"Anil Awachat Calling...."

Submitted by धुंद रवी on 24 January, 2010 - 10:13

डॉ. अनिल अवचटांना एक लेखक म्हणुन, एक सामाजीक कार्यकर्ता म्हणुन ओळखत होतोच.
त्यांचं लिखाण जितकं वाचलं होतं त्यापेक्षाही ह्या प्राण्याविषयी खुप ऐकलं होतं.... त्याला जवळचे सगळे बाबा म्हणतात हे ऐकुन होतोच.... कधीतरी एकदा ह्या बाबाशी भेट व्हावी असही वाटत होतं.... वाईला त्याच्या कार्यक्रमाला जायचा योग आला. हा माणुस इतकं भरभरुन बोलतो की नुसतं ऐकतच बसावंसं वाटतं.... झपाटल्यासारखंच होतं... !

मला तर इतकं झालं की घरी आल्या आल्या त्याला एक पत्रच टाकलं आणि दुस-याच दिवशी सेलफोनेची रिंग वाजली आणि पहातो तर काय... "Anil Awachat Calling...."
त्यानी घरी बोलावलं आणि मग.....
अडीच तास............................................................................... !!

हा अनोळखी मित्र, जवळचा मित्र होण्याआधि मी त्याला लिहिलेलं हे पत्र...

" प्रिय बाबास...
परवा वाईला तुझ्या कार्यक्रमाला होतो.
कार्यक्रम संपल्यावर 'तु खरंच वेडा आहेस' असं तुला Certificate देणारा आगाऊ इसम मीच !

खरं तर,
समोरच्याला वेडात काढण्याचा शहाणपणा
कोणताही पुणेकर, कुठेही करु शकतो...
पण ज्या वेडाविषयी मी बोलतोय, जे वेड तुला लागलय...
ते खुप छान अनुभवलं परवा... !

सुंदर...
अरे, किती छान बोलतोस तु ! मजा आली.
प्रेमातच पडलो तुझ्या...
आधिही होतोच पण आता जरा जास्तच...

तु माणुसच मस्त आहेस रे...
मोकळा आहेस.
सहज आहेस.... सोपा आहेस... स्वच्छ प्रकाशासारखा...
पण प्रकाशाचा एखादा साधा किरण,
Prism वर पडावा आणि मनमोहक सप्तरंग उधळले जावे, असंच काहीतरी झालं.
तुझ्या वेगवेगळ्या रंगात हरवुनच गेलो...
किती छान जग होतं ते...
सगळं भरुन घ्यावसं वाटत होतं... आणि मी ते घेतलंही...

तु... तुझं बोलणं... तुझं जगणं.... तुझे विचार...तुझं काम,
हे सगळं माझ्यासाठी नविन नाही.
तुझ्या पुस्तकातुन खुप जवळुन जगत आलोय मी हे सगळं.

एक काळ वाया गेलेला मुलगा होतो मी.
वाया म्हणजे तुझ्या मुक्तांगण मधल्या मित्रांइतका नाही पण,
आयुष्य वायाच जात होतं.
इतरांच्या अपेक्षा पुर्ण करत ना त्यांच्या मनासारखं जगत होतो, ना माझ्या मनासारखं,
म्हणजे सगळं वायाच की !

...... आणि अशावेळेस तुझं अमेरिका वाचलं.
भारावुनच गेलो.
काय आवडलास मला तु...
वाटलं मला असंच जगायचय.
...आणि त्यानंतर...
तुझ्यासारखं नसलं तरी at least जगायला लागलो.

मग झपाटल्यासारखी तुझी सगळी पुस्तकं वाचुन काढली.
खजिनाच हाताला लागला...

१९७४ मधलं तुझं ’वेध’ नावाच लिखाण वाचलं.
खरं तर पु. लं वर माझं अतोनात प्रेम, पण तरिही तुझंच बरोबर वाटायला लागलं आणि मग मनाशी म्हंटलं की, ’आपल्याला हा माणुस जरा जास्तच आवडतोय.’

मग हळुहळु तुझे एक एक रंग उलघडत गेले.
प्रेमाची जागा मग आदरानी घेतली. मग नकळत तुझी एक प्रतिमा मनात बांधत गेलो.
ती इतकीच छान होती की तुला भेटायची भितीच वाटायला लागली.

शनिवारी माझ्या सासुबाईंचा फोन आला की
"अवचट येताहेत.. येणार का ?"
तुझी मुलाखत त्यांना घ्यायची होती म्हणुन किती excited होत्या.
मलाही काय हेवा वाटला त्यांचा. म्हंटलं "नक्की येतो."

