मैत्री... "तो" अन "ती" दोघांमधली... भाग---१

Submitted by mahesh_engpune on 16 October, 2009 - 03:58

स्त्री अन पुरुष ... का बरं देवानं अशी माणसाची दोन अधुरी रुपं साकारली असतील..? फार कुतुहुलाचा विषय आहे हा.. नाही..?
देवानं बनवितानाच दोघांना अस अपरिपूर्ण बनवलयं.. की दोघंही एकमेंकाना पूरकच..!!
म्हणतात जगात perfect असं काहीच नसतं..!!!
पण मला या जगात एक perfect दिसलं..!! काय..? तो/ती "अर्धनटनारिश्वर"...!!
ज्याच्यात तो अन ती दोघं एकमेंकात परिपूर्ण सामावलेले..!!
कधी त्याचं ते कल्पनेतलं चित्र समोर येतं.. अन देवानं स्त्री अन पुरुष या माणसाच्या दोन जाती का निर्मिल्या याचं विश्वरुपी दर्शन होते..!!!
तो म्हणजे पुरुष... प्रत्येकात पुरुन उरनारा..!! अन ती म्हणजे स्त्री...!! सर्वांच मुळ..!! त्रिलोक सामावलेली...!!
आपली गोष्ट ही अशीच तो अन ती मधल्या खट्क्याची....!! त्याच्यांतल्या निखळ मैत्रीची... !! अन बरंच काही अबोल् सांगणारी..!!!

कोणाला वर्णावं बर आधी ...? "तो" की "ती" ला..? असो उगीच वादाल तोंड नाही फोडत..!! वर वर्णिल्या परि दोघंही एकमेंकाना पुरक..!! दोघांच स्व:ताच असं एक वेगळं अस्तित्व..!!
सुरुवात दोघांच्या भूतकाळा पासून करतो...!!

आधी तो च्या बद्द्ल...

तो.....
म्हणावा असा काही हीरो वगैरे नाही..!! दिसायला 'अतिसामान्य'...!! बापाच्या विचाराचा फार मोठ प्रभाव त्याच्यावर...!! कारण बापाकडे कधी काय मागितलयं अन ते मिळालं नाही असं कधीच झालं नाही..!! हं.. तर दिसायला अतिसामान्य्..रु़क्ष्..धिप्पाड्...उंचीला ६ फूट्..!! डोळे फार गहिर्‍या विचारात गुंतलेले..!! पण ... चेहर्‍यावरच्या काळ्या सावळ्या रंगाने कोणी तिथपर्यंत पोहचायचं नाही..!! पोहचायचा प्रयत्नही करायचं नाही..!! पहिल्यांदा कोणी पाहून लक्षात रहावा असाही नाही..!! ह्या "तो" ची life फारच विचित्र..!! फार हळवा पण जिद्दी... हट्टी म्हणा हवं तर..!! 'तो' डोक्याने विचार करायचा..!!
अन मनानं काम...!! आजही करतो..! त्याच्या त्या रांगड्या देहयष्टी मुळे कदाचीत 'तो' सर्व "तीं"पासुन दुरच रहायचा..!! हा... पण 'तो' च मित्र मंडळ खरंच अलीबाबाच्या खजिन्याच्या पोट्ली सारखं..!! काय्.. काय रत्न होती.. त्या मित्रांमधे..!! जगात किती निराळी माणसं असतात ते पहायचं असेल तर ही पोतडी नक्कीच चाळली पाहिजे..!! तो फार महत्वकांक्षी..!! (अनेकांना तो egoistic आहे असचं वाटायचं..!!)
बारावीलाच आपल्याला मेकॅनिकल इंजिनिअर व्हायचयं..!! ही महत्वकांक्षा त्याच्या कोणी शाळेतील बाईंमुळे त्याच्या मनात रुजली होती..!! झालं मग...!! आमचा हट्ट म्हणजे हट्ट..!! आई वडीलांच्या डॉक्टर होण्याच्या इच्छेला छेद देत त्याने पुण्यातल्या एका (सुमार..) engineering college ला mechanical engineering साठी admission घेतलं..!! खूप स्वप्न रंगवली होती त्यानं...!! आपल्या करीयर ची, त्या CLG विषयी..!! पण त्या clg सारख्या दिसणार्‍या एक मजली निर्मिता अवस्थेतील इमारत पाहुन त्याची निराशा झाली होती..!! त्याला फार जड गेल तिथं रमायला..!!
आयुष्यात distinction खाली न येणार्‍याला इथं लोक "first-class" काढायचा कसा तरी..!! म्हणत underestimate करत होती..!! (तो च्या म्हणण्या नुसार..!!)
अन तो असले बुरसटलेले विचारांचे मित्र पाहुन उगीच मग आपुल्या हट्टाला दोष द्यायचा..!! या सगळ्यांचा परिणाम व्हायचा तोच झाला...!!!
काय...?
तो first year down झाला..!! ज्याने आयुष्यात कधीही distinction शिवाय result पाहिला नाही... तो फेल झाला..!! त्याच्या घरच्यांचा यावर विश्वासचं बसत नव्हता..!! पण त्याने निर्विकार पणे हा अपमान स्विकारला होता..!! त्याने वस्तुस्थिती स्विकारली होती..!! "सध्या माझा down period चालु आहे..!! शिखरावर मध्यातून जाण्यात काय मजा..? पायथ्यापासुनच सुरुवात केली पाहिजे..!!" असं म्हणत त्याने स्वताला सावरलं..! एक वर्ष असंच घरी बसून काढ्लं...!! कदाचित काहीतरी वेगळी योजना त्या ईश्वराने माझ्यासाठी योजिली असेल..!! असचं कहीतरी बरळत तो स्वताचं सांत्वन करायचा..!!
एक वर्षाचा कातळ वनवास आता संपला होता...!! कसाबसा तो second year ला पोहचला..!!
अन सुरु झाला त्याचा शिखरावर पोहोचण्याचा प्रवास..!! त्याला हवे तसे मित्र मिळाले..!! त्याचा एक GROUP झाला..!! ६० जणांचा...!! gang च म्हणा..!! सगळेच टारगट.. !!त्याच्यासारखे "MECHANICAL ENGINEERING" करण्याचा ध्यास घेतलेले..!! त्या नियतीने खेळलेल्या खेळीचे गुढ त्याला आता हळुहळु उकलत होते..!! 'तो' ला त्या बुरसटलेल्या विचारसरणीतुन या चैतन्याच्या पावसात भिजण्यासाठी नियतीने एक वर्षाचा दुष्काळ दिला होता त्याच्या आयुष्यात..!!
"तो' जरा वेगळाच होता..!! नेहमी थोडासा (!!) वेगळा विचार करायचा..!! त्याला वाईटातही काही चांगलं दिसायच..!! पण तो वाईटाचं कधीच समर्थण नाही करायचा..!! अन तो ते ६० जणांच्या group मधे पहायचा..!! सगळेच साले इरसाल..!! अगाऊ..टारगट..!! अन कोणीतरी दिलेलं hopeless हे विशेषण घेऊन मिरवण्यात पठ्ठे आपली बहादुरी मानणारे..!!पण "तो" या सार्‍यातही काहीतरी चांगलं पाही..!! clg मधले सगळे वाईट धंदे करुन..(पोरींच्यामागे फिरणे.. मारामारी करणे.. टवाळक्या करणे.. वगैरे वगैरे..!!)'तो' चा group फक्त पास व्हायचा..!! पण त्याच्याशी त्यांना काही देणंघेणं नव्हतं...!! फारच अवखळ अन DIFFERENT CLG LIFE जगत होते ते सारे..!!
असेच दिवस जात होते..!! त्याला आता कोणी तरी आवडू लागलं होतं.. त्या विचारात तो तासनतास रमायचा..!! तो एका जुनिअरच्या प्रेमात पडला होता..(अस त्याला वाटायचं..)!! ह्म्म clg life अन प्रेम नाही...? by default ते आलचं..!!मग काय तो ची विमानं कवितेच्या आसमंतात अशी काही झेपाऊ लागली की बस्सं..!! त्या जुनिअरची अन तो ची ओळख clg gathering मधे झाली ती, तो अन त्याच्या hopeless group ने केलेल्या धमाली मुळे..!!दोघंही एकमेंकाना आता चांगले ओळखत होते..!!त्याला जुनिअर बद्दल खूप काही वाटायचं..!!पण जुनिअर या सगळ्यांपासून अगदी दुर..!!तो ला मनोमन वाटायचं, she will get the same feeling about me..!! तो वाट पाहत होत एका मोक्याची .. !!
अन तो मोका आला..!! ७ एप्रिल २००६ त्याचा birth-day..!!
त्याने तिला birth-day treat साठी बोलवलं..!! जुनिअर ही लगेच तयार झाली...!! बाकीचे सगळे मित्र असतील बरोबर म्हणून..!! पण तो ने फक्त जुनिअर ला एकटीला बोलावलं होतं..!! तरी जुनिअर आली..!! त्याने सगळी फिल्डींग व्यवस्थीत लावली होती..!! सगळ्या HOPELESS कार्ट्यांनी तो ला पुरेपुर मदत केली होती..!! पण as usual.. response काय असणार होता...? तेच झालं..!! जुनिअर ने त्याला नाही म्हणत त्याचा पुरता अपेक्षाभंग केला. तो प्रेमभंग त्याला सहन झाला नाही..!! तो सर्वस्वी तुटला होता..!!
"जुनिअर ने नाही म्हटलं..!!"तसं तो बद्दल तसं काही जुनिअर ला वाटावं असं काही नव्हतं..!!
त्याला मात्र सगळं संपल्यासारखं वाटत होतं...!! मित्रांनी समजावूनही तो त्यातून सावरत नव्हता..!!
