राज पिछले जनम का!

Submitted by राजे on 17 December, 2009 - 06:11

राज पिछले जनम का नावाचा एक नविन कार्यक्रम NDTV Imagine वाहिनिवर सुरु झाला. कालचा एपिसोड बघुन मी तर बुचकाड्यातच पडलो. आता पुनरजन्माबद्द्ल कुतुहल वाढलय.

डॉ. गायकवाड नावाची एक व्यक्ती मुळ गाव नांदेळ जवल कुठे तरी. मागील १० वर्षापासुन कावळे त्यांचा जातील तिथे गाठुन फार त्रास देतात अशी त्यांची तक्रार होती. या कावळा प्रकरणाचा मागच्या जन्माशी काही संबंध आहे का, हे जाणुन घेण्यासाठी काल ते तिथे आले होते.

डॉ. तृप्ती जैन ( पुनरजन्म प्रवास तज्ञा / ज्ञ ) ह्या, गायकवाडाना या घटनेचे मुळ शोधण्यासाठी मागील जन्माच्या प्रवासावर घेऊन जातात, व घटनेचे मुळ सापडते ते सन १२४८ या वर्षी.

हे गायकवाड नावाचे इसम १२४८ साली मँगलुरु नावाच्या शहरात एक देविच्या मंदिरात पुजारी म्हणुन कामाला असतात. व त्याची एक प्रेयसी हि असते, पण ती बहुतेक खालच्या जातीची असते. त्याच मंदिरात एक माथेफिरु सिनिअर "धुत" नावाचा पुजारी ( की कोणी राजाचा कर्मचारी, हे निट कळले नाही) राहतो. अमुक अमुक दिवशी तलवारिने कावळयाचा बळि दिल्यास ती तलवार सोन्याची होते या अंधश्रद्धेमुळे तो कावळ्यांचा बळि देतो. हे सगळं गायकवडच्या देखत होतं, पण गायकवाड त्याचा विरोध करायला समर्थ नसतो म्हणुन तो विरोध करत नाही. व एक दिवस हा माथेफिरु गायकवाडच्या प्रेयसिला मंदिरात प्रसादाला हात लावताना बघतो व तिची कत्तल करतो, हे सर्व त्या गायकवाडच्या पुढे घडते पण तो तिचा बचाव करायला पुढे सरसावत नाही. म्हणुन जीव जाताना ती गायकावाडला शाप देते की तुला पुढच्या कित्येक जन्मांत प्रेयसी लाभणार नाही. ती मेल्यावर व्याकूळ होऊन गायकवाड त्या धुताला शाप देतो, की तु कावळा होऊन जन्माला येशील. ही घटना आहे १३ व्या शतकातील. तेंव्हा त्या राज्याचा राजा विक्रमादित्य असतो.

म्हणजे या जन्मात कावळ्याच्या रुपात श्रीमान पुजारी धुत साहेब गायकवाडांचा पिछा करुन त्रास देतात हे गवसलं. दुसरं असं की गायकवाडचं ह्या जन्मात कुठल्याहि मुलिशी पटत नाही, ह्याचं कारण त्याच्या प्रेयसीची आत्मा हे सगळं घडवुन आणत असते. तो जेंव्हा केंव्हा चांगलं करायला जातो व प्रेम जुळायला स्कोप असतो तेंव्हा तेंव्हा त्याच्या प्रेयसीची आत्मा सगळा खेळ बिघडवित असते. आणि या सगळयातुन आता गायकवाडाना मुक्ततता मिळाली असं पुनरजन्म प्रवासतज्ञा जाहिर करतात व कारक्रम संपन्न होतो.

मानो या ना मानो स्टोरी मे दम है

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी शेखर सुमन आलेला तो भाग बघितला होता. त्यात तो ब्रिटिश सोल्जर होता आणि तिकडेच राहात होता.

पण ती बाईला मात्र सगळे आधीच माहित असते. इकडे जा, तिकडे पळ, ह्याचा चेहरा निट बघ, त्या कोप-यात काय आहे बघ...... शेखर सुमनला तिने युद्धभुमीवर जा म्हणुन हुकुम दिला. तो बिचारा तिकडे जातो न जातो तोच लगेच घरी पळ म्हणुन फर्मावले. तो तसेच हातातले काम टाकुन घरी पळाला, तर घर त्याच्या बायकोमुलासकट जळतच होते.....

कदाचित हे इकडे जा तिकडे बघ वगैरे प्रोसेस खुप स्लो होत असेल, पण आपल्याला एडिट करुन दाखवत असल्यामुळे फास्ट वाटत असेल.. हे अर्थात प्रोग्रॅम मध्ये दाखवतात ते खरे असले तरच.. मला तरी फारसे खरे वाटत नाही. सेलेब्रिटीज सोडुन बाकीच्या लोकांना हिप्नोटाईज करुन पाहिजे ते वदवुन घेत असतीलही...

सेलेब्रिटीज मात्र त्यांना हवे तेच बोलतात... मागे पेपरात वाचलेले - एक भोजपुरी आयटेम गर्ल गेल्या जन्मी म्हणे बारगर्ल होती आणि ते ऐकुन तिच्या आईबाबांना प्रचंड धक्का बसलेला..... आता गेल्या जन्मात आपण कोण होतो त्यावर आपला काय कंट्रोल आहे का???

एक भोजपुरी आयटेम गर्ल गेल्या जन्मी म्हणे बारगर्ल होती >> म्हणजे बार गर्ल चा इतिहास नक्की किती वर्षाचा आहे हो.

