जुने हिन्दी चित्रपट व गाणी ही आपल्या मर्मबंधातील ठेव आहे. एकेक गाणी एकेक शॉट्स व फ्रेमस आपले रोजचे जीवन अगदी रौशन करून टाकतात. ( वरना था क्या इस जिन्दगी में? संदर्भ फारुख शेख बाजार ) रफी, लता, मुकेश किशोर नौशाद व साहिर यांची गाणी तर अगदी देवगड हापूस. मधुबालेचा नखरा व सौन्दर्य मोहविणारे.
काळाच्या पड्द्याआड गेले तरी हे गुणी कलावंत आपल्या मानसिक जीवनाचा एक भाग आहेतच. आज एक मन अतिशय उद्विग्न करणारी बातमी वाचली. रोजचे २.५ बॉम्ब स्फोट, १० घोटाळे अपहरण अपघात वगैरे वाचून नजरेआड करायची सवय झाली आहे तरी पण हे वाचताच दिल से एक आह निकली.
हिन्दी सिनेमातील दिग्गज कलावंत रफीसाब, नौशाद, साहिर लुधियानवी व मधुबाला यांना मुम्बईत जिथे दफन केले गेले होते तेथून त्यांच्या अस्थी व अवशेष काढून टाकून त्यांची रीतसर विल्हेवाट लावण्यात आली आहे.
त्यांच्या कबरी नष्ट करून वर माती पसरली आहे व नवीन प्रेतांना पुरण्यासाठी जागा करण्यात आली आहे. हे कबरस्तात जुहू येथे आहे.
यावर विचारणा केल्यास जागा कमी आहे व धर्मात हे बसत आहे त्यामुळे असे केले आहे असे उत्तर मिळाले. जुहू गार्डन समोरील या कबरस्तानात नसीम बानू, अलि सरदार जाफरी, के ए अब्बास, परवीन बाबी, जान निसार अख्तर यांच्या कबरी इथे आहेत. गेल्या पाच वर्षांपासून चाललेल्या प्रक्रीयेत ही जागा मॅनेज करणार्या ट्रस्ट ने
या जागेवरील २१ कबरी हलवायला सुरुवात केली आहे त्यांच्या कुटुम्बीयांना न कळविता रिमेन्सची विल्हेवाट लावली आहे. त्या नंतर तीन फूट माती पसरून नवीन कबरींसाठी जागा केली आहे. नुकतेच आमिर खान यांचे
वडिल वारले ते इथेच दफन केले गेले आहेत. साहजिकच आहे नातेवाइकांना धक्का बसला आहेच.
मला या विषयाच्या धार्मिक बाबी बद्दल अजिबात देणे घेणे नाही पण एक सांस्क्रुतिक व कलेचा वारसा असा
नाहीसा होताना बघणे जड जाते. हे रीमेन्स फिल्म् सिटि किंवा पनवेल सारख्या ठिकाणी नव्याने जपता आले असते. अशी किती जागा लागली असती. त्या भोवती एक् साधी बाग करून शेजारी रसिकांना बसायला व आपल्या भावना व्यक्त करायला दगडी बाके टाकता आली असती. एक छोटे कॅफे. कल्चरल सेन्टर बनवून त्यात
गाणी कायम झुळझुळत राहिली असती. सिनेमा स्क्रीनीन्ग्स ठेवता आली असती. आपला वारसा आपणच जपत नाही म्हणून हळहळ वाट्ली. अमेरिकेत तो हॉलिवूड मध्ये स्टार मिळतो तसे यांच्या नशीबी नाही पण इतकी दुर्गत पदरी यावी का? काळाचा महिमा अगाध आहे हेच खरे.
पेपर मध्ये त्यांचे फोटो आलेत ते माझ्या गाण्याच्या वहीत चिकट्वले आहेत. अजून आपण काय करू शकतो?
छान लेख...भावना पोचल्या..
छान लेख...भावना पोचल्या..
Pages