फार हळवा...मनस्वी होता तो..!! त्याला आता कुणाच्या तरी आधाराची गरज होती..!! खरंतर he was in need of some counseling..!! ते त्याच्या clg TRAINING N PLACEMENT OFFICER ने व्यवस्थीत केलं...!! तो आता हळुहळु त्या सगळ्या प्रकारातुन सावरत होता..!! त्याने असा काही ध्यास घेतला होता की असं काही तरी करुन दाखवेन की जुनिअर ला ही वाटावं, मी किती चुकीचं वागले...!! तो आता T.E. त आला..!! शेवटच्या सेम मधे campus placement च्ने वारे clg मधे वाहू लागले..!! तो वाट पाहात होता no criteria company साठी..!! अन clg ला पहिली company आली ती no criteria company ..!!
बस्सं त्याने ठरवलं...!! काहीही करुन college campus मधेच नोकरी मिळवायची..!! त्याने खुप hard-work केलं..!! दिवस रात्र तो फक्त त्या एकाच ध्यासाने पछाडला होता..!! तो त्या company त select झाला..!! 1.92 p.a. च (घसघशीत) package ही मिळालं त्याला..!!(तेही ऐन recession च्या तोंडावर..!!) तो खुश होता..!! जुनिअर ला कुणामार्फत तरी त्याने ही गोष्ट कळवली..!! अन काही व्यक्त व्हायचं म्हणून तो "JAB WE MET" मधलं "तुम से ही.. तुम से ही.." हे गाणं दिवसातून १०० वेळा ऐकत, जुनिअरचे आभार मानायचा..!! तो आता गमावत्न्यातला आनंद लूट्त होता..!! इवल्याश्या नाजुक ह्रदयात कुठ्ल्या तरी कोपर्‍यात ते दुख साठ्वून..!! कुणी तरी नाही म्हट्ल्याच...!!
"आयुष्यात काही गोष्टी पुन्हा पुन्हा घडत असतात ..!! जो पर्यत त्या तुम्हाला हव्या तश्या घडत नाहीत तो पर्यंत..!!" असाच काहीसा विचार तो च्या मनात डोकवून गेला..!! अन पुन्हा तो चा शिखराकडे जाण्याचा प्रवास सुरु झला..!!

ह्म्म काय विचार करताय..?
"तो" अन "ती" मध्ये फक्त तो च दिसतोय..!! पण अजून गोष्ट सुरुच झाली नाही.. त्या अगोदर "ती" ला नको का introduce करायला..!!

ती..
एका शब्दात वर्णायचं झाल्यास "समंजस"...!! पण एका शब्दात वर्णन करुन "ती" वर जरा अन्यायच होईल नाही का...?
तर "ती"..!!
भिरभिरणार्‍या नजरेची..!! सतत काहीतरी शोधणारी ..!! काय ते माहीत नाही..? पण नक्किच काहीतरी शोधायची..!! दिसायला साधारण..!! लांबसडक केसांची नेहमीच चापुन चोपुन वेणी घालणारी...!!चारचौघींसारखी..!! पण तरीही चरचौघींपेक्षा थोडी हटके..!! कोणाला जर साधेपणातलं सौंदर्य दाखवायचं असेल तर "ती" म्हणजे या साधेपणातल्या सौंदर्याचा उत्तम आविष्कार..!! फार साधी अन तितकीच सरळ..!! म्हणतात साधी अन सरळ माणसच समजायला फार अवघड असतात..!! अगदी तशीच साधी.. अन सरळ..!! गंगेच्या पवित्र पाण्यासारखी, पण हिमालयाच्या पायथ्यासारखी निश्चल..!! अवखळ झरा म्हणावा अशीही काही नाही पण प्रवाही..!! सत्याला धरुन जीवन अनुभवनारी..!! अन आपुल्या आई- पप्पांची आर्दश लेक..!! दहावी- बारावी distinction ने पास झालेली.. !! शिक्षकी आई वडिलांचे शिक्षकी संस्कार आनंदाने जपणारी.. " स्वप्न... फक्त पाहणारी..!!"."डोकयाने काम अन मनाने फक्त विचार करणारी..!!" अन आयुष्यातल्या सत्याला धरुन जमिनीवरच लक्ष असणारी..!! आसमंतात पाहुन हसणारी..!! पण जमिन पाहुन अंतर्मुख होणारी..!! वरवरुन शांत..एखाद्या निद्रिस्त ज्वालामुखी सारखी..!! मिटलेल्या कळीसारखी अबोल.. अविचल..!! फार महत्वकांक्षी वगैरे काही नाही..!! पण जबाबदरींची जाणीव असलेली..!! थोडक्यात "तो" च्या अगदी विरुध्द स्वभावाची..!!
या "ती" चा एक ध्यास होता.. बारावी नंतर डॉक्टर (M.B.B.S.) होण्याची..!!
त्यासाठी तिची चाललेली अविरत मेहनत..!! पप्पांचा असलेला पाठींबा..!! आईच मिळणारं उत्तम मार्गदर्शन..!! सारं कसं तिला हवंहवसं वाटणारं..!! हे क्षण कधी संपुच नयेत असं तिला वाटायचं..!! आहे तो क्षण भरभरुन जगायचा...!! एव्हढंच काय ते तिला माहीत होतं..!! छोट्या छोट्या गोष्टीतही मोठा आनंद शोधणारी..!! अन आपले मध्यमवर्गीय संस्कार कुठल्याही कुरबुरीशिवाय जिवापाड जपणारी..!!
ती चा तो ध्यास पुर्ण व्हावा म्हाणून तिचे अविरत कष्ट चालु होते.तहान भुक विसरुन ती CET ची तयारी करीत होती..!! पण आपल्याला जे हवय ते असचं इतक्या सहज मिळतं नाही हे अजुन तिला कुठं माहीत होतं..? दैवानं तिच्यासाठी काहीतरी औरच नियोजन केलेलं असावं..!! अविरत कष्टाचे फळ म्हणून "CET"त १४७ चा score आला खरा.. पण सारं व्यर्थ..!! शेवटच्या round पर्यंत थांबूनही कुठेच M.B.B.S. ला अ‍ॅडमिशन मिळालं नाही..!!
झालं..!! स्वप्न भंगाची ही तर सुरुवात होती..!! तेही उमलत्या वयात..!! फार जिव्हारी लागलं ते तिच्या..!! पण पप्पांसारखा खंबीर मित्र तिच्यापाठीशी होता म्हणुन यातून ती कशीबशी सावरत होती..!!
किती सहज समजून जायची ती.. पप्पांनी समजावल्यावर..!! सगळं दुख तसचं मूकपणे गिळून तिनं "ENGINEERING" करायचं ठरवलं..!! पण.. बारावीला फक्त "PCB" हाच group असल्यामुळे तिला दहावीच्या base वर DIPLOMA साठी अ‍ॅडमिशन घ्यावं लागणार होतं..!! दहावीलाही बर्‍यापैकी मार्क्स असल्याने तिला diploma ला अ‍ॅडमिशन मिळेल याची खात्री होती..!! तिसर्‍या round मधून तिला कोल्हापूर च्या government polytechnic ला अ‍ॅडमिशन मिळालं..!! मनाविरुध्द..!! छे..!! काही मनाविरुध्द वगैरे नसतं..!! सगळं आपल्याला हवं तसंच होतं असतं, फक्त परिस्थीती आपल्या बाजूने नसते..!! यावर तिची अपार श्रध्दा..!! जशी श्रीकृष्णावर अन पप्पांवर..!! आहे हे असचं आहे.. म्हणून तिनं ती परिस्थिती स्विकारली..!! अन घर सोडुन आता आई पप्पांपासून दुर hostel ला रहायला लागणार म्हणून ती रडवेली झाली..!! पण याशिवाय गत्यंतर नव्हतं,याची जाणीव तिला आपल्या पप्पांच्या उबदार छायेखालून दुर hostel वर जायला भाग पाडत होती..!! पप्पा म्हण्जे life मधला पहिला HERO..!! काय नाही केलं त्यांनी माझ्यासाठी..? सगळे हट्ट आपली लाडकी लेक म्हणून त्यांनी पुर्ण केले..!! कधीही आपल्या मुलापेक्षा कमी नाही लेखलं त्यांनी..!! त्याच पप्पांन सोडुन आयुष्यातली नवी शिखरं धुंडाळायला ती diploma in INFORMATION TECHNOLOGY पूर्ण करण्यासाठी आपल कराड सोडुन कोल्हापूर ला चालली होती..!! तिला जितकं भरुन आलं होतं त्याच्या कैक पटीनं तिच्या पप्पांना भरुन आलं होतं..!! आपुल्या मुलीचा 1st HERO म्हणुन त्यांनी ते अश्रू डोळ्यांच्या बंदिस्त पेटित बंद करुन,ती ला धीर द्यायचा म्हणून..!! एक पुरुष म्हणून.. !!आपल्या लाडकीला hostel ला एकटी सोडुन जड पावलाने ते परत माघारी फिरले..!! ती चं clg सुरु झालं..!! hostel वर जुळवून घेणं तिला फार अवघड गेलं..!! पण थोड्या दिवसातच तिनं छान बस्तान बसवलं..!! ती चा मस्त १३ जणांचा एक group तयार झाला होता..!! त्या सगळ्यांच servicing center चं झाली होती ती तिच्या group मधे..!! ती १३ जणांच्या group मधे चमकत होती अन प्रत्येक परिक्षेतही तितकीच..!! ती अबोल्..अविचल कळी उमलत होती.. आपुल्या निर्बंध मैत्रीचा निराळा सुगंध सर्वांवर बरसवत होती..!! बंधनाच्या पाकळ्या अत्ताच कुठे सैल होत होत्या..!! group मधल्या प्रत्येकाचे problem ती आपुलकिने सोडवायची.. अन तिच्या दोन खास मित्रांचे तर खूप अलगद..!! तिचे ते दोन मित्र..!! सगळ्या group मधे ती फक्त या दोघांशीच व्यक्त व्हायचा प्रयत्न करायची..!! त्यातला एक फारच अबोल.. लाजाळू.. सुस्वभावी.. मनातली प्रत्येक गोष्ट डोळ्यातूनच कळावी.. अन ती कळते यावर विश्वास असणारा.. अन समोरच्याला ते कळावं म्हणून अडून बसणारा..!!
