तीन दिवस लागोपाठ आलेल्या सुट्टी मुळे पर्यटन जशी स्थळ ओसंडून वहात होती त्याच प्रमाणे जागोजागच्या कचराकुंड्या सुद्धा. महापालिका कर्मचार्यांना देखील सुट्ट्या असल्या मुळे, ह्या कचर्या पेट्या ओला /सुका हा भेदभाव विसरुन भरभरुन वहात होत्या.

गुरुवारी संध्याकाळी आम्ही सोसायटीतल्या अतीउत्साही सभासदांनी प्रत्येक घरी जाऊन विनंती केली, तीन दिवस कचरा गोळाकरण्यात येणार नाही, कृपया आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करा, कचरा कमीत कमी निर्माण करा, आपल्या घरीच ठेवा ,इ इ. काहींनी नुसतच ऐकुन घेतल्,काहींना पटल तर, आले मोठे शहाणे ह्या अविर्भावात ऐकवल ' अहो आपण जरी कचरा टाकला नाही, तरी बाकीचे टाकणारे च ना ?? ते थोडी थांबणार ? त्यातच आपला ही टाकायचा, घरी कसा काय ठेवणार ??"
शेवटी व्हायचे तेच झाल. कचरापेट्या भरभरुन वहायला लागल्या. लोक नाका तोंडावर रुमाल ठेवून , प्रसंगी रस्ता बदलुन ये जा करु लागले , पण कचरा टाकायचे कोणीही थांबले नाही. ही आपली मानसिकता. हे आपल /माझ घर आहे ते स्वच्छ ठेवायलाच हव, ह्या प्रमाणे च हा माझा देश, परिसर, (निदान कॉलनी )आहे, तो ही स्वच्छ ठेवायलाच हवा ही भावना आपल्या मनात कधी निर्मांण होणार ??
मध्यंतरी पुण्यात कचर्याची मोठी समस्या निर्माण झाली होती, देवाची आळंदी इथल्या कचराडेपोत कचरा टाकण्याविरुध्द तिथल्या स्थानिक नागरीकांनी आंदोलन केलं. स्थानिक वस्ती जवळ कचरा डेपो असण ह्याचा अनुभव पुणेकरांनी बरीच वर्ष घेतलाय.तरीही शहरातल्या कचराकुंड्या भरभरुन वहात होत्या, पण नागरीकांनी कचरा टाकण बंद केल नाही. आमच्या सोसायटी मधे त्या दरम्यान आम्ही एक उपक्रम राबवला, ओला कचरा आणि कोरडा कचरा वेगळा ठेवणे, ओला कचरा सोसायटीतील आवारात जिरवणे, प्लॅस्टिक पिशवी न वापरणे. सुरवातीला अगदी अत्यल्प प्रतिसाद मिळाला. पण पुन्हा शनिवार, रविवार प्रत्येकाकडे जाऊन दोन्ही प्रकारचा कचरा वेगळा करण सगळ्यांच्याच कस हिताच आहे हे गळी उतरवण्याचा प्रयत्न केला. शेवटी दोन तीन आठवड्या नंतर आमच्या प्रयत्नांना यश आल. आता सोसायटी तील सर्व लोक ओला व सुका कचरा कटाक्षाने वेगळा टाकतात. आप जर मनात आणल तर ह्या समस्येवर निश्चित पणे मात करु शकतो. गरज आहे आपली मानसिकता बदलण्याची
आपण परदेशातल्या स्वच्छ्तेचे नेहमीच गोडवे गातो, पण इथे वाट्टेल तिथे कचरा टाकणारा माणूस,परदेशी गेल्यावर प्रसंगी कचरा आपल्या पिशवीत, खिशात बाळगतो पण रस्त्यावर टाकत नाही.
हीच मानसिकता आपण आपल्या देशा बाबत का ठेवत नाही ?? इथे तर 'थुकना मना है ' ही पाटीच लाल झालेली दिसते. सोसायट्यां मधे, लोकांनी थुंकु नये म्हणून देवांना वेठीला धरलेल दिसत.मग सरकारला /महापालिकेला दोष द्यायला मात्र सगळे पुढे असतो, पण हेही बघायला हव, महापालिकेन दिलेल्या किती सुचना / नियम आपण अंमलात आणतो ? पाळतो ?
