मैत्री.....!!! तो अन ती दोघांमधली.....!!! भाग ५ (अंतिम)

Submitted by mahesh_engpune on 6 September, 2010 - 12:35

१० December ...!!! सकाळी तिनं त्याला एक छान sms पाठवला. त्याच्यासारखा मित्र तिच्या आयुष्यात आल्याबद्दल ती त्याचे आभारच मानत होती. पण तो असल्या आभार वगैरे मानायच्या कुठल्याच फंदात कधी पडायचा नाही. तिचा sms होता....

"Friendship is not finding gold 'gold' or 'silver' among the rocks of life...
It is accepting each other as coal till 'DIAMONDS' are formed through time...!! thanks... '....' for accepting me as I am..!! (the coal) "

तिच्या या sms वर मात्र त्याने as usual थोडा हटके reply पाठवला..

"कोळसा..? अहं हा...!! एकच शब्द..!! दगड...!!"

त्याच्या या reply वर ती मात्र जाम उखडली. मी याला इतकं समजवतीय की माझ्यासारख्या कोळष्याला तु हिरा करतोयस.. अन याला मात्र मी दगड वाटतेय..? वैतागुन तिने ही लगेच त्याला reply केला.

"मी ? दगड...? आहे ...मग...?"

तो मात्र स्वताशीच हसत होता. पण त्याला आज तिच्यासाठी गिफ्ट घ्यायचं होतं. लगेचच तो आपल्या boyfriend कडे जायला निघाला. पण काल त्यान पुणे सोडुन न जाण्याच्या commitment वर तिचा विश्वास नसावा म्हणुन की काय ती तो कुठे आहे म्हणुन त्यालासारखे sms करत होती. अन तो मात्र तितकाच नालायक अगदीच उद्दामपणे तिला "दगड.. '........' च्या घरी आहे.. अशीच दगड रहा" असच खिजवत होता. अन ती मात्र आता आपल्या त्या दगड असण्याचं explanation त्याला देत होती.

"'....' ऐ मला माहितीये OK मी काय आहे ते. दगड..? impossible..? मनान खुप हळव्या असणार्‍या माणसांना बाहेरुन तसं रहावं लागतं '....' नाहीतर त्यांच जगणं मुश्कील होतं. कधी कळणार तुला?"

तिच्या या उत्तराने त्याला न जाणे कुठला धीर यायचा. पण खुप छान वाटायचं. कदाचित माझी मैत्रीण माझ्या इतकी कुणाकडेच व्यक्त होऊ शकत नाही. तिला समजणारा मी केवळ एकमेव आहे असच काही त्याला वाटायाचं.
दुपारी तो अन त्याचा तो ' TRUE BOYFRIEND' दोघही तिच्यासाठी गिफ्ट शोधायला बाहेर पडले. काय बरं गिफ्ट द्यावं तिला याच विचारत तो होता, पण आत कुठेतरी तो तिला द्यायच्या गिफ्ट बाबत निर्धास्त होता. तो अन त्याचा BOYFRIEND दोघही तिला काय गिफ्ट घ्यावं यावर बरीच खलबते करीत होती. शेवटी त्यानेच मी तिला तिचा सगळ्यात जवळ असणारा, तिला नेहमी हवा असणारा "कृष्णा च" देणार आहे. असं म्हणत त्याच्याकडुन आपल्या कुठे कृष्णाची छान मुर्ती मिळेल याची माहिती काढुन घेऊ लागला.ह्म्म... तो यापे़क्षा काय निराळं तिला देऊ शकणार होता "तिचा कृष्णा"....!! तसं तिच्याकडे तिच्या त्या कृष्णवेडामुळे बर्‍याच जणानी दिलेल्या कृष्णाच्या मुर्त्या होत्या.पण तिला हवा असणारा तो कृष्णा फक्त त्याच्याकडेच होता. केवळ तोच तिला देऊ शकणार होता. झालं दोघानीही आपआपल्या गाड्यावर टांग टाकत चिंचवड चं काळेवाडीतल संगमरवरी मुर्त्या बनविणारी दुकानं पालथी घालायला सुरुवात केली. पण काही केल्या त्याला हवी तशी मुर्ती मिळत नव्हती. बस्स संगमरवराचीच पांढरी शुभ्र मुर्ती तिला द्यायची असच काही त्यान ठरवलं होतं. शेवटी बरीच शोधाशोध केल्यावर त्याला हवी तशी मुर्ती मिळाली. पण ती राधा-कॄष्णा ची जोडी होती.कसंबसं त्या दोघांनी त्या दुकानदराला फक्त कृष्णाच द्या म्हणुन पटवलं. तसं पाहिलं तर राधा-कृष्णा ची जोडी तिला गिफ्ट केली असती तर ती खुप खुश झाली असती, पण त्याने मुद्दामच फक्त कृष्ण घेण्याचा हट्ट केला. कसबस त्या दुकानदाराला पटवत किंमतीत घासाघीस करत ती ६ इंची पांढरी शुभ्र संगमरवरी कृष्णाची मुर्ती त्याने हातात घेत त्या श्यामसुंदराकडे खुपच विलक्षण नजरेने निरखुन पाहत होता. जणु काही आपला आतला एखादा अंशच तो त्या मुर्तीत फुंकु पाहत होता. तो 'कृष्णा' हातात घेत त्याने तिला फोन लावला अन तिच्याशी फारच मवाळ स्वरात बोलु लागला.

"अरे आठवतय मी म्हणायचो.. की मला तुला एक गिफ्ट द्यायचय..!! पण काय द्यावं ते सुचत नाही. आज मला ते गिफ्ट मिळालय.. तुझ्यासाठी..!! मी तुला दिलेल गिफ्ट..!! खुप आवडेल तुला...!! आत्ता ते माझ्या हातात आहे..!! तु सांग घेऊ का नको..!! कदाचित तुला ते या आधी मिळालंही असेल्..पंण हे मी दिलेलं गिफ्ट आहे,, तुझ्या मित्राने... फक्त तुझ्यासाठी..!! मग घेऊ ना..!!"

" '....' नालायका मला तुझ्याकडुन कुठलच गिफ्ट नकोय.. अन गिफ्ट देण्या इतपत शिष्ट कधीपासुन झालास रे तु..!! ह्.. आता तुला द्यायच आहे तर दे..!! काय घेतलयस..!!"

"अहं अहं.. एव्हढ्या सहज नाही.. तु guess कर..!! अन हो तु तुझ्या मित्राला ओळखतेस... so मी तुझ्यासाठी काय गिफ्ट घेतलय हेही तुला माहितीये...! बस ते तुझ्यापर्यंत येईपर्यंत वाट पाह.."

त्याचं ते आजच वागणं, बोलणं ती कधीच विसरणार नव्हती. किती आत्मीयतेने तो तिच्यासाठी काहीतरी घेत होत. तसं त्यानं आयुष्यात कधीच कुठल्या मुलीसाठी गिफ्ट घेतलं नव्हतं.पण तिच्याबाबतीत हे गिफ्ट निवडताना तो खुपच सहजपणे "हो मला हेच गिफ्ट द्यायचय तुला.." असं ठामपणे स्वतालाच समजावत होता. ती कृष्णाची मुर्ती घेऊन दोघही पुन्हा निघाले. आज गुरवार असल्याने त्याचा निरंकार उपवास होता. तो ही फक्त आपल्या एकुलत्या एक मैत्रीणीसाठी त्याने केला होता. त्या उपवासाचा थोडा असर आता जाणवु लागला होता. त्या कडक उन्हात सकाळपासुन फक्त दोन ग्लास पाण्यावर तो केवळ आज काहीही करुन तिच्यासाठी गिफ्ट घ्यायचच म्हणुन आपल्या BOYFRIEND बरोबर फिरत होता. त्या उपवासाच्या झळीमुळे कदाचित त्याला आजच ते गिफ्ट तिला देणं शक्य होणार नव्हतं, पण तरीही त्याने हे गिफ्ट तिला आज घेण्यासाठी हट्ट केला. दोघही चिंचवडवरुन निघाले असताना त्याला गाडीवर असतानाच त्या हैद्राबादच्या company तुन पुन्हा call आला.यावेळीस त्याला final offer मिळाली होती. 16000+ one bonus salary + incentives+ performance bonus. त्यानं लगेच उत्तर देणं अपेक्षीत होतं.पण त्याने त्या company च्या manager ला भेटुन बोलु म्हणुन गळ घातली. तसं त्यानही लगेच त्याला उद्याची appointment देत त्याच्या पुण्यातल्या office मधे त्याला भेटायला सांगितलं.त्याला मात्र कुठल्याही परिस्थीतीत आजच्या आजच तिचं ते गिफ्ट तिच्या हवाली करत तिच्या आयुष्यातुन कायमचा निरोप घ्यायचा होता. दिवसभराच्या त्या कडक निरंकार उपवासाने तो शिणला असुनही त्याने तिला आजच भेटायला येतो तुला म्हणुन गळ घातली. त्या आलेल्या शीणामुळे त्याने आपल्या boyfriend ला गाडी घ्यायला लावली. तसं त्यान मी हैद्राबादला जाणार आहे याची कल्पना तिच्या अगोदरही आपल्या boyfriend ला दिली होती. त्यानंही त्याच्या हैद्राबादला जाण्याला ती इतकाच विरोध दाखविला होता. अन अजुनही तो त्याला विनवत होता. पण तो ऐकेल तर शप्पथ....!! तशीच त्याची intense desire (गाडी )दोघांनीही तिच्या hostel कडे वळवली. सुमारे ३०-३५ किमी चा प्रवास करत दोघंही तिच्या hostel पासुन थोडं दुर एका चहाच्या टपरीवर येऊन थांबले.तिथुनच त्याने तिला फोन करुन बोलावलं. पण ती त्याचवेळेस कुठल्याश्या मंदीरात गेल्याने तिला यायला थोडा उशीर होणार होता. पण त्याला तिथ थांबण फारच जिवावर आलं होतं, त्याच्या त्या hopeless image मुळे...!! त्याला college मधुन pass-out होऊन एक वर्ष होऊनही त्याचा तिथला दबदबा अजुनही आहे तसाच होता. त्याच्या या hopeless image चा तिला कुठलाही त्रास होऊ नये याच प्रयत्नात होता, त्यामुळेच कधी एकदाचं तो तिच ते गिफ्ट तिला देऊन तिथुन सटकतोय असच वाटत होतं. तसच काहीस तो त्याच्या boyfriend ला समजावत होता. पण तितक्यात त्याच्याच hopeless group मधली काही टाळकी त्याला त्या टपरीवर दिसली. त्याची बैचैनी अजुनच वाढली.कसबसं त्या टाळक्यापासुन थोडं दुर जात त्याने तिला फोन करुन आहे तिथच थांबायला सांगत थोडी आपली बाजु safe करण्याचा प्रयत्न केला.पण त्या hopeless कार्ट्यांना नाही म्हटलं तरी या दोघांना इतक्या दिवसांनी college च्या आसपास बघुन जरा वेगळा doubt आलाच. पण त्याच्या boyfriend ने या ही कोंडीतुन आपली "If you can`t convince them, then just confuse them" ही routine philosophy वापरत परिस्थिती बर्‍यापैकी नियंत्रणाखाली आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला. फक्त आपल्या या मित्राच्या एकुलत्या एक मैत्रीणीला आपल्या त्या hopeless image मुळे कुठलाच त्रास होऊ नये म्हणुन. अन म्हणुनच तर तो नेहमी त्याला आपला true boyfriend म्हणायचा.कसंबसं त्या दोघांनी तिथुन काढता पाय घेत, तिला दुसर्‍या ठि़काणी यायला सांगितलं. ती मात्र बराच वेळ त्याची वाट पाहत त्याने सांगितलेल्या ठिकाणी येऊन घुटमळत होती.त्याला तिथं यायला मात्र थोडा उशीरच झाला त्या आपल्या hopeless कार्ट्यांना संभाळुन घेण्यामुळे. तिनं मात्र त्याच्या उशीरा येण्याबद्दल एका शब्दानेही तक्रार नाही केली. पण त्याला भेटण्याची उत्सुकता मात्र तिच्या डोळ्यातुन डोकावत होती. तिचे ते भिरभिरणारे डोळे आता जणु काही कोठेतरी स्थिरावले होते.तसे ते कधीच स्थिरावले होते पण आज ती मात्र स्वतालाच त्याच confirmation देणार होती.त्यानं मात्र अगदी वाहत्या वार्‍याच्या वेगात येत तिच्या हातात ते गिफ्ट ठेवत "आज तो दिवस आला.. मी म्हटलं होतं ना मी तुला एक खुप छान गिफ्ट देणार आहे.. जगावेगळं... माझं हे गिफ्ट तु कधीच नाही विसरणार..!! रुमवर जाऊन उघड..!! अन तुला माहितेय मी काय गिफ्ट आणलय ते..!!"

"हो.. मला माहितिये.. पण काय आहे तुच सांग ना..? मला तर वाटतं तु यात कृष्णाची मुर्ती आणलीय.. हो ना..? माझ्याकडे खुप आहेत.. खुपजणांनी मला हेच गिफ्ट दिलय..!!"

तिचं हे उत्तर ऐकुन त्याचा थोडा हिरमोड झाला होता. पण त्याला माहित होतं माझा कृष्णाच्या जवळपास बाकीच्यानीं दिलेला कुठलाच कृष्ण साधा फिरकु सुद्धा शकणार नाही. कारण त्याने आज स्वताचं अस्तित्वच तिला त्या कृष्णाच्या रुपाने दिलं होतं.लगेच त्याने आपल्या intense desire चा मोर्चा पुन्हा घराकडे वळवला. आज मर्गषीर्शातला शेवटचा गुरुवार होता ना..? पण त्याने तिच्या hostel च्या पुढे जात intense desire आपल्या boyfriend ला घ्यायला सांगत मागे बसुन तिला फोन लावला.
ती मात्र खुपच आनंदात होती. तो पांढरा शुभ्र कृष्ण त्याची ती झुकलेली नितळ नजर तिला पुर्ण मोहवुन टाकत होती. आजवर तिला मिळालेल्या कृष्णाच्या मुर्ती /फोटों मधे हा मात्र जरा वेगळाच वाटत होता. पण तरीही आत कुठेतरी तिला अजुनही हा कृष्ण माझ्या घरातल्या कृष्णाच्या फोटो इतका बोलका वाटत नाही असं वाटत होतं.तो तिला तसं साऱखच म्हणायचा तु मला पुर्ण ओळखतेस..!! फक्त ०.०१% तु मला ओळखत नाहीस..!! तेही मी तुला ते कधीच दाखवत नाही म्हणुन..!!! तिला त्याच्या या बोलण्याचा काहीच अर्थ लागायचा नाही. कदाचीत त्याच्या त्या ०.०१% मुळेच त्याने दिलेला तो संगमरवरी कृष्ण तिच्या घरात असणार्‍या कृष्णा इतका बोलका वाटत नव्हता. गाडीवर मागे बसुन तो तिला "आज तुझ्याशी काहीतरी बोलायच होतं खुप महत्वाचं होतं म्हणुन प्रत्यक्ष भेटुनच बोलायचं होतं. पण जाऊ दे you know my image..? नाही जमलं आज बोलायला..!! परत भेटल्यावर बोलु..!!" असच काहीसं बडबडत होता.
ती मात्र त्याला " अरे काय बोलायचं होतं ते आत्ता बोल ना मग.. नालायका..!! काय एव्हढं महत्वाचं बोलायचं होतं..!!" असं म्हणुन त्याच्या आजच्या या जरा हटक्या वागण्यामागचं कारण शोधु पाहत होती.
त्यानं मात्र तिला फोनवर सांगण टाळलं. ती आज जाम खुष होती. काहीतरी गवसल्याचा आनंदच तिच्या चेहर्‍यावर ओसंडुन वाहत होतं. आयुष्यभर ज्याच्या शोधात ती होती कदाचीत ते मिळाल्याचा भासच तिला सुखावत होता. तो मात्र वेगळ्याच mood मधे..!! आतुन त्याची चाललेली चलबिचल फक्त त्यालाच माहीत होती. त्याचं ते बोलणं तिला त्यावेळेस समजुन घ्यावसं वाटलच नाही, कदाचित त्या काहीतरी गवसल्याच्या आनंदात..!! पण तिने तो घरी पोहचताच त्याला sms केला.

" "...." त्या कृष्णाकडे बघुन इतकं छान वाटतय ना..जणु काही तो म्हणतोय, मी इथच आहे'.......' तुझा true friend - '....' thanks "...." तु आहेस...!!"

तिनं तिच्या भावना आता व्यक्त करायला सुरुवात केली होती. त्यानं मात्र दिवसभराच्या त्या कडक उपवासामुळे पटकन दोन घास पोटात ढकलत आपल्या mobile कडे झेप घेतली. आज काहीही करुन "मी तिच्या आयुष्यातुन कायमचं दुर चललोय हे तिला सांगायचच.. मग मला कितीही त्रास झाला तरी चालेल.." असच काहीसं वादळ त्याच्या मनात घोंघावत होतं. तिचा तो sms पाहुन त्या वादळाची तीव्रता मात्र अजुनच वाढली होती. तिलाही त्याने लगेचच reply पाठवला..

"'......" तु म्हणाली होतीस ना I NEED YOU MY FRIEND TILL I AM ALIVE.... मी नाही पण तो कृष्णा नेहमी तुझ्याबरोबर असेल... तुला कधीच "मी नाही" असं वाटणार नाही...!! नेहमी तुझ्याबरोबर ठेव त्याला..!! पुढं कधी वाटलचं मी पाहिजे होतो... कोणीच नाही भांडायला तर त्याच्याशी भांड..!! मी ".....च" दिलाय तुला..!! तुझाच येडा "....."...!!!"

त्याच्या या उत्तराने ती खुपच भावुक झाली, अन त्या कृष्णाकडे तो माझी किती काळजी करतो म्हणुन त्याचे आभार मानत होती. त्याच्या या msg नंतर पुन्हा दोघांचा संवाद sms मधुन सुरु झाला नेहमीसारखा..!!

"ह्म्म.... माझा कृष्णा.... माझा "....." ...!!"

तिचा sms जणु तिनं आज तिला जे गवसलयं त्याचंच confirmation तिच्या कॄष्णाला दिल्यासारखं होतं. तिचं ते इतका जीव लावणं त्याला खरच खुप त्रासवत होतं. त्यानंही लगेचच तिला

"दगड.. you are ultimate.. आजवर माणसांना दगडावर जीव लावताना पाहिलं होतं.. पण दगडांनी माणसांना...? विसरणार नाहीस ना '.....'ला " असाच sms करत आता माझी घटका भरलीये असचं सांगायचा प्रयत्न केला. पण यावेळी यशस्वी..!

" '....' , '.......' तुला कधीच नाही विसरणार. NEVER.. जोपर्यंत ती आहे तोपर्यंत...." ह्म्म.. त्याचं तिला मला विसरु नकोस हे विणवनं आजही तिला उमगलं नाही. एका बाजुने तिच्या आयुष्यातुन निघुन जाण्याची गडबड अन दुसरीकडे मला विसरणार नाहीस ना..? म्हणत तिला घातलेली गळ..!! त्याचं हे दुभंगलेल भ्रामिक वागणं..!! त्याचा होणारा त्रास यापासुन ती मात्र कोसों दुर..!! "मिलों के हे फासलैं .... तुमसे ना जाने क्युं..." या ओळीत त्याने मुद्दमच 'न' घातलेल प्रश्नचिन्ह तिला मात्र कधीच नाही जाणवलं. तो मात्र अगदीच focused, आपल्याला काय करायचय याच्या बाबत. शेवटी न रहावुन त्यानं तिला मला हैदाबादला जावं लागेल असा message पाठवला.

""......." त्या हैद्राबाद च्या company चा call आला होता मघाशी.. He was ready to give me 14000+incentive+1 bonus salary.. to join at Hyderabad.. |16 पर्यंत देतो म्हणतायत ते.. त्याने १६+ १ salary+ incentive+ performance allowance दिला तर I`ll think on that..!! उद्या १२ वाजेपर्यंत सांगायचय त्यांना..I think देतील ते..!! काय करु? मघाशी हेच बोलायचं होतं रे..! तु सांग..?"
ह्म्म क्षणार्धात काहीतरी गवसेला आनंद काहीतरी पुन्हा हातुन निसटुन जाणार म्हणुन कुठे गायब झाला कोणास ठाऊक...? फारच हिरमुसली ती. पण स्वताच्या भावना आवरत आपल्या त्या मित्राच्या career चा विचार करत, आपल्या व्यावहारिक मनाला जमेल तितकं बाहेर काढता येईल तितकं काढत तिनं त्याला reply केला.

":) मी आत्तच कृष्णाला म्हटलं, देवा आयुष्यात पहिल्यांदा खरा मित्र मिळालाय, please आता पुन्हा मला एकटं पाडु नकोस रे . तुला म्हटलं होतं ना '....' तो कुणालच माझ्या life मधे कायम ठेवत नाही... त्याला वाटतं कायम मी त्याच्याकडे जावं. अत्ताच तुझा msg यायच्या आधी म्हणत होते त्याला..! जा '.....' चांगली offer आहे ... माझं काय रे, मी अशीच तुला नको जाईन म्हणेन पण तुझ्या career चा प्रश्न आहे...!!"

तिचा हा reply पाहुन तो पहिल्यांदाच इतका confuse feel करत होता. तिच्या कृष्णाला आव्हान देणारा तो एकमेव तिच्या आयुष्यात होता. ज्यानं आजवर नेहमीच त्या देवाच्या अस्तिस्त्वाला आपल्या त्या खराब attitude अन प्रचंड potential च्या जोरावर झिडकारलं त्याला आज तिच्या 'तुला म्हटलं होतं ना '....' तो कुणालच माझ्या life मधे कायम ठेवत नाही'' या वाक्याने मात्र पहिल्यांदा आपण त्या देवापुढे हरतोय असं वाटु लागलं. माझ्या मैत्रीणाला अजुनही असंच वाटतय की माझं जाणं हे तिच्या कृष्णानेच पुर्वनियोजित केलं होतं. पण खरं तर तो पाठ दाखवुन पळत नव्हता. फक्त काही गोष्टी त्याला हव्या तश्या घडु नयेत, माझ्यापुढं तो देव हरु नये म्हणुन चाललेली त्याची धडपड, अन एक खरा मित्र म्हणुन माझ्या मैत्रीणीबरोबर जोवर तिला गरज आहे तोवर रहाणं यातली नक्की कोणती गोष्ट करावी? याच विचारात तो गेले कित्येक दिवस होता. अन आज तर निर्णयाचा दिवस होता. आपल्या एकुलता एक मैत्रीणीसाठी देवाला हरवायचं का नाही..? त्यानं फक्त ठरवणचं बाकी होतं, कारण एखादी गोष्ट त्यानं ठरवलीय अन ती केली नाही आजवर असं कधीच झालं नव्हतं , अन आज तो कुठलीतरी गोष्ट अर्ध्यावर सोडुन जाणार होता. विचाराच्या गलबतात हेलकावे खात असतानाच, इतक्यात त्याच्या inbox मधे तिचा msg येऊन धडकला.

"'....' please नको जाऊस रे... :`( ... please..."

तिच्या एका msg लाच तो विरघळला अन त्यानं देवाला हरविण्याचा निर्णय क्षर्णाधात घेऊन टाकला. त्यानं तिला तिचा कृष्ण म्हणुन, तिला मला थांबव, मी तुझ्या कृष्णाला खोटं ठरवणार आहे..!! असच जणु त्या msg मधुन तो तिला सांगत होता.

"To: '....';
Cc: '......'
From: कृष्णा;
'....', '....' किती रे भांडता..? '.....' माझं काम फक्त तुला खरा मित्र देण्या इथंपर्यंतच होतं.. त्याला तुझ्या आयुष्यात कायम ठेवायचं की नाही ते तुझ्याच हातात आहे... तु ठरव..!! He needs lots of understanding...!! जो मला नाही मानत , तो तुझ्यासाठी निरंकार उपवास करुन मला साकड घालतो..!! किती मानतो '....' तुला... थांबव त्याला...!! प्रत्येकवेळी मीच यायला पाहिजे का रे...!! तुझ्या '....'ने मला माझ्या राधेपासुन दुर केलं फक्त मी तुझ्याजवळ असावं म्हणुन...!!
तुझाच कृष्णा...!"

त्याचा हा message तिला पोहचायच्या आधीच तिचा message त्याला आला.

"'....' जाउ नकोस. I need you '....' please माझ्यासाठी नकोस जाऊ रे.... please."

तो अजुनही आपण जे करतोय त्याच्या परिणामांचा विचार करत उगीच घराच्या छताकडे टक लावुन पाहत होता. तिला मात्र त्याचं ते मौन राहणं खुपच hurt करत होतं. न राहवुन तिचा पुन्हा एक msg.

"'....' नको रे जाऊ मला एकटीला सोडुन.. please... please... मला हवायस तु. please... नको जाऊ.."

तिची होणारी तडफड पाहुन त्यालाही आता मौन सोडणं भाग होतं.

"दगड.. काय हवायस तु....? हरलोय रे तुझ्याकडुन..!! एका तरी decision वर आहे का ठाम मी..? तु हाकल्याशिवाय काही जाता येणार नाही मला तुझ्या आयुष्यातुन..!! दगड..!! असु देत माझा दगड..!!"

माझा दगड..!! त्याची आपली एक वेगळीच style होती आपल्या माणसांची काळजी करण्याची. आपले हजार शब्द तो तिला दिलेल्या एका शब्दासाठी मोडायला तयार होता.फक्त आपल्या एकुलत्या एक मैत्रीणीसाठी...! त्याचा तो sms मात्र तिच्या चेहर्‍यावर किती निर्भेळ हास्य उमटवुन गेलं हे पाहलाय तो त्या कृष्णाच्या रुपाने अनुभवायला तिथं होताच. अन त्याच आनंदात तिनं त्याला परत "खरंच नाही जाणार ना मग? please नको जाऊ." असा आदेशच दिला. तिच्या जीव लावण्याला मात्र तो तिचा हट्ट म्हणुन हेटाळत होता, अन तिलाच विचारत होता. "तुला असं नाही वाटत का तु हट्ट करतेस म्हणुन..?"
तिनं मात्र प्रमाणिकपणे प्रांजळ कबुली दिली.

"'....' हा हट्ट नाहिए..!! खरंच मला हवायस तु. please नको जाऊस."

अखेर तिच्या या लाडिक हट्टापुढे तो ही नमला असं तिला दाखवत "नाही जाणार..!! तु हाकलुन देई पर्यंत...!! promise me one thing you will never change your decision for ME..दगड... दगडासारखी रहा.. रहाशील ना..?" नाही जाणार 'इतक्यात' असच सांगत होता. त्याची दुरदृष्टी मात्र खुपच चाणा़क्ष..!! कदाचित त्याच्या ' I will make it happen attitude ' मुळे..! म्हणुनच तर तो तिच्याकडुन माझ्यासाठी तु तुझा कुठलाच decision बदलायचा नाही. असं promise घेत होता. पण तिला या सर्वांपेक्षा, तो फक्त माझ्यासाठी थांबला याचाच खुप अप्रुप वाटत होतं. पण ती ही त्याच्यावर तो लाडिक राग दटावत होती.

"गप..!! इतकं रडवलयस '....' खुप रडलेय मी तुझ्या जाऊ का वाल्या message पासुन आत्तापर्यंत..!!"

तो तिच्या या जीव लावण्याने आतुन खुपच गुदमरला होता.पण तो हे सगळं सहन करत होता. कुठल्याही तक्रारीविना. आपल्या colorful drop साठी. पण तिला तो हा त्रास कधीच त्यानं जाणवु दिला नव्हता. अन तसा तो कधीच दाखवणार नव्हता. म्हणुनच त्याने तिला sms केला,

"'......' बघ ना..? खरंय ना..? मी फक्त त्रासच देऊ शकतो.... Sorry रे.. फोन करुन शिव्या दे... मी काहिही नाही बोलणार.. तुला काय बोलायचय ते बोल.. मी फक्त ऐकेन...!!"

"फोन मघाशीच करणार होते, पण म्हटलं, नको काका, काकु तुला शिव्या देतील. मला खरंच नाही सहन झाली रे तु जायची गोष्ट. डोळ्यातुन पाणी आपोआप पडत होतं."

"'.....' , '....' जेव्हा जाईन ना, तेव्हा तु त्याच्यासाठी एक गाणं म्हणशील.. "बहती हवा सा था वो.. उडती पतंग सा था वो..." म्हणशील ना...? लई ताप दिलाय रे मी..!" या sms मधुन जणु काही तो तिला समजावतच होता की मी फक्त क्षणिक विसावा घ्यायला आलोय तुझ्या आयुष्यात..!! मला तुझ्या कॄष्णाने ज्या कर्यसिद्धीसाठी तुझ्या आयुष्यात पाठवलयं ते पुर्ण झालं की मी जाणारेय. ती मात्र उगीचच तो कायम राहिल याच वेड्या आशेवर अजुनही तग धरुन होती. अन त्याला "मी तुला जाऊनच देणार नाही '....' " असं म्हणत होती. पण तिचा हा आत्मविश्वास त्याच्या त्या खराब attitude समोर फारच तोकडा पडणार होता याची तसुभरही कल्पना तिला नव्हती. याचीच जाणीव करुन देण्यासाठी थेट वर्मावर बोट ठेवत त्यान तिला विचारलं.

"का बरं..? तुझ्या नवर्‍याला चालेल का आपल्या बायकोचा खरा मित्र...?"

त्याच्या या प्रश्नाला तिनं तितकच भाबडं पण खुपच संमजसपणे उत्तर दिलं.

"सोप्पयं.. !! ज्याला कोणी खरी मैत्रीण आहे त्याच्याशीच लग्न करेन मी..!!"

"अवघड आहे रे..!! नक्की लग्न करायचय ना? पण घाबरु नकोस मी तुझ्यासाठी केलेले गुरुवारचे उपवास वाया जाणार नाही. तुला नक्कीच चांगला नवरा मिळेल..! पण तु ते गाणं म्हणशील ना रे...!!"

"म्हणेन मी..!! लग्न करायचय रे...!! पण मला अजुन कळलं नाही ना माझा 'आदित्य' कुठयं ते? तो सापडला की करेन लग्न..!! "

"तुझा आदित्य..? काय रे समजा तुझा आदित्य तुला सापडला..अन घरच्यांनी त्याला नाही म्हटलं तर..? अन तशीच situation आली तर जाशील घरच्यांच्या विरोधात?" त्याचा प्रश्नार्थक reply...!

"आदित्य हे एक imaginary नाव आहे मी माझ्या नवर्‍याला दिलेलं. अन नाही रे '....' असं नाही होणार. करण आदित्य माझा होणारा नवरा आहे.. मग त्याला घरच्यांनी हो म्हटल्यावरच तो माझा नवरा झालेला असेल ना..?"

"काय अपेक्षा आहेत आदित्य कडुन..? मी करेन मदत तुला तुझा आदित्य शोधायला..!! चालेल ना..?"

"Tall, Dark, Handsome...caring, understanding..... चुकीच्या गोष्टी खपवुन न घेणारा.. fights with them.. थोडा येडा self made, माझ्यासारखा pure.. अन माझ्यावर मी जशी आहे तसा मनापासुन प्रेम करणारा. (थोड्या जास्तच होतायत ना रे'....' ..!!) पण ठीक आहे कृष्णाने कुठेतरी पाठवलच असेल ना रे?"

तिच्या त्या अपेक्षा ऐकुन त्याला मात्र मी खरच हिच्या इतक्या जवळ आलोय याच्यावर विश्वास बसत नव्हता. त्यानं ती चौकट खिऴखिळी करुन तिचा अक्षरश: चोळामोळा करुन ती दुर कुठातरी भिरकावुन दिली होती. अन त्याचमुळे त्याची एकुलती एक मैत्रीण त्याच्याजवळ आज मनोसोक्त व्यक्त होतं होतं आपल्या मनावरचे सगळे निर्बंध त्याच्या भरवश्यावर तो आहे मला संभाळायला या विश्वासावर तोडत, ती झर्‍यासारखं अवखळ वाहत होती. अन तो ही तिच्या त्या अवखळ प्रवाहात आपलं अस्तित्व टिकवुन होता.पण त्या पाण्यातल्या शेवळासारखं नाही, तर त्या झर्‍यातल्या एकसंध धारेसारखं...!! जिच्यामुळे त्या झर्‍याला अस्तित्व प्राप्त झालेल असतं, त्या धारेसारख त्याच अस्तित्वं तिच्या आयुष्यात..!! तो मात्र त्या झर्‍यासारखच pure रहायचा प्रयत्न करत होता. मनात कुठलीच अभिलाशा न ठेवता.

" '......' मी तुझ्यासाठी... तुझा आदित्यच तुला मिळावा म्हणुन.. तुझ्या घरच्यांनीही त्याला हो म्हणावं म्हणुन तुझ्या कृष्णाशीही भांडेल... All the best मैत्रीणी..!!"

ती मात्र त्यानं आदित्य साठी दाखवलेल्या support पेक्षा तो फक्त माझ्यासाठी थांबला म्हणुन खुप खुश होती. अन म्हणुनच त्याचे आभार ती मानत होती.

"thanku..!!अरे आदित्य साठी नाही..!!त्याच जाऊ दे..!! तु थांबलास म्हणुन..!! खुप खुप thanku..! please पुन्हा असं म्हणु नको रे. I need you dear... Miss you..!"

तो मात्र आता दुसर्‍यच विचारात गुंतलेला.

"what about that promise..? you will never change your decision for me..!! promise me.."
पण तिनं तिचा एक decision already बदलला होता आज... फक्त त्याच्यासाठी आपल्या true friend साठी..!

"तुझ्यासाठी मी already माझा एक decision बदललाय '....' आजच...!! मी कुणालाच आजपर्यंत I need You, मला तु हवायस तु असं म्हटल नव्हतं, अन म्हणनारही नव्हते, but I have changed that for you..!!"

त्याला तिच्या या उत्ताराने खुपच feel होत होतं. पाण्यात उतरुन कोरडं राहणं अशक्यच असतं याचाच तो प्रत्यय घेत होता. पण स्वताला जमेल तितक सावरत त्याने मी कसा वाईट आहे हे तिला समजावयचा प्रयत्न केला.

"का बदललास..? कृष्णाने सांगितलं म्हणुन...? नाही रे माझी एव्हढी लायकी.. तुझ्या कृष्णाला मी आज राधेपासुन वेगळ केलं... फक्त तो तुझ्याबरोबर रहावा म्हणुन...

"....." नको बदलु रे माझ्यासाठी.. college च्या कुठलयाही मुलीला काय रे पण पोरालाही विचार.. DON`T CHANGE YOUR DECISION FOR ME.... WHO IS AN IDIOT MECHIET..."

"He is an Idiot Mechiet for whole college.. but for me he is THE TRUE FRIEND... THE PUREST BUDDY who is always with me in every moment... मग काय बिघडल if I changed..? don't worry... झोप शांत. मला माहितिये माझ्या आयुष्यातला तुझा IMPORTANCE ... AND I PROMISE '....' whenever you`ll need me, I`ll be always be there.. तुझ्यासाठी... तुझ्याबरोबर.... "

तिचा हा confidence त्याला खुपच रुतत होता. पण शेवटी तो तिचा confidence त्याच्या त्या hopeless attitude समोर खुजाच ठरणार होता, हे तिला कुठं ठाऊक होतं. आजचा दिवस असंच दोघं एकमेंकाची मनधरणी करण्यात गेला. ती मात्र माझा true friend माझ्यासाठी थांबला.. फक्त मी थांब म्हणुन थांबला याच आनंदात mobile तसाच हातात ठेऊन त्याने दिलेल्या कॄष्णाच्या मुर्तीकडे पाहत झोपी गेली. अन तो त्याच्या वेगळ्या विचारात गुंतलेला. तिनं झोपेपुरता तरी त्याचा विचार थांबवला म्हणुन सुटकेचा निश्वास टाकत झोपेचे वाट पाहत तो तसाच बिछान्यात पडुन होता.दुसर्‍या दिवशी सकाळी तिनं त्याला call करत त्याला पुन्हा न जाण्याची गळ घातली. पण तो मात्र आपल्या त्या नकोश्या झालेल्या confidence वर हताश झालेला.तिला आपल्यापासुन जितकं दुर ठेवता येईल तितकं ठेवायचा त्याचा हर एक प्रयत्न तिला मात्र खुप hurt करुन जायचा. ती मात्र अजुनही त्याला न जाण्याचा आग्रह करीत होती.

"त्या माणसाला नाही म्हणुन सांग '....' मला काय माहीत नाही जा. नको जाऊ '....' please माझ्यासाठी..... तुझ्या मैत्रीणीला तु हवायस..... please:(" असच काही ती त्याला विनवत होती.
तो मात्र तिच्या या विनवणीने पुरता धर्मसंकटात सापडला होता. पण तिला काहीतरी उत्तर देण त्याला खुपच गरजेच वाटलं. त्यानं तिला मला तुला काहीतरी समजावयचय पण तुला ते समजावुनच घ्यायचं नाही अश्याच आविर्भावातला msg तिला पाठवला.

"काय रे दगड, माझ्या life चे decision ही तुच घ्यायला लागलीस रे..का..? please don't change your decision for me.. दगड हरलोय रे अक्षरशः हरलोय रे... नाही जाणार..!!"

नाही जाणार हे दोनच शब्द तिची कळी खुलवायला पुरेसे होते. पण त्याच्या त्या 'का' ला आज तिच्याकडे उत्तर होतं, तसं ते तिला फार आधीपासुनच गवसलेलं होतं, पण फक्त आज त्याला ती ते सांगणार होती. त्याच्या त्या "don`t change your decision " वाल्या वाक्याचा तिनं अर्थ लावायचाही प्रयत्न केला नाही.कदाचित त्याच्या "नाही जाणार" या दोन शब्दांच्या पुढे ते गुढार्थी वाक्य तिनं मुद्दामुनच झाकोळुन टाकलं होतं. तो मात्र तिला काल त्याचं तिच्या hostel जवळं येणं बरोबर नव्हतं म्हणुन तिची, कालच्या येण्याबाबत माफी मागत होता.

"काल मी तुझ्या hostel जवळ यायला नको होतं. आता पुन्हा कधीच नाही येणार तिथं.अन आणखी एक फक्त मलाच हक्क आहे तुला त्रास द्यायचा बाकी दुसर्‍या कुणाचाच नाही. माझ्यामुळे तुला कुणी बोलावं अस नाही वाटत रे मला.. काल माझा true boyfriend बरोबर होता म्हणुन सगळं निभावल रे.. पण प्रत्येकवेळी तो नसनारेय.. मला संभाळायला.... माझी image कशी आहे that you know.. म्हणुन मी तुला आता तुझ्या hostel च्या इथं नाही भेटणार.."

ह्म्म ती मात्र आज कुठल्या मुड मधे होती कोणास ठाऊक.. त्याच्या या (गैर) समजुती वर
"ठीक आहे मग मी येत जाईन तुला भेटायला.. पुण्यात.. मी येउ का आज तुला भेटायला.. मला ice-cream खायचय.. " असं म्हणत त्याला प्रत्येकवेळी चितपट करत होती. अन तो ही प्रामाणीकपणे "हरलोय रे.. अजुन कितीवेळा हरवणारेस.." असं कबुल करायचा. त्यानं फोन करुन त्या company ला नाही म्हणून सांगितलं अन जोपर्यंत ती ला job मिळत नाही तोपर्यंत काहीही झालं तरी तिच्याबरोबर रहायचं.. अगदी काहीही झालं तरी...!! पण ज्या दिवशी तिला job मिळेल त्या दिवसानंतर काय..? ह्या प्रश्नाच उत्तरही त्यानं जवळपास शोधुन काढलं होतं.. तेही त्याला पटणारं.. आयुष्यभर मनाने निर्णय घेणारा पहिल्यांदा डोक्याला झुकतं माप देणार होता. अन त्यामुळेच त्याच्या मनाची घालमेल होत होती. म्हणे त्याला पटणारं उत्तर...!! दुपारी तिनं त्याला call केला. अन पुन्हा ' तो थांबला' म्हणुन त्याचे आभार मनु लागली. पण त्यान थेट तिच्या मर्मावर बोट ठेवत तिला विचारलं,

"काय हवायस तु.. मुर्ख. नालायक.. दगड.. तुझ्याजवळ तुझा कृष्णा आहे ना मग माझी काय गरज आहे रे.. तो आहे ना तुला संभाळायला.. मग काय हवायस तु.. काय होतं माझ्या असण्याने अन नसण्याने..?"

त्याच्या या प्रश्नावर तिन "तु अन पप्पा दोघच हवेत.. बाकी कुणीच नकोय मला.. फक्त तुम्ही दोघंच हवेत.. मला तो नकोय तु हवायस...!!" असंच भावुक होतं त्याला indirectly सांगत होती की ' तु माझ्या आयुष्यात किती महत्वाचा आहेस' life चा SECOND HERO मला सापडलाय.. life चा second hero...!! किती अत्मविश्वासाने ती म्हणत होती "तु अन पप्पा दोघच हवेत.. बाकी कुणीच नको..!!" आज पप्पां अगोदर तो आला होता. त्याला याच खुपच अप्रुप वाटत होतं.अन तिला तसं तो म्हणालाही की "तु आज पप्पां अगोदर माझं नाव घेतलसं.... का...? मला याचं खरं उत्तर हवय..?" तिला मात्र या प्रश्नाचं उत्तर त्याला देत येत नव्हतं. कालपासुन ती त्याच्याजवळ जमेल तितक व्यक्त होत होती. जणु काही आयुष्यभर ज्याची वाटत ती पाहत होती ते तिच्याजवळ आज होतं, पण "हो मला हेच हवं होतं..!!" हेच तिला व्यक्त होता येत नव्हतं. तिनं फोनवर उत्तर देणं टाळल. पण त्याला msg मधुन त्याच्या त्या "का" च उत्तर पाठवलं.

