न्यूक्लियर डिसेप्शन

Submitted by sudhirkale42 on 19 August, 2010 - 17:43

"न्यूक्लियर डिसेप्शन": by Adrian Levy and Catherine Scott-Clark

© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)
© सुधीर काळे, जकार्ता (मराठी रूपांतरासाठी मूळ लेखकांच्या वतीने)
मराठी रूपांतर: सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)

संक्षिप्तीकरण व अनुवाद: सुधीर काळे, जकार्ता

कांहीं दिवसापूर्वी मी Nuclear Deception हे Adrian Levy व Catherine Scott-Clark या लेखकद्वयीने लिहिलेले पुस्तक वाचले. हे पुस्तक एका बाजूने अमेरिकेच्या ओळीने पाच राष्ट्राध्यक्षांनी (कार्टर, रेगन, बुश-४१, क्लिंटन व बुश-४३) कसेही करून अमेरिकन रक्ताचा एकही थेंब न सांडता मुजाहिदीन लढवय्यांना व लांचखोर पाकिस्तानी राज्यकर्त्यांना परस्पर रशियन सेनेशी लढवून त्या (रशियन) सैन्याला स्वगृही परत पाठविण्यासाठी आपल्याच प्रतिनिधीगृहाच्या सदस्यांची (सिनेटर्स व हाऊस रेप्रेझेंटेटिव्स) कशी मुद्दाम दिशाभूल केली, हे सगळे करतांना पाकिस्तानला अणूबाँब बनविण्यात कशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली, एक दिवस हा भस्मासुर आपल्यावरच ही अण्वस्त्रे डागेल ही दूरदृष्टी कशी ठेवली नाहीं याची कहाणी आहे, दुसर्‍या बाजूने पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी "दहशतवादाविरुद्धच्या लढाई"बद्दल अमेरिकेला तोडदेखली आश्वासने देऊन पाठीमागून त्याच दहशतवाद्यांना छुपी मदत कशी चालू ठेवली, अमेरिकेला तिची लष्करी व आर्थिक मदत भारताविरुद्ध वापरणार नाहीं अशी आश्वासने देऊन प्रत्यक्षात त्याच पैशांनी व त्यांच्या सेनाधिकार्‍यांच्या सक्रीय सहभागाने दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण केंद्रे कशी उभी केली (त्यांना ’स्वातंत्र्यसैनिक’ म्हणणारा मुशर्रफ सगळ्यात मोठा चोर!) याची कहाणी, तर तिसर्‍या बाजूला ही एक तर्‍हेने डॉ. अब्दुल कादिर खान या "पाकिस्तानच्या अणूबाँबच्या पिताश्रीं"ची कहाणीही आहे!

वाचा तर ही मालिका. प्रस्तावनापर प्रकरणात लेखकांचे मनोगत आहे व त्यात लेखकद्वयांनी या पुस्तकात काय आहे याची थोडक्यात चर्चा केली आहे. पाठोपाठ येणारी प्रकरणे ही अज्ञात कथा उलगडत नेतील. ही मालिका वैयक्तिक वाचनासाठी आहे, पुनःप्रसारित करू नये. "कॉपीराईट"चे नियम लक्षात असू द्यात!
हा प्रकल्प आपल्याला वाचनीय वाटेल अशी आशा आहे.

काळेसाहेब, वाहवा, फार काळानंतर माबोवर दिसताय.
मध्यंतरी तुम्हाला विनंती केली होती त्याप्रमाणे भारतात सरकार बदलले त्याचा शेजारी देशांवर काय काय परिणाम झाला, इ. बाबत जर तुम्ही काही लेखन केले असेल तर ते कृपया माबोवर प्रकाशित करू शकाल का ? धन्यवाद !