सासु आणि सुन

Submitted by वर्षा_म on 10 December, 2009 - 07:00

लग्न ठरले की सासुला जश्या मैत्रीणी सल्ला देतात .. तश्याच सुनेला पण
(लोकांनो असले सल्ले द्यायचे बंद करा)

सासुची मैत्रीण

मुलाचे लग्न करताय म्हणालात
मुठीतच ठेवा मात्र नविन सुनेला
आजकालच्या पोरींचे या काही खरे नाही
सासुला आई आणि नंदेला म्हणतात ताई

काहीनाही आधीपासुनच धाकात ठेवलेली बरी
नाहीतर वाटल तुमच्या डोक्यावर मिरी
स्वयंपाकघर मात्र तुम्ही सोडु नका
केरवारा मात्र आता तुम्ही करु नका

सणवार कसे व्हायला हवेत नीट
नोकरी करते म्हणुन कसली आली सुट
करीअरची त्यांनाच असते हौस
वाटते त्यांना सासु करते त्यांच्या जिवावर मौज

=============================

सुनेची मैत्रीण

सासु नामक प्राण्याला जवळ करु नकोस
चार शब्द प्रेमाने तिच्याशी बोलु नकोस
बोलता बोलता उगी काही बोलुन जाशील
शब्दांमधे तुला ती वेठीवर धरील

झाला म्हणा तुमचा आता भरपुर संसार
तुम्ही आता निवांत टाळांचा घ्या आधार
कामाला सगळ्या बाई टाक लावुन
उगीच कुणाचे उपकार नको घेउ ठेउन

मी आता माझ्या मनाप्रमाणे म्हणा घर लावते
जुन्या सगळ्या वस्तु भंगारात टाकते
काय डोंबले त्या जुन्या वस्तुत यांचे मन
घरभर नुसते भंगार टन टन
===========================

अरारारा ....तुम्हा सासवा सुनांच्या भांडणाच्या नादात बिच्चार्‍या नवरा नामक मुक्याप्राण्याचा छळ होतोय ...
." तुमचा खेळ होतो अन आमचा जीव जातो "

Proud

:P:

Pages