Submitted by अभय आर्वीकर on 10 October, 2010 - 22:39
गंधवार्ता
दोर गळ्यात लटकवून
बाप झुलतोय झाडावर
माय निपचित पडलीय
हृदय फाटता धरतीवर
बाळ खिदळतंय मनीसंगे
मिशा तिच्या धरता-धरता
नाही जराही त्याला
कसलीsssचं गंधवार्ता
.
.
.
.
.
गंगाधर मुटे
...................................
गंधवार्ता = मागमुस, सुगावा
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मुटे सर जता जाता इशारा
मुटे सर
जता जाता इशारा कळला
नाही आवडली कविता. विषय छान
नाही आवडली कविता. विषय छान मांडणी चुकली.
अवांतर- गंधवार्ता = मागमुस, सुगावा>>> चुकीचा अर्थ आहे. (खरा घोळ हाच)
बाप रे.. विदारक..
बाप रे.. विदारक..
मुटेजी, वाह ! यापेक्षा वाईट
मुटेजी,
वाह !
यापेक्षा वाईट दु:ख जगात कुणाच्या वाट्याला आलं असेल का हो ?
कविता कशीही असली तरी त्याचा अर्थ समजला की झालं !
अर्थ कळाल्यावर मात्र शेतकर्याचा,हे पाहीलेल्या,अनुभवलेल्या जीवाचा संताप हा होणारच !
नाही आवडली.
नाही आवडली.
<< अवांतर- गंधवार्ता =
<< अवांतर- गंधवार्ता = मागमुस, सुगावा>>> चुकीचा अर्थ आहे.>>
अनुजा, जरा आजुबाजूच्या शेजार्यांना "गंधवार्ता" या शब्दाला प्रमाणभाषेत अधिकृत अर्थ काय आहे ते विचारून बघावे. तुम्ही चुक आहे म्हटल्याने शब्दांचे अर्थ बदलणार नाहीत. मात्र गंधवार्ता या शब्दाला मागमुस, सुगावा या व्यतिरिक्त इतर "मनठोक" अर्थ असू शकतात. तुमच्या मते गंधवार्ता या शब्दाला वेगळा काही अर्थ असेल सांगावा.
त्या निकषावरही वरील कविता तपासून बघता येईल.
तुम्हाला कविता आवडली नाही कारण कविता कळलीच नसावी.
कविता कळलीच नसावी कारण "शेतकरी आत्महत्या" हा विषय फारच गुंतागुंतीचा आणि किचकट आहे.
"शेतकरी आत्महत्या" हा विषय अधिक समजून घ्यायचा प्रयत्न करावा, ही विनंती.
चटका लावणारी
चटका लावणारी
(No subject)
आभारी आहे
आभारी आहे सर्वांचा.
आश्विनीजी, काही विषय असे असतात की सर्वांना नाही आवडू शकत. आणि असे विषय वाचकांची आवड-निवड लक्षात घेऊन हाताळणे शक्यही नसते. कारण वास्तव हे कडवट असू शकते.
एक विदारक चित्र कमी शब्दात
एक विदारक चित्र कमी शब्दात उभे केले. खुप छान.
.विषय चांगला आहे.
माझ्या " श्रावण" कवितेला
माझ्या " श्रावण" कवितेला प्रतिसाद दिल्याबद्दल
धन्यवाद.