'मायबोलीवरचा नळ' ह्या लेखाची सुरुवात http://www.maayboli.com/node/13117?page=10 इथे झाली..
सहज म्हणून मांडलेली नळाची कल्पना काही लोकांनी उचलून धरली म्हणता माझा मुंगेरीलाल झाला.
मुंगेरीलाल झाले असतानाची माझी दिवास्वप्नं खालीलप्रमाणे:
मायबोलीवर खरच नळ सुरू झालाय. ह्या नळाला पाणी येणं वगैरे काही अपेक्षित नाहिये.. पण लोकांना भांडणासाठी एक छानसा प्लॅटफॉर्म मिळालाय. लोक ह्या विचारानंच सुरुवातीला एकदम खूष आहेत. त्यामुळे ते काही काळ येतात आणि 'नळ सुरु करणे हा किती छान विचार आहे' ह्या विषयावर गोडुल्या गप्पा मारताहेत फक्त.
पहिला गट येतोय तो 'परतोनि पाहे' मधल्या अशा लोकांचा ज्यांनी नळाची कल्पना जरा उचलून धरलेली.
'हूड आणि झक्की इथे मुक्कामालाच येतील' असं अमृता नानबाला सांगतच असते, तेवढ्यात झक्की "कुठे आहे ती नानबा.. ठोकतोच तिला" अश्या आविर्भावात घागर उचलून इकडे तिकडे बघताहेत. नानबा कधी नव्हे ते हुशारी दाखवून योग्य वेळी गायब होते आणि झक्कींनी उचललेली घागर मधल्या मधे हूड ला लागते. आता हूड पेटतो .. हूड आणि झक्कीचे प्रेमसंवाद चाललेले असतानाच श्री, माधव, वर्षू_नीलू, रुनी, सायो, अगो, वत्सला, सुनीधी, छाया अशा शांतता प्रिय व्यक्ती 'कसे काय भांडतात बुवा लोक' अशा आविर्भावात डोकावून बघत असतात.
नळावर न भांडणार्यांच्यात बायकांची संख्या जास्त हे बघून जामोप्या आणि अतुलसारखी मंडळी योग्य ती काडी टाकतात आणि आता बाई-पुरुष वाद सुरू झालेले बघून निधपा आणि मगाशी पळून गेलेली नानबा दोघीही जणी पिटात येतात. मग हूड आणि झक्की वादांची पॉप्युलॅरिटी मागं पडून बाई आणि पुरुष ह्याविषयावर भांडणं सुरु. तसा प्रयोग समजावणीच्या सुरात योग्य मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो. पण समजावून घेणं - हे भांडणाइतकं मजेशीर नसल्यानं जामोप्या, अतुल विरुद्ध निधपा आणि नानबा- त्याच्याकडे लक्ष न देता निकराची लढाई चालूच ठेवतात.
हे सगळं सहन न होऊन गंगाधर मुटेंच्या मनातलं गुज ओठावर येतं "किती क्षुद्र कारणावरून लढताहेत ही माणसं. ह्या नळाला पाणी नाही. पाण्याच्या अभावी पिकं जगू शकत नाहीत - इतकच कशाला माणूस पण जगू शकत नाही. आणि नळ आहे पण पाणी नाही ह्या भ्रष्टाचारानं ह्यांचं मन व्यथित कसं होत नाही". त्यांचं बोलणं संपायच्या आतच भ्रष्टाचार हा शब्द ऐकून झक्कींचं भारत प्रेम उफाळून आलंय- मग शेती आणि भ्रष्टाचार ह्या वेगवेगळ्या विषयावर झक्की, गंगाधर, चंपक, बुवा आणि काही सुज्ञ मायबोलीकर चर्चा करताहेत.
पण नळावरच्या मायबोलीकरांची संख्या इतकी झाली आहे - गोंगाट इतका वाढला आहे की किरण काय बोलतोय हे कुणी ऐकूनच घेत नाही - ह्यामुळे किरण चिडतो. 'अरे, माझं पण ऐका' असं त्यानं म्हटल्यावर, लोकांना आणखीन एक 'बकरा' सापडला हे लक्षात येतं आणि ते त्यालाही मारामारीत खेचतात.
हे सगळं होईपर्यंत लेखक आणि कवी मंडळी जरा बाजुलाच राहिलेली असतात. (कारण ती आत्तापर्यंत त्यांच्या प्रतिभासाधनेत रमलेली असतात.) पण नळावरची गर्दी बघून ह्यातल्या काही मंडळीचं नळाकडे लक्ष जातं.
