युरोप खंडामधील जर्मनी, ऑस्ट्रिया, स्लोव्हेकिया व पोलंड या देशांच्या मध्यभागी असलेला देश चेक प्रजासत्ताक. १९९० साली येथे मुक्त मतदान झाले. त्याअगोदरचा मला ज्ञात असलेला इतिहास म्हणजे हा भाग जर्मन नाझींच्या अधिपत्याखाली होता, सोव्हियत आर्मीचेही येथे काही काळ वास्तव्य होते वगैरे वगैरे. (तसा माझा इतिहास जरा कच्चाच आहे). १९९३ मध्ये झेकोस्लेव्हिया दोन भागात विभागले गेले व चेक प्रजासत्ताकची स्थापना झाली. 'प्राग' (पुर्वीचे नाव प्राहा) हे शहर चेक प्रजासत्ताकची राजधानी म्हणून ओळखले जावु लागले. Vaclav Havel पहिले पंतप्रधान निवडून आले. १९९९ मध्ये चेक प्रजासत्ताक NATOचे सभासद झाले तर २००४ मध्ये युरोपियन युनियनला जावुन मिळाले असे इतिहास सांगतो (काही चुक असल्यास जाणकार मायबोलीकर निदर्शनास आणुन देतीलच, अशी आशा बाळगतो).
या वर्षी (सन २००८) चेक प्रजासत्ताकने पर्यटन विकासासाठी महत्वाचा निर्णय घेतला कि सभोवतालच्या देशांमधुन येणारे पर्यटक (टुरिस्ट व्हिसा असणारे) सीमारेषेवर जास्त चौकशी न करता महामार्गाने आत प्रवेश करु शकतात. एप्रिल महिनाअखेर विमानानेही पर्यटकांना आत प्रवेश मिळेल. याअगोदर प्रागला जाण्यासाठी त्या देशाचा परवाना (व्हिसा) घ्यावा लागत असे. ही माहिती येथे मुद्दाम येथे देत आहे जर कोणी युरोप फिरण्यासाठी टुरिस्ट व्हिसा घेणार असेल तर त्यांना जास्त सोपस्कार न करता चेक प्रजासत्ताकमध्ये जाणे सोपे होईल. अधिक माहीती www.auswaertiges-amt.de येथे मिळेल. या कारणामुळे व माझ्याच कार्यालयातील एक सहकारी व त्याच्या मित्रांमुळे माझे प्रागला पाय लागले. अन्यथा मी विचार सोडून दिला होता.
आमचा प्रवास Frankfrut पासुन चालू होणार होता. तेथेच बाकीचे मित्र जमणार होते. तेथुन पुढचा प्रवास आम्ही कारने करणार होतो. मी राहत असलेल्या Braunschweig या छोट्या शहरातुन आम्ही निघणार होतो Frankfrut ला जाण्यासाठी. आमच्याकडे दोन पर्याय होते. पहिला पर्याय Mitfahr चा व दुसरा ट्रेनचा. आता थोडे या Mitfahr बद्दल सांगतो. जर्मनीतल्या एका शहरातून दुसर्या शहरात जाण्यासाठी कारचा मालक www.mitfahrgelegenheit.de येथे जाहिरात देतो, ज्यांना या शहरादरम्यान प्रवास करायचा असेल त्या प्रवाशाने तारीख व वेळेनुसार कारमालकाशी संपर्क करायचा. सगळ्यात उत्तम व स्वस्त असे हे प्रवासाचे साधन आहे. यात फायदा दोघांचाही. कारमालकाचेही पेट्रोलचे पैसे सुटतात व प्रवाशीही बस किंवा ट्रेन पेक्षा यालाच प्राधान्य देतात. आता प्रश्न आहे सुरक्षेततेचा. येथील माझ्या जर्मन सहकार्यांना तसेच भारतीय मित्रांनाही अद्याप वाईट अनुभव आला नाही. स्वतःची कार असुनही बरेच जर्मन हा पर्याय निवडतात. आम्हाला नाव नोंदण्यास उशिर झाल्यामुळे आम्ही दुसरा पर्याय निवडला व ३ तासात ट्रेनने Frankfrut ला जाण्याचे तिकिट १ दिवस अगोदर घेतले. थोडे महाग पडले परंतु पर्याय नव्हता. येथेही एक चांगली सोय आहे BHAN 25, BHAN 50 अशा नावाने येथे कार्ड मिळतात. हे कार्ड दाखविले तर वर्षभरात तुम्ही जो ट्रेनने प्रवास कराल त्यात २५% किंवा ५०% सुट मिळते. ट्रेनचेही वेगानुसार बरेच प्रकार आहेत. मध्यम वेगाच्या साधारण ताशी १३० कि.मी वेगाच्या ट्रेनने आम्ही प्रवास करणार होतो.