असं असतं तर माणसान भाषा निर्मिली नसती नाही का..? पण तरीही ती त्याला समजायची..!! तिच्या मुळच्याच संमजसपणामुळे बहुतेक..!! अन दुसरा मित्र तर अगदी नक्षत्रच होता..!! बड्बडा..!! एखाद दिवस तिच्याशी न बोलता गेला तर.. फार कसंतरीच व्हायचं त्याला..!! अति बडबडा..!! गरजेपेक्षा अधिकच EXPRESSIVE..!! मनात आलेलं लगेच बोलुन टाकणारा..!! त्या दुसर्‍याच्या अगदी उलट..!!
तर अश्या दोन परस्पर विरोधी मित्रां बरोबर ती फुलत होती.. !! दोघांच्याही विचारांचा सुवर्णंमध्य साधत होती..!! किती समंजस होती ती..!! सगळ्यांचं servicing center..!! तिघांचीही मैत्री गुलमोहरासारखी फुलत होती.. बहरत होती..!! पण गुलमोहर जसा झडतो, तशी ही मैत्री पानगळीसारखी तर नाही ना..? म्हणून ती ला थोडी भीती वाटायची..!! आई-पप्पांच्या उपजतच आलेल्या शिक्षकी संस्कारामुळे आलेला समजुतदारपणा या सर्व शंकाना तिलांजली देत होता अन.. आलेला क्षणाचा निर्भेळ आनंद कसा घ्यायचा हेच तिच्या भिरभिरत्या नजरेतून ती सार्‍या जगाला दाखवायची..!! किती PURE.. ORIGINAL.. होती ती..!! त्या दोघांच्या मैत्रीत अखंड बुडालेली..!! पण संस्कारांचे धागे दोरे तितकेच करकोचून आवळणारी..!! पण नियतीलाही काही औरच मंजूर असावं..!! हेही सुख ती तिच्यापासून हिरावून घेणार होती..!!
तिचा तो अबोल मित्र असं काही करेल हे तिला आजही पटत नाही..!! ज्याला वाटायचं डोळ्यातूनचं व्यक्तं व्हावं.. त्यानं असं करावं..?? त्याने तिला propose केला होता..!! अन तिनं सरळ नाही म्हणत त्याच्यासाठी उधळत असलेला तो मैत्रीचा सुगंध कायमचा कळीत मिटून घेतला..!! ती चा तो नकार त्या अबोल मित्राने त्याच्या मनाला लावून घेतला..!! अन तिच्यापासून दुर जायचा प्रयत्न करु लागला..!! पण त्या अधीच ती त्याच्यापासून खूप दुर केली होती..!! मनातलं व्यक्तं होण्याची एव्हढी मोठी शिक्षा मिळणार होती तर तो कधीच बोलला नसता..!! कायमचा अबोल राहिला असता..!! चितेवर पडलेल्या प्रेतासारखा निश्चल..!! तो तुटला होता..!! काहीसा आपल्या गोष्टीतल्या तो सारखाच..!!
"नाही..!!" किती वाईट शब्द आहे नाही हा..!! ज्याने उच्चारला त्यालाही त्रासवत होता..! अन ज्याच्यासाठी उच्चारला त्यालाही जाळत होता..!! एव्हाना काहीतरी बिनसलयं हे ती च्या group मधे सर्वांनाच कळलं होतं.पण ती कुणाशीच बोलत नव्हती..!! ती चा तो बडबडणारा मित्र, तोही काय झालं हे ती ला विचारत होता.. अन तीच जखम पुन्हापुन्हा चिघळवत होता..!! त्याला झालेली हकिकत कळली अन फार वाईट वाटलं..त्या दोघांची तूटलेली मैत्री पाहून तो हळहळत होता...!! त्याने काहीतरी मनाशी ठरवून ती ला एकटीला गाठलं..!! अन थेट विषयाला हात घालत तिच्याशी बोलु लागला.. !!
"बरेच दिवस तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं पण कसं ते कळत नव्हतं..
मला तू आवडतेस.. खूप मनापासून.. तुला मी हे कधीच सांगू शकलो नसतो पण मला वाट्लं की तू .. तू.."
तो बोलत होता.. अन ती तशीच स्तब्ध.. !! तिला काय बोलावं ते क्षणभर सुचेच ना..? तिने सरळ त्याला नाही म्हणत hostel गाठलं..!!रूमवर जाऊन ती खूप रडली..!! आपल्या कृष्णाला समोर धरुन ती त्याच्याशी बड्बडतं होती..!!
"का म्हणून मी कुणाच्या इतक्या जवळ जावं की कुणाला तशी feeling यावी..? "
तिला फार अपराध्यासारखं वाटत होतं. पण ती चा त्या तिच्या एकमेव सख्यावर, त्या श्यामनिळ्या कृष्णावर पूर्ण विश्वास होता..!! तो कितीही दुखं देत असला तरी तो कायम माझ्या बरोबरच असेन.. यावर ती चा खूप विश्वास होता..!! खूप कृष्णवेडी होती ती..!!
त्या़ कृष्णावर सारं सोडुन आहे हे असं आहे..!! म्हणत तिने सर्व स्विकरलं होतं..!!
दिवसांमागून दिवस जात होते..(त्याशिवाय कथा पुढे कशी सरकणार..!!) तशी ती या सर्वांतून सावरत होती..!! कळी मिटली होती. कुठेच तिच्या मैत्रीच्या सुगंधाचा मागमूस नव्हता..!!
शेवट्ची परिक्षा संपली..!! छान गुण मिळवून (नेहमीप्रमाणे) ती distinction ने पास होऊन diploma in information technology घेऊन ती कोल्हापूर सोडून जाणार होती..!! इथल्या सार्‍या आठवणींना मनाच्या एका कोपर्‍यात कायमचं कोंडून..!! ती चे दोन ही मित्र ती पासून कायमचे दुरावले होते..!!
तो भूतकाळ तिथचं सोडुन ती पुन्हा पुढच्या प्रवासास त्या श्याम निळ्यावर सर्व काही सोडून निघाली..!!
पुढे तिला degree करायची होती..!! तसं तिनं तिच्या पप्पांना सांगितलं..!! आपल्या एकुलत्या एक लेकीचा हट्ट म्हणूण त्यांनी ही लगेच परवानगी दिली..!! तिला पुण्यातूनच degree करायची होती..!! तसे अ‍ॅडमिशनस चे सर्व सोपस्कर पार करून मेरिट वर तिला पुण्यातल्या एका clg ला B.E. COMPUTER च्या course साठी direct S.E. (second year engineering) ला अ‍ॅडमिशन मिळालं..!! ती च्या group मधे ती ला एकटीला पुण्यात अ‍ॅडमिशन मिळालं होतं..!! ती खूश होती..!! आता तरी मनासारखं झालं म्हणून..!!
पण पुन्हा hostel ला रहावं लागणार होतं..!! पण यावेळेस तिनं सर्व व्यवस्थित सांभळून घेतलं..!!
इथंही रुळायला ती ला थोडा वेळ लागला..!! मेस्स बरोबर नसल्याने ती ची तब्येत खालावू लागली.. s.e. admission late झाल्यामुळे बराच अभ्यास बुडालेला होता..!! पण हळूहळु ती सावरत होती.. जम बसवत होती.. नव्या मैत्रीणी लगेच झाल्या ती च्या "संमजसपणामुळे"..!! पण ती मुलांपासून मात्र थोडी बिचकूनच होती. कशीबशी 1st sem दिली..अन result ची वाट पाहू लागली. या दरम्यान ती ला तिच्या त्या जुन्या group मधल्या सर्वांचे मेल्स ,फोन यायचे..!! त्या दोन मित्रांचे ही..!! पण ती त्या घडलेल्या प्रसंगातून अजूनही सावरली नव्हती दोघाशीं ती फारच तुटक बोलायची.. !!
कसातरी 1st sem ला तिने first class काढला..!! (हे कसातरी म्हणजे बाकिच्यांसाठी खूप काही असतं. कारण ENGINEERINGला1ST CLASS मिळवणं काही खायचं काम नसतं. 3 idiots मधे फार थोड च दाखवलय असो कथेच्या बाहेर विषय नको... !!)
तर ती इथं आता रुळायला लागली होती..!! सगळं छान चाललं होतं..!! ती पुन्हा मैत्रीणींच servicing center झाली होती..!! अगदी पहिल्या सारखीच..!! कळी पुन्हा उमलायला लागली ..!! पुन्हा अगदी पहिल्यासारखीच मैत्रीणींसारखीच मित्रांमधेही मिळुन मिसळुन राहु लागली.
एव्हढ्या सगळ्यातही काही बदललं नव्हतं ते म्हणजे ती चे भिरभिरणारे डोळे..!!
काय बरं शोधत असावी ती..?
हंम्म तर अशी ही ती..!!