मग तुला भेटलो आणि खुप बरं वाटलं...
तु नव्हतास मला ओळखत, पण मी तर ओळखत होतो तुला...
अगदी जवळच्या मित्राला ओळखावं तसं !
तुझ्या जवळ बसुन, तुझा हात हातात घेउन चारच वाक्य बोललो असेन...
पण जुना मित्र भेटल्याचा आनंद !
मला वाटलं त्याहीपेक्षा छान माणुस आहेस तु...

भरभरुन बोलत होतास... आम्हीही भरभरुन ऐकत होतो.
तु थांबुच नये असं वाटंत होतं.
हे सगळं सगळं साठवलय मी...
तुझा प्रत्येक शब्द
तुझी कळकळ
तुझं मोकळं हसणं
तुझा यमन... तुझा मारवा....
तुझी गोगलगाय, तुझा उंदीर.... तुझी नाचणारी बाहुली
तुझी बासरी
तुझा वेडेपणा... सगळंच !

वेडाचे हे झटके काय आनंद देतात, हे जाणवलय मला..
आणि म्हणुन पुन्हा भेटायचय तुला.
तुझ्याकडुन थोडीशी ओरीगामी शिकायचीये.
तुझं मुक्तांगण बघायचय...
तुझ्या मुलींना भेटायचय...(त्यांचा खुप हेवा वाटतो मला !)
तुझा कार्यक्रम ऐकताना
अंगावर उमललेला शहारा मिटण्याआधिच.. खुप काही करायचय...

माझ्या मुलीचा जवळचा मित्र व्हायचय मला..
जमलंच तर प्रत्येकाचाच !

तुझा मारवा ऐकायला
येईन एखाद्या संध्याकाळी...
तुला भेटायला वेडा झालोय.

.......... आणि ह्या वेडासाठी... तुझे मनापासुन आभार !

धुंद रवी.

मायबोलीकर मित्र-मैत्रीणींनो
'बाबासोबतच्या त्या अडीच तासात काय झालं... ?'
....... हे नुसतं ऐकण्यापेक्षा त्याच्याकडे एकदा चला माझ्याबरोबर...

काही अनुभव हे ऐकण्यापेक्षा घेण्यासारखे असतात....

धुंद रवी.

गुलमोहर: 

सही!!!
ह्या माणसाला आयुष्यात एकदाच प्रत्यक्ष भेटलेले.. पण भन्नाट अनुभव होता..
खरं तर तो फारसं बोलला तरी कुठे त्या दिवशी! पण मला खूप काही मिळालं जे अजून पुरतय!
(उगाच नाही मी सुतारकाम , शिवण, हस्तकला असलं काय काय करायला लागले!)
त्यांनी तेवढ्याशा वेळात शिकवलेल्या ओरिगामी वर २-४ लहान मुलांशी तरी मैत्री करू शकले..
Happy

मस्त माणूस आहे तो - आणि तुही Happy

खरच झपाटुन टाकणारं व्यक्तिमत्व आहे बाबा म्हणजे! खुप पुर्वी त्यांची एक दोन पुस्तके वाचली होती पण सुनंदाबाई गेल्यानंतर त्यानी लिहीलेला सा स दिवाळी अंकातला लेख वाचुन मी झपाटल्यासारखी त्यांचे मिळेल ते वाचत सुटले, नाही अक्षरशः पारायणे केली आहेत. अजुनही संग्रही असलेली पुस्तके वाचत असते.
बाबांना प्रत्यक्ष भेटायचा योग अजुन आला नाही पण दोन वेळा त्यांच्याशी फोनवर गप्पा मारल्या आहेत.

रवी, छान लिहीलं आहेस रे!

रवी, छान.. याची लिंक अनिल अवचट ओर्कुट ग्रुपवर देतोय. आपल्याला काही आक्षेप नसेल अशी आशा आहे.

इतक छान पत्र लिहिल्यावर मोब.वर 'calling' यायलाच हवं.. असं खरच आपल्या मनातल माणुस भेटलं बोललं कि खरच ते क्षण अमर होवुन जातात आपल्यासाठी.

अरे तुम्ही किती नशीबवान आहात. अनिल अवचटांविषयी नेहमीच एक कुतूहल आहे मनात...त्यांच्या सारखे पालकत्व जमणं म्हणजे कठीणच. खुप अप्रुप वाटतं त्यांचं. त्यांना भेटायला खरंच आवडेल पण त्यांच्या समोर उभं रहाण्याची आमची प्रतिभा नाहीच्...प्लीज तुमच्या भेटी बद्दल नक्की..नक्की लिहा..निदान तुमच्या लेखातून तरी ते भेटतील...