रविकिशन ? ..... भोजपुरी मधला अमिताभ .......... ???????/
जास्तित जास्त भोजपुरी मधला जॉनी लिवर म्हणता येईल .

रविकिशन ? ..... भोजपुरी मधला अमिताभ .......... ???????/
जास्तित जास्त भोजपुरी मधला जॉनी लिवर म्हणता येईल .

असे भोजपुरी लोक म्हणतात.. मला तर जॉनी लिवरचाही अपमान होईल असे वाटते.. जॉनीबाबाही गलिच्छ आहे पण इतका नाहीय...

म्हणजे बार गर्ल चा इतिहास नक्की किती वर्षाचा आहे हो.

ते त्यांनाच ठाऊक. पण त्या मुलीने ती खरेच बारगर्ल नव्हती. सेटवरच्या कोणीतरी उगाच खोटे पसरवले असे मुलाखतीत अगदी जीव तोडुन सांगितले. मुलाखतीच्या हेडींगम्धे 'राज पिछले....' चा उल्लेख होता म्हणुन मी मुद्दाम वाचली होती.

बाकी असले हिशोब ह्या कार्यक्रमात चालत नाहीत.. तिथे कोणी १०० वर्षांपुर्वीच्या इतिहासात जाते तर कोणी १०००.. मग मधली वर्षे हे आत्मे कुठे भटकत होते हे विचारायची फी बाईंना दिलेली नाहीय बहुतेक...

चॅनल्स सर्फ करता करता दोन्-तीन वेळा अर्धवट काही एपिसोड पाहिले. त्यावरून कोणत्याही सुज्ञ माणसास बनवाबनवीची कल्पना यावी.

ज्यांच्या पत्रिकेत काळसर्प योग असतो त्यांना पूर्वजन्मातील घटना नीट आठवतात. शनी लग्न आणी सप्तम स्थानात मंगळ असेल तर ही शक्यता जास्तच.

मी परवाचा पायल रोहतगी आली होती तो एपिसोड पाहिला होता. ती म्हणे ब्राझिल का कुठे होती. मी विसरले नक्की कोणता देश ते. पण ती मागच्या जन्मी पुरूष होती. आणि त्या जन्मात बायको त्याच्याच मित्राबरोबर पळून गेली. घोड्यावर बसून..
आता ती पायल काय पहात होती ते या टिव्हीवाल्यांना काय ठाऊक? ती बाई म्हणते पायाखाली बघ, जमिन आहे का? कुठे उभी आहेस? काय घातलंयस? घरी कोपर्‍यात कोण बसलंय?
येणार्‍या प्रत्येक माणसाच्या मागच्या जन्मी सगळं वाईट्ट्च घडलेलं असतं, असं का? Uhoh
चांगलं घडलेलं एक पण का नाही दाखवत? आणि मागच्या जन्मीचा आणि या जन्मीचा (बादरायण) संबंध जोडायलाच हवा का? फक्त मनोरंजन म्हणून पहा ना.. किंवा तिथे जा.. Sad
मी तर मेंदूला खाद्य हवे असले तर पाहते चुकुन, पलिकडे आवडती सिरियल सुरु असली की त्याच्या ब्रेक मध्ये हे पहायचं. कुठुनही पाहिलं तरी कळतेच सिरियल.. Proud

कसला विनोदी एपिसोड आहे वर प्रस्तावनेत दिलेला. १२व्या शतकात उठ सुठ कोणीही ( माणसांनी) मरताना शाप दिले ते खरे व्हायचे की काय? देव तर देव पण माणसं ही असल्या "पावर" राखुन होते वाटतं Lol

नक्कीच असेल, तोही भयाण नर्तकी..... ह्या जन्मातही तो विसरला नाहीय तेव्हाच्या लकबी..

गीतेत व गौतम बुद्धांच्या जातक कथांमध्ये पुनर्जन्माबद्दल अनेक दाखले आहेत.>>>>>>>>>>>>>>>>>
सेनापती साहेब ते सगळे महान होते, कुठे ते तुकाराम महाराज आणि कुठे आपला गुत्यावरचा तुक्या,नाव तुकाराम असल्याने काहीही होत नाही.
तसंच हे आहे, नावात किशन (कृष्ण) आहे म्हणजे काय गीता लिहु शकत नाही तो....तुम्ही म्हणता तसे दाखले असतील पण ही संत मंडळी वेगवेगळ्या साधना करणारी होती त्यामुळे या तुम्ही म्हणता त्यात तथ्य असेल

Ase maha murkh karyakram marathi channel var suru karavet bakkal murkh janata marathit pan ahe ti tyana jaroor labhel...hehe

शिर्डी संस्थानकडुन १९२३ सालापासुन साईलीला हे मासिक प्रकाशित केले जाते. १९३० च्या साईलीले मधे नॉर्थ इंडीया मधे १९२५ - १९२६ च्या एका पुनर्जन्माची कथा दिलीये त्यावरुन पुनर्जन्म होतात असं वाटतय, बाकी मानणे न मानणे हे प्रत्येकाचे वैयक्तीक मत आहे.

लिन्क : https://www.shrisaibabasansthan.org/saileela/SAILEELA_Old/SAILEELA1930EX...

अजुन १ विनोद.

शाहरुख म्हणे मागच्या जन्मी नर्तकी होता, इकडे पहा

Submitted by गौतम७स्टार on 15 January, 2010 - 03:29
नक्कीच असेल, तोही भयाण नर्तकी..... ह्या जन्मातही तो विसरला नाहीय तेव्हाच्या लकबी..>>>>>>>> Rofl

Pages