ते 'कथा एका मॅरेज सर्टिफिकेटची' वाचलं आणि मला माई आज्जीचा भारी किस्सा आठवला. ती आता नवद्दीच्या आसपास असेल. पण आहे एकदम डॉन! म्हणजे तिच्या वयाकडे बघून ती फिरकी घेईल हे कुणाच्या स्वप्नातही नसतं - आणि अशा वेळेस ती एकदम साळसूद चेहर्यानं गूगली टाकते!
एक एप्रिलला तिच्या घराच्या, आपल्याच फोनच्या आसपासही नाही जायचं - नाहीतर कितीही तयार असलात तरी तुमची विकेट गेलीच म्हणून समजा! तशी सटकफटक असली तरी स्वभावाला मात्र माईआज्जी एकदम गोड! लोकांना आवर्जून मदत करणार, ह्या वयातही लोकांना तर्हेतर्हेचे पदार्थ करून खावू घालणार (म्हणजे फक्त भारतीयच पदार्थ असं नाही बरं का!) वगैरे.
असो, पण तो आजचा विषय नाही! आजचा विषय आहे बर्थ सर्टिफिकेट. साधारण पंधरा वगैरे वर्षापूर्वीची गोष्ट. तर झालं असं तिच्या नातीचं बर्थ सर्टिफिकेट हवं होतं. माझा मामा फेर्या घालून घालून थकला, पण सर्टिफिकेट मिळायला काही तयार नव्हतं. मग एके दिवशी माई आज्जीनं डिक्लेअर केलं 'तुम्हा लोकांना जमत नसेल तर आता मीच जाऊन आणते' - आणि एकदा ठरवल्यावर पार पाडलं नाही तर ती माई आज्जी कसली!
मग ती गेली 'जन्म मृत्यू नोंदणी' कार्यालयात. एका काऊंटरवर जाऊन म्हणाली 'इथले साहेब कोण आहेत? मला त्यांना भेटायचय.'
तो माणूस म्हणाला, "काय काम आहे मला सांगा. मी बघतो."
"ते काही नाही मला साहेबांनाच भेटायचय" इती माई आज्जी.
असं बर्याच वेळ झाल्यावर त्या माणसाला तिच्या वयाचा मुलाहिजा बाळगणं भाग होतं. शेवटी तो तिला साहेबांकडे घेऊन गेला. म्हातारी बाई बघून (आणि खरंतर तिच्या व्यक्तिमत्वातच असा काही गुण आहे की माणूस तिला बघता क्षणीच मऊ/नम्र होतो.) साहेब एकदम आदबीन वागता झाला. 'बसा आजी. काय काम होतं', तो म्हणाला.
'मला मृत्यूचा दाखला हवा होता': आजी.
'मृत्यूचा दाखला? बरं, कुणाचा" : साहेब
निर्विकार चेहर्यानं आजी "माझा" असं उद्गारत्या झाल्या.
"तुमचा?" : साहेब खूर्चीवरून फिजीकली उडायचाच फक्त बाकी राहिलेला
"हो, माझा!" आजी
अजूनही आजींचा अंतस्थ हेतू न कळल्यानं साहेब बिचारा 'जिवंत माणसाचं डेथ सर्टिफिकेट देता येत नाही' हे समजावून सांगण्याच्या प्रयत्नात.
"ते माहित आहे हो" आजी
आता मात्र साहेबाला काय प्रकार चाल्लाय ते कळेना.
"ते माहित आहे हो, पण माझ्या नातीचा जन्म होऊन पंधरा वर्ष झाली, माझा मुलगा अजून हेलपाटे घालतोय जन्म दाखला मिळवण्यासाठी. मग माझ्या मृत्यूनंतर माझ्या नातेवाईकांनी किती वर्ष हेलपाटे घालायचे? ते काही नाही. माझ्या करता कुणाला त्रास नको मी गेल्यावर. मला आताच माझ्या मृत्यूचा दाखला द्या कसा!"
