जपानी भाषा (native) शिकण्यासाठी ठाणे / मुंबई मधे वर्ग?

Submitted by सावली on 27 May, 2010 - 00:09

मी सध्या टोक्यो मधे आहे. बर्‍यापेकी जपानी बोलू शकते.
माझी मुलगी (३ वर्षे) जापनीज डे केअर मधे जाते आणी उत्तम जपानी बोलते. तीच्या जपानी मित्रमेत्रिणीएवढच सफाईने बोलते. आणखि दिड वर्षांनी आम्ही भारतात परत येऊ. त्यावेळी तीच जपानी पुढे चालू ठेवायच आहे. (मला माहितेय हा खुपच पुढचा विचार आहे. पण आत्तातरि हे योग्य वाटतय आणि तीच भाषा आत्मसात करण्याच स्किल आहे अस वाटतय)
तर लहान मुलांसाठी जपानी भाषा (native) सहज बोलण्यातुन शिकण्यासाठी, शब्द संपत्ती वाढवण्यासाठी ठाणे / मुंबई मधे वर्ग कींवा काहि सोय आहे का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनूक्स
धन्यवाद लवकर उत्तराबद्द्ल. मी फोन करुन बघेन तिथे.

आऊटडोअर्स
मी ठाण्यात रहाणार आहे. घर आधीच आहे तिथे.

नाहि ग. मला माहित नाहित.
त्यांचे कशाप्रकारचे क्लास आहेत? Contact no. असेल तर देऊन ठेव.

सावली, मी योनक्यू त्यांच्याकडूनच केली होती. कॉन्टॅक्ट नं. वै नाहीये आता माझ्याकडे, पण त्यांचा क्लास घरगुती होता. तरीही मला असं वाटतं की तू थोडी इतर ठिकाणीही चौकशी कर.

धन्यवाद.
खरतर अशा क्लास पेक्षाहि नुसत संवाद साधणे गरजेचे आहे.
आपण जपानी व्याकरण शिकतो तस तिला शिकाव लागत नाहिये. पण खूप नवनविन बोलत रहाण जरुरी आहे.
तिथे रहाणारी जपानी मुले काय करत असतिल? जपानी आईबाप सहसा मूलांना जपानी मधुनच शिक्षण द्यायचा प्रयत्न करतात. अगदि US UK मधे राहुन सुद्धा.

ठाण्याला सरस्वती शाळेच्या इथे पाध्ये सर आहेतच नाहीतर डोंबिवली पूर्वेला प्राजक्ता केसकर(चुभूद्याघ्या) ही शिकवतात. दोन्हींचे कॉन्टॅक्ट नं. माझ्याकडे नाहीत.

सायो, मी ही तिला प्राजक्ता केसकरांचं नाव सांगण्याचा विचार करत होते, पण तिला डोंबिवलीला येणं-जाणं जमेल की नाही माहित नाही, म्हणून बोलले नाही.

सावली मी तुला माबोमार्फत पाध्ये सेन्सेईंचा फो. नं कळवला आहे.
बाकी तुला नेटीव्हच पाहीजे असतील तर इंडो जॅपनीज असो.मध्येच विचारुन बघ. पुण्यातही काही नेटीव्ह जपानी टिचर्स आहेत असं ऐकलं आहे. मिचीको तेंडुलकर? मला नक्की माहीत नाही....

मिचिको सेन्सेई आता चेन्नईला आहेत. त्यांनी पुणं ३-४ वर्षांपूर्वी सोडलं. हल्ली त्या वर्षातले सहा महिने जपानात असतात असं मध्ये ऐकलं होतं.

पुण्यात चालणार असेल तर एक उमा गोखले म्हणून आहेत. कसं शिकवतात माहित नाही, पण ओळखीच्या काही मुली स्पेशली त्यांच्याकडे जायच्या दर रविवारी डोंबिवलीहून पुण्याला.

धन्यवाद आऊटडोअर्स , चिनूक्स, सायो Happy
शक्यतो ठाणे आणी जवळ्पास असेलतर बर. तिला त्रास आणी जाच होउ न देता करयचय. एकदा तो अभ्यास झाला की कदाचित कंटाळा येऊ शकतो.
वर्षा फो. नं बद्दल धन्यवाद. हो ग तीच जपानी असच राहील तर खूपच छान होईल. तीला दोन भारतीय भाषा पण (मराठी सकट) तेव्हढ्याच छान येतात. त्यामुळे नवनवीन गोष्टी आत्मसात करणे पण सोपे जाते.

सावली,

डोंबिवलीत केसकर मॅडम शिकवतात. (सध्या त्या इथेच आहेत(भारतात) त्यांचा नंबर / ईमेल आयडी देऊ का?

(ठाण्यातून येणं त्रासाचं पडेल कदाचित पण तरीही त्यांचंच नाव सुचवावंस वाटलं. )

.

सावली,
माझी मुलगी २००९ मधे ठाण्यात जपानी भाषा शिकत होती.ठाण्यात नौपाड्यात
ब्राम्हण सोसायटी येथे कर्वे हॉस्पिटलजवळ श्री.वैद्य म्हणून आहेत.ते जपानी बोलीभाषा
शिकवीतात.सध्या मला त्यांचा फोन नंबर सापडला नाही पण सापडल्यावर विपु करेन.

ठाणा कॉलेज मधे विदेशी भाषा विकास सेक्शन आहे. तिकडे फ्रेंच, जपानी आणि जर्मन शिकवतात. माझी मुलगी फ्रेंच ला जाते.

western line var - andheri madhe kalpita socity mrs kamat,

borivali prachi bapat, neha prabhudesai.

पार्ल्यात नियंता देशपांडे यांना विचारा.

ठाण्यात जपानी भाषेचे क्लासेस... वल्लरी परचुरे-बर्वे. गुगल वर सर्च केल्यावर मिळू शकेल.