"अहो, तुमची पाहुण्यांची यादी झाली का तयार?"
"वेगळी तयार काय करायचीय? तू घे लिहून, मी सांगतो..."
"आता तेवढं एकच काम आहे का मलाऽऽ? सतरा व्यवधानं आहेत. लिहून घे काय? तुम्हीच लिहून द्या मला आज संध्याकाळपर्यंत."
"(आठ्या घालून) आजच्या आज??"
"ओरडताय कायऽऽ? तुम्हाला जराही गांभीर्य कसं नाही हो? वधूपक्ष आहे आपला. सगळी व्यवस्था चोख नको? घरच्या कामात लक्ष कमीच तुमचं पहिल्यापासून. मी आहे म्हणून चाललंय सगळं सुरळीत इतकी वर्षं...!"
----------
"अगं, तुझी पाहुण्यांची यादी दे माझ्याकडे. दोन्ही याद्या एकत्र करतो आणि आजच पत्रिका करायला टाकतो. तेवढंच तुझं एक मोठं काम होऊन जाईल."
"पत्रिका काय करायला टाकतो? तुमचीच यादी द्या इकडे. मला एकदा ती नजरेखालून घालायला नको??"
"(हताशपणे) अगं, ती ‘माझ्या’ पाहुण्यांची यादी आहे ना? मला करायला सांगितलीस ना? तशी केलीय मी. आता तू पुन्हा त्यात काटछाट कुठे करतेस?"
"(संशयास्पद नजरेने) म्हणजे, काटछाट करण्याजोगी नावं आहेत तर त्यात...! आणा तो कागद इकडे."
"अगं, पण..."
"(वैतागून) हे काऽऽऽय? बराक ओबामाचं नाव कशाला टाकलंयत यात??"
"म्हणजे काय! त्याला नको बोलवायला?"
"कशाला?"
"तुझा बॉस आहे तो!"
"काही गरज नाही! घरच्या लग्नाला बॉसची काय गरज?"
"(संधी साधत) इतकी थाटामाटातली लग्नं ही नेहेमी घरचीच असतात ना? की दारच्या लग्नातही तू मिरवतेस एवढी? किती ते कपडे, दागिने...! आणि गरज कशी नाही? आत्ता तो अध्यक्ष असला तरी त्या जागी एके काळी मी काम करत होतो..."
"कामं कमी... ‘इतर’ गोष्टीच जास्त करत होतात... घोडं तिथेच तर पेंड खायचं ना!"
"हे बघ, जुन्या गोष्टी उकरून काढायची काहीही गरज नाही."
"मी काढल्या? मी काढल्या जुन्या गोष्टी उकरून?? सुरूवात तुम्हीच केलीत."
"आता यावरून तू भांडत बसणारेस का माझ्याशी? आता नाहीयेत वाटतं तुला सतरा व्यवधानं?"
"हे अठरावं व्यवधान लावलंयत तुम्ही माझ्यामागे. (ठामपणे) ते काही नाही! बाकी कुठलीही नावं चालतील पण ओबामा नको म्हणजे नको!"
"बाकी कुठलीही नावं चालतील?’
"हो."
"(चाचरत) मो... मो... मोनिका...??"
"(चिडून) तिचं नाव आत्ता घ्यायची काही गरज होती काऽऽ? नाही त्या वेळेला थट्टा कसली करता?"
"(गुळमुळीत आवाजात) थट्टा कुठे? तूच तर म्हणालीस कुठलीही नावं चालतील म्हणून..."
"मला शब्दात पकडू नका!"
"पण ओबामा का नको? मॅडेलीन, माझ्या मंत्रिमंडळातली गृहमंत्री, ती चालते! मग तू ज्याच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री आहेस, तो का नको?"
"सारखे प्रश्न विचारू नका. माझ्याकडे वेळ नाही त्यांची उत्तरं द्यायला. सतरा व्यवधानं आहेत मागे..."
----------
"आज कसं सगळं शांत, शांत वाटतंय."
