सावट

Submitted by ललिता-प्रीति on 4 February, 2010 - 03:18
गुलमोहर: 

लले, सॉरी; उशीरा प्रतिसाद टाकल्याबद्दल. अत्यंत साध्या वाटणार्‍या घटनेतलं नाट्य आणि नाट्यपूर्ण घटनांच्या मागे असलेल रुटिन साधेपण छान टिपलं गेलय. घटना घडून गेल्यानंतर डहुळल्या पाण्यासारखे आयुष्यावर उठणारे तरंग आणि परत हळू हळू पूर्वपदावर येणार जीवन ह्या कॅन्व्हासवर तू रंगवलेल्या व्यक्तिरेखा ठसून जातायत आणि त्याही कथेशी कुठेही वरचढ न होता. क्लास वन.. बट वी वॉन्ट फर्दर बेटर....वी डिझर्व इट... Happy

खूपच छान लिहीली आहेस. हे बाहेर असताना खूप जाणवतं. इथली लोकं बघून तर आपल्या इथल्या परिस्थितीचं खूपच वाईट वाटतं. भारतात कायम आपल्या डोक्यावर टांगती तलवार असल्यासारखंच वाटतं.

पल्लवी जोशी चा १ चित्रपट होता, रेल्वे स्टेशनावरचा, त्याची थोडि आठवण झाली. "एक छोकरी"असावा.
छान चित्रण. आवडलं.

ललिता, सुंदर जमलीये गोष्टं.
नुक्तीच कोकण रेल्वेने कोकणात जाऊन आले. मधेच कधीतरी हात धुवायला बेसिनपाशी गेले तर तिथे एक बॅकपॅक दिसली.
मला काय करावं सुचेना. कंपार्टमेंटमधे परत आले... आणि दोनच मिनिटांत परत गेले, बघायला. एक माणूस ती वासकत उभा होता. त्याल विचारलं "तुमची का?"
तर हो!
माझा पारा चढला... बेवारशी इथे टाकून कशाला गेलात? कुठे गेलात? मी साखळी ओढणार होते... पोलिसात सांगणार होते... काही कळतय का नाही?... वगैरे वगैरे.
तो माणूस चिडला असणार पण म्हणाला की, आत संडासात बॅग ठेवायला हूक किंवा जागा नाही म्हणून इथे ठेवावी लागली... पाचच मिनिटांसाठी वगैरे.
त्या पाच मिनिटांच्या काळात माझ्या मनात काय काय येऊन गेलं ते मलाच माहीत.
पण त्या माणसाचं तरी काय चुकलं?
परिस्थितीच कारणीभूत.... माझ्यासाठी आणि त्याच्यासाठीही... तुझ्या कथेतल्यांसाठीसुद्धा.

कथा शेवट पर्यत खिळवुन ठेवते...प्रतेक व्यक्तिरेखा छान रंगवली आहे...
छान लिहिली आहे कथा...आवडली ..

कथा गायब का आहे? प्रत्येक प्रतिसदांमध्ये भरभरून कौतुक आहे त्यामुळे वाचण्याची उत्सुकता अजूनच वाढली आहे.

Pages