संध्याकाळी ६ वाजता प्रवास सुरु झाला. बाहेर सगळीकडे हिरवळ हे येथील खास वैशिष्ट. ट्रेनच्या आतलेही वातावरण सु़खकर होते बरेचसे प्रवासी संगणकावर काम करत होते, काही झोपले होते तर काहींचे वाचन चालू होते. आम्हीही आमचे सामान व्यवस्थित ठेवुन बसण्यास जागा मिळवली. वाटेत बरेच बोगदे लागले. आता बाहेर अंधार पडल्यामुळे काही दिसत नव्हते. काचेत आतलेच सगळे दॄष्य दिसत होते. अधुनमधुन जर्मन तसेच इंग्रजीत पुढे येणार्या स्टेशनची नावे सांगितली जात होती. दोन अडिच तास कसे गेले समजले नाही. Frankfrut ची घोषणा झाली व आम्हीही उतरण्याच्या तयारीला लागलो. स्टेशनवरच लॉकर रुममध्ये सामान ठेवले व रात्रीचा Frankfrut बघण्यास निघालो, सोबतीला पाऊसही होता त्यामुळे जास्त फिरता आले नाही. काही दुकानेही बंद झाली होती. आपल्या थोड्या भारतीय बांधवांची दुकाने आहेत येथे. रात्रीचा मुक्काम येथेच मित्राकडे होता.


शुक्रवार दि. २१ मार्च २००८ रोजी आम्ही प्राग बघण्यासाठी मार्गस्थ झालो. गाडी भाड्याने घेतली होती. नकाशे व महामार्गाची माहिती जमवली होती. हवामानही चांगलेच होते, सूर्यप्रकाश नव्हता आणि पाऊसही नव्हता, परंतु वातावरणात गारवा होता. दुपारी १२.३० वाजता आमची ओपेल गाडी निघाली. शहरामधुन महामार्गापर्यंत यायचे काम वाटाड्या (नेव्हिगेटर)ने अचुक पार पाडले. या यंत्राकडे पाहिल्यावर मला वाटत होते आपण संगणकावर मोटारीचा खेळ खेळत आहोत. वळणदार रस्ता व मधोमध पुढे जाणारी गाडी. परंतु यात जी हळुहळु पुढे सरकणारी मोटार होती ती आमचीच होती. अधुनमधुन या यंत्रातुन घोषणा होत होत्या म्हणुन आम्ही सर्व गप्प बसुन त्या लक्षपुर्वक ऐकत होतो तसेच नकाशे व वाटेतल्या पाट्याही बघत होतो. कारण सगळेच नविन होतो. एखादे वळण जर चुकले तर आमचे पुढिल कार्यक्रमही लांबणार होते. साधारण अर्ध्यातासात आम्ही महामार्गाला लागलो, आता ते यंत्र काही बोलत नव्हते मग आमची बडबड चालू झाली. एकमेकांच्या चौकश्या, मागचा इतिहास, अलिकडची लफडी, काहि विनोद, खानपान, बाहेरची मजा, अधुनमधुन फोटो. एकंदर अंदाजे प्रवास ६ तासाचा होता. रस्ते चांगले होते त्यामुळे प्रवासाची दगदग नव्हती. आम्ही हळुहळु जर्मनीच्या सीमारेषेकडे सरकत होतो. मध्यंतरी थोडा पाऊस पडला. थोडे पुढे गेल्यावर तुरळक बर्फही दिसु लागला. फार सुंदर होते बाहेरचे दृष्य, रस्त्याच्या बाजुला बर्फच बर्फ. सभोवती सगळीकडे शेतात बर्फ, त्यापलीकडे दूरवर बर्फाचे डोंगर.