आता माणसं आणि त्यांचे वागण्याचे पॅटर्न्स, म्हणजे खर्या लेखक/कवीच्या लेखणीला खरे आवाहन! त्यामुळे अर्थातच प्रतिभावंतही नळावर येतात. ह्यांच्यातही वेगवेगळे शांततापूर्ण गट असतात. कथालेखक(विशाल, कौतुक, चाफा, बासुरी, सुनिल, चमन, रुयाम, टण्या आणि झालंच तर गणु_गवारी), कवी (उमेश, छाया, गिरीष.. कवींच्या नावांची एक वेगळी पुरवणी जोडावी लागणार वाटतं!) , ललित लिहिणारे (पल्ली, आशुचॅम्प, मैत्रेयी, आर्च वगैरे) विनोदी लेखक(दाद, धुंद रवी, नवीन पदार्पण करते बारिशकर वगैरे..).
(काही लोक सगळ्या गटात ओव्हरलॅप होत असले, तरिही त्यांना एकदाच काऊंट करावं ही विनंती)
नळावरच्या हाणामार्या बघून 'चांगलं कथानक सापडलं' म्हणून रहस्यकथा लेखक, विनोदी लेखक खूष होत असतानाच - कवी दु:खी होतात. ललित वाले विचाराक्रांत.
लेखक मंडळी वादात पडणार नसतात, पण मग कुणीतरी 'प्रस्थापित विरुद्ध नवोगत' 'मायबोलीवरील गटबाजी' असे विषय सुरु करतात आणि न रहावून हे लोकही भांडायला प्रवृत्त होतात.
मैत्रेयीला कळत नाही, आपण ऑलरेडी 'असंबद्ध गप्पांचा' बाफ सुरु केलेला असताना, लोक नळावरही तेच का करताहेत? काही शहाणी लोक इथला सगळा रागरंग बघून आधीच पळून गेली आहेत. स्वप्ना राज, साधना वगैरे मंडळींना - 'जे घरी सिरीयल मधे बघायला लागतं तेच इथे बघायला लागलं तर आपलं दु:ख सांगायचं कुणाला' असे प्रश्न पडलेत.
आता ह्या सगळ्यात अश्विनीमामी डीटॉक्स चं तत्व सांगण्याच्या प्रयत्नात. लोकांना ते पटतही. त्यामुळे "आत्ता भांडू - नंतर डिटॉक्स आहेचे भांडण विसरायला" असा विचार करून सगळेजण पुन्हा हिरिरीनं भांडायला लागतात. तेवढ्यात आपलं 'डीटॉक्स टेक्निक' वापरून कुणीतरी उद्योग सुरू केलाय आणि माहित नसल्यानं उद्योजक गटात आपणच त्याला हा व्यवसाय सुरू करायला मदत केली आहे हे मामींच्या लक्षात येतं - मग त्यांचे कॉपीराईट चे वाद सुरु होतात.
दिवस संपेपर्यंत पडलेले गट असे असतातः
१. काही बायका विरुद्ध काही पुरुष वाद
२. काही पुरुष वि. काही पुरुष वाद
३. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित वाद
४. भारतातले भारतीय विरुद्ध परदेशातले भारतीय बाद
५. परदेशातले परत येणारे विरुद्ध परत न येणारे वाद
६. भ्रष्टाचार योग्य का गरजेचा असे वाद.
७. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागातले वाद
८. शहरा शहरातले वाद
९. "नळावर भांडणार्यांना 'एका कल्ट' चा भाग म्हणता येईल का" ह्यावरून वाद
१०. तात्विक वाद
११. वैयक्तिक वाद
१२. नसलेल्या टॉपिक वरून झालेले कोटी कोटी वाद!
ह्या सगळ्या वादांमध्ये माबोकरांचा नळावरचा पहिला दिवस संपतो. पण भारतातला दिवस संपेपर्यंत अमेरिकेतला दिवस सुरू होतोच! आणि मग हीच भांडणं कायम रहातात.
शेवटी अॅडमिनलाच सहन होत नाही, ते हा नळ काढून नेतात. लोक पांगतात पण वाद संपत नाहित. ते वेगवेगळ्या बाफ वर चालूच रहातात.
नळावरच्या हाणामारीत कुणाच्याच लक्षात न आलेली गोष्ट म्हणजे, ह्या सगळ्या गडबडीत हूड आणि झक्की 'दो दोस्त एक प्याली मे चाय पियेंगे' म्हणत मजेत कोपर्यात बसलेले असतात... नुसतं तेवढच नाही तर चक्क एकमेकांना डोळा मारून हसत असतात!
