दहा लाखाची लॉटरी

Submitted by अभय आर्वीकर on 27 August, 2010 - 00:13

दहा लाखाची लॉटरी

आज सकाळी ९.१८ मिनिटांनी माझ्या मोबाईलवर, +९२३४२७९३६५१५ या नंबरवरून एक कॉल आला.
मला दहा लाखाची लॉटरी लागली असे सांगण्यात आले.
हिंदीमध्ये बोलत होता. पण बोलण्याची ढब भारतीय हिंदीसारखी वाटत नव्हती.
त्यासाठी मी त्यांना माझे पुर्ण नांव आणि राशनकार्डाचा नंबर सांगावा असा आग्रह होता.
बॅंक अकॉउंट नंबर वगैरे जाणून घेण्यात त्यांना फ़ारसा रस दिसला नाही.
त्यावरून हा प्रकार निव्वळ आर्थिक फ़सवणुकीचा नसून काही अवांतर गौडबंगाल असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मला वाटते.
.
.
. मी दहा लाखाचे काय करू? जे माझ्याजवळ त्यात मी समाधानी आहे असे म्हटल्यावर तिकडून फ़ोन डिस्कनेट करण्यात आला.
.
जाणकारांनी मतप्रदर्शन करावे.

गंगाधर मुटे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नमस्कार मुटे साहेब,
मला अधे मधे असे समस येतात. (फोन आजुनतरी आलेला नाहिये)
मी डिलीट करतो.
ईमेल तर दिवसाआड येतात. दुर्लक्ष करा.
हवं तर पोलिसात एक तक्रार दया.

कदाचित हा identity theft चा प्रकार असू शकेल असे मला वाटते.
त्यामुळे सर्वांना हे कळायलाच हवे.

मुटेजी या नंबरला मी कॉल केला तो लागला. पहिल्या दोन वेळेस डिस्कनेक्ट केला गेला नंतर उचलला

मी : ह्यालो कोण बोलतय?
तो: ज्स्ज(ऐकु आले नाही) ऑफिससे आकाश वर्मा बोल रहा हू
मी : आपके नंबर से मुझे मिस कॉल था
तो : रुको (दुसर्‍याला फोन दिला)
तो२: बोलो
मी : मिस कॉल क्यु दिया
तो२: अरे हमने दिया जिसने दिया उसे करो
मी : आपका नाम क्या है?
तो : रोहीत शर्मा
मी : साले ठीक से ब्याटींग कर... रख अब. (डिस्कनेक्ट)

अहो संपर्काची साधन जसजशी वाढतील तसतसे असले प्रकार वाढणारच. कुठल्याही प्रलोभनाला बळी पडुन आपले कुठलेही डिटेल्स न देणे ईष्ट.

पुर्ण नाव आणि रेशनकार्ड नंबर !!!! हे बोगस रे.का. वाल्यांचं / बांग्लादेशींचं रॅकेट असू शकतं. काही महिन्यांपुर्वी हीच बोगस कार्ड्स पकडण्यासाठी ड्राईव्ह चालू होता. त्यात भरपूर गुन्हेगार मिळाले होते. पण आता अस्तित्वात असलेल्या जेन्युईन कार्डवाल्यांची माहिती घेऊन तस्संच ओरिजिनल दिसणार्रं कार्ड बनवलं गेलं आणि त्याचा गैरवापर केला गेला तर? पकडला जाणार जेन्युईन कार्ड होल्डरच.

मुटे साहेब, तुम्ही कंप्लेंट केली तर पुढे निदान त्या नंबरवाल्या लोकांना आळा बसू शकतो.

<< तुम्ही कंप्लेंट केली तर पुढे निदान त्या नंबरवाल्या लोकांना आळा बसू शकतो.>>

हो ते खरे आहे. पण त्यासाठी शासकिय यंत्रणा गंभिर असायला हवी.
नाहीतर आपले तक्रार नोंदविण्याचे श्रम व्यर्थ जायचे.
शिवाय ते अशाप्रकारची तक्रार नोंदवून घेतील याचीही शाश्वती नाही. Happy

<< पुर्ण नाव आणि रेशनकार्ड नंबर !!!! हे बोगस रे.का. वाल्यांचं / बांग्लादेशींचं रॅकेट असू शकतं. काही महिन्यांपुर्वी हीच बोगस कार्ड्स पकडण्यासाठी ड्राईव्ह चालू होता. त्यात भरपूर गुन्हेगार मिळाले होते. पण आता अस्तित्वात असलेल्या जेन्युईन कार्डवाल्यांची माहिती घेऊन तस्संच ओरिजिनल दिसणार्रं कार्ड बनवलं गेलं आणि त्याचा गैरवापर केला गेला तर? पकडला जाणार जेन्युईन कार्ड होल्डरच.>>

अगदी सहमत.

