===============================================
स्थळ - आर्थर रोड तुरुंगातील विशेष न्यायालय. २६-नोव्हेंबर मुंबई हल्ला खटला
दिनांक - २६-नोव्हेंबर-२००९
वेळ - ३:०५
न्यायाधीश : "मराठी कुठे शिकलात?"
आरोपी : " एथेच सिकलो मराती"
===============================================
२५ वर्षानंतर .........................
स्थळ - हॉटेल ताज, गेट वे ऑफ इंडिया
दिनांक - १५-जानेवारी-२०३४
वेळ - ११:००
आत्ताच आलेल्या बातमीनुसार प्रमुख पाहुण्यांचे हेलिकॉप्टर ताजच्या छतावर उतरले आहे.
ताज हॉटेलचा गजबजलेला हॉल. सगळीकडे चहेलपहेल चालू आहे. अतिमहत्वाच्या व्यक्ती, मंत्रीसंत्री स्थानापन्न होतायत. बंदूकधारी सैनिक सुरक्षाव्यवस्था चोख आहे की नाही याकडे बारीक लक्ष देतायत.
हॉलभर छान red carpet पसरले आहे. उंची अत्तरांचा मंद वास सर्वत्र पसरला आहे. वेटर्स कुणाला काय हवे नको ते बघतायत. खाण्यामधे शाही बेत आहे.....
कार्यक्रम सुरू व्हायची वेळ झालेली आहे.......
निवेदक : लेडिज अँड जेंटलमन, आपणा सर्वांचे ताजच्या या पंचतारांकीत हॉल मधे सहर्ष स्वागत. आज आपल्याला इथे बर्याच मोठ्या आणि विद्वान लोकांचा सहवास लाभला आहे. आपल्या बरोबर व्यसपीठा वर आहेत, आपले माननीय पंतप्रधान चाहूल गांधी, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री कसकायराव देशमुख, गृहमंत्री का.बा.पाटील, जागतीक दर्जाचे फोटोग्राफर माधव ठाकरे तर प्रेक्षकांमधे आहेत पुण्याचे मुख्यमंत्री मनमोडी साहेब, मुंबईचे मुख्यमंत्री पिटेश काणे, आणि इतर छोट्या गावांचे I mean राज्यांचे मुख्यमंत्री ....
आणि आता टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मराठी साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार मिळवणार्या, महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील कानाकोपर्यात पोहोचलेल्या लेखकाचं आणि आपल्या प्रमुख पाहुण्यांचं.......माननीय श्रीयुत अजमल कसाब यांच ...............
टाळ्यांच्या कडकडात, ढोल ताश्यांच्या गजरात, तुतारींच्या आवाजात आणि ताज बाहेरच्या AK-47 च्या फैरीमधे प्रमुख पाहुण्यांच स्वागत झालं.
निवेदक : आता कार्यक्रमाच्या सुरवातीला शहीद इंग्लिश स्कुल चे विद्यार्थी सादर करतील देशभक्तीपर गीत.
...............................................
निवेदक : आता पुढील कार्यक्रम प्रश्नोत्तराच्या स्वरूपात होइल.
अजमल साहेब, आयुष्यातल्या आणि कारकीर्दीच्या या टप्प्यावर तुम्हाला कसं वाटतय?
अजमल : सर्वप्रथम अल्लाचे आभार. अल्लाच्या कृपेमुळेच आज मी इथवर येऊ शकलो. तुम्हा भारतवासीयांचे पण शतशः आभार. गेल्या २५ वर्षात जी सरकारे आली, त्यांचाही मी ऋणी आहे. २५ वर्षापूर्वी बॉलिवूड मधे काम करायला आलेलो मी आणि मराठी साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार मिळवणारा मी ....खूप काही कमावले आहे ..मिळवलं आहे मी या वर्षांमधे. आज खुप छान वाटतय...मोकळं वाटतयं....
