आयशॉटच्या वहीतून - आम्ची सहल !

Submitted by राफा on 30 April, 2008 - 06:14

अहा हा ! एणार एणार म्हणताना सहलीचा दिवस आलाच. आक्शरशा सुवरणाच्या आक्शरानी लिहून ठेवून देण्याचा तो दिवस होता (आमच्या वर्गात सुवरणा चित्रेचे आक्शर सर्वात चांगले आहे).

सकाळच्या मंगल वेळी पक्शी कोकीलकूजन करत होते. मि व अंत्या एकत्र शाळेत पोचलो तेव्हा बसचा पत्ताच नव्हता. साखरदांडे सर नेहमीचसारखे रागीट दिसत होते (त्याना आम्ही उसाचं चिपाड म्हणतो कारण की ते काडीपेल्वान आहेत) . आज ते बसवाल्यांवर अतिचशय चिडले होते. आपल्या देशात वेळापत्रकातल्या वेळेचे महत्व लोकाना नेमी उशिरा कळते. पक्शी घड्याळ न घालताही योग्य वेळी किल्बी लाट करतात मग माणसे तसे का करत नाहीत बरे ? मी अंत्याला हे सांगितल्यावरती तो म्हणाला की घड्याळ घालावयास पक्शांना हात नसतात त्यामुळे त्यांचे घड्याळ अदरुश्य असते. मग शेवटी एकदाचे बसवाले आले.

बसमधे चढताना सरवाना रोमहर्शक वाटत होते. पण तेव्हढ्यामधे गायतोंडेच्या वेणीला कुणीतरी चुंगम चिक्टवण्याचे निन्दनीय क्रुत्त केल्याचे समजताच ती किंचाळली. मग साखरदांडे सरानी तिच्या जवळील एक दोन मुलाना झोडपून शासन केले. बसमधे मजल दरमजल करत अस्ताना आम्ही मुले विरुद्ध मुली अशा गाण्याच्या भेंड्या खेळत होतो. मुलांवर चऊदावी भेंडी चढत असतानाच आम्ही शनिवार वाड्यापाशी पोचलो.

शनिवार वाडा हा आयतीहासिक किल्ला आहे. एका पेशवे आडनावाच्या राजांनी तो बांधला होता. ते घरचे श्रीमंत होते. ही मऊलिक माहिती अंत्याने आम्हाला दिली. अंत्याला आयतीहासिक गोष्टींची खूपच माहिती आहे (साखरदांडे सरांपेक्षाही जास्त).

वाड्यापाशी गुरे, गायी, म्हशी व रेडे इत्यादि पाळीव व उपयुक्त पशू होते. वाड्याची भिंत तीन पुरुष उंच आहे असे उपासने सर म्हणाले. अबब असे म्हणत आम्ही मनाशीच एकावर एक माणसे चढवून दहीहंडी करुन पाहिली तर ती ४ माणसे होवू लागली. कदाचित पुर्वीच्या पुरुषांपेक्शा आत्ताची माणसे बुटकी झाली असावीत. त्यामुळे थोडा गोंधळ उडत आसातानाच गुर नावाच्या एका पाळीव पशूने मला धक्का दिला. त्या धक्क्यातुन सावरल्यावर मी पुन्हा भिंतीचे निरिक्शण करु लागलो.

उपासने सरानीच आम्हाला जिदन्यासा हा एक मोठा गुण आहे हे शिकविले आस्ल्यामुळे मी लगेच ही एव्हढी उंचच उंच भिंत बांधली कशी आसेल आसं विचारलं. तर ते वसकिनी आमच्या अंगावर खेकसले. मग अंत्या हळूच म्हण्ला की एकावर एक उभे राहून तीन मजूरानी ती बांधली असेल तर माईणकर म्हणाला की त्यांनी शिडी वापरली असेल. पण आधी भिंतच नसेल तर शिडी टेकवणार कशावर ? असा प्रशन मला पडला होता तो पडूनच राहिला.

पण ह्या उदाहरणावरून आपल्याला अरवाचीन शिल्पकला किती प्रगतीशिल होती हेच दिसत नाही का ?

