बोलका

Submitted by नितीनचंद्र on 8 March, 2010 - 06:18

कथा वाचकहो,

ही कथा वाचण्यापुर्वी माझी राखण ही कथा वाचावी हि विनंती. अन्यथा काही संदर्भ लक्षात न आल्याने कथा वाचनाचा पुर्ण आनंद मिळणार नाही.

नसली वाचल्यास ही लिंक घ्या. http://www.maayboli.com/node/14421 राखण

बोलका ही कथा राखण या कथेचा पुढ्चा आणि बहुदा शेवटचा भाग आहे. कथा कशी वाट्ली हे सांगाच. मला माहित आहे यात अनेकांना मी पटणार नाही अस लिहील आहे. सर्व काही प्रत्येकाला पटावेच हा आग्रह अजिबात नाही. ज्यांना विचार पट्णार नाही त्यांनी कथावाचनाचा आनंद घ्यावा, विचार सोडुन द्यावा हि विनंती.
----------------------------------------------------------------------------------

बोलका

दापोलीला जायला मी पुण्याच्या स्वारगेट एस. टी. स्टॅड वर वाट पहात होतो. पुणे दापोली दुपारी दोन ची गाडी, भोर मार्गाने जाणारी येत आहे अशी घोषणा झाली . मला शनिवार अर्धा दिवस सुट्टी असते. दुपारी दोन ची गाडी पकडली की रात्री आठला दापोली हा परिपाठ. गेले ३-४ वर्षे आंब्याच्या सिझन मध्ये जवळपास प्रत्येक शनिवार ठरलेला. शनिवारी रात्री दापोलीला मुक्कम. रविवार सकाळ वाडीची काम उरकायची.रविवारी दुपारी दोन ची गाडी भोर मार्गाने पुण्याला जाणारी गाडी परत यायला.

गाडीत बसणार तोच एक आवाज आला.
"नमस्कार खोतसाहेब ओळखल का?"
मी आवाजाच्या दिशेने पाहीले. ते मास्तर होते. मला भुतांच्या राखणीची व्यवस्था लाऊन देणारे. मी नमस्कार म्हणालो आणि पळ काढावा असा विचार करताच ते म्हणाले " हीच का पारख केली माझी ? मी तुमच्या भल्याचा विचार करुन संतारामला तुमच्या वाडिवर दिला राखण करायला. तुम्ही मला पाहुन पळायचा विचार करताय.?"

मी म्हणालो "कोण संताराम ? कोण पळतोय ?"
मास्तर म्हणाले " वा संताराम परत दिसला नाही म्हणुन काय झाल ? चोरी नाही ना झाली आंब्याची कधी ? बाकी संताराम ला तुम्ही विसरुच शकणार नाही. अस्सल कोल्हापुरी भाषा, कमरेला धोतर, अंगात बंडी आणि फरशी कुर्‍हाड घेतलेला तो, कसा विसराल तुम्ही ?

मी म्हणालो " नाही नाही, विसरलो नाही, त्याचा नाव त्यावेळेला विचारल नाही त्यामुळे लक्षात नाही इतकच"

मास्तर म्हणाले " बाकी तुम्ही धिराचे हो, प्रचिती घेण हे काम मोठेच अवघड. मागे एकदा एकाला असाच भेटलो आणी प्रचिती घेताना त्याला घेरी आली हो. मग काय त्याला भरती केली हॉस्पीट्लात. आठ दिवस जाम होता.

मी म्हणालो " आता काय काम काढल माझ्याकडे ?"

मास्तर म्हणाले " मी तुमचे कायमचे काम केले. संताराम आताश्या चोरांनाच कोंबड्या द्यायला लावतो. त्याशिवाय चोरांची पाठ सोडत नाही. तुमच्या वाडीची राखण चालुच आहे. तुम्हाला काही त्रास नाही मग माझे एक काम कराच."

मी म्हणालो " काय काम ?

मास्तर म्हणाले " मला एक हजार रुपये द्या आणि या सावजीला एक महिना सांभाळा. मला कोल्हापुरला जायचे आहे महत्वाच्या कामसाठी. तिथे याची अडचण नको."

मी म्हणालो " कोण सावजी ? कुठे आहे ? हजार रुपये काय म्हणुन देऊ ? माझा स्वर पैशाच्या बाबतीत जरा नरमाईचा होता.

मास्तर म्हणाले " हे पाह खोतसाहेब. आपल अस ठरल होत की दर वर्षाला एक हजार रुपये तुम्ही मला द्यायचे. चार कोंबड्या संतारामला. संतारामन स्वत:ची सोय केली. माझे तीन हजार रुपये तुमच्याकडे बाकी आहेत.

मी म्हणालो " म्हणजे तुम्ही मांत्रीक तर. हे तुम्ही मला आत्ता सांगताय. हे पहा मी आत्ता निघालो दापोलीला. आत्ता मला वेळ नाही." मागे वळुन न पहाता मी एस.टी. त चढ्लो. कंड्क्टर जणु माझीच वाट पहात होता. त्याने बेल दिली. एस.टी. सुरु झाली. मी निश्वास टाकला. हळुच स्वत:शी बोलालो "सुट्लो एकदाचा." "सुटलात?वाट पहा" माझ्या कानात आवाज झाला. मी इकडे ति़कडे पाहिल. कोणीच दिसल नाही मग कानात कोण बोललं? भास असावा अस मी मनाशी म्हणालो. आता आमची एस.टी. स्वारगेट एस.टी.स्टॅड च्या बाहेर आली आणि घुर्...घुर.. आवाज करत बंद पडली.