आता गोष्ट पुढं जायची म्हणून म्हणा किंवा योगायोग म्हणा..!! हे तर आलच की..!! ती "तो"च्या त्या सुमार clg ला आली होती..!! हा.. आपली ती तर computer engineering ला होती अन तो.. mechanical engineering ला ...!! अगदी परस्परविरोधी..!! या दोन branch चा तर ३६चा आकडा..!! मग दोघांत मैत्री झाली कशी..? तेही तो सारख्या hopeless, अगाऊ, idiot पोराबरोबर..!!! हीच तर खरी गम्मत आहे ना..?
तर ती तो च्या सुमार clg ला आली होती..!! ती S.E. COMPUTER ला अन तो T.E. MECHANICAL ला..!! तसं दोघांची मैत्री होणं फारच दुरापास्त..!! पण ती झाली..!! त्या श्याम निळ्याच्या मनातच तसं असावं..!! ती third year (T.E. त ) ला येईपर्यंत दोघंही एकमेंकाना ओळखत नव्हते..!! अन तसं काही कारण नव्हतंही..!! पण ती च्या group कडून MECHANICALवाल्यांची अपकिर्ती ती ला कळत होतीच..!! पण ती त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत होती.. !! त्या HOPELESS कार्ट्यानीं clg days मधे नुसता उच्छाद मांडला होता..!! mismatch day च्या नावाखाली भाई डे करून त्यांनी डेज मधे नवाच पायंडा पाडला होता..!! traditional day ला तर चक्क clg campus मधे तो त्याच्या hopeless group ने लग्नातला band आणला होता..!! अन आख्या clg ला त्या band च्या तालावर नाचवलं होतं..!! त्यात ते नाकं मुरडणारे, तो च्या group ला hopeless म्हणवणारे सगळेच होते..!! पण त्याला तो च्या hopeless group चा काहीच आक्षेप नव्हता..!! कारण ते सर्व फक्त त्यात enjoyment पाहत होते..!! अन तो काहीतरी वेगळं..!! तो clg चा cultural coordinator म्हणून काम करत होता.. !!अन त्याला फक्त दिसत होतं ते या वाईटातलं चांगल..!! त्यांची अभेद्य unity ज्या पुढे त्याने clg management लाही नमवलं होतं..!! याच unity चा तो विधायक कामासाठी उपयोग करायचा अगदी त्या hopeless टाळक्यांच्याही नकळत..!! असो.. तर तो असा एक salient leader..!! पण तो अजूनही त्या जुनियरच्या प्रकरणातून सावरत नव्हता..!! जेव्ह्ढा वरून अलिप्त अन रुक्ष वाटायचा त्याहूनही अधिक हळवा.. अन भावनिक..!! पण हे सर्व तो त्या रुक्षपणाच्या कातडीखाली ओढून जगत होता..!!
ती ही असंच काहीसं जगत होती..!! clg ची टारगट पोरं म्हणूननच ती तो च्या त्या hopeless group कडे पहायची..!! तर असेच दिवस बदलत होते..!! त्या एक मजली निर्मिती अवस्थेतील इमारतीला आता कुठे clg च खरं clg पण मिळत होतं..!! ते तो च्या ६० जणांच्या इरसाल अन खोडसाळ पणामुळे..!! T.E. च्या लास्ट सेम ला तो कुठल्याशा एका company त place झाला..!! आता तो आणखीणच free झाला होता..!! आपल्याला हवं ते करायला मिळेल..!! clg च magazine करता येईल..!! फिरोदियात काम करायला मिळेल..!! अन काय काय..? या सर्वांमधे त्याचं कविता लिखान चालुच असायचं..!! तो कविता करतो यावर कोणाचाच विश्वास बसत नव्ह्ता..!! अन का बसावा..? mechanical engineer अन कविता..? त्याच्या training n placement officer ला याचं फार कौतूक वाटायचं..!! झालं कसबसं त्याने T.E. काढलं.. अन B.E. च्या FINAL YEAR ला आला..!!
आता एकच वर्ष राहिलं होत त्याचं clg संपायला..! अन खूप स्वप्नं..!! B.E. FINAL YEAR ला असताना एव्ह्ढं सगळं करणं म्हणजे अवघडच होतं..!! पण आपण हे सारं करायचं असा त्याचा हट्ट..!! B.E. त FIRST CLASS हवा म्हणून तो खूप कष्ट घेत होता..!! शेवटच्या सेम चा backlog घेउन त्याने B.E. FIRST SEM दिली..! result मनासारखा आला होता..!! Engineering मधे आयुष्यात पहिल्यांदा तो first class बघत होता..!! नोकरी अन first class या दोहोच्या खुशीत त्याने सर्वांना पेढे वाटले..!! काहीतरी मिळवल्याचा आनंद कसा enjoy करायचा हेच तो कोणातरी दाखवत होता..!! फारच expressive होता तो..!!
"आयुष्यात पुन्हा काही तरी घडत होतं अन तेही मला हवं तसं हवं तेव्हा.. यावेळी मी misfire नाही झालो..!!"
ह्म्म ..!! Engineering च्या प्रत्येक गोष्टीला, theory ला तो आपली philosophy लावून पहायचा अन जाम खूश व्हायचा..!! Engineering त्याचं passion होतं अन philosophy आयुष्य..!!
Engineering च्या प्रत्येक theory त तो आयुष्याची philosophy आपल्या style ने शोधायचा..!!
"THIRD SIDE OF COIN" असंच त्या STYLE ला तो म्हणयाचा..!! फारच येडा.. !!
"आपलं वयं काय अन आपण करतोय काय..? आई-बापानं मोठ्या आशेने आपल्याला इथं पाठवलं ते ही philosophy पाजळायला का..?"
असंच काहीबाही म्हणत,सारेच त्याला वेड्यात काढायचे..!! पण त्याला याचा काहीच फरक पडत नव्हता..!! फक्त आपल्या terms वर life कशी जगायची हेच त्याला माहित होतं...!! कुणाचीही पर्वा न करता..!! बेजबाबदारपणे..!! अगदी आपल्या ती च्या उलट..!
तर ह्या तो च एक स्वप्न होतं ,ती "THIRD SIDE" सार्‍या जगाला दाखवायची..!! आयुष्यातलं सर्वात मोठं अन जिद्दीचं स्वप्न..!! "THIRD SIDE OF COIN" मराठी तून लिहायचं..!! सगळेच त्याला वेड्यात काढायचे अन "अभ्यासात लक्ष घाल, लास्ट सेम ला distinction काढशील..!" असा नकोसा सल्ला द्यायचे..!! झालं first sem संपली अन B.E. ची खरी धावपळ सुरु झाली..!! project work, submission, viva`s, days, annual gathering, industrial visit, first class, send-off..!! अन आपल्या hopeless कार्ट्यांसाठी नोकरी (placement) बाप रे....!! या सगळ्यात तो आपली स्वप्न पूर्ण करील असं कधीच वाटत नव्हतं..!! तो clg culture committee मधून बाहेर पडला होता तरीही, यातलं एक तरी स्वप्न तो पुर्ण करणारच होता..!! त्या श्यामसुंदराने असंच काहीतरी ठरवलं असणार आपल्या एकमेव सखी साठी..!! या सर्व व्यापातून तो clg cultural committee ला magazine साठी पाठपुरावा करत होता..!! अन शेवटी तेही त्याच्या हट्टा पुढे नमले.. अन magazine committee form झाली..!! कशीबशी clg magazine committee form झाली अन तो च्या एकाधिकारशाहीमूळे (?) तो आपल्या clg च्या first magazine चा chief editor झाला..!! तो editor झाल्यामूळे magazine ला खूपच थोडा प्रतिसाद मिळत होता..!! पण याचा तो वर काहीच परिणाम होत नव्हता..!! तो समर्थ होता..!! फार जबरदस्त उत्साह अन ATTITUDE याच्यां जोरावर त्याला कोणाची ही गरज वाटत नव्ह्ती..!! अन हे सारं ती मोठ्या कुतुहुलाने पाहत होती..!! magazine फसलं तर किती त्रास होइल याला..!! अशीच मनोमन विचार करीत होती..!! ती आता त्याच्या team ची १ member होती..!! ENGLISH section ची editor होती.. !! पण अजूनही दोघांत हवा तसा संवाद घडायचा होता.. !! committee होऊन बरेच दिवस झाले तरी काहीच action होत नव्हती..!! तो च्या उपस्थितीमुळे बर्‍याच जणांनी committee तून माघार घेतली होती..! पण त्याला त्याचा काहीच फरक पडत नव्ह्ता..!! बस्सं, हे magazine माझं आहे..!! अन ते मी करणारच एव्ह्ढचं त्याला माहीत होतं..!! ती ला कधी कधी या महत्व़कांक्षी so called leader चा फार त्रास ह्वायचा..!! पण तो तसूभरही आपल्या आक्रमकतेपासून हटत नव्हता..!! सगळ्याच team member ना त्याची भिती वाटायची..!! magazine committee form होऊन् बरेच दिवस झाले होते, पण तरीही मैत्री व्हावी असा काही संवाद त्या दोहोंत होत नव्हता..!! तो त्याच्या B.E. च्या busy schedule मधून आपल्या hopeless कार्ट्यांसाठी industrial visit organize करत असल्यामूळे त्याचं जरा magazine कडे दुर्लक्ष होतयं..!! असंच काहीसं सर्वांना वाटायचं, पण रोज किमान अर्धा तास तरी तो त्यासाठी स्वताच विचार करत बसायचा..!! तो अर्धा तास कुठे मिळेल याची त्याला सुध्दा खात्री नसायची..!! म्हणूनच लेक्चरला मागे बसून, research work चा project असून, workshop मधे ,जिथं म्हणून वेळ मिळेल तिथं तो magazine साठीची रूपरेखा तयार करायचा..!! ती ही आपल्या clg magazine साठी काम करण्यास आतूर होती..!! तो चं ते dedication अजूनही कोणालाच दिसत नव्ह्तं..!! या सर्वांत त्याच्या बाकीच्या activity (clg days, submissions, campus placement, mesa (MECHANICAL ENGINEERING STUDENT ASSOCIATION),annual day साठी ची hopeless theme ) चालूच होत्या..!!
तो अन ती यांची खरी ओळख झाली ती, त्याने अन त्याच्या T.P.O.(TRAINING AND PLACEMENT OFFICER ) ने आयोजित केलेल्या READERS CLUB SUMMIT मूळे..!!
readers club च्या उदघाटनाच्या वेळी तो ने जबरदस्त कहर केला..!! अन तो पटण्यासारखा होता..!!
तो च्याच branch च्या कोणा एका मास्तराने.. तो ने " मला कुसुमाग्रज फार आवडतात..!! माझे सर्वात आवडते कवी आहेत, अन मी इथे आज त्यांचीच कविता सादर करणार आहे.." या प्रतिक्रियेला कारण नसताना त्यांच्या भाषेत आक्षेप नोंदवत..
"आजकालच्या मुलांचं वाचन फार कमी आहे, त्यांना शाळेत कुठेतरी शिकलो म्हणून कुसुमाग्रज माहीत आहेत..!! पण विंदा सारखा कवी माहीत नाही.. !! त्यांना फक्त जे प्रसिद्ध तेच दिसतं अन पटतं..!!" अ॑सच सूमारे १५ मिनिटांचं बोरिंग लेक्चर दिलं.. !! तो चा चेहरा रागाने फणफणत होता..!! कधी हा मास्तर ह्याचं लेक्चर संपवतोय अन कधी त्याला झापतोय असचं त्याला वाटत होतं..!! झालं एकदाचे ते मास्तर त्यांचे विचार ओकून मोक़ळे झाले..!! तो तसाच ताडकन उठला.. अन बोलु लागला.. तेही ३०-४० जणांच्या समूहासमोर.. समूहच होता तो..!!!
"फार चुकीचं बोलला सर आपण.. !!" अन तो त्याने वाचलेल्या मनाच्या श्लोकांपासून सुरुवात करत विषय थेट तुकारामांच्या अभंगापर्यंत आणला..!! संत रामदास अन संत तुकाराम या समकालीन कवींची उदाहरणे तो मुद्दामच देत होता..!! हेच पटवुन द्यायला की विंदा असोत वा कुसूमाग्रज कवी फक्त कवी असतो..!! त्याची तुलना कधीच दुसर्‍या कवीशी करता येत नसते..!! कारण सृजनशीलतेला व्यक्तींची बंधने नसतात...!! त्यामुळेच ती व्यक्तींव्यक्तींनुसार बदलत असते..!!
"विंदा अन कुसुमाग्रजांबद्दल बोलायला आपन खूपच लहान आहोत हे मलाही कळतय पण कोण श्रेष्ठ हा अट्टाहास कोणासाठी अन कशासाठी ..?" तो बोलतच होता.. सारा समूह स्तब्ध..!!
अन ती.. ती ची भिरभिरणारी नजर पहिल्यांदाच कुठेतरी स्थिरावली..!!
"हा तोच magazine committee चा chief editor आहे का..?" ती संभ्रमात..!! किती आत्मियतेने बोलतोय हा..!! आपला मुद्दा बरोबर आहे हे समोरच्याला किती आक्रमकतेने पटवतोय..!! की समोरचाही याबद्दल नक्कीच विचार करेन की आपलं कुठं चुकलं!! अन तेही तो हे सारं आपल्या मास्तरांपुढे बोलतोय..!! ज्यांच्याकडे कदाचित त्याचे viva/orals चे मार्क्स असतील..!! किती निर्भीड..!! अन आक्रमक..!! great attitude..!! माझं ते खरं पेक्षा कुणीतरी खरं ते माझं असं म्हणत होतं..!! अन ती हे सर्व पाहत होती..!! स्थिरावलेल्या नजरेने..!!
ती ला कुठेतरी आतून त्याचं समर्थण करावं असं वाटत होतं.. पण..? जाऊ दे म्हणत तिने विषय सोडुन दिला..!! ती ला हे पटतचं नसावं की कोणी सत्यासाठी एव्हढं तळमळीने बोलु शकतो..!! वागू शकतो..!! पण तो फारच उद्दाम.. अगाऊ..! आपलं तेच खरं करवून घेणारा..!! किती सहज जमायचं ते त्याला..!! कारण ज्याला तो आपलं म्हणायचा तेचं खरं असायचं..!! ती नं आज तो चं एक वेगळंच रूप अनुभवलं होतं..!! फक्त ती लाच ते अनुभवता येत होतं..!! हळूहळू तो ची ती बुरसटलेली image ती च्या मनातून पुसली जाऊ लागली होती..!! अशीच एकदा magazine ची meeting चालू असताना तो फार भडकला होता..!! ३ आठवड्यांनंतरही कामात काहीच प्रगती दिसत नव्हती..!! त्याने सगळ्यांनाच फैलावर घेतले होते..!!
"लोक इथे फक्त magazine मधे आपलं नाव येइल म्हणुन आलेत..!! त्यांना कामाशी काहीच देणंघेणं नाही ..!!मी फक्त तुमच्याकडून काम करून घेणार आहे..!! तुम्ही मला कामचुकार म्हणा नाहीतर काहीही...!! मी सगळी कामे तुमच्याकडूनच करून घेणार आहे..!! ज्याला कोणाला interest नसेल तो बाहेर पडू शकतो..!! मला असल्या पोकळ लोकांची काहीच गरज नाही..!! उद्या तुम्ही जेव्हा पुढचं magazine कराल तेव्हा तुम्हाला कोणालाच माझी आठवण येता कामा नये..!! कुठलंही काम करताना मी तिथं असायला हवं होतं असं तुम्हाला बिलकुल वाटलं नाही पाहिजे.. तुम्ही independent असायला पाहिजे.. कोणा एका व्यक्तीच्या अस्तित्वामुळे किंवा गैरहजेरीमुळे आपलं कुठलंच काम अडायला नाही पाहिजे..! तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल माझं बोलण ऐकून , कारण तुम्ही सर्व मन लावून काम करताय हे मलाही दिसतय.. हे magazine होणार हे मला माहित आहे ..!! कारण आज मी आहे..!! पण पुढलल्या वर्षी मी नाही म्हणून magazine बंद पडायला नाही पाहिजे..!! मला चांगला leader व्हायचयं, successful leader नाही..!!" सगळ्यांनाच त्याचं बोलणं खूप लागलं होतं. आपल्या ती ला ही..!! ती ला ते सहन होत नव्हतं ..!! कारण ती नाव करायला इथं नव्हती आली..!! ती ला खरच मनापासून काम करायच होतं,तिथं त्या meeting म॑धे ती काहीच बोलली नाही., त्याने board वर लिहिलेला त्याचा mobile number तिनं आपल्या वहीत लिहून ठेवला..!! सगळ्यांनीच घेतला..!!
आख्खा lunch hour तो चं ते lecture ऐकण्यात गेल्याने सगळेच वैतागले होते. अन ती तर खूप..!!
मेस्स आता बंद झाली होती..!! बाहेरच खावं लागणार होत ती ला..!!
संध्याकाळी ती ने तो ला call केला..!! तो कुठल्याश्या design च्या class (CATIA) ला बाइक वरून चालला होता. तरी तो ने तो call घेतला.ती चा नंबर तो कडे नव्हता. तरी तो unknown call त्याने घेतला..!! ती ने सरळ त्याला " मी magazine मधे नाव होइल म्हणून नाही आले.. मला मनापासून काम करायचंय..!! म्हणून मी आले..!! तुझा काहीतरी गैरसमज झला आहे..!!" असं सांगत तिच्या मनातली बोच बोलवून दाखवली..!! त्याने ती ला फक्त "मी जे काही बोललो ते in general होतं.. कोणालाही personally target करायचं नव्हतं..!!" एव्हढंच बोलून फोन ठेवून उद्या बोलु म्हणून तिला झिडकारलं..!
दुसर्‍या दिवशीच्या magazine meeting मधे कालच्या त्या "चांगला leader व्हायचयं, successful leader नाही.." चं त्यानं स्पष्टीकरण दिलं.. " चांगला leader नेहमी leader च बनवतो.. पण successful leader फक्त follower बनवतो.. मला माझे follower नाही, leader बनवायचेत, उद्याच्या magazine चे leader..!! जे पुढचं magazine lead करतील..!!" म्हणूनच मला चांगला leader व्हायचयं, मझ्यानंतर हे magazine बंद नाही पडायला पाहिजे..!!" तो चं ते बोलणं ती तल्लीन होऊन ऐकत होती. त्याची third side ती ला हळूहळू उमजत होती..!! आता तिचं तो बद्दलचं मत पुर्णपणे बदलल होतं..!!
आता ती त्याला रोजच फोन करून त्रास (!) द्यायची..!!
हळूहळू दोघांचीही चांगलीच गट्टी जमली..!! रोजच फोन, sms चालू लागले..!!
पण तो म्हणावा इतका involved होत नव्हता. हे ती ला ही उमजत होतं..!! तो जमेल तितकं ती पासून दूर रहायचा प्रयत्न करायचा, अन ती ही तितकंच त्याला आपलसं मानायची..!! तो अजूनही जुनियर च्याच विचारात गुंतलेला असायचा.एव्ह्ढ्या सहज तो तिला विसरणार नव्हता. असेच दिवस जात होते, ती T.E.च्या LAST SEM ला होती, अन आता campus placements साठी प्रयत्न करित होती. academics चांगल असल्याने ती चं नक्कीच कुठल्याना कुठल्या चांगल्या company त place होईल यावर ती च्या सर्व हितचिंतकाना विश्वास होता. झालं... clg ला L & T आली..!! software मधली एक मोठी company..!!
ती ची जोरदार तयारी चालली होती..!! त्यात तो च्या so called magazine साठीचं काम पण सूरु होतं. अन मैत्रिणींच servicing center ही..!! apti छान गेली होती..!! त्यामधे ती नं TOP केलं होतं..!!
आता HR ROUND होणार होता. ती पुर्ण तयारीत होती..!! प्रत्येक प्रश्नाला ती मोठ्या आत्मविश्वासाने सामोरे जात होती. interview व्यवस्थित झाला होता. ती खुश होती. result ची वाट पाहत होती.
L&T ने RESULT OUT केला..!! ती त्यात select नाही झाली..! फार upset feel करत होती ती. एवढ्या मेहनती नंतर ही ती चं selection झालं नव्हतं..!! फारच खचून गेली होती ती..!! या servicing center ला ही आता servicing ची गरज होती..!! कुणाशी तरी मन मोकळं करावसं वाटत होतं ती ला.
पप्पांना फोन केला तर ते शाळेत होते, फारसं बोलता आलं नाही..!! आता कोणाशी बोलावं..!! अन ती ला तो आठवला..!! सकाळीच तो ने ती ला result साठी best luck wish केलं होतं..!! ती नं तो ला फोन लावला. पण तो चा फोन बिझी...!! १० मिनिटांनी पुन्हा लावला.. पुन्हा बिझी..!! सुमारे अर्धा तास तो चा फोन बिझी होता..!! ती जाम वैतागलेली..! रूमवरच्या त्या कृष्णाच्या फोटोकडे मोठ्या आशेने पाहत,डोळ्यांच्या कडांपर्यंत आलेली अश्रु रोखत तो आहे म्हणून स्वतालाच धीर देत होती..!! थोड्यावेळाने पप्पांचा फोन आला. ती फोन वर मनोसोक्त रडली..!! "का तो माझी एव्हढी परिक्षा पाहतोय..?" ती चे पप्पा तिला समजावत होते. ती ला ते सर्ब समजत ही होतं.. पण पटत नव्हतं..!! सुमारे १ तास ती पप्पांशी बोलली.. अन i am OK paa..!! म्हणत फोन ठेवला. पण तरीही ती चं काही समाधान होत नव्हतं..!! पुन्हा ती ने तो ला फोन केला.. फोन पुन्हा बिझी..!! मागचा गेला दीड तास ह्याचा फोन बिझी लागतोय..!! माझा फोन येत असूनही कोणाशी हा एव्हढं बोलतोय..? ती ने तो ला येतील तेव्ह्ढ्या शिव्या देउन झाल्यावर, तो ने आलेले ती चे १० miss call पाहून लगेचच तिला miss call दिला..!! ती अजूनच उखडली..!!
अन लगेच त्याला call back केला..!! "काय मग कसा झाला interview.. !! चांगलाच गेला असणार म्हणा" तो चा सर्द आवाज..!! ती फक्त "हेलो.." म्हणून शांत झाली होती. फक्त तिचा हुंदका ऐकू येत होता. तो ने मग तो मस्ती मजाक वाला आपला नेहमिचा hopeless tone बाजूला ठेवत ती ला seriously काय झालं म्हणून विचारलं..!! ती ला अजूनच भरभरून येत होतं. सुमारे १५ मिनिटे ती तसाच हुंदका दाबून रडत होती..!! अन तो फक्त निशब्द..!!
"झालं रडून ..? की अजून रडायचंय..?"
ती ला वाटलं "का आपण याला फोन केलाय? कशाला? याला काहीच नाही वाटलं?"
"किती रडायचंय तेव्हढं रड..!! डोळ्यातून अश्रु गेले ना की फार हलकं वाटतं.. मन मोकळ होतं अन पुढची कामं करायला उत्साह येतो..!! मला कोणीतरी म्ह्टलं होतं अश्रू हे जिंवत पणाचं लक्षण असतं म्हणून..!! काय झालं रडायला..?"
"मी नाही झाले L & T त select..!! H.R.मधूनच बाहेर..!!" ती चा हुंदका वाढतच होता..
"ठीक आहे ना मग.. एव्हढ्यात हरलीस..? अन रडून काय करणारेस..? मी तुला रड म्हणतोय ते तुला हलकं वाटावं म्हणून.. अश्रुंच्या आड पराभव कधीच लपत नाही.. आपण कुठे कमी पडतोय हे नको का बघायला..? जिथं कमी पडलो तिथं नको का सुधारणा करायला.. पराभवाची कारणं शोधं..!! अन प्रत्येक वेळीस आपण कमी आहोत म्हणून च आपला पराभव होत असतो असं काही नाही..!! आपण प्रत्येक बाजुत श्रेष्ठ असूनही आपले पराभव होत राहतात काळाची गरज म्हणून.. एक दोन परभवानेच खचून गेलीस..? अजून खूप पहायचेत असले क्षुल्लक पराभव ...!!"
ती चा हुंदका थोडा थोडा थांबत होता.. डोळे पुशीत त्याचं ते सांत्वन स्विकारत होती.
तो ती ला बरीच उदाहरणे देत होता.. बरीचशी ती ला माहित होती.. पण तरीही ती तल्लीन होऊन ऐकत होती. सुमारे तासभर दोघं बडबडत होते..!! तो ती ला नकोश्या वाटणार्‍या interview tips देत होता..!!
" आपण ठरवलं तर आपण कुठेच कमी नाही पडत..!! बस्स.. मन लावून काम करायचं..!! इतकं की यश सुध्दा हसत हसत आपल्याकडे यायला आसुसेल ..! आपली बलस्थानं कोठली ती ओळखून वापरायला शिकलं पाहिजे..!! तू खूपच expressive आहेस.. तू काही बोलायच्या आधीच तुझा चेहरा सगळं काही सांगून जातो..!! ते expression control करायला शिक..!! तुझे प्लस पोईंट मी नाही सांगणार ते तुला चांगलेच माहित आहेत.. !! हार जीत तर चालतच राहते रे.. अन एक सांगू हार असल्याशिवाय जीत ला महत्व नाही रे.. खूप कष्टाने एखादी गोष्ट मिळाली ना तिचा आनंद असा काही लूटायचा की बस्स.. त्या आनंदाला स्वताहून तुझ्याकडे यावसं वाटेल.."
ती ला आता सर्व काही पटलं होतं..!! साडे-सहा वाजून गेले होते..!! तो चा सात ला CATIA चा class होता. पटकन आवरत.. ती ला थोडी उमेद देत फोन ठेवत त्याने बाईकला किक मारली अन भुर्र उडाला.. !! हो ती च्या साठी त्याचं ते पटकन track change करण भुर्र उडण्यासारखंच होतं.
किती काही शिकायला मिळालं होत त्या एक दिड तासात ती ला..!!
अन तो ला..? त्यालाही..!! ती चा फोन यायच्या आधी तो जुनियरशी बोलत होता..!! तिचे आभार मानत होता..!! अन तो ही रडत होता..!! पुर्ण न होणार्‍या स्वप्नांसाठी..!! अन दुसरीकडे कोणाला तरी "हार जीत तर चालतच राहते रे" असंच समजावत होता..!! दोघंही एका वेगळ्याच मूड मधे..!!
त्या दिवसापासून ती तो ची खरी फॅन झाली होती.. तो च्या भाषेत "भक्त". त्याला खूपच जवळचा मानू लागली..!! महिनाभरापुर्वी ती तो बद्दल करत असलेला विचार अन आज करत असलेला विचार यात जमिन आसमानचा फरक होता. पण त्याला याचा काहीच फरक पडत नव्हता..!! अन पडणारही नव्हता..!! तो फक्त आपल्या terms वर life जगत होता..!! कोणाचीही पर्वा न करता..!! अगदी भरभरून..!! आत कुठेतरी कोणीतरी नाही म्हटल्याचं दुख लपवून..!! ती आता पुन्हा बोलकी होऊ लागली होती. पुन्हा काहीतरी गवसलं होतं तिला. अन तो अजूनच अंतर्मुख..!! अगदीच अळवावरच्या पाण्यासारखा..!! अन ती त्याला स्पर्शीण्याचा ध्यास घेतलेली..!! magazine चं बरचस काम संपत आलं होतं. annual day ही झाला, त्यात तो चा hopeless group पुन्हा गाजला. पण यावेळी चांगला म्हणून!! अन तो खुश होता ते त्यांच्यातलं एक अनोखं रूप जगाला दाखवलं म्हणून.. ती third side यशस्वीपणे त्याने सर्वांपुढे मांडली होती, अन सर्वांनाच ती पटली होती. गेली ३ वर्षे त्याच्या hopeless group बद्दल असलेली सर्वांची मते त्या एका दिवसाने बदललेली होती..!! एका रात्रीत सर्व hopeless कार्टी star झाली होती..!!
असेच दिवस पुढे जात होते.
७ एप्रिल २००८ तो चा वाढदिवस..!! ती च्या तो लक्षात होता. कसा ते माहित नाही..!!