"खरं उत्तर..
मी तुला म्हणते ना, कृष्णा माझा 'सखा' आहे.. एकमेव्दीतीय... पण मी त्याला फक्त अनुभवु शकते. पाहु नाही शकत.. त्याच्याशी मी बोलते, ती उत्तरेही माझ्याच मनातुन आलेली असतात, माझा स्वताशीच साधलेला संवाद असतो तो.. माझ्या कृष्णाचं दृष्यस्वरूप आहेस तु '.....' म्हणुन तु हवायस मला.. मला तो नकोय्, तु हवायस..!!".

हो तिला तिचा कृष्णाच मिळाला होता त्याच्या रुपाने, तिची प्रत्येक अधुरी इच्छा पुर्ण करायला..!! तिचं अव्यक्त जगणं सत्यात उतरावयला...!! त्याला मात्र तिला त्यानं विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर आठवत होतं. तिच्या आयुष्यातली पाच महत्वाची माणसं..!! अन तिच्या उत्तरात तो पहिल्या पाचात शेवटीही नव्हता. त्याचा नंबर होता सहावा...!! फक्त त्याच्या त्या अतुट potential अन खराब attitude मुळे, अन आज ....!! आज आयुष्यातल्या 1st hero च्या आधीही त्याने स्थान पटकावलं होतं. तिची ती अभेद्य चौकट त्यानं तोडली होती. आयुष्यात तिनं कुठलच decision कधीच कुणासाठी बदललं नव्हतं.. पण आपल्या कृष्णासाठी तिनं आपले सगळे निर्णय बदलण्याची तयारी ठेवली होती. पण तिचा कृष्णाच तिला "don`t change your decision for me.. " असं म्हणत होता. ह्म्म त्याचं तिला तो संगमरवरी कृष्णाची मुर्ती देणं अन तिन त्याला तिच्या आयुष्यातला कृष्णा माननं..!! सगळं कसं अगदी नदीनं अगदी सहज अवघड वळणे घ्यावीत तसच काहीसं होतं. पण त्याला फक्त झर्‍यासारख अवखळ वाहणंच माहीत होतं. पण नदीची अवघड वळणं त्याच्या कधीच पचनी पडणार नव्हती.आज ती मात्र भलतीच खुष होती. त्याच्या सांगण्यानुसार ती त्याच्यासाठी ते 3-च "बहती हवा सा था वो... उडती पतंग सा था.." हे गाणं थोडं बदलुन म्हणणार होती. तसं तिनं तिच्या एका social networking site वर च्या account ला जगजाहीर ही करुन टाकलं होतं. अन त्याला तिचं account check करायला सांगत होती. तिनं तिच्या account ची base line लिहिली होती.. त्या गाण्याच्या video सहीत..

"Dedicated to my TRUE FRIEND, in this song they are searching their IDIOT FRIEND..and saying बहती हवा सा था वो.., but I am experiencing it in present... बादल आवारा है वो..!! तप्ती धुप मैं छाव के जैसा, रेगिस्तान मैं गाव के जैसा, दिल के घांव पे मरहम जैसा 'है वो'..!! "

तिचा मात्र त्या "है वो" वर खुपच जोर होता. तिच्या account ची theme पाहुन त्यानं तिला

"बरं बाबा 'है वो'..!!आज काल खुपच intensity दिसतेयं तुझ्या वागण्यात, बोलण्यात..!! केव्हढ्या intensity ने पाठवला होता मागचा message दोन वेळा आलाय तो माझ्य inbox मधे. I think I`ve break that boundary.. हो ना?"

असं म्हणत तिच्या त्या वागण्याचं जणु काही मीमांसाच करीत होता. तिनं मात्र ला
"तुला ती intensity आवडली नाही ना..? खरं सांग..!! and don`t you think you have broken that boundary..?" असा प्रतिपश्न करीत "हो.. नालायका.. तु तोडलीस ती चौकट.. माझी अभेद्य चौकट..!!"

असंच काहीसं मनात म्हणत त्याच्या त्या प्रश्नाचा होकारार्थी उत्तर देत होती. तो मात्र तिला फक्त इतकच म्हणत होता की

"मला तुझी ती intensity खुप आवडली. तु ते गाणं ऐकलयसं का रे.. हवास तु हवास मजला हवास तु..?".

ती मात्र त्याचा हा message पहुन आवकच झाली, अन खरंच माझा कॄष्णाच मला ओळखु शकतो...!! म्हणुन थक्क होत होती. खरंतर त्याला आधीचा message पाठविताना तिलाही हेच गाणं गुणगुणावसं वाटलं होतं. अन तिचं ते अव्यक्त जगणं, तो किती सहज व्यक्त करुन , उलगडुन दाखवत होता. आता तिला काहीच बोलण्याची गरज नव्हती. दोघांचाही संवाद आता मौनातुनच पुढे जाऊ शकला असता, पण तो तिच्या आयुष्यात आला होता ते तिला व्यक्त व्हायला जमावं यासाठी म्हणुनच..!! मग तिला तो मौनातुन बरा संवाद साधु देणार होता..? त्याच्या त्या message ला तिनंही तेव्हढ्याच उत्सुकतेने reply केला,

""....." देवा...!!! नालायका, म्हटलं होतं माझ्यासारखा.. पण इतका..? अत्ता तुला मेसेज टाईपत होते तेव्हा हेच गाणं strike झालं होतं, माझ्या मनात..!!"

जणु काही त्याला ती हेच सांगत होती की "आता तु मला सर्वस्वी ओळखतोस..!!" अन हेच तो तिला विचारत होता की आपण एकमेंकाना जरा जास्तच ओळखायला लागलोय नाही..? " त्याच्या या भावुकपणावर ती मात्र अगदीच मिष्कीलपणे "अरे आपण कधीपासुन एकमेंकाना ओळखतो..!!" असं म्हणत त्या भावुक वातावरणाला थोडसं निवळण्याचा प्रयत्न करीत होती.दरम्यान आज तिनं संध्याकाळी आकाशात तुटणारा तारा पाहताच त्याला फोन करत मनातली एखादी wish त्या तुटणार्‍या तार्‍याकडे मागण्याची गळ घातली. तिनं जे मागायचं ते मागितलं. आज पहिल्यांदा ती त्याच्यासठी काहीतरी मागत होती. त्यानं मात्र आज तिनं जे काय मागितलयं ते कधीच पुर्ण होणार नाही असंच काहीतरी अभद्र मागितलं होतं. किती ओळखत होता तो तिला, आज ही जे काही मागणर आहे ते फक्त माझ्यासाठीच मागणार आहे, माझ्याशी संबधीतच मागणार आहे हे तो चांगलच जाणुन होता.आजवर तिनं देवाकडे फक्त आपल्या कुटुंबियांकरीताच मागितलं होतं. पन आज मात्र पहिल्यांदा कुणा परक्या करिता ती एव्हढ्या तन्मयतेने काहीतरी मागत होती. तिनं त्याला विचारलं ही "तु काय मागितलसं..?". त्याने प्रामाणिकपणे "मी मागितलं आज तु जे मागितल्म ते कधीच पुर्ण नाही होणार..!!" तिला सांगत अचंभ्यात टाकलं. ती मात्र त्याच्यावर "नालायका आजच मागायाचं होतं का तुला असं..!! किती महत्वाची गोष्ट मगितली होती मी.." डाफरत होती. पण त्याला ती काय मागणार होती हे माहिती होतं. त्याच्या त्या अतुट आत्मविश्वासापुढे तिची अपार श्रद्धाही आता तोकडी पडु लागली होती. इतका तरी तो तिला नक्कीच ओळखत होता की ती आज काय मागणार होती त्या तुटलेल्या तार्‍याकडे. अन ती ही त्याच्या तळ नसणार्‍या अथांग मनाची खोली मोजायचा प्रयत्न करत होती. त्याचं मात्र एकच उत्तर "तु आज जे मागितलं ते जर माझ्याशी संबधीत असेल तर ते कधीच पुर्ण नाही होणार.." ती मात्र त्याला प्रांजळपणे त्याला सांगत होती "मी आज त्याला मागितलं होतं की "...."ला कायम सुखात ठेव..!!". अन त्यानं ही तितक्याच तत्परतेने तिला आज त्यानं असं का मागितलं याचं explanation दिलं, "मी म्हटलं तु जे मागितलं ते आज तुला मिळणार नाही कारण मी तुझ्या कृष्णाला राधेपासुन वेगळं केलयं.. फक्त तो तुझ्याबरोबर असावा म्हणुन.. मग तो मला कसा काय सुखी ठेवेल..?"त्याच्या या मार्मिक उत्तरावर तिनंही तितकच मार्मिकपणे उत्तर दिलं.

"'....' कृष्णा-राधा हे अद्वैत आहेत्.ते युगानुयुगे एकत्र आहेत.. आणी तसं तर ते दोघं ,जेव्हा कृष्णा गोकुळातुन जातो तेव्हाच दुर झाले होते. पण मनाने they are always together. so don`t worry. नक्की पुर्ण होईल माझी wish.". तिचा तो भाबडेपणा आज त्यालाही तिच्यापुढे नमवत होता. अन तो ही मग "Tension नको घेऊस.. मनापासुन मागितलेली कुठलीही wish पुर्ण होतेच रे...!!"
असं म्हणत तिला मात्र खोटी सहानुभुती देत होता.त्याच्या त्या विचित्र वागण्याचा अर्थ लावायचा प्रयत्नही ती करत नव्हती, आपला कृष्णा आपल्या जवळ आहे हेच तिला खुप होतं. अन तो मात्र कुठल्यातरी विवंचनेत..!! नेहमी आर या पार असाच आविर्भाव असणारा आज मात्र द्विधा मनस्थित.आज मात्र त्यानं true friend अन त्याचं स्वताचं अस्तित्वं या दोघांतलं द्वंद कसं बसं टाळलं होतं. पण केव्हा ना केव्हा तरी हे द्वंद होणारच होतं. पण त्याला फक्त जिकंणच माहीत होतं. अन आज ते द्वंद टाळण्याचं कारण म्हणजे त्यालाही मनापासुन त्या true friend ला हरवायचं होतं. जिला तो म्हणायचा "तु मला हरवलसं..!! अक्षरशः हरवलयसं...!!" तो मात्र तिला "अरे तु तो बाजिगर मधला डायलोग ऐकलाय का रे..? हारकर जितने वालें को बाजीगर कहते है..!! मला बाजिगर नाही व्हायचं..!!" असं म्हणत "मी तुला सहज हरवु शकतो.." असंच तिला काहीसं समजवात होता. अन ती मात्र तितक्याच बिनंधास्तपणे त्याला "तु मला नाहीच हरवु शकत" असं त्याचं ते potential माहित असुनही डिवचत होती. तस्म पाहिलं तर त्याला आज खुप आनंद व्हायला हवा होता. आजवर त्याने त्याच्या आयुष्यात कुठली गोष्ट ठरवली अन मिळवली नाही असं झालंच नाही. अन आज तर त्याला त्याच्या आयुष्यातली सर्वात अवघड गोष्ट साध्य झाली होती. काहीतरी मिळवण्यातला आनंद कसा लूटायचा हेच त्याच्या कडुन तिनं शिकलं होतं, पण आज त्याला मात्र या काहीतरी मिळवण्याचा खुप त्रास होत होता. तिची ती चौकट तोडणं त्यानं साध्य केलं होतं पण स्वताचं अस्तित्व गमावुन. अन त्यामुळेच त्याला तो त्रास होत होता. अन त्याच्या त्या आधिच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा तर त्याला आणखिणच संभ्रमात टाकत होत्या. त्याचं ते उरल्या सुरल्या अस्तित्वाचं बोलणं तिला कळत नव्हतं. तिला फक्त कळत होता तो आपला true friend, तिनं तिच्यासाठी , तिला जसा हवा तसा घडवलेला..!!
ती काळरात्र त्याला मात्र कुठल्याश्या गुढ अंधारात चाचपडत , फरफरट होती ते दिवसाच्या त्या भयाण काळोखात कुठंतरी गडप करण्यासाठीच. रात्र संपली. कसंबसं त्यानं आवरलं. अन थोडं relax होतं दिवसातला पहिला sms आपल्या त्या उरल्या सुरल्या अस्तित्वाच्या खाणाखुणासहित तिला पाठवला.

"तु काल मी सुखी राहवं हे मागितलेलं नव्हतं..!! अन आणखी एक.... तु तुझा decision बदललास..!! माझ्यासाठी... you have brake that promise. नको बदलुस स्वताला माझ्यासाठी.. दगड.. माझा दगड.. का एव्हढा जीव लावतेस...? तेव्हढी लायकी नाही रे माझी..!! माझा दगड..!!! "
असं म्हणत तो तिला त्यानं तिच्याकडे मागितलेल्या त्या promise बद्दल विचारणा करत होता. कारण एखादा शब्द एखाद्यासाठी मोडणं किती तापदायक असतं ह्याचा अनुभव तो घेत होता. त्यानं तिच्यासाठी त्याचे कित्येक शब्द मोडले होते. फक्त आपल्या एकुलत्या एक मैत्रीणीसाठी, तिच्याकडुन कशाचीच अपेक्षा न ठेवता. त्याची ती दोन्ही रुपं इतकी intense असुनही तिला ती जाणवत नव्हती. आपला true friend अन तो... यामधे तिला फक्त अनुभवायचा होता ते तिचा "कृष्णा.." तिचा "true friend..." तिला १००% टक्के ओळखणारा... समजणारा..!! अन तोच true friend त्याला होणारा तो ताप पाहुन कदाचित तिलाही त्याची कीव आली असावी, म्हणुनच तिनं

"I haven`t change any of my decision "......" इतक्या सहज नाही.. &i haven`t brake that promise... अजुन तरी नाही.. अन लायकी..? तु कोण तुझी लायकी ठरवणारा..? आणी मी नाही बदलेललं स्वताला. इतका नको विचार करु "...." don`t worry. काहिही झालं तरी तुला त्रास देणार नाही. अन तुला सांगितलं ना एकदा , देवबप्पानं मला सांगायला पाठवलयं की त्याचा तुझ्यावर किती जिव आहे. जेव्हा तु त्याला जीव लावशिल ना तेव्हा मी जाईन."

असं म्हणत त्याला जितकं त्या त्रासाच्या झळीपासुन दुर ठेवता येईल तेव्हढं ठेवायचा प्रयत्न करीत होती, आपल्या आयुष्यायातला एकमेव्दितीय सखा म्हणुन..!! किती सहज म्हणुन जायची ती "मी तुला कधीच त्रास नाही देणार..!!". पण तिच्या त्याच्या आयुष्यातल्या अस्तित्वामुळे त्याला होणारा त्रास त्यानं नेहमीच "मी फक्त त्रासच देऊ शकतो.. I can only hurt people.. and I don`t care for them.. my life on my terms.. मला नाही कुणाचीच गरज.." असल्या खराब attitude च्या धारदर वाक्यांखाली चिरडुन टाकायचा. ते तिला कधी कळलंच नाही अन कधीच कळणार नव्हतं त्याच्या त्या ०.०१ % अलिप्तपणामुळे...!! तो मात्र अजुनही तिला कालच्या "त्या" wish बद्दलच विचारत होता.

"मी विचारलं होतं तु ते मागितलं होतसं की आणखी काही वेगळं.. माझ्या विचारावर तुझा पुर्ण control आहे... तु थांबव ... मीही थांबेन.. मी म्हटलं होतं काहीही माग...देणार..!! पण आता भिती वाटायला लागलिये रे..!! दगड तु असताना मी नाही त्याला जीव लावणार.. जसं तुला हवास तु मला हवास तु तसचं मला पण हवीस तु हवीस तु..!!"

त्याच्या या sms वर ते मात्र गोंधळात पडली, पण तिनं तसं दाखवलं नाही. खरंतर अजुन तर त्याचं विचित्र वागणं कुठं सुरु व्ह्यायचं होतं. त्याच्या त्या sms वर त्यानंही मला काहीच नाही कळालं तुला काय म्हणायचय अशा आविर्भावात तिनं reply केला,

"काय थांबवु..? कशाची भिती वाटतिये..? काळजी नको करुस्..तुला त्रास नाही देणार.. कधीच नाही. आणी तु त्याला जीव लावशिलच. मग तुला दुसर्‍या कोणाचीच गरज नाही राहणार."

आता मात्र त्याला सर्व सहन करण्यापलीकडे गेलं होतं. तो तिला म्हणत होता

"अरे मी खुप वाईट आहे.. माझ्या नादी नको लागुस.. hopeless आहे रे मी.. मला असं वाटायला लागलंय की मी तुला बिघडवतोय..!! खुप स्वार्थी आहे रे मी..!!". त्याची ती धडपड आत्ता कुठे तिला स्पष्ट दिसु लागली होती. तिनं त्याला मधेच टोकत

"अरे नालायका.. एव्हढी प्रस्तावना का देतोस..? तुला काय म्हणायचयं ते एका वाक्यात सांगु.. just stay away from me..!! हो ना...? अन तु काय बिघडवलयस मला..?". तिच्या त्या उत्तराने मात्र त्याच्या त्या उरल्या सुरल्या अस्तित्वाच्या ठिकर्‍या ठिकर्‍या उडाल्या.

"हो मला हेच म्हणायचंय.. नको रे मला एव्हढा जीव लावुस..!! खरंतर तुझी ती चौकट तोडल्यावर मला खुप आनंद व्हायला हवा होता. पण माहित नाही का खुप कसंतरीच feel होतय रे.. तुझी ती चौकट मला तोडायचीच होती रे.. पण...!! नको येऊस त्या चौकटीच्या बाहेर..!! आजवर मी माझ्या मनाचच ऐकत आलोय रे पण मी आयुष्यात पहिल्यांदा कुठला तरी decision मी डोक्याने घेणार आहे.. ज्याचा मला आयुष्यभर त्रास होणार आहे, अन तो मी सहन करायला तयार आहे.. just stay away from me.. I can just hurt people..!! मनासारखं वागलो तरी अन नाही वगलो तरी.....!! just stay away from me..!! ".

त्याला आता बोलायला शब्दही जड जात होते. तसाच जड आवाजात त्याने फोन cut केला. ती मात्र त्याच्या बोलण्याच्या खोलीचाच अर्थ शोधत होती. शुन्यात नजर तर दोघांचीच होती. तिचा त्याच्या मनाचा थांग शोधण्याचा हरएक प्रयत्न आज तोकडा पडत होतं. क्षणात हळवेपणाचा कळस गाठणारं त्याचं मन क्षणात मात्र "stay away from me" म्हणण्या इतपत निष्ठुर कसं काय होतं होत हेच तिची ती "स्थिरावलेली" नजर शुन्यात शोधत होती. इतक्यात त्याचा sms

" "........" तुझ्याइतका जीव नाही लावु शकत मी तुला...!! तुझी जी boundary मी तोडली त्याबद्दल sorry.. आता ती चौकट परत नको उभी करुस... फार त्रास होतो रे... मी STAY AWAY FROM ME म्हणतोय कारण माझी पडलेली boundary मी परत आखलिय.... DON`T GET EMOTIONALLY INVOLVED WITH ME....!! दगड मला समजुन घेणा रे...!!".

त्याचं ते आर्जव तिला मात्र खुपच hurt करुन गेलं. जो तिला म्हणायचा "मला समजणारी तु एकमेव आहेस .. माझी एकमेव एकुलती एक मैत्रीण..!!!" तोच आज तिला तु तरी समजुन घे ना मला असं आर्जव तिला करत होता. तिनं जमेल तितकं आपलं मन आवरत मोठ्या शिताफिने आपल्या मनातली बोच तशीच सलत ठेवुन त्याला मात्र धीर द्यायचा म्हणुन reply केला.

" "...." तुझी एकुलती एक मैत्रीण मेली नाहिए.. जिवंत आहे अजुन..!! समजुन घे म्हणायची गरज नाही मला.. मी आहे .. don`t worry..!! अजुन एक ती चौकट मी एका अटीवर नाही उभी करणार , तु ती boundary पुन्हा आखणार नसशील तर... :)".

तिचा तो sms त्याला त्या संभ्रमाच्या जाळ्यात आणखीनच करकोचुन आवळत होता. पुर्णतः हतबल झालेल्या निशस्त्र योध्यासारखी त्याची झालेली गत त्याला सुखाने जगुच देत नव्हती. समोरच्याला मी सहज चारी मुंड्या चित करु शकतो हा attitude, मी जिंकणारच हा अतुल्य आत्मविश्वास आपोआपच त्याच्या पाठोपाठ आणत होता.. अन तरीही त्याला समोरच्याला हरविण्याची इच्छा होत नव्हती. ती मात्र त्याच्या "मी तुला तुझ्याइतका जीव नाही लावु शकत" या एका वाक्याने व्यथीत झाली होती. पुन्हा त्याने दिलेल्या त्या संगमरवरी कृष्णाकडे मोठ्या आसुयेने पाहत त्याच्याकडुनच तो च्या या विचित्र वागण्याचं रहस्य उलगडु पाहत होती. पण तो संगमरवरी कृष्ण काहीच बोलणार नव्हता अजुन तो बोलायची वेळ यायची होती. ती आज कुठल्याश्या क्लासच्या placement oriented course ची aptitude द्यायला जाणार होती. तसं तिनं त्याला कळवलंही होतं. त्याने तिला aptitude साठी best luck ही wish केलं होतं. पण तिच्या मनात त्याचं ते वाक्य खुप खो घाव करुन गेलं होतं. "मी इतकी का वाईट आहे की माझा कृष्णाही आज मला मी तुला तुझ्याइतका जेव नाही लावु शकत असं म्हणतोय..?". फारच हळवी अन भाबडी.. होती ती..!! तिनं संध्याकाळी तिची aptitude संपल्यावर त्याला msg करुन कळवलं अन पुन्हा hostel ला जायला निघाली. तो मात्र खुपच अस्वस्थ..!! ती aptitude ला जायच्या आधी त्याने तिचं orkut profile check केलं होतं. त्याची tag line होती. "I realized many facts...!!". त्याला त्या tag line चा उद्देश बरोबर समजला होता. म्हणुनच त्याने तिला त्या tag line च्याच punch चा reply पाठवला.

"one true fact that I realized : I can`t stay away from you..!! I need you as you need me. दगड I tried a lot but I CAN`T STAY AWAY FROM YOU...!! दगड.. the most hurting thing is that I HAVE TO.." त्याच्या या अतरंग वागण्याचा अर्थ आता तिला हळुहळु उलगत होता. पण त्याला मात्र तिच्या त्या orkut profile च्या tag line लिहिण्या मागचा उद्देश माहिती होता.पण तो उद्देश त्याला तिच्याकडुनच ऐकायचा होता. तसं त्याने तिला विचारलही अगदी सहज आपल्या नेहमीच्या hopeless style ने "काय रे दगड काय facts कळलेत रे तुला.?"
त्यावर तिनं मात्र त्याच्या काळजाचा बरोबर वेध घेणारा reply पाठवला.

"I realized so much facts today, त्यातले दोन महत्वाचे १. कृष्णाला असच वाटतं त्यानं जे अनुभवलं ते मी ही अनुभवावं..!! २.महत्वाचं म्हणजे कोणी जीव लावावा इतकी माझी लायकी नाही." तिच्या या उत्तरावर तो मात्र खुपच हळवा झाला. आता मात्र त्याने जे त्याला तेच केलं. पटकन तिला फोन लावत "कुठे आहेस..? १५ मिनिटात मी येतोय तिथं..!! मला तुला भेटायचय..!! कुठंयस..?" विचारलं. ती मात्र त्याला "काही गरज नाही मला भेटायला यायची. बस स्टोपवर आहे. येईल लगेच बस. नको येऊस..!!" असं म्हणत त्याला टाळायचा अयशस्वी प्रयत्न केला.खरंतर तिला त्याच्याहुन जास्त उत्सुकता होती त्याला भेटायची, अन त्याला का तु मला माझ्याइतका जीव नाही लावु शकत हे विचारायची..!! पण तिचं ते 'डोक्याने विचार करणारं समजुतदार मन' तिला खुपच जखडुन ठेवत होतं. तो मात्र झर्‍यासारखा खळखळाट करणारा...!! २० मिनिटातच त्यानं ती उभी असलेला बस स्टोप गाठला. अन चटकन तिला मागे बसायला सांगत "मी सोडतो तुला hostel त्या निमित्ताने थोडं बोलणं होईल" असं म्हणत तिला गळ घातली. ती ही त्याला काहीतरी सांगणार होती. खरंतर तिला त्याच्या त्या अबोध वागण्याचं कारण विचारणार होती. पण मनातुन खुपच शाशंक होती ती. पण गोष्टी इतक्या flawlessly कधीच होत नसतात हे तर दोघांनाही आता खुपच सवयीचं झालं होतं. ती त्याच्या येण्याची वाट पाहत असताना त्या दोघांच्या 'त्या' common friend चा तिला फोन आला होता. तो नुकताच मुम्बई वरुन कुठल्याश्या company त interview देऊन स्वारगेट्ला आला होता. त्याने तिला दगडुशेठला जाऊया म्हणुन स्वरगेटला बोलावलं होतं. तिची फारच गोची झाली होती. पण त्याने सारं संभाळुन घेतं गाडी सरळ स्वारगेटला वळवली. अन त्या दोघांच्या common friend ला अवघ्या १०-१५ मिनिटांत गाठलं. तिथं त्याच्याशी थोड्या गप्पा झाल्यवार आता तो "मी निघतो.. तुम्ही दोघे बसने जा.." म्हणत त्यांचा निरोप घेण्याच्या तयारीत होता. दोघांनाही एकाच ठिकाणी जायचं असल्याने त्याने तिला त्या common friend बरोबर जाण्याची request केली. पण तिनं मात्र त्या common friend ला "मला आज "......"बरोबर बोलायचयं कार्ट लय बिघडलयं. जरा त्याला दम भरायचा.. मला त्याच्याबरोबर जायचय आपण पुन्हा केव्हातरी जाऊयात दगडु शेठ ला..!!" असं म्हणत आपला मनसुबा जाहीर करुन टाकला. झालं तिच्या आग्रहाखातर तो अन ती दोघंही त्या common friend चा निरोप घेत निघाले. ती मात्र थोडं पुढे गेल्यावर त्याच्यावर चांगलीच उखडली होती.

"काय रे नालायका ...!! कोण समजतोस रे तु स्वताला..? एखाद्याला वाट्टेल तेव्हा जीव लावायचा.. अन वाट्टेल तेव्हा असंच अर्ध्यावर सोडुन द्यायचं. '....' खुप वाईट वाटलं रे मला..!! खरच माझी लायकी नाही रे कुणी इतका जीव लावावा..!! ".

तो मात्र आपल्या आतल्या वादळाला जितकं शमवता येईल तितकं शमवण्याचा प्रयत्न करत तिला जितकं व्यक्त होता येईल तितकं व्यक्त होऊ देत होता. अन ती ही अगदी आपल्या कृष्णाशी मन मोकळं करावं इतकं मनमोकळेपणाने बोलत होती. तो मात्र अपल्या hopeless वागण्यापासुन तसुभरही मागे हटत नव्हता. तिचे हात त्याच्या खांद्यावर तिनं अलगद ठेवले तेव्हा मात्र तो मोहरुन गेला होता. किती विश्वासाने आज त्याच्या खांद्यावर तिने आपले दोन्ही हात अलगद ठेवले होते. त्याला मात्र त्या उबदार स्पर्शातही काहीतरी वेगळाच अनुभवायला मिळत होता. तिच्या हातांचा तो उबदार स्पर्श होताच तो तिला म्हणाला

"दगड तुझे हात किती गरम आहेत. नालायक ताप आहे का तुला..?".

तिला मात्र ह्याला शेवटी कळलं तरी की मला किती तप झालायम्हणुन समाधान होतं. आणी "he cares..". तिची कळी ही उमलत होती. तिला दिवसभर झालेला ताप अन त्रागा तो सर्वकाही जाणुन होता. सकाळपासुन तिनं काहीच खाल्लं नव्हतं , म्हणुनच तो "तिला काहीतरी खाऊनच तुला hostel ला सोडतो" असं म्हणत होता. पण आता hostel एकदमच टप्प्यात आलं होतं अन वरुन ती च्या पप्पांचे दोन फोनही झाले होते. ७.३० झाले तरी अजुन कशी काय ती hostel ला पोहचली नाही म्हणुन ते चिंतेत होते. पण तिनं परिस्थिती संभाळुन घेत सगळं काही पुर्वपदावर आणलं होतं. त्याने तिला झालेल्या उशीरा मुळे (खरं तर त्याच्या त्या hopeless image मुळे) काहीही न खाता तिला "hostel वर जाताना काहीतरी parcel घेऊन जा खायला.." म्हणुन तिला hostel च्या थोडं अलिकडेच सोडुन पुन्हा अपल्या घराकडे धुम ठोकली. तिची job मिळवण्यसाठी चललेली धडपडत.. अन सततच्या येणार्‍या अपयशचं वावटळ य सार्‍यांत तिच्याकडे आशेचा एक किरण होता. तो म्हणजे त्या किरणाचं अस्तित्वच होता. अन त्याच्या त्या धुसरश्या वागण्यामुळे तिला खुपच त्रास व्हायचा. त्याचं ती धुसर वागणं कधीच तिच्या त्या आशेच्या किरणाला तिच्या आयुष्यातुन काढुन घेणार नव्हतं, यावर तिच्यापेक्षाही जास्त विश्वास तो किरण धुसर करणार्‍या तो ला होता. कारण कितीही काळ्या ढगांआड लपला तरी सुर्य तळपायचा थांबत नसतो. त्याचं दोन टो़कांच वागणं मात्र त्या सुर्यालाही कुठल्याश्या अंधारात झाकोळुन टाकेल याचीच भिती तिला वाटत होती. तो मात्र अगदीच बिनधास्त असलेल्या तिच्या आजच्या त्या चलबिचललीमुळी फारच अस्वस्थ झालेला. का कुणास ठाऊक तो कोणतं वादळ आपल्या त्या इवल्याश्या नाजुक ह्रदयात दडवत होता..? पण मी जे काही करतोय ते चुकीच नाहिये याचा मात्र त्याला अजोड आत्मविश्वास..!! बर्‍याच वेळाच्या निशब्द संवादानंतर त्याने तिला sms पाठवला. खरतर त्यांच्यातल्या संवादला आता शब्दांचीही गरज पडत नव्हती.

"saying things isn`t always easy... I can`t stop thinking about you... I need you दगड..!! हवीयस तु..!! ह्या ३ दिवसांत काहीतरी घडलय रे .....!! something life changing don`t you think.. दगड..?"

ते life changing काय होतं हे दोघांसाठी वेगवेगळं होतं. ज्यानं आजवर नेहमी आपल्या मनालाच झुकतं माप दिलं तो आज डो़क्याने काहीतरी निर्णय घेणार होता, तर तिनं कुणासाठी आपले सगळे decision change करण्याची दाखवलेली तयारी हेच तिच्यासाठी life changing होतं. पण तिचं ते समजुतदारपणाचं ओझं त्याच्या त्या हलक्या फुलक्या मोरपिसाच्या स्पर्शाहुनही अलगद अनुभव देणार्‍या वागण्यापुढे अजुनही झुकायला तयार नव्हता. म्हणुनच तिनं त्याला खुपच सावध प्रतिक्रिया दिली.

"life changing ...? काय माहित...!! पण आज खुप छान वाटलं मला..!! आपण भेटलो.. बोललो.. MY TRUE FRIEND is with me, understands me, cares for me..!!".

त्याला आज खुपच समाधानी वाटत होतं. तिन घडवलेला त्याच्यातला true friend अन 'तो' यांच्यातल्या त्या संघर्षाला आजपुरता त्याने पुर्णविराम दिला होता म्हणुन..!! दोघही रात्रीच्या त्या विशाल काळोखात फक्त एकमेंकाची साथ आहे म्हणुन अगदी बिनधास्तपणे झोकुन देत होते. ती जरा जास्तच intensity ने..!! रोजचा दिवस तिच्यासाठी तो ला अधिकच जवळ करणारा ठरत होता, तर त्याच्यासाठी त्याचा अवखळपणा हरवणारा. अन म्हणुनच तो जमेल तितकं तिच्यापासुन दुर रहायचा प्रयत्न करायचा.

"दगड तु म्हणालीस ना.."....." तुला चौकट तुटलेली "....." नाही आवडली? मला हीच "......" हवी होती.. पण एक सांगु .. त्याचवेळेस तुला तुझा "...." डोक्याने विचार करावा असं वाटत होतं.. अन आज तोच "...." तुला नकोय.. तुला तो मनाने विचार करणारा "....." हवाय.. पण ती चौकत तोडली तेव्हा मी मनाने विचार करायचो..!! अन आता डोक्याने..!!नको येऊस.. त्या चौकटीच्या बाहेर ...!! मनाच्या बोलण्याने, त्यासारखं वागण्याने त्रास होतो रे.. तुच म्हणयाचीस ना.. नको येऊस..!! मी नाही बोलणार काहीच..!!"

अशीच तो तिची समजुत काढ्त तिच्या त्या मनाच्या प्रवाहाला थोपवु पाहायचा. पण ज्यानं आयुष्यभर फक्त आपल्या मनाचच ऐकलं त्याला कुठवर तिच्या मनाचा तो प्रवाहीपणा थांबवता येणार होता. त्याबाबतीत तो साशंक होता म्हणुनच कदाचित तो असा विचित्र वागायचा. आजच्या त्यांच्या बोलण्यातुन त्याचं हळवं मन आता मात्र खुपच पिळवटुन निघालं होतं. कदाचित तिलाही त्याच्या हळव्या मनावर उठलेल्या तरंगाचे अन त्यामुळे त्याला होणार्‍या त्रासाचे जाणीव झाली असावी म्हणुनच त्याला सावरायचं म्हणुन आपल्या त्या मनाला आवर घालत ती त्याला समजावत होती.

""....." मी अजुनही डोक्यानेच विचार करते ..!! म्हणुनच मी नाही येणार त्या चौकटीच्या बाहेर. don`t worry."

तो तिच्या प्रयत्नाने सावरण्या ऐवजी आणखीणच कोलमडत होता. ज्याला वाटायचं तिनं ते चौकटी बाहेरचं सुंदर अथांग अन खरं जिणं अनुभवावं तोच आज तिला त्या चौकटीत रहाण्यासाठी विनवत होता. अन ती ही फक्त "तो" आहे म्हणुन सर्व त्याच्यावर भरवश्यावर सोडुन "नाही येणार मी..!!" म्हणत त्याला "मी नाही तुझ्या शब्दाच्या बाहेर..!!" अशीच जाणीव करुन देत होती. कदाचित life च्या 1st hero नंतर ती त्याच्यावरच एव्हढी विसंबवु पाहत होती.तिचा तो समजुतदारपना आता त्याच्या चांगलाच अंगवळणी पडला होता.

"ती चौ़कट तुटली तेव्हाच माझा दगड तुटला होता.. तु विचारलं होतंस ना मला की मी काय बिघडवलय तुला..? तुझी चौकट तोडनं हेच बिघडवलं होतं तुला..!! किती समजुन घेतेस रे तु.. अन तु माझ्याकडुन काय मागणारेस रे..? ते पटकन माग..!! I need you..!!"

तिच्या त्या समंजस उत्तरावर त्याच हा फारच हळवा reply..!! तिच्याशी बोलताना मग ते प्रत्यक्षात असो वा अप्रत्येक्षात.. त्याच्या मनात एकच विचार नेहमी असायचा.. तो म्हणजे.. " stay away from her.. you can just hurt people.. तुला तिच्या आयुष्यातुन निघुन जायचय.. पण तिच्या अगोदरच्या त्या दोन मित्रांसारख नाही तर तिचा एक सच्चा मित्र म्हणुन.. तिचा एकमेव्द्वितीय सखा म्हणुन.. अगदी जसं मी तिला म्हणतो ना माझी एकुलती एक मैत्रीण अगदी तसं..!!". अन तिच्या त्या जीव लावण्यामुळेच कदाचित त्याला त्यानं तिच्या आयुष्यात कमवलेलं स्थान गमावण्याची भिती वाटायची अन त्या भितीपोटी चाललेली त्याची फरफरट.. तर तिला खुपच जवळुन अनुभवायला मिळत होती त्यामुळेच ती व्यक्त व्हायला बराच वेळ घेत होती. सगळं त्याच्या कलाकलाने घेत अन यालाच तो तिचा समजुतदारपणा म्हणायचा.

"नाही येणार मी त्या चौकटीच्या बाहेर्..!!माझ्या पप्पांना कय वाटतं याचा मला खुप फरक पडतो. HE has blind trust on me , त्यांची मुलगी त्यांची मान कायम ताठ ठेवेल. माझीlife त्यांच्यामुळे आहे for him i can do anything."

तिच्या या sms ने त्याला सकाळपासुन जे सधायचं होतं ते त्यानं साधल्याचा आत्मविश्वास आला होता. पण या सगळ्यात तो तिला आवर्जुन म्हणायचा

"मी पाठ दाखवुन पळतोय असं वाटतय का रे? तु काय विचार करतेस ह्याचा मला खुप फरक पडतो रे.. मला नाही बोलता येणार.. पण तु बोल् ना रे.. मी नाही कधीच नाही बोलणार..".

तिला मात्र त्याला काय बोलायचय अन तो काय अपेक्षीत करतोय हे सर्व माहित होतं अन तरीही त्यालाच काहीच न समजल्याचा आव आणात "तुच बोल" म्हणुन डिवचत होती.

"काय बोलु? की YOU ARE TRUE FRIEND? YES YOU ARE MY TRUE FRIEND .. NO FRIEND CAN REPLACE YOU IN MY LIFE . की I NEED YOU..!! YES I NEED YOU? YES I NEED YOU MY DEAR FRIEND .. मनापासुन..!!".

ह्म्म त्याचं अस्तित्वं खरं तरं तिला तिनं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याचा भासच करुन द्यायचा... फक्त भासच..!! तिलाही ते जाणवत होतं.. अचानक वहावत जाणार्‍या आपल्या मनाला समजुतदारपणाच्या अन पप्पांच्या मायेच्या त्या चौकटीत ती अलगद कोंडु पाहत होती, कुठल्याही तक्रारीविणा..!! खरच अशी मुलगी असायला भाग्यच लागतं. तिच्या पप्पांचं पुण्य त्याच्यापेक्षा निश्चितच भारी पडत होतं म्हणुनच ती चौकट तुटुनही ती त्या चौकटीच्या आत अजुनही तग धरुन होती. अन तो ही तिला तिथुन बाहेर काढायचा प्रयत्न करत नव्हता. पण त्याचा जीव फक्त तिच्या मनाच्या होणार्‍या त्या कोंडमार्‍यामुळे जळत होता. "मी असताना माझ्या एकुलत्या एक मैत्रीणाच्या मनाचा कोंडमारा होतोय..!!" ही गोष्टच त्याला सहन होत नव्हती. पण तो फक्त तिच्या 1st HERO साठी गप्प बसला होता. त्याला कधीच तिला हरवायचं नव्हतं अन तिच्या पप्पांनाही..!! पण ती मात्र त्याच्या त्या attitude समोर केव्हाच चारी मुंड्या चीत झालेली. अन तो मुद्दामुनच तिला "तु तो बाझीगर मधला डायलोग ऐकलाय का रे.. हारकर जितने वालें को बाझीगर कहते है... मला बाझीगर नाही व्हायचं..!!" असं म्हणत "बघ मी म्हणायचो ना की मला हरवणारा तु एकमेव आहेस.. पण तु मला हरवुनही मीच जिंकलोय.. कारण मी तुला जिंकलय.." असंच काहीसं तिला भासवायचा. पण ती मात्र त्याच्या त्या जिंकण्याने खरंतर तिच्या चौकटीतल्या आयुष्यात त्याच्या येण्याने आलेल्या उच्छादामुळे खुपच सुखावली होती. तिचं ते तिच्या पप्पांप्रती असलेलं प्रेम अन जिव्हाळा पाहु त्याचा तो true friend ही त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायचा.. त्याचा तो खराब attitude फक्त त्या एका माणसापुढे फिका पडत होता, तिच्या पप्पांसमोर..!! म्हणुनच तो तिला म्हणत होता.

"नको येऊस.. त्या चौकटी च्या बाहेर.. मला ही असंच वाटतं.. तरीही माझ्यासाठी नाही बोलणार का रे..!! माझ्यापेक्षा तुझे पप्पा खुप मोठेत रे... पण तु तुला काय वाटतं ते तु बोल.. त्या चौकटीतुन.. तुझ्यासाठी.. दगड..!!".

त्याचा तो सच्चेपणा पाहुन ती ही भारावुन गेली होती. पण त्याच्या क्षणा़क्षणाला जीव जाळणार्‍या तिच्या कोंड्मार्‍यामूळे तिला ही तितकाच ताप होत होता. त्याचं मन मात्र तिच्या मनातलं दडलेलं सगळं काही ऐकायला व्याकुळ झालं होतं, पण फक्त आपल्या मित्राला आपल्या व्यक्त होण्याचा त्रास होईल म्हणुन ती ते व्यक्त होणं टाळत होती. अन म्हणुनच तो काही ना काही कृप्ल्ता काढुन तिला व्यक्त व्ह्यायला भाग पाडायचा. अन त्याचाच भाग न्हणुत्याने तिला sms पाठवला. तिच्या सकाळच्या बोलण्याचा धागा पकडतच..