आयुष्यात पहिल्यांदाच एवढा बर्फ बघत होतो. आम्ही गाडी थोडी बाजुला घेतली लघुशंकेसाठी व विरंगुळा म्हणुन. एकमेकांवर बर्फाची फेकाफेक चालू झाली.
गोळा बनविण्याचे कार्यक्रम पार पडले. अर्थातच प्रत्येकाने आपले फोटो काढण्याचे कौशल्य अजमावुन पाहिले. भरपुर फोटोसेशन झाले. मला माझ्या सौची आठवण झाली, मन थोडे उदास झाले. बरोबर असती तर आणखी आनंद झाला असता. असो. येथे आम्हाला जास्त वेळ थांबता येणार नव्हते. मागोमाग गाड्या येण्यास सुरवात झाली होती. आम्ही आमचे महत्वाचे काम करुन पुढच्या प्रवासास निघालो.


हसु नका, हा पुरावा नाही. हे छायाचित्र देण्याचे कारण येथील सरकार सोय पुरवते व जनता त्याचे पालनही करते यासाठी.
आता आम्ही बर्यापैकी ताजेतवाने झालो होतो. गाडीही जास्तच वेगात पळायला लागली असे वाटायला लागले. आमची तोंडे बडबडीने व खाद्यपदार्थामुळे चालुच होती. थोड्याच वेळात आम्ही जर्मन व चेक प्रजासत्ताक या देशांच्या सीमेवर पोहचणार होतो. आजुबाजुला बर्फा शिवाय काही नव्हतेच. जंगल होते तेही बर्फाने अच्छादलेले. आम्ही कार्यालयात गाडीच्या व आमच्या सगळ्यांच्या कागदपत्रकांची पुर्तता केली व पैसे भरले, त्यांनी एक स्टिकर दिला तो गाडीच्या काचेवर खालच्या बाजुला चिटकवला. आता आम्ही चेक प्रजासत्ताक मध्ये प्रवेश करणार होतो.

आमच्या पोटात अधुनमधुन थोडीफार भर पडत होती परंतु गाडीचे पोट रिकामेच होते. ड्राइव्हिंग व्हिलच्या पलीकडच्या तबकडीत दिसत होते की गाडी जेमतेम ६० ते ७० कि.मी. पर्यंत गाडी जावु शकेल. त्याअगोदर आम्हाला पंपावर थांबणे भाग होते. स्वयंचलीत पंपावर आपण स्वतःच आपल्याला हवे ते इंधन निवडायचे व मावेल तेवढे भरुन घ्यायचे. बाजुच्या दुकानात जावुन पैसे भरायचे. सोपी पद्धत. दुकानात आमची थोडी खरेदीही झाली. बाहेर तुरळक बर्फवृष्टी चालूच होती. आता आमचा वाटाड्या काही कामाचा नव्हता तेव्हा आम्ही आमचे नकाशे तयारीत ठेवले. महामार्गावर क्रमांक लिहिले होते ते बरोबर असल्याची खात्री केली. वळणदार रस्ते प्रवासाचा थकवा जाणवु देत नव्हते.
अपूर्ण ....
छान आहे
छान आहे फोटो आणि लेख. पुढचा भागही लवकर टाका!!
RB आणि ICE चे
RB आणि ICE चे फोटो बघुन तसेच Bahnkarte, Mietfahr, Hauptbahnhof असे शब्द वाचुन मला एकदम होमसीक (जर्मनीसीक) व्हायला लागलय.
माझ्या "must visit" लिस्ट वर हे पण एक ठिकाण आहे.
शेवटचा
शेवटचा फोटो खल्लास आहे अगदी.
वर्णन छान करताय.
मी मध्ये एक चित्रपट पाहिला होता. "व्हेन डिजेल" नावाच्या एका मजबुत हातापायाच्या हिरो चा. "XXX"नावाचा.
त्यात प्राग चा उल्लेख आहे. शहर सुंदर वाटत होत.
वॉव छानच
वॉव छानच फोटो आणि लेख
पूर्ण करा की लवकर
कीशोर फोटो
कीशोर फोटो छान आहे
किशोर
किशोर अप्रतीम फोटो... जर्मनी अनुभल्याचा आनंद झाला
लवकर पुर्ण करा...