निवेदक : गेल्या २५ वर्षात तुम्ही अनेक पुस्तके लिहिलीत. तुमच्या "माझे जीवनगाणे" या पुस्तकाला तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तुमच्या या प्रवासाविषयी थोडं सांगाल.
अजमल : मला अजूनही आठवतात माझे ते तुरूंगातील आणि कोर्टातील दिवस. मी मराठी नुकताच शिकायला लागलो होतो. काहीच कळायचे नाही....पण या काळामधे भारतीय कायदा आणि संविधान यांनी मात्र मला फारच मदत केली. अनेक वर्षे माझ्यावर खटले चालत राहीले. मी मराठी शिकत गेलो आणि बघता बघता मी मराठीवर प्रभुत्व मिळवले.
सुरवातीच्या काळात मलाही डिप्रेस्ड वाटायचं. कळायचं नाही की मला का डांबून ठेवलय इथं ...का हे मला सारखे कोर्टात उभे करतात. काही समाजकंटकांनी तर मी गेट वे ऑफ इंडिया ला फायरिंग करून अनेक लोकांना ठार केले असे म्हणून माझी प्रतिमा मलीन करायचाही प्रयत्न केला. पण मग मला तुमच्याच मिडियामधून गांधी, नेहरू, सावरकर यांन घडलेला तुरूंगवास, त्यांचे माझ्याशी असलेल साम्य वाचायला मिळालं..मग मला जरा धीर आला. ..जगण्यामधे आशा वाटू लागली. ...
२५ वर्षापूर्वी रूचिका गिलहोत्रा प्रकरण घडलं होतं. त्यातील आरोपी राठोड म्हणाले होते "अशा परिस्थीतीमधे हसायला मी नेहरूंकडून शिकलो." यातून आणि अशा अनेक प्रसंगातून मी बरेच काही शिकलो.
मग पुढं मी तुरूंगात राहून मी "कौन बनेगा सच्चा हिदुस्थानी" या मोनिका बेदी होस्ट असलेल्या रिएलिटी शो मधेही काम केलं. हा शो अत्यंत गाजला. आणि SMS वोट्स वर मी यात विजेता ठरलो. असे करत करत माझा आत्मविश्वास वाढतच गेला. आणि तिथून मग मी मागे वळून कधी पाहिलेच नाही. इतके खटले पाहिले की पुढे पुढे मी भारतीय कायद्यावर मार्गदर्शन करणारे लेख लिहू लागलो. करकर्यांच्या जॅकेट बद्दलची controversy वाचून माझे मन विषण्ण होइ. मग मी यात थोडे संशोधन करून माझे संशोधनही पुढे भारत सरकारला पाठवले.
बघता बघता दोनाची चार, चाराची सहा अशी पुस्तके लिहीत गेलो. आणि आता "माझे जीवनगाणे" हे माझं आत्मचरित्र तुमच्यासमोर आहेच.
निवेदक : आम्हाला तुमच्या तुरूंगातील जीवनाबद्द्ल काही सांगाल.
अजमल : मी आधी सांगितल्याप्रमाणे माझे सुरवातीचे दिवस फारच वाइट होते. नंतरचे दिवस जरा चांगले होते. माझ्यासाठी चोख सुरक्षाव्यवस्था असे. त्यामुळे लिखाणासाठी लागणारा शांतपणा मला मिळे. जेवणातही आठवड्यातून दोनदा हैद्राबादी बिर्याणी आणि एकदा फिस्ट असे. बाकी दिवशी जेवण तसे सो सो च असे...गरम पोळ्या, भाजी, भात, आमटी वगैरे....
मी कसे दिवस काढले आहेत माझे मलाच माहित ...
