आणखी उखाणे !

Submitted by कवठीचाफा on 28 March, 2008 - 08:48

हे आणखी काही उखाणे ! यांच्या जन्मदात्या रा.फा.भाव (उर्फ योण्णा ) ला सप्रेम अर्पण.
****************

पी.सी. बंद असतानाही .........
मायबोलीवर असल्यासारखे वाटते,
कारण....... बोलते खवचट,
आणि 'दिवे घ्या' म्हणुन सांगते !

सांगुन सांगुन थकले
कंटाळले सुचना देउन
......रावांची हजेरी घेते
आता डुप्लिकेट ID घेउन.

माझ्या नशीबाचा कधी कधी
मलाच वाटतो हेवा,
सगळे सांगतात 'दिवे घ्या'
आणी ..... रावांची 'बंब सेवा'

..... ने लिहिली प्रेमकविता
ती मला नाही भावली
मग गुलमोहोरवर नेउन
'काहीच्या काही..' मधे खपवली.

सारख्या सारख्या पोष्ट टाकुन
......... वेड्यासारखी वागते
साध्या वाण्याच्या यादीत सुध्दा
दोनचार स्मायलि टाकते !

पाककलेच्या बी बी चा
....... वर प्रभाव वाढला
हिच्या 'बिघडलेल्या पाककृती' खाउन
मी महीना हॉस्पिटलात काढला !

'माझा अनुभव' चाच हा परीणाम
........राव तुम्ही काही म्हणा
प्रेन्गंसी टेस्ट झाल्यावर म्हणताय
हा 'माझा इब्लीसपणा की वेंधळेपणा' ?

......राव माझ्या धाकात
म्हंटल तर घरही झाडतात,
आणि माझ्यावरचा सगळा राग
मग 'V & C' वर काढतात.

......राव मला पटवणं
गोष्ट आहे का ईतकी सोपी ?
जशी रा.फा च्या उखाण्यांची
चाफ़्फ़्याने मारली कॉपी.

गुलमोहर: 

rofl, lol
जबरी आहेत रे हे Happy

>> सारख्या सारख्या पोष्ट टाकुन
......... वेड्यासारखी वागते
साध्या वाण्याच्या यादीत सुध्दा
दोनचार स्मायलि टाकते !

पटलं चाफा.

छान आहेत रे चाफ्या :))

चाफ्फा , सही जमलेत हे उखाणे...... खास करून 'इब्लिसपण की वेंधळेपणा' Wink

btw, ह्या दोन्ही बीबींवर तुझी मक्तेदारी आहे. आम्ही काय समजायचं????? :)) दिवे दिवे दिवे दिवे बंब बंब बंब...........

सही आहेत!!

सांगुन सांगुन थकले
कंटाळले सुचना देउन
......रावांची हजेरी घेते
आता डुप्लिकेट ID घेउन.>>>> .

lol.......... हा घेता येईल Happy

वेड्यासारखी वागते
साध्या वाण्याच्या यादीत सुध्दा
दोनचार स्मायलि टाकते !>> खल्लास.. मला देखिल फार स्वय लागली स्मयली टाकायची.. Happy

योगिनि

amazingggggggggg!!!!!!!!!!!!!!!

छान लिहिलेत की चाफ्फा उखाणे!! Happy Happy

धन्यवाद सगळ्यांनाच ! ते योण्णाचे उखाणे वाचले आणि आपोआप सुचत गेले तसे लिहीत गेलो त्यामुळे सगळे श्रेय राहूलकडे ! Happy
आणि त्या ' वेंधळेपणा आणि ईब्लिसपणा' चा उखाणा काल्पनिक आहे हो मंजुदेवी ( बंबाबद्दल म्हणाल तर झकासबंब सेवा आम्हाला केंव्हाही उपलब्ध आहे Happy !

राफा आणी आता चाफा एकदम धमाल.. आईशप्पथ आज ऑफिसमधे दिलखुलास हसलो
... बाजुचा मला येडपट समजत असणार नक्की.

सहीच रे चाफ्या!!!

अगदी lol बघ!!!

मस्त रे चाफ्या. मजा आला. Lol

chaffa धन्यवाद ! वाण्याच्या यादीत स्माईली >>> Happy Happy

धन्यवाद ! सर्वानाच !
राहूल भाSSSSSSSSSSSय अरे तुझीच कृपा रे एक आख्खा BB चालु झालाय ! तिकडे माझे अनुभव वर !

चाफ्फा : छानच जमले आहेत उखाणे ............. Happy

--
अरूण

Biggrin

ootkhanan

Pages