प्लॅस्टिक मुळे होणार प्रदुषण - इतर अनेक भेडसावणार्या समस्यांपैकी ,माणसाने स्वतःच्या गरजे पोटी निर्माण केलेली एक समस्या. खरच आज प्लॅस्टिक चा होणारा वापर हे एक गंभीर समस्या बनलीय आणि ती निर्माण होण्यासाठी आपण आणि आपली मानसिकताच कारणीभूत आहे.
मध्यंतरी ५० मायाक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक वापरा वर सरकार ने बंदी घातली होती. परंतु नियम हे तोडण्याकरताच असतात ह्या उक्तीनुसार, ती कधीच धुडकावुन लावली गेली आणि प्लॅस्टिकचा वापर जोमाने वाढला. आठाण्याची कोथींबीर असो नाहीतर आठहजाराचा शालु असो, प्लॅस्टिक च्या पिशवी शिवाय आपण ती घरीच आणु शकत नाही. इथे खरी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे.
आमच्या इथल्या दुकानदाराशी मी एकदा बोलले होते प्लॅस्टिक च्या पिशव्या न पुरवण्या बद्दल. त्याने २ दिवस बंद केल प्लॅस्टिक च्या पिशव्या देण, पण नंतर पुन्हा चालु. मला म्हणला " तुम्हाला पहिजे तर नका घेऊ, पण मी दिली नाही पिशवी तर शेजारचा दुकानदार देतो, गिर्हाइक जातं माझ अशाने" ही मानसिकता कधी बदलणार ?
माझ्या एका बहीणीची जर्मन मैत्रीण, भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्याकरता आली होती, त्या दरम्यान पुण्यात सवाई गंधर्व महोत्सव चालु होता, त्याला ही ती आमच्या बरोबर आली होती, त्या बद्दल ची तिची प्रतिक्रिया एकदम बोलकी होती.ती म्हणाली " तुम्ही लोक तुमच्या ' कले ' वर किंवा देवावर मना पासुन प्रेम करत नाही, फक्त स्वतःचा आनंद . स्वार्थ बघता त्यात " आम्हाला खर तर राग आला तिच्या ह्या बोलण्याचा ,
ती म्हणाली" ज्या गोष्टी वर आपण मना पासुन प्रेम करतो, आदर करतो, त्या गोष्टीची आपण सर्वतोपरी काळजी घेतो, ती घाण होणार नाही अस बघतो, पावित्र्य राखायचा प्रयत्न करतो, पण तुम्ही तर अशा सगळ्या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या, थर्माकॉल चे ग्लास, कागद इतक्या सगळ्या गोष्टी फेकुन सगळी कडे घाण करता, अगदी देवळात सुद्धा,
जस घर आपल/ माझ आहे ही भावना तुमच्या मनात असते ,तस हा देश 'माझा' आहे ही जाणीव तुम्हाला कधीच होत नाही , कधी झालेली मी बघीतली ही नाही, तस असत तर तुमच्या देशात माणसांच्या बरोबरीने कदाचित जास्त प्रमाणात पसरलेल कचर्याच साम्राज्य दिसलच नसतं" तिने दिलेले हे स्पष्टीकरण मनातुन १०० % पटल आणि मनाला लागल खर तर.
फक्त आपण नियम / अटी पाळून, स्वच्छता राखुन काय होणारे ? आपण प्लॅस्टिक चा वापर बंद करुन प्लॅस्टिक प्रदुषण कमी होणारे का ? फक्त आपणच कचर्याच वर्गीकरण करुन काय होणारे ? चला हे सगळे विचार कचर्यात फेकुन , कचर्याच/ प्लॅस्टिक च साम्राज्य नष्ट करायला आपल्या पासुनच सुरवात करुया,
आपल्या चिकाटीला मानलं... मी
आपल्या चिकाटीला मानलं... मी वैयक्तिक पातळीवर हे सगळं पाळतो, घरच्यांनाही पाळायला लावतो, पण त्यापलिकडे जायची माझ्यात शक्ति/इच्छा/धैर्य नाही.
