अपेक्षा....

Submitted by स्मिता द on 27 October, 2009 - 02:43

अपेक्षा.........

अपेक्षा प्रत्येक मानवी मनाचा अविभाज्य भाग. खुप ऐकलय मी, अनुभवलय ही की दु:खाचे मुळ कारण अपेक्षा. खुप पुर्वी व. पु वाचले त्यात एका वाक्याने लक्ष वेधले "अपेक्षाच नाही ठेवली की अपेक्षाभंगाचे दु:ख नको." पटलही..अपेक्षाच नको..मूळ दु:खाचे कारण.. माझ्या काही अपेक्षा असतात त्या नाही पुर्ण झाल्या की मला दु:ख होतं..मग हळूहळू अपेक्षा बंदी सुरु केली..पण अपेक्षाच न ठेवण हे मला खुपच तटस्थपणा कडे नेणार वाटायला लागलं पण हा तटस्थ पणा मला मानसिक सुखाकडॆ नेतोय असेही जाणवले.....

यासगळ्या अपेक्षा, अपेक्षाभंगाच्या आवर्तात परवा चुकुन माझ्या प्रियजना कडून मी वाक्य ऐकलं माझी तुझ्या कडून काही अपेक्षाच नाही..आज वर अपेक्षाच नको चा पुरस्कार करणारी मी त्या वाक्याने मात्र दुखावले..एखादी व्यक्ती तुझ्याकडुन अपेक्षाच नाही म्हणते यात काय असते दडलेले उद्वेग, उपेक्षा की अजुन आपल्या विषयीची तटस्थता. तुझ्याकडुन अपेक्षाच नाही या शब्दाने मी दुखावले..ती व्यक्ती माझ्याबाबतीत तटस्थ झाली असाच भाव माझ्या मनी निर्माण झाला. वडिलधारी वैतागुन म्हणतात आमची काही अपेक्षाच नाही.. प्रसंगी अपत्यच्या वागणुकीवर आलेले हे उदगार असो वा वक्तव्यावर ..पण यात त्यांचा उद्वेग , दु:ख नसतं दडलेलं?

मग या अपेक्षा नसण्यात नाही का दु:ख? दु:ख अपेक्षाभंगाचच नाही तर आपल्या कडुन कोणाची काही अपेक्षा नसणं या उपेक्षेतही असतं. मग अपेक्षाच नसणं यात कुठं आलय सुख? किती गंमत आहे नाही आपण अपेक्षा न ठेवणं यात आपल्याला सुख पण आपल्याकडुन कोणाला काही अपेक्षाच नाही या भुमिकेत मात्र आपणास दु:ख..कि इथेहि माझ्या कडुन कोणी अपेक्षा करावी निदान स्नेहाची तरी या अपेक्षेचा हा अपेक्षाभंग?..

म्हणजे अपेक्षा अन अपेक्षाभंग या व्यक्ती सापेक्ष संकल्पना..अपेक्षा नसणं हा तटस्थ भाव कि सुखद भावना? असा विचार करता करता त्या अपेक्षा अन अपेक्षभंगाच्या आवर्तात सापडले मी..अन मग परत याच निर्णयाप्रत आले अपेक्षाच नको माझ्याही आणि इतरांच्याही...म्हणजे अपेक्षाभंग कोणाचाच नको. माझ्या अपेक्षा नकोच पण दुसर्‍यांच्या आपल्याकडुन अपेक्षा नाही हे ही पचवायला यायला हवे.तरच मग असे म्हणता येईल सर्व दु:खाचे मूळ अपेक्षा....

गुलमोहर: 

तुम्ही म्हणताय ते एकदम खरं आहे...... अपेक्षाच नको..... माझ्याकडून आणि इतरांकडूनही.....
पण दुसरयांना आपल्याकडून काही अपेक्षा नाहित हे पचवणं जरा जडच जातं हेही तितकचं खरं आहे.....

अगदी खरं
मघाशीच मी ह्या विषयावर मैत्रिणीला बराच लांबलचक मेल केला
पण नीट शब्दात मांडताच नाही आल
हा लेख वाचला आणि तिला लिंक पाठवुन दिली, म्हटलं की आधिचा मेल नको वाचत बसुस, हेच फक्त वाच

खूपच सुरेख लिहिलय

हसरी, काही गैरसमज होतोय का? कारण मी ते हसत आणी गमतीने म्हणतेय.. मला वाटत स्माईली पण टाकलीये..गंमत आवडत नसेल तर क्षमस्व! पण मी जे बोललेय ते निखळ गंमत म्हणुन अन प्रतिक्रिय तुम्हा दोघीच्या होत्या म्हणुन मी दोघीच नाव टाकल्..अर्थात मी तुमच्यावर काही आक्षेपार्ह बोललेले नाही किंवा वाद घालण्याचा माझा स्वभाव नाही.
पण एक सुचना करते पटली तर पहा प्रत्येक वाक्य हे वादग्रस्त होऊ शकते .आपण त्याचा कसा.अर्थ काढु त्यावर ते अवलंबुन असते. इथे मा बो वर तुम्ही वाद चाललेले वाचत असाल त्यामुळे मी हे वादग्रस्तच बोलतेय असा तुमचा गैरसमज झाला असेल तर कृपया तो काढुन टाका. काय होते अर्थाचा अनर्थ झाल्यास अनेक अनर्थ उदभवतात. मला जेव्हा काही बोलायचे असते ते मी सरळपणे बोलते असे वेगळे अर्थ निघणारे बोलत नाही तेव्हा निदान माझ्या बाबतीत तरी गैरसमज नसावा ही कळकळीची विनंती.

बासुरी मि माझ मत माडल आणि मि काही गैरसमज केला नाही मला फक्त सांगायच होत तु छान लिह्तेस
मला आवड्ते म्हणुन मि प्रतिसाद देते (कुपया माझ्यामुळे गैरसमज झाला असल्यास क्षमा कर)
बासुरी आपण friendship करु (तुझी हरकत नसेल तर)म्हणजे असे गैरसमज होणार नाहि पुन्हा एकदा sorry

हसरी..:) मैत्रीणी झालोय बघ आता आपण..तेव्हा सॉरी नको नाही का?..:)

अशीच वाचत रहा आणि हो प्रतिसाद पण देत रहा..:)

मी पण..... मी पण.....
हसरी, बासुरी मलाही तुम्हा दोघींशी मैत्री करायला खूप आवडेल............
wat say????????

बासुरी,
नेहमीप्रमाणेच छान मांडलयस. अपेक्षा नसल्या की अपेक्षाभंगाच दु:ख नसत हे खर असल तरी मला वाटत अपेक्षा बर्‍याच वेळा जगण्याला उद्देश (purpose) देतात. अपेक्षा मॅनेज करता आल्या पाहि़जेत तरच अपेक्षाभंगाच दु:ख होणार नाही.