ड्रायव्हरने सर्व कसब पणाला लाऊन स्टार्टर मारला पण अह. हलेना जागची. दुपारच्या उन्हात कंड़क्टर व इतर प्रवाशांनी धक्का मारुन बाजुला घेतली.

मी म्हणालो जरा बघा, मेकॅनिक बोलवा.

कंड़क्टर म्हणाला ते काय सांगायला पाहिजे का? हे मेकॅनिक, साले वेळेवर तेल पाणी पहात नाहीत. कामाच्या वेळेला असा होता. तो पहा ,बघा कसा डुलत डुलत येतोय. निळा डगला घातलेला एक जण आमच्या एस. टी च्या दिशेने येत होता. त्याच्याकडे बोट दाखवत कंडक्टर बोलला. आता नुसताच येतोय. आधी नुसतच पाहील मग ह्त्यार आणायला परत मागे जाईल तो चहा पिऊनच परत येईल एका तासान. कंड़क्टरने मळमळ ओकली. आता काय होणार आहे याची कल्पना सर्व प्रवाश्यांना आली होती.

"दुसरी एस. टी. सोडा म्हणाव, प्यॅसेंजरचा टाईम जातोना" एक प्रवासी ओरड्ला. हो.. हो बाकीच्यांनी गलका केला.
"हे सर्व त्या डेपो मॅनेजरला सांगा. "कंड़क्टरने आता कान टोकरायची चांदीची काडी कानात घातली. शांतपणे ति आपल्या जागेवर बसुन फारसा उत्साह न दाखवता म्हणाला.

चला चला, भेटु डेपो मॅनेजरला म्हणत काही उत्साही प्रवासी खाली उतरले आणि डेपो मॅनेजरच्या ऑफिसकडे गेले. मी, काही म्हातारे प्रवासी, लहान मुले, त्यांच्या आया आणि ड्रायव्हर कंड्क्टर येव्हडेच त्या बंद एस. टी म्ध्ये बसुन राहिलो.

पाच दहा मिनीटांनी सर्व परत आले. "छे ! हे एस. टी. महामंडळ म्हणजे कहर झाला. एक प्रवासी आल्या आल्या सामान गोळा करत म्हणाला .डेपो मॅनेजर सरळ म्हणाला बस कॅन्सल. पैसे परत घेऊन जा ही त्याची भाषा. ही बदमाशी आहे सगळी. या एस. टी. महामंडळाच खाजगीकरण करायला हव आहे. बर रिझर्वेशन नव्हत, नाहीतर पैसे परत घ्यायला रांग लावावी लागली असती.

भोर, महाड पर्यंत जाणारे दुसर्‍या बस च्या शोधाला लागले. त्याचाही पुढे जाणारे एकतर परत घरच्या दिशेला किंवा खाजगी वाहनाच्या शोधात गेले. दुसरा पर्यायच नव्हता. यामार्गावर यानंतर बसच नव्हती.

मी ही परत निघालो. तस महत्वाच काम नव्हत. वाडीला आंब्याच्या सिझनला पाहणे हेच महत्वाच काम होत. फळ वाढ्तय का, रोग नाहीना पडला, हे आपल्या डोळ्याने पहाणे मह्त्वाचे होते जे पुढ्ल्या शनिवारी होऊ शकत होते. गड्याचा फोन आल्यास रजा काढणे हा पर्याय होताच.

एस.टी. च्या बाहेर पड्ताच कोणीतरी कानाशी कुजबुजल. " समोरच्या इराणी रेस्टॉरंट मध्ये मास्तर तुमची वाट पहात आहेत." आता मात्र कहर झाला. मी पुन्हा एकडे तिकडे पाहिले. माझ्या कानात कुजबुजेल येव्हड्या अंतरावर कोणीच नव्हते. मग हा आवाज आला कुठुन ? मी समोरच्या आयडियल रेस्टॉरंट कडे पाहिल. मास्तर मला हात दाखवत होते. काय प्रकार आहे काही कळेना. विचार केला बघुयातर काय म्हणतात मास्तर ? येऊन जाऊन पैसे तर मागणार. देऊयात झाल. मागच्या वेळेस फायदाच झाला.

मी समोरच्या इराणी रेस्टॉरंटमध्ये गेलो. मास्तरांच्या समोरची खुर्ची सरकवुन बसलो. मास्तर "म्हणाले काय खाणार "? मी म्हणालो "मी जेऊन निघालोय. दुपारी चहाची पण वेळ झाली नाही. पण तुमच्या बरोबर घेईन चहा." मास्तरांनी एक मस्का बन दोन चहाची ऑर्डर दिली. "मस्का बन हा इथला स्पेशल आणि खिशाला परवडणारा" मास्तर हसत म्हणाले. भुकेले असावेत.

मला का बोलावलत परत ? मी मुद्याला हात घातला.

"नाही मगाशी म्हणालात वेळ नाही, आता आहे म्हणुन बोलावल" मास्तर मिश्कील हसत म्हणाले. " मग देताय ना हजार रुपये ? मास्तर आता मात्र गंभीर झाले होते.
मी मुकट्याने खिशात हात घालुन पाकिट काढले. पाचशेच्या दोन नोटा मास्तरच्या हातात सरकवल्या. चहाची वाट पहाता मी उठ्लो आणि निघु पहात होतो तोच मास्तर म्हणाले " अहो निघालात कुठे माझ आणखी एक काम आहे तुमच्याकडे, शिवाय चहा ही राहिलाय तुमचा"

मी काही बोलाणार तोच मास्तर म्हणाले " माझ्या सावजीला एक माहिना सांभाळा"

मी भडकलो. " काय हो कोण हा सावजी काय संबंध त्याचा माझा"

मास्तर म्हणाले " रागाऊ नका, तुमच्या सारखा एखादाच माणुस लाखात एक असतो जो भुतांना घाबरत नाही. दुसर की तुम्हाला भुतं दिसतात. तिसर आणि महत्वाच भुत ही एक प्रकारची माणस आहेत. सहसा ती चुकिची काम करायला तयार नसतात. मला खात्री आहे की सावजीला तुम्ही वाईट कामासाठी वापरणार नाही. सावजी पण सरळ आणि सज्जन भुत आहे. महिनाभारत झालाच तर फायदाच होईल तुम्हाला.