साहेब भर थंडीत घामाघूम!
आणि थोड्याच वेळात १००% काम होऊन माईआजी विजयी मुद्रेनं ऑफिसच्या बाहेर!
बर्थ सर्टिफिकेट (लघुकथा/किस्सा)
Submitted by नानबा on 9 March, 2010 - 10:05
गुलमोहर:
शेअर करा
भारीच आहे तुझी आजी.
भारीच आहे तुझी आजी.
जय हो!!!
जय हो!!!
(No subject)
हाहाहा सह्ही आहे आज्जी
हाहाहा सह्ही आहे आज्जी
हा हा हा हा हा ही ही ही ही
हा हा हा हा हा
ही ही ही ही ही
खी खी खी खी खी
ख्याक ख्याक ख्याक ख्याक
वा वा लै भारी आज्जी
वा वा लै भारी आज्जी
(No subject)
सहीच
सहीच
चला म्हणजे तुमच्या आजींना
चला म्हणजे तुमच्या आजींना सुद्धा तसा अनुभव आलेला दिसतोय... ग्रेट आजी..
नानबा, किस्सा चांगला आहे. पण
नानबा, किस्सा चांगला आहे. पण एक दोन पॅरामध्ये लिहायची घटना उगाच कथा म्हणून टाकली आहे असं वाटलं!
नानबा, किस्सा चांगला आहे. पण
नानबा, किस्सा चांगला आहे. पण एक दोन पॅरामध्ये लिहायची घटना उगाच कथा म्हणून टाकली आहे असं वाटलं!
>> होय, म्हणूनच मी इतके दिवस टाकत नव्हते.
ते मॅरेज सर्टिफिकेटचं वाचून टाकायचं ठरवलं.
पण कुठल्या हेड खाली टाकावी तेच नाही सुचलं.
लघु कथा असा काही विभाग नाहिये.
इतर कुठे बसत असेल तर सुचव - मी शिफ्ट करते तिकडे
जन्म, मृत्यू, लग्न व तत्सम
जन्म, मृत्यू, लग्न व तत्सम दाखल्यांचे किस्से - असा बीबी काढावा लागेल.
जन्म, मृत्यू, लग्न व तत्सम
जन्म, मृत्यू, लग्न व तत्सम दाखल्यांचे किस्से - असा बीबी काढावा लागेल.
हे हे हे..
मस्त किस्सा... .. तो
मस्त किस्सा... .. तो श्रिकेचा पण किस्सा मस्त आहे.
सही किस्सा. एक पाटी वाचली
सही किस्सा.
एक पाटी वाचली (अर्थात पुणेरी): जन्म-मृत्यू दोन दिवस बंद राहील.
मधे 'कार्यालय' हा शब्द टाकायला विसरले
मस्त लिं.टिं.ला हसता हसता
मस्त
लिं.टिं.ला हसता हसता खोकला लागला
लहान परंतु मजेशीर कथा. एक
लहान परंतु मजेशीर कथा. एक आजोबा आजारी असल्यामुळे नंतरच्या महिन्यात पेन्शन आणण्यासाठी पोष्टात गेले तर तेथील कारकुनाने आजोबांकडे मागच्या महिन्यात हयात होता असे डॉक्टरचे प्रमाणपत्र मागितले होते.
