गोष्ट: राजकन्येचा झगा

Submitted by सावली on 30 May, 2010 - 19:31

हा माझा लेखनातला पहिलाच प्रयत्न. ही आणी अशाच आणखी काहि कथा मी माझ्या लेकीसाठी लिहिल्या. पण खरतर आत्तापर्यंत कुणालाच , अगदि कुणालाच दाखवलेल्या नाहित. लेकिला सांगितल्यात फक्त.
तुमचे मार्गदर्शन मिळावे यासाठी इथे आज लिहून काढते.
काय बदल करवा ते सुचवा फारच खराब असेल तर तेहि सांगा (म्हणजे अजून लिहून त्रास देणार नाही).
------------------------------------

खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट. एक छोटस गाव होतं. इन मीन तीन घरांच. गावाभोवती सुंदर नीळे डोंगर होते. खळाळणारी नदी होती. गर्द हिरवी झाडे होती छोटी छोटी तीन घर होती. घरांभोवती अंगण. अंगणात छान रांगोळी.

एका घरात एक छोटीशी काळ्याभोर डोळ्यांची, गोबरया गालांची गोंडस मुलगी रहात होती. ती रोज आपल्या अंगणात पक्षांशी खेळायची. फुलांना कुरवाळायची. अंगणाच्या सभोवार तीने झाड लावली होती, त्यांना पाणी घालायची.त्यांच्याशी गप्पा मारायची. एका झाडाशी तर तीची खास गट्टी होती. हिरवगार झाड आणि त्याची गर्द सावली तीला खूप आवडायची. छोट्या छोट्या पानटल्यांची मिळून बनलेली मोठी मोठी पान बघताना तीला मजा वाटायची. झाड सुद्धा तीची रोज वाट बघायच. तीच्या इवल्याशा हातांना पानांनी गुदगुल्या करायचं. सळसळ आवाज करत मोठ्यानी हसायच.

एकदा काय झालं, त्या देशाच्या राजकन्येला निळ्या डोंगरांवर जायच होत. आदल्या दिवशी गावात दवंडी पिटली,
"ऐका हो ऐका उद्या राजकन्या गावातून जाणार आहे. सगळ्यांनी राजकन्येच्या स्वागताला थांबा." तीनही घरासमोर छान रांगोळया काढल्या. फुलांनी घर सजवली. सगळेजण सकाळी उठून, तयारी करुन वेशीपाशी ऊभे राहीले. सकाळी सकाळी भालदार चोपादारांची एक मोठी तुकडी गावात आली. त्या चिमुकल्या गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फी उभी राहिली. मागाहून आल्या राजकन्येच्या दासदासी, त्यांनी रस्त्यावर पायघड्या टाकल्या. इतक्यात टपटप असा घोड्याच्या रथाचा आवाज झाला. सगळे आतुरतेने मान उंचावून बघायला लागले. पांढऱ्याशुभ्र असे सात घोडे लावलेल्या चांदीच्या रथाचे आगमन झाले. कमानदार रथ आणि त्यावर मोत्यांच्या झालरी. जणू काही चंद्राचाच रथ. आणि त्यात बसलेली परीसारखी सुंदर राजकन्या. गावातल्यांनी पहील्यांदाच अशी सुंदर राजकन्या बघितली होती. आपल्या देशाची राजकन्या म्हणून त्यांच्या डोळ्यातून कौतुक दिसत होते. छानशी, लांब केसांची आणि नाजुक राजकन्या. तीने सुंदर लाल रंगाचा पायघोळ झगा घातला होता. त्यावर पांढरी झालर अन माणकांची सुंदर नक्षी होती. ऊन्हात झगा छान चमकत होता. सगळ्यांनी राजकन्येचे मनापासून स्वागत केले, तीच्यावर फुले उधळली. असे छान स्वागत स्विकारत राजकन्या डोंगरावर निघून गेली.

इथे गावातल्या त्या छोट्याशा मुलीलाही राजकन्या खूप आवडली. पण त्याहीपेक्षा आवडला तो तीचा झगा. तिच्या ध्यानीमनी सारख राजकन्या आणि झगाच येऊ लागला. तीला वाटल आपल्याकडेही असा सुंदर झगा असता तर किती छान झाल असतं. काय कराव बर? तीने आई,बाबांजवळ हट्ट केला. पण ते तरी कसा देणार राजकन्येचा झगा. आई,बाबांपण समजूत काढून दामले. एवढी शहाणी गुणाची मुलगी तू, कशाला अशी रडतेस? आपण आपली साधी माणसं. आपलायाला असा झगाबिगा नाही मिळत. आईने परत समजावलं. आता आईबाबांना वाईट वाटेल म्हणून चिमुकलीने ओठावर हसू आणलं आणि बागेत पळाली. आणी आपल्या लाडक्या झाडाखाली जाऊन बसली. झाडाने सळसळ करून तिला खेळायला बोलावलं पण तीच काही आज लक्षच नव्हत. झाडाने खोदून खोदून विचारल्यावर मात्र तिने झग्याबद्दल सांगितल. आणि वर म्हणाली “जाउदे आपल्याला काही तसले कपडे कधी मिळणार नाही चे माहितेय मला, तरीसुद्धा जरा वाईट वाटतंय मला. उद्या नाही ह इतक वाटणार.”