झेक रिप्बलिकला कीती एअरपोर्ट आहेत?
किशोर,
किशोर, मस्त वर्णन आहे. शेवटचा फोटो तर एकदम सुरेख आहे. यातील नॅव्हिगेटर म्हणजे GPS का?
चेक मधे आता जाता येते ही माहिती ही उपयोगाची आहे. इंग्रजी चालते का तेथे?
पुढचे वर्णन कधी?
मुंढे सर प्राग वरील लेख
मुंढे सर प्राग वरील लेख आवडला. प्रत्यक्ष प्रागला तुम्ही मला नेऊन आणले. धन्यवाद
छान लेख व फोटो अप्रतिम,
छान लेख व फोटो अप्रतिम, विशेषतः शेवटचा!
धन्यवाद. अप्रतीम ! फोटो एकदम
धन्यवाद. अप्रतीम ! फोटो एकदम झक्कास. शेवटचे वळण खूप गोड!!!
वा,छान माहिती आणी सुर्रेख
वा,छान माहिती आणी सुर्रेख फोटो
छान वर्णन आणि फोटोही
छान वर्णन आणि फोटोही
फोटो आणि लेख छानच...
फोटो आणि लेख छानच...
छान वर्णन किशोर.
छान वर्णन किशोर.
हा लेख अजुनही अपुर्णच आहे.
हा लेख अजुनही अपुर्णच आहे. पुढचा भाग कधी येणार?
छान आहेत फोटो आणि लेखही .
छान आहेत फोटो आणि लेखही . शेवटचा तर फारच छान
पुढची माहिती वाचायला आवडेल
शेवटचा फोटो मस्त.
शेवटचा फोटो मस्त.
@किशोरजी हे फेरफटका काय
@किशोरजी
हे फेरफटका काय म्हणतात पहा :
>>ferfatka | 6 March, 2013 - 14:14
मुंढे सर प्राग वरील लेख आवडला. प्रत्यक्ष प्रागला तुम्ही मला नेऊन आणले. धन्यवाद
<<
फक्त 'फेरफटका' यांनाच प्राग दाखवून आणलेत हा भेदभाव का?
बाकीच्यांना झेक राज्याच्या सीमेपर्यंत छान आणलेत आणि तिथेच सोडून दिलेत!
आम्ही पाहतोय वाट ! बाकिच्यांना कधी नेणार तिथे?
किशोर.. झेकोस्लोव्हाकियाचा
किशोर.. झेकोस्लोव्हाकियाचा इतिहास फार रंजक आहे..
पहिल्या महायुद्धाच्या शेवटी जेव्हा जर्मनिचा पाडाव झाला तेव्हा दोस्त राष्ट्रांनी(इंग्लंड्,फ्रांस व अमेरिका) व्हर्सायच्या तहात जर्मनीवर जबरदस्त अटी लादल्या व परत जर्मनीने युरोपमधे असे डोके वर काढु नये म्हणुन जर्मनीच्या ताब्यात असलेले बरेचशे प्रदेश जर्मनीकडुन एक तर काढुन घेउन दुसर्या देशांना दिले तर काही प्रदेशांचे नविन देशात रुपांतर केले.
पहिल्या महायुद्धाच्या आधी जर्मनीने आपले एंपायर सेंट्रल युरोपमधे प्रशियन व ऑस्ट्रो-हंगेरियन एंपायर म्हणुन इस्टॅब्लिश केले होते. ते निर्माण व त्याचा विस्तार करण्यात हिंडेनबर्गचा खुप मोठा वाटा होता. पण पहिल्या महायुद्धात पराभव झाल्यामुळे ऑस्ट्रो-हंगेरियन प्रशियन एंपायर जे जर्मनीच्या अधिपत्याखाली होते त्याची अनेक छकले झाली व तत्कालिन जर्मनिचे लचके तोडण्यात आले. डँझिंग हे जर्मनिचे महत्वाचे बंदर पोलंडला देण्यात आले. ऑल्सेस व र्हुर हे जर्मनिचे पोलादाचे उत्पन्न करणारे महत्वाचे प्रांत फ्रांसला बहाल करण्यात आले. ऑस्ट्रो-हंगेरी प्रांताची छकले करुन त्यातुन ऑस्ट्रिया व हंगेरी हे दोन देश निर्माण करण्यात आले व व्हिएन्नाला(ज्या व्हिएन्नात हिटलर त्याच्या विशीत एक भणंग म्हणुन राहात होता तेच व्हिएन्ना..) ऑस्ट्रियाची राजधानी केली व बुडापेस्टला हंगेरीची राजधानी केली. तसेच फॉर्मर प्रशियातले बोहेमिया,मोरेव्हिया हे (प्रिडॉमिनंटली जर्मन स्पिकींग प्रदेश) व स्लोव्हाकिया(प्रिडोमिनंटली स्लाव्ह स्पिकिंग प्रदेश) एकत्र करुन झेकोस्लोव्हाकियाची निर्मिती केली व प्रागला त्या नविन देशाची राजधानी केली.