-----
तळटीप १: फक्त मजा म्हणून लिहिलंय. कुणालाच दुखवायचा हेतू नाहिये.
तळटीप २: तुमचं नाव फारशी ओळख नसल्यानं, स्वभावविशेष आत्तापर्यंतच्या माझ्या मायबोलीवरच्या इतक्याशा काळात जाणवला नसल्यानं, अनावधानानं, नजरचुकीनं, माझ्या लेखणीच्या मर्यादे मुळे किंवा इतर काही कारणानं राहिलं असेल तर आपले आपण इथे कमेंट्स मधे घुसा..
तळटीप३: हा नळ सार्वजनिक आहे - त्यामुळे बिनधास्त घुसा!
जबरी...
जबरी...
हुर्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य च
हुर्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य
चालु दया.
>नानबा => मुरलेली माबोकर एकदम
>नानबा => मुरलेली माबोकर
एकदम पटेश!
>कथालेखक(विशाल, कौतुक, चाफा, बासुरी, सुनिल, चमन, रुयाम, टण्या आणि झालंच तर गणु_गवारी),
आपलं नाव! ते पण भारी लोकांबरोबर वाचुन माणसाला किती आनंद होतो राव.... लगेच बोल्ड मधे...
"मायबोलीवरचा नळ" जबरदस्तच लिहीलंय हो... लय भांडतात राव लोक. खरंच आहे..
मज्जा येते पण भांडण वाचायला
फ्रायडे ईव्हीनींगची सुरुवात मस्त करुन दिलीत. चला... वीकेंडच्या शुभेच्छा!!
(No subject)
हे हे हे.. ज्यांनी ज्यांनी
हे हे हे.. ज्यांनी ज्यांनी वाचून प्रतिसाद दिला त्यांचे आभार..
)
जे आखाड्यात उतरले त्यांचे आणखीन आभार..
आगाऊ, तळटीप खास तुझ्यासाठीच लिहिलेली..
(तुझं फक्त नाव(आयडी) घेतलं तरी मी भांडायला उतरली आहे असं वाटतय मला
पण हे काय? नेहमीचे 'यशस्वी कलाकार' (ह्या ऩळाचे खरे जनक) काही आले नाहित... (हिरमुसलेला चेहरा)..
तरी त्यांच्या विपूत जाऊन भांडायचं निमंत्रण दिलेलं!
अमृता म्हणते तसं खरंच वेगवेगळ्या बाफ वर सापडलेली भांडंण पोस्टुयात इथे! (संग्रही रहातील ;))
भांडण संपले आहे
भांडण संपले आहे
भाग्यश्री, झिंज्या सोडून
भाग्यश्री, झिंज्या सोडून कशाला येत्येय? आपणहूनच हातात द्यायच्या का? घट्ट आंबाडा घालून ये ग बायो.
खरं तर हे नळावरच भांडण म्हणजे डिटॉक्स. मनातली सगळी घाण बाहेर. मन स्वच्छ की घरी जायला मोकळे. उगाचच महिनोंमहिने, वर्षानुवर्षं मनात काहीतरी साठवायच आणि मग थेरपीसाठी पैसे खर्च करायचे. अँटीडिप्रेसंट घ्यायची. त्यापेक्षा सार्वजनीक नळ बरा.
नानबा, मायबोलीकरांसाठी डिटोक्स थेरपी चालू केल्याबद्दल धन्यवाद ग.
आर्च, नुस्तीच डीटॉक्स नाही,
आर्च, नुस्तीच डीटॉक्स नाही, तर पारंपारिक डीटॉक्स पध्दती सुरू केल्याबद्दल आभार मान!
स्सहि! मजा आलि एकदम अग पण
स्सहि! मजा आलि एकदम अग पण नानबा स्गळ्यांन्ना भांडणासाठि आमंत्रण काय देतेस? तुझि कल्पना असल्यामुळे पहिला मान तुझाच नाहि का? आता तु प्रतिपक्ष म्हणुन कोणाचि निवड करतेस ते बोल.
नळ आला पण पाणी गेले.
नळ आला पण पाणी गेले.
