.....आज ती येणार नसते.
पण न येताही प्रत्येक क्षण भेटत असते. कारण तिच्या संदर्भाशिवाय मी श्वासही घेत नाही.
आधिच मी अस्वस्थ असतो आणि नेमकं तेंव्हाच ...
ती अगदी नेहमी म्हणते तेच गाणं रेडीओवर लागतं.
मी जास्तच अस्वस्थ होतो.
हे असं झालं की,
माझी पाय माझाही नकळत आम्ही नेहमी जिथं बसतो, त्या बागेकडे वळतात.
पण आम्ही नेहमी जिथं बसतो, त्या आमच्या जागेवर आज दुसरंच जोडपं बसलेलं असतं.
मी बाभळीच्या झाडासारखा कडेला जाऊन बसतो.
मग तिची जास्तच गरज भासायला लागते.
........................................................नेहमीपेक्षा जास्त.
पण आज ती येणार नसते.
मग कोणीही वाजवत नसलं तरी मला एकट्याला बासरीचे सुर ऐकु येतात.
आठवण जास्त येत असेल तर सतारीचे सुद्धा येतात.
बहुतेक मी वेडा झालोय, असं मला वाटायला लागतं आणि मी खुप बेचैन होतो.
माझ्या डोळ्यासमोरुन मोग-याचे गजरे मिरवत एक गजरेवाला येतो.
खरं तर इतर वेळेला मला त्याचं अस्तित्वही जाणवत नाही. माझ्यासाठी गजरेवाला, दाणेवाला आणि काकडीवाला सारखेच दिसतात.
पण आज तो गजरेवाला क्षितिजावरुन मावळेपर्यंत मी त्याच्याकडे पहात राहतो.
तो नजरेआड होतो तरी मोग-याचा गंध तिथंच...
मी उठतो आणि बागेतुन बाहेर जायला निघतो. दरवाज्यापर्यंत येतो आणि पाऊल खुप जड होतं.
मी मागे वळुन पहातो. आता आमच्या जागेवर कोणीही बसलेलं नसतं.
मी धावत पळत त्या जागेवर येतो... बसतो आणि वेड्यासारखा हसतो देखील....
आजुबाजुच्या परिस्थितीची जाणीव झाली की ओशाळतो.
मग तिथं बसवत नाही... मग उठतो. पण निघवत नाही...मग पुन्हा बसतो.
असं ब-याचदा झाल्यावर मला काय होतय हे मलच कळत नाही.
खुप प्रयत्न करुन मी स्वत:ला समजावतो आणि पायात जीव गोळा करुन जायला निघतो...
कारण माहित असतं.....आज ती येणार नाहीये....
पण...
पण ती आलेली असते. खरंच आलेली असते.
चेह-यावरचा आनंद आणि वेदना लपवत धावत मी तिच्या जवळ जातो.
तिच्या पायात तर तेवढेही त्राण नसतात.
आम्ही दोघं आमच्या जागेवर येतो.
इतक्या वेळात ती काहीही बोललेली नसते.
माझ्या खांद्यावर डोकं ठेवताना ती इतकंच म्हणते की,
............."तु नालायक आहेस."
असेन. मी नालायक असेनही.
पण मी वेडा नाही.
कारण सतारीचे सुर मला एकट्यालाच ऐकु येत नाहीत.
त्याची नशा तिच्याही आयुष्यात आहे.
धुंद रवी.
मस्त रे....:धुंद:
मस्त रे....:धुंद:
छान.. हे आधी कुठे प्रकाशित
छान..
हे आधी कुठे प्रकाशित झालेय का? वाचल्यासारखं वाटतय..
कदाचीत तुला ईमेल नी आलम
कदाचीत तुला ईमेल नी आलम असेल
किंवा माझ्या ब्लॉगवर... www.dhundravi.multiply.com
तो नजरेआड होतो तरी मोग-याचा
तो नजरेआड होतो तरी मोग-याचा गंध तिथंच...>> वा छान उत्कटता साधलीय लिखाणातुन.
नेहमीसारखंच छान !
मस्त
मस्त
अप्रतीम............... मस्त
अप्रतीम............... मस्त लिहिलयं नेहमीसारखं
धुंद रवी! एकदम बेधुंद
धुंद रवी! एकदम बेधुंद लिखाण!!!
रवी बरोबर! मेल मधुनच पाठवलेली
रवी बरोबर! मेल मधुनच पाठवलेली कुणीतरी..
पण परत वाचतानाही तितकीच आवडली कविता!
क्या बात है रवी! पुलेशु!
क्या बात है रवी! पुलेशु!
छान लिहिलंय रवी, एकदम
छान लिहिलंय रवी, एकदम ईमोशनल..
व्वा काव्यात्मक ललित मस्तच..
व्वा काव्यात्मक ललित मस्तच.. आवडले
अगदी मस्त आहे ललित.
अगदी मस्त आहे ललित.
वा! वा! मस्तच!!!
वा! वा! मस्तच!!!
(No subject)
रवी, आवडललं:)
रवी, आवडललं:)
सही है भिडु..
सही है भिडु..
नेहमीसारखंच! मारवाच्या सुरात
नेहमीसारखंच!
मारवाच्या सुरात 'म्मस्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त'
आवडलं !
आवडलं !
क्या बात है!!! मस्तच हेही
क्या बात है!!! मस्तच हेही
सगळ्यांचे मनापासुन आभार....
सगळ्यांचे मनापासुन आभार....
तुमची लेखनशैली खुप छान
तुमची लेखनशैली खुप छान आहे....विशेष म्हणजे, तुम्ही एखादे वाक्य पूर्ण न करता वाचकावर सोडून देता..<<तो नजरेआड होतो तरी मोग-याचा गंध तिथंच...>> यावरुन तुम्ही वाचकावर टाकलेला विश्वास जाणवतो...खुप छान...
मस्त.... हरवलो रे....
मस्त.... हरवलो रे....
असेन. मी नालायक असेनही. पण मी
असेन. मी नालायक असेनही.
पण मी वेडा नाही.
जमलं भाऊ....
मस्त. आवडलं
मस्त. आवडलं
पावसाळी वातावरण आणि धुंद
पावसाळी वातावरण आणि धुंद लिखाण...