"चेलू गेली लग्न करून! मला तर फार चुकल्याचुकल्यासारखं होतंय बाई!"
"का? शिक्षण आणि नोकरीनिमित्त ती अनेक वर्षं आपल्यापासून दूरच राहिली आहे ना? आहे तिला सवय..."
"हो, पण तेव्हा तिला संसार नव्हता करायचा! काही लागलं खुपलं तर आपल्याकडे धाव घेऊ शकत होती ती."
"ते तर ती आताही करू शकतेच की..."
"तुम्हाला नाही कळायचं सासुरवाशिणींचं दुःख!"
"मला एक सांग, ओबामाला न बोलावण्यामागेही असलंच काही बायका-स्पेशल कारण होतं का?"
"(आठ्या घालत) तुमच्या डोक्यात तो किडा आहेच वाटतं अजून?"
"नाही, पण..."
"आधीच चेलूनं इंटरकास्ट ठरवलेलं. त्यात तुमचे ते व्याही! फसवणुकीच्या गुन्ह्याखाली तुरुंगवास भोगून आलेले!! ही टेन्शन्स काय कमी होती वर अजून ओबामाला बोलवायला? तो आला म्हणजे कडक सुरक्षाव्यवस्था आली; सगळ्यांच्या पर्सेस, बॅगा, भेटवस्तू उघडून तपासून पाहणं आलं. टी.व्ही. रिपोर्टर्सचंही जास्त लक्ष त्याच्याकडेच लागून राहिलं असतं. मार्क आणि चेलूचा त्याच्याबरोबर काढलेला फोटोच द्यावा लागला असता आज पेपरमधे छापायला. आता हा आपल्या चौघांचा फोटो कसा छान वाटतोय बघायला!"
"(कौतुकानं) तशी तू पहिल्यापासून दूरदृष्टीची आहेसच!"
"(नाक मुरडत) एकदाच फक्त त्या दूरदृष्टीवर झापडं कशी चढली कोण जाणे!"
"कधी ते?"
"उगीच वेड पांघरू नका! त्या मोनिकाला मी विसरलेले नाहीय अजून..."
"आता जुन्या गोष्टी कोण उकरून काढतंय?"
"काढणारच मी! आता माझ्यामागे सतरा व्यवधानं नाहीयेत."
सगळेच काही आमच्या सारखे
सगळेच काही आमच्या सारखे चाणाक्ष वाचक नसतात लले
स्वप्ना "२ मच" म्हणून प्रतिक्रिया २ वेळा का?
मस्त! दुसर्या पॅरात ओबामाचं
रच्याकने, आज सकाळमध्ये मस्त कार्टून आलंय- एक सामान्य बाई शेजारणीला म्हणत्ये- मारे अमेरिकेच्या माजी अध्यक्ष्याच्या मुलीचं लग्न, पण लग्नात एक तोळाही सोनं घातलं नाही मुलीच्या अंगावर!!!

करेक्ट कविता. चाणाक्षं
करेक्ट कविता. चाणाक्षं वाचकांच कौतुकच नाय.
सर्वांना धन्यवाद चाणाक्ष
सर्वांना धन्यवाद
चाणाक्ष वाचक
त्याला आदित्यच्या लग्नात बोलाव आणि सांग हेच ते घर बराक ओबामांना लग्नाला बोलावणारं.... >>>
आदित्य त्याच्या लग्नात आम्हाला तरी बोलावेल की नाही शंकाच आहे 
दुसर्या पॅरात ओबामाचं नाव येईपर्यंत संशयही आला नाही की 'त्या' लग्नाबद्दल असेल! >>> ओबामाला नक्की कुठल्या पॉईंटला इंट्रोड्यूस करायचं त्याचा मी बराच वेळ विचार केला होता. आधी सर्वात शेवटी टाकायचं ठरवलं होतं.
