परवा सक्काळी सक्काळी मस्त रिमझिमत होतं आणि रात्रभर बर्यापैकी पाउस पडल्याने लवकर उठवले नाही. नेमकी त्याच दिवशी "भद्रकाली एकादशी" होती. सगळे लेट उठुन लेट आवरणे आणि मग पळतपळत ऑफिसला निघणे हा नित्यक्रम झाला आहे. घरातुन निघताना आईने देवीचा जप वैगरे करायला सांगितले होते. तसा मंत्र वैगरे लिहुन दिला होता. "पुजा करायला वेळ मिळला नाहि ठिक आहे कमीत कमी तो जप तरी कर फावल्या वेळात.. तेवढेच जरा देवाचे नाव घेतलेस तर तुझे काही वाईट होणार नाहिय. वैगरे वैगरे," लेक्चर ऐकुन मी घराबाहेर पडले. मनात थोडे वाईट वाटले की काल ठरवुनसुध्हा मी लवकर उठले नाही. आज जरा पुजा केली असती मन शांत झाले असते. थोडे पुण्या पण लाभले असते अणि मनःशांतीही. पण काय "आले देवाजीच्या मना" असे एक ना अनेक विचार मनात चालु होते. नेहमीची सकाळची लेडीज स्पेशल पकडली आणि जागेवर बसले.
ट्रेन चालु व्हायला अजुन ५-७ मिनिटे अवकाश होता. म्हंटले चला तेवढा वेळ तरी तो मंत्र म्हणुया.. म्हणुन मोबाईलच्या कवरमध्ये ठेवलेला मंत्र काढणर तेवढ्यात मागुन आवाज आला. "देवीच्या नावाने चांगभलं.." पाठीवळुन बघेपर्यंत तो माणुस देवीची सुमारे दोन अडीच फुट मुर्तीसदॄश घेउन पुढ्यात उभा ठाकला. बापरे दोन मिनिटे काय करावे हे सुचेचना.. "भारावुन, भांबावुन किंवा दिग्मुढ होणे" म्हणजे काय याच प्रत्यय आला मला त्या दोन मिनिटांत.. अचानक ध्यानीमनी नसताना देवीचे मिळालेले ते असे दर्शन एकदम सुखावुन गेले मला. तसे मी कधीही कोणत्या भिकार्याला किंवा देवाच्या नावाने पैसे मागणार्या लोकांना कधीच पैसे देत नहि. वाटलेच तर त्यंना एखादा वडापाव, बिस्किटचा पुडा वैगरे घेउन देते. पण त्या दिवशी त्याने पैसे हि न मागता मी स्वताहुन त्याला पैसे काढुन दिले. पण त्या देवीला ज्याप्रकारे त्याने सजविले होते, तिचा मुखवटा, तिचे हिरवेगारवस्त्र, बांगड्या, तिच्या डोक्यात, अंगावर माळलेल्या माळा, गजरे, आणि खुपच बोलके डोळे वैगरे अतिशय लोभसवाणे दृश्य होते ते माझ्यासाठी. आणि मग तो "जोगता" दृष्टीआड झाल्यवर माझ्या लक्षात आले की अरे काय मुर्खपणा केला आपण. हातात मोबाईल असुनदेखील मी फोटो काढला नाही. "देवीचा" फोटो काढला असता तर काय मस्त झाले असते.. खरच खुप आवडले होते मला "ते रुप."
आत्तापर्यंत अशी दोन वेळाच त्या रुपाने मी भरावले आहे. एक म्हणजे वरळीला "जरिमरीमातेचे मंदिर" आणि एक म्हणजे एका मेलमधुन आलेला देवीचा फोटो; तो इथे चिकटवत आहे..
समाप्त.
मनात खूप इच्छा असेल तर अशी
मनात खूप इच्छा असेल तर अशी पूर्ण होते कधीकधी. तुमचं असंच झालं असेल कदाचित. ओम शांती ओम मध्ये शाहरूख म्हणतो नाही का "अगर मनसे किसी चीजको चाहो तो सारी कायनात उसे आपसे मिलानेमे जुट जाती है" असं काहीतरी
देवीचं रूप खरंच खूप सुरेख आहे.
धन्यवाद स्वप्ना. तसंच काहिसं
धन्यवाद स्वप्ना. तसंच काहिसं असेल..