......आधिच सांगतो....
खबरदार जर हसाल तुम्ही........ हे विनोदी लिखाण नाही
लोळवण्यास गडाबडा तुम्हाला....... हे हास्याचे बाण नाही
नका शोधु ह्या लेखामध्ये... साहित्याची मुल्य....
नसेल लेख हा मायबोलीच्या... उच्च-लेखांशी तुल्य...
नका लाऊ ह्या ललिताला... धुंद रवीचे मीटर
हे लिहताना घाम गाळला... सुमारे अकरा लीटर
काहीच्या काही ही कविता... पण लिखाण नसे काहीच्या काही
सादर करतोय 'म'ची मैफ़ल... सहन करायची...... तुम्हालाही....
'म'ची मंजुळवाणी मैफील ममताळू मायबोलीकरांसाठी.....
मायबोलीवरच्या माझ्या मायाळू मित्र मैत्रीणींना माझा मानाचा मुजरा.... मायबोलीकर मायबापांकडून मला मिळालेल्या मोलाच्या मुद्देसुद मार्गदर्शनामुळे मी मुक्तच्छंदाची मैफील मनमुराद मांडतोय.
मागच्याच मे महिन्यात, मराठीला मक्तेदारी मानणा-या मूर्ख मवाली माणसांनी, माझ्या मुक्तछंदकाव्यातल्या मुसळधार मल्लिनाथींना 'मरगळलेली मुडदुस मांडणी' म्हणुन मारलं. माझ्यासारख्या मराठी मातीत मुरलेल्या महाराष्ट्रीयन-महानुभव-मनुष्याची मनःशांती मुजोर मुस्कटदाबीनी मालवलीच.
मात्र मायबोलीवरच्या मातब्बर मित्र मैत्रीणींच्या मौलिक मदतीनं मला महिन्यात माणसाळवलं.
मराठीला माय मानणा-या मायबोलीकरांच्या मेहेरबानीचं मुलायम मोरपीस माझ्या मनात मोहरलं म्हणुन मी माझ्या मनातले मांडे मांडले, मग माझ्या ' मरतुकड्या मांजराच्या मावशीचा मांजरपाट मलूल मुंगसाच्या मामाशी' मुक्तछंदाला मराठा मांजरपाट मंडळातर्फे 'मीच माझ्या माघारी' महोत्सावातल्या महागौरवासाठी मानांकन मिळालं. मुक्तच्छंद महारथींसोबतच्या मारामारीनंतर महागौरवाचा मुकुट मला माथ्यावर मिरवायला मिळाल्यास मी मायबोलीला मुद्रांकित माणीकच मानेन.
मराठीच्याच मानगुटीवर मिटक्या मारत.... मस्तीत माजलेल्या मुर्दाड मराठेतर मारेक-यांचे मुंडके मानेसकट मोडणा-या मायबोलीला 'मराठी मनाचं (मानाचंसुद्धा) माहेर' म्हणुन मान मिळण्याची मागणी मी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांसमोर मांडतोय.
माझ्यासारख्या मुलखावेगळ्या मुक्तच्छंदकवीला मायबोलीकर मंडळीत मोजलंत... म्हणुन मनापासुन मुजरा....!
धुंद रवी.
थोडंसं 'म'ला सोडुन....
ह्या लेखात फक्त 'म' वरुन सुरु होणारे वेगवेगळे सुमारे १४८ शब्द आलेत त्यामुळे ह्याचा शेवट 'धुंद रवी'च्या ऐवजी मुंद मवी असा करुन १५० शब्द करावेत असं वाटत होतं. असो.
काही मशब्द सुचले असुनही ते टाकता आले नाहित म्हणुन दुःख होत आहे. सदरचे शब्द वाचण्यास देत आहे. आनंद घ्यावा....
मूळव्याध
मदिरा
मनोरुग्ण
मलेरिया
मसणवटी
मारपीट
माथेफिरु
मोतीबिंदू
लोभ असावा....
धुंद रवी.
मायला! मजबूत मेंदू मोप
मायला! मजबूत मेंदू मोप मिरवलात, म्या म्हंतो!!
मसेबसेक मरचा मब्दश मरडतांनाख ममछाकद मलीझा. मन्यध महेआ ममचीतु, मन्दधु मवीर!
मपलाआ मम्रन,
-ममागा मलवानपै
हे वाचताना "जॉर्ज बर्नाड शॉ"
हे वाचताना "जॉर्ज बर्नाड शॉ" या महान लेखकाचा किस्सा आठवला. भाषाप्रभुच तो तुझ्यासारखा.
एकदा एक बाई त्याला म्ह्नणाली:
"Do you know Mr. Shaw? There is only one word in English, which starts with letter "S" but pronounced as "SH" (श)."
Mr. Shaw immediately said to that lady "I am "sure" madam you are talking about "sugar".
महान माणसांच्या गोष्टीही महान
SUNDER
SUNDER
धुंद रवी मानले
धुंद रवी मानले ----------/\----------
मस्त! मस्त!! आणि मस्त!!!
मस्त! मस्त!! आणि मस्त!!!
मस्त! मुजरा मंद मवी आय मीन,
मस्त! मुजरा मंद मवी
आय मीन, धुंद रवी 
म हा न !
म हा न !
मस्तच........................
मस्तच........................
॓महान...__/\___
॓महान...__/\___
मंदारचा मुजरा
मंदारचा मुजरा
मद्यरात्री मिळालेल्या
मद्यरात्री मिळालेल्या मनःशांतीने / मनःशक्तीने मजल मारलीत ???
मारीये मे ( भारीए हे)
मारीये मे
( भारीए हे)
मस्त!
मस्त!
Pages