माझे गावचे आयुष्य आणी न भरनारी जखम

Submitted by आवळा on 24 March, 2010 - 03:08

सर्व मायबोली कराना नमस्कार
ईथे माझा पहिलाच प्रयत्न आहे लिहीन्याचा ...
काही चुकले असेल तर क्षमा करावी

माझा जन्म मराठवाड्यातील एका खेडे गावातला ..
गाव तसा मोठा ८००० लो. सं. होती आणी BSC पर्यंत चे college ...

शिक्षण ई ७ वी पर्यंत त्याच गावी(आजोळी) .. ते पण अगदी बिन्धास्त गावरान लाइफ..

आजी आजोबा दोघे शिक्षक मग आम्हाला उठता लाथ आणी बसता बुक्क्या अभ्यासाठी ..
(तसे अभ्यास सोडुन यथेछ् लाड पुरवले आजोबा आ़जी नी गावी असताना)...

एक मध्यम वर्गीय शिकलेले typical मराठी मानसाचे घर .. ( वाडा होता आमचा खुप मोठा .. १५ कुटुंब भाडेकरु होते )

पण सुशिक्षीत कुटुंब आमचे ... म्हनुन घरुन अपेक्षा अभ्यास करुन मोठा हो परदेशात जा ..

आणी त्यात त्यांचा आनंद द्विगुनित करणारे आम्ही .. याला कारण ही तसेच ....

अगदी जन्मल्या पासुन माझा आणी अभ्यास याचा ३६ चा आकडा
मारुण कुट्न अभ्यासाला बसवायचे आजोबा तरी, आम्ही अभ्यासात शुन्य ते शुन्यच

आजोबा ची इछा नवोदयला जावे, म्हनुन ती परिक्षा दिली तालुक्याच्या गावी जाउन.. ( अर्थात द्यायला लावली ) मग आम्ही कसले qualify होतोय .. फक्त boundry वर पास Happy

आजुन पण तो दिवस आठवतोय.. S.T. bus मधे सर्व मुले पुस्तके उघडुन अभ्यास करतायत आणी आम्चे लक्ष खिडकीतुन पळती झाडे
पाहन्याकडे ते पण जुन्या S.T bus मधे driver च्या मागच्या सीट वर .. front view मस्त वाटायचा

यथेछ मार आणी बोलणी खाउण झाली की आमची स्वारी परत तयार गल्ली मधे गोट्या खेळने ( फकाट ,राजा - राणी ई... ) आणी गावभर बोंबलत फिरणे ई. कार्यक्रम करायला .... ( फिरुन परत घरी आलो की आजोबा म्हनायचे आलात का गावभर कुत्रे मारुन Happy )

इ. ७ वी मधे पण सेम स्टोरी for scholarship exam आणी board exam..

फुल धमाल ... Happy मजा वाटायची खुप .. आणी कीव यायची अभ्यास करनार्या मुलांची .. बिचारे .. त्यांना काय माहीत..
मधल्या सुट्टि मधुन किंवा.. तास सुरु असताना.. मागच्या दारातुन.. पळुन जान्याची मजा..
आणी मास्तुरे नी सर्वा. समोर केलेला अपमान .. म्हन्जे .. स्वर्गातुन सर्व देव मिळुन फुले वाहत आहेत अंगावर असे वाटायचे.. (रामानंद सागर च्या श्री क्रुष्ण मालिके मधे दाखवायचे ना तसे with background music) ईतके आम्ही चांडाळ चौकडी निर्लज्ज

शाळेतुन पळुन जाउन मस्त पै़की.. मित्रा च्या शेतावर जायचे .. हुरडा...सुर्यफुलाच्या बिया.. खाने.. गावा बाहेरुन जानार्या चाल्त्या ट्रेक्टर / बैलगाडी तला उस चोरुण खाणे.. शेतातल्या झाडांच्या चिंचा पाडणे...त्या झाडाचा पाला खाने.. गावाच्या बाहेर तळे आहे ..तिकडे जाउन खेकडे मारणे.. .. गावाबाहेर घाट आहे तिकडे जाउन करवंद /सीताफळ खाणे ई. ई. आवडते खेळ आणी हे सगळे काम मधल्या सुट्टि आणी शाळा सुटायच्या आत करायचे ते पण घड्याळा शिवाय.. सुर्य नारायन देवा ची क्रुपा.. आम्हाला तेंव्हा त्याच्या कडे बघुन वेळ समजायची, बरोबर शाळा सुटायच्या वेळेवर शाळेच्या बाहेर हजर .. Happy