आत जाताच उपासने सर आम्हाला भराभर भराभर माहिती देवू लागले. ती काहीच कळत नसल्याने आम्हाला जणू काही त्यांच्या तासाला बसल्यासारखेच वाटले. पूरवी तिथे अरवाचिन बाग तसेच बगीचे वगेरे होते. (त्यावेळीही हरित क्रांति झाली होति काय असा प्रशन मला विचारायचा होता परन्तु सर पुन्हा वसकिनी ओरडावयाच्या भितिने मी मटकी गिळून गप्पच राहिलो) . तिथे एक मोड कळीस आलेले दगडी कारंजेही होते. एके काळी त्यात खालून वर पाणी उडावयाचे. पण आत्ता ते बंद होवुन नादुरुस्त पडले होते. ह्यावरून त्या काळचे पाण्याचे पंपही प्रगतीशिल होते हेच दिसत नाही का ?

इतका विचार करावयाची सवय नसल्याने आम्हाला कडाक्याची भुक लागली. बाजारु खाण्याने प्रक्रुतीवर हानिकारक व खोलवर परिणाम होतात त्यामुळे आम्ही आमचे घरुन आणलेले डबे उघडले व वदनिक वळ घेता म्हटले. जेवताना उपासने सरानी काका मला वाचवाची गोश्ट सांगितली. त्यात हिंसा व खुनाखुनी असल्याने आमची छाती आतिशय धडधडू लागली. पण ती रहस्यमय गोश्ट ऐकुन आमचे न्यान खूपच वाढले.

दरवाजातून त्या काळी पिमटी बस कशी काय आत जात असेल असा प्रशन माईणकरने बाहेर पडताना विचारला. त्यावर साखरदांडे सर काही वेळ हत बुद्ध झाले. मग मात्र त्यानी माईणकरला बुकलायला सुरुवात केली. तेव्हा तो वेड्यासारखा काका मला वाचवा असे ओरडू लागला. मग आम्ही पर्तीच्या प्रवासासाठी बसमधे बसलो.

घरी आलो तेव्हा शेजारचे भिंगार्डे आजोबा आमच्याकडे आले होते. (ते खडूस आहेत. आम्ही त्याना डोमकावळा म्हणतो) त्यानी माज्यावर प्रशनांची सर बत्ती केली. मी आपली आठवून आठवून कशीबशी उत्तरे दिली. त्यावर त्यानी ' शनिवार वाड्यातच गेला होतात ना नक्की ? ' असे विचारले. (ते मला अजिचबात आवडत नाहित)

रात्री झोपल्यावरती मला विचित्र विचित्र अशी स्वपने पडली. एका स्वपनात तर मला वाड्याच्या दरवाजात अडकलेली पिमटी बस दिसत होती व टपावर माईणकर बसला होता. दुसर्या स्वपनामधे साखरदांडे सर भिंतीला टेकविलेल्या शिडीवर बसून चुंगम खात होते.

तर मित्रानो व मैतिरिणीनो , अशी झाली आमची आयतीहासिक वाड्याची रोमहर्शक सहल !

- राफा उरफ आयशॉट - सहावी ड

गुलमोहर: 

खुपच मजा आली, लहानपाणीच्या आठवणींना उजाळा मिळाला.:P

खुपच मजा आली, लहानपाणीच्या आठवणींना उजाळा मिळाला.:P

राहुल फाटक,
लै खास लिहिलेस राजा Rofl

अफलातूनच रे!! आणि गंमत म्हणजे मी शनिवारवाड्या समोरच राहत असल्याने मला ते सगळे खूप जवळचे वाटत होते.
तीन पुरूष भिंत, शिडी , दरवाजा...सगळे... त्यादिवशी घरी जाताना शनिवारवाड्या समोरच उभी राहून एका मित्राला गप्पा मारताना हे सांगितले आणि दोघेही अक्षरशः पोट धरून हसत होतो!!
आणि घरी आई बाबांना सांगितले तर त्यांचीही ह.ह.पु.वा.
असेच तुझे विनोदी लिखाण चालू राहू दे!!:)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...