पण नविन निर्माण केलेल्या झेकोस्लोव्हाकियामधल्या बोहेमिया व मोरेव्हिया या प्रांतातल्या जर्मन स्पिकिंग लोकांना असा हा त्यांचा जर्मनीपासुन लचका तोडलेला कधीच आवडला नाही . त्या २ प्रातांना एकत्रीत असे सुडेटन प्रांत म्हणुन त्या वेळेला ओळखत असत. या सुडेटन प्रांतातल्या जर्मन लोकांनी पुढची २० वर्षे झेकोस्लोव्हाकियाच्या नव्या सरकारला सतत विरोधच केला.
पुढे १९३५ मधे जेव्हा हिटलर फ्युरर म्हणुन जर्मनिचा सर्वसत्ताधारी झाला तेव्हा त्याने हळु हळु पहिल्या महायुद्धाच्या आधी जर्मनिच्या अधिपत्याखाली असलेले प्रशियन एंपायर परत रिबील्ड करायला सुरुवात केली. १९३७ पर्यंत त्याने जर्मनीला परत मिलिटरी द्रुष्ट्या एकदम बळकट तर केलेच पण १९३५ पासुन १९३८ पर्यंत त्याने त्याचा धुर्त व मुत्सद्दी परराष्ट्रमंत्री रिबेन्ट्रॉपच्या मदतीने आधी ऑस्ट्रिया मग हंगेरी व मग आधी फक्त झेकोस्लोव्हाकियाचा सुडेटन प्रांत जो प्रिडॉमिनंटली जर्मन स्पिकिंग लोकांचा आहे म्हणुन.. एकही युद्ध न करता बळकावला. झालच तर आल्सेस व र्हुर प्रांतही फ्रांसकडुन हिसकावुन परत घेतले व पोलंडकडुन आधी त्यांचे असलेले डँझींग बंदर कबजात घेतले.. हे सगळे एकही युद्ध न करता!
हे असे हिटलर युद्धाशिवाय करु शकला याचे कारण म्हणजे इंग्लंडचा त्या वेळचा पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन हा फारच मवाळ होता. जेवढे शक्य होइल तेवढे वाटाघाटी करुन जर्मनीशि युद्ध टाळता आले तर बरे होइल अश्या मताचा तो होता. त्याला हिटलरचा कावा व हिटलरच्या मिलीटरी अँबिशनची झेप किती आहे हे समजलेच नाही. त्या ४ वर्षात नेव्हिल चेंबरलेन अगदी कणा नसलेल्या माणसासारखा वागला व हिटलरने व रिबेंट्रॉपने त्याला नुसत्या गोड शब्दांनी व खोट्या आश्वासनांनी झुलवत ठेवले...
फ्रांसमधेही तत्कालीन फ्रेंच पंतप्रधान दलांदिया हाही बिनकण्याचा चेंबरलेनसारखाच होता. त्यामुळे हिटलरने त्याचा पुरेपुर फायदा घेउन जुन १९३९ पर्यंत बंदुकीची एकही गोळी न उडवता ऑस्ट्रिया, हंगेरी व झेकोस्लोव्हाकिया हे देश बळकावले. चेंबरलेन व दलांदिया यांच्या बुळचट व नाइव्ह नेत्रुत्वाखालच्या दोस्त राष्ट्रांनी हिटलरला असे ४ वर्षे बिनविरोध व मोकाट सोडले.