"the fact that I realized today.. no one can love me.. तु मला तुझा कृष्णा म्हणाली होतीस ना..? माझही नशीब त्याच्यासारंखच रे.. त्यालाही राधा नाही मिळाली.. पण at least he knows some one love him.. जाऊ दे .. I know तु कधीच नाही बोलणार तु ..!! दगड..!! माझा दगड..!! अगदी माझ्यासरखा..!!"

अन म्हणुनच ती त्याला ""....." please जाऊ दे ना रे हा subject..!! का ताप करुन घेतोस एव्हढा? तुझ्या बयकोचं खुप प्रेम असेल तुझ्यावर.. नक्की..!!". ह्म्म तिच्या या उत्तरावर तो मात्र फारच गहिवरला अन तिला म्हणाला "तु समजावलं स्वताला..? मी ही समजावेण..!!".

तिला मात्र इतकावेळ sms मधुन चाललेला संवाद संभाषणातुन व्हावा असंच वाटलं, त्याची होणारी ती तडफड पाहुन..!! म्हणुन तिनं त्याला फोन लावला. वेळ रात्रीची ११ ची..!! तो च्या घरातले सगळे झोपेच्या तयारीत..!! त्यामुळे त्याला तिचा फोन receive करुन बोलणं अवघडच होतं. पण तरीही कानाला headset लावत त्यानं तिला तु बोल मी फक्त ऐकतोय.. काही वाटलंच तर msg करीन तशी सोय आहे माझ्या HTC MOBILE मधे.. बोलता बोलता sms करण्याची..!!" असा sms पाठवत तिचा फोन घेतला. तिच्या त्या फोनने तो मात्र फारच भारावुन गेला होता. पण खरंतर तिथंही तो त्याची ती समजण्यापलिकडची philosophy च पाजळत होता. फक्त आपल्या एकुलत्या एक मैत्रीणीला काय वाटतं हेच जाणुन घ्यायला. पण तिला मात्र मी माझ्या ह्याही मित्राचं (जो म्हणतो, "मला कुणाचीच गरज नाही..!!") servicing करु शकते म्हणुन समाधानी. फक्त देतच रहावं अन आलच काही घेण्यासारखं तर फक्त घेण्यासारखी खरचं आपली लायकी आहे का हेच तिच्या मनात यायचं तिला आज मात्र काहीतरी अनोखं असंच देणं द्यायला मिळतयं याचाच अनुभव सुखावत होता.

" '....' कशाला इतका ताप करुन घेतोयस.. तुला म्हटलं ना मी तुझ्या बायकोचं तुझ्यावर खुप प्रेम असेल.. अन तुच म्हणतोस ना जो चांगला आहे त्याचं नेहमीच चांगलच होतं..!! आठवतय मी म्हटलं होतं.. everything life remains balanced.. तुझीही life balanced असणार आहे..!! तुझ्या आयुष्यात तुला जीव लावणारी नक्की कुणीतरी येईल..!! अन तु मला म्हणतोस ना की मी तुझी एकुलती एक मैत्रीण आहे तुला समजणारी एकमेव..!! पण मला वाटतं तु तो हक्क तुझ्या बायकोला द्यावासं... तु आहेच असा की कुणीही तुला जीव लावावा. अन हं.. माझ्या चौकटी चं म्हणशील तर नाही येणार मी त्या चौकटीच्या बाहेर.. नको करुस रे इतकी माझी काळजी..!! माझ्या पप्पांना काय वाटतं ते मला खुप महत्वाचं आहे रे.. त्यांनी आजवर जे मला वाटलं ते करु दिलं कुठल्याही तक्रारीविना..!! त्या माणसाने त्याच्या आयुष्यात खुप खस्ता खाल्ल्यात रे.. खुप कष्ट सोसलेत रे त्यांनी..!! for him I can do anything..!! म्हणुनच मी नाही येणार त्या चौकटीच्या बाहेर..!! ".

ती पलीकडुन एकटीच बडबडत होती. अन तो मात्र त्याच्या ओल्या पापण्यांवर हात फिरवत देव्हार्‍यातल्या त्याच्या बप्पाकडे पाहत त्याला काहीतरी विणवत होता. तिचं ते बोलणं, त्याला समजावणं चालुच होतं. ५ मिनिटाने त्याने डोळ्यांच्या कडावर आलेलं पाणी पुसत तिला sms केला

"I proud of you दगड..!!". जणु काही पप्पाच बोलतायत असाच भास तिला त्याच्या त्या sms मधुन झाला असावा. पण लगेच त्याचा पुढचा sms होता.

"I want to take you for date..!! I proud of you..!! येशील date वर...? माझ्याबरोबर...!!" त्याचं ते हळुवार अलगद तिच्या मनाचा तळ गाठणं तिलाही आता जाणवु लागलं होतं. पण समजुतदार डोक्याने चालणारं तिचं मन मात्र त्याला म्हणत होतं "date.. plz.. "..." date हा काय word आहे का रे..?"
तो मात्र त्याचा तो आक्रमकपणा तसुभरही कमी न करता तिला म्हणत होता.

"अरे दगडु .. तुला date वर न्यायचयं..!! काय langauge..? मी असाच आहे.. date वर येणार का? नाही म्हण मग बघतो..!! अन एक मी तो शब्द बदलणार नाही. तुला यायचं असेल तर ये..!! पण मी तो शब्द नाही बदलणार..!! maddy तरी कुठे बदलतो त्याची भाषा..!! तुच म्हणतेस ना आपल्या माणसाला तो जसा आहे तसं accept करायचं असतं..!! मग..?". त्याची ती मुस्तुद्दीगिरी तिच्याही अंगवळणी पडल्यामुळे तिनं त्याच्यापुढं नमतं घेतलं, पण अजुनही ती तिची तुटलेली चौकट सोडायला तयार होत नव्हती. अन तो कालपर्यंत तिला "नको येऊस चौकटीबाहेर" म्हणुन आर्जव करणारा आजमात्र आपल्या त्या पुर्वीच्याच वाईट intensity ने तिला त्या चौकटीबाहेर खेचु पाहत होता. त्याची ती dual personality च खरंतर दोघांना तापदायक ठरत होती. तिचा त्याच्यावर असलेला confidence त्याला ठाऊक होता म्हणुनच तो तिला बिनदिक्कत पणे "तु माझ्याबरोबर date ला येणार आहेस..!! 1st DATE..!! कधी ते सांग..? तु मला नाही म्हणणार नाहीस.. दगड..!!".

"ह्याट.. "..." date हा काय word आहे का..? मला नाही हे पटलं. ", तिचा जमेल तितका चौकटीतुन बाहेर डोकवण्याचा प्रयत्न.
त्याला मात्र तिचं ते चौकटीतुन डोकावणं जितकं अल्हाददायक वाटत होतं त्याहुन ते टोचत होतं. पण आज मात्र ते टोचणं त्यानं पुर्णतः स्विकारलं होतं, मनाला होणार्‍या असंख्य यातना तो कुठल्याश्या उर्मीने बाजुला करत तिच्या जितक्या जवळ जाता येईल तितक्या जवळ जाऊ पाहत होता.

"दगड.. काल माझ्या खांद्यावर हात ठेवलास..!! खुप बरं वाटलं.. किती विश्वास होता त्या स्पर्शात.."
त्याच्या या आगळ्या वेगळ्या रुपाच्या त्या सळसळुन उसळणार्‍या कारंजीत ती मात्र मनोसोक्त भिजत होती, अगदी पहिल्या पावसात भिजावं तसचं बेभान होऊन. पण तिचं ते बेभान होउन भिजणं कुठेतरी तिलाही खटकतच होतं, आपल्या त्या घरच्या मध्यमवर्गीय संस्कारामुळे..!!
त्याच्या त्या sms ती मात्र खुपच गहिर्‍या विचारात लोतली गेली होती. "काय होईल जर मी त्या चौकटीच्या बाहेर आले तर..? माझा मित्र..!! माझा "......"..!! माझा कृष्णा आहे ना मला protect करायला या unprotected world पासुन..!! he is always with me..!! मग का मी एव्हढी घाबरतेय त्या चौकटीच्या बाहेर यायला..!! "...." पप्पांना हरवेल म्हणुन..?" तिचा एका सेकंदात स्वताशी चाललेला संवाद ही आता पुरेपुर हेरत होता. अन म्हणुनच तिचं ते एका क्षणाचं मौनही कितीतरी अनंत यातना त्याच्या त्या नाजुक हृदयावर ओरखडे देउन हेलावुन टाकत होतं. अन त्याच्या मनातली बोच ते तिला मात्र वेगळयाच स्वरुपात मांडत होता.

" "..."ची खंत... तु कधीच स्वतासाठी नाही जगणार का रे..? मी काहीही करु शकतो.. पण तुझ्या पप्पांना नाही हरवु शकत .. अन कधीही नाही हरवणार त्यांना..!! तुझ्यासाठी..!!".

एकीकडे तिची त्या चौकटीतुन बाहेर पडणार्‍या प्रयत्नांना तो तिच्या मनाचा तळ गाठुन बळकटी आणण्याचा त्याचा तो अलगद प्रयत्न अन दुसरीकडे तितक्याच खराब attitude ने ती चौकट पुन्ह बळकट करणयाचा त्याचा हा डाव. दोहोत सांगड घालताना त्याची मात्र पुरती वाट लागत होती. पण ती मात्र त्याला संभाळुन घेत होती. ती मात्र आपल्या घरच्यांच्या छोट्या गोष्टी त्याला सांगत होती. फक्त इतक्याच साठी की "माझ्या चौकटीत रहाण्याला बळ आलयं ते या सार्‍या माझ्या आपल्या माणसांमुळे..!! अन तु आलास..!! माझ्या माणसांनी बनवलेली ती प्रेमाची चौकट तु तोडलीस..!! त्या सार्‍या माझ्या अपल्या माणसांपुढे तु भारी पडतोयस..!! काय जादु केली आहेस तु मझ्यावर..? का तुच हवा हवासा वाटतोय मला..? मला एव्हढं द्वण्द चाललयं तुझ्याही अन माझ्याही मनात..?". तिचे हे सारे अबोल प्रश्नच त्याला खुप छळायचे. तिचं प्रत्येकवेळी आपल्या कुटुंबाप्रती आदर व्यक्त करणं म्हणजे तिची तिला त्या चौकटीत राहु देण्याची केलेली विनवणीच त्याला वाटायची. अन तिच्या त्या विनवणीमुळेच तिचा "true friend "गुदमरुन जायचा. तिचं ते व्यक्त होणं त्याला कितीही त्रास देणार असलं तरी तो मात्र तिला क्षणो़क्षणी व्यक्त होण्यासाठी उद्युक्त करत होता.

".... speechless... ते ९० % तु share करतेस.. बोल... मी तुझा आदि नाही ... पण बोल... मी तुझाच कृष्णा आहे... तुझा कृष्णा.. तुझा ".....".!! तु अशी आहेस ना म्हणुनच मी म्हतलं होतं की तुला नाही हरवणार.. मी तुला हरवु शकतो.. तरीही.. ते जाउ दे.. तु date वर कधी येतेस..? आता रुममधे कोणी नाही का..? कितीवेळ झालं तु बोलतेस.. माझ्यामुळे तुचं फोनचं बिल वाढलय ना..? पण मला खुप बरं वाटलं.. तु मला म्हणालीस ना तु अन पप्पा दोघच हवेत मला... बाकी कुणी नको मला..!! काय रे दगड किती त्रास देतोय ना मी तुला..? झोप आता..!!".

तिला त्याची विलक्षण स्मरणशकी पाहुन अचंभ होत होता. "किती बारिक सारिक गोष्टी लक्षात ठेवतो माझा "...."..?" तिचा त्याच्याशी बोलताना स्वताशीच चाललेला हा संवाद. त्याला मात्र फक्त 'तेव्हा' ती तिच्या पप्पांअगोदर त्याचं नाव घेत तु अन पप्पा दोघच हवेत हे बोलण भारावुन टाकत होतं. अन ती त्याच्या त्या आजच्या तिरसट वागण्याचा त्रास होऊनही त्याला मात्र "तु माझा true friend आहेस त्याच caliber चा" असं म्हणत तिच्या आयुष्यातल्या त्याच्या अस्तित्वाचं समर्थण करत होती. अन तो मात्र तिचे आभार मानत होता.

"thanx you still beleive me.. you trust me .. you.. you.. अन हो आहे माझ्यात ते caliber ..!! पण date चं काय..? उद्या ice-creame खायचं..?". ती मात्र अजुनही त्याच्या date या शब्दावरच अडुन बसली होती. पण तोही तितकाच हट्टी.

"langauge बदलणार नाही.. true friend म्हणतेस ना मला..? ठेव आता दोन तास झाले बोलतेस..!! battery low झाली असेल तुझी..!!".

तिचं आजच त्याला सावरणं, अन चौकटीत राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं सगळच त्याला सुखावणारं होतं. त्याच्या मनात मात्र त्याने मागे एकदा दगडुशेठला मागितलेल्या एका मागण्याची आठवण झाली. अन तसं त्यानं तिला sms मधुनही कळवलं

" "..." दगडुशेठने मी जे मागितलं ते पुर्ण केलं असं वाटतयं.. दगड तु date वर येतेस ok..? उद्या भेटल्यावर बोलु..!!".

तिला मात्र त्यानं बप्पकडे काय मागितलं हेच जाणुन घ्यायची उत्सुकता होती. पण त्यानं ती तशीच ताणत ठेवत त्या मागण्याचा खुलासा उद्या करण्याचं तिला अश्वाशन दिलं. पण रात्रीचा शेवटचा sms त्यानं मात्र खुपच हळवा होऊन पाठवला.. दिवसभराचं फलितच जणु ते दोघांचे शेवटचे sms सांगुन जात होते.

"त्या कृष्णाच्या आयुष्यातही राधा होती अन माझ्याही...!! तु नसणारेस यापेक्षा तु होतीस हे महत्वाचं..!!"
तिनं मात्र खुपच तोलामोलानं त्याच्या या sms च
उत्तर पाठवलं..

"मी राधा नाही अन् नसेनही...!!"

तिचं ते conscious मन त्यानं ओळखल होतं. अन म्हणुनच तिला पुन्हा त्या तिच्या conscious mind पासुन तो दुर खेचु पाहत होता, अन म्हणुनच त्यानं तिच्या या sms ला खास आपल्या origanal style मधे reply केला.

"हा.. हा.. तु कोण ठरवणारी तु राधा असणार की नाही..? अन आणखी एक राधा-कृष्णा हे प्रेमाच्या प्रतिकापेक्षा खर्‍या मैत्रीचं प्रतीक वाटतं मला.. दगड अगदी आपल्या मैत्रीसारख.... तु आहेस म्हणुन रे.. ".

त्याचा तो sms तिला त्या दोघांच्याही जगावेगळ्या पण निखळ मैत्रीचं प्रतीक वाटत होतं. तो sms तिच्या चेहर्‍यावर समाधानाची एक हास्य लकीर उठवुन गेला पण तिचं मन मात्र आणखीणच खोल विचारत गढुन गेलं. अगदी त्या रात्रीच्या भयाण काळोखा सारखं. दोघांच्याही मनाचा भावनिक गुंता त्या रात्रीच्या गडद अंधारासारखा वाढत होता. कशीबशी ती रात्र सरली. तो मात्र त्या रात्रीच्या भयाण काळोखातही कुठल्यातरी विचारात गढुन गेलेला. सकाळ कशी झाली हे त्याला कळलच नाही. आता दोघांनाही ओढ होती ते एकमेंकाना भेटण्याची.सकाळची सगळी आन्हीकं उरकल्यावर दोक्यावरचे ओले केस तसेच ठेवत त्याने तिला sms केला.

"दगड... I need you.... you need me... you respect me.. I respect you.. तु खरचं खुप मोठी आहेस गं.. खुप.. मला तु खुपच ठेंगण केलसं". तिच्या त्या कालच्या फोनवरच्या बोलण्याने तो पुरता विरघळला होता. अन ती..? ती तर जणु सांगत होती, त्याला विणवत होती, "माझ्या आयुष्यात कायम रहा पण माझ्या पप्पांना न हरवता, ते माझं सर्वस्व आहेत रे.. नाही हरवणार ना माझ्यासाठी, माझ्या कृष्णा..?". तिचा तो हट्ट पुर्ण करणं खुपच अवघड होतं. पण तो आपल्या या एकुलत्या एक मैत्रीणीचे सगळे हट्ट पुर्ण करु पाहत होता अन त्याच मुळे त्याची गोची होत होती. पाण्यात उतरुन कोरडं राहण्याचं तिचं ते आव्हान त्याला पेलताना खुपच अवघडल्या सारखं वाटायचं. पण तिचा तो विश्वास तो कधीच तोडणार नव्हता, म्हणुन तर आज त्याला तिला भेटायचं होतं.तशी ती आज पुण्यात त्या placement वाल्या class ची apti द्यायला येणारच होती, पण तिच्या कोणा एका हितचिंतकाने तो class नकोच म्हणत तिला त्यापासुन परावृत्त केलं. तसं तिनं त्याला "मी नाही येऊ शकत आज..!!" असं खास तिच्या style मधे कळवलंही. तसा तो जरा नाराज झाला अन तिला sms केला.

"फुस्स.. म्हणजे आज नाही भेटणार आपण I proud of you दगड.. I need you पेक्षा ही..!!".

का बरं आज तिला i need you पेक्षा i proud of you म्हणावासं वाटत होतं.? खरंतर तेच तर त्याला तिला सांगायच होतं. पण तिचं पुण्यात येणच आज cancel झालं होतं. पण त्याला जितकी उत्सुकता होती तिला भेटण्याची त्याहुन अधिक तिला त्याला भेटावसं वाटत होतं. म्हणुनच या आपल्या एकुलत्या एक true friend चा हट्ट ती आज पुण्यात फक्त त्याला भेटायला येऊन पुर्ण करणार होती. त्याच्या त्या I proud वाल्या sms ला तिनं ही लगेच reply केला.

"का? आपण भेटु शकतो आज. I want Ice-cream.. I scream you sceam we both scream for ice-scream. मला गडबड मस्तानी खायचीय." तिचा त्याच्याकडे लाडीक हट्ट..!!

झालं तिनं त्याला भेटण्यासाठी आतुरता दाखवली. तो मात्र आज तिला भेटुन काय बोलावं याच विचारात गढुन गेलेला. तिच्या त्या sms वर त्याचा कोणताच reply न आल्यामुळे तिनं थोड्यावेळाने त्याला फोन लावला.

"काय रे..? काय झालं? no reply..? any tension..?"

"tension..? कुणाला मला..? नाही रे असच थोडं घरच्या कामात busy होतो. बोल का म्हणुन फोन केलास..?". त्याचा उगीचच सारवा सारवीचा प्रयत्न..!!

"किती चिडतोयस "....". अरे आज मी अन "++++++" औंधला जाणारेय mkcl मधे C-DAC चा form भरायला..!!" तिचा त्याला काहीतरी सांगण्याचा निरागस प्रयत्न.

"मग..?" त्याचा मात्र रुक्षपणा दाखविण्याचाच आटापिटा.

"अरे मग काय मग..? आपण भेटुयात..!! मला तुझ्याशी बोलावसं वाटलं म्हणुन केला फोन..!! पण तुला त्रास होतोय ना माझ्या मैत्रीचा..!!"

"नाही रे इतकी सवय कोणी इतका जीव लावायची.. नको काळजी करुस माझी.. जीव गुदमरतो माझा.. plz ... stay away from me..!! खरचं तु यायलाच नको होत्म माझ्या आयुष्यात..!! मी फक्त एखाद्याला त्रासच देऊ शकतो रे.. I can just hurt people...!! का देवानं मला असं बनवलय तोच जाणे..!! मी असा का आहे रे..? मला तुझ्या आयुष्यातुन कधी ना कधी तरी जायचय रे..!! पण जायच्या आधी मी तुला एक वर दिलाय तो माग.. माग हवं ते माग.. काहीही माग नक्की देईन तुझा मित्र.. फक्त मी दुर जायच्या आधी माग रे.. मी तुझ्या आयुष्यातुन जायच्या आधी माग...!!"

त्याला आपल्या मनातली ती बोच दडवताच येत नव्हती, त्याने तसाच फोन ठेवला. ती मात्र त्याच्या त्या विचित्र वागण्याचाच विचार करत होती. आत्ताच कुठं तिचं conscious मन तिला त्या झर्‍याच्या प्रवाहात चिंब भिजायाची परवानगी देत होतं अन तो अवखळ झरा मात्र त्याची वाट बदलु पाहत होता फक्त "माझ्या दगडाला माझ्या प्रवाहाच्या वेगाचा त्रास नको म्हणुन..!!"
त्याचा फोन होताच तिच्या मनात ते शंकाच वादळ असच गिरक्या घेत राहिल अन शेवटी न रहावुन तिची ती होणारी आर्त ससेहेलपाट एका sms द्वारे तिनं त्याला कळवली.

""...." मी त्या चौकटीत होते ना , I was really PROTECTED.. ती चौकट तु तोडलीस , now I am not at all protected. आणी आता म्हणतोस मी जाऊ का..? का..? मला एकटीला इतक्या unprotected world मधे सोडुनच जायचं होतं तर का तोडलीस ती चौकट मित्रा? मी राहिली असते तशीच, atleast मला एव्हढं तरी समाधान असतं की I am SAFE. "

तसं तिच्या प्रत्येक का..? चं उत्तर त्याच्याकडे होतं.. त्याला पटणारं..!! पण ती उत्तरे द्यायची जेव्हा वेळ येणार होती तेव्हा ती उत्तरे ऐकायला कदाचित ती त्याच्यापासुन कायमची दुरावलेली असणार होती, अन या गोष्टीचा त्रास त्याला त्या दुंभगलेल्या वागण्यासाठी उद्युक्त करायचा. आज मात्र तिला त्या चौकट तोडण्यामगच्या कारणाची एक झलकच देणार होता. ती मात्र आज मी याला कहीही करुन भेटणारच अशाच आविर्भावात फक्त "माझ्या मित्राला माझी गरज आहे म्हणुन..!!" या एकाच गोष्टीच्या जाणीवेमुळे..!!
झालं तिनं त्या दोघांच्याही common friend ला बरोबर घेत hostel सोडलं. तसं तिनं त्या common friend ला "मला आज "...." ला भेटायचय.." असं सांगितलही. तो बिचारा मात्र या दोघांच्या गोचीत उगाच कोंडीत सापडला होता. ३-३.३० ला त्या दोघांनी "त्यांच ते" महत्वाचं काम उरकत त्याला फोन करुन J.M. road ला भेटायला बोलावलं. तशी त्याची उत्सुकता खुपच ताणली गेली होती तिला भेटण्यासाठी..! काय बरं सांगणार होता आज तो तिला..? पण आजचा दिवस ती अन तो दोघांसाठी खुपच वेगळा होता. ४.३० ला तो levies च्या शोरुम बाहेर आपली intense desire घेऊन त्या दोघांची औंधवरुन येण्याची वाट पाहु लागला. आज तो वेळे आधीच पोहोचला होता. १०-१५ मिनिटांनी ते दोघही तिथं पोहचले. तसे दोघही एकमेंकाची नजर चुकवत होते कदाचित त्या common friend च्या त्यांच्याबरोबर असण्यामुळे असेल..!! पण आज त्यांना निवांत बोलायचं होतं, फक्त दोघांनाच..!! इतक्यात त्या common friend च्या घरुन त्याला फोन आला अन कुठल्या तरी अर्जंट कामानिमित्त त्याला घरी जावं लागणार होतं. ह्म्म आता त्यांना दोघांना एकमेंकाशी निंवात बोलता येणार होतं. त्यांन आपल्या intese desire ची चावी त्या common friend च्या हाती देत त्याला लवकर निघायला सांगितल अन मी आहे हिच्याबरोबर हेही..!! तो common friend लगेच त्याची intense desire घेत तासाभरात येतो परत..!! म्हणत त्या दोघांना निवांत सोडलं.
आता दोघच..!! तिला मात्र थोडं insecure च feel होत होतं. तसं ती काय त्याच्याबरोबर पहिल्यांदच एकटी थांबली नव्हती, पण जितक्या वेळेस ते दोघेच भेटलेत तितकावेळात ते bike वरच जास्त वेळ होते. त्यामुळे "समोरासमोर" असं त्यांच बोलण कधी झालच नाही. तसं ते फोनवरुन खुप बोलायचे अगदी फोनचं बिल १५००-१६०० रुपये येइपर्यंत..!! पण आज दोघंच..!! समोरा-समोर..!! त्याचा आपला नेहमीचा टवाळकेपणा चाललेला..!! रस्त्यावर्ची एकुनाएक गोष्ट न्याहाळत चाललेलं त्याचं आत्मचिंतन..!! अन ती एरव्ही फोनवर त्याला झापणारी , त्याच्याशी भांडणारी, अगदीच अबोल, दोघही बरोबरच चालत होते पण शेजारी चाललेली व्यक्ती कोणी अनोळखीच आहे अश्याच आविर्भावात..!! कोणा त्रयस्थाला जर हे रस्त्याने जाणारे दोघे दाखवुन म्हटलं असतं की ह्या दोघांची खुपच घनिश्ठ अशी मैत्री आहे, तर मात्र त्या त्रयस्थाने सांगणार्‍यालाच वेड्यात काढले असते. पण त्यांची मैत्री अशीच होती, वरुन जेव्हढी अलिप्त आतुन तेव्हढीच गहिरी, खोल, बंधनाची कुठलीच चौकट नसलेली अन नितळतेचा स्वच्छ तळ संस्काराच्या आभाळा इतक्या उंचीवरुनही स्पष्ट दिसावा अगदी तशी..!! उगीच इकडेचे तिकडचे विषय काढत दोघांनी संवादाला सुरुवात केली खरी पण जो हवा तो संवाद मात्र काही होत नव्हता.

" sorry..!! मी खुप येडचाप आहे नाही..!! लई ताप देतो तुला..!! खरच यार "........." किती समजुन घेतेस रे मला..!! खुप lucky आहे मी माझ्याकडे तुझ्यासारखी मैत्रीण आहे.. मला समजणारी..!! काल किती ताप दिला ना मी..!!उगीच माझ्यामुळे तुझं बिल वाढलं. मागच्या जन्मी खुप पुण्यं केली असणार म्हणुन तर तु आलीस माझी एकुलती एक मैत्रीण म्हणुन माझ्या आयुष्यात.. पण मागच्या जन्मी जाता जाता मी काहीतरी घोर पाप केलं असणार रे.. म्हणुन.."

इतका वेळ रस्त्यावरच्या "पोरी" न्याहाळणारा तो क्षणात इतका भावुक होणं हे आता तिच्यासाठी नवीन नव्हतं. पण तिला मात्र त्याच्या "पण मागच्या जन्मी जाता जाता मी काहीतरी घोर पाप केलं असणार रे.. म्हणुन.." या वाक्याचा अर्थच उमजत नव्हता. काय बरं असावा त्या गुढ वाक्याचा अर्थ सध्यातरी तो अर्थ त्यानं आपल्या इवल्याश्या नाजुक ह्रुदयाच्या कुठल्याश्या कप्प्यात अलगद बंद केला होता.

" "...." नालायका, तु पाप पुण्याच्या गोष्टी करतोयस.. तु..? आपल्या नाही पटत बुवा..!!अन काय ताप दिलायस रे तु..!! तु माझा true friend आहेस.. एकुलता एक.. !! मग तुला गरज असताना मी नाही तर कोण येणार रे मित्रा तुझ्या मदतीला..!! अन तु कसं काय manners पाळायला लागलास रे..? काय मला खुप बरं वाटलं "....."..!! "

"ऐ.. काल तु माझ्याशी रात्री दीड पर्यंत बोलत होतीस हे तु "+++++" नाहीस ना सांगितलं.. त्याला उगाच काहीतरी वाटायचं..!! आधीच माझी personality कशी आहे that you know..!!"

तो कधीच कुणाचीच पर्वा न करणारा तिच्याबाबती खुपच conscious रहायचा, पण तिला ते कधीच जाणवु नाही द्यायचा.. मुद्दामच..!! पण आज तिनं त्याचं तिच्यासाठी पर्वा करणं खुपच जवळुन अनुभवायचं असचं काहीसं मनाशी ठरवलं होतं. म्हणुनच त्याच्या त्या बोलण्यावर ती त्याला म्हणत होती "का रे..? का नको सांगु त्याला..? जर आपण एखादी गोष्ट दुसर्‍या कोणाला उघडपणे सांगु शकत नाही तर ती गोष्ट चुकीची आहे असं नाही का वाटत रे तुला..?". तिच्या या उत्तरावर तो मात्र जाम भडकला.

"ठीक आहे सांग्..मग त्याला..!!"

" ".....", किती चिडतोस रे.. अरे तो माझा छान मित्र आहे.. मग त्याला सांगितलं तर बिघडलं कुठं? अन हो मी नाही त्याला काही बोलले..!! अरे तु काहीतरी विचारणार होतास आज मला..?" तिनं थोडा विषयाला फाटा द्यायचा प्रयत्न केला अन त्यात यशस्वीही झाली. दोघही J.M. रोड वर भटकत होते. त्याला मात्र तिची कालची फर्माईश आठवली "मला गडबड मस्तानी खायचीय..!!".

त्यानं तिला लगेच विचारलही "काय रे दगड काल तुला गडबड मस्तानी खायची होती ना..? चल आज खाऊया आपण..!!". असं म्हणत त्या दोघांनीही j.m. रोडवरची होती नव्हती तेव्हढी सगळी ice-creame parlour`s पालथी घातली, पण गडबड मस्तानी कुठेच नाही मिळाली. शेवटी वैतागुन दोघांनीही आपला मोर्चा j.m. रोडवरुन F.C. रोडकडे वळवली, पण तिथंही त्यांच्या पदरी निराशाच आली. पण दोघांनाही त्या "मस्तानी" न मिळाल्याच्या वैतागापेक्षा आम्ही दोघं आज इतका वेळ तरी एकत्र आहोत याचाच खुप आनंद होत होता. जवळ २०-२५ मिनिटांच्या भटकंती नंतर ते दोघं पुन्हा j.m. रोड कडे निघाले. ती मात्र त्या "मस्तानी" न मिळण्याच खापर मात्र so called "पुण्यातल्या लोकांवरच" फोडत होती. तो मात्र पुण्यातल्या लोकांच्या genuinity वर ठाम होता. अन म्हणुनच तिला अगदी आवेशात "चुकीच्या माणसांबरोबर पुणं फिरल्यावर असा ग्रह होणारच..!!".असं फटकारत होता. त्याचं हे वाक्यही तिला आता सवयीचं झालं होतं. पण आज तिला विश्वास होता "आज मी बरोबर माणसा बरोबर पुणं फिरतिये.. माझ्या एकमेव सख्या बरोबर..!!". पण उगीचच तिच्याकडे नसलेला attitude दा़खवायचा प्रयत्न म्हणुन त्याला फटाकरतच म्हणाली "shut up "......", तुला कुणी सांगितलं रे मी चुकीच्या माणसाबरोबर पुणं फिरलेय म्हणुन रे..? अन मी कोणाबरोबरही नाही फिरत..!! कळलं का..? मी माझी एकटीच जाते कुठेही..!! मी माझ्या होस्टेलवरच्या मैत्रीणींनाही नाही घेत कुठे मला जायचं असेल तेव्हा..!! " तिचं ते explaination तो ऐकुन घेत होता अन मनातल्या मनात आपल्या "त्या" कसबावर कोणाकडुनही आपल्याला हवं तेच वदवुन घेण्याच्या..!! जाम खुष होत "आता पुढं काय होणार आहे.." याचाच विचार करत आपले ते गहिरे डोळे तिच्यापासुन लपवत होता. पण त्याचं ते विचित्र वागणं तिला कितीही त्रासदायक ठरत असलं तरी ती त्याला त्याबाबत जाब विचारायला घाबरत होती. कदाचित त्याच्या उत्तरात तो तिच्या पासुन कायमचा दुरवण्याचीच शक्यता तिला वाटायची. म्हणुन तीही त्याला "त्या वागण्याचं" कारण विचारण्याचं टाळत होती. पण तिच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे होती. एव्हढ्या हळव्या प्रसंगातही त्याच्यातलं ते hopeless कार्टं अजुन शाबुत होतं. अन म्हणुनच समोर आलेला apaache bar येताच तो तिला त्या bar ची महती सांगत होता. ती मात्र थोडं auckward चं feel करत होती."आयला..खरचं.."......" पारच बाद कार्ट आहे.. एका पोरीबरोबर रस्त्याने फिरतोय अन तिला काय दाखवतोय तर तो apaache bar..ईईई.. देवा... बघ रे बाबा.. काय हे "......"" . तिचं आपलं मनातल्या मनात पुटपुटणं चालुच होतं. तो मात्र अगदीच बिनधास्त्..जे मनात येईल ते "बरळत" होता. त्याचं ते बरळणं चालु असताना मात्र त्याचा ताळतंत्र मात्र कुठेच सुटत नव्हता. तिला तो आपल्या सगळ्या "बेवड्या " मित्रांच्या स्टोर्‍या संगत होता. company त manager झाल्यावर त्याने आगोदरच्या manager साठी UP-&-ABOVE मधे दिलेली send-off party. अन आलेल्या बिलात खाण्यापेक्षा पिण्याचं आलेलं जास्त बिल, restaurant manager शी केलीली घासाघीस रंगवुन सांगत होता.

"दगड.. मी कधी दारु घेतलीच नाही.. तुलाही माहितीये.. मी फक्त वाटतो त्यातला.. पण मी दारु, सिगारेट या पासुन किती लांब आहे ते तुला सांगायची गरज नाही. पण तरीही मला कोठली beer strong आहे, whiskey, rum, wines,scotch, यांच्या brand सहित किंमतीची माहिती आहे. दारु पिणारे सगळेच वाईट असतात असं नाही अन कधीतरी म्हणजे occassionally घेतलीच तर काय फरक पडतो. दारु ocassionally घेणं वाईट नाही. " तो उगाच आपलं ते गुणी तत्वद्याण पाजळत होता.ती मात्र त्याचं ते तत्वड्नान कुठल्या कुठे उडवत लावत ""....." नालायका दारु इत्कीशी घेतली काय अन खुप घेतली काय शेवटी ती वाईटच ना..? " असं म्हणत त्या "दारु पुराणा"वरुन त्याला झापत होती.

"ऐ दगड मी घेत नाही हे काय तुला वेगळं सांगायची गरज नाही मला.. अन हो मी कधीच दारु पिणार नाही अगदी तु जरी माझ्याशी शर्यत लावलीस ना तरीही.. मी नाही घेणार..!! ही माझी committement आहे..!! अन दारु पिणारे सगळेच वाईट नसतात..!!"

त्याचे ते जगावेगळे विचार ऐकुन ती मात्र पुरतीच bore झाली होती. बर्‍याच वेळच्च्या भटकंती नंतर दोघेही वैतागले अन ती तिचं वैतागणं मात्र उगाचच पुण्यातल्या लोकांवर काढत होती. तो मात्र आपल्या नेहमीच्याच attitude ने तिला "चुकीच्या माणसांबरोबर पुणं फिरल्यावर पुणं कसं माहिती होणार रे तुला, कधीतरी सही माणसाबरोबर पुणं फिर... मग कळेल पुण्यात कुठं काय मिळतं ते.. उगीच आमच्या पुण्याला नावं ठेवायची नाहीत कळलं का..?" असंच clean bold करत होता.

"ऐ.. नालायका.. मी नाही कोणाबरोबर फिरत पुण्यात..!! कोणी सांगितलं रे तुला.. अन मला काय हवं असलं ना की मी एकटीच येते पुण्यात माझ्या होस्टेलवरच्या पोरींना पण नाही घेत बरोबर.. मला नाही आवडत कुणाबरोबर जायला.."

ती असच काही त्याला झापत होती पण आतुन कुठतरी तिचं हळवं मन तिला समजावत होतं "नाही "........." आज तु बरोबर माणसाबरोबर आहेस.. तुझा एकमेव सखा.. आहे तुझ्याबरोबर तो कधीच तुला चुकीचा रस्त्यावर भटकु नाही देणार.. तुझा कॄष्णा आज तुझ्याबरोबर आहे अन कायम असणार आहे जरी तो म्हणतोय मला जावं लागेल तरी..!! feel pride about that..!!"
बरच फिरणं झाल्यावर दोघांनीही शेवटी J.M. रोडवरच ROBBIN 'N' BASKIN गाठलं. आता गडबड मस्तानी ऐव़जी दुसरं काहीतरी..!! तो लगेच counter वर जाऊन दोन fruit overload double scoop with strawberry sauss अशी मस्त order घेऊन ही आला. दोघंही बराचवेळ त्या ROBBIN 'N' BASKIN च्या बाहेर कट्ट्यावर गप्पा मारत बसले होते. बर्‍याच एकडच्या तिकडच्या फालतु गप्पा चालल्या होत्या. पण त्याची चुळबुळ मात्र काही थांबत नव्हती. त्या ice-creame cups च्या bowl मधे तो plastic चा चमचा आतबाहेर करत तो जणु ती आपल्या मनात चाललेली चुळबुळच तिला दाखवु पाहत होता.त्याचं ते रस्त्यावरची "प्रेक्षणीय" स्थळं पाहणं अन तितकंच आपल्या एकुलत्या एक मैत्रीणीच्या जवळ असणं म्हणजे दोन घोड्यांच्या रथाला त्याच्या मनाने केलेलं सारथ्यच होतं. तसं "अश्या" हजार घोड्यांच सारथ्य करण्याइतपत "potential"("ती "चा त्याच्यासाठीचा खास ठेवणीतला शब्द..!!) त्याच्याकडे नक्कीच होतं.
आता बोलायला काहीच फालतुक उरलं नसल्यामुळे त्यानं एकाकी तिच्याकडे पाहत तिला विचारलं.

"दगड...!!! don`t you think, you are emotionally invoved in me..?"

"काय..?" ती त्याचा तो प्रश्न ऐकुन एकदम आवकच झाली. घाव बरोबर वर्मी बसला असावा कदाचित..!!

"हो.. तुला नाही असं वाटत की तु माझ्यात जरा जास्तच गुंतत चाललिये..?" इतक्यावेळ तिच्याकडे एकटत पाहणारा तो आता मात्र उगीच तिच्या नजरेपासुन नजर चुकवत होता.

""..." तुला काहीही वाटु शकतं..? अन तुला कोणी सांगितलं मी तुझ्यात emotionally involved झालेय ते..? नाही मला नाही असं वाटतं..!!" तिची मात्र वेगळीच धडपड.

"आठवतय... मी त्या दिवशी तुझ्या hostel खाली उभं राहुन तुझी समजुत काढत होतो..अन तुला भेटण्यासाठी बोलावत होतो.. अन तु नाही आलीस.. मी न येण्याचं कारण विचारलं तेव्हा म्हणालीस I don`t want to get emotionally invoved with any of my friend..!! अन आज इथं माझ्याबरोबर..!! इथं तुझ्या "...." च्या डोळ्यात डोळे घालुन म्हण नाही . तु मला तुझा कृष्णा म्हणतेस ना..? मग एकदा नजरेला नजर भिडवुन म्हण "नाही..!!" त्यादिवशी तु अन पप्पा दोघच हवेत मला बाकी कुणीच नको.. असं म्हणालीस.. का तुझ्या पप्पांअगोदर तु माझं नाव घेतलसं..?"

काय उत्तर देणार होती ती त्याच्या या सार्‍या प्रश्नांची..? त्याला मात्र यातल्या कुठल्याच प्रश्नांच उत्तर नको होतो. त्याला आज फक्त तिला व्यक्त करण्यासाठी बळ द्यायचं होतं. तिला जे वाटतं तेच तो स्वताच्या मुखातुन वदवुन घेत होता अगदी तिच्याही नकळत..!! पण तिनंही आपल्यातला जमेल तितका अहंपणा एकटवत अगदी त्याच्याइतक्याच attitude ने त्याला नाही हेच उत्तर दिलं. पण त्याच्या त्या attitude पुढे तो तिचा आजच काय पण नेहमीच कमी पडणार होता. तिनं मात्र क्षणभरच त्याच्या त्या पाणावलेल्या डोळ्यांत डोळे घालत "नाही..!! नाही वाटत मला.. की मी तुझ्यात emotionally involved झालेय..!!" असं म्हणत हळुच ती स्थिरावलेली नजर त्याच्यापासुन चुकवण्याचा प्रयत्न केला. त्यानं ते बरोबर ओळखल अन तिला पेचात टाकत विचारलं ,

"अहं .. इथं माझ्या डोळ्यात डोळे घालुन म्हण एका क्षणासाठी नाही तर थोडावेळ पाहत म्हण..!!"
ती मात्र त्याच्यावर जाम उखडली अन उगीचच त्याच्या त्या अवखळ धारेपासुन अलिप्त राहत त्याला म्हणाली,

""....." आमच्यात असं public place मधे एकमेंकाच्या डोळ्यांत डोळे घालुन बोलणारे सभ्य नसतात.. अन तु नसलास ना.. तरी मी अजुन सभ्य आहे रे..!!".

तो मात्र तिचं ते बोलण उगीचच ऐकुन न ऐकल्यासारखा करत होता. कुठल्यातरी गहन विचारात खिळलेली त्याची नजर तिला जाणवलीच नाही, त्याने जाणवु दिली नाही म्हणुन असेल कदाचित. तिची ती तळमळ त्याला मात्र काही केल्या स्वस्थच बसु देत नव्हती. उगीच कुठतरी शुन्यात पाहत तो पुटलला

"दगड.. तुला कधीच तुझ्या मनासारखं नाही का रे जगता येणार..!!" एव्हढच बोलुण तो क्षणिक थांबला अन त्याचा हात हळुवार डोळ्याच्या कडांवर आलेलं पाणी टिपण्यासाठी उठला. त्याला जे विचारायचं होतं ते त्याने विचारलं होतं. पण तिला त्याच्या या प्रश्नाच्म साधं उत्तर देता येत नव्हतं, कदाचित त्या संस्कारांच्या ओझ्यामुळं..!! त्याला राहवलच नाही अन तो पुन्हा आपल्या त्या अवखळ झर्‍याच्या धारेला तसाच कोसळवु पाहु लागला..!!

