"सुहाना सफर और ये.." किंवा गाडी बुला रही है.." तत्सम गाणी.. 'देश- विदेश सहल सवलतीत' 'फिरा अन मज्जा करा' अशा जाहिराती , टीव्हीवर पाहिलेले असंख्य विदेश या सा-याला भूलुन मध्यमवर्गिय 'घर' 'फिरायला' जायच ठरवतं. सुरूवात 'कसे' यापेक्षा 'कुठे' पासून.. भारत- पाकिस्तानने केली नसेल इतकी चर्चा 'कश्मिर' प्रश्नावर केली जाते.अखेर सा-या सीमाप्र्श्नांच्या प्लिकडची विदेश वारी 'फायनल' होते. हौसेच्या आणि प्रवासाच्या 'मोला' चा सुवर्ण्मध्य साधला जातो. पासपोर्ट, व्हिसा इत्यादी दिव्यातून जाऊन अतिआवश्यक अशा वळ्णावर गाडी येते... खरेदी!!!!!
'खरेदीचा श्रीगणेशा कपड्यांनीच होतो' या अलिखित नियमाला पाळून 'परदेशोद्भव' भासण-य 'मॉल'मध्ये खरेदीचा शुभरंभ होतो. 'एक ती 'मयसभा'.. त्यानंतर थेट आम्हीच" अशा थाटात थाट्लेल्या मॉल मध्ये "आवड आणि किंमत हे शब्द कदाचित आधुनिक शब्द्कोशात परस्प्र विरोधी शब्द असावेत' याचा प्रत्यय येऊ लागतो. मग.. 'इथं काही व्हेरयटीच नाही' अशा मुक्ताफळांच्या आधारे 'उधळपट्टी' थांबवली जाते.
मग 'शक्य तितक्या 'कंफर्टेबल' वेस्ट्र्न मध्ये' समाधान मानले जाते. निदात 'नऊवारीतली बयो' पंजाबी ड्रेस मध्ये अन सहावारीतल्या काकू 'कार्गो' मध्ये अवतरतात. काकासुद्धा 'निश्काम कर्मयोगाने' फुलाफुलांचा शर्ट, सनग्लासेस इ.त दिसू लागतात.
बॅगेत आगदी सुई दोरा, अम्रुतांजन पासून पाच आक्डी किंमतीच्या 'कॅम" ची भर पड्त असते. (पण ऐन वेळी 'कॅम' न ऑप्रेट करता आल्याने जुना 'कॅमेरा' ही जागा पट्कावतो)..
एव्हाना नातेवाईकांत वा-याच्या (सॉरी... विमानच्या) वेगाने पर्देशवारीची बातमी पसरलीच असते.. त्यामुळे 'आमच्या सुमीचे परदेश अनुभव.." पसून थेट "तुमच्यासठिइ नक्की आणू हो इंपोर्टेड पावडर.." अशी अनेक स्टेशन पार पाडत गाडी धावत रहाते...
भरपूर उत्सह आणि सामनही.. बरोबर घेऊन प्रत्यक्ष 'उडयचा' दिवस उजाड्तो. सकळपासून देवाला 'फ्लाईट मध्यरत्री आहे,, अॅसिडिटी पसून वाचव'' ते '' बागेतल्या फुलांच रक्षण कर" पर्यंत साकडं घातलं जातं.
नवर्सात दिवस सरल्यावर अथक प्रयत्नांनी टॅक्सी मिळवूनही काकांची सुटका नसते. ''गॅस बंद केल ना' ते ' लॅचकी घेतलीत ना सोबत?' अशा पावसात ते भिजत असतात. अखेर विमानत्ळ अल्याआल्या 'मीटर' वर वाद न घालता राजा (?) उदार होतो अन बिल देतो.
तिथं आधिच ह्जर असलेल्या मित्र्परिवारसह आत प्रवेश होतो. चट्पटीत हवाईसुंद्-यांपुढे आपण 'सुंदर ते ध्यान तर वाट्त नाही न,... यामुळे अस्वस्थ होऊन समस्त स्त्रीवर्ग गड्प होतो.
इक्डे अहोवर्ग दिलदर्प्णे मित्रांना 'कॉफी' ला नेतात पण दर बघून कॉफी स्वास्थालाहानीकरक असते.. याच त्यांना प्रत्यय येतो. तरी मनकवडे मित्र 'इनो' पुढे करून कॉफ उकळ्तातच.
प्रसधन आटोपून परत्लेल्या महिलावर्गात 'टिप्स' ची देवाण घेवाण सुरु असतानाच विमानाची घोषणा होते..
थाटत निरोप्समारंभ सुरु असतानाच कोणीतरी 'ते आपल विमान नाही.. अशी बातमी देत.
त्या गोंध्ळत आपल्याच विमानाच्या घोष्णेवर्ही तो मी नव्हेच.. चा खेळ होतो..
सा-यातूना पुढे जाताच 'हवेतले' आपण सामानाच्या वजनाने जमिनीवर आद्ळ्तो....... निरुप्द्रवी सामानाला वाट करून दिल्यावर खरेदी तरी सुरक्षित राहीली या समाधानाने जरा 'रिलॅक्स' होतो.
पुढच्या सोपस्क्रांची (?) .. पासपोर्ट.. व्हिसा वगैरे तून सुटून आखेर.. विमानाक्डे कूच केलीजाऊन प्रत्यक्ष प्र्वासला सुरुवात होते आणि 'प्रवास' तुम्हाला नवी 'ओळख देतो' याचा नव्यानेच प्र्त्यय येऊ लागतो.....
.......... खरं तर मंडळी.. 'प्रवास या सदरात आण्खी बरेच सदरे येतात,,, पण आपण आत्ता त्या सद-यात न शिरलेलं बरं ..... नही का????
सुहाना सफर और.......(माझा एक 'विनोदी' प्रयत्न)
Submitted by मी कल्याणी on 15 November, 2009 - 11:17
गुलमोहर:
शेअर करा
प्रयत्न छानच जमलायः) पण आणखी
प्रयत्न छानच जमलायः)
पण आणखी थोडा मोठा हवा होता.
शेवट तुटल्यासारखा वाटतो.
.
अगदी बरोबर, आजुन थोड लिहायला
अगदी बरोबर, आजुन थोड लिहायला पाहिजे होतं
तरी चांगला प्रयत्न.
कल्याणी, खरच चांगलं लिहिलय.
कल्याणी, खरच चांगलं लिहिलय. पण अगदी आवरतंही घेतलय. असं का?
तसच जे काही लिहिलय, ते नीट, सलग, सहज वाचता येण्याजोगं करा, कृपया.
अजूनही संपादन करून तुम्ही हा लेख सुधारू शकता, वाढवू शकता.
बरहा सारखं मोफत सॉफ्टवेअर वापरून आधी लिहून, सुधारून, मगच इथे प्रकाशित करू शकता.
तुम्ही चांगलं लिहिताय म्हणून एक विनंती आहे... विचार करा की, तुम्हीच तुमच्या कलाकृतीच्या बाबतीत "टाकणं टाकल्यासारखं" वृत्ती दाखवलीत तर वाचणारे वेळ काढून, निगुतीनं वाचतिल का? तुम्ही स्वतः असं दुसर्याने कसंतरी लिहून मोकळं झाल्यासारखं लिहिलं तर वाचाल का?
पुढल्याच का... ह्या लेखाला सुधारण्यासाठीही माझ्या शुभेच्छा!
तुमचं अजून वाचायला आवडेल.