जो तुमच्या कानात दोन वेळा बोलला तो सावजी."

" सावजी भुत आहे तर? सांभाळायच म्हणजे काय ? आणि तुम्ही का सांभाळत नाही ? अस काय काम आहे जे सांभाळुन तुम्हाला याला संभाळता येणार नाही ? मी जरा आवाज चढवुन बोललो.

"खोतसाहेब तुमचा मुद्दा रास्त आहे. तुम्ही रागाऊन मला गेल्या तीन वर्षांची दक्षिणा पण द्याल आणि म्हणाल, मास्तर व्यवहार म्हणुन मी जे देण लागतो ते मी देतो पण हे काम मला सांगु नका.

खोतसाहेब, मला जास्त पैसे नकोत. मला व्यवहाराच्या पुढे जाऊन मदत पाहिजे ती फक्त तुम्ही करु श़कता."

अहो हा सावजी जिल्हा परिषदेत प्युन होता. याला कोणतीही बातमी काढायला सांगा हा हि बातमी तुम्हाला तो पोचवेल. याची अडचण आहे, याला आहे सिगारेटच व्यसन. हा आहे भुतांच्या योनीत, कुठेही जाऊ शकतो आणि व्यसनापोटी कोणाचही काम स्विकारु शकतो. ह्याचा वापर राजकीय कामासाठी होऊ शकतो, गुन्हेगारी साठी होऊ शकतो. हेच मला टाळायचे आहे.

याला रोज एक सिगारेट लागते. सावजी ती विकत घेऊन पेटवू शकत नाही. सलग तीन दिवस याला सिगारेट न मिळाल्यास हा विव्हळु लागेल. हा आवाज जर दुसर्‍या मांत्रीकांच्या कानावर गेला तर हा माझ्या हातातुन जाईल. ते गुन्हेगारी, राजकीय, वा अन्य कारणांसाठी भुतांचा वापर करणारे लोक याला वश करतील. तुम्हालाही सिगारेट लागते हे मी पाहीलय. तुम्ही याला एक सिगारेट रोज एकांतात द्या. आणि काहिही काम सांगा. अस काम जे तो करु शकतो. हा पाहु शकतो, ऐकु शकतो, ऐकलेले आपल्या कानात येऊन सांगु शकतो. या पेक्षा वेगळे हा करु शकत नाही.

हा कर्णपिशाच्य आहे काय ? मी घाबरुन विचारले.
नाही नाही तुम्हाला वाट्ते तसा हा कर्णपिशाच्य नाही. मास्तर घाईघाईने म्हणाले.

हे साध भुत आहे. याला बोलता येत म्हणुन याला बोलका म्हणतात.

कर्णपिशाच्य हे मोठ वेगळ भुत, जे माणसाच्या मनाचा वेध घेऊ शकत, बंद पाकिटातले पैसे मोजुन सांगु शकत, बंद फाईल मधले शेरे वाचु शकत म्हणुन गुन्हेगारी, लबाडी करणारे कर्णपिशाच्यांच्या मागे असतात. त्यांचा शेवट ही वाईट असतो.

"माझ्यावर विश्वास ठेवा, मी भलत लचांड तुमच्या मागे लावणार नाही." मास्तर काकुळतीला येऊन म्हणाले

मास्तरांच बोलण पटत होत. हे समजत नव्हत की ते अस कोणत काम करायला चालले आहेत जिथे ते सावजीला घेऊन जाऊ शकत नाहीत.

मी विचारले "मास्तर तुम्ही अस कोणत काम करायला चालले आहात जिथे सावजीला घेऊन जाऊ शकत नाही ?"

मास्तर म्हणाले " माझे गुरु कोल्हापुरजवळच्या गावात रहातात. त्यांनीच मला भुतांना वश करायची विद्या शिकवली. काही भाग जो त्यांनी मला शिकवला नाही तो ते आत्ता शिकवु इच्छीत आहेत. कारण त्यांचा अंतकाळ जवळ आला आहे. ही साधना मोठी कठीण असते. यावेळेत सर्व बंघने सोडुन एकाग्रता लागते. बारा बारा तास सलग मंत्र- तंत्र यांचा अभ्यास असतो. यासाठी याला संभाळा. सावजी मला मुलासारखा आहे.

मला काय झाल होत माहित नाही. मला भिड पड्ली. मी म्हणल ठीक आहे. पण फक्त एकच महिना. एक महिन्यानंतर मी सावजीला संभाळणार नाही.

मास्तर म्हणाले. काय सांगु खोतसाहेब. मला तुम्ही मोठ्या अडचणीतुन बाहेर काढ्ल.

मी म्हणल मास्तर, मस्का बन वाट पहातोय . मी चहाचा कप तोंडाला लावला.

काय हो मास्तर तुम्हाला हे सर्व का करावस वाटत ? या ऐवजी दुसर्‍या गोष्टी का नाही करत.