"दगड मी म्हणतो ना तु मला जिंकलयस... हवं ते माग.. नक्की देईन..!! मग मलाही त्याच्याबदल्यात तु काहीतरी दे..!! देशील..?"

"काय देऊ..!!" तिचा तिरकस प्रश्न.

"आधी सांग देशील का नाही ते..?"

"नाही..!! आधी सांग ..!! मगच ठरवेन.. द्यायचं की नाही..!!"

"का..? मी तुला कुठं विचारलं होतं की तुला काय हवय.. तरीही मी तुला वचन दिलय.. त्याची परत फेड समज हवं तर..!! विश्वास नाही का तुझ्या true friend वर..!!"

"तसं नाही रे... पण तु सांग ना..!! मी म्हणते ना शब्द खुप जपुन वापरत जा.. मला एखाद्याला दिलेला शब्द मोडलेला नाही चालणार..!! तु मागितलेलं मला द्यायला नाही जमलं तर..?"

"तुझ्या मित्रावर विश्वास ठेव..!! जर नसेल द्यायचं तर राहु दे..!!"

"नलायका.. नेहमी स्वताचच खरं करणार..!! दिलं ..!! बोलं काय हवयं..?"

"कधीतरी स्वताला काय वाटतं ते जग..!! स्वतासाठी जग..!! नेहमीच आपल्या आगोदर दुसर्‍यांचा विचार करतेस..!!"

"ह्म्म...!! तुला कोणी सांगितल मी माझ्या मनासारखं नाही जगत..!! मी मला वाटत तेच करते..!! my life my decision"

तिचा तो पोकळ आत्मविश्वास त्याच्या त्या उन्मत्त attitude पुढे असा कितीसा टिकणार होता म्हणा..!!

"मला कोणी संगितलं..? मला कोणी सांगायची गरज नाही.. तु माझी एकुलती एक ,ऐत्रीण आहेस..!! मला कोणी सांगायची गरज नाही ok..!!"

"मी जगतेरे माझ्या मनासारखं.. पण माझं आयुष्य माझ्या पप्पांमुळे आहे..!! जगेन मी..!!"

"पण कधी..? ऐक मी तुला काल म्हटलं होतं ना i want to take you for date..!! मग त्याचदिवशी जेव्हा आपण date वर जाऊ ना त्या दिवशी दिवसभर तु तुला जे वाटेल ते कर..!! तुझ्या मनात जे येईल ते..!! मी आहे तुझ्याबरोबर..!! अन तु त्या दिवशी मला काहीही विचारु शकतेस..!! अगदी काहीही..!! ज्या गोष्टी तुला माझ्याजवळ व्यक्त होता येत नाहीत असं काहीही..!! येशील ना मग date वर ..!! तुला तुझ्या मनासारखं वागता येणार्‍या date वर..!!"

""....." plz date..? हा काय word आहे का..? अन तुला असं नाही का वाटत.. की मी जर माझ्या मनासारखं वागले तर मी त्या चौकटीच्या बाहेर येईन...! अन तुच तर म्हणतोस ना नको येऊस त्या चौकटीच्या बाहेर..!!"

"मी आहे "....." तुला पुन्हा तुझ्या चौकटीत पाठवायला मी आहे.. एकदा बघ रे मनासरखं वागुन..!! खुप छान वाटत..!! अन मी तुझा true friend आहे.. मी तुझ्या पप्पांना हरु नाही देणार..!! मग सांग कधी जायचं date वर..!!"

"ठीकाय..!! जाऊयात..!! पण आत्ता नको..!! मी सांगेन तुला..!!"

बस्स एव्हढावेळ त्याचा चालेला आटापिटा सार्थकी लागला होता. एकदिवस का होईना ती तिच्या मनासारखं वागणार होती सारं काही त्याच्या भरवश्यावर सोडुन..!!
ice-creame संपल्यावर तो counter वर bill देऊन आला अन तिला म्हणाला..!!

"नालायक.. जेवणापेक्षा जास्त बिल झालय २०३ रुपये..!! एव्हढी ice-creame खायची असते का..?"

ती मात्र त्याच्या त्या या track change मुळे वैतागली. अन त्याचं वातवरण निवळण्याच कसब पाहुन

"फक्त हाच आहे माझा एकमेव सखा" असच मनातल्या मनात पुटपुटत होती.
थोड्यावेळाने त्या दोघांचा common friend त्यांना पुन्हा join झाला. तिघांनीही बरोबर dinner घेतला अन पुन्हा आपाअपल्या मार्गी मार्गस्थ झाले. आजचा दिवस तिच्यासाठी एक मोठं आव्हानच तो तिच्यासमोर ठेऊन गेला होता "आपल्या मनासारखं वागायचं..!!". किती सहज बोलुन गेला तो हे..!! एक छोटीशी गोष्ट जी आजवर तिला कळुन सुधा वळत नव्हती ती किती सहजतेने त्याने तिच्या गळी उतरवली होती. पण हे सारं करताना तिनं एकदाही त्याच्या त्या गहिर्‍या डोळ्यात पहायचं धाडस केलं नाही. आज काहीतरी विपरीत घडता घडता त्यानं थांबवलं होतं. आता पुन्हा उद्याचा दिवस त्याच्यापुढं कोणतं नवीन आव्हान त्याच्या निखळ मैत्रेसमोर वाढुन ठेवणार होता कोण जाणे..? ती मात्र आज खुपच सुखावली होती. क्सं काय कोणाला इतकं pure राहता येऊ शकतं याचाच तिनं आज जवळुन अनुभव घेतला होता. आपल्या त्या सच्च्या मित्राच्या त्या अनोख्या मैत्रीच्या वर्षवात जणु ती मनोसोक्त न्हावुन निघत होती. hostel वर पोहोचल्या पोहोचल्या तिनं त्याला sms केलाच पण आज त्या sms चा नुर काही वेगळाच होता. अन ते सारं त्याला उमजत होतं, खरंतर त्यानच हे सारं घडवुन आणलं होतं, अन म्हणुन तर त्याने तिला आज कोणाताही rply केला नाही, आज त्यानं आपलं अस्तित्व तिच्या आयुष्यातुन कायम पुसुन टाकायच्या दिशेने पहिलं पाऊल उचललं होतं. दोघांनीही कशीबशी ती रात्र हातवेगळी केली. त्यानं मात्र जरा जास्तच विचारात. तिला तो आजचा दिवस खुप काही देऊन गेला होता. त्याचं तिच्यासाठी म्हणणं "माग हवं ते माग, पण मलाही तुझ्याकडुन काहीतरी हवयं..!!", तिला आज विचारापेक्षाही त्यावर अमंलबजावणी कर असचं काहीतरी सुचवुन गेलं होतं. आता या true friend ला ती आणखी कोणतं गोंडस रुप देणार होती तिलाच ठाऊक होतं. दुसर्‍या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी सकाळीच तिचा एक sms

"Good morning "...." उठलास का..? कसा आहेस..? आज काय विशेष..? i1ll always remeber that BASKIN`s N ROBBINS ice-creame fruit overload (costed RS 203)"

तसा तिचा हा sms normal च होता. त्याला मात्र त्या hopeless attitude मुळे तिचं त्याच्याबरोबर वहावत जाणं जाणवत होतं. तो मुद्दामच तिला आपल्याबरोबर वहावत नेत होता, कुठल्यातरी एका आडवळणावर एकटं सोडुन देण्यासाठीच..!! पण तो तिला सोडुन जायच्या आधी आपलं सर्वस्वच तिला देऊन जाणार होता. आपला तो I`ll make it happen वाला तो hopeless attitude च तो आपल्या प्रत्येक कृतीतुन तिच्यात उत्प्रेरित करु पाहत होता. तिच्या त्या sms ला त्याने काहीच reply केला नाही, मुद्दामच..!! आज काहीतरी वेगळंच त्याच्या मनात होतं..!! आजवर तिच्याबाबतीत त्याने जे त्याच्या मनात आलं ते सारं घडवुन आणलं होतं. पण आता त्याला तिच्या मनासारखं घडवुन द्यायचं होतं, आजवर त्याने तिला आपल्या मनासारखं अ़क्षरशः नाचवलं होतं, आपलं अस्तित्व हरवुन....!! पण आता तिला तिचं त्याच्या मार्फत व्यक्त होणं थांबवयाचं होतं, मैत्रीची ती नाजुक डोर हळुहळु भलतीकडेच खेचली जाऊ लागली होती, म्हणुनच असावं..!! तिला सोडुन जाण्या आगोदर "तिला काय वाटतं" हे तिलाच व्यक्त होऊ देण्याचा त्याचा घाट होता. अन त्याचसाठी पुन्हा एकदा आपली ती third side वाली philosophy implement करणार होता. दुपारी बारा- साडे बारा च्या सुमारास त्याने तिला फोन लावला.
"काय दगड काय करतेस..? अन काय रे सकाळी सकाळी ice-creame आठवली ते ही तिच्या किमंतीसहीत..!!"

"ह्म्म...!! "....." नालायका..!! message ला काही reply करायची काही पध्द्त..??"

"ऐ.. दगड..!! केलाय ना फोन आता..? मग बोल..?"

"अरे काही नाही रे बसलिए निवांत..!! तु कुठयस..?"

"अजुन कुठे असणार..? आपल्या नेहमीच्याच अड्ड्यावर..!! शनिवार वाड्यावर..!! बरं ते जाऊ दे..!! मग कधी जायचं आपण date वर..? ह्म्म अन आपण काल बोललेल तु "+++++"ला सांगितलंच असशील..!! हो ना..? आयला तुम्ही पोरी पण..? एक गोष्ट तुमच्या पोटात नाही राहु शकत..!!"

""...." काय हे..? नालायका..? He is my best friend..!! अन हो मी नाही काही सांगितलं त्याला काही ok..!! फक्त त्याला म्हटलं तु आज माझ्याकडे काहीतरी मागितलसं ते..!! अन जोपर्यंत तु तो word बदलत नाहीस तोपर्यंत मी नाही येणार तुझ्याबरोबर..!! plz, date हा काय word आहे का..? "

"दगड, मी तो शब्द बदलणार नाही..!! अन तु येतेस माझ्याबरोबर ok..!! माझा attitude म्हणुन नाही पण तु दिलेला शब्द म्हणुन तरी तुला यावच लागेल माझ्याबरोबर..!! कळलं..? किती स्वप्नं पाहशील..? नुसता विचारच करतेस..!! कधी तरी पाहिलेली स्वप्नं पुर्ण करण्याचा प्रयत्न कर..!! कधीतरी त्या स्वप्नांना सत्यात उतरावयाला शिक..!! खुप मजा येते रे..!! स्वप्नं पुर्ण करायला..!! खरंच बघ एखादं अव्यक्त स्वप्न पुर्ण करुन..! किती स्वप्न अशी मनाच्या तळकप्प्यात कोंडुन ठेवषील...? येऊ देत ना त्यांना बाहेर..!! होऊ देत सार्‍या अव्यक्त स्वप्नांना व्यक्त..!! माझ्याकडे बघ..!! मी जी काही स्वप्न पाहिलित जवळपास सगळीच पुर्ण केलीयेत..!! atleast ती पुर्ण व्हावीत म्हणुन मनापासुन प्रामाणिक प्रयत्न केलाय रे ती सगळी पुर्ण व्हावीत म्हणुन्..!! बस्स आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत रहायचा..!! अन मनापासुन केलीले कुठलीही गोष्ट होतेच रे..!! I beleive..!! "

""...." किती स्वप्न पाहतोस..? कधी कधी वाटतं जर तुझी ही स्वप्न पुर्ण नाही झाली तर..? किती त्रास होईल तुला..!! नको एव्हढा जीव लावत जाउस आपल्या स्वप्नांना..!! फार त्रास होतो रे स्वप्नं तुटल्यावर..!! मी अनुभवलयं..!! जरा बेतानं बघत जा रे स्वप्नं..!! त्रास होतो..!! अन तुला त्रास झाला की मला त्रास होतो रे..!!"

"ऐ दगड माझी स्वप्नं माझा attitude आहेत..!! मी नाही राहु शकत त्यांच्याशिवाय..!! तुलाही ते माहितेये..!!"

""...." मीही प्रयत्न करते रे, माझी सगळी स्वप्नं पुर्ण करण्याचा.. अगदी मनापासुन...!! पन त्यालाच वाटतं काही स्वप्न पुर्ण होऊ नयेत म्हणुन..!! अन काय रे नालायका..!! तु म्हणतोस ना तु तुझी सगळी स्वप्नं पुर्ण केलीयत..!! पण junior बाबतीतच तुझं स्वप्न कुठं पुर्ण झालय रे..? अपुर्णच राहिलय ना ते..!! तशीच राहतात काही स्वप्न अधुरी..!!"

तिच्या या बोलण्याने तो मात्र खुपच आगंतुक झाला. क्षणिक स्तब्धच झाला..!! ते मात्र त्याची दुखरी जखम चिघळल्यामुळे नाही तर आता त्याचं मन तिच्याबाजुने किती झुकलय याच विचारात तो गुंग झाल्यामुळेच..!! त्यानं मात्र लगेचच आपला tone change केला.

"दगड, तु होतीस ना..!! म्हणुन मी त्या प्रकरणातुन बाहेर येऊ शकलो रे..!! तु होतीस माझ्याबरोबर म्हणुन्..!!किती समजुन घेतलस रे आजवर मला..!! खरंतर तु होतीस म्हणुन मी माझं ते तुटलेलं स्वप्न घेऊन जगतोय रे..!! thanx दगड तु होतीस..!!"

""...." काय हे..? तु माझा true friend आहेस. मग मी तुझ्यासाठी एव्हढं केलं तर कुठं बिघडलं..? अन thanx म्हणण्या इतपत शिष्ट तु कढीपासुन झालास..? तुच म्हणतो ना मैत्रीत no sorry.. no thank you...!! मग..!!"

तिच्या या उत्तरावर त्याची ती कोमेजलेली कळी पुन्हा खुलली. किती विश्वासाने ती त्याला आपला true friend म्हणत होती. पण आज junior चा विशय काढुन तिनं त्याला त्या अव्यक्त स्वप्नाची जाणीवच करुन दिली होती. तिच्याशी फोनवर बोलताना ते त्यानं तिला जानवु दिलं नाही पण ठोड्यावेळाने तिला sms केला..!!

"you said J तुझं अर्ध राहिलेलं स्वप्न आहे..!! yes..!! पण ते काय एकच असं स्वप्न नाही...!! अशी कितीतरी स्वप्न आहेत माझी पुर्ण न झालेली..!! अन अजुन राहतीलही..!! पण मी पुर्ण न झालेल्या स्वप्नांबद्दल विचार करत बसत नाही..!! उलट पुढचं स्वप्नं का नाही पुर्ण होणार म्हणुन काही झालच नाही अस वागतो.. that is my potential..!! नाही होतं काही स्वप्नं पुर्ण..!! But still I can do anything...!!"
त्याचा हा sms पाहुन तिला खुपच शहारुन आलं..!! अगदी तिच्या मनातलं तो बोलत होता. तिला तो sms वि. स. खांडेकरांची एक ओळ आठवुन देत होता. तिनं पटकन ती ओळ mobile च्या text मधे type केली अन त्याला sent केली.

"माझं वि.स्.खांडेकरांच आवडत वाक्य..
"एखादं स्वप्नं बघणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत यावं म्हणुन धडपडणं, आणी जर ते पुर्ण नाही झालं तर त्या भग्न स्वप्नांच्या तुकड्यावरुन रक्ताळलेल्या पायांनी दुसर्‍या स्वप्नामागे धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे..!! " मी खुप स्वप्न पाहते, ती पुर्ण व्हावीत म्हणुन जिवापाड प्रयत्न करते..!! पण काही स्वप्न पुर्ण होऊच नयेत असच त्याला वाटतं....!!".

त्या sms ची शेवटची ओळ खुपच अर्थपुर्ण होती किमान त्याच्यासाठीतरी
"पण काही स्वप्न पुर्ण होऊच नयेत असच त्याला वाटतं....!!". तिनं जणु एक लाडिक तक्रारच या वाक्यातुन त्याच्याकडे केली होती. त्या वाक्यातला "त्याला" हे तिनं तिच्या कृष्णाला तिच्या true friend लाच उद्देशुन म्हटलं होतं. पण या कृष्णाच्या मनात काही औरच होतं. तिचं हे स्वप्न कदाचित तो अर्ध सोडणार होता पण आयुष्यभर पुरेल इतका attitude तो तिला देणार होता आपल्या प्रत्येक अव्यक्त स्वप्नाला सत्यसृष्टीत उतरवण्यासाठीच..!!तिचं त्याच्यातलं गुंतण आता वाढत चाललं होतं. आधी miss you पर्यंत येणारे तिचे messages आता फक्त त्याच्या नावानिशीच येऊ लागले होते..!!
त्याची आता पुरती कोंडी होऊ लागली होती. काहीतरी विपरीत घडायच्या आधीच त्याला तिच्या आयुष्यातुन निघुन जायचं होतं..!! काहीतरी विपरीत घडायच्या आधीच्..!!पण जायच्या आधी त्याला तीन गोष्टी करुनच जायच्या होत्या. पहिली म्हणजे तिला जे त्याच्याकडुन हवयं ते विना अट द्यायचं, अगदी विनाअट..!! मैत्रीचा मोबदला म्हणुन नाही तर आपल्या निखळतेचे प्रतीक म्हणुन..!! दुसरी गोष्ट म्हणजे तिला तिच्या मनासारखं वागु द्यायचं..!! एक दिवस का होईना..? कोणीतरी आपल्याला date वर न्याव्म ही सुप्त इच्छा पुर्ण करणं..!! अन तिसरी गोष्ट म्हणजे ती, ज्यामुळे ते दोघं इतके जवळ आले होते ती..!! तिचा job...!! त्याच्या त्या तिच्यापासुन दुर जाण्याच्या गडबडीमुळेच तो तिला लवकरात लवकर date वर जाण्यासाठी आग्रह धरत होता. त्याच रात्री तस्म त्यान्म तिला आपल्या एका message मधुन कळवलंही.
"plan for 30 th december..!! 10 am भवानी माता मंदीर कोथरुड, 1.30 pm lunch at Nisarg Hotel karve road, 2.30 to 5.30 long ride katraj ghaat to bengalore highway katraj lake, 6 pm to 7.30 pm गडबड मस्तानी @ गुज्जर मस्तानी हाऊस.., 8.15 pm back to hostel..!! plan approved waiting for your reply..! can be flexible as per your convieniece..!!"
त्याला आप्लया attitude वर जरा जास्तच विश्वास होता. ती मात्र तो date चा विषय मुद्दामच टाळत होती, तिला अजुन job नव्हता ना म्हणुन..!! पण त्याला तिच्या स्वतावरच्या विश्वासापेक्षा आपल्या त्या hopeless attitude वर खुप विश्वास होता. म्हणुनच त्याला खात्री होती तिला ३० december च्या आधी job मिळेल याची..!! तिनं मात्र आपल्या मनाशी पक्कं ठरवलं होतं, "....." date वर जायचं पण job लागल्यावरच..!! त्यामुळे त्यानं त्याच्या त्या message ला reply पाठवला नाहीच..!! पण तो अजुनही हार मानायला तयार नव्हता..!! तिला मुद्दामच भावनिक गुंत्यात अडकवत त्यानं तिला message पाठवला..!!.

""....." तुला माझ्याबरोबर यावसं वाटत नसेल तर नको येऊस..!! don`t change your decisions..!! sorry...!! मनापासुन sorry...!! ती चौकट तोडली म्हणुन..!! नको येऊस..!! take care...!!"

त्याच्या या message वर ती जाम वैतागली अन शेवटी त्याला जे हवं होतं तेच त्यानं तिच्याकडुन वदवुन घेतलं.

"तुझ्याबरोबर यायचं नसतं तर हो म्हटलंच नसतं ok..? प्रत्येक गोष्ट तुला हवी तेव्हा हो आणी हवी तेव्हा नाही..? काय अर्थय याला..?"

आणखी काय हवं होतं त्याला तिची मनापसुन त्याच्याबरोबर येण्याची इच्छा आहे की नाही हेच त्याल पडताळुन पहायचं होतं. सगळं कसं तिच्या मनासारखं घडविण्याचा त्याचा खटाटोप..!! त्याचं अस्सं अचानक इतकं जवल येणं.. अन क्षणात अंर्तध्यान होणं तिला आता नवं नव्हतं..!! पण तो असा का वागतोय याची उत्सुकता तिला स्वस्थच बसु देत नव्हती..!! पण तरीही तिला त्याच्या या वागण्याचा अर्थ विचारायची हिम्मत होत नव्हती..!! अन म्हणुनच तर त्याने तिला dateच्या दिवशी तिला त्याच्याबद्दल कुठलाही प्रश्न विचारायची मुभा तर दिलीच होती पण त्याही पेक्षा दिली होती ती हमी तिच्या सगळ्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे देण्याची..!! पण तरीही तिचा त्याच्या मनाचा थांगपत्ता शोधण्याचा नाहक प्रयत्न चालुच होता..!! तसं ती त्याच्याशी वागताना बोलताना सगळ्या चौकटींना व्यवस्थीत शहाणपणाच्या फुटपट्टीने मोजुन मगच व्यक्त होण्याचा प्रयत्न करायची..!! पण आता ती समजुतदारपनाची फुटपट्टीही त्याच्या समोर तोकडी पडु लागली होती. आज दिवसभराच्या दोघांच्या वागण्याचाच नाही पण गेल्या काहे दिवसातील दोघांच्या नात्यात आलेल्या स्थित्यंतराचच अवलोकन ती करत होती. शेवटी तिला रहावलं नाही अन तिनं लगेच तिला sms केला.

"one of the excellent quote from my collection
I wrote on the door of heart "Please donot enter..!!"
love came smiling & said , "sorry..!! I am illetrate..!!""

तिच्या या sms मुळे तो पुरता गुदमरला गेला होता.
उद्या तिची कुठल्याश्या एका software company त aptitude test होणार होती. ती apti crack करणार याची तिला तर खात्री होतीच..!! प्रश्न होता तो HR ROUND चा..!! पण आता त्याला कसलीच भिती नव्हती. त्याची मैत्रीण आता मोठ्या आत्मविश्वासाने पुढचा interview देणार होती. कारण यावेळेस तिला तिच्या आयुष्यातला कृष्णा गवसला होता. सदैव त्याच्या त्या I`ll make it happen वाल्या hopeless attitude घेऊनच तो तिच्या आयुष्यात आला होता, तिचा true friend म्हणुन..!! ती आता सर्वस्वी निश्चिंत होती..!!

19 december ..!! तिची technical aptitude crack झाली. आता technical interview..!! तोही तिनं व्यवस्थीत दिला. अगदी तिला जसा अपेक्षीत होता तसा..!
20 december तिचा final HR interview होणार होता...!! तश्या त्याच्या सदिच्छा नेहमीच तिच्या पाठीशी होत्या पन आता त्या सदिच्छा तो एक आव्हान म्हणुनच पेलत होता. रविवारचा दिवस असुनही तिचा उत्साह काही केल्या मावलत नव्हता..!! ते उत्साहाचं कारंज कोणी उसनं दिलेलं नव्हतं, ते आतुन आलेल होतं स्वंयप्रेरणेने उफाळुन येत होतं. मी जिंकणारच हाच आत्मविश्वास तिच्या प्रत्येक शब्दातुन ओसंडुन वाहत होता..!! Interview छान झाला ,आज तिला जास्तच विश्वास वाटत होता. आजच्या interview मधे select होण्याचा..!! तिनं interview संपल्यावर लगेचच त्याला फोन लावला. Interview कसा गेला हे त्याला सांगण्याची गरज नव्हती नुसतं तिच्या आवाजाच्या tone वरुनच त्याने अंदाज बांधला..!! अन result यायच्या आधीच तिला congrats म्हणत wish ही केलं..!! तिचा तो आनंद आज फक्त त्याच्याबरोबरच share करावासा वाटत होता अगदी त्याच्याच style ने..!! म्हणुनच ती आज त्याला भेटायला बोलावत होती, आपल्या त्या अव्यक्त संवादातुन..!! त्याला ते उमजलं..!! पटकन गाडी काढत त्यानं घरी काहीतरी थाप मारत तिला गाठलं..!! आज तिच्या चेहर्‍यावरच समाधान त्याला खुप काही देऊन गेलं होत्म..!! हेच समाधान पाहिला आजवर तो किती पिचला होता त्याच त्यालाच ठाऊक..!! आज एक मोठा सुटकेचा निश्वास त्यानं टाकला..!! तो तिच्या आयुष्यातुन जाण्याआधी तिच्याकडे job असणार होता..!! स्वताच्या हिम्मतीवर मिळवलेला..!! खरंतर आज त्याला खुप आनंद व्हायला हवा होता, तसा तो तिच्या आनंदात सामील्ही झाला होता पण मनाच्या कुठल्यातरी खोल कप्प्यात एक छोटसं दुख लपवुन त्याच्यावर ते पांघरुण त्यानं ओड्।उन घेतल्म होतं..!! आजवर जो तिला तिच्या त्या so called acting मुळे झापायचा..!! पण खरंतर तो तिच्याही पेक्षा मुरलेला actor होता. आपलं ते अनामिक दुख किती सहजतेने तो त्या आनंदाच्या पांघरुणाखाली दडवत होता..!! तिला भेटल्या भेटल्या त्यानं तिच्याशी हस्तांदोलन केलं, अन congrates म्हणत तिच्या पायाकडे न्याहाळत पाहिलं. आज तिनं sandles घालुन interview दिला होता. खरचं त्याची प्रत्येक सुचना ती किती आत्मियतेने आत्मसात करीत होती..!! आज पुन्हा दोघांनी एकत्र lunch घेतला, पण date च अजुन काहीच पक्कं होतं नव्हतं..!! तसं त्यानं आज तिला जास्त force करत विचारलं अन म्हणाला,

"मला prawn बिर्याणी खायची..!! कधी जायचं निसर्गला..!! कधी जायचं मग date वर..?"

"जाऊयात रे..!! मी घरी जाऊन आले की जाऊ..!! खुश..!!"

"काय खुश...? अन 30dec, च काय plan flop..?"

"अरे माझ्या मामेबहीणीचा साखरपुडा आहे २७ ला..!! मग तो झाल्यावरच येइन.!!"

"मग ठीकाय ना..!! तु ३० च्या आधीच येशील ना..?"

"नाही रे आई नाही मला इतक्या लवकर येऊ देणार..!!"

"ठीकाय मग तु घरी जायच्या आधी जाऊ..!! दगड तु तो दिवस किती टाळतेस ना ते मला कळत नाही असं वाटत का तुला..? बस तुझ्या true friend वर विश्वास ठेव..!! "

तिनं काहीच उत्तर दिलं नाही. lunch bill paid करताना तो तिच्याकदे मिश्कीलपणे पाहत म्हणाला "हे माझं शेवटचं bil.. ओके.. यापुढची सगळी बिलं तु भरायचीस मला job लागेपर्यंत..!!"

"हो..!! हे का सांगावं लागतं "...."..!!"
त्यानं लगेच तिला hostel drop केलं..! अन घर गाठलं..!!
आतुन आज तो खुप खिन्न होता. त्याची तिच्या आयुअष्यातुन निघुन जाण्याची घतका आता खुपच समीप आली होती..!! अन अजुनही तिनं त्याच्याकडुन काहीच मागितलं नव्हतं... ते दिल्याशिवाय तिला तिच्या आयुष्यातुन जाताच येणार नव्हतं. अन म्हणुनच तो हर एक प्रयत्न करत होता तिच्या मनातल प्रत्येक गुपित जाणुन घेण्याचा.
२२ december..
संध्याकाळी तिचा त्याला फोन..!!

"".....", मला तुला काहीतरी सांगायचय..!!"

"काय हेच ना की .......वालयांचा फोन आला होता अन तु select झालीस म्हणुन..!! मला हे आधीच माहित होतं..!! अरे तु नही तर आणखी कोन select होणार होतं रे..!! काय package दिलयं..?"

त्याचा त्यो hopeless अगाऊपणा तिचा मात्र हिरमोड करुन गेला.

"ह्म्म..!! नालायका..!! २.७ च दिलयं..!!"

"काय..? २.७ pa ..!! दगड you are rocking यार..!! आयला मला तर १.९२ च होतं अन तुला direct २.७..!!@ लई भारी..! सही खुश ना मग आता..? party हवी मग आता..!!"

"खुश..? लई म्हणजे लई खुश..! कुठं हवीय तुला party..?"

"ते जाऊ दे रे..!! तु घरी सांगितलस का हे..? अन दगड..!! तु हे मला सगळ्यात आधी सांगायला हवं< होतं..!! अन आत्ता सांगतेस..!!"

"अरे तुलाच सांगणार होते.. पण जेव्हा त्या ........ वाल्यांचा फोन आला ना तेव्हा माझी रुममेट पन बरोबर होती..!! सांगितलं घरी..!! घरी एकदम आनंदी अनंद गडे..!! बोलावलय आता घरच्यांनी लवकर घरी..!!"

तिच्या या आनंदात तो आपलं दुख घेऊनही समरसुन जात होता. त्याच्वेळेस त्याला त्याने कुणाला तरी दिलेला शब्द आठवला "तिला job मिळाली की १० दिवसांच्या आत तिच्या आयुष्यातुन निघुन जाईन.. कायमचा..!!" त्याच्या दोन्ही डोळ्यात सुप्त अश्रु..!! एकात आनंदाचे अन दुसर्‍यात दुखाचे..!!
दुसर्‍या दिवशी ती offer letter घ्यायला त्या software company त जाणार होती..!! offer letter घेतल्यावर तिनं त्याला फोन करुन तसं कळवलं अन भेटायला बोलावलं..!! त्यानं आज तिला भेटणं मुद्दमच टाळलं होतं..!! तो तिला आज face karuch शकला नसता..!! ती hostel वर पोहचल्यावर त्याने मग तिला आता पुन्यात ये आपण कोथरुडच्या भवानी मातेला जाऊयात म्हणुन गळ घातली..!! पन तिनं नको म्हटलं. उद्या घरी जाताना जाऊन येउ म्हणत त्याला उत्तर पाठवलं..!!

"उद्या तु ये मला सोडायला स्वारगेटला..!! मी घरी चललीए..!! मी वाट बघतेय तुझी..!!"

"मी सोडु तुला..? अरे मला काय काम धाम नाही का..? pick n drop का..? अरे तु काय माझी girlfriend आहेस का तुला pick n drop करायला..!! petrol महाग झालय खुप..!! त्यातुन माझी गाडी average पण देत नाही..!! अन तुला स्वारगेतला सोडायचं..!! petrol चे अर्धे पैसे द्यावे लागतील..!!"

"काय म्हणालास..? pick n drop..? i never expected this from you "..." you hurt me a lot..!!"
एव्हढचं म्हणत तिनं फोन cut केला..!! त्याच्या या विचित्र वागण्यामुळे ती खुपच hurt झाली होती. पन त्याच्या त्या दुभंगलेल्या व्यक्तिमत्वातलं तिचं तिनं घडवलेल अस्तित्व त्याला शांतच बसु देत नव्हतं अन आपोआपच त्याच्याकडुन तिला message sent झाला.

"sorry.. मस्करी केली..!! मला तुझी मस्करी करायचा हक्कसुद्धा नाही का..?"

"मस्करी..? तो tone मस्करीचा होता..!! today you hurt me a lot "...." खरचं"

कसाबसा हा कटुपणा तिनेच मोठेपणाने मिटवला अन रात्री त्याला एक message पाठवला

"Imagine dat wen u wakw up tomarrow n find out i`m no more in this word.. wat would you miss maximun @ me..?"

तसा तो mesage तिनं कोणाकडुन तरी तिला आल्यावर forward केला होता. पण तिला खरंतर जाणुन घ्याय्चं होतं तिचा त्याच्या आयुष्यातला importance..!! त्यानही सरळहाती आपल्या नेहमीच्या styale ने तिला reply पाठवला

"तुझं जाणं माझ्या हातात आहे..!! पन माझं जाणं फक्त माझ्याच हातात आहे.. जोवर मला वातेल तोवर मी राहणार.. नाही अडवु शकत मला कोणीच.. तु सुद्धा नाही..!!"

त्याच्या या उतारावर ती मात्र खुपच गहिर्‍या विचारात ढकलली गेली..!!
अन तितक्याच forcefully तिनं त्याला उत्तर पाठवलं..!!

"noways.."...." नाही जाणार तु..!! मी तुला जाउच नाही देणार..!!"

आता तो सपशेल हरला होता. काय उत्तर देणार होता तिच्या या प्रश्नाला तो..!! एक true friend म्हणुन तिला जे हवं ते घडवुन आणायचं की नीतीला धरुन जे बसत तसं वागायचं..? ती त्याच्या आयुष्यात येण्या आगोदर त्याची कधीच अशी द्विधा अवस्था झाली नव्हती..!! एरव्ही पटापट decision घेणारा आज एक decision घेताना खुपच कचरत होता. कारण यावेळेसच्या त्याच्या decision मुळे ती च आयुश्य पुरतं बदलुन जाणार होतं..!! अन म्हणुनच तो तिच्या कलाकलाने जाताना स्वताभवती ती नीतीतत्वाची चौकट अधिकाअधिक घट्ट विणत होता. शेवटी त्याने तिला उद्या स्वारगेटला भेटु म्हणुन तो संवाद तिथच थांबवला..!! दुसर्‍या दिवशी दोघेही स्वारगेटला भेटले. त्याच्या हट्टानुसार दोघेही आज त्या कोथरुडच्या भवानी मातेच्या मंदीरात जाणार होते. दोघेही त्याच्या गाडीवरुन निघाले. पन आज आई भवानी बहुतेक त्य दोघांवर रुसली असावी. दोघही तिथं जेव्हा पोहचले तेव्हा मंदीर बंद व्हायची वेळ झाली होती. आता मुख्य दरवाजा २.३० लाच उघडणार होता. त्याचा काही केल्या तिथुन पायच निघेना..!! तिनं याला कसंबसं समजावलं अन पुन्हा केव्हातरी येऊ म्हणुन त्याला तिथुन निघायला भाग पाडल. त्याला मात्र खुपच फील होत होतं. आज इतक्या दिवसानंतर ती त्याच्याबरोबर त्या भवानी मातेच्या मंदीरात यायला तयार झाली होती अन देवीनेच दरवाजा बंद करुन घेतला होता. कदाचित तिलाही दोघांच एकत्र येण मान्य नसावं. तो तसाच खिन्न पावलाने आपल्या intense desire कडे वळाला. तिला घरी जायला उशीर होत होता, म्हणुन पटकन त्यानं गाडी स्वारगेटकडे वळवली. गाडीवरच दोघांचा संवाद चाललेला .

"दगड..मी खरच येडाय ना..? तुला काहीही विचारतो..!! एकदम बाद..!!"

""...." तु मला काहीही विचारु शकतोस..!! काहीही..!! अगदी हक्कने..!!"

"का...? कोठल्या हक्काने...?"

"तु माझा true friend आहेस.. अन नालायका तुच तर म्हणतोस ना तु माझी एकुलती एक मैत्रीण आहेस म्हणुन मग त्या हक्कने नाही विचारु शकत तु मला..?"

रस्त्यात थोडी भुक लागल्यामुळे ते थोडावेळ समुद्रला थांबले. पण तो चा मुड खुपच down झाला होता. ती त्याला सांभाळुन घेत होती. पुन्हा केव्हतरी येऊ रे अशीच त्याची मनधरणी करत होती. दुपारी १.३०० ची बस तिला मिळाली. त्या बसमधे बसवुन तो तिच्या खिडकी शेजारी बराचवेळ तिच्याशी गप्पा मारत उभा होता, काहीशी तिच्याशी नजर चुकवत. बोलता बोलता सहज त्याने आपला ray-ban डोळ्यावर चढवला. का ते फक्त त्यालाच माहित होतं. तिचं मात्र त्याच्याकदे फारसं लक्ष नव्हतचं उगीच कुठेतरी शुन्यात नजर लावत ती त्याची ती बडबड ऐकत होती.

"काय मग..? काय करणार पहिल्या पगाराचं..? घरच्यांसाठी काहीतरी घे..!! पप्पांसाठी काहीतरी खास..!!"

"बघु रे अजुन खुप वेळ आहे त्याला, मला आईसाठी पैठणी घ्यायचीय.!! पहिल्या पगारात घेईन मी..!!"

"बरं.. तु ना माझ्याच choice ची घे पैठणी..!!माझी साड्यांची choice छान आहे.. असं माझी आई म्हणते..!! तिच्या बर्‍याचश्या साड्या मीच select करतो.. काय करणार..? कोणी मुलगी नाही ना आमच्याकडे..!! काकुंना नक्की आवडेल माझी choice..!!"

"ह्म्म.. ठीक आहे तुझ्याच पसंतीने घेऊ ..!! मलाही बघायचाय तुझा choice..!! मम्मीला मी घेतलेलं काही पटतच नाही.. बघु तुझी choice पटतेय का तिला..?"

१०-१५ मिनिटं अश्याच दोघांच्या गप्पा चालल्या होत्या. पण तितकावेळ त्यानं आपल्या डोळ्यावरुन तो ray-ban काढलाच नाही. तिची गाडी नजरेआड होताच हलकेच एक अश्रु त्याच्या गालावरुन खाली ओघळला. आज त्याला track change करताना खुपच त्रास होत होता. तिला निरोप देऊन घरी पोहोचल्या पोहोचल्या त्याने तिला message केला.

"sorry..! ती चौकट तोडायला नको होती मी..!!
हमको गिले तुमसे ना जाने क्युं..?
मिलोंके हैं फासलें.."

आजही त्याने त्या शेवटच्या ओळीतला प्रश्नचिन्ह मुद्दामच गाळलं होतं. तिला मात्र त्याच्या या message ला काय उत्तर पाठवाव हे सुचत नव्हतं. पुर्ण blank झाली होती ती...!! ती आज घरी जाणार होती. इतके दिवस त्याची होणारी ससेहेलपाट काहीकाळ का होईना थांबणार होती.खरंतर तो तिच्या आयुष्यातुन हळुच कसं सटकता येईल याच विचारात गुंतला होता. पन त्याला तिच्या आयुष्यातुन इतक्या सहज सटकताच येणार नव्हतं. गेले आठ महिने तो या गोष्टीवर बराच विचार करत होता. पन काही केल्या त्याला यावरच solution सापडतच नव्हतं. खरंतर त्याला हे आता कळुन चुकलं होतं की तो तिच्या आयुष्यातुन कधीच जाऊ शकणार नव्हता. तिनचं त्याच असं रुप बनवलं होतं की ज्यामुळे तो तिला कधीच सोडुन जाऊ शकणार नव्हता.पन त्याला कधीच तिला त्या चौकतीतुन बाहेर खेचुन काढायचं नव्हतं. कदाचित तिची चौकटी बाहेर पडण्याची धडपड त्याला सहन होत नव्हती. त्यानं तिला त्या फुटक्या चौकटीतुनच बाहेरचं ते अनोखं विश्व दाखवलं होतं. ती त्या चौकटीच्या बाहेर आली असती तर तिला चौकटीच्या आतल्या बर्‍याच गोष्टींना मुकावं लागलं असतं. त्यात कदाचित तिचे पप्पा ही असते. तिच्याबाबत विचार करत असताना तो खुपच conscious असायचा.

"तुला कोणी बहीण नाही ना..? म्हणुन तु असा आहेस" असं म्हणुन ती त्याची हेटाळणीच करायची. पण तो तिला हेच दाखविणार होता की मला बहीण नसली म्हणुन तुझं मन मला कळणार नाही असं कसं होईल्..!!तिच्या पासुन ४-५ दिवस दुर राहिल्यावर त्याला मात्र तिच्यापासुन दुर जायचा एक मार्ग सुचला. फारच विचित्र होता, त्यालाही तो पटत नव्हता. पण त्याचा नाईलाज होता. तिच्यापासुन कायमच दुर न जाता तिच्या आयुष्यातुन कसं जाता येणार होतं त्याला. म्हणुनच त्यानं ठरवलं होतं की तिला आपल्या आयुष्यातुन घालवायचं तिला जाणवु न देता. तिला आपल्या आयुष्यातुन कायमच काढुन टाकायचं. किती कठोर निर्णय होता त्याचा हा..!! पण हाच शेवटचा पर्याय त्याच्यापुढे शिल्लक होता. आपल्या मैत्रीतली ती निखळता कायम ठेवण्यासाठी..!! तसे ती घरी असताना तिचे sms त्याला यायचेच पण त्याला तो जाणुन बुजुन उत्तरं पाठवायचा नाही. तिला अगदीच सहन नाही झालं तरच तो एखादा sms reply म्हणुन पाठवत होता. या दरम्यान त्याला सोबत होती ती त्याच्या शब्दांची..!! आजवर कधीच त्यांनी त्याला दगा दिला नव्हता..!!

तिच्या मनातल्या सुप्त प्रश्नांना वाट करुन देण्यासाठी त्यानं तिच्या जागी जाऊन या शब्दाना हाक दिली होती, तिच्या जागी जाऊन विचार करण त्याला सहज जमत होतं. पण त्याच्या जागी येऊन तिला विचार करण केवळ अशक्यच होतं. असच त्या शब्दांना आळवता आळवता एक कविताच त्याच्याकडुन झाली. तशी ती त्याने लगेचच तिला email केली.