... आपल्या बेसिकमधेच लोचा आहे
छान लिहीले आहे
छान लिहीले आहे ....लिहीण्यातली तळमळ भावली ....
कळकळीने लिहिलय. एकदा ट्रेन
कळकळीने लिहिलय.
एकदा ट्रेन मधे बायका मस्त भाजी निवडत बसलेल्या होत्या आणि कचरा सरळ खाली जमिनीवर. मी त्यांच्या समोर कचरा उचलला आणि माझ्या बॅग मधे टाकला(सोबत नेहेमी एक कॅरीबॅग ठेवते)
.. मग जरा त्यांना लाज वाटली असावी. मला म्हणत 'अहो उचलणार होते मी '
छानच लिहिल आहे. एकदा एक बाई
छानच लिहिल आहे.
एकदा एक बाई ट्रेनमधून हातातला कचरा बाहेर फेकत असताना माझ्या बहिणीने तिचा हात धरला तर म्हणाली, " मी लॉयर आहे, तुझ्या विरुध्द केस करीन वगैरे वगैरे.' माझी बहीण म्हणाली, " केस जरुर कर पण मी तुला कचरा बाहेर टाकू देणार नाही." पण स्टेशनवर उतरल्यावर तेथेच रुळांवर कचरा टाकून गेली. शिक्षण आणि सुसंस्कृतपणा ह्याचा काही संबंध नाही हे दाखवून दिलं.
स्मिता, छान मनापासून लेख
स्मिता,
छान मनापासून लेख लिहला आहेस आणि महत्वाच्या मुद्द्याला हात घातला आहेस. गेल्या आठवड्यात कामानिमीत्त अहमदाबाद्ला जाण झाल. बरोबर अमेरिकन आणि युरोप मधले सहकारी होते. त्यातले दोघ जण (त्यांची पहिली भारतवारी होती) रस्त्यावर प्रातर्विधी करणारी लोक बघून हबकलेच. विचारत होते कि ह्या देशात कायदे नाहीत का सार्वजनिक संडास नाहीत? माझ्याकडे उत्तर नव्हत! सुट्या वगैरे नसताना कचरापेट्या भरून उतु गेल्या होत्या.
पण मला कुतुहल आहे की इतर गरीब देशात सुद्धा हीच परिस्थिती आहे का? रस्त्यावर थुंकणारी लोक सुद्धा फक्त भारतातच आहेत का?
पण मला कुतुहल आहे की इतर गरीब
पण मला कुतुहल आहे की इतर गरीब देशात सुद्धा हीच परिस्थिती आहे का? रस्त्यावर थुंकणारी लोक सुद्धा फक्त भारतातच आहेत का?
मी असे ऐकले (जे लोक अफ्रिकेतले, मध्यपूर्वेतले, दक्षिण अमेरिकेतले अनेक गरीब देश हिंडून आले आहेत, त्यांच्याकडून) की इतर देशात सुद्धा काही माणशी एक स्वच्छता गृह नसते, अगदी भारतासारखीच अवस्था आहे थोड्याफार प्रमाणात. स्वच्छता गृहे कमी. पण ते लोक भर रस्त्यावर तसले काही करत नाहीत! करत असतील तरी ते लक्षात येत नाही, कारण लोकसंख्या कमी.
रस्त्यावर थुंकणे नि चड्डी सोडून बसणे ही खास भारतीय संस्कृतीची वैशिष्ठ्ये आहेत. आणि लोकसंख्या जास्त असल्याने ते लगेच लक्षात येते.
शिवाय स्वच्छता करणे हे आम्हा उच्च जातीय लोकांचे काम नव्हे. आम्हाला आमच्या जातीचा अतिशय अभिमान आहे, जीव गेला तरी बेहेत्तर, आम्ही असली जातीला लाज आणणारी कामे करणार नाही.
हा संस्कृतिक फरक देशा देशात असतो.
Pages