अगदी हरितात्यांनी शिवी दिलेला
अगदी हरितात्यांनी शिवी दिलेला औरंगजेब झालाय माझा >>>>> लले$$$$$$$$$



बाकी लेख भन्नाट लिहीलायस
लले आदित्य ने लग्नात बोलावल नाही बोलावल तरी एक लग्न गटग करु आपण,
मंजे अजय बिचाराच की ग त्याशिवाय का तो डु चा शर्ट घालेल परत
ललिता छान लिहिलय. अगदी अशाच
ललिता छान लिहिलय. अगदी अशाच थाटाचे संवाद झाले असल्याची दाट शक्यता आहे !!
लले , सह्हीच तू कशावर काय
लले , सह्हीच
तू कशावर काय लिहिशील सांगता नाय येत
मस्त लिहिलय...
मस्त लिहिलय...
लय भारी
लय भारी
bhannat लिहीलय...
bhannat लिहीलय...
डेंजर लिहिलय..... ललिता.....
डेंजर लिहिलय..... ललिता..... मस्तं म्हणजे मस्तच!
आदित्य त्याच्या लग्नात
आदित्य त्याच्या लग्नात आम्हाला तरी बोलावेल की नाही शंकाच आहे >>> हे वाक्य आणि लेखासाठी _/\_
हे वाचून मला अपार खिन्नता आली
हे वाचून मला अपार खिन्नता आली आहे. >>>
लले,
भारी , जबरी, झकास, मस्त......... सगळी विशेषणं घे बाई.
बाकी, त्या 'बझ'वाल्या
बाकी, त्या 'बझ'वाल्या महाभागाने स्वतःच्या तिथल्या सगळ्या कमेंट्स डिलीट करून टाकल्यात. त्यामुळे काल त्याला मी जे चार खडे बोल सुनावले होते ते आता इनोदी वाटतायत.
लले, बझ वरचा तुझा सात्विक
लले, बझ वरचा तुझा सात्विक संताप वाचला आणि तो सं.पा. काय बरळला असेल याचा अंदाज आला
मंजे
मंजे
(No subject)
(No subject)
मस्तच...
मस्तच...
लले वरच्या सगळ्यांच्या
लले वरच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांसकट तुला दंडवत...
महान आहेस..
धम्माल लिहलयं...
धम्माल लिहलयं...
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद
भारी हां..
भारी हां..
मस्तच लिहिलयंस प्रीति,
मस्तच लिहिलयंस प्रीति, कल्पनाच छान आहे एकदम
अगदीच साधारण लेख आहे
अगदीच साधारण लेख आहे
लले, अश्विनी देवकरांसारख्या
लले, अश्विनी देवकरांसारख्या थोर व्यासंगी व्यक्तिमत्वांच्या प्रोत्साहनावर तर तुझी पुढची वाटचाल टिकून आहे... टीकाकाराने/निंदकाने तुझ्या शेजारी घर घेण्याचे ठरवले आहे इथेच तुझ्या यशाचे गमक आहे
मस्त
मस्त
अरेच्च्या! खरंच की! देवकर
अरेच्च्या! खरंच की!
देवकर बाईही ठाण्याच्याच रहिवासी आहेत की!
'निंदकाचे घर असावे शेजारी' या म्हणीचं थेट प्रक्षेपणच झालं की हे!
लले तुझा लेख आज वाचला, एकदम
लले तुझा लेख आज वाचला, एकदम फक्क्ड जमलाय.
विशेष करून
>>"काढणारच मी! आता माझ्यामागे सतरा व्यवधानं नाहीयेत." >> हे वाक्य वाचून तर मी जरा कमी लोळायचीच बाकी आहे.
तसंच या अदे बाईंच्या मागे ही व्यवधानं नाहियेत बहुतेक म्हणून त्यांना असलं सगळं सुचतंय..
तसंच या अदे बाईंच्या मागे ही
तसंच या अदे बाईंच्या मागे ही व्यवधानं नाहियेत बहुतेक म्हणून त्यांना असलं सगळं सुचतंय. >>>
Pages