मी असं का केलं...?
विचारणार नाहीस जाब मला..?
मृगजळ म्हणूनच धावत होतो..
आलं हाती तरी तो भासचं असणार होतं..!!
माहित असूनही का असं केलस..?
विचारणार नाहीस जाब मला..?
तुझ्या हजारों प्रश्नांना सामोरें जाण्याची..
भीती मला मुळीच वाटत नाही..!!
वाटते ती माझ्या उत्तरांना येनार्‍या तुझ्या प्रतिक्रियेची..!!
तरीही तू मला एका शब्दानेही विचारल नाहीस..?
मी असं का केलं..?
वाहत्या पाण्याला अडवण्याचा प्रयत्नही तू करणार नाहीस..!!
उलट्या धारेवर पोहणं एव्ह्ढंच काय ते मला माहित होतं..!!
तुला ते कधी जमेल की नाही..?
मी कधीच तुला विचारलं नाही..!!
अन नाहक तुला वहावत माझ्याबरोबर नेलं..!!
अन तू .. तू ही आलीस..!!
मी असं का केलं..?
विचारणार नाहीस जाब मला..?
अबोल कळीला डिवचून जागं करुन काय साधलं..?
माझ्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं तू टाळणं..!!
अन "तू" मला काहीही विचारु शकतोस..!!
म्हणून तुझं गळ घालणं..!!
अन मी फक्त "मी" म्हणूनच जगणं..!!
तुझ जगणं तुझ्या जागी येउन कधी जगलोच नाही..!!
मी असं का केलं..?
विचारणार नाहीस जाब मला..?
" फक्त तुझ्याच साठी जगला..
कधी वाटलं नाही कारे मला काय वाटतं ते..?
माझ्या मनातला तो सुप्तपणा जागवून असच..
अंधारात चाचपडत ठेवायचं होतं ..
तर का असं वागलासं..?"
मी असं का केलं..?
विचारणार नाहीस जाब मला..?
बस एकदा विचार..!!
सार्‍या प्रश्र्नांची उत्तरे आहेत..!!
फक्त तू विचारायची देरी आहे..!!

त्या कवितेच्या एक एक शब्दांत त्यान अपला प्राणच फुंकला होता. त्या कवितेतली तीव्रता तिला जाणवली असती तर..?
1 january 2010 नवीन वर्षातला पहिला दिवस..!! आज ती तिच्या गावाहुन परत पुण्याला येणार होती. त्याची चलबिचलता मात्र खुपच वाढली होती.
hostel वर आल्यावर थोड्यावेळातच त्याने त्याला फक्त त्याच्या नावानिशी message केला..!! त्यानं त्याकडे दुर्ल़क्ष केलं..!! जाणुनबुजुनच..!! त्या message ची intensity त्याला ठाऊक होती. पण मुद्दामच तो ती टाळु पाहत होता. आता फक्त एकच विचार त्याच्या मनात "हिला आपल्या आयुष्यातुन कसं घालवायचं..? तेही तिच्या नकळत..!! तिला काहीही कळुन न देता..!!". हे अवघड काम ही तो अगदी लीलया करणार होता . तिला त्याच्या आयुष्यातुन कायमचं निघुन जाण्यासाठी तो तयार करीत होता. ती मात्र या सगळ्यांपासुन अगदीच अनभिड्न..!! अन त्याचाच एक भाग म्हणुन त्यानं आज तिला खुप सोप्पा प्रश्न विचारला होता.

"दगड..explain me one term.. TRUE FRIEND" why it is different than best friend..?"

"friends say ' I care for you..'
best friends says 'I care for you and i`ll kill if you`ll dont care for me'
but care of True friend is not bounded to words, he/she, always care for you even though you dont care for them..!!
कळलं का..? अस का विचारालसं..?"

"दगड you care for me..!!"

"कोई शक..?"

"the best thing that i can do with you..!!
I can only hurt you..!! and still you care for me..!!Don`t care for me..!!I can`t just hurt you..!! "

"still I always care for you "...." मी तुला त्रास देतिए का..? माझ्या मैत्रीचा, काळजी करण्याचा त्रास होतोय का तुला..?"

तीर बरोबर निशाण्यावर बसला होता.

"नाही.. ती चौकट तोडल्याचा त्रास होतोय..!! इतका जीव नको लावुस की मी तुला कायमचा थांबवेन..!! खुप स्वार्थी आहे रे मी..!!"

"नाही.. "..." तु असं काहीही करणार नाहीस. माझा मित्र असं काहीही करणार नाही, I know..!! dat much I can trust you. तुझी आणी माझी मैत्री इतकी लेचीपेची नाही की कोलमडेल..!!"

"मी असं का केलं..? विचारणार नाहीस जाब मला..? कविता mail केलीए तुला.. वाच.. मी काहीही करु शकतो.. काहीही..!!"

"ह्म्म..!! तु काहीही करु शकतोस.. I know your potential.. ur attitude. पन माझा true friend असं काहीही करणार नाही याची मला खात्री आहे.. १००%.. मनापासुन..!!"

"दगड ..
माझ्या विचारावर तुझा पुर्ण control आहे.. म्हणुनच तुला जे वाटतं तेच मी करेन..!! काहीही माग..!! देणार..!! दिलं.. तुला जे वाटतं ते..!!"

"मी अजुन मागितलय कुठं..?"

"पण मी दिलय..!! तु मागायच्या आधीच शब्द दिलाय..!! फक्त जे काही मागायचय ते डोक्याने नाही मनाने माग..!! ही अट नाही सल्ला आहे..!! बाकी तुझी मर्जी..!! कविता वाचलीस..?"

"अरे माझ्या मोबाईल मधे net नाही तुझ्याकडे आहे..!! गरीब माणसं आम्ही लगेच कशी वाचणार कविता? उद्या वाचेन. आणि तुला party पन द्यायचीय, रविवारी वेळ आहे का तुला..?"

"कविता वाचुन शिव्या देणारेस तु मला..!! अन party च म्हनशील तर बघु..? and don`t you miss you me when you are at home..?"

""...." yes i missed you my friend. आणी काय रे सकाळपासुन तिसर्‍यांदा अस्म विचारतोयसं..? मी सोमवारी घरी चाललेय.. बोलावलय घरच्यांनी.. पुन्हा घरी जाणार आहे मी..!!अन रविवारी काय बघु..?"

त्यानं मात्र तिच्याबरोबर party ला कधी जायचं याच उत्तर तिला दिलं नाही. अजुन ती कुठे त्याच्याबरोबर date वर गेली होती.
दुसर्‍या दिवशी त्याची ती कविता वाचुन तिनं लगेचच त्याला call केला.

"काय करतोयस..? वाचली तुझी कविता..!!"

"कशी वाटली..? थोडीशी realastic आहे..!! हो ना..!!"

"मला त्यातल्या दोनच ओळी आवडल्या..."तुझ जगणं तुझ्या जागी येउन कधी जगलोच नाही..!!..अन कधी वाटलं नाही कारे मला काय वाटतं ते..?" बाकी छान आहे कविता..!! पन त्या दोन ओळी पटल्या..!!"

"ह्म्म.. मला वाटलं तु खुप शिव्या देशील मला..!! दगड यार काहीतरी वेगळं घडतय यार..!! असं मला वाटतंय..!! तुला त्या चौकटीच्या बाहेर यायचयं की नाही..?"

"मी येऊ नये असच तुला वाटतं ना तुला..? मग..?"

"तसं नाही रे..!! पण मला तुला काय वाटत ते महत्वाचय रे..!! माझं काय रे.. मी नाही कशाला घाबरत...!! येईल त्या परिस्थीतिला तोंड ध्यायला मी समर्थ आहे..!!"

"जाउ दे ना "...." का उगाच डोक्याला ताप करुन घेतोयस..? तु काल true friend बद्दल काय विचारत होतास..?"

"दगड.. काय हे..? जाऊ दे झिंदाबाद..!! अरे माझी true friend ची definition फार वेगळी आहे बघ तुलाही पटेल..!! मला ती आमच्या metullurgy च्या iron - iron carbide diagrame वरुन सुचलीए..!! कसं असतं माहितीए का..!! iron-iron carbide diagram म्हणजे थोडक्यात iron च phase transformation. iron च्या phase transformation मधे त्याच्यात काही extraa materials add केले ना की आपल्याला वेगवेगळे alloys मिळतात. आता हे alloys मिळण्याच्या आगोदर जर आपण pure iron मधे eutectoid temperature च्या range मधे त्याच्यात carbon % वाढलं की त्याचा hardness वाढत जातो.. अन हेच carbon च % वाढत असताना जर त्यामधे chromium/ magnessium किंवा आणखी कुठला एखादा धातु त्यामधे add करतात. त्यामुळे त्याच्या आणखी काही properties improve होतात. कधी त्याचा wear resistance वाढतो तर कधी corrosion resistance..!! हा तर हे झालं iron alloy अन त्याच्या meturlgy च्या बाबतचं. आता मैत्रीच म्हणशील तर तिचं ही असच असतं..!! तिच्याही वेगवेगळ्या phase असतात, अन त्या त्या वेळी तो तो रंग जर मैत्रीला दिला ना तर..!! तर तीही त्या iron alloys सारखी होत जाते.मला वाटत आपली मैत्री आता त्या eutectoid trasnformation phase मधुन पुढं चाललीए अन you are trying to add something extra in that, that extra flavour..!! म्हणुन मी तुला तसं म्हट्लं कळलं का दगड..!!"

""....", नालायका सगळी philosophy डोक्यावरुन गेली..!! कायच नाही झेपलं..!!"

"असु देत.. दगड..!! कळेल तुला या ही philosophy चा अर्थ कळेल..!! तु त्या चौकटीच्या बाहेर यायचा जो प्रयत्न करतेस ना त्याचा त्रास होतोय रे मला..!!मी तुला त्या चौकटीच्या बाहेर सहज खेचु शकतो.. अगदी सहज.. पण दगड मे जरी म्हणतो ना मी काहीही करु शकतो.. पण काही गोष्टी मी नाही बदलु शकत रे.. नाही बदलु शकत.. पन म्हणुन मी हरलोय असं नाही रे.. माझ्या काही अडचणी आहेत म्हणुन मी तुला त्या चौकटी बाहेर येऊन नाही देत...!! नको बदलुस तु तुझा कुठलाच decision माझ्यासाठी..!!"

""......", you are my true friend.. मला गरज नाही समजुन्घे म्हणायची.. अन माझं चौकटीच्या बाहेर येण्याचं म्हणशील तर नाही येणार मी. अन माझे decision final असतात..! ते मी कुणासाठीही बदलत नाही. तुझ्यासाठीही नाही बदलणार.. अन तु ते बदलुच शकत नाही.. ok.. my life my decisions..!!"

"ऐ दगड तु काय मला चावी देतेस का..? तुझे सगळे decisions बदलण्यासाठी..?"

"चावी..? no ways....".....", तुला म्हटलं ना नाही बदलु शकत कोणी माझे decisions..!! कुणीच नाही..!!"

"दगड you know my potential..!! ज्यानं तुझी ती चौकट तोडली, तो तुला त्या चौकटीच्या बाहेर आणु शकत नाही असं वाटतं का तुला..? त्याला तुझा कुठलाच decision बदलता येणार नाही असं वाटतं का तुला..? तर ऐक तुझा कुठलाही decison मी अगदी सहज बदलवु शकतो.. अगदी मला जसा हवा ना तसा.. यु.. बदलशील तु तुझे decision..!! माझा over confidence नाही attitude समज हवं तर..!! and you know my attitude..!! my potential..!!"

त्याच्या या argument वर तिला काहीच उत्तर देता आलं नाही. तिनं फोन तसाच ठेवला, पण अजुनही मनात त्याचीच वाक्य घोळत होती.
किती सरळ अन सहज बोलुन दाखविली होती त्यानं आपली हतबलता. पण तरीही मी हतबल नाही हेच दाखविण्याची त्याची धडपड तिला कितीतरी खोल विचारात ढकलुन गेली होती. बर्‍याच विचारांती तिलाही त्याचं ते मघाचच बोलण पटल असावं बहुतेक म्हणुनच तिने लगेच त्याला message धाडला.

"ok. I agree तु माझे कुठलेही decisions सहज change करु शकतोस्.पण तु change करु नयेस अस मला वाटतं..!! please don`t do that. याला तु surrender म्हण किंवा काहिही..!!"

message वाचताच त्याच्या डोळ्यात हलकेच अश्रु तराळले..!! काय होतं त्या message मधे.. सर्व बाबतीत परिपुर्ण असुन सुद्धा तो हतबल होता. का असं वागत होता तो,,? आपल्या एकुलत्या एक मैत्रीणीच्या मनात आलेली प्रत्येक गोष्ट त्यानं तिच्यासठी केली होती आत्तापर्यंत..!! मग आज का तो तिच्या मनातली ती सुप्त इच्छा पूर्ण करायला कचरत होता. आपल्या त्या I`ll make it happen वाला attitude सुद्धा आज तोकडा पडत होता की तिची होणारी घालमेल त्याला तसं करु देत नव्हती..? म्हटलं असतं तर त्यानं कधीच तिला त्या चौकटीच्या बाहेर फरफरट नेलं असतं. अगदी सहज...!! पण तिचं प्रत्येक वेळीसच विनवणं अन पुन्हा परत चौकटीतुन बाहेर येण्यासाठीचा अट्टाहस त्याला मोठ्या द्विधेत टाकत होता..!! त्याचमुळे गेले काही दिवस त्याच्या वागण्यात बरच fluctuation होतं होतं. आजवर त्यानं ते मोठ्या धीराने पेलल होतं, फक्त तिला त्यावेळेस कुणाचीतरी गरज होती म्हणुन..!! पण आज तिला कुणाचीच गरज नव्हती त्याच्या मते..!! आता कुठं ती track वर आली होती. धड्पड करुन यश अनुभवायला शिकली होती. अन त्याचं काम इथवरच होतं. तिला योग्य मार्ग सापडे पर्यंत तिची सोबत करेपर्यंत..!! आता सगळं काही साध्य झालं होतं. आता तिला खरच कुणाचीच गरज उरणार नव्हती, एव्हढा attitude त्यानं तिच्यात आणला होता. आता काय गरज होती तिला त्या चौकटीच्या बाहेर खेचण्याची. पण त्या तिच्या तुटलेल्या चौकटेच्या आत चाललेल्या तडफडीला तोच सर्वस्वी जबाबदार होता. कसं करणार होता तो याच प्रायश्चित..!! तसं तिच्याशी बोलताना तो नेहमीच म्हणायचा "मागच्या जन्मी मी खुप पुण्य केली असणार..!! म्हणुन तु आलीस माझ्या आयुष्यात..!! माझी एकुलती एक मैत्रीण म्हणुन मला जीव लावायला..!! पण मागचा जन्म संपता संपता माझ्या हातुन काहीतरी पाप घडलं असणार रे..!! म्हणुन तु मला सोडून जाणारेस रे..!! ". तिला तसं त्याच्या बोलण्यातली ही अजाणती बोच जाणवायची अन मग तीही त्याला समजावयचा वेडा प्रयत्न करायची.

"".....",मागचा जन्म , पुढला जन्म काही नसतं..!! जे काही कराल ते याच जन्मात करायचं असतं. अन कसल पाप पुण्य घेऊन बसलायस "....", at the last everything will be balanced. so don`t worry तुझी life ही balance असेल..!! तो कृष्णा आहेच ना.. सगळं बघायला..!! tension नको घेऊस..!! किती वेळ झालं बोलतोय..!! अन "तो" आहे "....."..!! सगळं बघायला..!!"

तिची ती सात्वंना त्याला नवीन नव्हती. पण त्या सांत्वनेतली आजची बोच जरा वेगळीच जाणवत होती.
आता तब्बल साडे चार महिने झाले होते त्याला आपला पहिला job सोडुन..! अन अजुनही त्याला दुसरा job मिळत नव्हता..!! त्यामुळे घरच्यांन बरोबर त्याची थोडी खरखर व्ह्यायची. पण अशी खरखर त्याला आता नवीन राहिली नव्हती. ती त्याची चांगलीच अंगवळणी पडली होती. घरी गेल्यागेल्या चार शिव्या खाऊन कसंबसे चार घास गिळुन त्याने बिछान्याकडे झेप घेतली बरोबर आपला मोबाईल घेऊनच..!!
पडल्या पडल्या लगेचच तिचा message.

"".....", reply नाही केलास आधीच्या message ला ..? का..?"

पण तिचा message येण्या आधी तो त्याच्या पप्पांच त्याला नकोसं वाटणारं lecture ऐकत होता. त्यानं जवळपास आता आपलं काळीज दगडासारखच घट्ट केलं होतं बाहेरच्या जगासाठी पण आतुन तो हळवेपणा त्याला कितीतरी छळत होता. त्यामुळे त्यानं तिच्या message कडे थोडं दुर्लक्ष करत तिला message केला.

"पप्पांच lecture ऐकतोय..!! आईला दगड.. घरच्यांच प्रेम कमी झालय..!! असं वाटतय..!! no one can love me..!! just becoz i live what i think..!! but i cant give up that..!! life on my terms only..!! झोपलीस का..?"

"नाही ..!! मला उत्तर हवय माझ्या आधीच्या mesaage चं..!! अन dont worry "...." तुला लवकरच छान job मिळेल..!! अगदी तुझ्या मनासारखा..!!"

तो तिच्या त्या सांत्वनेवर खुपच चिडला. त्याच्या job नसण्याची तिनं काळजी करावी हे तिला बहुतेक पटलच नसावं बहुतेक, त्यांमुळेच त्यानं फटकारतच तिच्या त्या आधीच्या अन आतच्या दोन्हीही message ला अगदीच त्याच्या style ने reply केला.

"hey you, don`t worry, all izz well... अन तुला जर खरच मनापासुन माझ्यासाठी तुझे decisions बदलावे लागले तर बिंधास बदल.. मी समर्थ आहे त्याचे परिणाम भोगायला..!! life मनापासुन जग.. माझ्यासारखी.... तुझ्या कृष्णासारखी..!! I`ll not interfer in your decisions..!!"

यावर तिनं खुपच सावध प्रतिक्रिया दिली अगदी त्याला अपेक्षीत असलेली.

"मी माझे कुठलेच decisions बदलणार नाही. dont worry..!! आणि माझ्या कुठल्याच decisions चे परिणाम तुला का म्हणुन भोगावे लागवेत..? मी तुला कधीच त्रास नाही देणार..never..!!"

तिचं तिच्याच मनाशी खेळणं चालु होतं, पण या खेळात फरफट त्याची होत होती कदाचित याची जाणीव तिला झाली होती म्हणुन तर ती त्याला धीर देत होती "" मी कधीच तुला त्रास देणार नाही " म्हणुन..!! पन त्यानं मात्र सगळच स्विकारलं होतं. तिच्या मनाबरोबर फरफटणं सुद्धा..!! फक्त आपल्या एकुलत्या एक मैत्रीणीसाठी..!! अन म्हणुनच त्यावेळेस तिच्या मनात जे चालल होतं ते त्यान शब्द रुपी मांडण्यासाठी तिला खुप विचारांती reply केला.

"मी थांब म्हटलं तर थांबशील..? कायमची.? I dont want to loose you..!! थांबशील कायमची..?"

"नाही..!! नाही थांबणार. एक मुलगा, एक मुलगी कितीही true friend असले तरी they have to depart..! so तु म्हणालास ना तरी नाही थांबणार..!!"

त्याचे सर्वच decision तो त्याला हवे तसे घडवुन आणत होता. त्यातलाच हा एक..!!

"ह्म्म..!! ठीकाय .... तुझा कुठलाही decision मी change करु शकतो... पण... It matters me a lot what you think. आज विचारलं..!! पुन्हा कधीच नाही.. शेवटी तुला काय वाटत हेच महत्वाचय..!! हम तो बस ऐसे ही है..!! I can only hurt people..!! becoz I live what I think.. thats why I don`t need any one.. NOT EVEN YOU.. don`t worry..!!"

"I know YOU DON`T NEED ME."

"BUT YOU NEED ME.. TILL YOUR END..!! and one day तु मला कायमचं थांबवशील..! party कधी अन कुठे देणारेस..?"

"उद्या सकाळी 3 IDIOTS बघायला जाणारेय.. उद्या संध्याकाळी जायचं की परवा सकाळी..? तु सांग..!! कुठे जायचं ते पण तुच ठरव..!!"

"बहुतेक उद्याही नाही अन परवाही नाही.. माझ्या नशिबात नाही रे तुझी party..!! बहुतेक उद्या गावी जावं लागेल..!! Anywez ALL IS WELL.. ".........", माझी ".........""

त्याचं तिला माझी म्हणणं तिला खुपच सुखावुन गेलं होतं. तो कितीही अतरंग वागत असला तरी तो नेहमीच माझ्याबरोबर असणारेय हा आत्म्विश्वास त्यानच तर तिच्यात निर्माण केला होता. अगदी त्याच्याच intensity ने तिनं त्याला reply केला.

"आत्ता बाहेर पाहिलं तर पाऊस पडुन गेलाय.. HE is wid me.. Always.."

आजपुरता शब्दातला संवाद इथेच थांबला होता पन मनांचा संवाद अजुनही चालु होता अन तो कायमच राहणार होता. दुसर्‍या दिवशी 3-IDIOTS पाहुन झाल्यावर तिनं त्याला फोनकरुन party बद्दल विचारलं अन त्याला लगेचच स्वारगेटला बोलावुन घेतल. तो आज तिला भेटायला निघाला पण आज त्याच्या घरातुन निघण्यात रोजच्या सारखं अवसान नव्हत. उगीच तिचा शब्द ठेवण्यासाठी तो तिला भेटायला निघाला होता पण मनात काहीतरी विचित्रच वादळ घोंगावत होतं. स्वारगेटला त्यानं तिला pick-up केलं, आज पुन्हा दोघेच..!! पण आजचा तो एकांत काहीतरी वेगळच घडवुन आणणार होता. त्यानं नेहमीप्रमाणेच आपल्या मनाचे तळ झाकोळणारे त्याचे नेहमीचे ते झरोके ओढुन घेत तिच्याशी संवाद सुरु ठेवला होता. दोघांनी party साठी चांदणी चौकातलं "UP-&-ABOVE" होटेल निवडलं होतं.
तो आज तिला जेव्हढं उशीरा भेटता येईल तेव्हढ उशीरा भेटण्याचा प्रयत्न करत होता अन तिला मात्र त्याला भेटण्याची ओढ अगदी तो म्हणायचा ना त्या झर्‍यासारखी अवखळ वाहावत जाण्याच्या ओढीसारखी. दुपारी दीड च्या सुमारास तो स्वारगेटला पोचला. दोघही त्याच्या Intense Desire वरुन UP & ABOVE कडे निघाले. दोघांच्याही मनात आज कितीतरी वादळे होती पण वेगवेगळ्या कारणासाठी. रस्त्यात त्याने पुन्हा विचारलच.

"ऐ.. दगड काल मी तुला विचारलं होतं थांबशील माझ्या आयुष्यात म्हणुन..!!"

"हो..!! मग..?"

"थांबशील..? कायमची..? तुझ्या "...." तुझी गरज आहे..!! थांबशील माझ्यासाठी..?"

"अन काय करु थांबुन..?"

"अरे ते मी थांबल्यावर सांगेन ना..!! आधी सांग थांबशील का नाही ते..?"

"नाही..?"

"दगड..!! तुझं हे खरं उत्तर नाहीए..!! तु घाबरतेस..!! माझ्यावर विश्वास नाही का..? मी तुझा true
friend आहे ना..?"

"तसं नाही रे..!! i trust you..!! पण..?"

"पण काय..? दगड तुझ्यासाठी नाही पण माझ्यासाठी थांब..!! मी आहे ना सगळं सांभाळुन घ्यायला. माझ्यात आहे तेव्हढं potential. अन मी काहीही करु शकतो. that you know..!!"

"हो.. I know that...!! पण तरीही नाही थांबणार..!! एक मुलगा अन एक मुलगी कितीही चांगले मित्र असले तरी त्यांना एकमेंकांच्या आयुष्यात कायम राहता येत नाही."

"ठीक आहे. तुझी जशी इच्छा..!! बघ पुन्हा कधीच नाही विचारणार..!!"

तिनं यावर काहीच उत्तर दिलं नाही. पण तिच्या मनातला तो उसळणारा आनंद तिच्या चेहर्‍यावरुन ओसंडुन वाहु लागला होता. शेवटी एकदाचं त्यानं तिला काय वाटतं ते जाणुन घ्यायचा नाही तर ते व्यक्त व्हायचा प्रयत्न केलाच. पण याचे परिणाम कय होणार होते याची त्याला पुर्ण जाणीव होती अन होणार्‍या कूठल्याच परिणामाची त्याला भितीही वाटत नव्हती, अगदी सहज तो तिच व्यक्त होणं आत्मसात करत होता. अगदी तिला हवं तसं. अन आज तेच झालं होतं. तिला जे वाटत होतं तेच घडत होतं. पण तिच मन मात्र ह्या इतक्या सहज घडणार्‍या गोष्टी मानायला तयारच नव्हतं. एव्हढं होउन तो तिला पुन्हा पुन्हा तीच विनवणी आळवत होता.

"दगड.. I need you...!! नको जाऊस ना मला सोडुन..!! मला हवीयस तु कायमची माझ्या आयुष्यात..!! थांबशील माझ्यासाठी..!! तुझ्या true friend साठी..!!"

ती मात्र त्याच्या या मागण्यावर निरुत्तर होत होती. तो तिच्यापासुन दुर जाण्याच्या तयारीत असताना तिला त्यानं असं काही विचारण खरतर कुणालाच पटण्यासारखं नव्हतं.पण त्यानं या दुनियेची कधीच फिकीर नाही केली. त्याला जे मनापासुन वाटल तेच तो करत होता. आपल्या एकुलत्या एक मैत्रीणीला जी गोष्ट व्यक्त होता येत नव्हती तिच गोष्ट तो स्वताकडुन व्यक्त करु पाहत होता तिचा कृष्णा म्हणुन..!!

"बघु रे.. "......." मी काय तुला लगेच नाही सोडुन जाणारेय..!! अन कायमचं थांबायच म्हणशील तर बघु..!!"

तिच्या या हतबलतेवर तो निराश झाला नाही, कारण त्याला विश्वास होता तो त्याच्या त्या purity वर, त्याच्या त्या झर्‍यासारख्या निखळ वाहण्याच्या निर्व्याज वृत्तीवर..!!
UP & ABOVE मधे lunch घेतल्यानंतर दोघही आता त्या कोथरुडच्या भवानी मातेच्या मंदीरात गेले. दोघांनीही त्या दैवी शक्तीकडे एकच मागणं मागितलं "काहीही झालं तरी आमची मैत्री सुखरुप राहु देत..!!"
तो जरा जास्तच attitude देऊन त्या देवीकडे जरासं लटक्या रागाने उगीच आपल्या मनात पुटपुटत होता.

"तुला म्हटलं होतं ना..!! माझ्याबद्दल तिला 'तसली कुठलीही' feeling येऊ देऊ नकोस.. तु हरलीस असं का वाटतय मला..!! मी माझ्या बप्पाकडेही हेच मागितलं होतं रे.. पण तुम्हा दोघांनाही नाही जमलं..! ह्म्म आता मलाच निस्तरायचय सगळं..!! अन हो मी निस्तरेन सगळं..!! मी समर्थ आहे..!! I don`t need any one..!! अगदी माझी एकुलती एक मैत्रीण सुध्दा नाही..!! अन हो मी तर माझी मैत्री पुर्णपणे निभवली आहे, जोवर तिला गरज होती तोवर तिच्या आयुष्यात होतो. अन आता नाही पडणार तिला माझी गरज..!! इतका attitude तर मी नक्कीच आणलाय तिच्यात..!! अन जरी पुढे भासलीच तिला माझी गरज तर मी कायम असेन तिच्या आयुष्यात तिचा कृष्णा म्हणुन..!! so सध्यातरी तुम्हा दोघांना काहीच त्रास नाही देत..!! बस तिला जे वाटत..!! फक्त तिला जे वाटतं ना तेच घडु दे..!!".

त्याचा तो इतका attitude यापुर्वीही तसा बराचवेळा त्याच्या आवडत्या दैवतांनी अनुभवला होता. पण आजच्या attitude मधे आर्जवच जास्त होतं. तो कशाच्या तरी भीक मागत होता तेही attitude ने..!!
थोडावेळ तिथच त्या मंदीराच्या आवारात दोघं शांत बसले होते बरुन..!! ती जरा विचारातच होती. कदाचित त्यानं विचारलेया प्रश्नाचं उत्तर ती शोधत असावी. तो मात्र आपले ते गहिर्‍या विचारात अखंड बुडालेले डोळे तिच्यापासुन लपवत उगीच आपला hopeless attitude त्या मंदीरातल्या publicला दाखवत होता. असच थोडावेळ बसुन दोघही पुन्हा तिच्या hostel कडे निघाले. नळ्स्टोपच्या चौकात आल्यावर त्याने पुन्हा तिला विचारलं.

"दगड काय झालं..!! सांगितलं नाहीस अजुन मला..!! थांबणारेस की नाही..?"

""....", तुला काय वाटतं..?"

"ऐ दगड मी तुला विचारलय ok..!! आणी एक सांगु मला तुला काय वाटतं ना तेच महत्वाचय..!! बाकीच्यांना मी गृहीतही धरत नाही. आजवर मी फक्त मला काय वाटलं तेच केलं. आज पहिल्यांदा मी कुणालातरी विचारतोय. नाहीतरी you know मला या जगाला काय वाटत त्याचा फरक पडत नाही. तुला काय वाट्त ते तु सांग..!! तुला मी त्या चौकटीच्या बाहेर कधीही खेचु शकतो अगदी सहज..!! It matter me more what you think..?"

""......", मला तेच वाटत जे माझ्या पप्पांना वाटतं..!!"

""........", I respect your pappa..!! अगदी मनापासुन..!! अन तु तेच कर जे तुझ्या पप्पांना वाटतं. कारण तुला ते महत्वाचय..!! अन मी तेच करणार जे तुला वाटतय..!! तुझा एकुलता एक true friend म्हणुन..!!"

त्याची ते अनोखी style कुणाच्या तरी काळजाला हात घालत हळुवार आत्म्याला स्पर्शिण्याच्या कसबाला आता ती बरीच habitual झाली होती. त्याचं ते बोलण तिला खुप सुखावत होतं. खरतर त्याचं हेच वागणं तिला त्या तुटलेल्या चौकटीत तग धरुन रहायला बळ देत होतं. पाच साडेपाच दरम्यान त्यानं तिला hostel जवळ drop केलं अन पुन्हा घरी परतला.आज पुन्हा त्यान तिच व्यक्त होणं आपल्या अस्तित्वातुन साकारलं होतं. ती मात्र त्याच्या त्या प्रश्नावर "थांबशील माझ्यासाठी.. कायमची..!!" तिच्या मनातुन येणार्‍या उत्तराला बधत नव्हती, अन म्हणुनच तिने आपल्या रुममेटला या गोचीविषयी सांगितलं असावं.
तिच्या रुममेटने मात्र त्याच्या असं विचारण्यात काहीच गैर नाही अस तिला समजावलं.
"उलट तुझा एखादा खुप छान मित्र तुझा life partner असेल हे भाग्यच समज. अन तो ही तुझ्या "....."सारखा असेल तर.. विचारायलाच नको. बिनधास्त रहा. तो खरच तुझी perfect match आहे. तुम्ही दोघही एकमेंकाना इतकं छान ओळखता..!! तुम्हा दोघांनाही एकेमेंकांच्या मित्र-मैत्रीणींविषयी छान माहिती आहे. I mean he is perfect match for you..!! not a bad choice at all. खुप सुखात राहशील त्याच्याबरोबर...!!"
त्या रुममेटच्या समजावण्याने ही तिला काय करावं अजुन सुचत नव्हतं. शेवटी तिनं त्या दोघांच्या common friend ला फोन लावत झालेल्या सगळ्या गोष्टी त्याला सांगितल्या. तसं त्याला हे काही नवीन नव्हतं. त्याच्या "त्या" संशयीत वागण्यामुळे त्याला तिचं काय करु हे विचारणं म्हणजे फार नवल करण्यासरखं नव्हतच मुळी. पण त्यानंही त्याला त्याच्याबद्दल positive response दिला. त्यानं त्याचे सारे positive negative points अगदी त्रयस्थ्पणे तिच्यासमोर मांडले. तिला ते सारे पटत होते. पण तरीही मन अजुन "तो" विचार करायला धजावत होतं. खरतर मनाने केव्हाच विचार पक्का केला होता पण डोकं त्या गोष्टीला कधीच मान्यता देणार नव्हतं. अन तिला नेमकं हेच जमत नव्हतं. आजवर डोक्याने विचार करणारीला हे तसं अवघडच होतं म्हणा. अन म्हणुन तर ती तिच्या आयुष्यातल्या महत्वाच्या निर्णयासाठी आपल्या मित्र-मैत्रीणींच्या सल्ल्यांच्या कुबड्या घेऊ पाहत होती. पण तरीही तिला सावरण काही जमत नव्हतं. आयुष्यातला एव्हढा मोठा निर्णय ती आपल्या एकमेव सख्याला न विचारता थोडीच घेणार होती. शेवटी तिनं या कोड्याचं उत्तर आपल्या त्या एकमेव सख्यालाच विचारायच ठरवलं होतं. पण आजची रात्र काही तिचा डोळ्याला डोळा लागत नव्हता. सतत पप्पांचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. अगदी लहानपणापासुन ते त्यांनी तिला इथं पुण्यातल्या college ला सोडेपर्यंत तिची दिलेली साथ. चालायला शिकवताना धरेलेलं तिच बोट, आईने मारल्यावर पुसलेले तिचे डोळे, लांब केस नको म्हणुन तिनं हट्ट केला तेव्हा तिला समजावताना त्यांनी केलेल आर्जव, त्यांच्याकडे बारिकसारिक गोष्टींसाठी केलेला हट्ट. सारे प्रसंग जणु तिच्या नजरेसमोर फेर धरत होते. अन प्रसंगाच्या फेर्‍यांच्या मधोमध अगदी निर्धास्त्पणे राक्षसी हास्य करत उभा असलेला तो. सारं कसं अंगावर शहारा आणणारंच होतं. त्याच विचारात ती कशीबशी झोपण्याचा प्रयत्न करत होती. इतक्यात त्याचा एक message तिच्या inbox मधे आला, खरतर तिनं mobile त्याला message करण्यासाठीच हातात घेतला होता.

"दगड..!! झोपली नसशीलच..? जास्त विचार नको करुस.... त्रास होतो तुझ्या ".....". उद्या जायचं दगडुशेठला..? लई ताप होतोयना माझ्यामुळे तुझ्या डोक्याला..?"

"नाही झोपले. "+++++++" बरोबर बोलत होते. जाऊयात बप्पाला. हो. लय ताप होतोय माझ्या डोक्याला."

"ऐ दगड शांत झोप. tension नको घेऊस. एक सांगु तु तोच decision घे ज्याने तुला कमी त्रास होईल..!! कुठे भेटतेस मग..? उद्या साडे बाराला..?"

"उद्या दीड ला माझे ड्रेस शिवुन मिळणारेत. बाराला दगडुशेठला जाऊन दीड्ला काय परत येऊ hostela ला."

"मग तु सांग कधी ते..? दगड.. किती ड्रेस टाकलेत रे शिवायला..? office च्या पहिल्य दिवशी एकच घालणार असशील ना..?"

"३ टाकलेत..!! उद्या सकाळी जायचं का मंदीरात?"

"सकाळी..? किती वाजता..? अन परत जाणार hostel ला...? मग घरी कधी जाणारेय..? दगड ह्म्म.. खरच रे तुझ्या डोक्याला लई ताप झालाय..!! सकाळी कधी..? दगड.. झोप झोप.. लई ताप झालाय रे तुझ्या डोक्याला.."

त्याचा हा message वाचायच्या आधीच ती आपल्या त्या अव्यक्त स्वप्नांना कवटाळत झोपी गेली.
तोही त्या रात्रीच्या काळोखाला दुर लोटण्याच्या नादात आता पुढे काय ह्या विचाराच्या काळोखात ढकलु पाहात होता. त्याची ती चलबिचल तिला कलत नव्हती अस्म काही नव्हतं पण त्यावेळेस मुद्दामच ती त्याच्या त्या विचित्र वागण्याकडे दुर्लक्ष करित होती. काहीतरी शोधण्याच्या नादात कधी कधी आपल्याला आपल्या आजुबाजुच्या जगाचाही विसर पदतो अगदी तसच काहीसं..!!कशीबशी रात्र पुढ सरकवत त्यानं आपली अर्धी झोप पुर्ण करायचा प्रयत्न चालुच ठेवला होता. शेवटी पहाटे कधीतरी त्याचा डोळा लागला. पहाटही सरली. अजुन तो झोपेतच होता गाढ नाही पण सत्यापसुन थोडसं दुर जाण्याचा त्याचा तो प्रयत्न त्याला रोजच आईच्या शिव्या खायला भाग पडत होता. पण त्याला त्याचा कहीच फरक पडत नव्हता. आजही रोजच्यासारखच घडणार होतं. पण नाही घडलं. आज त्याला जाग आली ती आईच्या ओरडण्यामुळे नाही तर उशाशी ठेवलेल्या त्या मोबाईलच्या message tone मुळे. अर्धवट झोपेतुन जागे झालेल्या त्याच्या त्या मिणमिणत्या डोळ्यांना तो बळेच ताणुन त्या निद्रादेवीला आपल्यापासुन दुर धाडत होता. पण तो message वाचल्यावर त्याला आपली ती अर्धवट झोप आवरण कठीण नाही गेलं. तिचाच mesaage होता. तो वाचुन आपोआपाच त्याचे डोळे झोपेतुन खाडकन जागे झाले. त्या अधुर्‍या झोपेमुळे आधीच त्याचं डोकं जड झालं होतं अन त्यातच तिचा तो message.

" ".....", का आलास माझ्या life मधे..? का..?"

त्या दोन ओळीतली ती आर्तता त्याच्या त्या हळव्या मनावर कितीतरी ओरखडे उठवुन गेली. पण त्यानं लगेच तिला उत्तर देणं टाळलं. सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेण्याची त्याची सवय आता घरच्यांना माहित होती. पन आज त्याच्या घरच्यांनाही थोडं विचित्र वाटलं असावं, सगळ्यांच्याच नजरेत तसं दिसत होतं. कशीतरी सगळ्यांशी होणारी ती नजरानजर चुकवत त्यानं आपली दैनंदिनी उरकली अन तिला reply केला.

"सकाळ सकाळ लई bouncy question विचारलाय..? लई ताप झाला ना काल.? फक्त तुला त्रास द्यायला आलाय तो..!! कधी जायच मंदीरात..?"

"what लई ताप झाला ना काल..? आत्ताही होतोय..!! अन असाच होत राहिला तर येडी होईन मी..!! मी आज नाही जाणारेय घरी..!! मंदीरत कधी जायच तु सांग, तु म्हणशील तेव्हा..!!"

तिची ती आगतिकता त्याला पहावली नाही अन त्या हळव्या मनाला तो जेव्हढ बेमालुमपणे कुठेतरी आत त्या रुक्षपणाच्या कातडीखाली लपवु पाहत होता त्याच intensity ने वर उसळु पाहत होतं. अन त्याचमुळे त्यानं तिला फोन केला.

"काय दगड..? सकाळी सकाळी लई bouncy question विचारालाय..!! अन तुला या प्रश्नाचं उत्तर मी या आधीही दिलय..!! तुझ्या अश्रुंमागची हजारो कारणे शोधायला पाठवलय मला तुझ्या कृष्णाने..!! अन तेच मी करतोय..!! का ..? आज असं का विचारावसं वाटलं रे तुला..!!"

"काही नाही रे "......", एक problem झालाय अरे..!!"

"problem..? तुला..? काय झालं..? कुणी काय बोललं का..? का कुणी त्रास देतय तिथं..? बस फक्त सांग माझं नाव अपोआप त्रास देणारे जागेवर येतील. तेव्हढा वट अजुनही आहे माझा..!!"

"तसला काही problem नाही रे..!! अन झालाच तर आम्हाला नाही पडत कुणाची गरज..!! तो problem handle करायला मी समर्थ आहे..! हा problem जरा वेगळाच आहे..!!"

"अरे बास ना आता.. बोल पटकन काय problem आहे..?"

""......", अरे माझा एक best friend आहे..!! मला असं वाटत की तो माझा more than best friend झालाय..!!"

"अरे वा..!! चांगलय की मग..!! more than best friend..!! बरं आहे कोण तो दीड शहाणा..? नाव सांग मला..!!"

"तुला त्याच्याशी काय देणं घेणं आहे..!! मला सांग मी काय करु..? "

"अरे काय करु काय..? तुला वाटत ना तसं..!! मग..?"

"".....", मला तुझ्याकडुन उत्तर हवय..!! मला ते महत्वाचं वाटतं..!! कारण तु मला कधीच चुकीचा सल्ला नाही देणार that much I can trust you..!!"

"ठीकाय..!! उत्तर कुणाकडुन हवय..!! तु ज्याच्याशी बोलतेय त्याच्याकडुन..!! की तुझ्या true friend कडुन..?"

"तु माझा true friend आहेस..!! मला माझ्या true friend कडुन उत्तर हवय..!!"

