आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा! अर्थात डीसी गटग)

Submitted by नानबा on 13 April, 2010 - 14:16

बाराकरांनी 'फक्त आमचेच वृत्तांत आले' असं म्हटल्यानं अस्मादिकांना हा वृत्तांत लिहिणं भाग पडतय! आता कदाचित आम्ही बाराकरांना पुरेसे पडणार नाही - (त्यांच्या गाडीतल्या खादाडीच्या वृत्तांतानच आमच्या तोंडाला पाणी सुटतय!) पण शेवटी अटलांटा गाडीच्या 'इज्जतका सवाल' म्हणून हे लिखाण.
------------
जोगकाकांनी डीसी ला घेऊन जायचं आधी कबूल केलेलं - पण आयत्यावेळी जागेअभावी कॅन्सल केलं.. मग काय करणार, त्यांना बाबापुता करून चहा-वीडी दिल्यावर आम्हाला गाडीच्या टपावर बसून येण्यास परवानगी मिळाली (रात्रीच्या अंधारात स्वतःच्याच भयकथा आठवून भिती वाटते हो अशा वेळी!)
दुसर्‍या दिवशी सकाळी लालूच्या घरी निघालो तेव्हा अटलांटावासीयांशिवाय आणखीन दोन व्यक्तींनी जॉईन केलं - हेच ते अ‍ॅडमिन साहेब असं कळलं. मायबोलीवर भांडण्यात पुढे असलो तरी अजून आमचे मडके कच्चेच असल्याने 'जुने अ‍ॅडमिन- नवे अ‍ॅडमिन' प्रकार आम्हास ठावूक नव्हता, त्यामुळे त्यांनाच वेबमास्तर समजून आम्ही मायबोलीची जन्मकथा विचारली (त्यांनी ती सांगितलीही - शिवाय 'कालचे विस्थापित-उद्याचे प्रस्थापित' ह्या संदर्भातली काही ऐतिहासिक/काही सांप्रत काळातली माहितीही पुरवली - हे ऐकून आपणही उद्याचे प्रस्थापित होऊ शकतो असा आत्मविश्वास आम्हास मिळाला. त्याबद्दल अ‍ॅडमिनचे विशेष आभार)
लालूकडे पोहोचल्यावर ओळखा पाहू राऊंड सुरु झाले. 'आयडी आणि लिहिलेलं वाचून आपण प्रतिमा तयार करतो, त्यापेक्षा प्रत्यक्षात माणसं वेगळीच निघतात' ह्या रुनी ह्यांच्या वचनाचा प्रत्यय मला लालूच्या तळघरामध्ये जाता जाताच आला.. 'आवाज कुणाचा ..' च्या आरोळ्या ठोकणारी व्यक्ती म्हणजे वैद्यबुवा
हे आम्हास स्वप्नातही वाटलं नसतं! वैद्यबुवा म्हणजे कसं धोतर - उपरणं घातलेले वयस्कर गृहस्थ डोळ्यासमोर येतात! हाच धक्का फचिन, पराग ह्यांना बघूनही बसला!(पण सीमाला बसला तितका नाही)
मेधा ह्यांचा शोनू हा आयडी वाचून आम्ही बर्‍याच लहान मुलीची अपेक्षा केलेली - आणि सायो ह्यांच्या बाबतीतही.
अर्थातच आम्ही झक्की आणि अनिलभाई सोडून कुणालाच ओळखलं नसतं पण स्वाती दांडेकर मदतीला धावल्या (कुणाला सांगू नका पण त्या आधीच आम्ही लालूलाच 'त्या कोण' हे विचारण्याचा बावळटपणा केलाच होता!)
सिंडीनं ओळख झाल्याझाल्या 'तू नानबा का? फोटोत चांगली दिसतेस' असं सांगितल्यानं अस्मादिकांचा चेहरा पडला - असं तुम्हाला वाटलं असेल तर ते काही खरं नाही! चेहरा पडून न देता, 'छोटे केस होते तेव्हा' असं काहीसं बोलून आम्ही लगबगीनं स्नॅक्स कडे वळलो!
