अमर,अकबर,अँन्थनी हे तीन मित्र जंगल भटकंतीसाठी निघाले.अमरच्या आईने तिघांसाठी वाटेत खाण्याकरीता लाडू दिले. लाडू खातेवेळी त्याचे तीन समान भाग करून खा अशी स्पष्ट ताकीदही तीने सर्वांना दिली. अमर,अकबर,अँन्थनी जंगल भटकंती करत करत एका झाडाच्या सावलीत थांबले. गप्पा मारता मारता त्यांना झोप लागली.अमरला झोपेतून जाग आली तेव्हा त्याला खूप भूक लागली होती.त्यांने लाडूचा डबा उघडला .डबा उघडतांना त्याला आईचे शब्द आठवले ‘तीन समान भाग करून खा ‘ त्याने डब्यातील लाडवांचे तीन समान भाग केले.आपला वाटा खाऊन टाकला. उरलेले लाडू डब्यात ठेवून तो पुन्हा झोपला.थोड्या वेळांने अकबरला जाग आली तेव्हा त्यालाही खूप भूक लागली होती.त्यांने लाडूचा डबा उघडला .डबा उघडतांना त्याला अमरच्या आईचे शब्द आठवले .त्याने डब्यातील लाडवांचे तीन समान भाग केले.आपला वाटा खाऊन टाकला. उरलेले लाडू डब्यात ठेवून तो पुन्हा झोपला.थोड्या वेळांने अँन्थनीला जाग आली तेव्हा त्यालाही खूप भूक लागली होती.त्याला अमरच्या आईचे शब्द आठवले. त्यानेही डब्यातील लाडवांचे तीन समान भाग केले.आपला वाटा खाऊन टाकला. उरलेले लाडू डब्यात ठेवून तो पुन्हा झोपला.
काही तासांनी तिघांना एकदम जाग आली.सर्वांना खूप भूक लागली होती. अमरच्या आईचे सांगणे त्यांना आठवले.तिघानी डब्यातील लाडवांचे तीन समान भाग केले. आपाआपला वाटा खाऊन त्या सर्वानी लाडू संपवले.
मित्रानो तर सांगा एकूण लाडू किती होते ?
एकूण लाडू किती
Submitted by sunil patkar on 28 August, 2010 - 12:27
गुलमोहर:
शेअर करा
amarchya aaine ekun 27 ladu
amarchya aaine ekun 27 ladu dile hote. Tin saman hisse karun pratyekachya vatyala 9 ladu yetat. Ekane tyache 9 ladu khalle tevha urle 18 punha 6 che tin hisse karun dusaryane 6 ladu khalle ata urale 12. Nantar tighe uthale an 4 pramane 3 hisse karun ladu sample.
तसं नाही रे सुकि , अमरच्या
तसं नाही रे सुकि ,
अमरच्या आईने ३ च लाडु दिले होते , तिघांनी ३ खाल्ले , आणि उठल्यानंतर तिघांनी उरलेला भुगा खाल्ला .
जोक्सअपार्ट कोडं चांगल होतं , अजुन असतील तर पोस्ट कर.
मुळात ८१ लाडू होते. अमर उठला
मुळात ८१ लाडू होते.
अमर उठला आणि त्याने ८१/३=२७ लाडू खाल्ले आणि ५४ लाडू डब्यात ठेवले.
अकबर ने त्या ५४ पैकी ५४/३=१८ लाडू खाल्ले आणि ३६ लाडू परत ठेवले.
अँथनी ने त्या ३६ पैकी ३६/३=१२ लाडू खाल्ले आणि २४ ड्ब्यात परत ठेवले.
तिघे उठल्यावर त्यांनी ते २४ लाडू प्रत्येकी ८ प्रमाणे वाटून खाल्ले.
पध्दतः शेवटी निदान ३ किंवा त्याच्या पटीत लाडू उरले हवेत. पण त्याच बरोबर एका-एकाने खाऊन झाल्या वर डब्यात सम आकडी लाडू उरले पाहिजेत.
मामी, बकासुर म्हणायचे कि काय
मामी, बकासुर म्हणायचे कि काय सगळे ?
नमस्कार सुनील पाटकर हे तुम्ही
नमस्कार सुनील पाटकर
हे तुम्ही विविध कला मध्ये जे कोडं टाकलय त्या ऐवजी इथे जो चालवा डोकं नावाचा ग्रूप आहे तिथे हवे. हा धागा त्या ग्रूप मध्ये हलवायची मी प्रशासकांना विनंती केली आहे. पुढच्या वेळी मात्र कोडी तिकडेच घाला.
- मदत समिती
दिनेशदा,
दिनेशदा,
रूनी पॉटर चालेल
रूनी पॉटर
चालेल
@श्री ......... सहमत
@श्री ......... सहमत