"उत्तर हवय..!! तर मग ऐक..!! हे उत्तर तुच कधीतरी कुणाला दिलं होतं. तेच उत्तर मी तुला देतोय..!! आठावतय तु मला सांगत होतीस की तुझ्या मैत्रीणी तुला विचारलं होतं "दीदी, जर मला एक एखादा मुलगा खुप आवडतो, कदाचित मीही त्याला आवडत असेन..!! पण मला माहितीऐ की आमच्या दोघात तसं काही होणं शक्यच नाही...!! अश्यावेळी काय करायचं..!! त्या मुलाला मी माझ्या मनातलं सांगवं की नाही", तेव्हा तु तिला सांगितलं होतं."no ways..!! असं जर असेल तर जीव गेला तरी आपल्या मनातली गोष्ट बोलुन दाखवायची नाही. कळलं..!! कहीही झालं तरी जी गोष्ट होणारच नाही तिच्याबद्दल का करायचा..!!" माझंही तेच उत्तर आहे..!! नको येउस त्या चौकटीच्या बाहेर..!! आपल्या पप्पांना काय वाटतं ते महत्वाचंय..!! नको येऊस त्या चौकटीच्या बाहेर..!! I rspect your pappa..!!"

""....",I PROUD OF YOU...!! तो best friend तु आहेस..!! हो तु आहेस..!! "

"ह्म्म..!! दगड..!! काही खरं नाही..!! आयला..!! अन काय I PROUD OF YOU..? "

"काही नाही रे काल तु म्हणालास ना "तुझ्या पप्पांना काय वाटतं ते महत्वाचय..!! I RESPECT YOUR PAPPA..!!" म्हणुन म्हटलं मी..!! अन खरच मनापासुन I PROUD OF YOU "......"..!!"

"पुरे आता..!! किती कौतुक..!! सवय नाही रे इतक्या कौतुकाची..!! चल लवकर तयार हो साडे अकरा वाजता पोचु मंदीरात..!! चल आवर पटकन..!! भेटुयात थोड्याचवेळात..!! अन हो येताना तुझ offer letter ही घेऊन ये..!!"

तिनं मान डोलावत होकार देत फोन ठेवला अन पटकन आवारायला घेतलं. तिला उत्सुकता होती त्याला भेटुन कहीतरी विचारण्याची.
दोघही साडेअकराच्या सुमारास त्या मंदीराच्या दिशेने निघाले. त्याची INTENSE DESIRE त्यानं अप्पा बळवंत चौकाच्या थोडी अलिकडे park केली. अन दोघही मंदीराच्या दिशेने चालतच जाऊ लागले.
मंदीराच्या आवारात जाताच त्याने अभिषेकाच ताट विकत घेतलं. तेव्हा तिनं त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने भुवई उंचावुन त्याला विचारलच.

"अरे काही नाही..!!! मी म्हटलं होतं त्याला, की पोरीला job मिळाला ना की तिला घेऊनच येईन तुझ्या दारी..!!"

इतक्यात तिलाही काहीतरी आठवलं अन ती त्याला एकच मिनिट म्हणत जवळच्याच ठेल्यावरचे खव्याचे मोदक घेऊ लागली. त्यानं त्यावर काहीच reaction दिली नाही. पन तिनं स्वताहुनच त्याला सांगितलं.

"अरे मी त्याला म्हटलं होतं खव्याचे मोदक घेऊन येईन म्हणुन..!!"

त्याला मात्र तिची ती कृती म्हणजे त्याची तिनं केलेली copy वाटली. दोघही आत मंदीरात गेले.
दोघांनीही अगदी विनम्रपणे त्या श्रींच्या त्या मंगलमुर्तीपुढे आपले शीष झुकवले होते. दोघही काहीतरी खुपच मनापासुन मागण्यात मग्न होते. पन दोघही खुपच वेगळ मागत होते. श्रींच दर्शन घेतल्यानंतर दोघही थोडावेळ सभामंडपात बसले, तेव्हा तो तिथं काहीतरी पुटपुटला.

"साल्याला म्हटलं होतं..!! तुझ्या मनात तस्सं काही नको येऊन देऊस..!! पण..? च्यायला तु मागे विचारलं होतस ना की बाप्पाकडे काय मागितलसं..? तेव्हा मी तुला म्हटलं होतं की वेळ आल्यावर सांगेन..!! ऐक आज सांगतोय.. मी मागितलं होतं की "......." माझी एकुलती एक मैत्रीण आहे... plz तिच्या मनात माझ्याबद्दल तस्सं काही येऊ देऊ नकोस..!! पण जाऊ दे..!! त्याच्या मनात काहीतरी वेगळच असेल..!! मी तरी काय करणार मी त्याला challenge केलं होतं..!! नाही जमलं त्याला..!! "

""....", जाऊ दे ना का वैताग करुन घेतोस..!! बप्पा लोकांची strategy च वेगळे असते..!! खुप वेगळी..!!"

"दगड ....!! काय strategy..!! जाउ दे आता निस्तरायच तर मलाच आहे ना..? अन मी ते निस्तरेन..!! चल आत खुपवेळ बसलोय इथं..!! जाऊन काहीतरी खाऊयात..!!"

दोघांनीही दगडुशेठ मंदीरातुन आपला मोर्चा स्वारगेटच्या दिशेने वळवत सरळ "साहिल वर" धडक मारली. गर्दीची वेळ असल्याने थोडावेळ waiting मधे थांबावं लागलं. पण थोड्यावेळाने त्यांना एक कोपर्‍यातली जागा मिळाली. बोलण्यासारखा निंवातपणा मिळण्याइतपत काही तो कोपरा safe नव्हता. पण तरीही दोघांची ती sharing थोडीच थांबणार होती. त्यांच्या गप्पा अश्याच रंगल्या होत्या. त्यानं तिच offer letter बराच वेळ निरखुन पाहिलं. काहीतरी मिळवल्यानंतर त्याच्या चेहर्‍यावर जी समाधानाची जी एक लकेर उठायची अगदी तशीच लकेर ऊठल्यासारखी तिला जाणवली. खरंतरं त्या offer letter साठी त्यानं खुप काही गमावलं होतं. अन अजुन खुप काही गमायचं बाकी होतं. पन एव्हढं सगळं होऊन त्याच्या चेहर्‍यावरची ती समाधानाची लकेर बिलकुलही झाकोलली गेली नव्हती. उलट ती कोणत्या तरी तेजाने उजळुन निघत होती.त्याची ती तेजाळणारी नजर आज तिला खुपच मोहवुन टाकत होती. बराच वेळ दोघांची हितगुज चालली होती. एव्हढा निवांतपणा पुन्हा दोघांना मिळणार होता की नव्हता हे फक्त त्या देवालाच ठाऊक होतं. पण तरीही आहे त्या क्षणाचा निर्भेळ आनंद जगण्याची ती वृत्ती काही हार मानायला तयार नव्हती. इतकावेळ एकमेंकासोबत असुनदेखील अजुन मुद्द्याची गोष्ट बोलायचीच राहिली होती. lunch आटोपुन झाला ice-creame ही झाली आजही गडबड मस्तानी मिळालीच नाही. bill द्यायची वेळ आली तेव्हा तिने पटकन ते आपल्या हातात घेत त्याला खडसावलं.

"Bill मी भरणार..!! आठवतयं माग तुच म्हणाला होतास ना हे माझं शेवटचं bill आहे, इथुन पुढची आपली बिलं तु भरायचीस जोवर तुला job मिळत नाही तोवर.. so its my turn now..!!"

तिच ते बोलणं इतकावेळ कुठल्याश्या तेजाने झळकणारा त्याचा तो काळासावळा चेहरा पाडुन गेलं. काहीतरी बोच त्याला आतल्या आत खात होती. इतकावेळ तिच्याशी सगळं अगदी मनमोकळेपणा कुठलेही आढेवेढे घेणारा तो स्वताच्या मनाशीच बडबडु लागला.

"तुला job लागेपर्यंत..!! ह्म्म..!! thank god..!! हिला अजुन ल़क्षात आहे तर..!! म्हणे तुला job लागेपर्यंत..!! तस्सं असतं तर मला केव्हाच job मिळाला असता..!! पण जाऊ दे..!! तुला स्वतावर विश्वास आहे ना मग जाऊ दे..!! उद्यापासुन तुला job शोधायला सुरवात करायची आहे..पण त्या आधी "त्याने" घडवुन आलेला घोटाळा निस्तरायचाय..!! तिला आपल्या आयुष्यातुन कायमचं बाहेर काढायचय..!! पण तिला आपल्या आयुष्यातुन बाहेर काढताना मी तिच्या पहिल्या दोन मित्रांसारखाच निघालो असं तिला कधीच वाटलं नाही पाहिजे. तुच म्हणतोस ना आजवर तुला कोणीच नाही हरवलं. बघ हा डाव..!! इथं तुच जिंकणारेस..!! पण कुणालातरी मनापासुन तु हरावसं..!! तिच्या पप्पांना तु हरवावसं..!! पण त्यांना हरविण्यापेक्षा तु त्यांना जिंकावस रे जिंकावस..!! त्यांना हरवणारा या जगात तु एकमेव आहेस.!! अन हा तुझा अहंपणा नाही तर तुझ्या एकुलत्या एक मैत्रीणीने दिलेले certificate आहे. पण तु फक्त true friend म्हणुन वागायच ठरवलं तर..!! ती तुला तिचा कृष्णा मानते..!! तिला तिच्या true friend अन तिचा कृष्णा या दोघांमधे फरक करताच येत नहीए. दोन्ही रुपं तिला तिच्या college मधल्या एका hopeless कार्ट्यात दिसतायत. अन त्या दोघांमधे फरक नक्कीच आहे. आज तुला हेच करायच..!! तिला या दोघांमधले फरक highlights करायचेत. अन तुला हे जमेल..!! तुला काहीही जमु शकतं..!! कारण you don`t need anyone..!! तु समर्थ आहेस..!! जे होईल ते निस्तरायला..!! आजचा दिवस ठरवेल तु तिच्या आयुष्यात काय म्हणुन रहायचं अन काय होऊन जायचं ते.."

त्याच्या मनातला हा स्वताशी चाललेला संवाद तिला मात्र ऐकुच आला नाही. कारण अगदी त्याचवेळी तिचाही आपल्या मनाशीच संवाद चाललेला होता अन डोळ्यासमोर येत होता तो तिच्या पप्पांचा चेहरा.

"पप्पा..!! मी काय करु..? मी नेहमीच तुमची मान ताठ ठेवेन..!! पण माझ्या कुठल्याही decision ने मी माझ्या true friend ला hurt नाही करणार..!! आजवर मला फक्त आपल्या माणसांबद्दलच काळजी वाटायची तुम्ही, आई, "....." ,"....." एव्हढीची ती काय माझी माणसं होती. आजवर माझ्या आयुष्यात इतके मित्र्-मैत्रीणी आलेत अन गेलेत..!! कुणाबद्दल तसं काही मला वाटलही असेल.. पण ते वाटणं तेव्हढं intense नव्हतं जेव्हढं आज मला माझ्या "......" बद्दल वाटतं. पण आता तोही माझा झालाय. त्या कृष्णाला आजवर मी फक्त माझ्या विचारात अनुभवलं होतं.पण मला वाटलं नव्हतं माझं ते "कृष्णाचं" स्वप्न पुर्ण करायला तो सा़क्षात माझ्या "....."च्या, माझ्या true friend च्या रुपात येईन..!! हो अन तो आलाय पप्पा..!! तो मला खुप सुखात ठेवील..!! he really respect you..!! अन तुमची मुलगी कधीही चुकणार नाही पप्पा..!! अगदी तुमच्या सारखाच आहे माझा "...."..!! तो कधीपासुन म्हणतोय मला तुझ्या पप्पांना एकदातरी भेटायचय..!! पण मी त्याला अजुन काहीच उत्तर दिलं नाही..!! काय म्हणुन उत्तर देऊ पप्पा..? तुम्हाला हरवणाराही या जगात कुणीतरी आहे हे मलाच पुर्वी मान्य होतं नव्हतं..!! पण आता मला मान्य आहे..!! अन तुम्हालाही ते मान्य होईल..!!! पप्पा तुम्ही एकदा "....."ला भेटाच..!! माझी खुप इच्छा आहे त्याला तुम्हाला भेटवायची..!! पण अजुन त्याच्याबद्दल मला एक गोष्ट confirm व्हायचीय..!! ती झाली की मी नक्की घेऊन येईन त्याला तुम्हाला भेटवायला..!!".
दोघांचा संवाद असाच काहीकाळ चालु राहिला असता पण बाहेर बरच waiting असल्याने वेटरने तत्परतेने राहिलेली बिलाची amount आणुन देत indirectly त्या दोघांना table सोडण्यास सांगितलं. तसं दोघांना एकमेंकाशी खुप बोलायचं होत्म, काहीतरी विचरायचं होतं, त्यामुळेच दोघांचाही पाय तिथुन निघत नव्हता. दुपारचे तीन्-पावने तीन झाले होते. "साहील"ची भट्टी विझायला अजुन अर्धा तास बाकी होती, पण तरीही तिथली वर्दळ काही कमी होत नव्हती.दोघही वरच्या floor वरुन खाली आले. पण त्यानं आज तिच्याशी सगळं स्पष्ट बोलायच ठरवलं होतं. पण आज जरा वेगळ्या style ने..!! कदाचित त्याची style च त्याची third side of coin होती. आजवर तो तिला जे जे वाटायच ते ते करुन दाखवायचा. पण आज तो ते बोलुन दाखवणार होता. आज दोघात संवाद होणार होता पण दोन्ही बाजुने तोच बोलणार होता. तिला जे वाटतं तेही अन त्याला जे वाटतं तेही..!! जिने खाली उतरतानाच त्याच्या डोक्याला पुढच सगळं चित्र स्पष्ट दिसत होतं. खरंतर आता दोघांनीही आपाअपल्या घरी (तिच्यासाठी hostel) वर जाणच रास्त होतं. पण त्यान तिला बाहेर पडताच थोडावेळ अजुन थांबण्यास विनवलं. तसं दोघही मग साहिलच्या बाहेरच्या व्हरांड्यात ओळीने मांडलेल्या खुर्च्यांकडे वळाले. थोडावेळ निवांत बसल्यावर त्यानच त्या नीरव शांततेला फाटा फोडाला कदाचित आजच्या दिवसाचा शेवट त्याला तिच्याकडुन अपेक्षीत असावा म्हणुन त्यानं स्वताच बोलण्यात पुढाकार घेतला असावा.

"दगड, काल खुप ताप झाला ना रे..? पण नाही यार..!! आता बस..!! काय ठरवलसं मग..? थांबणार की नाही माझ्या आयुष्यात कायमची..!! खुप सुखात राहशील तु माझ्याबरोबर.."

"I know "....", तुझ्याबरोबर मी खुप सुखात राहिन..!! तु मला खुप सुखी ठेवशील..!! पण..?"

"तुला विश्वास आहे ना माझ्यावर..!! बस्स मग..!!"

"तस्स नाही रे ".....", माझ्या पप्पांचा खुप विश्वास आहे माझ्यावर..!! अन त्यांना जर हे कळलं तर..? माझ्या घरच्यांना कळलं ना तर जीवच घेतील ते माझा..!! अन माझे अजोबा.. त्यांना कळलं तर..? ते मला नेहमी म्हणतात "....", बेटा तुला जितका वेळ हवा तेव्हढा घे.. पण मुलगा आमच्या पसंतीचाच हवा.."

"मुलगा well settled हवा...!! चांगला घरदांज हवा..!! तुला शोभेल असाच हवा..!! तुझ्याबरोबर तुझ्या घरच्यांचाही स्विकार करणारा हवा..!! अन सगळ्यात महत्वाचं तो ९६ कुळी हवा..!! किती अपेक्षा एका माणसाकडुन..?"

"९६ कुळी..!! खुप मोठी गोष्ट आहे रे"....", माझा होणारा नवरा ९६ कुळीच असला पाहिजे..!! "

"ह्म्म..!! ९६ कुळी..!! दगड..!!" आता त्याला रहावलं नाही हळुहळु गोष्ट मुद्द्याकडे सरकत होती. त्याने हळुच आपल्या वरच्या खिशातला ray-ban चा gogle काढला अन डोळ्यावर चढवला अन तिच्या शुन्यात गेलेल्या नजरेकडे त्या ray-ban च्या काचे आडुन निरखुन पाहु लागला. किती स्वप्न दिसत होती तिच्या नजरेत तिला अन त्याहुन जास्त तिच्या चेहर्‍यावरचा आत्मविश्वास ती पाहिलेली स्वप्न पुर्न होण्याचा आत्मविश्वास..!! पण त्यानं डोळ्यावर तो ray-ban चढविण्याचं कारण काही आगळच होतं. त्याला तिची विखुरलेली स्वप्नचं त्याच्या डोळ्यात दिसत होती. तिचा तो तुटलेला आत्मविश्वासच अश्रुरुपी त्याच्या डोळ्यांवर दाटुन आला होता. अन हेच सार्म तो त्या ray-ban च्या अंधुक काचेमागे दडवत होता. तिच्यापासुन आपली ती बोलकी नजर चोरु पाहत होता. तिला या कशाचीच जाणीव होत्म नव्हती. तिच्या मनात फक्त एकच विचार होता "ह्याला पप्पांशी कसं introduce करुन द्यायचं..?"तिची विचाराची तंद्री त्यानं हळुच भेदत पुन्हा त्या नीरव शांततेला छेद दिला.

"मुलगा well settled हवा..!! म्हणजे मुलीपेक्षा त्याला जास्त पगार हवा..!! ह्म्म अपेक्षा चुकीची नाही..!! मुलाने नेहमीच जास्त कमवावं.!! ह्म्म..!! पण माझ्याकडे आज job नाही..!! पण मला नक्कीच लवकर job मिळेल. मी तुला शब्द दिला होता ना तुला job लागल्या नंतर दहा दिवसाच्या आत मला job असेन माझ्याकडे म्हणुन..!! तु join व्हायच्या आधी माझ्याकडे job असेन..!! २.७ p.a. च package नसेन पण काहीतरी हातात तर नक्की असेन..!!"

"मिळेल रे "....", तुला छान job..!! त्याच्म का tension घेतोयस तु..? अन तुला एक वर्षाचा experience आहे.. so don`t worry मिळेल तुला छान job..!!"

"ते तु मला सांगायची गरज नाही..!! मला job मिळणारच आहे..!! अन दगड तु तुझ्या घरच्यांच मत सांगुन मोकळी झालीस...!! अन मी काय तुला अनाथ वाटलो की काय..? माझ्या घरच्यांच्याही माझ्याकडुन काही अपेक्षा असतील असं नाही वाटत का तुला..? माझ्या पुढेही एक आहे अन माझ्या मागेही एक आहे कुणीतरी बघायला माझ्या family कडे..!! पण माझ्या घरच्यांचा खास करुन माझ्या पप्पांचा खुप विश्वास आहे माझ्यावर दगड..!! आजवर मी हट्ट केलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी मला आणुन दिली. स्वतासाठी आजवर काहीच नाही केलं. पण मला जेव्हा जेव्हा काही हवं होतं तेव्हा तेव्हा ते त्यांनी दिलं. मी doctor व्हावं अशी त्यांची इच्छा होती.पण मी नाही झालो doctor मला mechanical engineer च व्हायचं होतं. तरी ते एका शब्दाने मला नाही बोलले. माझी intense desire घ्यायच्यावेळेस त्यांनी मला एव्हढी मोठी bike घेण्यापेक्षा कारच घेऊ म्हणुन समजावलं होतं, पण मी नाही ऐकलं अन एक लाखाचीच bike घेतली फक्त मला माझं स्वप्न पुर्ण करायचं होतं म्हणुन..!! पण त्यांनीही माझ्याबद्दल काही स्वप्न पाहिली असतील ना रे..!! आजवर त्यांच कुठलं स्वप्न मी पुर्ण केलय..!! अन तु जर माझ्यासाठी थांबलीस तर मला कायमचं माझ्या घरापसुन दुर व्हावं लागेल. तुला काय वाटत तुला जे खुपं अवघड आहे ते माझ्यासाठी खुप सोप्पंय..!! हो आहे सोप्प..!! कारण माझ्यात तो attitude आहे अवघड गोष्टी सोप्या करण्याचा..!! तुला तुझी family च सबकुछ आहे..!! मग माझ्यासाठी माझी family काहीच नाही का..?

"...." शांत हो..!! सगळीच स्वप्न नाही होत पुर्ण..!! काही स्वप्न फक्त पहायची असतात..!! अनुभवायची असतात...!! जरी ती पुर्ण होणार असली ना तरी ती पुर्ण नसतात करायची फक्त आपल्या माणसाला आपल्यापासुन तोडायचं नाही म्हणुन..!! नाही "....." तु आजवर बघितलेलं प्रत्येक स्वप्न पुर्ण केलय..!! तुझं असो की तुझ्या एकुलत्या एक मैत्रीणीचं..!! तु ते पुर्ण करु शकतो. अन फक्त तुच ते पुर्ण करु शकतो. तेव्हढा attitude फक्त तुझ्यात आहे. नाही "...." आहे तुझ्यात तो attitude पण म्हणुन काय तु तिच्या पप्पांना हरवणार..!! कोण समजतोस तु स्वताला..!! तिनं तुला तुझा कृष्णा मानलं अन तुही लगेच झालास..!! तुझं स्वताचं काही अस्तित्व आहे की नाही. का तिला जसं हवं तसं वागतोयस.!! काय मिळणारेय तुला..!! कोण आहेस तिच्यासाठी तु..!! college च एक वाया गेलेलं कार्टं..!! ज्याच्याकडे आज स्वताला job नाही तो तिचं आयुष्य काय सावरणार..!! कुठल्या गोष्टीचा तुला एव्हढा घमेंड आहे..!! तुझ्या त्या आजवर न हरलेल्या attitude चा..!! अरे कसला attitude "...." तु कहीही करु शकतोस जिची ती अभेद्य चौकट ज्यांन एका क्षणात चिरडवुन कुठतरी भिरकावुन फेकाणार्‍या तुला तिच्या पप्पांना जिंकण अवघड नाही..!! तु त्यांना सहज जिंकु शकतोस..!! नाही "...." तु असं काहीच नाही करनार..!! तुझ्या एकुलत्या एक मैत्रीणीचा खुप विश्वास आहे रे तुझ्यावर..!! तु असं काहीही नाही करायचं..!! "

त्याच स्वताशीच बडबदणं चालु होतं. सगळं बोलण तिच्या कानी पडत होतं. तिला काहीच बोलायची गरज नव्हती. तिला जे काही वाटत होत तेच तो आपल्या त्या संदिग्ध वागण्यातुन व्यक्त होत होता.
इतकं त्याचं चाललेल बडबडणं तिनं दुर्लक्षिलंच होतं. पण त्याच्य ओठी तिच्या पप्पांच नाव येताच ती त्या स्वप्नातलं वातावरणातुन खडबडुन जागी झाली अन त्याला त्याच्या त्या दुभंगलेल्या वागण्याबद्दल विचारत होती.

""....." अरे काय येडा झालायस का तु..? काय बडबडतोयस नालायका..!! " तिचा आपलं उगीच वातावरण निवळण्याचा प्रयत्न..!!

"अरे दगड काही नाही रे..!! मला ते गलगले निघाले..!! आठवलं..!! म्हटलं आपण ही try करावं जमतय का आपल्याला ते म्हणुन..!! दगड तुला म्हटलं होतं ना तुझा true friend पन त्या 3 IDIOTS मधल्या त्या बहती हवासा था वाल्या गाण्यातल्या IDIOT सारखाच आहे म्हणुन..!! आज माझी जायची वेळ आली आहे मैत्रीणी..!! अन मला कायमच जावं लागतय..!!"

"नाही ".....", असं का म्हणतोस..? अरे त्यात तो करिनाचा dialague सही आहे ना..? जेव्हा तिला ते दोघ गाडीतुन तिला नेत असतात अन ती त्यांना विचारते की अगर रँछो की शादी हुई होगी तो..? तेव्हा ते दोघं तिला म्हणतात कोई बात नही हम तुम्हे वापस छोड देंगे..!!"

"हा..!! हा..!! पण एक सांगु ह्या IDIOT ला परत आणायला त्याचा काय पण तुझाही कुठला मित्र येणार नाही..!! ती movie होती अन ही आपली life आहे..!! खुप जगलो आजवर मी स्वतासाठी आता दुसर्‍यांसाठी जगेन म्हणतोय..!! sorry मला माफ कर..!! माझी लायकी नव्हती तुझा true friend व्हायची..!! पण तुच मला तुझा कृष्णा बनवलस..!! मला नाही म्हणताच आलं नाही तुला..!! तु माझी खुप छान मैत्रीण आहे..!! तुला तुझा आदित्य नक्की मिळेल..!! माझा विश्वास आहे..!! मी ठेवलेले मार्गषीर्शातले गुरुवारचे निरंकार उपवास वाया नाही जाणार..!! मी ते कायम करणार आहे..!! माझी एकुलती एक मैत्रीण कायम सुखात रहावी म्हणुन..!!".

बोलता बोलता अचानक त्याचा हात वर उचलला गेला अन तिच्या डोक्यावर स्थिरावला. थोडावेळ तिच्या केसावरुन तिनं प्रेमळपणे हात फिरवलं. तिनं आपले ते मोठे डोळे हलकेच मिटले अन आपली मान त्याच्यापुढे नम्रतेने झुकवली. कदाचित एव्हढी नम्रता आजवर फक्त दोनच पुरुषांकरिता तिनं दाखिविली असावी. पहिला तिचे पपा अन दुसरा तिचा कृष्णा..!! आज ती तिच्या कृष्णासमोरच आपलं शीर नम्रतेने झुकवत होती. अन तोही मोठ्या विनयाने तिचं ते समर्पण स्विकारत होता. तिच समर्पण..!! आता काय करायचं होतं ते त्यालाच करायच होतं. त्याचा एक निर्णय दोघांचही आयुष्य खुप बदलवुन टाकणार होता. पण तो घेताना कदाचित हा कृष्णा तिच्यापासुन कायमचा दुरावणार होता. बोटात intense desire ची चावी तशीच होती ती तिच्या केसात रुतली. इतकावेळ झाकोळलेले डोळे त्या वेदनेने उघडले अन हलकेच एक अश्रु त्याच्या तळहातावर सोडुन ती आजवर स्थिरावलेली नजर सैरभैर होऊ लागली. त्या ray.ban च्या आड इतकावेळ लपवलेले त्याचे ओले डोळे त्याने शेवटी तिच्या नजरानजरीसाठी पुन्हा त्या चौकटीतुन बाहेर डोकावले. दोघांच्याही डोळ्यात अश्रु..!! पण हे विरहाचा..!! आजवर एकमेंकाना दोघांनीही कधी जाणुन बुजुन तर कधी अनावधने रडवलं होतं. पण आजच्या अश्रुचं कारण काही वेगळच होतं. तिच्या आयुष्यभराचा साथीदार होण्यासाठी तो कुठेतरी कमी पडत होता. तो कमीपणाच त्याला खात होता. पण तिच्यापासुन दुर जाताना तिला हे कारण पटेल..? याचमुळे तो शाशंक होता. त्याची आजही तिला ते सांगायची हिम्मत होत नव्हती. तिच्यापासुन दुर जाण्याच कारण तीही त्याला विचारु शकत नव्हती. पण त्यानं निर्णय आता जवळपास पक्का केला होता. सुमारे दोन अडीच तास ते साहिलच्या बाहेरच्या व्हरांड्यात बसले होते. बाहेर आभाळ दाटुन आलं होतं. जोरदार पाऊस येणार असच वातावरण तयार झालं होतं. तिला आज मनापसुन पाउस पडावं असं वाटत होतं. पण आज एव्हढं वातावरण ढगाळ होउनही पाऊस येणार नव्हता, कारण आज ती तिच्या कृष्णापासुन खुप दुर जाणार होती. कायमची कधीही न परतण्यासठी..!! पण तो कृष्णा मात्र कायमच तिच्या आयुष्यात राहणार होता. जोवर तिला त्याच्या साथीची गरज होती अगदी तोवर..!! दोघही अंधारुन आल्यावर तिथुन निघाले. INTENSE DESIRE वर मागे बसल्यावर त्यानं तिला एक विनंती केली ,

"दगड, आठवतय मागे एकदा तु माझ्या खांद्यावर हात ठेवला होतास खुप छान वाटलं होतं रे तेव्हा मला..!! आज एक request..! तुझं hostel येईपर्यंत माझ्या खांद्यावरुन हात काढु नकोस..!! दगड माझ्या खांद्यावर हात ठेव..!! I NEED YOU..दगड..!! I AM SORRY..!!"

"".....", true friend म्हणतोस ना स्वताला..!! अन तुच म्हणतोस ना दोस्ती मधे no sorry, no thanks..!! मग..!! " एव्हढं म्हणत तिनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या अंगावर एकच काटा शहारुन आला, तिला तिला जाणवलाही असेल म्हणुनच तिनं तो हात आणखीणच घट्ट त्याच्या खांद्यावर ठेवला. आज खुपच शांतता भासत होती त्याच्या मुखमंडलावर..!! तो पडलेला चेहरा तो तिच्यापासुन लपवत होता. अन तिला दरडावुन सांगतही होता.

"दगड मी घाबरलो असं नाही वाटत ना तुला..? मी पळकुटा नाहीये रे..!! मी काहीही करु शकतो..!! अगदी काहीही..!! एक गोष्ट मी नाही बदलु शकत..!! त्या साल्यान मला सगळ दिलं..!! पण एका गोष्टीत कमीपणा दिला अन म्हणाला आता लढ..!! आता दाखव तुझा attitude..!! अन दगड एव्हढं करुनही तो हरलाच की रे..!! माझा बप्पाच माझ्याकडुन हरला..!! मला माहितेय मी जिंकलोय..!! पण मला इथं हरायच होतं रे दगड..!! पण जाऊ दे ना यार..!! you know my potential..!! ती गोष्ट बदलता येत नाही म्हणुन काय झालं. मी मैदानात उतरनारच नाही त्याला हरवायला..!! कारण मला माहितिये जेव्हा मी ठरवतो की मला मैदानात उतरायचं तिथच मी जिंकलेलो असतो. अन म्हणुनच मी मैदानात उतरत नाहीऐ दगड..!! ".

ती मात्र माग बसुन सगळ शांत ऐकत होती. थोड्याचवेळात तिच hostel आलं. दोघांनाही एकमेंकाना सोडुन न जाण्याचा मोह आवरत नव्हता, पन नाईलाज होता. ती गाडीवरुन उतरताच त्यानं "goodbye" म्हणत गाडी 180 च्या कोणात वलत मागे न पाहत सरळ ९० चा speed गाठला. ती मात्र त्याच्या धुसर होत जाणार्‍या आकृतीकडे पाहत त्याच्या त्या एका शब्दाचा अर्थ लावत hostel कडे वळु लागली.

"goodbye..!! आजवर कधीच नाही म्हटलं "...." ने मला godbye..!! मग आज असं का म्हणतोय..!! कुठली गोष्ट कमी आहे त्याच्याकडे..!! तो दिसायला सुंदर नाही..!! माझ्या स्व्प्नातल्या राजकुमारासारखा नाही म्हणुन तो असं वागतोय की अजुनकाही..?" तिचं विचारचक्र चालुच होतं.अन तो मोक्षाच्या कुठल्यातरी अनभिड्।न दिशेने वाटचाल करत होता. तिच्या त्या अभेद्य चौकटीला अगदी सहज भेदताना त्याला त्या चक्रव्युहातुन बाहेर कसं पडायचं हे ठाऊक होतं कारण तो अभिमन्यु नव्हता. तो तिचा कॄष्णा होता. अन अगदी तिच्या मनातल्या कृष्णासारखाच वागत होता. अस हे सगळं करताना त्याला होणारा त्रास तो कुणालाच सांगु शकत नव्हता. ती मात्र अजुनही त्यानं विचारलेल्या प्रश्नाच उत्तर आपल्या खास मित्र मैत्रीणींना विचारुन तिची पारख योग्य आहे का नाही हे तपासुन पहात होती. पहिल्यांदाच ती कोणतातरी निर्णय आपल्या मनाला विचारुन घेणार होती त्यामुळेच ती इतकी शाशंक होती.
थोड्यावेळातच त्याचा एक sms तिला आला.

"I AM SORRY "..........", माझा पुन्हा गैरसमज झाला रे..!! I FEEL VERY GUILTY.. SORRY.."

त्याच्या या sms वर तिनं त्याला आधीच एका e-mail द्वारे उत्तर पाठवलं होतं.

"".....", तुला mail पाठवलाय..!! वाच आणि मग बोलु..!!"

त्याला तो sms लगेचच वाचावासा वाटला. पटकन आपल्या mobile मधुन त्याने त्याचा mail id open केला अन तिचा तो mail वाचला.

"".....", तु माझा true friend होतास.... आहेस....... आणी कायम राहशिल....It's my TRUST!!!!!!!!!
माझा माझ्या true friend वर खुप खुप विश्वास आहे रे....... म्हणुनच आज मी माझ्या true friend ला विचारलं.... काय करु...??????????? कारण तु मझा TRUE FRIEND मला कधीच चुकीचा सल्ला देणार नाही याची खात्री आहे...
I TRUST YOU MY TRUE FRIEND!!!!!!!!!!!!!!!
"...." तुला guilty वाटायचं काय कारण??????
मी आहे "....." DON"T WORRY. DON'T TAKE TENSION.
So MY DEAR.... DONT FEAR......... ".........." IS STILL HERE.............
WD U........ 4U....... ALWZ MY TRUE FRIEND........ME AHE................"

तो email त्याने घरी जायच्या आधीच रस्त्यातच गाडी बाजुला घेऊन वाचला. वाचल्या बरोबर लगेचच त्यने तिला फोन करत तिची पुन्हा माफी मागत फोन ठेवला अगदी लगेच कशाची तरी घाई होती त्याला. कदाचित तिच्यापासुन दुर जाताना त्याला खुप buisy व्हायचं होतं म्हणुन असेल कदाचित..!! पण त्याने आजपासुनच त्याची स्वतासाठी job शोधण्याची मोहीम सुरु केली होती. अन त्याच गडबडीमुळे त्यानं तो फोन लगेच cut केला होता.जमेल तितक्या मित्रांकडुन त्यानं फार आधीच त्याच्या job साठी त्याने बरेच contacts मिळवले होते. दहा दिवसाच्या आत त्याला सगळ पालटावयाचं होतं. तिला कायमच अलविदा करायचं होतं. आजची संध्याकाळ त्याला कातरवेळीसारखी भासत होती. आज बुरुज ढासळण्याचीच लक्षणे जास्त दिसत होती. पण तो अजुनही तटस्थ होता. अन कायम तटस्थ राहणार होता. त्यानं "त्या" वादळात अडकलेली तिची नाव व्यवस्थीत पैलतीरी लावली होती अन स्वतामात्र कुठल्यातरी भयाण लाटेच्या तोंडी जाऊन उभा होता. स्वताचा घात..!! पण हे सारं त्यानं ठरवल्यासारखच होतं.स्वताच अर्घ्यच तो त्या मैत्रीरुपी सागराला आज अर्पण करु पाहत होता. तिकडं तिची मात्र वेगळीच गडबड सुरु होती. आपल्या हक्काच्या मैत्रीणींना अन त्या दोघांच्या common friend ला तिनं आता ताप द्यायला सुरु केलं होतं. त्याला ओळखणारी एकमेव आज त्याच्याबद्दलची मते दुसर्‍यांना विचारात होती. एरव्ही कुठल्याही दीडशहाण्या मैत्रीणी त्याच्या विरुद्ध ब्र जरी काढला तर ती त्या मैत्रीणीची चांगलीच रपेट घ्यायची. पण आज ज्या मैत्रीणींकडे "तो" किती चांगला आहे, त्याच्या त्या निर्भीड अन अतुट attitude अन confidence चं ती पारायणं करायची आज त्यांच्याकडुनच तिला त्याच्याबद्दलचं certificate हवं होता. किती विरोधाभास होता नाही..!! तिच सुदैव की दुर्दैव कोण जाणे..? सगळ्यांकडुनच तिला तो बद्दल चांगलच ऐकायला मिळत होतं. उलट तोच किती perfect match आहे तिच्यासाठी हेच प्रत्येकजण तिला पटवुन देत होता. पण तिचं अजुनही समाधान होतं नव्हतं. कारण तिच्या true friend चं मत या सगळ्यांच्याच काय पण प्रत्यक्षात तिच्याही मताच्या विरुद्ध होतं.आता ती स्वतालाच यातुन सावरु पाहत होती म्हणुनच मघाशी शिंप्याकडुन आणलेले तिचे ते नवे चार ड्रेस्स ती try करणार होती. पहिला dress try केल्यानंतर लगेचच तिनं त्याला message केला.

"Fashio show starts..!! आत्ता मी red dress घातलाय. मस्त झालाय..!! अल्टी..! काय करतोयस..? जेवलास का..?"

तिचा वातवरण निवळण्याचा त्याच्यासारखाच एक hopeless प्रयत्न..!! खरंतर तिच्या या बारिक सारिक गोष्टी आता उद्यापासुन ती कधीच आपल्या बरोबर वाटत असुनही share करु शकणार नाही म्हणुन त्याचं मन जड झालं होतं.नेहमी झर्‍यासारखी उसळी घेणारं त्याचं मन या दगडाला धडकुन कायमच शांत बसल्यासारखच वाटत होतं. त्या फेसाळणार्‍या पाण्यातला तो सच्चेपणा त्या दगडालाही मोहवत होता. जणु तो दगडच तो निरंतर प्रवाह रोखु पाहत होता. पण त्या दगडाला हा उसळाणारा कधीच थांबवता येणार नव्हता ह्याचं सगळ्यात जास्त दुख त्या प्रवाहालाच होतं. त्यानं तिच्या mesaage वर काहीच reply नाही दिला. तिलाही त्याची चाललेली तळमळ आता स्पष्टपणे जाणवु लागली होती. पण या घडीला तो आपल्या आयुष्यातुन कायमचा जाणारे ही कल्पना तिच्या ध्यानीमनीही नव्हती. फक्त त्याच्या त्या सच्चेपणामुळेच..!! तिचा पुन्हा एक message..!!

"".....", काय झालं..? बोल ना काहीतरी...."

अजुनही तो बोलता झाला नव्हता. आता त्यानं बोलण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं. आज तिच्याशी संवाद साधताना तो पुर्ण blank झाला होता. पण आज तिच्यासमोर तो त्याचं मुक होणं लपवणार नव्हता. डोळ्यातली सारे अश्रु मोठ्या धैर्याने पिऊन टाकत त्यानं तिला एक blank message पाठवला. जणुकाही त्याच मुक होणंच तो त्या blank message मधुन तिला सांगत होता. तिला तो त्याचा blank message पाहुन काहीतरी आठवलं. माग कधीतरी एकदा तो तिला सांगत होता.

"मी कधीच blank होत नाही..!! अन सुदैवानं मी कधीच blank होणार नाही. आपल्याला बाबा जे आहे त्या व्यक्त व्ह्यायला आवडतं.. उगीच मनात काहीतरी लपवायचं..!! फार कपटी असतात असं मनात लपवणारी माणसं..!!" त्याची ही सारी वाक्य अन तो blank message..!! तिला "तो" माझ्यामुळं इतका बदलु शकतो यावर विश्वासच बसत नव्हता. नेहमी I DON`T NEED YOU म्हणणारा "......" आज फक्त माझ्यासाठी blank झालाय..!! देवदार वृक्षाच्या वनासारख्या बहरलेल्या मैत्रीच्या त्या वनात दोघही एकमेंकाना शोधत होते, एका वेगळ्या रुपात. त्याचा तो blank message पाहुन तिनही त्याला लगेच reply पाठवला खास त्याच्यासाठी बनवलेल्या त्या attitude ने.

""......", I KNOW , तुला किती त्रास होतोय..!! I PROMISE मी तुला एका शब्दनही काहीही म्हणणार नाही तुला. कारण मला माझा खरा मित्र माझा "....." असणं खुप महत्वाचं आहे. I AM IDIOT & I WANT MY IDIOT TRUE FRIEND WITH ME..!! PLZ.. हस एकदा..!! तो jab we met चा dialogue आठव.. नाहीतर ३ IDIOTS चा.."

पण त्याला या message ला ही reply करावासा नाही वाटला. तिचा पुन्हा mesaage..!!

""....."..... काय रे .... no reply? काय करतोयस..? बोल ना PLZ..."

तो तिच्या या message नंतर थोडा सावरला अन लगेच तिला reply केला.

"DON`T WORRY... ALL IZZZ WELL ...... ALL IZZ WELL"

त्याचा message पाहुन तिच्या जीवात जीव आला. खुप हायसं वाटलं तिला.

"ह्म्म..!! Aal is Well!!!! IDIOT! माझा true friend किती बे येडा असला तरी त्याची जागा कोणीच नाही घेऊ शकत..!!"

अजुन काय ऐकायचं होतं त्याला तिच्याकडुन..?? सगळंकाही मनाजोगत तर झालं होतं त्याच्या..!! तिला खरतरं आता व्यक्त व्ह्यावसं वाटत होतं अन त्याला फक्त तिच ते व्यक्त होणं अनुभवायचं होतं. पण तिच खर व्यक्त होणं तो आतुन feel करत होता. त्याला अचानक त्याने october मधे त्याने त्याच्या mobile ची caller-tune change केल्याचं आठवलं..!! त्यानं खरोखरच ती caller-tune आजवर जगली होती. पन त्या गाण्याच्या एका वेगळ्या अर्थाने..!!