स्नॅक्स! खाण्याच्या आठवणीनं आम्हाला स्वाती 'बाष्प गदगदीत' का काय म्हणतात ना तसं व्हायला लागलय! काय थाट केलेला लालू ह्यांनी जेवणाखाण्याचा! व्वा! 'आम्ही फक्त पाणीच प्यायलो' असं जरी त्यांना वाटत असलं तरी ते काही खरं नाही - दहीवडे, भेंडीची भाजी, बघारे बैंगन झालच तर श्री पराग ह्यांच्या खव्याच्या पोळ्या, रुनी यांचं तिरामिस्सु ह्या सगळ्यावर भरपूर ताव मारला - सोबत अ‍ॅडिशनल चवीला झक्की आणि कार्ट्याच्यातले खमंग संवादही होतेच! (मँगो पाय मात्र आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही. श्री विनायक ह्यांचा त्यात हात होता असं ऐकून आहोत)
मग होता 'विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम' - ज्यात परदेसाईंची स्टँडअप कॉमेडी, झक्कींची बसल्या बसल्या कॉमेडी (इती रुनी), भाईंच्या (अ‍ॅडिशनल) उत्तर पत्रिका, वैद्यबुवांचा टाळ्यांचा कार्यक्रम, स्वाती-२ (म्हणजे नुसती स्वाती सोडून उरलेल्या दोन्ही स्वाती), मो, बारिशकर, झारा, सुमंगल आणि इतर काही जणांची गाणी झाली..
कार्यक्रमा दरम्यान आम्हाला कळालेल्या काही मौलिक माहित्या:
१. अ‍ॅडमिन-झारा ह्यांच्या लग्नाला अमृता-मराठी किरण जबाबदार आहेत
२. अमृता-मराठी किरण ह्यांच्या लग्नाला मायबोली जबाबदार आहे..
३. मायबोली ह्यांच्या लग्नाला - हे आपलं... जन्माला- श्री आणि सौ वेबमास्तर यांच लग्न जबाबदार आहे.
४. मंगेशरावांनी त्यांच्या कंपनीत माबो वाचण्याचा सांस्कृतिक बदल टप्प्याटप्प्यांनी आणि धैर्यांनी आणला
५. वैद्यबुवांची नोकरी मायबोलीमुळे वाचली (अधिक माहितीसाठी संपर्क करा - स्वतः वैद्यबुवा)
६. वेबमास्तरांना मामी नाही ..
७. ज्ञाती आणि राजश्री काहीतरी क्रिएटिव्ह करताहेत.
८. पन्ना आणि सायो बहिणी आहेत
९. मैत्रेयी ह्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात प्रचंड रस आहे (इतका की कधी कधी निर्मुलन करता यावं म्हणून त्या स्वतःच आधी अंधश्रद्धा पसरवतात, असं काहीसं ऐकिवात आलं)
१०. श्री पराग बायकोला जाच करून घरीच ठेवून आलेले
११. श्री चमन ह्यांच लग्न ठरलय
१२ श्री फचिन हे लग्नेच्छुक आहेत (आपल्या बहिणी/मैत्रिणींसाठी स्थळ म्हणून डोळा ठेवायचा असेल तर संपर्क करा "फचिन" ह्यांना)
१३. झक्की महान आहेत - अशक्य टाकतात! (आम्ही विनोद ह्या विषयावर बोलत आहोत - उगाच गैरसमज नसावा!)
ते मायबोलीवरच्या स्त्रियांना 'जाचक आणि खटकणार्‍या स्त्रिया' म्हणाले ह्याची इच्छुकांनी नोंद घ्यावी!
१४. नितीन माबोवर नसतात ही रुनी यांनी पसरवलेली माहिती खोटी आहे - त्यांचे एक सोडून दोन आयडीज आहेत (अधिक माहिती साठी श्री झक्की ह्यांना संपर्क करा)
१५. मो, झारा भन्नाट गातात!
१६. स्वाती-देव हॅपी कपल आहेत. स्वाती ह्यांना विंदांची 'जे व्हायचे असे ते खुश्शाल होऊ दे रे, हा हात फक्त माझ्या हातात राहू दे रे' ही कविता खूप आवडते.
(आम्हालाही आवडत होती, पण बा.करांनी 'आम्ही फक्त गळे धरतो' म्हटल्याने आमचा नाईलाज झाला Sad
बा.कर म्हणजे बारिशकर, बाराकर नव्हे, कृपया गैरसमज नसावा!)
१७. लोक आमच्या भयकथांना घाबरत नसले तरी 'वेगवेगळ्या' पाककृतींना खूप घाबरतात. तथापि बारिशकरांना हट्टाकट्टा बघून लोकांचं जरासं मतपरिवर्तन झालं आहे (कृती ट्राय करण्यापूर्वी प्रत्येकाने आपली प्रतिकारशक्ती तपासून पहावी ही सर्वांना णम्र इनंती)

