आपली मायबोलीकर मिनोतीकडुन प्रेरणा घेवुन मी पण कुंभारकामाच्या (Pottery) क्लासला नाव घातले.
त्यातलाच हा एक प्रयोग :). या भांड्याबद्दल थोडेसे, हा फ्लॉवर पॉट coil technique वापरुन (म्हणजेच हाताने मातीच्या जाड जाड लांब शेवया करुन मग त्या एकावर एक रचुन) बनवलेला आहे.
अश्विनी, दिनेश, तुम्ही दिलेल्या suggestions नंतर हे स्पुन होल्डरचे चित्र टाकतेय. एक उदाहरण म्हणुन की या coils चे कसे डीजाईन बनवता येते. हे भांडे चुकीचे रंगवले गेले म्हणुन मला खुप आवडले नाही. खर म्हणजे मी हे भांडे ३-४ रंगात रंगवले (होते). पण मी सगळ्यात शेवटी काळा रंग वापरला फिक्या रंगावर. या चुकीमुळे एक महत्वाची गोष्ट शिकले ते म्हणजे काळा रंग पारदर्शक नसतो .
Anyway यात (coil technique मध्ये) दोन्ही प्रकार करता येतील. एक म्हणजे प्लेन भांडे बनवुन मग त्यावर डीजाइन साठी अश्या वेगवेगळ्या आकाराच्या शेवया लावणे (जसे सुंभाचे किंवा लाटांचे डिजाइन)किंवा भांडे बनवत असतांनाच शेवयांना आकार देणे.
मी या क्षेत्रात फार म्हणजे फारच नवीन आहे त्यामुळे मातीचा अंदाज येत नाही. जोपर्यंत मातीचे गुणधर्म मला ओळखीचे होत नाहीत माझे प्रयोग खर्या अर्थाने यशस्वी होणार नाहीत. आम्हाला दिलेला गृहपाठ पण साधारण असाच असतो की ज्या मुळे आम्हाला मातीच्या वेगवेगळ्या गुणांची ओळख होईल. एवढ मात्र नक्की की मातीत खेळायला खुप मजा येते. हळु हळु डोक्यात कल्पना येत जातील तसे तसे प्रयोग करत जाईन त्याच वेळी तुम्ही दिलेल्या सुचना पण अमलात आणायचा प्रयत्न करेन.
मस्तच.. सगळीच भांडी अप्रतिम
मस्तच.. सगळीच भांडी अप्रतिम जमलीयत. हा पॉट ही फारच छान आहे. आधीच्या फोटोंपैकी पानाच्या आकाराचे कँडल स्टँड, झाकणाची भांडी, चटणीसाठीच्या छोट्या वाट्या खूप आवडल्या. त्या दही ठेवण्याच्या (विरजण लावण्याच्या) बरण्या माझ्या आजीकडे पाहिल्या होत्या लहानपणी त्याची आठवण झाली.
फिरत्या चाकावरती देशी मातीला
फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार
रुनि बाई, तू वेडी कुंभार!
वेड....
वेड....
रुनि खुपच छान आलाय पॉट. हे
रुनि खुपच छान आलाय पॉट.
हे ceramic clay पासुन बनवलाय का??
तुकाराम म्हणाले असते,
तुकाराम म्हणाले असते, मृत्तिका आम्हा सोन्याचांदीसमान!
खूप छान ! पुण्यात कुठे शिकता
खूप छान ! पुण्यात कुठे शिकता येईल का हे ? कृपया सांगणार का?
Pages