अरे वा हे कधी लिहिल, मी आजच बघतेय
एकदमच मस्तच लिहिलय आयशॉट Lol

आयशॉट तुमच्या वाडा न्यानदा नाने आम्ही कुत्त्कुत झालो... :d

निबंदाच्या आधी "कृपया हापिसात वाचू नये" अशी सुचना द्यायला हवी होती...

एकदम भन्नाट Rofl

च्या मारी.. राफा.. जबरीच Lol

~~~~~~~~~~~~~~~~~
आलो कुठून कोठे तुडवून पायवाट
काटे सरून गेले उरली फुले मनांत

खुप म्हणजे खुप च मस्त लिहिलंय..
सुवरणा चित्रे, पेशवे आडनावाचा श्रीमंत राजा, मटकी गिळुन, मउलिक माहिती, वदनिक वळ वगैरे वगैरे तर फारच खास Happy

Rofl

गुर नावाच्या एका पाळीव पशूने मला धक्का दिला

असा प्रशन मला पडला होता तो पडूनच राहिला

सर पुन्हा वसकिनी ओरडावयाच्या भितिने मी मटकी गिळून गप्पच राहिलो.....

एक से एक जबरा ओळी आहेत. खूप धमाल आली वाचताना!!!

भारी..........................(positive degree)
लय भारी....................(comparative degree)
लय म्हनजे ....लय म्हनजे......लयच भारी..............(superlative degree)

'शनिवार वाड्यातच गेला होतात ना नक्की?' असे विचारणारे भिंगार्डे आजोबा शेजारी राहात असले तर नुसत्या वर्णनपर कथनातून हास्याचा धबधबा तयार नाही का होणार? दिवाकरांच्या नाट्यछटेनंतर एक वेगळा लेखनप्रकार हाताळण्याचे श्रेय आयशॉटला मिळणार आहे. निबंदाची वही हरवली नाही म्हणजे मिळवली.
बरेच दिवसात निवडक १०त काय नोंदवायचे ते ठरत नव्हते. आता तो प्रश्न सुटला.

दरवाजातून त्या काळी पिमटी बस कशी काय आत जात असेल असा प्रशन माईणकरने बाहेर पडताना विचारला. त्यावर साखरदांडे सर काही वेळ हत बुद्ध झाले. मग मात्र त्यानी माईणकरला बुकलायला सुरुवात केली. तेव्हा तो वेड्यासारखा काका मला वाचवा असे ओरडू लागला. >>>>

लय भरी पठ्ठ्या... Rofl

<<<दरवाजातून त्या काळी पिमटी बस कशी काय आत जात असेल असा प्रशन माईणकरने बाहेर पडताना विचारला. त्यावर साखरदांडे सर काही वेळ हत बुद्ध झाले<<<

खल्लास.... Rofl

काहीच कळत नसल्याने आम्हाला जणू काही त्यांच्या तासाला बसल्यासारखेच वाटले
भिंगार्डे आजोबा, हत बुद्ध साखरदांडे
>>
जबरी Rofl

मी आणि बायको दोघंही हसता हसता एकचदम गडा व बडा लोळलो!!!!! Rofl
माईणकरला बुकल्ला तो सीन तर पुढे मला हर्षवायु झाल्यामुळे लवकर वाचताच आला नाही!! अशक्य हसलोय! Rofl

एक नंबर .. Biggrin
आज आयशॉटची पहिल्यांदाच ओळख झाली..खूपंच भ्हारी ल्हिलाय..एक्दम फ्यान.. Happy
आता घरी जाऊन स ग ल्या ना वाचुन दाकवनार..(वाच्लं कीच माण्सं वाच्तात असं आयकलय.. :फिदी:)

-मुग्धा भिडे

वाचायला उशिराच मिळाले.पण वाचाय ला मिळाले ना.... इतके मस्त..........
<<शनिवार वाड्यातच गेला होतात ना नक्की ?>> ह्सुन ह्सुन पुरेवाट.

Pages