैत्रीण
धन्यवाद मित्रमैत्रिणींनो मला
धन्यवाद मित्रमैत्रिणींनो
मला वाटलं तुमच्याही कल्पना लिहाल इथे 

लाजो मला आहेत अशा मैत्रिणी ! तुम्हीच सगळ्या गं
छान आवडली ग
छान आवडली ग
मोरपिसी.. अल्हाद .. असे
मोरपिसी.. अल्हाद .. असे मैत्रीचं नातं सांगणारी कविता.. सुरेखच गं !
काहीच्या काही आहे काय ?
छान काकाक मधे नाही बसत .
छान
काकाक मधे नाही बसत .
धन्यवाद ! सुकी, नुतन अरे तशी
धन्यवाद !
पण तरी धन्स !
सुकी, नुतन अरे तशी फार गेय नाहीये अन खरं तर जरा गद्यच आहे म्हणून इथे
आरतीजी, खास ....एकदम खास
आरतीजी,


खास ....एकदम खास ...मस्त !
मैत्रीवरची कविता तर अशी असावी !
पहिल्या कडव्या वाचताना मात्र तोंडाला पाणी सुटलं ....!
अनिल , मग माझं लिहिताना काय
अनिल , मग माझं लिहिताना काय झालं असेल , कल्पना कर
मैत्री कशी असावी
मैत्री कशी असावी ....

पोळीहूनही लुसलुशीत ; जिभेला गोंजारणारी
दुधाहूनही स्निग्ध ; जिभेला मऊसूत करणारी
दह्याहूनही कवडी ; जिभेवर टिकून राहणारी
आरती,
भारी कविता !
आवडली. सर्वात आवडलं ते कवितेच
आवडली.
सर्वात आवडलं ते कवितेच व्यापकपण. हीच कविता यत्किंचितही बदल न करता.
भाकरी
मैत्रीण
मांजर
अश्या बर्याच विषयांसाठीही वापरता येईल.
अतिशय छान केल्या आहेत
अतिशय छान केल्या आहेत मैत्रीच्या व्याख्या, आरती...
तुझ्याशी मैत्री असणारे सर्व भाग्यवानच असणार... मी ही त्यातलीच एक 
एकदम झ्याक बरका आरते
एकदम झ्याक बरका आरते
सर्वांना धन्स !
सर्वांना धन्स !
मैत्रीचे सगळे कंगोरे टिपलेस
मैत्रीचे सगळे कंगोरे टिपलेस गं, आरती.
पण काकाक का म्हणून??? गेयता नाही, गद्याळ आहे म्हणून काकाक मध्ये नसते काही टाकायची अशी कविता
धन्स गं निंबुडा ! अन
धन्स गं निंबुडा ! अन >>>गद्याळ <<<आवडला शब्द
आपल्याला तर आपल्या मैत्रीणीने
आपल्याला तर आपल्या मैत्रीणीने केलेली ही कविता खुपच आवडली बॉ
मस्तच
हीच कविता यत्किंचितही बदल न
हीच कविता यत्किंचितही बदल न करता.
भाकरी
मैत्रीण
मांजर
अश्या बर्याच विषयांसाठीही वापरता येईल.
>>>
बापरे मांजर हा शब्द घातल्याने मात्र खरंच काकाक होईल ही......
य्याक!!!
मांजर कशी असावी ....
पोळीहूनही लुसलुशीत ; जिभेला गोंजारणारी >>>> जिभेला गोंजारणारी मांजर .???
कोकीळेच्या स्वरात गाणारी मांजर वगैरे भन्नाट ओळी होतील.
मोहिनीताई __/\__
तुमची विनोदबुद्धी भलतीच तेज तर्रार आहे हो
निंबुडा
निंबुडा
निंबुडा धन्स गं
निंबुडा धन्स गं
आरती छान आहे कविता. आवडली.
आरती छान आहे कविता. आवडली.
धन्स जागू
धन्स जागू