घडाळ्यात बारा वाजले .

Submitted by ShantanuG on 11 February, 2008 - 08:36

एकदा एक चित्रपट बनतो . तर टॉकीजबाहेर लिहितात 'बंगाल्यांसाठी नाही '.तो चित्रपट फार गाजतो.एक बंगाली माणूस ठरवतो की आपण जायचे चित्रपट बघायला.तो वेश बदलतो व जातो.पूर्ण चित्रपट संपतो,सगळे हसत असतात,पण याला काही उमजे ना.तो चित्रपट संपल्यावर बाहेर येउन एका मराठी माणसाला विचारतो ,"भाऊ,मला सांग या चित्रपटात हसण्यासारखी कोणती गोष्ट आहे ?"
मराठी माणूस म्हणतो,"दादा,तुम्ही बंगाली का ?"
"अरे तु कसे ओळखले?"
"मी ओळखले कारण तुम्हाला चित्रपट कळलेला दिसत नाही!"
बंगाली माणसाला राग येतो.तो जाऊन आपल्या बंगाली मित्रांना सांगतो.ते एक गट बनवतात व एक चित्रपट काढायचा ठरवतात्.टॉकीज बाहेर लिहितात 'फक्त बंगाल्यांसाठी '.तो चित्रपट गाजतो.एक बिहारी माणूस ठरवतो की तो जाणार चित्रपट पहायला.तो वेश बदलतो व जातो.चित्रपट पाहतांना संपूर्ण चित्रपटग्रुहात शांतता असते.सर्वत्र 'सस्पेंस' .चित्रपट संपतो तर तो बिहारी एका बंगाल्याला विचारतो,''दादा,मला सांगाल का की या चित्रपटात 'सस्पेंस' अशी कोणती गोष्ट आहे ?"
"बेटा,मला सांग तु या चित्रपटात काय पहायले ?"
"मी पहायले की एक घड्याळ होते ज्याच्यात बारा वाजले होते व तीन तास ते घड्याळात बाराच वाजले होते."
"अरे हाच तर तो 'सस्पेंस' ."
"अरे पण ह्याच्यात काय 'सस्पेंस'?"
"बेटा,'सस्पेंस' असा की 'घडाळ्यात वाजलेले बारा दुपारचे होते की रात्रीचे ?"

गुलमोहर: