"आर्टटॅटॅक"

Submitted by स्मितागद्रे on 1 January, 2010 - 05:47

आजकाल टिव्ही ने सगळ्या मुलांच जग व्यापलय. टिव्ही वरचे कार्टून, पिक्चर्स , जाहिराती हे जणू त्यांच विश्वच बनलय. आजकालचे पालक ही अगदी तक्रार कम कौतुकाने सांगत असतात, आमचा बाळ्या ना रात्री टॉम अँड जेरी पाहिल्या शिवाय झोपतच / जेवतच नाही .

हल्ली मुल एकेकटीच असतात, चार मुलांबरोबर जमवुन घेऊन खेळताना त्यांना बराच त्रास होतो, कारण घरी सगळे त्याचच ऐकतात, त्यामुळे बाहेर मनाप्रमाणे झाल नाही तर त्यांच लग्गेच बिनसत.

ह्या सगळ्यावर उपाय म्हणून आम्ही एक प्रयोग करायच ठरवल होत.

मुलांच लक्ष जर त्यांच्या आवड्त्या गोष्टी कडे वळवल तर त्यांना टिव्हीची आठवण पण होत नाही. त्यांना भरपूर पसारा करु दे, हवे ते रंग ,कागद,खेळणी भरपूर मनसोक्त वापरु दे ,त्यांना टिव्ही लावायची इच्छा पण होणार नाही.

मुलांना अभ्यासा व्यतिरिक्त एक तरी छंद/ कला/आवड आपल्या मनाप्रमाणे जोपासता यावी हे खूप गरजेच आहे, ही जाणीव सतत अस्वस्थ करत होती. सगळी मुल क्लासला जातात, पेटी, तबला, खेळ ,अभ्यास, नाटक शिबीर, असे अजुन असंख्य क्लासेस. पण ते बहुदा पालकांच्या आवडीचे असतात. त्यांच्या मना प्रमाणे काही करण्यासाठी एक दिवस तरी त्यांना मिळावा ह्या संकल्पनेतुन हे शिबीर करायच ठरवल

ह्या ख्रिसमस च्या सुट्टीत आम्ही एक प्रयोग केला.

बिल्डींग मधल्या १०/११ मुलांना २४ तारखेला संध्याकाळी एकत्र जमवल आयांसकट आणि २५ तारखेला एक कल्पक शिबीर घेणार आहोत ही कल्पना दिली. त्यात काही अटी हे ठेवल्या, मुलांनी काहीही साहित्य बरोबर आणायच नाही, जे उपलब्ध साहित्य असेल त्यातुन सगळ्यांनी शेअर करुन आपापल्या आवडीच्या वस्तु, चित्र ,पेंटींग्स जे हव ते बनवायच आणि कुठल्या ही प्रकारे कोणी ही काही ही तक्रार करायची नाही, मला हा / ही पेन्सिल देत नाही, पट्टी देत नाही इ इ. वयोगट होता ९ ते १२ वर्ष.

बरोब्बर दोन वाजता सगळे जमले, आया आपाप्ल्या घरी, सगळ साहित्य एका कोपर्‍यात ठेवल होत त्यात भरपुर क्रेयॉन्स, वॉटर कलर्स , पेपर्,पेन्सिल्स, इरेझर ,फेविकॉल, मणी टिकल्या, बीडस , क्रेप पेपर, सिरॅमिक क्ले,पॉटस, ग्लिटर्स, ब्लोपेन्स इ इ सगळ.

सुरवातीला मुलांचा सगळ साहित्य बघण्यात वेळ गेला, मग प्रत्येकाला ह्या वस्तु वापरुन काय काय बनवता येइल / बनवायला आवडेल हे ठरवायला सांगीतल .

थोड्यावेळातच मुलांनी हॉलला मासळी बाजाराच स्वरुप दिल, भांडाभांडी, मारामारी, ओढाओढी, मुलच ती शेवटी. मी सगळ गोळा केल आणि सांगीतल प्रत्येकानी आपाप्ल्या घरी गेल तरी चालेल ही अ‍ॅक्टीव्हीटी क्रिएटीव मुलांसाठी आहे, भांडकुदळ मुलांसाठी नाही. जरा त्यातल्या त्यात मोठ्या मुलांना बहुतेक काहीतरी चुकल्याच जाणवल असाव, मग सॉरी मावशी, सॉरी मावशी म्हणत सगळ्यांनी गराडा घातला.

मग पुन्हा सगळ साहित्य लाऊन ठेवल, आणी त्यातुन मुलांनी आणि माझ्यालेकी नी ही काही मस्त वस्तु बनवल्या. विंड्चाईम, ग्लासपेंट नी केलेल फुलपाखरु,ख्रिसमस ट्री, सिरॅमिक माती पासुन बनवलेले काही मॉडेल्स, पॉटरच्या मदतीने बनवलेल्या पॉटवर केलेल रंग काम. एक ही मुल अस नव्हत ज्याला ह्या गोष्टी वर्ज्य होत्या किंवा आवडत नव्हत्या.
हे काही फोटोस

हे सिरॅमिक क्ले वापरुन बनवलेले काही आकार
flowers.jpg

हे कागदाच ख्रिसमस ट्री
xmas tree_0.jpg

हे पॉटरच्या सहायाने बनवलेल्या पॉट वर केलेल रंग काम
pots.jpg

हे रफ कागद वापरुन बनवलेल विंडचाइम
windchime.jpg

बूक मार्क्स
bookma.jpg

६ / ७ वाजे पर्यंत मुलांनी एंजॉय केल,मधे मधे ,गाणी, गप्पा,गोष्टी, जोक्स पण होते तोंडी लावायला

मुलांना ही "आर्टटॅटॅक "ची कल्पना खुप आवडली. पुन्हा पुढच्या आठवड्यात त्यांनी अस शिबीर करायच प्रॉमिस घेतल माझ्याकडुन. (आर्टटॅटॅक हा एक टीव्ही वर लागणारा लहान मुलांचाच कार्यक्रम आहे :फिदी:)

मुलांच डोक रिकाम न ठेवता सतत काही तरी खाद्य पुरवल पाहिजे,त्यांना विचार करायला भाग पाडल पाहिजे नंतर ह्याची त्यांना सवय होऊन ते आपसुकच टेव्ही पासुन परावृत्त होऊन नक्कीच काहीतरी क्रिएटीव्ह करतील. त्यांना सांगायची ही गरज लागणार नाही. फक्त गरज आहे त्यांना तुमचा थोडा वेळ देण्याची ,त्यांच ऐकुन घ्यायची, आणि त्यांना मनात येइल ते करु द्यायची .

१५ दिवसातुन एकदा जरी ह्या प्रमाणे वेळ काढला तरी मुल क्रिएटिव्ह बनवायला नक्की हातभार लागेल.
मुलांच्या डोक्यात ही खुप भन्नाट कल्पना असतात त्याला वाव मिळेल.
त्यातुनच आपल्यालाही कितीतरी गोष्टी मुलांकडुन नव्याने माहिती होतील तसच अपल्याकडच्या ही बर्‍याच गोष्टी आपण मुलांना देऊ/ शिकवु शकतो हे प्रकर्षाने जाणवेल.

हे सगळ इथे लिहायचा उद्धेश म्हणजे, तुम्ही जर करुन बघीतला नसेल हा प्रयोग तर नक्की करुन बघा Happy

२९ तारखेला आम्ही अजुन एक शिबीर घेतल ज्यात मुलांसाठी - क्रिएटीव्ह थिंकिंग आणि त्या अनुषंगाने येणारे गेम्स, पझल्स, स्लाईडस, अस बरच काही होत. ते ही मुलांनी खुप एंजॉय केल, कारण कुठे ही त्यात अभ्यासाच नाव नव्हत, स्पर्धा नव्हती तरी अभ्यासाला उपयुक्त सर्व काही होत.
त्या बद्दल पुन्हा कधी तरी....

गुलमोहर: 

फारच छान कल्पना. मुलांना काही निर्मितिप्रक्रियेत गुंतवले, लहानपणापासून एकमेकांच्या सहाय्याने काहीतरी चांगले निर्माण करायचे असे शिक्षण दिले तर तीं मुले मोठेपणी वाईट मार्गांना लागणार नाहीत, त्यांना त्यांचा राग मर्यादेत ठेवणे, दुसर्‍याचे ऐकून घेणे, स्वार्थीपणा न करणे या गोष्टी समजतील.

स्मिता छान वाटलं वाचून.. खरय लहान मुलांमधे इतकी क्रिएटीविटी असते ना.. माझ्या मुलीने ही, तिच्या नील (वय ५ वर्षे - स्वैपाक घरात लुडबुड करून सत्तत काही ना काही मदत करायच्या मागे लागतो तिच्या) च्या क्रिएटीविटी ला वाव देण्यासाठी अ‍ॅपल केक बनवायला घेतली. त्यात त्याने अ‍ॅपल्स सोलण्यात्,किसण्यात ,केक चं मिक्सचर फेटण्यात खूप मदत केली. एव्हढच नव्हे तर केक वर आयसिंग पण स्वतःच केलं आता माझी मुलगी आणी नील, या वयाच्या मुलांसाठी खास असलेल्या नो कुकिन्ग रिक्वायर्ड रेसिपीज च्या क्लासेस ना वॉलेंटिअर म्हणून जातात्.आणी त्याला आता स्वतःसाठी भरपूर सलाद्,सॅण्डविचेस इ. करता येऊ लागलेत. Happy

मस्त उपक्रम स्मि. जमल तर फोटो पण टाक ना

केद्या शाळा काय काय घेईल? अशी काम पालक गट एकत्र येऊन करु शकतो की विकेंडला. तेव्हढाच मुल आणि पालक ह्यांचा बंध पण घट्ट होतो (हा अजुन एक फायदा)

स्मि.. खरच ग मस्त कल्पना असतात मुलांच्या डोक्यात...टीव्ही बघत बसण्यपेक्षा हे नक्कीच चांगल होतं Happy

स्मि, खरंच गरज आहे अशा उपक्रमाची. आम्ही आमच्या कॉम्लेक्स मधे गणपतीत वगैरे अशाच अ‍ॅक्टिवीटीज घेतो, म्हणजे मेंदी, क्राफ्ट, बेस्ट फ्रॉम वेस्ट इ. घरचा कचरा पण साफ Wink

स्मिता, मस्तच उपक्रम. मुलांच्या क्रिएशनचे फोटोही टाक काढले असल्यास.
बायदवे, आर्टटॅटॅक कार्यक्रम मीही पाहिलाय. काय सही क्रिएटिव्हीटी आहे त्या माणसाची(नाव नाही आठवत त्याचं)

स्मिता, मस्त उपक्रम. उन्हाळी सुट्टीत आमच्या इथे विवेकानंद केंद्रात छंदवर्ग असायचे त्याची आठवण झाली.

केदार, नीरजाच्या शाळेत अशीच शिक्षणपद्धत आहे. अल्फाबेट्स लिहायला शिकवताना रंगात सगळ्या मुलांची बोटं बुडवून गिरवायला लावतात. हात बरबटल्यामुळे मुलं खुश, परत परत गिरवतात आणि चटकन शिकतात. नंबर्स साठी रबर स्टँपस् करून घेतले आहेत. मुलं मस्तपैकी कागदावर मारत बसतात.

मी काम करत असताना नीरजाला एक कागद आणि बिनधारेची कागद कापायची कात्री देते आणि हवा तेवढा कचरा करण्याची परवानगी देते. एक दिवस अपघाताने फुलपाखराचा आकार कापला गेला तर स्वारी एकदम खुश झाली. Happy त्याच्या दुस-या दिवशी ते रंगवण्यात वेळ गेला. आजीने बोलावून सुद्धा टिव्ही बघायला गेली नाही बया...

स्मिता भन्नाट कल्पना आहे खूप आवडली Happy

आमच्या घरी कायमच रंग आणि क्राफ्टचं सामान पसरलेलं असतं आणि हे नसेल तर गाण्याच्या वह्या आणि आम्ही पसरलेले असतो मुलांच्या टीव्ही आणि कंप्युटर आणि इलेट्रॉनिक गेम्सचा खरंच वैताग येतो मला.
सकाळी सकाळी माझा डीएस कुठंय म्हणणारं अगदी जवळचं उदाहरण डोळ्यापुढे आहे. Sad

स्मिता- अभिनंदन. खूप छान विचार आणि मुख्य म्हणजे त्यासाठी वेळ काढलास त्याबद्दल तुझं खरोखर कौतुक आहे.
वर्षु- तुमची आयडिया मस्तय एकदम. Happy

ओ.. सुंदर फोटो........ मज्जा.. पोरांनी कित्ती मजा केली असेल आणी खेळता खेळता सहज शिकली असतील..

आर्टटॅटॅक हा एक टीव्ही वर लागणारा लहान मुलांचाच कार्यक्रम आहे >> हा कार्यक्रम मी पहायचो. त्यातल्या Big Picture सारखं काही करता येईल का? छानच उपक्रम...

Pages