"I`VE A PERFECT CALLER-TUNE..!! लम्हा बीता हुवा.. दिल दुखाता रहा.. खाम खा बेवजहा ख्वाब बुनता रहा..!! तुने जो ना कहा मैं वो सुनता रहा..!! Don`t worry .... मी तुझ्या प्रत्येक decision मागे ठाम उभा आहे, b`coz मला तु काय विचार करतेस ते खुप महत्वाचय रे..!! तुझा खरा TRUE FRIEND..!!"

आजची रात्र ही कशीबशी पुढे ढकलली गेली होती. पण अजुनही तो तिच्यापासुन दुर जाण्याचं रहस्य उलगडायचं होतं..!! ते त्यानं मुद्दामच आज उलगडलं नव्हतं..!!
दुसर्‍यादिवशी त्यानं त्याची ती काल अधुरी राहिलेली job शोधण्याची मोहिम पुन्हा सुरु केली. जमेल तितक्या placement agents, कंपन्यांच्या गेटवर आपला RESUME SUBMIT केला. त्याच दरम्यान त्याला कालची एक अधुरी राहिलेली गोष्ट पुर्ण करण्याची आठवणही होती. संध्याकाळी त्यानं तिला फोन केला अन उगाच गोष्ट कुठल्यातरी भुतकाळातल्या गोष्टीवर आणुन तिला काहीतरी सांगु लागला.

"दगड आठवतय..? मी तुला विचारलं होतं..? the most important thing in life..? and your answer was... "the word after it said..!!" माफ कर मला..!! नाही जमली मला acting करायला..!! I am sorry.. आपली मैत्री ही आता इथच थांबवायला हवी..!! खरतरं खुप आधीच आपण ती थांबवायला हवी होती. आपली मैत्री ही एक वाईट सवय होती. अन वाईट सवय सुटायला थोडावेळ लागतो..!! थोडा त्रास होतो पण वाईट सवयीही सुटतात..!! अन हीही वाईट सवय सुटेल. it was an addiction..!! कुठंतरी संपणारं...!! आपल्या या मैत्रीत मी तुझ्याशी खुप वाईट वागलो..!! तुला खुप hurt केलं..!! माझी प्रत्येक लाथ तु टाळी म्हणुन झेललीस..! माझी boring philosophy तुला interest नसतानाही ऐकलीस. माफ कर मला माझ्यामुळे तुला खुप त्रास होतोय..!! पण यार I can just hurt you..!! तुझ्या भावी आयुष्यसाठी खुप खुप शुभेच्छा..!! तो कृष्णा कायमच तुझ्याबरोबर असेन..!! "

""....." इतक्या सहज जमेल तुला..? इतकं सोप्पं आहे का रे सगळं..!! अन तु राहु शकशील..?"

"I don`t need anyone..!! मला जायला हवं दगड..!!"

एव्हढंच बोलुन त्यानं तो फोन cut केला.

तिच्या डोळ्यातमात्र अश्रुंशिवाय काहीच उरलं नव्हतं. अन का उरावं तिच सर्वस्व तिनं कुणाच्यातरी नावाने करायचं ठरवलं होतं. आता भोवर्‍यात अडकलेल्या एखाद्या नावेसारखी तिची दशा झाली होती. पुढे उचलेलं पाऊल मागे घेतलं तर हातुन काहीतरी नक्कीच निसटुन जाणार होतं. पण निसटुन जाणारं काहीतरी "मृगजळ" च असणार होतं त्यामुळे ते हातुन निघुन गेल्याचं दुखही त्या मृगजळासारखच क्षणिक असणार होतं. पण मनाची वेडी आशा हे सत्य काही मानायला तयारच होतं नव्हतं. अन म्हणुन तिनं पटकन त्या दोघांच्या common friend ला फोन लावत घडलेली सगळी हकीकत सांगितली. ती सांगताना तर तिला खुपच भरुन येतं होतं. त्या common friend ने तिला थोडा धीर धरायला लावत सगळी situation समजावुन घेतली अन तिला त्याच्यापासुन काहीदिवस दुर रहायला सांगितलं अन जर या मधल्यावेळात जर तिला तिच्याबद्दलची feeling बदलावीशी वाटली नाही तर मग तो या विषयात थोडफार interfere करणार होता. पण तिला भिती होती ती तो तिच्यापासुन दुर जाण्याचीच..!! अन हीच बोच तिनं त्याला बोलुन दाखविली. त्यवर त्या common friend ने तिला "तो" तुला सोडुन अगदी पाताळात जरी गेला तरी तुझ्यासाठी परत घेऊन येईन..!! असं वचन देत तिला सावरलं..!! पण तरीही तिच मन काही ऐकायलाच तयार नव्हतं..!! शेवटी नाईलाजाने त्या common friend ने "मी बोलतो त्याच्याशी मग तर झालं..!! उद्याच बोलतो..!! मग तर झालं..?" असं म्हणत कशीबशी त्याची समजुत घातली. त्यांच बोलणं संपेपर्यंत त्याचा एक sms तिला आलाच.

"ऐ.. ".......", नको करुस लई विचार.. झोपं शांत.. Aal izz well..झोप शांत... तो नेहमीच तुझ्याबरोबर असेन...!!"

तिला मात्र त्या sms कडे बघुन खुप रडावसं वाटलं..!! शेवटी त्यानच दिलेल्या त्या कृष्णाच्या मुर्तीकडे पाहत काहीतरी बडबडत ती झोपी गेली.

तिचा फोन झाल्यावर लगेचच त्या common friend ने तो ला फोन करत त्याला भेटण्याबाबत विचारलं. त्यालाही हेच हवं होतं. जी गोष्ट तिला direct सांगायला जमत नव्हती कदाचित ती गोष्ट तो त्या common friend ला सांगु शकला असता. अन म्हणुनच दोघांनी उद्या सकाळी भेटायचं ठरवलं. दुसर्‍यादिवशी सकाळी दहा वाजताच त्यानं त्या common friend च घरं गाठलं..!! त्याच्या घरी आज कुणीच नव्हतं त्यामुळे दोघांनाही बोलण्यास तसा बराच एकांत मिळणार होता. आल्या आल्या थोडसं settle होतं, चहापाणी झाल्यावर थेट विषयला हात घालत त्याच्याशी संवादाला सुरुवात केली.

"तुला काय बोलायचं आहे ते पटकन बोलं..!! परत म्हणु नकोस मला बोलायला channce दिलाच नाही म्हणुन..!! तुला जे काही बोलायचय ते तु आधी बोल..!! कारण मी जेव्हा बोलेन तेव्हा मीच बोलेन..!! अन मी जेव्हा इथुन जाईन तेव्हा तुही माझ्या निर्णयाशी सहमत असशील..!! so जे काही बोलायचं आहे ते आधी तु बोल..!! काय विचरायचं आहे तेही..!! अन you know my attitude..!! so at the end decision will be mine only...!! you will agree with it..!!"

"अरे ...!! हो..!! मान्य आहे बाबा तुझा attitude..!! पण तिचाही थोडा विचार कर ना..? काल पासुन बरं नाही वाटतय तिला..!! अन काय problem आहे..? का चललायस तिला सोडुन..?"

"मला जावं लागणारेय रे..!! मला तिच्या आयुष्यातुन जायचं नसलं तरी..!! I have to go..!! तिचा खुप जीव आहे रे तिच्या पप्पांनवर..!! मी थांबलो तर कदाचित ते हरतील रे..!! अन तिला हे कधीच नाही पटणार रे..!! मला नाही हरवायचं तिच्या पप्पांना..!! ती जितका respect करते ना त्यांचा तितकाच मीही करतो रे त्यांचा respect..!!"

"तुला असं का वाटतं की तु त्यांना हरवतोयस म्हणुन..!! एक सांगु तुमच्या दोघांच असं काही होईल हे मला खुप आधी पासुन माहित होतं. तु तिच्या hostel खाली राहुन त्या रात्री तिच्याशी बोलत होता ना अगदी त्या दिवसांपासुन..!!"

"ह्म्म..!! आजवर मी कुणाच्याच comments seriously घेतल्या नाही. गरज नाही वाटली मला त्याची..!! अन तु चुकतोयस मित्रा..!! तेव्हाही मी तिचा true friend म्हणुन्तिथं होतो..!! अन आज तिला सोडुन चाललोय तर तेही तिचा true friend म्हणुननच..!! अन जेव्हा मी जाईन ना ती नक्की म्हणेन ""....", I PROUD OF YOU..!!". मी तिला promise दिलय मी तिच्या आयुष्यातुन तुझ्या आधीच्या दोन मित्रांसारखं होऊन नाही जाणार..!! अगदी काहीही झालं तरी..!! अन एक तुला काहीही वाटु शकतं त्याचा मला काहीच फरक नाही पडत..!! मला फक्त तिला काय वाटतं याचाच फरक पडतो..!! बाकी सगळी दुनिया गेली उडत..!! मी नाही विचार करत बसत या दुनियेचा..!!"

"अरे पण तुला असं नाही वाटत का की तु जर तिला सोडुन गेलास तर ज्या पप्पांसाठी तिला इतकं काही वाटत तेच तिचे पप्पा तिच्या मनातुन उतरतील..!! कधी हा विचार केलायस..!!! तुझं तिच्या आयुष्यातुन जाण्यामूले कदाचित तिच्या पप्पांविषयीचा आदर कमी होईल..!! she will hate him..!! फक्त तुझ्या नसण्यामुळे..!!"

"वेडायस का..? कोण आहे रे मी..? एक पुर्ण वाया गेलेलं कार्टं..!! ज्यानं कधीच या दुनियेची पर्वा केली नाही..!! त्यानं नेहमी तेच केलं ते ज्याला वाटलं..!! कधी आपल्या आई-बापाला काय वाटतं याचाही ज्यानं कधी विचार नाही केला. त्याच्या असण्या नसण्याने कुणालाच काही फरक नाही पडायला पाहिजे रे..!! अन तिच्या पप्पांसमोर खुप लहान आहे रे मी..!! खुप लहान..!! अन माझ्यासाठी तिनं त्यांना hurt करावं असं नाही वाटतं..!! अन तिचे पप्पाच तिच्यासाठी सर्वकाही आहे..!! जरी ती मला तिच्या आयुष्यतला कृष्णा मानत असली ना तरीही..!! so don`t worry..!! असं काहीच नाही होणार..!! तिचे पप्पा कधीच तिच्यासाठी वाईट नाही होऊ शकत..!! कळलं..!!"

"".....", काय problem आहे यार...? गेले चार- पाच दिवस मी अन तिची room-mate आम्ही दोघही तिला हेच समजवतोय की तु तिच्यासाठी किती perfect match आहेस..!! तुझ्याबद्दलचे सगळे pros and cons लक्षात घेऊनच आम्ही दोघांनी तिला तो सल्ला दिलाय..!! अन तिच्या पप्पांच म्हणशील तर मी बोलेन त्यांच्याशी..!! मी भांडेन त्यांच्याशी..!! तुझ्यासाठी नाही तर तिच्यासाठी..!! तु फक्त मागे नको हटुस रे..!! आम्ही आहोत ना सगळं सांभाळुन घ्यायला..!!"

"ज्याला तिची ती अभेद्य चौकट तोडायला जमलं..!! त्याला तिच्या पप्पांशी भांडतणाना भिती वाटते..!! असं वाटतं का तुला..!! मी ते सगळं handle करु शकतो..!! त्या साठी मला तुझ्यासारख्या भेकड माणसाची गरज नाही..!! काय माहिती आहे रे तुम्हाला माझ्याबद्दल..? मी दगडला म्हणतो तु मला ०.००१ % ओळखत नाहीस पन तु अन तुची रुममेट मला ०.०१% सुद्धा ओळखत नाहीत..!!! अन मी काय हे तिला दुसर्‍या कुणी सांगायची गरज नाही..!! मला अजुनही ते वाक्य आठवतय...!! "......" मला म्हणाली होती..!! अन तुही तेच वाक्य म्हणाला होता..!! खुप hurt झालं होतं मला तेव्हा..!! तुम्हे दोघही म्हणाला होतात "....", तुला कोणी बहीण नाही ना म्हणुन तु असा वागतोस..!! काय संबध होता रे असं मला emotionally blackmail करायचं..!! मला बहीण नाही म्हणुन मी कोणत्याच मुलीला समजवुन नाही घेउ शकत असच तुम्हा दोघांना वाटत ना..? तुझं ठीकाय रे..? तुझ्या मताचा मला फारसा फरक नाही पडत..!! पण मी हे कसं विसरेन तिनं हे मला ,म्हटलं होतं..!! दुसर्‍या कुणीही म्हटलं असतं मला ते चाललं असतं रे.. पण माझ्या एकुलत्या एक मैत्रीणीने असं म्हणावं..!! जी मला पुर्णपणे ओऴखते तिनं असं म्हणावं..!! मी इतकाही वाईट नाही रे..!! मला तिच्यापासुन दुर जावं लागतय कारण I don`t want to hurt her..!! I LOVE HER...!! YES I LOVE HER..!! माझी एकुलती एक मैत्रीण म्हणुन..!! "

"एव्हढं सगळं असुनही का सोडुन चललायस "......." तिला..? किती जीव लावते ती तुला..!! अरे सगळ्या गोष्टी तुझ्याबाजुने आहेत मग काय problem आहे..!! तु ९६ कुळी आहेस..!! घरची आर्थिक परिस्थितीही ok आहे..!! family background ही चांगलं आहे..!! गावी शेती आहे..!! अजुन काय हवं असतं रे..!! अन हे कमी आहे का तु ही B.E. MECHANICAL आहेस..!! भले आज तुझ्याकडे नोकरी नाही पण तुला नक्कीच छान नोकरी मिळेल..!! मग काय problem आहे..?"

"आपण एकमेंकाना किती गृहित धरतो नाही..!! ९६ कुळी..? तुला कुणी सांगितलं मी ९६ कुळी आहे..?"

"तु ९६ कुळी नाहीस..? मला वाटलं.. म्हणजे मला खुप confidence होता..!! अन या सार्‍या गोष्टी मी तु ९६ कुळी आहेस म्हणुनच गृहित धरल्या होत्या..!!"

"९६ कुळी..!! ह्म्म..!! माझं मागच्या जन्मीचं पाप..!! एकदा सहज बोलता बोलता तिनं मला विचारलं होतं रे..!! तिला कदाचित आजही वाटत असेल ते मला अजुन कळलं नसेल..!! पण मला ते तेव्हाच कळलं होतं..!! पण त्यावेळेस मी तिला मुद्दामच उत्तर नाही दिलं..!! मला नाहे द्यावसं वाटलं..!! कारण तेव्हा तिला माझी गरज होती..!! तिला कुणाच्या तरी आधाराची गरज होती..!! अन तिथच माझी चुक झाली ..!! कदाचित तेव्हाच मी तिला सांगितलं असतं की मी ९६ कुळी नाही...!! तर ती माझ्यात एव्हढी नसती गुंतली रे..!! मी ९६ कुळी ***** नाही..!! मी क्षत्रिय ***** आहे..!! तिनं एकदा मला तिच्या एका चुलत बहिणीविषयी सांगितलं होतं. तिनं असच कुणातरी मुलाबरोबर पळुन जाऊन लग्न केलं..!! पण तो मुलगा ९६ कुळी***** नव्हता..!! तो नुसताच****** होता. तेव्हा तिच्या अजोबांनी तिला सांगितलं होतं. बेटा तुला हवा तेव्हढा वेळ घे..!! पण लग्न ९६ कुळी ****** बरोबरच कर..!! ती जेव्हा हे मला सांगत होती ना खरतर त्याच्याही आधीच मला ती माझ्यात गुंतलेल्याच लक्षात आलं होतं रे अन तेव्हढ्याचसाठी मी हैद्राबादला चाललो होतो..!! पण तिनं मला थांबवलं..!! तिच्या आयुष्यातला कृष्णा बनवलं...!! तु अन पप्पा दोघच हवेत म्हणुन माझे सगळे plans धुळीस मिळवले..!! तिला मी वचन दिलं होतं..!! तिच्या आयुष्यायातुन तिच्या आधीच्या दोन मित्रांसारखं नाही जाणार..!! पण कदाचित सगळ्यांसाठी अगदी तिच्यासाठीही मी ते promise मोडल्यासारखं असेल..!! पण मला हा अरोपही मान्य आहे..!! मला माझ्या मैत्रीणीला काय वाटतं मी दिलेल्या promise पेक्षा ही महत्वाचय..!! आजवर तिच्यासाठी मी माझे कित्येक शब्द मोडलेत..!! पण मला त्याचं काहीच नाही वाटत..!! मी आज जे काही केलं ते फक्त तिला जे वाटत तेच केलं..!! तिला जे बोलता येत नव्हतं..!! तिला जे व्यक्त होता येत नव्हतं तेच केलं..!! या सगळ्यांचे परिणाम माहित असुनही..!! कारण मी तिला म्हटलं होतं मी तुझ्या आयुष्यात आहे ते तुझ्या अश्रुंमागची हजारों कारणे शोधायला.!! कदाचित तिला अशी अधुरी पुर्ण न होणारी स्वप्न दाखविणं चुकीच असेल..!! पण मी तेच केलं जे माझ्या मैत्रीणीला वाटतं..!! प्रत्येक मुलीच एक स्वप्न असतं रे..!! आपल्यावर कुणीतरी जिवापाड प्रेम करणारा असावं..!! आपल्यावर जीव ओवाळुन टाकणारं असावं..!! तिलाही तसं वाटलं तर काय चुकलं..? अन तिच्या स्वप्नांना जिथवर मी बळकटी देऊ शकत होतो तिथवर मी दिली..!! अगदी भरभरुन..!! पण या सगळ्यात तिनं कधीच मला नाही विचारलं..!! मला काय वाटतं ते..!! मीच नाही विचरु दिलं ते..!! एक कविता तिला पाठवली होती..!! मी असं का केलं..? तिला ती कळलेच नाहे रे..!! अन तिला कधीच नाही कळणार..!! मे जेव्हा जाईन तेव्हा मात्र ती माझ्यासाठी एक मात्र नक्की म्हणेन "......", I PROUD OF YOU....!!"

त्याच्या डोळ्यातुन आपोआपच अश्रु पडत होते. अन तो मित्र त्याने अत्र त्याला घट्ट मिठी मारली..!!

"तुही माझ्यासारखाच decision घेतलायस..!! मला वाटलं नव्हतं यार मला कुणीतरी माझ्यासारखं या आयुष्यात भेटेन..!!"

"तुझी अन माझी comparision होऊ शकत नाही..!! तु माझ्यासमोर कचरा आहेस..!! कचरा..!! तु भेकड आहेस..!! अन मी भेकड नाही..!! तु मैदानातुन पळुन आलायस..!! अन मी ..!! मी लढायच्या आधीच माघार घेतली..!! कारण मला समोरच्याला हरवायचं नाही..!! अन मी जेव्हा ठरवतो ना की मला लढायच आहे..!! तिथंच मी अर्धी लढाई जिंकलेली असते..!! अगदी त्या रामयणातल्या बाली सारखं..!! माझा over confidence म्हण नाही तर attitude..!! पण मला माहितिए मी काय आहे ते..!! उगीच तुझी comparision माझ्याबरोबर करायची नाही..!! तु खुप लहान आहेस..!! खुप..!!"

"मी तुझ्या decision मागे आहे..!! फक्त तु ९६ कुळी नाहीस म्हणुन..!! अन तु ९६ कुळी असतास तर..?"

त्याच्या या वाक्यावर तो मात्र खुपच विचित्र हसला. त्या common friend ला खुपच लाजल्या सारखं झालं होतं..!! थोडावेळापुर्वी दोघांचही पळवुन जाऊन लग्न लावायला तयार झालेला तो आता मात्र अचानक त्याचं मतपरिवर्तन झालं होतं. त्याला तो आल्याआल्या म्हणालेलं वाक्य आठवत होतं..!! खरचं जाताना तो त्याचच decision final करुन जाणार होता, जे त्यालाही पटलेलं असणार होतं.. आजवर त्यानं त्याच्या i will make it happen वाल्या त्या खराब attitude बद्दल ती कडुन बरच ऐकलं होतं पण आज साक्षात अनुभवत होता. त्याच्या हसण्यामागच्या गुढतेचं रहस्य त्यालाही कळलं असावं म्हणुन तर आता त्याची त्याच्याशी नजरानजर करण्याची हिम्मत होत नव्हती. खरंतर इतकावेळ मी तुम्हा दोघांसाठी ह्यांव करेन ...!! ट्यांव करेन..!! करणारा तो common friend अचानक का शांत झाला होता..!! मोठ्या आत्मविश्वासने मी भांडेन तुमच्या दोघांसाठी तिच्या घरच्यांशीही दोन हात करेन म्हणणार्‍याचं अवसान फक्त त्यानं "मी ९६ कुळी ****** " नाही म्हणताच गळुन पडलं होतं..!! एखादी गोष्ट ठरवणं अन ती करणं यातला फरकच त्या common friend ला त्याने जाणवुन दिला होता. त्याला मात्र त्या common friend ने घेतलेल्या माघारीचं बिलकुल वाईट वाटत नव्हतं..!! वाईट फक्त इतक्याच गोष्टीच वाटत होतं की "मी ९६ कुळी" नाही ...!! खरंतरं आज जग कुठं चाललय अन ते तिघंही कुठल्या जुन्या रिढीपरंपरेला धरुन बसलेत असच सगळ्यांना वाटत असेल..!! पण ते रुढी परंपरेला कवटाळुन धरणं म्हणजे दोघांनीही नाही म्हटलं तर आपाअपल्या कुटुंबाप्रती दाखवलेला विश्वासच होता. त्यानं ठरवलं असत तर तो ९६ कुळी नसतानाही तिला त्याच्याबरोबर तिच्या पप्पांच्या त्या उबदार पंखाखालुन सहज उडवुन नेलं असतं..!! अन तिनंही त्याच्याबद्दल अशी कुठलीच तक्रार नसती केली. पण त्यानं असं काहीच नाही केलं..!! एखादी गोष्ट करण्याची हिम्मत असतानाही जर ती करायला नाही मिळाली तर किती त्रास होत असेल हे त्या कर्णानंतर अनुभवाणार कदाचित तो दुसराच असेल..!! पण त्यानं हे सर्व स्विकारलं होतं..!! कारण दोघांच नातं हे प्रेमाचं नव्हतच मुळी..!! ते नातं होतं एका निखळ मैत्रीचं..!! एकमेंकासाठी काहीही करण्याची अगदी आपाआपलं अस्तित्वही पणाला लावायची तयारी असेलेली नितळ मैत्री..!! त्या दोघांची गोष्ट ही अधुरी राहिलेली प्रेमकथा नसणार होती तर ती गोष्ट ही पुर्णात्वाकडे गेलेल्या निखळ मैत्रीची असणार होती. अन त्याला विश्वास होता या कथेला प्रेमकथेचा इतुकाही अंश तो त्याच्याबाजुने लागणार नव्हता. इतकी काळजी तर त्याने नक्कीच घेतली होती.
बराच वेळ गप्प मारल्यावर शेवटी त्या comon friend ने या सगळ्या प्रकारातुन लवकरात लवकर सावरण्यासाठी busy होण्याचच त्याला सुचवलं..!! लवकर job शोधण्याचा एक नकोसा सल्ला देत तिला समजविण्याची सगळी जबाबदारी स्वतावर घेत त्यानं त्याला निरोप घ्यायला लावला. तो तसाच तिथुन भरल्या डोळ्याने निघाला. डोक्यात मात्र अजुनही तिचे विचार थैमान घालत होते..!!

"तिला आपण असं वागुन धोका तर नाही देत आहोत ना..? तिला कुणीतरी माझ्यापेक्षा चांगला समजुन घेणारा जोडीद्रार मिळेल ना..? का नाही मिळणार..!! मार्गषीर्शातले गुरुवार असे वाया तर नाही जाणार..!! पण ती मला विसरु शकेल..? खरंतर मी तिच्या आयुष्यातुन दुर चाललो असं म्हणतोय..!! पण तिच्या आयुष्यातुन कधी मी दुर जाऊ शकेन..?? इतकं सगळं होऊनही ती मी दिलेली कृष्णाची मुर्ती कायम तिच्याबरोबर ठेवेन..? की ती कुठेतरी सोडुन देईल त्या कृष्णाला..? नाही ती असं काही नाही करणार..!! आपल्या निखल मैत्रीवर विश्वास ठेव रे "....." . काहीही झालं..!! तिच्यासाठी तु कितीही वाइट झालास...!! तरी तुझी तिच्या आयुष्यातली जागा कुणीही हिरावुन नाही घेऊ शकणार..!! अगदी तिचा नवराही..!! तु तिचा कृष्णा आहेस..!! अन तुझी जागा ती कुणालाच नाही देऊ शकणार..!! अजुन असा कुणीच जन्माला नाही आला. अन येणार नाही..!! हे फक्त तुच करु शकतो..!! कारण आजवर तु फक्त खर्‍याचीच बाजु घेतलीएस..!! अन इतकं सगळं होऊनही तुझं मन तुला कधीच नाही खाणार..!! तु कधीच कुढत नाही बसणार..!! कारण तु सच्या मित्राच कर्तव्य पार पाडलयसं..!! तु तुझ्या मैत्रीणीला जेजे वाटतं ते सारं केलयसं..!! भलं ते आख्या जगाला मैत्रीच्या विरोधतल वागणं वाटल का असेना..? तु तुझ्या मनाशी प्रामाणिक होतास..!! बस अजुन काय हवय..!! बस्स..!! एकच वाक्य ऐकायचय तिच्याकडुन पुन्हा एकदा..!! I PROUD OF YOU...!!"

असे कितीतरी विचारंच थैमान त्याच्या मनात चाललं होतं. हे विचारांच चक्रीवादळ शमविण्याचं काही नावच घेत नव्हतं. तो आता कोसळला होता. कुणीतरी त्याला सावरण्याची नितांत आवश्यकता होती. आजवर I DON`T NEED ANYONE म्हणणारा आज कुणाची तरी आधारासाठी आशाळभुतपणे वाट पाहत होता. पण त्याची एकुलती एक मैत्रीण तिला कितीही वाटत असलं तरी त्याला सावरायला येऊ शकत नव्हती. अन त्याला त्याबद्दल काही एक तक्रार नव्हती. कुणीतरी खरच म्हटलं मुलींच्या मैत्रीपेक्षा मुलांची मैत्री खरच खुप परवडते. त्याला ते त्यावेळी पटत होतं. संध्याकाळी लगेचच त्याने आपल्या true boyfriend ला फोन करत सगळी हकीकत सांगितली. त्या true boyfriend ने त्याला जमेल तितकं सावरलं. अन त्याच्या त्या निर्णयासाठी त्याच्या पाठीशी ठाम उभा राहिला. पण त्या common friend सारखं नाही. तो common friend त्याच्या निर्णयाशी सहमत होता ते तो ९६ कुळी ****** नव्हता म्हणुन..!! पण त्याचा true boyfriend त्याच्यामागे ठामपणे उभा होता कारण त्याला त्याच्यातल्या तिच्या true friend वर विश्वास होता. त्याच्या सच्चेपणावर विश्वास होता. त्यावेळेस तो true boyfriend त्याच्या ९६ कुळी नसण्याला अवास्तव महत्व देत नव्हता. तर तो योग्य त्या गोष्टी साठी आपल्या मित्राचं सांत्वन करत होता. हेच त्या common friend ला जमलं नव्हतं. अन तो त्या common friend कडुन तिला समजविण्याची अपेक्षा करत होता. पण त्याशिवाय दुसरा ईलाज नव्हता. तिला समजविण्यासाठी त्यावेळी तो चुकीचा माणुसच त्याला बरोबर वाटला. त्या true boyfriend ने त्याला व्यवस्थीत सावरलं अन स्वता तिच्याशी बोल असंच त्याला समजावलं. तो कसाबसा त्यासाठी तयार झाला.
इकडे त्या common friend ने तिला मोठ्या विश्वासात घेऊन तिला सार्‍या गोष्टी समजवल्या.
तिला मात्र काहीच उमजत नव्हतं. स्वप्न तुटणं तसं तिला नवीन नव्हतं. अन त्या तुटलेल्या स्वप्नांचे तुकडे वेचत पुढचं स्वप्नं पाहणंही..!! पण हे स्वप्न तुटणं..!! तिला हे सारं पटतंच नव्हतं..!! सारखं राहुन राहुन कधीतरी त्यानं म्हटलेलं एकच वाक्य तिच्या कानावर आदळत होतं.

"तुझ्या आयुष्यात दोन अशी माणसं आहेत जे तुला खुप त्रास देतात अन तितकाच जीव लावतात..!! ".....", त्यातलाच एक आहे..!!". अन आज त्या दोघांमधला एक फक्त तिच्या आयुष्यातल्या त्या दुसर्‍या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणुन स्वताहुन तिच्या आयुष्यातुन दुर जाणार होता. त्या मित्राने तिला सगळी हकीकत सांगितल्यावर तिला मात्र आपलं रडु आवरलच नाही. तिथच ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवुन रडु लागली. रडता रडताच काहीतरी बडुबडु लागली.

"तो ९६ कुळी नाही..!! वाटलच मला..!! असं काहीतरी असेन म्हणुन...!! म्हणुन अजुन मी माझा decision final करत नव्हते..!! पण आता मी decision घेतलाय..!!and thats final..!! no one can change..!! इथुन पुढं तु कधीच "......" विषय माझ्याशी बोलताना काढायचा नाही..!! promise me..!! कधीच ".....", बद्दल नाही बोलायचं..!"

काल परवा पर्यंत ज्याचा आवाज ऐकण्यासाठी जी आतुर होत होती ती असं म्हणत होती. कालच त्याला म्हणणारी ""......", I KNOW , तुला किती त्रास होतोय..!! I PROMISE मी तुला एका शब्दनही काहीही म्हणणार नाही तुला. कारण मला माझा खरा मित्र माझा "....." असणं खुप महत्वाचं आहे. I AM IDIOT & I WANT MY IDIOT TRUE FRIEND WITH ME..!! PLZ.. हस एकदा..!! तो jab we met चा dialogue आठव.. नाहीतर ३ IDIOTS चा.."

आज अचानक त्याच्यापासुन नातं तोडु पाहत होती. फक्त त्याच्या ९६ कुळी नसण्यामुळे..!!
त्या मित्राला तिला सावरणं खरच खुप अवघड जात होतं. कसबसं त्यानं तिला सावरलं अन तिला hostel वर सोडलं..!! एव्हढ्या सगळ्या भावनिक घटनांचा परिणाम तिच्या शरिरावर होत होता. तिची तब्येत अजुनच ढासळु लागली. ती खरंतरं बाहेरच्या जगासाठी वेगळच वागत होती. पण आतुन तिचं मन तिला खुपच खात होतं. अन म्हणुनच hostel वर पोहोचल्यावर लगेचच तिनं त्या पांढर्‍या शुभ्र संगमरवरी कृष्णाची मुर्ती समोर धरुन त्याच्या त्या नितळ नजरेतल्या निरागसतेला नजर भिडवत त्याच्याशी संवाद सुरु केला.

"का..? वागलस असा माझ्याशी..?का..? असच सोडुन जायचं होतं तर का आलस माझ्या आयुष्यात..!! का..!! राहिली असते मी तशीच..!! का लावला इतका जीव मला..!! का करुन घेतलास इतका त्रास "..."..? का..? फक्त माझ्यासाठी..? कोण मी..? माझ्यासाठी इतकं केलस..? इतकी स्वप्न दाखवलिस..!! I`ll make it happen असच म्हणायचास ना रे तु..? मग हे का नाही केलसं...? फक्त माझ्या पप्पांसाठी..!! ".....", आजवर मी म्हणायचे मी खुप बारिक सारिक गोष्टींचा विचार करते..!! पण तु ही करत असशील असं वाटलं नव्हतं रे..!! माफ कर तुझ्या एकुलत्या एक मैत्रीणीला..!! तु नेहमी माझा सच्चा मित्र म्हणुनच वागलास अन मी..!! मी त्या नात्याला एक वेगळं रुप देऊ पाहिलं..!! माफ कर मला..!! खुप lucky आहे रे माझ्या आयुष्यात कॄष्णा आहे..!! तु जरी म्हणतोयस ना की तु माझ्यापासुन खुप दुर चाललायस..!! ऐक मित्रा तु कायम माझ्या हृदयात असशील..!! माझा एकमेव सखा म्हणुन..!! माझा कृष्णा म्हणुन..!! माफ नाही करणार तुझ्या मैत्रीणीला..?" तिच असच बरळणं त्या मुर्तीला समोर घेऊन चाललं होतं. आज तिला कळलं होतं ही मुर्ती सगळ्या मुर्तीपेक्षा का वेगळी होती ते..!! त्याचं तिला ते म्हणणं "मी मागच्या जन्मात खुप पुण्य केली असणार..!! म्हणुन तु आलीस माझ्या आयुष्यात जीव लावायला..!! पण यार जाता जाता मागच्या जन्मात मी काहीतरी घोर पाप केलं असणार म्हणुन मला तु माझ्या आयुष्यातुन निघुन जाणारेस रे..!! "

अन अशी कितीतरी त्याची गुढ वाक्य अन त्याचे अर्थ आज तिला कळुन येत होते. किती सच्च्या दिलाने हे सर्वकाही घडवुन आणलं होतं. अन हे सारं घडवताना सगळ्या जगासाठी स्वताच वाईट होऊन गेला होता. तिला त्याच्याबद्दल आज खुपच कण्ह्व वाटत होती. कोणी खर्च इतक pure राहु शकतं का..? या तिच्या प्रश्नाला आज त्यानं एक चपराक दिल्यासारखच उत्तर दिलं होतं...!! दुसर्‍यादिवशी संध्याकाळी त्यानं त्याच्या true boyfriend च्या सल्ल्यानुसार तिला फोन करण्याचा ठरवलं..!! आज पहिल्यांदा तो तिला "can I call you now..?" म्हणत तिची परवानगी मागत होता. पण ती net cafe मधे असल्यामुळे तिने त्याला थोड्यावेळाने call करायला सांगितलं. थोड्यावेळाने तिचा misscall आला. त्याला तो misscall पाहुन खुपच वाईट वाटलं..!! कधीकाळी त्याच्याशी mobile मधे शिल्लक असलेल्या शेवटच्या पैसा पर्यंत गप्पा मारणारी आज त्याला misscall करत होती. काल्-परवापर्यंत i need you म्हणणारी आज अचानक इतकी बदलली होती. तो सारा अपमान गिळत त्यानं तिला फोन केला.

"दगड मला माफ कर..!! मी चुकलो..!!"

"मिस्टर "......", मी दगड नाही..!! तोंड संभाळुन बोलायचं..!! अन काय बोलायचय ते पटकन बोल..!! मला मेस्सवर जायचय..!! ८.३० ला मेस्स बंद होते..!!"

"हो ".........", तु दगड नाहीस..!! माहितिए मला..!! माफ कर मला नाही जमलं मला तुझा कृष्णा व्हायला..!!"

"तुझी तेव्हढी लायकी नाही..!! कोण समजतोस रे तु स्वताला..!!"

तिच्या या बोलण्याने तो खुपच hurt झाला. पण त्याला आपल्या त्या attitude बद्दल स्वतालाच हेवा वाटु लागला. कधीतरी तोच तिला म्हटला होता माझी लायकी नाही रे..!! नको जीव लावुस इतका..!! अन आज तीही हेच म्हणत होती.. !! तुझी लायकी नाही..!!

"हो माझी लायकी नाही..!! मला माफ कर..!! नाही होता आलं मला तुझा true friend..!!"

"true friend..? तुझा true friend true friend नव्हताच..!! तो boyfriend च होता..!!"

"तुझ्याबवतीची जी चौकट तोडली त्याबद्दल माफ कर..!! पण जाताना मी तुझ्याभवती अशी चौकट उभी केलीएना..!! ती कुणीच नाही तोडु शकणार..!!"

"मिस्टर"....", आता मला कुणा दुसर्‍यांने दिलेल्या चौकटीची काहीच गरज नाही ..!! आता ती चौकट इतकी घट्ट बनली आहे की तुच काय पण कोणीच नाही तोडु शकत..!!"

असंच बराचवेळ ती तिचं स्वप्न तुटल्याचं frustration त्याच्यावर काढत होती. अन तोही एका शब्दने तिला काहीच बोलत नव्हता. आपली कुठलीच चुक नसताना तिच बोलणं निमुटपणे ऐकौन घेत होता. कारण तो त्याच्या एकुलत्या एक मैत्रीणीला खुप छान ओळखत होता जरी ती त्याला ओळखु शकली नसली तरी..!! बराचवेळ तिची ती firing चालु होती. कानाचे पददे फाटावेत इतकं वाईट ती त्याच्याशी बोलत होती. पण तो सारं काही सहन करत होता. प्रत्येक वाक्यामागे तिच्या डोळ्यातुन येणारी अश्रुंची धारच त्याला हे सारं सहन करायची शक्ती देत होती. तिचं ते बोलणं चालु असताना त्यानं अचानक तिला विचारलं

"विसरणार नाहीस ना..? दगड तुझ्या"....."ला..?" तिनं यावर फारच सत्विक उत्तर दिलं.

"आजवर computer enginers ने एव्हढी झक मारली पण त्यानं आजही brain nerrow चा एक साधा छोटा nerve ही बनविता नाही आला. माणसाचे सगळे अवयव कृत्रीम करता येतील..!! पण त्याचं स्मृतीपटल..? नाही विसरणार..!! नाही विसरणार..!! माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी नाही विसरु शकत नाही..!!" आता हळु हळु ती normal होतं होती. त्यानं पटकन संधीचा फायदा उचलत तिला व्यक्त करण्यास भाग पाडलं..!!

"दगड बाकीच्यांच जाऊ दे..!! माझं काय..?"

""....." तुला मी कधीच नाही विसरणार..!! जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी नाही विसरणार तुला..!!"

"दगड मी तुला म्हटलं होतं..!! काहीही माग..! दिलं..!! अजुन तु मागितलं नाही..!! तु जोपर्यंत ते मागत नाहीस तोपर्यंत मी कसा जाऊ..? माग ना रे..!! माझा जीव त्याचमुळे अडकलाय॑ रे..!! तु जोवर ते मागत नाहीस ना तोवर मला तुझ्या आयुष्यातुन जाता येणार नाही."

"काय मागु "....."..?"

"काहीही..!! अगदी काहीही..!!"

"कायम सुखी रहा..!! तुझी प्रत्येक स्वप्न पुर्ण करं..!!"

"दगड..!! काय हे..? मी माझी प्रत्येक पाहिलेली स्वप्न पुर्ण करणार आहे..!! ते मला तु सांगायची गरज नाही..!! तुझ्यासाठी काहीतरी माग..!!"

"माझ्यासाठी..? माझ्यासाठी काय मागु..? बसं तु कायम सुखात रहा..!! अन तु म्हणतोच आहेस ना तर तुझी ती THIRD SIDE OF COIN सार्‍या जगाला दाखव..!! ते THIRD SIDE OF COIN पुस्तक नक्की लिही..!! ती तुझी आवडती कार toyoto camry s8 ही घे वयाच्या २८ व्य वर्षी..!!"

"दगड..!! काहीतरी तुझ्यासाठी माग म्हतलं होतं..! ठीक आहे..!! मी नक्की प्रयत्न करेन ते पुस्तक लिहायचं..!! पण दगड तु असतीस ना माझ्याबरोबर तर ते पुस्तक मी खुप छान लिहिलं असतं रे..!! पण ठीक आहे...!! पण एका अटीवर मी ते पुस्तक लिहीन..!! त्या पुस्तकावर पहिल्या पानावर मी तुझा उल्लेख करेन..!! घाबरु नकोस त्यामुळे तुला कुठलाच त्रास नाही होणार..!! तुझं नाव नाही लिहिणारं मी..!! पण DEDICATED TO MY TRUE FRIEND माझ्या एकुलत्या एक मैत्रीणीसाठी..!! एव्हढा उल्लेख नक्की करेन..!! नाही नको म्हणुस..!! इतका अधिकार तर आहे तुझ्या "..."ला..!! अन हो ह्या पुस्तकाची पहिली copy ही तुला पोहोचवेल..!! तु कुठंही असशील ना तरी त्याची copy तुझ्यापर्यंत नक्की पोहचवेन..!! माझं network तेव्हढं strong आहे..!! तु कुठंही असशील तिथुन तुला शोधुन ती copy तुझ्यापर्यंत पोहचवेल..!! वाचशील ना माझी THIRD SIDE OF COIN..!! "

"नक्की वाचेन..! ".......", काळजी घे रे.. स्वताची..!! पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न कर..!!"

"मी माझं पाहिलेलं प्रत्येक स्वप्नं पुर्ण करणार आहे at any cost..!! दगड आता माझं घर जवळ येतयं..!! पटकन बोल रे आयुष्यातली शेवटची पाच मिनिटं..!! यानंतर आपण पुन्हा कधीच एकमेंकचा आवाज नाही ऐकणार..!! कधीच नाही..!! बोल रे दगड बोल..!!"

"काय बोलु..?"

"काहीही बोलं..!! आपलं शेवटचं बोलणं..!!"

त्याच्या या वाक्यानंतर तिला तिचा हुंदका आवरलाच नाही. इतकावेळ मुसमुसुन रडणारी ती अचानक टाहो फोडलो..!! अन त्याचही काळीज पिळवटुन निघालं..!! त्यालाही राहवलं नाही..! पावलं पुन्हा घरापासुन दुर जाऊ लागली..!! आपोआपच..!! आता थोड्याचवेळात सारंकाही संपणार होतं. इतकावेळ मोठ्या धीराने त्याने अडवुन ठेवलेले डोळ्यांच्या काठांपर्यंत आलेले अश्रु आपोआपाच डोळ्यांतुन वाहु लागले.

