युएस ओपन सिरीज - २०१०

Submitted by Adm on 5 August, 2010 - 12:10

क्ले आणि ग्रास कोर्टचा सिजन संपल्यानंतर आता हार्डकोर्ट सिजन सुरु झाला आहे. हा धागा ह्यावर्षीच्या युएस ओपन सिरीज तसेच सरत्या उन्हाळ्यात येणार्‍या युएस ओपन टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी.

युएस ओपन टेनीस स्पर्धा २०१० सोमवारपासून सुरु होत आहे. रफाएल नदाल आणि कॅरोलाईन वोझनियाकी ह्यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीमध्ये अग्रमानांकन मिळालं आहे.

महिला एकेरीमध्ये सेरेना विल्यम्स आणि जस्टीन हेनीन अश्या दोन दिग्गज खेळाडू यंदा अनुपस्थित असल्याने बाकींच्या खेळाडूंमधे विजेतेपदासाठी चुरशीसी स्पर्धा दिसेल. मानांकनाप्रमाणे खेळाडूंनी आपले सामने जिंकले तर उपांत्यपूर्व फेर्‍यांचे चित्र असं असेल.
महिला एकेरी :
वोझनियाकी वि ना ली (शारापोव्हा, कुझनेत्सोवा ह्याच क्वार्टरमधे आहेत).
यांकोविच वि झ्वोनारेवा
स्क्विवोनी वि व्हिनस विल्यम्स
स्टोसूर वि किम क्लायस्टर्स

पुरुष एकेरी :
पुरुष एकेरी
नदाल वि व्हरडास्को
अँडी मरे वि बर्डीच
डेव्हीडँको वि जोकोविच (रॉडीक ह्या क्वार्टर मधे आहे)
सॉडर्लिंग वि फेडरर (हेविड ह्या क्वार्टर मधे आहे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुतेक विंबल्डन वगळता बाकीच्या ग्रँडस्लॅम्स मधे क्वार्टर फायनल आणि पुढे पाचव्या सेट मधे टायब्रेकर नसतो... विंबल्डन मधे सगळ्याच फेर्‍यांमधे नसतो...

सुमंगल, इन्ग्लिशला नावे नाही ठेवली. टोनीने जे सांगितले त्यातून ते अर्थ काढायचा प्रयत्न करत होते. पण सर्विसबद्दल आता त्याला दोनदा विचारुन झाले आहे. Happy

लोपेझ हा रड्या माणूस आहे. आणि हा राफाचा मित्र म्हणे! दीड सेट बघूनच मी झोपले.

गो Vardasco!

फेडररची सर्व्हिस अशक्य आहे खरंच. कित्येक वर्षं उत्तम सर्व्हिस करतोय हा मनुष्य.
केवळ सर्व्हिसच्या जोरावर मॅच जिंकू शकतो तो. Happy

खरच फेडरर आज खुप छान खेळला. सेमीज मधे नोवाक थोडा त्रास देणार पण फेडररच जिन्कणार.
फेडरर असाच खेळला तर राफा बरोबर फायनलला मजा येणार. राफा अप्रतिम खेळत आहे.

बोपन्ना पुरुष दुहेरीच्या फायनल मधे सामना ब्रायन बंधूंशी.
कुरेशी मिश्र दुहेरीच्याही फायनल मधे.
फेडरर एसेसच्या बाबतीत दुसरा ७४ एसेस, पण फर्स्ट सर्व्ह पर्सेंटेज मधे टॉप टेन मधे नाही. इथे जोकोविच दुसरा ७०%.

आज 'प्रदर्शनीय' डबल्स सामन्यात माजी नंबर १ महिला खेळाडू मार्टिना हिंगीस व सौंदर्यसम्राज्ञी आना कुर्निकोव्हा या दोघी (boring)पॅट कॅश व (अति boring) मॅट्स विलँडर यांच्याशी खेळतील. इच्छुकांनी लाभ घ्यावा.

फेडरर चांगला खेळला खरा पण त्याच्या काही चुका म्हणजे नेट मध्ये मारलेले शॉट्स, चुकलेले ड्रॉप शॉट्स बघून कसंतरीच झालं. योकोविच जर नीट खेळला तर कदाचित थोडं अवघड जाईल त्याला.
बाकी, कॉर्नर टु कॉर्नर मारलेले बॅकहँड्स आणि सोडर्लिंगचे अगदी प्वाईंट हातात असल्यागत जोरात मारलेल्या शॉट्स वर प्रत्युत्तर देऊन प्वाईंट स्वतःच्या खिशात घालत असताना डोळयाचं पारणं फिटलं!

चला आता यावेळेस आपलं फेडी नदाल ग्रँड स्लॅम फायनल मॅच पहायचं स्वप्न पूर्ण व्हायची आशा करूयात... Happy

पुरुषांच्या सेमीफायनल कधी होणार? महिलांच्या आज सेमी फायनल आणि उद्या फायनल का?
पुरुषांच्या सेमीफायनल शनिवार आणि फायनल रविवारी का?
मधे गॅप का नाही ठेवत हे यु एस ओपनवाले?

पराग ते मी आधीच पाहिले होते, पण तिथे फक्त त्या त्या दिवसाचेच शेड्युल देतात, आत्ता शनि-रविचे शेड्युल नाही तिथे.

Pages