बन चा तुकडा सावकाश चावत मास्तरांनी एक चहाचा घोट घेतला आणि माझ्याकडे पहात सुरवात केली

माझ्या जीवनाची कहाणीच मोठी अजब आहे. माझी आई साठ वर्षाची असताना मी जन्माला आलो. अशक्य वाटतय ना ? ती मोठीच मांत्रीक होती. विंचु उतरवणे, सापाच विष उतरवणे हे तर मी माझ्या आईच्या सोबत पाचव्या वर्षी शिकलो. मी दहा वर्षांचा असताना ती मला सोडुन गेली. तिला आणखी काही शिकायच होत. जाताना मला म्हणाली लोकांना मदत कर. संसार तर सगळेच करतात. तु वेगळे कर. मग मी वेगवेगळ्या मांत्रीकांना भेटलो. साप - नाग, पक्षी - प्राणी यांना वश करु लागलो. वेगवेगळ्या भाषा शिकलो. मी तुमच्याशी कोकणी लोक बोलतात तस बोलतो, हे मी शिकलोय. माझी मात्रुभाषा बंगाली. वयाच्या विसाव्या वर्षी मला माझ्या गुरूंना भेटण्याचा योग आला. त्यांनी भूत वशीकरण शिकवल. मग या भुतांना जो पर्यत मुक्ती मिळत नाही तो पर्यत त्याच्या गरजा पुरवुन वाईट लोकांपासुन दुर ठेवण्याच काम करतो आहे. मला स्वत:ला अन्नाला कमी पडल नाही. संसार केलाच नाही, घर नाही म्हणुन गरजा फारश्या नाहीत.

मी म्हणालो "काय हो मास्तर हा सावजी भुत का झाला ? "

याची कहाणी मोठी विचीत्र आहे. हा प्युन होता. आतली माहिती बाहेर आणि बाहेरची आत करुन रग्गड कमवत होता. पुढे याला दारुचा नाद लागला. घरी लक्ष नाही, त्यात याने दुसर लग्न केल. मग पहिलीची किंमत कळाली. तोवर पहिली बायको व तीची मुल स्वताच्या पायावर उभी राहिली. याची नोकरी संपली तेव्हा हा एकाकी पडला. पैसे संपले. अनेक नवीन व्यसन लागली. शेवटी सिगारेट ओढायची इच्छा असताना गाडीखाली आला. पहिल्या बायकोच्या मुलांनी ना याला अग्नी दिला ना दहावा केला. राहिला फिरत एकडे तिकडे. एक दिवस माझ्या नजरेला पडला. आता माझ्या सोबत आहे.

ज्यांचे दिवस- वार होत नाहीत ते सर्वच असे फिरतात ? मी विचारले

मास्तर म्हणाले " नाही, सर्वच असे फिरत नाहीत. जे मुळात सज्जन असतात, पुण्यवान असतात त्यांना याची गरज नसते. त्यांना दहावा, पिंड्दान याचीही गरज लागत नाही. ते सर्व याविघींशिवाय मुक्त होतात. ही गरज फक्त सामांन्याना असते. असो, हा मोठा गहन विषय आहे आणि तुमच्या पचनी पडायला अनेक अनुभव घ्यावे लागतील. काही लोक तर यावर विश्वासच ठेवत नाहीत. त्यांच्या मते म्रुत्युनंतर सर्व काही संपत. म्रुत्युनंतरही जीवन असत हे सत्य मानाव की नाही हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे. "

"चला मला जायला हव" मास्तर म्हणाले. मास्तरांच्या चेहेर्‍यावरचे भाव आनंदी, व समाधानाचे होते. "अरे हो हि बस बंद पडली हा योगा योग नाही बरका खोतसाहेब. सावजीने ड्रायव्हर, कंडक्टर यांचा संवाद ऐकला होता. त्यांनी मे़कॅनिकला सामिल करुन घेऊन बस बंद पाडली." म्हणुन तो तुम्हाला " सुटलात ? वाट पहा." तुमच्या कानात म्हणाला.

"च्यामारी , अशी होती काय ड्रायव्हर, कंडक्टर ची गेम ? मी म्हणले. " बस कॅन्सल अस आधीच सांगीतल असत तर लोक चिडले असते. या ऐवजी चालु करुन बंद पाड्ली की लोक फारसे नाराज होत नाहीत. म्हणतात होत अस कधी कधी.

मास्तरांनी माझा निरोप घेतला आणि ते कोल्हापुरची एस. टी. पकडायला गेले. सावजी मला दिसत नव्हता. मी म्हणल " चला सावजी, घरी जाऊया." सावजी कानात बोलला. "घराजवळ एखादी अडगळीची जागा, झाड असल ना ? मी थित राहीन. राती या सिगरेट घेऊन, मग बोलत जाऊ आपण कस ?

मी म्हणालो " घराबाहेर का हो ? तुम्हाला काय झोपायला जागा लागते का जेवायला लागते ?"
तस नव्ह खोतसाहेब तुमच्या घरात बायका मुल असणार मी जर चुकुन त्यांच्या नजरला पड्लो तर झाला घोटाळा ? भुत घराच्या बाहेर बरी, काय ?

सावजीच हे शहाणपण ऐकुन मी गप्प राहीलो. रिक्षा केली घरी आलो. येताना विचार आला बर झाल, सावजी घरा बाहेर राहीन म्हणाला. हा घरात कुठे बसलाय आणी काय काय पहातोय ? नसती चिंता नाही.