निवेदक : तुमच्या आयुष्यातील आणि जीवनातील परमोच्च असे म्हणता येणारे क्षण कुठले
अजमल : अर्थातच हा पुरस्कार मिळणं हा कारकिर्दीतला सगळ्यात आनंदाचा क्षण आहेच. पण याबरोबरच मला आणखी एक क्षण आठवतो. तो क्षण म्हणजे १७ वर्षापूर्वी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झरदारी यांनी भारताला भेट दिली होती तो....शांतताचर्चा पुन्हा चालू करायला ती भेट त्यांनी दिली होती. त्या शांतता चर्चेसाठी भारत सरकारने माझी "ब्रँड अँबेसिटर" म्हणून नेमणूक केली होती. माझ्यासाठी तो एक मोठा सन्मानाचा क्षण होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधे शांतता निर्माण व्हावी असे मला नेहमीच वाटत आलय - "शांततादूत" म्हणून काम करायला मी आताच नाही तर सदैव तयार असेन.
निवेदक : आयुष्यातल्या या टप्प्यावर तुम्हाला कुठल्या गोष्टीची खंत वाटते का?
अजमल : तसं अल्लाच्या कृपेन मला सगळच मिळालं आहे. पण एका गोष्टीची खंत मात्र मला कायमच वाटत राहिली आहे. ती म्हणजे मला परत माझ्या देशाला परत जाता आले नाहीये ही. तुम्हाला तर माहिती आहेच की या पलिकडच्या समुद्रामार्गेच मी बॉलिवूड मधे काम करण्याकरता आलो. तसा निकालही कोर्ट काही वर्षात देइलच. पण मलाही जावेसे वाटते माझ्या मायभूमीकडे.....मनू शर्मा सारखा मीही अर्ज केला आहे पॅरोल साठी ...
कुणास ठावूक, माझे ३-४ मित्र येतील आणि याच समुद्रामार्गे मला घेउनही जातील....
तुमच्या सावरकरांचे गीत म्हणावेसे वाटते मला इथे .....
"ने मजसी ने परत मातृभूमीला...
सागरा प्राण तळमळला ....."
निवेदक : अजमल साहेब, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही इथे आलात, आम्हाला तुमचे मनोगत सांगितलेत...खूप छान वाटले. तुम्हाला तुमच्या पुढच्या लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा....
***** इतक्यात सगळीकडी सिक्युरिटी अलार्म वाजतात.....
निवेदक : सर्वांसाठी एक महत्वाची बातमी .....आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार सिंधुदूर्ग राज्याच्या किनारपट्टीकडून काही पाकिस्तानी अतिरेकी समुद्रामार्गी भारतामधे घुसले होते.....त्यांच्याशी लढताना ६ पोलीस शहीद झाले आहेत ....सर्व अतिरेकी मारले गेले असून एका अतिरेक्याला जिवंत पकडण्यात आले आहे ......
*****************************************************
टीप : या कथेतील सर्व पात्रे काल्पनिक असून त्यांचा सत्य घटनेशी काही संबंध नाही. आढळल्यास तो दैवदुर्विलास समजावा.
चांगलं आहे satire!
चांगलं आहे satire!
काळा विनोद !!! अप्रतिम !!!
काळा विनोद !!! अप्रतिम !!!
धन्यवाद. मला कळत नाहिये हा
धन्यवाद.
मला कळत नाहिये हा लेख गुलमोहर मधे कोणत्या section खाली टाकावा ...सध्या ललित मधे टाकला आहे ......
तुफानी लिहिलेस रे, हश्या !!
तुफानी लिहिलेस रे, हश्या !!
अशक्य नाहीये हे!
अशक्य नाहीये हे!
छान रंगवलय , दुर्दैवाने
छान रंगवलय , दुर्दैवाने आपल्या भ्रष्ट राजकारणात हे सुद्धा शक्य होईल .
ह्म्म्म..हसत खेळत. आपल्या
ह्म्म्म..हसत खेळत. आपल्या न्याय प्रणाली आणी नेत्यांना शालजोडीत लपेटून लगावलीस की एक.. तू लिहिलेलं खर व्हायच्या भीतीनं कळ आली पोटात
मित्रा... खुप छान लिहलयेस....
मित्रा...
खुप छान लिहलयेस.... खर तर ब्लॅक कॉमेडी लिहणं खुप जड काम आहे. तारेवरची कसरत...