माझ्या भाचीचा जन्म चिंचवडला
माझ्या भाचीचा जन्म चिंचवडला झाला. तीच बर्थ सर्टफिकीट आणायला मी गेलो. रितसर अर्ज सोमवारी दिला. बुधवारी सर्टफिकीट घ्यायला बोलावल होत. त्याच दिवशी संध्याकाळी मिऱज कोयना एक्सप्रेस ने मुंबईला जायचे होते सर्टफिकीट घेऊन बहिणीला द्यायला. शाळेची अॅड्मिशन होती दुसर्या दिवशी. ३.४० दुपारी मी महानगर पालिका कार्यालयात. सर्टफिकीट तयार नव्हत कारण त्यासालच रजिस्टर सापडत नव्हत. मी धड्क मंडल प्रमुखांना गाठ्ल. तोंड ओळख होतीच. त्यांनी सर्व लिपीकांना लाईनीत उभ केल व दम दिला. आज सर्टफिकीट नाही दिल तर कुणीच घरी जायच नाही. एका हुशार प्युन ने ८४ सालच रजिस्टर शोधल. सर्टफिकीट बनल ४.३० मिनीटांनी. मंडल प्रमुख मला सोडायला चिंचवड रेल्वे स्टेशन वर. एक मित्र पुढे गेला होता तिकीट काढायला. गाडी मिळाली. सगळ जमल. सावकाशीन मी मंडल प्रमुखांना विचारल. ते म्हणाले एका माहिला लिपीकाने ते खुर्चीवर बसायला घेतल होत. कारण त्याची उंची कमी होती. हे फक्त पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत घडल अन्यत्र अस घडण्याची सुतराम शक्यता नाही.
एका माहिला लिपीकाने ते
एका माहिला लिपीकाने ते खुर्चीवर बसायला घेतल होत. कारण त्याची उंची कमी होती. >>>
सहीए तुझी आज्जी!!
सहीए तुझी आज्जी!!
माईआजीला दाद द्यावी तितकी
माईआजीला दाद द्यावी तितकी थोडीच. 'सरकारी काम आणि सहा महिने थांब'ला यशस्वी तोड!
मला त्या अधिकाऱ्याचा त्या वेळचा चेहरा पाहण्याची आस लागून राहलीये आता.
सही आहेत माई आज्जी.
सही आहेत माई आज्जी.
सह्ही आहे ही आज्जी! अशी
सह्ही आहे ही आज्जी! अशी धडाडी पाहिजे.... बिनधास्त!
माझ्या बहिणीला तिचे बर्थ सर्टिफिकेट इंग्रजीत हवे होते. ती परदेशात, आम्ही भारतात, असा कारभार.
मग आईवडील घालत होते खेटे त्या कार्यालयात.... त्यात टोलवाटोलवी तर इतकी की विचारू नका! शेवटी एकदाचे मिळाले, तिला फॅक्स केले, स्कॅन करून ईमेल केले....पण हाय रे! तेथील कारकूनाने तारीख पुन्हा मराठीत घातली होती! साहजिकच ते तिथे परदेशात रिजेक्ट झाले. पुन्हा खेटे.... पुन्हा टोलवाटोलवी! बर्याच प्रतीक्षेनंतर काम झाले!
त्या वेळेला असेच अनेक परदेशस्थित मराठी मुलांचे पालक तिथे भेटत.... त्याच कामासाठी!
एक वयानं पोक्त, मोठं कुंकू लावणार्या, नऊवारी नेसलेल्या बाईही यायच्या तिथे.... बहुधा फारशा शिकलेल्या नसाव्यात! त्यांना जेव्हा सांगितलं की बर्थ सर्टिफिकेटसाठी त्या हॉस्पिटलचा तसा दाखला लागेल किंवा डॉक्टरांच्या सही - शिक्क्याची कागदपत्रे लागतील तेव्हा त्या बाई कपाळाला हात लावून मटकन खालीच बसल्या! त्यांना विचारले, काय झाले, तर म्हणाल्या, "आवं, माझं बाळंतपण तर घरीच झालं आन सुईणीनं क्येलं.... आता कुठून आनू मी ह्ये सर्टिफिक्येट!" उपस्थितांपैकी कोणालाच काय बोलावं ते सुचलं नाही!
नानबा आणि इतर.. असे किस्से
नानबा आणि इतर..