मी घरात पाऊल टाकल अन, सुमीन विचारल " हे काय ? दापोलीला न जाता परत आलात ? तब्येत बरी आहे ना ?

होग, तब्येतीला काही नाही झाल. एस. टी. कॅन्सल झाली. ट्र्क नी जायचा व्याप करण्यायेव्हड तातडीच कामही नाही. मग आलो परत.

चहा पिणार ? चार वाजलेत, का उशीर आहे चहा प्यायला ?
"नाही टाक लगेच," मी म्हणालो.

सुमी आत गेली, मी पेपर काढला आणि तेव्हड्यात माझा मोबाईल वा़जला. माझ्या बहिणीचा फोन होता. बोल ताई मी माझ्या मोठ्या बहिंणीशी बोलु लागलो.

"उमेश यांना रात्री छातीत दुखल, वाट्ल किरकोळ असेल. आज यांनी रजा टाकुन सर्व तपासण्या केल्या. तशा ते नेहमीच करतात. आत्ताच रिपोर्ट आलेत. यावेळेला कार्डीओग्राम बिघडला आहे. फारस काळजीच कारण नाही."

"पुढे काय म्हणाले डॉक्टर, मोकळेपणाने बोल." मी रेखाताईला विचारल.

" ते म्हणाले, पुण्याच्या रुस्तम हॉस्पिटल मध्ये अ‍ॅजिओग्राफी करुन घ्या आवश्य्कता वाटल्यास अ‍ॅजिओप्लॅस्टी तिथेच करा. त्यांनी पत्र दिलय. तुझ्या मदतीशिवाय पुढे जात नाही येणार. राजापुरात यापेक्षा काही सोय नाही"

"काही काळजी नको. कधी येताय ते सांगा. मी रजा काढ्तो, शिवाय सुमी आहेच मदतीला" मी आश्वासक एका दमात बोललो. पैश्यांची सोय काय ? मला ते ही सांग"

" उमेश पैशाची अडचण नाहीरे पण पुण केव्हड मोठ झालय. तुझ्या मदतीशिवाय सगळ अवघडच की" ताईने खुलासा केला. " ह्याच्याशी बोलुन पुण्याला कधी येणार ते कळवते.

ताईन फोन ठेवला. मी सुमीला सर्व कल्पना दिली. ही पहिलीच वेळ, जेव्हा ताईन मला मदत मागितली. चहा पिता पिता सुमीन सुध्दा काय वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवली त्यामुळे जीव भांड्यात पडला.

रात्रीच जेवण झाल. मी टेरेसवर गेलो. कर्वेनगरच्या माझ्या स्वतंत्र घराला आंगण, दरवाज्यात नारळाच झाड, भरपुर फुलझाड सर्व काही व्यवस्थित होत. टेरेसवर येताच मी सिगारेट शिलगावली. पहिला धुर बाहेर येताच सावजीची धुसर आक्रुती अंधारात दिसु लागली. साधीशी पॅट, शर्ट घातलेला तो सावजी माझ्यासमोर उभा होता. आना माझी सिगारेट तुमी दुसरी ओढा. त्याने मला हुकुम केला. मी मुकाट्याने त्याच्या हातात सिगारेट दिली.

मग कुठे मुक्काम केलाय ? मी विचारल.

"समोर नारळाच्या झाडावर " मोठ्ठा कश मारत सावजी म्हणाला.
"उद्या पासुन मला तुमच्या बरोबर रहायचय. दिवसा मी कुणाला दिसणार नाही. जिथ जाल तिथ मला न्या. तुम्ही जे बोलाल त्यावरुन मी इतर माणसं काय बोलातात ते तुम्हाला कानात सांगेन." सावजी म्हणाला. नाहीतर मी वेळ कसा घालवायचा ?

रविवारी सकाळीच ताईचा फोन आला निघतोय म्हणुन रात्री पोचु पुण्याला. साधारण दर चार तासांनी फोन येत होता. दर तीन चार तासांनी कुठे पोहोचलो ते फोनवर ताई सांगत होती. शेवटी ताई व प्रशांतराव म्हणजे माझे मेहुणे पुण्याला रात्री पोहोचले.

जेवणे झाली मी पुन्हा सिगारेट ओढायला पुन्हा टेरेसवर. साव़जी हजर होताच. सिगारेट पेटवल्यावर म्हणाला "रात्र कशीबी जाती हो पन दिवसा कट्टाळा येतो."

मी म्हणालो सावजी उद्यापासुन कामच काम. माझ्या बहिणीच्या नवर्‍याला रुस्तम हॉस्पिट्लला घेऊन जायचय. रुस्तम हॉस्पिटल ? सावजी म्हणाला "तिथ तर लै घ्याट म्याट चालतय. डॉक्टर लोक लई लफडी करतात हे मी ऐकल हाय. उद्या चला तिकड मग सांगतो." मी बर म्हणालो.

दुसर्‍या दिवस डॉ. रामाणी यांची अपॉईंट्मेंट घेण्यात गेला. सावजी बरोबर होताच्. मंगळवारची अपॉईंट्मेंट घेतली. त्यांनी सर्व रिपोर्ट्स पाहुन मंगळवारीच अ‍ॅडमिट करुन घेतल प्रशांतरावांना. अ‍ॅजिओग्राफीसाठी फिटनेस पाहिला जात होता.