ही यादी अजूनही वाढू शकते - पण सध्या इथेच थांबत आहोत. (म्हणजे 'बदलून' म्हणून हा वृत्तांत वर येऊन TRP वाढण्याची शक्यता निर्माण होईल)

हा वृत्तांत लिहून संपवताना अटलांटाकरांचा नामोल्लेख न केल्यास आम्ही पापाचे धनी होऊन- रौरव नरकात खितपत पडू. वर उल्लेखलेला टपाचा प्रसंग हा फक्त फुटकळ विनोद निर्मितीकरता वापरलेला होता. प्रत्यक्षात राहूल-शिल्पा , पूर्वा-विनायक, मिनी-सुनीत ह्यां दांपत्यांनी प्रेमानं आमचं गाडीत स्वागत केलं, डीसी ला नेऊन सुखरूप (ह्या शब्दाची बाराकरांनी नोंद घ्यावी) परत आणलं.
थोडक्यात काय, डीसी ला जाऊन आल्यामुळे अस्मादिकांना कसं एकदम गार गार वाटतय!

गुलमोहर: 

१. कुणालाही दुखावण्याचा हेतू नाहिये, वरच्यापैकी कुठल्याही वाक्यानं कुणाला वाईट वाटलं तर विपूत
लिहा - मी ते वाक्य काढून टाकेन.
२. कुणाचा नामोल्लेख नजर चुकीनं/त्या दिवशी फारसं बोलणं न झाल्यानं राहिला असेल तर सॉरी..:(

नानबा मस्त!!!
राजश्री आणि सीमा यांची परेड मी मिसली, तेव्हा त्याचा डीटेल वृत्तांत माझ्या विपुत लिहावा Happy

'जोगकाका' उल्लेखाने भरून पावलो. कुफेहीपा... Happy
वृत्तांत लय भारी. शेवटी तुच राखलीस हो आपल्या गाडीची.

अरे सगळे सुटलेत आज! जोर्‍यात लिहीलय!
आणि नाव लिहायचं सोडुन तुम्ही दोघंही एका मेकांना नानबा आणि बारिशकर म्हणुन काय संबोधताय? मायबोली चं भुत डोक्यात फारच गेलय वाटतं Wink
आणि हे माफी बिफी मागायचं काय झेंगट गळ्यात अडकवुन घेतलयस. बनी तो बनी नै तो अबदुल गनी! येवढी काळजी करायची काय गरज?

सहीच Happy

सही लिखेला है रे. ऐसा डरनेका नै रे. बिन्धास्तमे लिखनेका. वो रेनमेकर किधरको गया. वोभी लिखनेको मंगताय और.. क्या?. Happy

मस्त झाला आहे लेख.
बाकी मला हट्टाकट्टा म्हटल्याबद्दल आणि त्यावर माबो करांनी विश्वास ठेवल्याबद्दल धन्स....मला गेल्या ३०-३५ वर्षात कोणी हट्टाकट्टा हे विशेषण लावले नव्हते..

मी नाही बदलला.. काल एकदा फक्त क्रमांक दोन आणि तीनच्या मौलिक माहित्या अ‍ॅड करून शिर्षक बदललेलं..
(कोण वापरतंय माझा आयडी? :O)

नानबा, छान लिहीले आहे.
आधी वाचणारच नव्हतो, म्हंटलं काही भयकथा की काय? म्हणून आज सकाळी उठून देवाला नमस्कार करून मगच वाचले.

९. मैत्रेयी ह्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात प्रचंड रस आहे (इतका की कधी कधी निर्मुलन करता यावं म्हणून त्या स्वतःच आधी अंधश्रद्धा पसरवतात, असं काहीसं ऐकिवात आलं) >>>:हाहा: टू मच हां Happy

Lol मस्त जमलाय लेख एकदम. Happy
खाली ते "दुखवण्याचा हेतु" इत्यादी कशाला ? टचकन पाणी काढत "सगळे आपलेच. संभाळुन घेतात." अस म्हणायच किंवा "गेले उडत" अस. Happy

Pages