"का..? दगड..!! का..? तो असं वागतोय आपल्याशी..? काय चुकलं होतं रे आपलं..? काय..? का कुणी कुणाच्या इतकं जवळ यावं की दुर जाताना एकमेंकासाठी वाईट होऊनच जावं लागावं...!! का..?"

तिला मात्र रडण्याशिवाय काहीच सुचत नव्हतं..!! जवळपास गेले दोन्-अडीच तास दोघ बोलत होते..!! अन ती त्याच्या फोन पासुन रडत होती. पण तरीही डोळ्यांतुन अश्रुंची धारा काही कमी होत नव्हती. आता सारं काही संपल्यात जमा होतं. दहा पंधरा मिनिटातच एव्हढी जिवापाड जपलेली मैत्री संपणार होती. दिव्याची विझण्यापुर्वीची ही फडफड दोघांनाही तितकीच सतावत होती. मैत्री थांबविण्याच ते क्षुल्लक कारण दोघांनाही पटत नव्हतं. खरंतरं त्याचं ९६ कुळी असणं नसणं हा ही अतुट मैत्री इथच थांबविण्याच कारण असुच शकत नव्हतं..!! याचं फक्त एकच कारण होतं अन ते म्हणजे दोघांचीही एकमेंकांबद्दल विचार करण्याची दृष्टी..!! आजवर एव्हढ्या निखळतेने जपलेल्या मैत्रीत त्या feeling मुळे थोडा वेगळाच नुर आला होता. अन तो नुर दोघांनाही नको होता. हेच एकमेव कारण होतं ही मैत्री इथच थांबविण्याच..!!
थोडावेळ असच जाऊन दिल्यावर पुन्हा दोघं normal झाले..!!

"दगड मला तुझ्याकडुन जाता जाता काहीतरी ऐकायचय रे..!! माझ्यासाठी..!!"

"बोल काय ऐकायचय..?"

"परवा तु म्हणाली होतीस ना..!! ".....", I PROUD OF YOU "....."..!! मला पुन्हा ते ऐकायचय..!! म्हणशील माझ्यासाठी पुन्हा..!!"

"I PROUD OF YOU "....."...!! I PROUD OF YOU..!! खुश..!!"

"ते जाउ दे रे दगड..!! मला समजुन घेणारी तु एकमेव आहेस रे..!! तु नसणारेस रे..!! कोण समजुन घेणार तुझ्या "......"ला..?"

"काळजी करु नकोस..!! "....", तुला समजुन घेणारीच बायको मिळेल तुला..!! अन नाही मिळाली तर तु घे तिला समजवुन..!! तुझी toyoto camry घे..!!"

"camry s8 घेऊन काय करु..? अन कुणाला बसवु ..!! तु नसणारेस ना माझी camry s8 पाहायला..!!"

"अरे नालायका..!! तुझ्या बायकोला बसव ना पुढे..!! अन camry फक्त तुला आवडते..!! आम्हाला दुसरी कुठली car आवडत असेल तर..?"

"अरे दगड..? तुला दुसरी कार आवडते तर..!! दुसरी चारही घेतली असती ना..!! जाऊ दे..!! ह्म्म..!! जाऊ दे झिंदाबाद..!! अरे म्हटलं होतं ना तु काय माझी आयुष्यभराची मैत्रीण राहणार नाहीस..!! अन त्यावर मी एक छानशी युक्तीही काढली होती..!! तुच सांग माझ्या मुलीला कोण सांगणार की तिचं नाव मी "..........." का ठेवलयस ते..? आत मला आयुस्।यावर बोलु काही कधीच नाही बघायला भेटणार..!!"

"हे ही तुच सांगायला हवसं ना..? अन तु तुझ्या बायकोबरोबर बघ आयुष्यावर बोलु काही..!!"

"चल दगड..!! आता ठेवतो फोन..!! घरी पोहोचलो मी..!! I`LL MISS YOU..!!"

"I`LL TOO MISS YOU..!!"

"Goodbye "......" 123...!1"

"goodbye "...." कायम सुखात रहा..!! I`LL TOO MISS YOU... "....."..!! "

एव्हढचं बोलुन दोघांचा तो शेवटचा संवाद संपला. पण अजुनही त्याच्या मनाचं काही समधान होतं नव्हतं...!! ,म्हणुनच थोड्यावेळाने त्याचा एक sms तिच्या mobile च्या inbox मध्ये येऊन थडकला.

"one request..!!! last..!! आज आपण शेवटच बोललो.. आज जो पर्यंत दोघांना झोप येत नाही तोपर्यंत एकमेंकाना sms करायचे..!! परत कधीच नाही..!! plz reply yes or no..!!"

"sorry I am sleeping. good night "....." take care. सुखी रहा ...!! GOOD BYE.."

"OK PLZ... झोपु नकोस.. message me.. आज रात्री हे आपले शेवटचे message असतील रे... I know दगड तुला किती त्रास होतोय पण plz... plz रे plz.. "......." झोपु नकोस message कर I am waiting.. plz.. D last messages for our whole life.. plz do reply..!!"

"काय करु message..?"

"thanks you`ve not sleep..!! या आधी कधीच नाही विचारलसं की काय message करु..? जे बोलता आलं नाही ते काहिही message कर.. thanks..!! "

"मी मला जे बोलायचय ते सगळं बोललिये..!!"

"दगड.. तुला माझ्यावर विश्वास नाही का मी जाणार नाही म्हणुन..!! मी खरच चाललोय..!! D last word dat I heard from you I`ll TOO MISS YOU"

"हो तु चाललायस I know..!"

"तुला त्रास होत असेल तर ठीक आहे रे नको करुस message..!!"

"GOOD NIGHT "....." Take care. सुखी रहा सदैव. तुझी सगळी स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न कर. GOOD BYE."

"My last message to you..
sorry "....." तुझ्या आयुष्यात राहु शकत नाही.. अन त्याच्या आयुष्यात तुझ्याशिवाय कुणीच नाही राहु शकत. तो तुझा TRUE FRIEND आहे अन कायम असेन..!! काळजी घे..!! तुझा आदि.. तुला नक्की मिळेल..
I NEED YOU ...
I MISS YOU..
N..
I .... U..
तुझाच ".....""

एव्हढं सगळं होऊन त्यानं तिच व्यक्त होणं अजुन काही सोडलं नव्हतं.. अगदी त्याचा शेवटचा message ही हेच सांगत होता.अण तिला हे सारं कळण्या पलिकडचं होतं. काही गोष्टी न संगताच समोरच्याला कळाव्यात हा हट्ट करणारी त्याची मैत्रीण एव्हढं मात्र समजुन घ्यायला विसरली. तो तिच्या सर्‍याच व्यक्त न झालेल्या गोष्टी समजुन घेत होता. अगदी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत..!!
आता पुन्हा दोघ कधीच एकमेंकाना भेटणार नव्हते.उद्यापासुन कोणीच कोणाला sms करणार नव्हतं की फोन..!! सारं काही बंद होणार होतं...!! तिच्या अश्रुंमागची हजारों कारणे शोधताना ती मात्र त्याच्या डोळ्यात कितीतरी अश्रु देऊन गेली. आज त्या रुक्ष चेहर्‍यावर कुठलाच आनंद दिसत नाही पण त्या गहिर्‍या डोळ्यातलं दर्द आजही कोणाला जाणवत नाही. जाताना तो तिला आपला तो असामान्य अन अतुट attitude देऊन गेला होता, खरंतर तो कायमच तिच्या बरोबर असणार होता त्यानंच दिलेल्या कृष्णाच्या रुपातुन तो कायमच तिच्याबरोबर असणार होता. गोष्ट इथच संपली नव्हती. अजुन खुप काही बाकी होतं. आता खरी त्याच्या त्या अफलातुन attitude ची परिक्षा होती. ती १५ जानेवारी रोजी तिची कंपनी join करणार होती. त्याच्याआधी त्याला नौकरी मिळवायची होती. त्याची job ची शोधमोहीम चालुच होती. पन तो फारच खचला होता. आपल्या true boyfriend च्या आधाराने तो कसाबसा सावरत होता. पण अजुनही तो खराब attitude तसाच होता. ९ जानेवारी २०१०..!! सकाळ पेपर मधे त्याने एका Engeneering college ची lecturer च्या post ची add पाहिले अन लगेचच तिथं apply केलं. walk in interviews होते. लगेच १० जानेवारीला त्याचा interview ही झाला. ३०-३५ जणाम्च्या गर्दीतही तो खुपच उठुन दिसत होता. व्यवस्थित केलेलं presentation अन जबरदस्त confidence च्या जोरावर समोरुन येणार्‍या प्रत्येक bouncer ला boundary पार पिटाळुन लावत होता. अर्ध्या तासाच्या interview नंतर त्याच्म selection final झाल्म होतं. १५ जानेवारी पासुन joining होतं. अन तिचंही joining 15 पासुनच..!! त्यानं त्याचा तिला दिलेला पहिला शब्द पाळला होता. ती join व्ह्यायच्या आधी १० दिवसाच्या आत त्याच्याकडे job होता. salary ही व्यवस्थीत होती अगदी जवळपास तिच्याइतकीच..!! त्याच्या सार्‍या मित्रांना खरंतरं त्याच्यासाठी हेच field योग्य वाटत होतं. पण त्यानं हे field एक challenge म्हणुन स्विकारल होतं. Industry तला rejected माल म्हणुन हिणवलेल्या क्षेत्रात तो स्वताच्याच style ने एक वेगळ अस्तित्व निर्माण करू पाहत होता. join केल्या नंतर त्याला पहिला subject शिकवायला मिळाला तो engineering mechanics..!! प्रत्येक engineering students चा कर्दनकाळ..!! पण हेही आव्हान त्याने लीलला पेलले..!! दोन divisions ला तो चान आपल्या वेगळ्याच style ने शिकवु लागला. अल्पावधीतच "बुलेटवाले सर" पुर्ण कॉलेजमधे famous झाले. first year च्या दोन divisions अन third year mechanical ची एक divisions अशा एकुण १८० टारगट पोरांना तो शिकवु लागला..!! त्या थोड्याश्या वेळातच त्यानं बरोबरच्या सहकार्‍यांसहित आपल्या विद्यार्थांनाही आपले भक्त बनवुन टाकले..!! पण आतल्या आत एक बोच अजुनही सलत होती. कधीतरी ती बोच अनावर झाली की तो आपल्या true boyfriend बरोबर तासंतास गप्पा मारायचा. याच दरम्यान तिच joining postpone झालं होतं.
आठ फेब्रुवरी तिचा job वर पहिला दिवस..!!
७ फेब्रुवरी त्याला फारच कसंनुसं होत होतं..!! त्याच्या एकुलत्या एक मैत्रीणीच्या आयुष्यातला एक खुप महत्वाचा क्षण उद्या येणार होता अन तो तिथं नसणार होता. त्याला खुपच वाईट वाटत होतं..!! त्याला त्याच्या company त join होतानाच दिवस आठवत होता. तिनं त्याच्यापाशी केलेला लाडिक हट्ट..!! सारकाही कालपरवा घडल्या सारखं जाणवत होतं. शेवटी न रहावुन आपल्या true boyfriend च्या विनंतेवरुन त्यानं तिला फोन लावला..!! पण तिनं फोन उचलला नाही..!! दोन तीन रिंग नंतर तिनं फोन उचलला..!! पण तिची तब्येत बरी नसल्याने फारस बोलणं झालच नाही..!! त्याला मात्र खुपच वाईट वाटत होतं. एव्हढ्यासगळ्यात काहीतरी राहुन गेल्याचं त्याला वाटत होतं..!! उगीच न केलेल्या चुकीची शिक्षा तो भोगत होता. बरेच दिवस झाले होते आता त्या गोष्टीला. एक दिवस असच त्याला तिची आठवण अनावर झाली होती. तिच्यासठी असे मित्र्-मैत्रीणी जवल येणं अन दुर जाणं हे नवीन नव्हतं पण त्याच्यासाठी हे सारच नवेन होतं. शेवटी त्याच्या true friend ने त्याची होणारी तडफड पाहुन त्याला तिला एकदा शेवटचं भेटण्याचा सल्ला दिला. पण तो ते ऐकायला तयार नव्हता..!! काहीही झालं तरी मी तिला पुन्हा भेटणार नाही. असचं त्याचं म्हणणं होतं..!!! शेवटी कसबसं त्यानं त्याचं म्हणन ऐकलं अन तिला पुन्हा फोन लावला. पण यावेळेस तिनं

"I am busy ..!! tomarrow i have a presentation in company you can call me if you are not going to take my much time"

असा जालीम sms करत त्याच्या जखमेवर आणखीणच मीठ चोळलं..!! त्याची तडफड अनुभवायल त्याचा true boyfriend तिथच होती. त्याची ती अवस्था पाहुन त्या true boyfriend चे डोळेही पाणावले..!! अजुन काय करायला हवं होतं त्यानं आपली मैत्री निभावयला..!! तिला भेटुन खरंतरं त्याला जाब विचारायचा होता. त्याच्या इतक्या निखल मैत्रीला बट्टा लागेल अस्म तो काहीच वागला नव्हता. पण आता ती त्या मैत्रीच्या पावित्र्याला धक्का लागेल असच वागत होती. स्वता त्या मैत्रीत वाईटपणा घेत होती फक्त आपल्या मित्रन आपल्याला विसरुन जावं म्हणुन..!! पण हे कदापी शक्य नव्हतं..!! अन हे सर्व त्याला कळत होतं..!! अन म्हणुनच त्यानं फोन झाल्यझाल्या तिला लगेच sms पाठवला.

""......." can only hurt you..!! sorry..!! "........"ला तु स्वतासाठी वाईट बनवतेस हे त्याला कळणार नाही असं वाटतं का? "......." कधीच वाईट नाही होऊ शकत..!! HE IS YOUR TRUE FRIEND !! कृष्णाला तु कधीच वाईट नाही करु शकत..!! ह्म्म माझा attitude..!! चल आता डोळे पुस..!! मनातले अश्रु कळतात तुझ्या कृष्णाला..! don`t worry.. मी कधीच वाईट नाही होणार..?"
तीही त्याच्या या sms पुढे हतबल झली होती. शेवटी तिनं आपल्या त्या common friend चा सल्ला घेत त्याला भेटण्याचा निर्णय घेतला. ६ मार्च शनिवार..!! तिचा सुट्टीचा दिवस..!! त्यामुळे तिच्या सोयीने तो निवडला..!! अन त्याला आदल्यादिवशी रात्री साडे नऊ वाजता कलवलं..!! पोरींना सगलं कस आपल्या सोयीनुसार लागतं..!! त्याला दुसर्‍यादिवशी पहिलच् lecture होतं..!! त्यानं कसबस आपल्या भक्तांकरवी adjust करत आपल्या true boyfriend ला बरोबर घेत तिनं बोलावलेलं ठीकन गाठलं. ती यायच्या अधीच अर्धातास ते त्या hotel च्य्या बाहेर घुटमळत होते. बराचवेळ वाट पाहिल्यानंतर शेवटी एकदाची ती आली तब्बल तीन महिन्यानंतर ते दोघं भेटत होते. कितीतरी गोष्ट खरंतर एकमेंकाना सांगण्यासारख्या होत्या. पण संवादाची सुरुवातच भलत्या मुद्द्याने झाली. "MECHANICAL ENGINEERS" च्या most eligible batchelor वरुन दोघांत चंगलीच जुंपली होती. तस्सं आल्याआल्या त्यानं तिच्या आईच्या तब्येतीची चौकशीही केली होती. अन ती करतानाच "काय मग..? घरच्यांनी स्थळं शोधायला सुरुवात केली का नाही..?" असा टोमणा मारला.

"नाही अजुन. जुन नंतर सांगितलय मी..!!"

"पप्पांना सांग माझ्यासाठी Mechanical Engineer च बघा..!!"

"Mechanical Engineer..? noways..? त्यांना मुलींशी कसं वागवं कळत नाही..!! त्यांना फक्त त्यांच्या मशिन्सच बर्‍या वाटतात..!! त्यांना काय कुणाच्या भावना कळणार..!! सगळेच hopeless असतात..!! goto hell with that mechanical engineers..!! बघेन एखादा PG झालेला नाहीतर कुणी MBA झालेला..!! पण mechanical engineer नाही..!!".

तिचा तो attitude पाहुन त्याला मात्र गुदगुल्या केल्यासारखच झालं होतं. पण त्याला फक्त तिला हेच दाखवायचं होतं की काहीही झालं तरी त्याचा attitude कोणीच beat करु शकणार नव्हतं. प्रत्यक्षात त्याच्या बाप्पालही ते जमलं नव्हतं, तिथं तिची काय गोष्ट होती. अन हेच तिला जाणवुन देण्यासाठी तो फटकन तिला बोलुन गेला.

"कोणाला दाखवतेस हा attitude...? मला..!! ज्याच्याकडे हा attitude सोडुन काहीच नाही त्याला..? ज्यानं तुझी ती चौकट तोड्ली त्याला..? नाही जमणार तुला मला attitude दाखवायला. चिल्लर आहे तुझा attitude माझ्यासमोर चिल्लर..!! दुसर्‍या कुणाल तरी दाखवायचा तो attitude ..!! मला नाही दगड..!! अन हो मी काहीही करु शकतो..!!! मी आज कुठे आहे ते कदाचित तुला कधीच क़ळणार नाही..!! मी कुठेही जाऊ शकतो अन कुणालाही समजावुन घेऊ शकतो..!!"

त्याच्या त्या बोलण्याने खरतर आक्रमक पावित्र्याने ती थोडीशी नरमलीच होती.पण तिला त्याचा तो attitude पाहुन खुप छान वाटत होतं. कदाचित मैत्रीतले जुने दिवस आठवले असावेत म्हणुन. पण उगीच विरोधाला विरोध करायचा म्हणुन ती बोललीच.

"बोट खाली करुन बोलायचं..!! अन माझा attitude तुझ्यासमोर चिल्लर असेल..!! पण मी नाही..!! ok..!! अन तु काहीही करु शकतोस..!! yes I agree..!! पण तु कुणालाहे समजावुन घेऊ शकतो..? नाही तुला नाही जमणार ते..!! कधीच नाही..!!"

""दगड काय बोलायचे ते बोल..!! आज मी फक्त ऐकायला आलोय..!! मी जेव्हा जाईन ना तेव्हा माझंच बोलण final असेल..!!"

"तुझं बोलणं..!! नाही..!! बोल तर..!! मी..!! मी बोलायला लागले ना..!! तु बोल तुला काय बोलायचय ते..!! मी नंतर बोलेन..!! "

"ह्म्म..!! ठीक आहे..!! मीच बोलतो..!! पण मी बोलल्या नंतर तु बोलण्यासारखं काहीच नाही उरणार..!! पण ठीक आहे मीच बोलतो..!! तु नाहीच बोलणार काही..!! महितिय मला..!! काय चुकलं रे माझं..? फक्त मी ९६ कुळी नाही म्हणुन मला तुझ्यापासुन दुर जावं लागलं..!! इतकं महत्वाचं होतं..!! "......"च ९६ कुळी असणं..? मैत्री करायच्या आधीच विचारायचं होतं ना हे मग..!! एकतर मी तुला माझ्या आयुष्यात येऊ देत नव्हतो..!! पण नाही तुलाच किडा..!! माझ्या आयुष्यात अक्षरशः तु घुसखोरी केलीस..!! आठवतोय तो दिवस ७ ऐप्रिल ०८..!! तु माझ्या आयुष्यात येऊ नयेस म्हणुन किती वाईट वागलो होतो मी तुझ्याशी..!! किती त्रास झाला होता त्या दिवशी मला..!! त्या junior च्याच प्रकरणानंतर मी सुधारलो होतो..!! पण नाही मोठा हक्क गाजवत आलीस माझ्या आयुष्यात मला सुधरवण्यासाठी..!! काय सुधरवलसं मला..? मी आजवर म्हणत होतो न की I can only hurt you..!1 पण ऐक..!! you can only hurt people..!! तु फक्त एखाद्याला त्रास देऊ शकतेस..!!"

"मी त्रास दिला..? मी..? बरं दिला मग...?"

"दगड इथं माझ्या डोळ्यात डोळे घालुन बोलं..!! आजवर इतकी नजर चुकवलीस माझ्यापासुन..!! अन तु मला आजवर खुप त्रास दिलायस खुप..!! तुझ्या सगळ्या चुका मी माफ केल्या असत्या रे..!! पण शेवटी आपण जेव्हा बोलत होती ना तेव्हा तु काय म्हणाली होतीस..? "तुझी लायकी नाही..!! तुझा true friend म्हणजे boyfriend च होता. तुला कृष्णा कधीच नाही समजणार..!!" दगड ठीक आहे नाही माझी लायकी..!! कारण नाही मी ९६ कुळी..!! हेही मान्य मला..!! ह्या चुकीसाठीही मी तुला माफ केलं..!! तु तुझ्या "......"ला आज वाईट बनवतेस..!! फक्त त्याला विसरता यावं म्हणुन..!! हे ही मी माफ केलं..!! पण तु म्हणालीस "तुझा true friend boyfriend च होता..!!" हे मी कसं विसरु..? तु मला पुर्णपणे ओळखतेस..!! अन तरीही तु असं म्हणावसं..!! मला तुझ्या दोन कानाखाली पेटवाव्याश्या वाटतायत..!! मला मैत्री नाही कळली..? अरे ज्याच्या कुणीच मुलगी नाही त्याच्याकडुन अजुन काय अपेक्षित होतं रे तुला..? बोल ना..? काय चुकलं माझं..!! मी माझ्या मैत्रीणीला जे वाटतं तेच बोललो..!! दगड लई लक्कीस रे लई लक्कीस तु..!! तुझ्याकडे "++++++++" अन माझ्यासारखे दोन मित्र होते. खुप काहे केलय आम्ही दोघांनी तुझ्यासठी..!! का इतकी जीव लावलास रे मला..? त्याचं एक ठीकाय रे तो तुझा class-mate होता..!! पण माझा काय संबंध होता..!! कोण होतो मी ..? कॉलेजचं एक hopeless कार्टं..!! कधी अपेक्षाही केली नव्हती तुझ्यासारखी इतका जीव लावणरी मैत्रीण माझ्या आयुष्यात येईल..!! पण तु आलीस अन माझ्या सगळ्या commitments धुळीस मिळवल्या..!! मी एक शब्दानेही काही नाही बोललो तुला..!! तुझं ते नाजुक मन मला खुपच आपलसं वाटलं.. अगदी माझ्यासारखं..!! अन मी तुझ्या जवळ येण्याचं फक्त एकच कारण होतं रे..!! खरतरं आजचा दिवस कधीतरी येणार हे मला खुप आधीपासुन माहिती होतं..!! ४ ऑगस्ट २००९ लाच..!! मी काहीतरी ठरवलं होतं..!! अन एक दिवस मी माझ्या मैत्रीचं तुला अस्म explaination देतं असेल हेही माहित होतं..!! ४ ऑगस्ट ला जर तुझे ते दोन blank message मला आलेच नसते तर आज हे सारं घडलं नसतं रे..!! आज जे काही घदलं ते सारं तुझ्या त्या दोन blank message मुळे..!! ज्या दिवशी तुझे ते message आले ना त्याच्या दुसर्‍या दिवशी मी माझे pramotion चे documents घ्यायला मुंबईला जाणार होतो. त्या रात्री मला झोपच नाही आली रे..!! सतत वाटत होतं रे तुझ्यासाठी काहीतरी करावं..!! तुझा एकुलता एक मित्र इथं असताना तु blank का व्हावस..!! मला माझ्या मैत्रीची हार वाटली ती..!! अन मी बस्सं ठरवलं..!! तुझ्या त्या चौकटीच्या आत शिरायचं..!! तुझी ती चौकट तोडायाची..!! मला नाही वागता येत तुझ्या इतर मित्रांन सारखं वागायला..!! खोटी खोटी सांत्वना द्यायला..!! खरंतरं तुला ती सांत्वनेची भीक नकोच होती. तु कंटाळली होतीस त्या नकोश्या सल्ल्यांना..!! interview tips ना..!! अन त्या चांगल्या मार्कांच्या ओझ्याला..!!! म्हणुन मी हे सारं केलं..!! अन तु म्हणतेस तुझा true friend boyfriend च होता..!! तु अक्षरशा तुला हवा तसा तुझा true friend घडवलास..!! अक्षरशा तुला हवं तसं नाचवलस रे तुझ्या तालावर..!! अन मीही नाचलो..!! कारण तुझ्याकडे माझ्यासारखे खुप मित्र आहेत पन माझ्याकडे फक्त तु होतीस..!! मग काय बिघडलं रे मी असं केलं तर..? अन तुला गरज असेपर्यंत मी तुझ्याजवळ होतो..!! माझ्या त्या बदलत्या वागण्याचं हेच रहस्य होतं..!! "

""....", इतका जीव लावतोस मला..!! मग का नाही कधीच बोललास..?"

"दगड आपल्या माणसाला सांगावं लगतं कारे की माझा तुझ्यावर किती जीव आहे ते..?"

"Good..!! "....", सुधारलास तु..!! तुला कुणाच्या बोलण्याने तरी फरक पडतो..!! तु दुसर्‍यांचाही
विचार करायला लागलायसं..!! तु सुधारलास..!!"

"दगड..!! मी बिघडलोच कधी होतो रे..? नालायक..!! ह्या प्रकरणातुन सावरण्यासाठी कय काय नाही केलं..!! ह्याला विचार..!! दिवसातले चार चार तास माझं रडगाणं ऐकलय त्यानं..!! कुठल्याही तक्रारीविना..!! त्याचा job करुन..!! माझा दिवस सकाळी ७ ला सुरु होतो अन रात्री ११ ला संपतो..!! फक्त तुझ्या आठवणी पासुन दुर राहत यावं म्हणुन..!! पण अजुनही ते नाही जमलं मला..!! अन कय रे दगड मला तुझी इतकी आठवण यायची ..!! तुला नाहे का रे कधी माझी आठवण आली..? कधी विचारावासं वाटलं की "......" काय करतो..? कुठे..? कसाय..? जिंवत आहे का.. मेलाय ते..?"

"आठवण यायला आधी विसरावं लागतं ".....", अन तु कसा आहेस हे मला दुसर्‍या कुणाला काय विचारायची गरज..? तुच तर म्हणाला होतास ना..!! त्या कृष्णाच्या रुपात मी स्वताचं रुपच दिलय तुला म्हणुन..!!! मग तु असताना मी का म्हणुन दुसर्‍या कुणाला तुझ्याबद्दल विचारु..!!".

बस्सं अजुन काय ऐकायचं बाकी होतं. इतकावेळ कारुण्याच्या अश्रुत डुंबलेल्या त्याच्या डोळ्यात अचानक एक तेज झळाळुन आलं. जीवन सार्थकी झाल्यासारखच वाटलं त्याला.

"दगड अजुन विचारु एक..? खुप त्रास होईल तुला पण तरिही विचारणारच..!!"

"विचार..!!"

"तुला कधीपासुन मी तुझा more than true friend आहे असं वाट्त होतं..?"

"तु जेव्हा पुणं सोडुन त्या हैद्राबदच्या कंपनीत जाणार होता ना..!! तेव्हा मला वाटलं की तु काहीतरी वेगळाच आहे माझ्या आयुष्यात..!! माझ्या बाकी मित्रांपेक्षा एकदम वेगळाच वाटलास तेव्हा तु मला..!"

"की त्या आधीपासुन अस वाटत होतं..?"

"आईशप्पथ..!! तेव्हापासुनच तुझ्याबद्दल तसं वाटायलं लागलं..!!"

"मला नाही असं वाटत..!! तु खोटं बोलतेस..!! त्याही आधीपासुनच तुला असं वाटत होतं..!! "

"".....", मुर्खा..!! मी माझ्या आईची खोटी शप्पथ कधीच नाही खाणार..!!"

तिला ते सहनच झालं नाही. खुपच त्रास व्हायला लागला. धाप लागली..!! अन डोळ्यातुन अश्रु आपोआप पडु लगले. तो मात्र उपहासाने तिच्याकडे पाहत पुटपुटला

"बरं वाटलं तुला रडताना बघुन..!! मघापासुन मी एकटाच रडत होतो..!! आता तुही रड..!!"

खरंतर असं करण्यमागे त्याचं फक्त एकच कारण होतं. त्याला झालेल्या त्रासाची एक छोटीशी झलकच त्यानं तिला दाखवली होती. बराच दोघांच्या गप्पा सुरु होत्या त्याचा true friend ही त्या गप्पा ऐकत होता. त्यांच बोलणं ऐकता ऐकता त्यानं त्याच्या mobile च्या screen वर अनावधाने काहीतरी type केलं.

"TRUE FRIEND = TRUE FRIEND BUT NOT CONVIENCE..!!"

त्यानं हळुच ते type केलेल वाक्य दोघांनाही दाखवलं. अन आजच्या भेटीचं conclusion भेट संपण्या आधीच करुन टाकलं. ती ओळ दोघांनाही पटली होती. दोघांचीही true friend ची definition एकच होती पण एकच गोष्ट दोघंही वेगवेगळ्या चष्म्यातुन पाहत होते. त्या true boyfriend ने मग
तिला "आमचा "....." आता professor झालाय..!!" म्हणुन सांगुन टाकलं. ती ते ऐकुन एकदम आवकच झाली. एका क्षणासाठी तिला magazine चा तो extra attitude वाला leader च आठवला. तो पोरांना कसं शिकवत असेल ह्याची कल्पनाच करुन तिला हसु यायला लागलं.

"तु अन lecture ship..?? बात कुछ हजम नही हुई..!! आयला lecture bunk करणारे lecture घेतायत..!!"

"ऐ दगड....!! मी काय पण आमच्या B.E. MECH च्या बॅचचा रेकॉर्ड आहे..!! आजही aatendence book जाऊन करु शकतेस कॉलेजमधे..!! मी कधीच defaulter मधे नव्हतो..!! अन lectiureship च म्हणशील तर एकदा माझ्या classroom मधे येऊन बस्स अन मग बोल..!! माझ्या mechanics च्या lecture ला attendence 90% असते..!! कुठलही compulsion न करता..!! इतकाही वाईट नाही शिकवत मी..!!"

"तस्सं नाही रे "....", पण तु ना यार..!! तुला नाही suit होत हा job तुला..!! तुला काहितरी वेगळं करायचय..!! जास्तवेळ नको राहु या field मधे..!! हा job वाईट आहे असं नाही रे..!! पण आत्ता नको..!!"

"I know "........", मीही प्रयत्न करतोय रे दुसरा job मिळवण्याचा ..!! अन तो मला लवकरच मिळेल..!! बघ मिळतोच की नाही..!! स्वताच्या हिमंतीवर..!!"

"मिळेल तुला..!!"

आता जेवणही उरकत आलं होतं. बराचवेळ जवळजवळ तीन तास ते तिघही एकाच टेबलवर बसुन होते. दोघही एकमेंकाना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा देत होते.

"दगड तु mechanical engineer च बघ तुझ्यासाठी खुप सुखात राहशील..!!"

"बघु रे "......", खुप वेळ आहे अजुन त्याला..!! अन मी तुला असच म्हटलं होतं रे मघाशी..!! अरे जिजुंना कळलं तर ते ते लगेचच त्यांच्या मित्रात शोधाशोध सुरु करतील. एकदोनदा त्यांनी विचारलंही होतं त्यांनी मला..!! म्हणुन मी घरच्यांना तसं काही सांगितलं नाही पन कुणी आलाच एखादा चांगला mechanical engineer तर नक्कीच विचार करेन त्याबद्दल..!!"

आता निघायची वेळ जवळ आली होती. आजही त्या हॉटेलच्या व्हरांड्यात ते बराचवेळ बोलत बसले होते.

"दगड..!! तुझी perfect match ....!! बनता बनता राहिली..!! का माहितीऐ..? कारण त्याला असं वाटतं की त्याच्याशिवाय या जगात कुणीच perfect असु नये..!! पण असु देत..!! कायम सुखात रहा..!! "

असंच म्हणत त्यानं तिच्या डोक्यावर हलकेच हात ठेवला. तिला त्याचा तो उबदार स्पर्श मात्र तिच्या पप्पांची आठवण आली असावी. तिनं आपले डोळे मिटुन घेतले अन आपल्या या कृष्णाची मनोमन माफीच मागत होती. तो तिच्याकडे तिच्या पप्पांना एकदातरी भेटायचा हट्ट करत होता, अन ती तिला हे कधीच शक्य नाही होणार असच पटवुन देत होती. अन तो तिला मात्र आपला I`ll make it happen वाला attitude दाखवत होता.

"दगड आता जायची वेळ आली..!! आता पुन्हा कधीच आपली भेट नाही होणार रे..!! खुप वाईट वाटतयं..!! जाताना माझ्यासाठी पुन्हा एकदा म्हणशील I PROUD OF YOU..!!"

"I PROUD OF YOU "....." I PROUD OF YOU... मनापासुन..!! अन हस आता..!! असा रडत रडत निरोप देणारेस का मला..!! "

"दगड माझी callertune एकदम perfect आहे रे..!! तुने जो ना कहा मै वो सुनता रहा..!! फक्त सुनता रहा नही..!! मै वो करता रहा..!! तुला जे जे वाटलं ते ते मी जगलो रे..!! दगड मी तुला इतकं छान गिफ्ट दिलय..!! मला नाही काही गिफ्ट देणार तु..!!"

"तुला काय गिफ्ट द्यायचं "....."..? तुला गिफ्ट द्यायची काही गरज आहे..!!"

एक दहाची नोट तिच्यापुढे करत त्याने तिला या नोटवर तिला जे त्याच्याबद्दल वाटतं ते लिहायला लावलं.
तिनंही ती नोट पटकन घेत त्यावर लिहिलं..!!

""....." be happy always..!! m proud of you..!!"

ती नोट त्याने थोडावेळ तशीच तिच्या हातात राहुन दिली. आपल्या त्या true boyfriend च visiting card घेत त्यानं त्यावर आपली सही करत तिला म्हटलं..!!

"उद्या मी कोणी मोठा कवी लेखक झालो..!! अन मला कुणेतरी विचारलं..!! पहिला autograph कुणाला दिला तर तो मी तुला दिला म्हणुन सांगेन..!! जपुन ठेव माझी सही..!!"

तिनंही मान डोलावत ते card आपल्या perse मधे ठेवलं. त्याला अजुनही तिच्याशी खुप वेळ बोलायचं होतं. पण निरोप घेणं तर गरजेच होतं. तिच्या चेहर्‍यावर जाताना मात्र खुप समाधान होतं. तिच्या त्या expressive चेहर्‍यावर खुपच उठुन दिसत होतं. त्याचा पाय काहीकेल्या तिथुन निघतच नव्हता.

"दगड तुला माहितीए..!! आजवर मला कुणाच्याच बोलण्याचा फरक नाही पडला..!! बाकींच्याच्या कुठल्याच comments/ certificates चा मला काहीच फरक नाही पडला. पण तु मला एक certificte दिलं..!! माझं आयुष्यच बदलुन गेलं रे त्या certificate मुळे..!! मला तुझा कृष्णा म्हणालीस..!! बस्सं...!! मला आणखी काय हवं होतं..!! बस्स..!! जाता जाता एक विनंती आहे..!! ती कृष्णाची जागा कोणालाच देऊ नकोस..!! नाही देणार ना..? एखाद्या मुलीच्या आयुष्यातला कृष्णा होणं ही खुप मोठी गोष्ट असते रे..!! अन माझं भाग्य की मी तुझ्या आयुष्यातला कृष्णा झालो..!! खुप खुप उपकार आहेत तुझे माझ्यावर..!! "

"हो आहेस तु माझा कृष्णा..!! अन कायम राहशील..!! आता डोळे पुस..!! Goodbye "....", take care..नेहमी सुखात रहा..!! तुझी सगळी स्वप्न पुर्ण करं..! मी कुठेही असले ना तरी तुझ्यासाठी नक्की प्रार्थना करेन..!! हस आता..!! Good bye..!!"

तिचं ते वाक्य त्याच्या कानावर पडत होतं पण त्याच्या सगळ्याच संवेदना हरवल्या होत्य. ती तिच्यापासुन दुर गेल्याचही त्याला जाणवलं नाही. त्याची तिला होस्टेलपर्यंत सोडण्याची विनंतीही तिनं फेटाळली होती. त्याला मात्र ते अश्रु आता त्या RAY-BAN च्या जाड फ्रेम मागेही लपविता येत नव्हते. बराचवेळ तिथं थांबल्यावर त्याच्या त्या true boyfriend ने त्याची समजुत काढली अन दोघही पुन्हा त्यांच्या अड्ड्यावर निघाले. ती hostel वर पोहोचताच त्या कृष्णाच्या मुर्तीकडे झेपावली. अन त्याच्यासमोर मनोसोक्त रडु लागली. तिचं ते हुंदके देत रदणं चालु असतानाच तिनं त्याला message केला.

"".......". I am happy ..!! तु माझ्या आधीच्या दोन मित्रांसारखा नाही गेलास माझ्या life मधुन. तु true friend म्हणुनच गेलास. माझी friendship जिंकली ".....". thanks मला इतकं समजुन घेतलसं. don`t worry my friend now onwards I WILL BE HAPPY FOREVER.. TAKE CARE..!! सुखी रहा. मी जिथे कुठे असेन तिथुन तुझ्या सुखाची प्रार्थना करेन. Goodbye..!! this is my last message to you..!! & now smile..!!"

त्याच्यासाठी आणखी एक certificate..!! पण खरंतरं त्याला या sms च
पहिलं वाक्य ऐकण्यासाठी तिला भेटणं गरजेच वाटत होतं. आज तिनंही ते मान्य केलं होतं. इतकं सगळं होऊन आज ती त्याला म्हणत होती. "तु माझ्या आधीच्या दोन मित्रांसारखा नाही गेलास माझ्या lifeमधुन. तु true friend म्हणुनच गेलास. माझी friendship जिंकली "....."."
त्यानं तिला दिलेला तो अखेरचा शब्दही पाळला होता.
आज तब्बल आठ महिने झाले असतील दोघांची मैत्री थांबुन..!! पण तिची त्याच्या बरोबर चालणारी ती sharing अजुनही चालुच आहे. तो कायम तिच्या आयुष्यात आहे त्या कृष्णाच्या रुपाने सदैव असणार आहे..!!!
ती आज तिच्या त्या software company मधे छान रमली आहे. अन तो..!!
त्यानं ही आता lectureship सोडली आहे. आपल्या त्या I`ll make it hapen attitude च्या जोरावर कुठल्याश्या एका पुण्यातल्याच कंपनीत आज PROJECT HEAD म्हणुन चांगल्या पगाराची नोकरी करतोय..!! पुणं सोडुन कधीच नाही जाणार म्हणारा आज दिल्ली हैद्राबादच्या वार्‍या अगदी सहज करतोय..!! त्याच्या स्वप्नांचे क्षितीजं आता खुपच विस्तारलियत..!! प्रत्येक स्वप्न काबीज करायचा त्याचा तो जबरदस्त उत्साह आज त्याचा trade mark झालाय..!! आज वयाच्या २४ व्या वर्षी तो एका company त PROJECT HEAD म्हणुन काम पाहतोय..!! २८ व्या वर्षी तो स्वताची toyoto camry s8 नक्की घेणारेय..!! ३० व्या वर्षी त्याची स्वताची HVAC DESIGN CONSULTANCY असणारेय..!! तो त्याची सगळी स्वप्न सत्यात उतरवणार आहे. तो हे सगळं करु शकतोय..!! याचं एकमेव करन म्हणजे त्याची एकुलती एक मैत्रीण आपल्या एकमेव सख्यासाठी नेहमीच त्या इश्वराकडे प्रार्थना करत असते अगदी सच्या मनाने..!! आज तो तिच्या आयुष्यात कायम आहे..!! पण ती नाहीऐ त्याच्या आयुष्यात..!!
सगळ्यांनाच त्या दोघांची कथा म्हणजे एक अधुरी प्रेम कथाच वाटते. पण त्याला माहिती आहे ही पुर्णात्वाकडे गेलेली मैत्रीची कथा आहे. ज्यात आज ती त्याच्या आयुष्यात नाहीऐ..!! पण फक्त थोड्याकाळासाठी..!! त्याची एकुलती एक मैत्रीण त्याच्या आयुष्यात पुन्हा परतणार आहे..! ती येणार आहे...!! आपले बोबडे बोल घेत..!! आपल्या पैंजणाचा अलवार नाद घेत..!! आपल्या बापाला भेटायला..!! त्याच्या मुलीच्या रुपात..!! त्याची ही मैत्रीणही काहीकाळच त्याच्या आयुष्यात राहणार आहे..!! पण या मिळणार्‍या थोड्यावेळातही तो तिला खुप काही देणार आहे..!! आपल्या एकुलत्या एक मैत्रीणीच्या स्वागताची तो वाट पाहतोय..!! ती पुन्हा येणार आहे..!!

समाप्त.....!!

गुलमोहर: 

कथा दिसत नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो..!!
प्रयत्न करतो ...!!
शेवटी आपल्याला हरविणारा / हरविणारी अजुन यायचीय..!!!
कथा सांगण अन ती लिहिणं..!! दोन्ही खुप वेगळ्या गोष्टी आहेत..!!
प्रसिक गोष्ट लई भारी बर का तुमची..!!
पण एक सांगु का..? आपल्या कथेसमोर कधीच टिकणार नाही..!!

ATTITUDE....!!!

mala vatate he tuzi swatchi katha ahe
mala mazya engineering chi athavan zali

same attitude hota maza.. lokani sangitake hote ki serious ho ayushyabaddal

khup Chhan Katha..mazyasathi tari shewat negative but practical hota...Proud Of You!!!