असे किस्से तुम्ही ह्या पानावर टाकू शकता... विरंगुळा ग्रुप मधे आहे हे पान..
मस्तच आहे किस्सा सही आहे
मस्तच आहे किस्सा
सही आहे तुझी आजी नानबा!!
पराग, एक धागा किश्श्यांचा
पराग, एक धागा किश्श्यांचा देऊन तू शंभर धागे कथांचे वाचवलेस बघ..
धन्यवाद!
लालू
लालू
<<कारकुनाने आजोबांकडे मागच्या
<<कारकुनाने आजोबांकडे मागच्या महिन्यात हयात होता असे डॉक्टरचे प्रमाणपत्र मागितले होते.>>
त्याचे कारण असे की पेन्शन देण्या आधी जिवंत असल्याचा दाखला द्यावाच लागतो, तसा कायदा आहे. तो दाखला न घेताच पेन्शन दिले तर बिचार्या कारकुनाची नोकरी जायची.
आता या महिन्यात जिवंत होता म्हणजे मागच्या महिन्यात होताच, हे सगळ्यांना समजते, पण तसे करायला कदाचित् वरच्या अधिकार्याची परवानगी पाहिजे, किंवा काहीतरी अशी कायद्यात सोय पाहिजे की ज्यायोगे हे असे करावे लागणार नाही. आता ती सोय कधी होईल, कोण करेल वगैरे वेगळा प्रश्न आहे.
असले प्रकार इथे पण होतात! इथे जरा आरडा ओरडा केला की ते प्रश्न सुटतात. पुष्कळदा फोनवरूनहि. कारण प्रवृत्ति कामे करण्याकडे आहे, अडवण्याकडे नाही.
आता तुम्हा सर्वांना या अडचणी का येतात माहित नाही. मी चाळीस वर्षांपूर्वी भारत सोडला. तत्पूर्वी मला हि हे सगळे धंदे करावे लागले, पण एव्हढा त्रास झाला नाही. त्यामानाने आता परिस्थिती सुधारायला नको का?
माझ्या जन्माचा दाखला नव्हता, कारण मी अनेSक वर्षांपूर्वी जन्मलो. तेंव्हा दाखले वगैरे एव्हढे महत्वाचे नव्हते. पण अमेरिकेत येताना दाखला पाहिजेच्. तशी जन्मतारीख इतर दाखल्यांवर असतेच, पण अमेरिकेचा विश्वास नाही. त्यांना इथल्यासारखेच जिथे जन्म झाला तिथल्या इस्पितळातून किंवा मुन्शिपल्टीकडून केलेला दाखला पाहिजे होता. मग माझ्या धाकट्या भावाने जाऊन शपथेवर सांगितले की माझा मोठा भाऊ अमुक वेळि जन्मला. मग दिला तो दाखला मुन्शिपल्टीने. म्हणजे कसे, कायद्याने कामे केली, सगळी कागदपत्रे व्यवस्थित केली की काम होते.
मला दुचाकीचा परवाना हवा होता. गर्दी प्रचंड. मग त्या अधिकार्याने सांगितले, आठचा आकडा काढून दाखव. मी मराठी आठचा काढला (तसा तो आपोआपच आला म्हणा.) आता कुठे वेळ घालवता मराठी नाही इंग्रजी आठ असा वाद घालण्यात. देऊन टाकला झाले त्याने परवाना. तसे नागपुरात त्या वेळी आम्ही प्रसिद्ध. काय हवे ते मिळत असे, मुन्शिपल्टीतुन, इतर सरकारी कचेर्यांतून. शाळा कॉलेजातून सुद्धा.
मस्त! एकदम आवडल्या आजी!
मस्त! एकदम आवडल्या आजी!
मी मराठी आठचा काढला (तसा तो
मी मराठी आठचा काढला (तसा तो आपोआपच आला म्हणा.) >>> झक्की कुठे कागदावर की दुचाकी फिरवुन
Pages