मटणा मटणा नाच रे

Submitted by किरण कुमार on 2 September, 2010 - 05:00

मटणा मटणा नाच रे
तूझी हाडके पाच रे
एक हाडूक रुसल
घशात जाउन बसल
घसा लागला दूखू
आवाज तेतो कूकू
बाजारातून आणला हातोडा
मानेवर नेउन ठोकला
हाडूक बाहेर निघाल
तोडून कुत्र्यांना वाटल
एक कुत्रा चूकला
मागून घरात शिरला
पातेल्यात घातल तोंड
खाउन आली भोंड
काठीने मग बडवला
कोप-यात जाउन रडला

- किरणकुमार

हा हा हा...

किकु आले रे आले.
मला जाम मजा येते किकु आले की Biggrin

सही आहे तुमचे विडंबन. मी पोट भरून हसले. Proud

खाउन आली भोंड >>> म्हणजे काय??? Uhoh

मामी, भोंडल्याला मटणाचे गाणे....हे तूच करु जाणे... Rofl
बाकी,
आली किकुची स्वारी, घेऊन विडंबन भारी. Lol

Happy

.....