रवी , एकदम बढीया,
ह्या माणसाच्या लेखांची मी पण फार आतुरतेन वाट पहात असतो.
आधी २-३ पुस्तकं घेतली होती , सध्या लातुरात पुस्तक प्रदर्शन सुरु आहे
त्यातही यावेळी २ घेतलीत.

आई गं....!! सही लिहिलंस रे.....!!
नुकतेच अनिल अवचट न्यू जर्सीला येऊन गेले तेव्हा माझ्या बहिणीच्या घरी आले होते.....आणि चक्क ५-६ मस्त गप्पा गोष्टी झाल्या. तिच्या भाग्याचा अगदी हेवा वाटला Happy

सायकोट, धन्यवाद. मी लिंक काढुन टाकली आहे. हा लेख रवी यांनी तिकडे आधीच टाकला आहे याची मला कल्पना नव्हती.

ओर्कुट वर 'अनिल अवचट' ग्रुप ला कसे सहभागी होता येइल? >> वत्सला, ओर्कुटावरच्या अनिल अवचट ग्रुप ची ही लिंक (http://www.orkut.com/Main#Community?rl=cpp&cmm=14827543). या ग्रुपचे सदस्य अवचटांना वरचेवर भेटत असतात पुण्यात.

छान पत्र आहे हे! अमेरिका, स्वतःविषयी, कार्यरत , छंदाविषयी, गर्द, धागे उभे आडवे,मोर, माणसं....जेव्ह्ढं वाचलं तेव्हढं मनापासून आवडलं. एकदा अवचट, अरुण साधू आणि आनंद नाडकर्णींना एकत्र मॅजेस्टिक गप्पांमधे ऐकलं...अफाट व्यक्तिमत्त्व, कामही तसंच!
आपण सुंदर शब्दांमधे पकडलं आहे हे सारं!

रवी नमस्कार...
फार छान लिहले आहे पत्र , मांडणी अगदी साधी , सरळ आणि सुटसुटित...
अस पत्र लिहिल्यावर का नाही येणार " calling "
अनिल अवचट हे कोण आहेत मला खरच माहित नाही, लिहलेल्या पत्रातून तर ते फार ग्रेट असतीलच, पण
त्यांच्याबद्द्ल आणखीन जाणून घ्यायला नक्की आवडेल.
ओरीगामी हा काय प्रकार आहे.

रवी तु मस्त लिहीलयस रे,
माझीहि इच्छाहोती कि बाबाला पत्र लिहावं पण तुझ्यासारख लिहीता येत नाही मला.
मी पण बाबाची प्रचंड मोठी फॅन आहे. मी त्याचे लेख शाळेत असल्यापासुन वाचलेत. मला एक धडा होता "क्रिकेटच्या वेडावरचा" भारतात क्रिकेटचं वेड कितीआहे त्यावर.. तेव्हा अनील अवचट हे नाव पहिल्यांदा ऐकलं नंतर आधाशा सारखे त्यांचे जेवढे लेख सत्यकथा, मौज, लोकसत्ता वगैरे जिथे जिथे आले ते ते वाचलेत. त्यांच मेडिकलचं शिक्षण, येरवड्याचे दिवस,ओतुरचे दिवस , मुक्ता- यशो -मुलींचं संगोपन, इतक मस्त वाटत वाचायला. असं वाटत कि आपण ह्या सगळ्या कुटुंबाला पुर्ण ओळखतो.
हे लेख संकलीत करुन जी पुस्तकं झाली आहेत ती संग्राह्य आहेत. स्वतः विषयी, छंदाविषयी, अमेरिका, धागे उभे आडवे, जगण्यातले काही ( हे नाव नीट आठ्वत नाही), मोर, धार्मिक. .... सगळी नावं आठवत नाहीत.
(मुक्ता आणि यशोचं -) "मुलींचं संगोपन "इतक अफलातुन आहे कि बस्स. मी अनंत वेळा वाचलय ते.

त्यान्चे लिखाण आहेच खूप छान

भारतातील पहिल्या नम्बर चे व्यसनमुक्ति केन्द्र आहे
कितीतरि परिवार देशोधडिला लागण्यापासून वाचवले आहेत ह्या बाबाने _______/\_________