त्यातला बोचरा उपहास कमी झाला तर विनोदानी घेतला जातो. जास्त झाला तर सगळंच भडक होऊन जातं आणी वाचक मध्येच सोडुन जातो....
पण तु खुप सांभाळुन लिहलं आहेस.... अभिनंदन आणि कौतुकही... !!
काळजात कळ उठली, नुसत्या
काळजात कळ उठली, नुसत्या कल्पनेने! Black comedy चांगली जमलिये बार्शीकर!
जबराच रे अम्या.......
जबराच रे अम्या.......
आढळल्यास तो दैवदुर्विलास
आढळल्यास तो दैवदुर्विलास समजावा. >> तुला हा लेख लिहायची संधी निर्माण व्हावी हाच मुळातला दैवदुर्विलास आहे. बाकी तुझ्या लेखातल्या प्रमाणे घडणे अशक्य नाहीये. ते न घडो हीच प्रार्थना आणि कृती करायची वेळ आली आहे.
अतिशय सुंदर लेख...ब्लॅक
अतिशय सुंदर लेख...ब्लॅक कॉमेडी !!!
दैवदुर्विलास
दैवदुर्विलास >>
=========
दुसरं काय ...
बाकी तुझ्या लेखातल्या प्रमाणे
बाकी तुझ्या लेखातल्या प्रमाणे घडणे अशक्य नाहीये. ते न घडो हीच प्रार्थना
अनुमोदन..
चांगलं लिहिलय ...
चांगलं लिहिलय ...
असं न होवो. लिहीलय छानच.
असं न होवो. लिहीलय छानच.
खुप मस्त लिहिलयस... खुपच
खुप मस्त लिहिलयस...
खुपच छान..
बारश्या, पुन्हा
बारश्या, पुन्हा सिक्सर..!
मस्त लिहिलयस.
चांगले लिहिले आहे आपण.. फक्त
चांगले लिहिले आहे आपण.. फक्त एक लहानशी दुरुस्ती.. अजमल कसाब विरुद्धचा खटला सध्या उच्च न्यायालयात नाही तर आर्थर रोड तुरुंगातील विशेष न्यायालयात सुरू आहे.
छान लिहीलय. कसाब अजून जिवंत
छान लिहीलय. कसाब अजून जिवंत आहे व १०० कोटी भारतीयांच्या थोबाडावर हसतोय ही खेदजनक व संतापजनक बाब आहे
छान लिहीलय.
छान लिहीलय.
घ्या कसाब साहेबांचा नविन
घ्या कसाब साहेबांचा नविन शोध्....सर्व अतिरेकी भारतीय होते...
मला एक कळत नाहीये, खटले चालवायचे असतील तर चालवा ना, पण अशी अब्रुची लख्तरे मिडीया मधून करायची काय गरज आहे...काय दाखवू पाह्ताय तुम्ही, आमची लोकशाही किती उदार आहे हे...
बापरे.उत्तम लिहीले आहे.उपहास
बापरे.उत्तम लिहीले आहे.उपहास आणि सत्य दोन्ही छान्.तुझी विचार करण्याची ताकद ग्रेट . भितीच वाटते एकुण परिस्थिती बघुन्.तु नेम्के लिहीले आहेस.
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.

झक्कास लिहील आहे. प्रत्येक
झक्कास लिहील आहे.
प्रत्येक जिल्ह्याच एक राज्य? भारी कल्पना. आत्ता त्या भविष्यातल्या ३१ राज्यांचे मुख्यमंत्री देखील ठरवायला मजा येइल.
जबरदस्त लिहिले आहेस! ग्रेट!
जबरदस्त लिहिले आहेस! ग्रेट!
उपहास छान व्यक्त झाला आहे .
उपहास छान व्यक्त झाला आहे .
ब्लॅक कॉमेडी छान उतरलेय. अस न
ब्लॅक कॉमेडी छान उतरलेय.
अस न होवो खरच
मस्त! अफाट सारकाझ्म!!
मस्त! अफाट सारकाझ्म!!
(No subject)
Pages