पण जेव्हा झेकोस्लोव्हाकियावर जर्मनीने पुर्ण कबजा केला तेव्हा मात्र नेव्हिल चेंबरलेनला पुर्ण कळुन चुकले की हिटलरने त्याला पुर्ण मामा बनवले. व जुन १९३९ मधे मग चेंबरलेनने आपला टोन बदलला व जर्मनिला ताकीद दिली की यापुढे जर्मनीने अजुन जर युरोपमधे अतिक्रमण केले तर ते खपवुन घेतले जाणार नाही व इंग्लंड व फ्रांस बा़की देशांच्या संरक्षणाला आपले सैन्य पाठवील म्हणुन.
पण चेंबरलेन व दलांदियाच्या तश्या मवाळ व धुर्तता व दुरद्रुष्टीचा अभाव असलेल्या नेतृत्वामुळे ४ मोलाची वर्षे जर्मनीला आपले सैन्य व मिलिटरी मजबुत करायला मिळाली व सप्टेंबर १९३९ पर्यंत हिटलरने जर्मन मिलीटरी पहिल्या महायुद्धाच्या आधी जेवढी जर्मनी मिलिटरी द्रुष्ट्या प्रबळ होती त्याच्या पेक्षाही जास्त बळकट केली.
व १ सप्टेंबर १९३९च्या झुंजुमुंजीला जर्मनीच्या पँझर तुकड्यांनी पोलंडवर आपल्या आग ओकणार्या रणगाड्यांनी तोफेचे गोळे उडवत जबरदस्त हल्ला सुरु केला व दुसर्या महायुद्धाची नांदी केली....
पुढे १९४५ मधे जर्मनिच्या दुसर्या महायुद्धातल्या पराभवानंतर परत एकदा झेकोस्लोव्हाकिया स्वतंत्र झाला . त्या वेळेला सुडेटन(जर्मन स्पिकिंग) व स्लोव्हाकिया(स्लाव्ह स्पिकिंग) हे दोन्ही प्रांत एकत्रच ठेवण्यात आले. त्या २ प्रातांतली एथनिक धुसपुस तेव्हापासुन चालुच होती. १९८८ नंतर जेव्हा युरोपमधे जी राजकिय उलथापालथ झाली त्यात नुसत्या फॉर्मर सोव्हिएट युनिअनचीच छकले झाली नाहीत तर ठिकठि़काणी युरोपमधे एथनिक लोकांचे उठाव झाले. फॉर्मर युगोस्लाव्हियाची स्लोव्हेनिया-क्रोएशिया- बाझ्निया हर्झग्रोवेनिया-सर्बिया-माँटेनिग्रो व कोसोव्हो अशी ६ छकले झाली व १९९३ मधे फॉर्मर झेकोस्लोव्हाकियाची झेक रिपब्लिक व स्लोव्हाकिया अशी २ छकले झाली.
तर असा हा झेकोस्लोव्हाकियाचा संक्षिप्त इतिहास...:)
सह्हीच!!!!!!!!!!!!!!
सह्हीच!!!!!!!!!!!!!!
पण जेव्हा झेकोस्लोव्हाकियावर
पण जेव्हा झेकोस्लोव्हाकियावर जर्मनीने पुर्ण कबजा केला तेव्हा मात्र नेव्हिल चेंबरलेनला पुर्ण कळुन चुकले की हिटलरने त्याला पुर्ण मामा बनवले. >>>>> "हिटलर मिस्ड द बस" असे म्हणणार्या चेंबरलेनला नंतर लगेचच लक्षात आले की - "नॉट हिटलर बट चेंबरलेन हिमसेल्फ्ड मिस्ड द बस". मला वाटतं या फ्रेजवरुन पुढे कायमच चेंबरलेनची खिल्ली उडवली जायची .
मुकुंद - चांगली माहिती दिलीये.
किशोर मुंढे - सुरेख लेख.
पुन्हा बघितला. मस्त. मुकुंद
पुन्हा बघितला. मस्त. मुकुंद माहितीही छान.
किशोर - पुढचा भाग टाकला होतास का?
छान आहेत फोटो आणि लेखही !
छान आहेत फोटो आणि लेखही !