रात्री ताई मुक्कामाला प्रशांतरावांबरोबर हॉस्पिट्ल मध्येच राहिली. मी टेरेसवर आलो. सावजी समोर होताच. सिगारेट पेटवताच बोलायला लागला. डॉ. रामाणी कडे होतो मी दिवसभर. मी म्हनलो नाई, लई घ्याट म्याट हॉस्पिट्ल हाय म्हणुन ? डॉ. रामाणी ला राजापुरहुन फोन आला होता. दोघ डॉक्टर बोलले यावरुन तुमच्या दाजीला विशेषकाय झाल नाय. पन या हॉस्पिट्लची योजना हाय. काय ते मार्केटींग प्लॅन दुसर काय. जेव्हड बील पुन्याच्या या हॉस्पिट्लला होईल त्याच्या वीस ट्क्के राजापुरच्या डॉक्टरचे.

काय सांगतोस सावजी ? हे तु स्वतः ऐकलस की ?

"खोतसाहेब, माझी जिंदगी गेली याच कामात. हे फकस्त डॉ. रामाणी कडुन नाय तर हॉस्पिट्लमधी मी कान देऊन ऐकल ते हेच." सावजी म्हणाला.

बर बघुया काय होतय ते. मी सिगारेट विझावुन झोपायला आलो.

बुधवारी आम्हाला अ‍ॅजिओग्राफी गुरुवारी सकाळी ९.०० वाजता करणार अस सांगीतल गेल. सावजीला सुध्दा याचा मागोवा घेता आला नाही की नेमक काय होणार आहे. मी काळजीत अश्यासाठी होतो की नको असताना जर अ‍ॅजिओप्लॅस्टी किंवा बायपास सांगितली गेली तर पैशापरी पैसा जाणार वर पेशंटला होणारा शारिरीक त्रास, त्याच्या नातेवाईकांना होणारा मानसिक त्रास हा टाळता येईल का ?

बुधवार रात्र झाली. मी टेरेसवर आलो. सावजी हजर झाला. आज सिगारेट पेटवायच्या आधीच गाडी बोलायला लागली. "खोत साहेब आजला या हॉस्पिट्लवाल्यांची थेरी कळली बरका. एक पेशंट पुराच कापला गेला आज . म्हणजेरे काय ? मला ना समजल्याने मी विचारल.

आज दिसभर मी रुस्तमलाच होतो. डॉ. रामणीचा दुसर्‍याच एका बाहेरगावच्या पेशंट्ची अ‍ॅजीओग्राफी होती. सकाळी नऊला त्याला आत घेतला, अर्धा तासात अ‍ॅजीओग्राफी आटपायला पाहिजे होती. यांनी १०.३० पर्यंत टाईमपास केला. खिदळत चहा प्याले दोन वेळा. मग त्याच्यापुढे सुरु केली अ‍ॅजीओग्राफी. ऑपरेशन थेटर बाहेर नातेवाईक गॅसवर. प्रत्येकाला वाट की काहीतरी सिरीयस गोष्ट आहे. आत डॉ. रामाणी त्याच्या शिकाऊ डॉक्टरला शिकवत होता. थेरी कशी करायची.

११.३० ला त्यांनी पेशंटच्या नातेवाईकांना बोलावले. लै गंभीर चेहरा करून सांगीतल पेशंट्ची बायपास करावी लागणार आहे. लगेच सांगा म्हणजे उद्याच करता येईल. एक लाख रुपये तातडीने जमा करायला सांगितले. पेशंट्चे नातेवाईक काय करणार, भरले एक लाख रुपये. अडाण्यातला आडाणी पण दुसर्‍या डॉक्टर्ला विचारल्याबिगर येव्ह्डा मोठा निर्णय घेत नाही.

इथल कामच अजब, पेशंट सोताच्या पायनी चालत येऊन अ‍ॅडमिट होतो अन हे लोक म्हनतात सिरीयस केस ? नातेवाई़कांना काय सुचत नाही, घेतात निर्णय अन जातात कापले. शरीर बी अन खिसा बी. मग डॉ. रामाणीन दुसर्‍या मोठ्या डॉक्टरला फोन केला. हा डॉक्टर बायपास करतो. मी तर मोबाईलवरच बसलो होतो रामणीच्या. दोन्ही बाजुच बोलाण ऐकत होतो. मोठा डॉक्टर रामाणीला म्हणला, दर महिन्याला बायपास च्या दहा केस मला द्या अन दोन वर्षात स्वत:च तुमच हॉस्पिटला उघडा.

"अस्स आहे तर". मी झुरका मारत म्हणालो.

उद्या सावध रहा. मी कानत सांगतोच काय चालल आहे ते. सावजी म्हणाला.

गुरूवार उजाडला. मी आठ वाजल्यापासुन हॉस्पिटलला होतो. नऊ वाजले प्रशांतरावांना आत नेले. दर दहा मिनीटांनी सावजी बाहेर येऊन सांगत होता. नेहमीच्या प्रथेप्रमाणे चहापान चालु होते. मध्येच ऑपरेशन थिएटरच दार उघडे,पांढरे कपडेवाले लोक लगबगिने आत बाहेर करित. दरवाजा पुन्हा बंद होई. सावजी सांगे अजुन काहीच सुरु नाही. दहा वाजले तेरी तेच.

ताई अस्वस्थ झाली. अरे उमेश विचारना आत जाऊन. राजापुराचे डॉक्टर तर अर्धा तासात संपेल म्हणले होते अ‍ॅजीओग्राफी. काही सिरीयस तर नाहीना. मी शांत रहात तीला समजावले. १०.३० वाजता परत ताईची भुणभुण सुरु झाली. ती म्हणाली "मी विचारु का ? " मी पुन्हा तिला शांत केल. सावजीन सांगीतल अ‍ॅजीओग्राफी सुरु झाली. ११. वाजता संपली देखील. ११.१५ ला डॉ. रामाणीचा असिस्टंट बोलवायला आला. प्रशांतराव अजुन आतच होते.