देवा, नंद्या >>एका विष्ठावंत
देवा, नंद्या
>>एका विष्ठावंत कार्यकर्त्याला
म्हणजे घाणीने बरबटलेला , भ्रष्ट झालेला असा म्हणुन ! काय राव?? छॅ
)क्काय तरी लोक असतात एकेक! असं म्हणुन भांडण्याच्या पवित्र्यात कंबरेवर हात ठेउन उभी पल्ली)
पल्ले पाणि गेलय आता हात खाली
पल्ले पाणि गेलय आता हात खाली घे..रिकामी घागर कंबरेवर घे आणि जा परत आता कोणी नाहीये नळावर
नानबा , मला नाव वाचुनश्यान
नानबा , मला नाव वाचुनश्यान वाट्ल , ह्यो नळ दमयंतीचा तर न्हवं . पर काय बी म्हना झ्याक लिवलया बगा .
कसा ओढुन काढला बाहेर.
कसा ओढुन काढला बाहेर.
नानबा.... कुठे गेली ही
नानबा.... कुठे गेली ही बया.... पाण्याचा हंडा मधेच टाकुन...???? इकडे ही लाइइइइइन लागलिये आणि ही बया बसली कविता करायला... येतेस की नाही? की देऊ तुझा हंडा उड्वुन???
नानबा... टु द गुड च
मज्जा आली मला..
मज्जा आली मला..
कोणेरे ते? हात लावून तर बघा
कोणेरे ते? हात लावून तर बघा माझ्या हंड्याला...
रमा, आपल्याला काय कोनबी चालाल भांडाया!
सुनिधी, नुसते हासत नाहियोत तुझं आणि भाग्यश्रीचं भांडण बघून.. केस कापून आलोय आणि तुमच्या दोघींवर लेख लिहायच्या विचारात आहोत आम्ही सगळेजण
केस कापुन आलोय.. आई ग्ग..
केस कापुन आलोय..
आई ग्ग.. एक क्षणभर समजलेच नाही मला.. ह्यात केस कुठुन आले
..
जागं झालय सारं गाव तांबडं
जागं झालय सारं गाव
तांबडं फुटाया लागलय
तुझी घागर नळाला लाव
पाणि सुटाया लागलय.
अगं हौसा भरल्यात घागरी गळतयं
अगं हौसा भरल्यात घागरी गळतयं पाणी

http://www.youtube.com/watch?v=y4-ChvpP6m0
हौसा गाणं हाय गं ते यु ट्युबवर
भरलेत दोन्ही माठ गळतय पाणी (आली अंगावर)
अहो ऐकल का? माबोवर आपली एवढी
अहो ऐकल का?
माबोवर आपली एवढी सुपरहिट जोडी असुन सुद्धा या बयेन आप्ला चक्क नामोल्लेख केला हाय.
थांबा तुम्ही बाजुला व्हा. टवळीच्या झिंज्या धरुनच आपटते.
तुम्ही घरात म्हनता ते गाण
तुम्ही घरात म्हनता ते गाण लावा कि,
अग हौसा
भर दिवसा
मिठीत मला तु
घेशील का?
व्हय व्हय हौसा , धर तिच्या
व्हय व्हय हौसा , धर तिच्या झिंज्या , आमचा आन आमच्या हौसाचा अनुल्लेख म्हंजी काय ?
हौसा हे गाणं फकस्त
हौसा हे गाणं फकस्त तुझ्याचसाठी
गाणं
(No subject)
दाजीबा आक्का हिच्या चांगल्याच
दाजीबा आक्का हिच्या चांगल्याच झिंज्या उपटा माझा बी उल्लेख केला नाय बगा हिन
ऐकल ग्गाणं. आवडेश. पण तुम्ही
ऐकल ग्गाणं. आवडेश.
पण तुम्ही म्हणता तस या गायकाला ताला सुरात नाही म्हणता आल.
>>>>हाय रे दैवा. झिन्ज्या धरायला गेले तर झिंज्याच नाही . कपडे , नाव बघा, पुरुष आहे तो पुरुष. वाचले बाई, नाहीतर त्यानेच मला धरले असते.
हौसाक्का
हौसाक्का
नाहीतर त्यानेच मला धरले असते
नाहीतर त्यानेच मला धरले असते --- धरले अस्ते म्हने , मावशील का तु त्या पुरुशाच्या मिठीत आक्के
अगं न्हाय हौसा ती वाईची बाईच
अगं न्हाय हौसा ती वाईची बाईच हाय , फकस्त काटकसरीपाई तिनं केस कापल्यात . ओ मालाकाकु ती फकस्त माही हौसा हाय . हौसा धर तिच्या झिंज्या .
Pages