हे ऐकून बघून झाडालापण खूप वाईट वाटल. झाड दुःखी झाल. अस झाड दुःखी झालं की वनराणीला लगेच खबर पोहोचते. झाडांवरचे पक्षी लगेच तीला निरोप देतात. अशी झाड, फुलं, पान यांच दुःख देवीला अजिबात बघवत नाही. त्या रात्रीच वनदेवी आली झाडाकडे त्याची विचारपूस करायला. मग झाडाने तीला त्याच्या लाडक्या छोट्याशा मैत्रिणीची गोष्ट सांगितली. म्हणाल, “ती किती शहाणी आहे, माझे कित्ती लाड करते, माझ्याशी खेळते. आत्तासुद्धा आईबाबांना वाईट वाटू नये म्हणून रडत नाहीये ती. मग मला वाटत आपण नाही का तीला असा सुंदर झगा देऊ शकत? कित्ती छान दिसेल ती."
वनदेवीला पण खरतर हि चिमुकली माहिती होती. तिच्या पक्षीदुतांकडून तिला नेहेमी हिच्या बद्दल कळायचं. सगळ्यांची लाडकी होतो ना ती. पण झगा देण वनदेवीच्या हि हातातलं नव्हतं. एरवी फुलं, फळ, पान काय मागाल ते देता आलं असतं तिला. मग ती म्हणाली "मी तुला झगा देऊ शकत नाही रे. तो फक्त राजाच देऊ शकतो. पण मी तशीच सुंदर फुल मात्र देउ शकते. ती तु तीला दे. चालेल का तुला?" झाड आनंदल, सळसळ करत हो म्हणालं. वनदेवीने आपल्या हातातल्या जादुई फुलाने झाडाला स्पर्श केला. सगळ झाड शितल प्रकाशाने क्षणभर उजळल. वनदेवी हसत हसत निघून गेली. आणि झाड गडद अंधारात झोपून गेले.
सकाळ झाली. छोटी नेहेमीप्रमाणे सकाळी झाडांना पाणी घालायला बाहेर आली. आणी बघते तर काय हे हिरवागार झाड हिरव राहीलच नव्हतं. त्याच्या अंगाखांद्यावार सुंदर फुलं उमलली होती. लालचुटूक रंगाची, पांढर्या झालरीची , माणकांच्या ठिपक्यांची. सगळ झाड अशा फुलांनी डवरून गेलं होतं. ऊन्हात त्याचा रंग छान चमकत होता. गावातले सगळेच जमून ती फुल बघत राहीले. ती छोटी धावत धावत झाडाखाली आली, आणी झाडाने सळसळ करत तीच्या अंगावर फुल टाकली. गुलमोहोर अगदी आनंदून गेली. सगळ्यानी एकमतानी फुलांना गुलमोहोरची फुल अस नाव ठरवून टाकलं.

*****
या गोष्टी इथेहि वाचता येतील
गंमत गोष्टी
http://gammatgoshti.blogspot.com/
*****

गुलमोहर: 

सावली, गोष्ट चांगली आहे पण खूपच लवकर उरकल्यासारखी वाटली. तसंच त्या छोट्या मुलीचं नाव गुलमोहोर आहे, हे गोष्टीच्या सुरुवातीलाच लिहायला विसरलीस का?

धन्यवाद सायो.
गुलमोहोर नाव खरतर आधी सांगायच नव्हत. म्हणुन नाहि लिहिल. पण हा बद्ल नक्की करता येईल.
हं शेवट मलापण आता वाटायला लागलाय उरकल्यासारखा Sad
परत लिहुन बघेन. Happy

मला वाटत त्या मुलिच नाव शेवटीच बरोबर आहे.
नाहितर फुलान्च्या नावची मज्जा नाही येणार हाच तर ट्विस्ट आहे.
पु.ले.शु.
लवकर लवकर लहान मुलान्च्या कथा पोस्ट करा.
मला फार आवडतात अश्या निरागस कथा.

वाह.. मस्त कथा आहे ... छोटी , निरागस.. Happy

खरच अजून कथा वाचायला आवडतील, आम्हाला नक्कीच फायदा होईल...
पु.ले.शु. Happy

अरे व्वा! छानच की!
आमच्या लहानपणी अशी गोष्टीन्ची छोटेखानी पुस्तके मिळायची, ती आठवली, वाचताना रन्गुन जायचो.