पावसाळ्यात तर विचारु नका .... चिखल म्हन्जे आमचा जीव की प्राण .. पाउस सुरु होउन संपे पर्यंत न चुकता भिजने .. बर्याच वेळेस.. मार खालेल्ला Happy
(आजुनही गावात पाउस पडल्याचा नंतर मातीतुन येनार्या सुगंधाची आठवण झाली की विचार येतो आता किती पण million dollars द्या ते दिवस आणी मजा कधीच परत नाही येनार आयुष्या मधे Sad )

घरी आलो .. की .. मस्त.. आजी नी चुली वर केलेली भाकरी आणी .. वांग्याचे भरीत एकदम झकास Happy

पण एकच गोष्ट नित्य नियमाने करावी लागायची रो़ज संध्याकाळी.. ती म्हन्जे देवा समोर दिवा लावणे आणी .. शुभमकरोती कल्यान्म .. हा
श्लोक म्हनने आणी १ ते ३० ची बाराखाडी ..
आजी आजोबांचे संस्कार .

पण म्हनतात ना सगळे दिवस सारखे नसतात ..

आजी आजोबा नी , आई बाबा कडे सोपवुन दिले शहरात आणि स्वता गेले मामा कडे एका दुसर्या मोठ्या शहरात ...

पण खेड्यातला माकड शहरात आला की हुशार होतो असे थोडेच .. उलट शहरात माकडाला अजुन उन्मादी माकडे भेट्ली Happy

मग काय ८,९ वी मधे पण तीच कहाणी boundry वर पास
७ - ५५%
८- ६०%
९-५८%

शेवटी सगळ्यांनी .. ओळखले हे महाशय सुधरणार नाहीत ह्यांना घराबाहेर ठेउयात ..
घराबाहेर ठेउयात .. म्हनजे एका चांगल्या शहरात (जिथे शिक्षणासाठी खुप पैसे द्यावे लागतात) १० वी साठी

तिकडे एका नामाकिंत शाळेत admission घ्यायचे ठरले .. मी आणी माझे वडील खुप खुप फिरलो .. माझी राहण्याची व्यवस्था करायला
त्या शाळेतील एक गणिताचे शिक्षक होते नाव नाही आठवत आता,त्यांच्या इकडे राहन्याची सोय होणार होती .. पण काही कारणास्तव ते जमले नाही..
मग त्याना (म्हनजे माझ्या वडिलांना) पटेल( म्हनजे मी जिकडे बोंबा मारत फिरणार नाही/ व्यवस्थित अभ्यास करेल) असे ठिकाण सापडले नाही) Happy
शेवटी राहीलो आई , बाबा कडेच ...

मग काय माकडाच्या हातात कोलिथ दिल्यासार्खे ..... अभ्यास मुर्दाबाद... Happy

आजोबा..पण मोठ्या शहरातुन गावी परतले.. नाही तरी त्याना कुठे करमत होते तिकडे.... आणी .. प्रत्येक.. शनी. आणी रवी.
न चुकता ४० कि.मी. अंतर पार करुन(हो त्या काळी हे अंतर फार होते .. दिवसातुन मोजुन ५ बस असायच्या ) येउन अभ्यास घ्यायचे ... खुप खुप इछा त्यान्ची .. मी foreign ला जावे... असो .. पण आमच्या डोक्यात ( किंवा खोक्यात Happy ) काही शिरेल तर शप्पथ ..

पण ते मधल्या काळात आमच्या डोके नावाच्या खोक्याला बर्या पैकी कंटाळले.
आणी .. माझ्या लहान मामा नी त्यांना आणी आजी ला परदेशात घेउन गेले.. Sad
पण आजी आणी आजोबा ची खुप आठवण यायची त्यांना पण माझी... फोन वर ( त्या वेळॉ ISD call प्रचंड महाग होता तरी) बोलायचो .. खुप..

तसे त्यांना तरी कुठे करमले परदेशात .. राहुन राहुन गावातली माणसे ती.. फार फार तर १-२ महिने फिरने आणी कौतुक ... पुन्हा एकेकटे पणा आला मग आले आजी आजोबा परत...
आजोबा नी .. आल्या आल्या मस्त chocolates दिलेली Foreign ची Happy
आणी मग घेतले आम्हाला फाइल वर आणी .. प्रचंड राग व्यक्त केला ... कदाचीत त्यांना कळुन चुकले .. मी काही पास होनार नाही 10th ला....