डॉ. रामाणीच्या केबीन मध्ये मी आणि ताई गेलो. ते गंभीर चेहरा करुन बसले होते. आम्हाला बसा म्हणाले. चष्मा नाकावर वरच्या बाजुला सरकावीत ते बोलु लागले. "तीनच चोक- अप आहेत पण फार गंभीर आहेत. उद्याच्या उद्या बायपास करायला हवी नाहीतर पेशंट्च्या जिवाला धोका आहे." ताईने माझ्याकडे पाहिल आणि ती मी काही बोलाव अशी अपेक्षा करु लागली.

कुठे चोक अप आहेत मी विचारल ?

डॉ. रामाणींनी लगेचच रंगीबेरंगी ह्रदयाची चित्र असलेले चार्ट काढले. मोठाले डॉक्टरी शब्द वापरीत त्यांनी ताईकडे पहात सांगायला सुरवात केली. खुपच अवघड केस आहे ही. अ‍ॅजीओग्राफीलाच अडचणी आल्या. ही केस फारच गंभीर. तुम्ही वेळेवर माझ्याकडे आलात म्हणुन पेशंट्चा जीव वाचला आहे. ताई आता रडायच्या बेतात असताना मी तिला धीर दिला. याला एकच उपाय उद्याच्या उद्या बायपास करणे.
डॉ. रामणी आता आम्हा दोघांची प्रतिक्रीया आजमावत होते.

नेमकी कितीवाजता सुरु झाली अ‍ॅजीओग्राफी " मी प्रश्न विचारला तो गंभीर वातावरणाचा ताण कमी करण्यासाठी मी वेगळाच प्रश्न विचारला.

आपण यांचे भाऊचना ? डॉ. रामणींनी आपले व्यावसायिक स्किल उघड करीत माझ्या बहिणीला हे दाखवण्याचा प्रयत्न केला की तुमचा भाऊ नको त्यावेळी काय प्रश्न विचारतो आहे ते पहा.

"नाही बर्‍याच वेळा चहा आत गेला म्हणुन विचारल" मी घोड दामटलं यावर डॉ. रामणींचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.

"हे पहा तुमचा निर्णय झाला असेल तर सांगा. तुमच्या असल्या प्रश्नांना उत्तर द्यायला मला वेळ नाही पैशाचा प्रश्न असेल तर तस सांगा. आपण कमी किमतीच पॅकेज आहे आपल्याकडे. हे ऑपरेशन करणार्‍या डॉ. कामांशी मी आधीच बोललोय. त्यांना उद्याच वेळ आहे"

काय म्हणतात डॉ. कामा ? हेच ना ही यापध्द्तीने भराभर बायपास केल्यातर तुमच स्वताच हॉस्पिटल बनायला वेळ लागणार नाही, बरोबर की नाही डॉ. रामाणी?"

डॉ. रामाणी ताडकन उभे राहीले." काय बोलताय तुम्ही हे "

"तुमच्या प्रतिक्रीयेवरुन समजले मी बोलतोय ते बरोबरच बोलतोय" मी म्हणालो
"आज आमच्या केसच्या बाबत डॉ. कामा काय म्हणाले ते सांगु ? ते म्हणाले डॉ. रामाणी मी तुमच्यावर खुश आहे"

ताई माझ्या़कडे आणि डॉ. रामाणी कडे आलटुन पालटुन पहात होती. तीला हा प्रकार काय चाललाय कळत नव्हता.

डॉ. रामाणी आता थरथर कापत होते " हे हे तुम्हाला कस कळाल ?

डॉ. रामाणी तुमच्या मोबाईल चे दुसरे सिम कार्ड माझ्या़कडे आहे आणि तुमचा डॉ. कामाच काय इतरांशी झालेला सर्व संवाद माझ्या़कडे रेकॉर्ड होतो आहे.

डॉ. रामाणींचा चेहेरा बघण्यासारखा झाला होता. शेवटी धीर एकवटुन ते म्हणाले " ऑडीओ रेकॉर्डेड हा पुरावा ग्राह्य धरला जात नाही"

" नसेलही पण केस रिफर केली म्हणुन गावोगावीच्या डॉक्टर्स ना तुमचे मार्केटींग मॅनेजर चेकने पैसे देतात हे तरी सिध्द होईलच ना"

तुम्हाला नेमक काय पाहीजे ? माझी बदनामी करुन तुम्हाला काय फायदा ?

माझ्या पेशंटला बायपास ची तातडीची गरज नाही हे सत्य प्रथम माझ्या बहिणीला सांगा डॉ. रामाणी, तिची माफी मागा. आजच माझ्या पेशंटला डिसचार्ज द्या. आत्ता तुर्त मला इतकच पाहिजे. दुसर्‍या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन बायपास करायची का नाही हे आम्ही ठरवु. काय ताई, मी ताईकडे पहात म्हणले.

डॉ. रामाणी आता नरमले होते. माझ्या बहिणीची क्षमा मागत म्हणाले " माझ्यामुळे तुम्हाला फारच त्रास सहन करावा लागला. मी आपली क्षमा मागतो. तुमच्या मिस्टरांना बायपासची गरज बहुदा लागणार नाही. काही गोळ्या लिहुन देतो यामुळे आराम पडेल. तुम्ही दुसर्‍याही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि ठरवा.