सावली, इथे लिहीताय खरे, पण या गोष्टी इथुन ढापुन कुणी परस्पर पुस्तके काढत नाही ना यावर कसा कन्ट्रोल करणार? Sad त्यापेक्षा, तुम्हीच याच्या लहान लहान पुस्तिका छापायचे मनावर घ्याल का? Happy

चिंगी, आऊटडोअर्स, limbutimbu धन्यवाद:)

आमच्या लहानपणी अशी गोष्टीन्ची छोटेखानी पुस्तके मिळायची, ती आठवली, वाचताना रन्गुन जायचो. >> माझ्याहि. मोदक..
सावली, इथे लिहीताय खरे, पण या गोष्टी इथुन ढापुन कुणी परस्पर पुस्तके काढत नाही ना यावर कसा कन्ट्रोल करणार? >> अग्दि खरय..:(

त्यापेक्षा, तुम्हीच याच्या लहान लहान पुस्तिका छापायचे मनावर घ्याल का? >> माझा हा plan पण होता. पण हे छापणे वगेरे कसे जमणार माहित नाहि. मि माझ्या मुलीसाठि काहि पुस्तके घरि बनवते हाताने. (अजुन या मोठ्या गोष्टीचि बनवलि नहियेत). पुस्तके प्रकाशन वगेरे बद्द्ल कहिहि माहिति नहिये Sad म्ग माझ्यावहित रहाण्यापेक्षा कोणीतरि इथे वाचेल तरि असे वाट्ले.

फारच क्युट आहे गं गोष्ट! आणि कल्पना पण एकदम निरागस आहे. आवडली.
फक्त थोडं शुद्धलेखनाकडे लक्ष दे.
आणि लिहीत रहा.

सावली, छान लिहीली आहेस गोष्ट. Happy ...... अजुनही छान फुलवता आली असती .... कारण त्या गावात तुम्ही घेऊन गेलात आणि तिथे रमत असतानाच पटकन गोष्ट संपली Sad ......
अजून अशा गोष्टी वाचायला नक्की आवडतील ..... Happy

छान लिहिली आहे गोष्ट. पण लव्कर संपवली.
लेकाला मधे मधे इंग्लिश शब्द घालून वाचून दाखवली. आवडली.. पण अजून पुढे काय सांग... Happy

मि माझ्या मुलीसाठि काहि पुस्तके घरि बनवते हाताने>>>तू माझ्या पठडीतली दिसतेस Happy आईने स्वतः करुन दिल्याचं कवतीक लेकीला बराच काळ (म्हणजे शिंग फुटे पर्यंत नक्की) पुरतं Proud माझ्या लेकीला तिच्या वाढदिवशी मी एक असच चित्र टाकून सजवलेलं बुकलेट प्रिंट करुन बाईंड करुन दिलं ह्यावर्षी. एकदम खुष झाली ती Happy

तुझी गोष्ट लेकीला खुप आवडली Happy

सुमेधा, वरदा, संघमित्रा, प्रकाश, अमोल, डॅफोडिल्स, कविता कथा वाचुन अभिप्रायपण दिलात म्हणून खुप अाभारि अाहे Happy
एवढ्या प्रतिसादांची खरच अपेक्षाच नव्हति. Proud
तुमचे बदल सल्ले नक्की लक्षात ठेवेन. जमलतर पुन्हा लिहूनपण काढेन.
तुमच्यापैकी ज्यांनी मुलांना सांगितली त्यांना धन्स. मुलांसाठीच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचल्या हे छानच.

आईने स्वतः करुन दिल्याचं कवतीक >>> कविता हो हे मात्र खर अाहे. मी पुस्तक नविन बनवते किंवा इंग्लीश पुस्तकाचे भाषांतर करते. पण एक एक पुस्तक चित्र काढुन करायला फार वेळ लागतो. मराठीमधे गोष्टीची बोर्डबुक हा प्रकार नसल्याने (मला तरि मिळाला नाहिये) मी मराठी बोर्डबुक घरी करते.

रमा च्या प्रतिसादावरुन गोष्टी मधे छोटासा बदल केलाय.
गोरि गोरि ऐवजी छानशी हा शब्द घालते. तुम्हि मुलांना सांगताता पण हे लक्षात ठेवा बर Happy

रमा धन्यवाद Happy
<<आपण मागे मुलांना गोष्टि कश्या सांगायच्या ते बोललो होतो ना, त्या पार्श्वभुमिवर एक गोष्ट खटकलि. गुलमोहोराच्या गोष्टितलि राजकन्या गोरीपान आणि सुंदर का होति (हे दोन शब्द सगळ्याच ठिकाणि एकत्र वापरले जातात आणि मग समानार्थि वाटायला लागतात मुलांना). मी कोल्हापुरच्या एका ज्येष्ठ शिक्षिकेची मुलाखर वाचलि होति काहि वर्षांपुर्वि लोकसत्तेत (त्यांच्या कामासाठि त्यांना कसलातरि पुरस्कार मिळाला होता), त्यांनि सांगितले होत की "गोरि गोरि पान, फुलासरखि छान..." गाण आहे ना त्यात गोरि, नाजुक सुंदर म्हणजेच चांगलि अस नकळत मुलांच्या मनावर बिंबत जात म्हणुन त्यांच्या विद्यार्थ्यांसाठि त्यांनि एक वेगळ गाण लिहिल होत. बाकि सगळे तपशिल विसरले पण हा विचार सोबत राहिला. >>

काहि चुकल असेल तर असच सांगत जा.