मग मलाच थोडी लाज वाटली .. म्हनालो त्यांना ... मी खरच करतो आता पासुन अभ्यास...
केला पन अभ्यास थोडा फार १-२ आठवडे .. पुन्हा गाडी .. पुर्व पदावर .. याला बाकीचे माकड मंडळी जबाबदार Happy

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

असो.. पण .. नियती च्या पुढे कधी कुणाचे चालत नाही ...
गावा मधे आजोबा चे भांडण झाले.. पैसे वसुली वरुन (कुणीतरी त्यांचे पैसे बुडवले) .. आणी त्यांना .. heart attack आला...
त्यातच ते गेले... आणी .. अगदी .. शेवट्च्या क्षणा पर्यंत मला hospital मधे भेटायाला नाही येउ दिले
एकच इछा त्यांची "लेकराचा अभ्यास बुडेल कुणी काही कळ्वु नका..."

हे कळाल्यावर पाया खालची जमीनच सरकली..
अवघ्या ४ महिन्या वर १० वी ची परिक्षा असताना हे झाले..

राहुन राहुन डोक्यात तेच वाक्य फिरायचे आणी अजुनही फिरतात Sad

अगदी .. एकही पुस्तक न उघडनारा मी अभ्यास करु लागलो ..
मिळवले १० वी मधे ६७% . आणी १२ वी मधे ९२% .. . झालो ईंजीनियर, संगनक बडवनारा .. आणी आलो .. foreign मधे.

फक्त एकच विचार यायचा मना मधे.. माझ्या आजोबांचा . आणी तो विचार आला की .. परत .. गाडी अभ्याला लागायची..

म्हनाल तर सगळे काही मिळवले आहे .. पण आज आजोबा नाहीत याची खंत वाटते ..

आज ते असते तर छाती फुगवुन त्यांना अभिमानाने सांगितले असते .. तुमची मेहनत वाया गेली नाही ...
तुमच्या माकडाच्या खोक्यामधे डोके गेले आहे ............................................

गुलमोहर: 

छान लिहिले आहे.
मी पण कॉम्पुटर ईंजी. चा विद्यार्थी आहे. माझा पण अभ्यासाच्या बाबतीत नेहमीच हे अस होत असत

झक्कासच लिवलंय, आवडला !!! बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या...

पु.ले.शु., फक्त ण आणि अनुस्वार बरोबर असते तर वाचायला मजा आली असती.

Na = ण
aM = अनुस्वार

साध सरळ आणि मनापासुन लिहीलय. आवडल Happy पु.ले.शु.

टायपो,शुद्धलेखनाच्या चुका सुधारल्यात तर वाचायला अजुन मजा येईल. :)म

प्रतिसादा बद्द्ल सर्वाचे धन्यवाद..

पहिल्याच वेळेस लिहीत होतो मायबोली वर (आणी मराठी मधे using keyboard) त्यामुळे अनुस्वार वगैरे चुकले ..

पुढच्या वेळेस पासुन नक्की काळजी घेइल. Happy

मनापासून लिहिलेलं जाणवतंय.... आवडलं! तुमचे आजोबा नक्की आज तुमची प्रगती पाहून आनंदात असतील. पु. ले.शु. Happy

खूप आवडलं लिखाण....अतिशय प्रामाणिक !!
तुझ्या पुढल्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा Happy

किशोर, आवडलं हे निवेदन... खरच मोकळं-ढाकळं आहे, आतून आलेलं, सहज आहे.
(शुद्धलेखनाकडे खरच किंचित लक्षं द्याल का?... अजूनही हाच लेख तुम्ही परत संपादित करू शकता. खूप कंटाळवाणं काम असतं ते, कबूल आहे. पण तुमचा पहिलाच इथला लेख छानच असावा असं मलातरी वाटतय.)

प्रतिसाद दिल्या बद्द्ल सर्वांचे आभार.
माझे .. हे पहिलेच मराठी लिखान आहे.. on internet. त्यामुळे अनुस्वार, जोड अक्षरे कशी लिहावी हे समजले नाही..
असो. मी ह्या लेखनात आता सुधारणा केल्या आहेत. तरी आणखी suggestions असतील तर नक्की कळवा.

आणी हो उद्या APRIL FOOL DAY आहे जरा जपुन Wink

किशोर.. साधं, सरळ आणि प्रामाणिक लेखन ! आवडलं.... फ़क्त शिर्षकातील (पु.ले.शु.) चा संदर्भ नाही कळला.