पुढील काही वेळात प्रशांतरावांना ऑपरेशन थेअटर मधुन बाहेर स्पेशल रुम मध्ये आणले गेले. रात्री मी त्यांच्याबरोबर राहिलो. दुसर्‍याच दिवशी त्यांना डिसचार्ज घेतला. मोठ आश्चर्य हे होत की बिल फक्त काही रुपयांच होत. डॉ. रामणी यांनी अ‍ॅजीओग्राफीसाठी कुठलेही बिल लावले नव्हते. मलाही प्रकरण वाढवायला रस नव्हता.

प्रशांतरावांना आमच्या घरी हालवुन दोन चार दिवसांनी दुसर्‍या डॉक्टरांची अपॉईंट्मेंट घेण्याचे ठरले. रात्री सावजी हजर झाला. एक रात्र सिगारेट न मिळाल्याने वैतागला होता. मी सिगारेट शिलगावली आणि सावजीला दिली. सावजी जवळ जवळ अर्धी सिगारेट संपे पर्यंत शांत होता.

"खोतसाहेब तुम्ही त्या डॉ. रामाणीला धोबीपछाड्च टाकला. मला वाटला तुम्ही माझ नाव घेणार पण मोबाईल फोनमधुन मला तुमच बोलाण ऐकु आला सांगुन डॉ. रामाणीला चारीमुड्या चित केला."

सावजी तुला माझ्याकडे आणताना नसती ब्याद आणतोय असा विचार केला होता. तु आम्हाला मोठ्या संकटातुन बाहेर काढलस. सांग काय करु तुझ्यासाठी ? मी सावजीला प्रश्न केला.

सावजी हसत म्हणाला " जोवर तुमचा आहे तोवर काहिबी सांगा. आपण करनार म्हंजी करनार. राहिल मला काय पाहिजे. मला तुमी देताच हाय की सिगरेट. अजुन एक विनंती हाय. माणसाच्या हिशीबात आमा भुतांना वर्षाला एकदा जेवाया लागत. तेबी एक घास. जोवर मास्तर हाईत तोवर आमचा घास आमाला मिळणार.

आमच्या दुनियेत अस लई जीव हाईत ज्यांना कुणीच नाही. एका घासाकरता हे जीव रडतात. त्यांना घास द्या. प्ररतेकाचे भोग संपल्यावाचुन त्यांना गती नाही. माणसात ताकद नाही की यांचे भोग संपवु शकेल. पण एक घास दिला तर त्यांची तळमळ तर थांबल. सगळे जीव हे बोलु शकत नाही. बोलाव म्हणल तर ऐकाया कुणी नाही. ऐकल तर विश्वास ठेवणारे कमीच. अन विश्वास असणारे, ध्यानात ठेऊन घास देणारे त्याहुन कमी.

सावजीच बोलण ऐकुन मला स्वत:चीच किव आली. आपले दिवंगत आई - वडील, त्यांचे आई वडील यांच्याकडुन आपण काही ना काही घेतलेले असतेच. प्रॉपर्टीच नाही तर विचार, संस्कार त्यांचा वारसा ही किती तरी गोष्टी असतात. याची आठवण आपल्याला रहात नाही. वर्षातुन एक दिवस श्रध्देने आपण त्यांना घास देत नाही. श्राध्द, पक्ष ही अंधश्रध्दा आहे अस समजुन आपण धर्मशास्त्राच्या मोठ्या सिध्दांताला आपण नाकारतो.

हे विचार करताना दुसरा विचार आला. याला दुसरी बाजु आहेच ना. मला आज अनुभव आला. समाजातल्या प्रत्येकाला तो थोडीच येणार आहे ? आणि आलाच तर तो मानायला कोण तयार होणार आहे ? एक वेळ बाप दाखवता येईल पण बापाच म्रुत्युनंतरच जीवन कस दाखवायच ? हा तर श्रध्देचा विषय आहे. म्रुत्युनंतरच जीवन असत, ही श्रध्दाच नसेल तर श्राध्द कोण करणार ?

गुलमोहर: 

नितिन तु म्हणजे एक ध़क्का दिलास. तुझ्या व्यक्तिम्त्वाचा हा कप्पा इतक्या वर्शानी आम्हाला कळला.असो.
कथा छानच आहेत. आण्खी एक धक्का. मी तुझ्यामुळे लिहिता झालो.सापड्ल्यास मायबोलीवर वाच.

कथा छान लिहिली आहे Happy

आमच्या सोसारटी मधे एक कुटुंब आहे..ते दर दिवशी ..घरी शिजवलेले अन्न एका ताटलीत ठेवतात.. आज तुमच्या कथेतुन त्याचा बोध झाला...कि ते असे का करतात ते? छान कल्पना आहे Happy

अरे वा असे स्पेशलायझेशन्स असलेली भुतं आवडली. चांगली कामं-बिमं करतायत की.

जाहिरात : एक स्वच्छ चारित्र्याचे, निर्व्यसनी, अनुभवी, कामसू भुत घरकामास हवे आहे. योग्य मोबदला आणि अलाउन्सेस दिले जातील. Happy

मामी,

धन्यवाद,

पहिल्या कथेमधे याबाबतचा प्रतिसाद आला आहे. राजापुर या कोकणातल्या गावाजवळच्या गावात भुते विकत मिळतात म्हणे. माझा स्वतःचा काही अनुभव नाही. बघा चौकशी करुन.

अंजू | 6 April, 2011 - 14:50
दोन्ही कथा सुरेख...
एक स्वच्छ चारित्र्याचे, निर्व्यसनी, अनुभवी, कामसू भुत घरकामास हवे आहे. >>>
खरच पाठवु का ? नक्की भुतच हवय की एखादी हडळ चालेल ?

Pages