अन तो ला तो का आहे म्हणून वाईट वाटायचं..!! कारण २ वर्षांपुर्वी याच दिवशी तो ला जुनियर कडून नकार मिळाला होता. काही केल्या तो ते विसरवू शकत नव्हता. ती अन बाकीच्या magazine team ने त्याचा birth-day celebrate करून तो ला surprise द्यायचं असं ठरवल होतं. ती ने सगळी जय्यत तयारी केली होती. मीटींग झाल्यावर ते सगळे पी. जी त (clg जवळ चा एक छोटेखानी कट्टा) जमणार होते अन त्याला तिथं बोलावून surprise birthday wish करणार होते. सकाळपासूनच तो चा मूड छान होता. त्यामुळे सगळेच बिनधास्त..!! एरव्ही तो चा मूड संभाळुनच सगळी कामं करायचे सगळे magazine वाले..!! (हे तो च्या hopeless group ने दिलेलं विशेषण!! ) मीटींग झाल्यावर ती ने तो ला पी.जी. त यायला सांगितलं..!! तो project work मधे बिझी असल्याने थोड्यावेळाने येतो म्हणून ती ला उडवलं..!!
तोपर्यंत ती ने cake वगैरे बाकीची सगळी तयारी केली होती. १२.३० ला तो पी.जी.त आला. तिथं फक्त ती, ती ची एक मैत्रीण अन एक मित्र तिघेच..!! (बाकी कुणालाच तो च्या birthday बद्दल उत्सुकता नव्हती. ते दोघंही फक्त ती च्या आग्रहामुळे आले होते.) तो आल्याआल्या तिघांनीही त्याला wish केलं. तो ला सारचं अनपेक्षित..!! wish करून तिघे त्याला cake लावायला पुढे सरसावले. त्याने पटकन त्या सर्वांना अडवलं. अन "कोणी करायला सांगितला हा शहाणपणा? मला नाही आवडत असली थेरं करायला.कोणी सांगितलं माझ्यासाठी एव्हढं करायला..!! नाही आवडत मला माझा birth-day celebrate करायला..!! " म्हणत त्या तिघांनाही झापलं..!!
सगळेच स्तब्ध..!!
"किती नालायक आहे हा.. आम्ही एव्हढ्या आपुलकिने याचा birth-day celebrate करतोय अन हा..!"
येणार्‍या सगळ्या प्रतिक्रिया त्याला माहित होत्या.अन तरिही तो असा वागत होता. कारण त्याला त्याचा काहिच फरक पडत नव्हता. ती च्या डोळ्यांत मात्र दोन अश्रु हळूच तरारले. पण तो ने च सांगितल्याप्रमाणे तिनं ते control केलं. तो थोडा शांत झाला, अन मग " cake फक्त खायला असतो.. तोंडायला फासायला नाही " म्हणत त्याने cake कापला. त्याचं ते वागणं सर्वांनाच खटकलं होतं. उपकार केल्यासारख त्याचं ते येणं..!! अन मला कुणाचीच गरज नाही हा अहंभाव असलेला खराब ATTITUDE या सगळ्यांचाच ती ला खूप त्रास होत होता..!! पण तो निर्विकार!! अगदीच अळवावरच्या पाण्यासारखा अलिप्त..!!
त्याचं ते वागणं ती ला खूपच लागलं होतं. पण त्याच्याकडे त्याच्या प्रत्येक विचित्र वागण्याचं समर्थण होतं.. !! त्याला पटलेलं..!! अन इतरानांही ते पटावं असा त्याचा बिलकुल अट्टाहास नसायचा..!! ते त्याच्या अतिआक्रमकतेमुळे अपोआपच समोरच्याला पटायचं. ती तो च्या या विचित्र वागण्यामुळे खुपच दुखावली गेली होती. रूमवर जाउन खूप रडली.
"का मी त्याच्यासाठी एव्हढं करतेय? त्याच्यासाठी मी काहिच नाहिये..!! मी त्याला आपला मित्र मानलं म्हणुन त्यानं सुध्दा मला तसचं आपली मैत्रीण मानावं ही चुकीची अपेक्षा का करावी मी..? मी सगळ्यांनाच एव्हढा जीव लावते मग का रे कोणीच मला जीव लावत नाही. एव्हढी का रे वाईट आहे मी..?" त्या श्यामसावळ्या ला समोर धरून ती खूप रडली. फारच हळवी होती ती. प्रत्येक छोटी गोष्ट मनाला लावून घेणारी. जितकं छोट्या गोष्टीतून ती ला मोठा आनंद मिळायचा त्याच्या कैक पटीने त्या छोट्या गोष्टींचा ती ला त्रास व्हायचा. पण तो जे काही वागला ते सर्व ती दुखरी जखम चिघळल्यामुळेच..! हे ती ला कुठे ठाऊक होतं..? त्यामुळेच तो ने आपल्या भवती एक अभेद्य अशी महत्वकांक्षी चौकट उभी केली होती. त्याच चौकटीचा त्रास ती ला होता. अन तो.. त्याला तर त्याहुनही अधिक...! चौकटीतल्या जगण्याचा तर त्याला फार तिटकारा यायचा. पण आज ती ने त्याची ती अभेद्य चौकट भेदली होती. अगदी सहज्,त्याच्याही नकळत! त्याच्या त्या वागण्याचा त्यालाही त्रास होत होता. त्याला रहावलं नाही. त्याने सरळ ती ला clg library च्या reading hall मधे बोलावल अन आपल्या sack मधून एक diary काढली,अन ती च्या पुढ्यात कुठलसं पान काढून
" इथून पुढं वाच, याच्या व्यतिरिक्त काहिच वाचु नकोस! ही पाचच पानं वाच्,उगीच इथं तिथं डोकावू नकोस!!" असं म्हणत आपल्या त्या विचित्र वागण्याचं कारण सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
"कोण समजतो हा स्वताला? त्याची diary वाचायला देऊन माझ्यावर उपकार करतोय असं वाटतय याला!किती नालायक आहे..बाद !! एकदम बाद!!" तिची प्रतिक्रिया मात्र अशीच काहीशी होती.
पण तरीही ती ने त्याची ती diary वाचायला सुरुवात केली. तो ची ती diary त्याने English मधून लिहिली होती. ती अजूनच tense!! English तेही तो चं!! जो मराठीतून कविता करतो,त्याची English मधे लिहिलेली diary पाहून ती ला आलेलं tension स्वाभिवकच होतं. ती न ती पाच पानं वाचली.. त्यातलं ते दर्द English मधे असूनसुध्दा ती पर्यंत पोहोचत होतं. ती ला ते वाचून दोन गोष्टीं तर नक्कीच कळल्या होत्या!! पहिली म्हणजे वरवरून रुक्ष वाटणारी माणसं आत किती दर्द घेऊन जगत असतात्,ते दर्द लपविण्यासाठी त्यांना बाहेरून किती ओबड्धोबड असावं लागतं ना..? अन दुसरी म्हणजे मराठीत कविता करणार्‍याच English हे मराठी इतकंच fluent असु शकतं!! त्या diary त त्यानं बंदिस्त केलेली तो ची ती अपुर्ण स्वप्नच जवळून अनुभवत होती. अन एव्हढं होऊनही हा काही सुधारत नाही. उलट आधीच्या intensity पेक्षा जास्त intensity ने तो पुढची स्वप्न पहातोय.. अगदी बिनधास्त..!! कसं काय जमतं याला..? ती आजवर फक्त स्वप्नच बघायची..! पण खरं तर ज्या गोष्टी तिच्या आवाक्याबाहेर असायच्या त्यांना ती स्वप्न म्हणायची. पण स्वप्नही पुर्ण होतात्,अन नाही झाली म्हणून ती बघणं सोडुन द्यायचं नसतं!! असंच काहीतरी वेगळं तिला तो ची diary वाचुन कळलं होतं. त्याची त्या पाच पानांतली दोन पानं असलेली त्याची अधुरी प्रेमकथा..!! सगळं काही ती अनुभवत होती. तीन पानात घरच्यांवर असलेले अपार प्रेम अन बापाबद्दल व्यक्त केलेला आदर अन लिहिलेल एक वाक्य "papa i just want to be like you.. i am sorry dad.. i am sorry i failed.."
ते सगळं ती च्या डोळ्यापुढे फिरत होतं. तो ती diary घेऊन ती ला कालच्या असभ्य वागण्याबद्दल sorry म्हणत भुर्र उडाला..!! किती सहज जमायचं त्याला आपला track change करणं. १० मिनिटांपुर्वी इथं समोर रडवेला झालेला तो कुठल्या तरी गर्दीत मिसळून टवाळक्या करण्यात दंग होऊन गेला. जसं काही झालचं नाही. ती ला त्याच्याशी काहीतरी बोलायचं होतं! पण तो कुठं ऐकायला तिथं होता.केव्हाच पसार झालेला!! आज ती ला खूप बरं वाटत होतं. का कोणास ठाउक पण काहीतरी परत मिळाल्यासारखं वाटत होतं. कदाचित आधी ती पासून दुर गेलेले दोन्ही मित्र तो च्या रुपाने ती च्या आयुष्यात आज अवतरले असावेत म्हणून!! त्या दिवशी ती नं तो ला एक mail पाठवून आपल्या आयुष्याची कहाणीच सांगितली. त्यानं न विचारता, स्वताहून!! ती आज पहिल्यांदाच स्वताहून व्यक्त होत होती !! त्यानं तो mail वाचला. पण त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. या सगळ्यात clg ला campus साठी अनेक company येत होत्या. ती मोठ्या आत्मविश्वासाने प्रत्येक apti crack करत होती final round पर्यंत जात होती. पण कोठेच select होत नव्हती. फार वाईट वाटायचं ती ला. पण मनात कोठेतरी तो सारखा मित्र आहे मला support करायला म्हणुन सगळं दुख विसरून पुन्हा जोमाने पुढच्या तयारी ला लागायची. दोघांची मैत्री फोनवरूनच फुलत होती. तो ती ला clg मधे मुद्दामच टाळायचा,ते आपल्या त्या hopeless image मुळे!! आपली ती hopeless image change करावी असं कधीच त्याला वाटलं नाही. आता तो ही ती ला आपली मैत्रीण मानु लागला होता. तो च्या extra attitude मुळे दोघांच्यात खूप भांडणे व्हायची. पण सगळी लटकीच असायची. कोठल्याही साध्या गोष्टींवरून त्यांच्यात जुंपायची !! त्यांची मैत्री अशीच फुलत होती. त्याच clg life आता संपत आलं होतं. फिरोदिया करण्याचं त्याचं स्वप्न अधुरच राहणार होतं!!