हो ते खरे आहे. पण त्यासाठी शासकिय यंत्रणा गंभिर असायला हवी.
---- 'अशा प्रकारच्या अनेक तक्रारी येतात, आम्हाला केवळ हेच कामे नाही आहेत.' असे वक्तव्य पचवायच्या तयारीने तक्रार करा. सर्वांनीच सावध, कर्तव्य तत्पर असायला हवे...

जमल्यास मुक्तपीठ सारख्या जास्त वाचल्या जानार्‍या पुरवणीकरता हे पाठवा.. त्यातुन कदाचीत ज्या वाचकांना असे अनुभव आले असतील ते देखील सापडतील.. बर्‍याच जणांना असे अनुभव आले असतील तर पोलीसांत कम्प्लेंट करण सोपं जाइल.. अश्या गोष्टी दुर्लक्षल्या गेल्या नाहीत तर कदाचीत भविष्यात होणार्‍या काही गोष्टी घडण्यापासुन वाचु शकु.. पण कॉलचे डिटेल्स जपुन ठेवा.. आणि शक्य असेल नेमकं काय बोलणं झालं ते देखील आठवुन लिहुन ठेवा..

भारतातले नंबर +९१ ने सुरू होतात ना? मग +९२ कुठला? पाकिस्तान की बांगला देश?? इथल्या लोकांच्या आयडेंटिटीज चोरून इथे येऊन स्थाईक व्हायची गरज दोघांनाही आहे सध्या Happy (on second thoughts, त्यांना हे करायची काय गरज??????? एकदा इथे आले की इथले लोकल नेते त्यांना आवश्यक ती सगळी मदत 'मतांच्या बदल्यात' करतीलच की... )

थोडे दिवस थांबु या..... पोलिस कंप्लेन ऑनलाईन नोंदवता येणार आहे म्हणे.... मुख्यमंत्री उवाच.

मुल्ला ओमार (कंदाहर प्रकरणात ज्याला सोडले गेले) काश्मीरात रोहित शर्मा हे नाव घेऊन रहात होता, आणि त्याने काही परदेशी (अमेरिकन) लोकांना ओलीस ठेवले होते....डिस्कव्हरीवर एकदा पाहिलेली डोक्युमेंटरी..नाट्यरूप.....

माझ्या एका मैत्रीणीला युनायटेड नेशन्स कडून ग्रँट मिळाल्याची इमेल आली होती!

अनोळखी नंबरला आपले नाव न सांगणे गरजेचे आहे. कुणी अनोळखी ये किसका फोन है विचारताच मी विचारतो आपको कौन चाहिये ? मुलांना पण हे शिकवलेच पाहिजे. माहिती काढुन कोण कसा वापर करेल सांगता येत नाही.

>>अनोळखी नंबरला आपले नाव न सांगणे गरजेचे आहे. कुणी अनोळखी ये किसका फोन है विचारताच मी विचारतो आपको कौन चाहिये ? मुलांना पण हे शिकवलेच पाहिजे. माहिती काढुन कोण कसा वापर करेल सांगता येत नाही.>> अनुमोदन
मुटेजी, +९२ हा कोड पाकीस्तानचा आहे.. गुगल सर्च वर पाहीले..

मुटेजी, +९२ हा कोड पाकीस्तानचा आहे.. गुगल सर्च वर पाहीले.. >>>> अरे बापरे. मग गंभीर आहे प्रकरण. मुटेजी, पोलिसांत कळवणे योग्य ठरेल. निदान काहीतरी हालचाल करतील आपले पोलीस. विशेषतः पाकिस्तानी नंबर आहे हे कळल्यावर.

खरं तर बरेचदा, आपले पोलिस जास्त कामाच्या दबावाखाली असतात. त्यांना सोयी काही नसताना, त्यांच्यावर नेते, गुंड अशी लोकं प्रेशर आणताना ते बरेच (आनि बरेचदा) चांगली कामगिरी करतात. अर्थात वाईट अनुभव देणारे पोलिसही आहेतच.