magazine ही जवळ जवळ पुर्ण होत आलं होतं. त्याची बरीचशी स्वप्न आता ती ला माहित होती. त्यातलच एक म्हणजे त्याचा idol संदीप खरे ला भेटण्याचं!! अन ते ही तो पुर्ण करणार होता. आपल्या magazine साठी त्यांची मुलाखत घेण्याचा योग तो च्या T.&.P मुळे आला होता. तो ने लगेच आपली team कामाला लावली. अर्थात त्यात ती ही होतीच. मुलाखतीसाठी दोघंही खुप मेहनत घेत होते. २८ एप्रिल २००८ सकाळी १० वाजून ३० मिनिटे.. मुलाखतीची वेळ ठरली. तो, ती अन दोघांचा एक मित्र (common friend हे असण फार गरजेचे!! ते असल्याशिवाय कथा कलाटणी घेत नाही!!) असे तिघे संदीप खरें ची मुलाखत घेण्यास त्यांच्या घरी गेले. मुलाखत व्यवस्थित झाली. त्या मुलाखतीं दरम्यान ती तो च पुर्ण होणार स्वप्न फार निरखून पाहत होती. किती आनंद दिसत होता त्याच्या त्या रुक्ष चेहर्‍यावर!! सगळ ती अनुभवत होती. त्याच्या diary त ल्या पानावर लिहिलेल एक स्वप्न तो किती सहजपणे सत्यात उतरवत होता!!
मुलाखत संपली तिघांनी ही संदीप सरांचा निरोप घेतला. मुलाखत संपवून ते स्वारगेट जवळच्या नटराज मधे काहीतरी खायला म्हणून थांबले. तो चा काहीतरी मिळवण्यातला आनंद तो, त्या दोघांबरोबर उधळत होता. बोलता बोलता तो हळूच म्हणून गेला "मला आपल्या माणसांसाठी काहीही करायला आवडतं त्याच्यांसाठी काहीही..!! मग त्याच मोल पैशानं सुध्दा मी करत नाही." यावर ती ची प्रतिक्रिया थोडी वेगळीच होती.
"तू कुठे कोणाला आपलं मानतोस रे..? तुझं आपलं माणूस म्हणजे नेमकं काय रे..?"
"आपल्या माणसला तु आपला आहेस हे सांगाव लागत नाही.. त्याला ते कळलचं पाहिजे..."
जवळ ठेवलेल्या पाण्याने भरलेल्या ग्लास कडे पाहत तो पुटपुटला "काय आहे.. ग्लास फुल्ल भरलाय पाण्याने, पण लोक तरीही त्यात पाणी ओततात पण ते पाणी वाहूनच जाणार आहे..!! पण त्यात जर एखादा colorful drop टाकला ना ते रंगीत होतं.. ज्या color चा drop टाकलाय ना अगदी त्याच color च ते पाणी होतं". glass full of water theory.. philosophy.. अगदीच कडु..!! फार लागलं ते तिला..!! का मी भरलेल्या ग्लासात पाणी ओततेय असच तिला वाटलं. फारच उखडली ती..!!
पण तो colorful drop म्हणजेच आपली माणसं असतात असच काहीसं त्याला म्हणायचं होतं.
clg आता जवळ संपलच होतं. project work,submissions,send off सगळ उरकलं होतं.B.E.च्या orals ही जवळ आल्या होत्या. सगळ्याच hopeless कार्ट्यांनी आता clg ला येणं बंद केलं होतं.पण तो magazine
च्या कामामुळे clg ला अधून मधून चक्कर मारायचा. तो असाच एकदा clg मधे आला होता. अन नेमक त्याच दिवशी ती ला घरी जायचं होतं. त्यान ठेवलेल्या मीटींगमुळे ती ला उशीर झाला होता.
तो मीटींग झाल्यावर ती ला भेटला अन म्हणाला "हरकत नसेल तर मी तुला सोडतो स्वारगेट ला..!!"
ती एकदम चाटच.. "हा विचारतोय..? ह्याला कधीपासून दुसर्‍यांची काळजी वाटायला लागली?"
तिन नको म्हणून त्याला झिडकारलं.. पण तो ऐकेल तर शप्पथ ना? त्यान तिला तिचं सगळ सामान घेऊन clg च्या थोडं पुढेच मुद्दामून बोलावल. दोघही त्याच्या बाइकवरुन निघाले. तो नेहमीच तिच्याशी तुटक तुटक वागणारा आज एकदम मोकळेपणाने बोलत होता..!! अन ती त्याची ती बडबड गप्प ऐकत होती. रस्त्यावरुन जाणार्‍या प्रत्येक गोष्टीत तो आपली स्वप्न पहायचा अन ती ला "हे बघ मी हे पण स्वप्न पुर्ण करणार आहे.. !! बघ करतोच की नाही..!!" असच त्याच्या i will make it happen .. attitude मधून सांगायचा प्रयत्न करत होता.
"ऐ ती बघ Toyota Camry S8 MY DREAM CAR with 2362cc, 2.4 ltr.4 cylinder petrol engine, price rs. 24 lac on Indian road !!!" रस्त्यावर जाणारी ती silver car बघुन तो जोरात ओरडला. जशी काही कोणीतरी याचीच कार पळवून नेतय. ती मनातल्या मनात उगीच बडबडत होती, "याला स्वप्नां शिवाय दुसरं काही दिसतं की नाही..? माणसान स्वप्न पहावित पण इतकी झपाटल्या सारखी..?" जी आजवर फक्त स्वप्नच पाहत होती ती..,ती आज त्याच्या स्वप्न पाहण्यावर आक्षेप घेत होती. पण त्याला आपल्या प्रत्येक स्वप्नावर जिवापाड विश्वास होता, ते पुर्ण होण्याचा..!! अन ती कसं काय हा एव्हढा बिनधास्त स्वप्न पाहु शकतो म्हणून अचंबित होती. " किती आत्मियतेने पाहतोय तो ही सारी स्वप्नं..!! यातलं एक जरी स्वप्न पुर्ण नाही झालं तर किती त्रास होईल याला.. !! कदाचित तो उन्मळूनच पडेल..!! " असाच विचार तिच्या मनात डोकावुन गेला. पण त्याला कशाचीच फिकीर नव्हती. १५ मिनिटात स्वारगेट आलं..!!
गाडी नटराजच्या बाजूला पार्क करुन त्यानं ती ला कराडच्या S.T.त बसवल, अन ती चा निरोप घेत पुन्हा भुर्र उडाला..!!
B.E. FINAL EXAM झाली. ती ची ही exam झाली होती. पण तो जरा tense च होता. त्याला एक पेपर फारच अवघड गेला होता. CAD/CAM हा पेपर तसा सगळ्यांनाच अवघड गेला होता. तो ने ती ला ते सांगितल तर ती "नालायका तुझा पेपर राहाण हे अशक्य आहे..!! बघ तुला त्यात नक्की चांगले मार्क्स मिळतील मला विश्वास आहे..!!" असं म्हणुन त्याला थोडा धीर देत होती.
"अरे ४० मिळाले तरी खुप आहेत रे..!! पण यार मी एक ठरवलं होतं की काहीही झाल तरी B.E. त mark list वर theory त ४० आकडा येऊन नाही द्यायचा..!! जाऊ दे यार बघु येईलच काहीतरी चांगला आकडा..!!"
अन ती नक्की याला सांत्वनेची गरज आहे का? म्हणून स्वताशीच विचार करत होती.
त्याच्या मते त्याला कुणाचीच गरज नव्हती कारण त्याच्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे होती. त्याच्या या वाक्यावर ती फार वैतागायची. clg संपलं तसं दोघांचा संपर्क ती घरी असल्यामुळे फारसा होत नव्हता. पण रोजचे रोज sms चालुच होते.
"आता clg संपलं..!! आपण फार कमी भेटणार..!! job मुळे फार कमी वेळा आपलं बोलणं होईल. विसरणार नाहीस ना मला मग...?" दोघांच्या मनात हे एकच वाक्य एकाचवेळी..!!
अन दोघही "नाही विसरणार रे तुला..!!" म्हणत एकमेंकाना सांभाळून घ्यायचे.
२२ जुलै २००८ तो चा company त join होण्याचा दिवस.
आदल्या दिवशी दोघही फोनवर तासभर बोलत होते. ती त्याला "job ला गेल्यावर फोन तर नको करु मला मग बघते तुझ्याकडे..!!" असा दम भरत होती. अन तो ही भारावून गेला..!! ती च्या त्या जीव लावण्यामुळे..!! खरतर त्याला या कशाचीच सवय नव्हती. पण आता त्याला जीव लावायला त्याच्या आयुष्यात त्याची एकुलती एक मैत्रीण आली होती. देवावर त्याचा फारसा विश्वास नव्हता,पण ती च्या सहवासामुळे त्यालाही देवाचं अस्तित्व स्विकारावं असं वाटायचं..!! दोघंही आता आपापल्या personal life मधे busy झाले होते. तो चं job schedule पहिला एक महिना training असल्यामुळे म्हणावं इतक hectic नव्हतं. नव्या वातावरणात जुळवून घ्यायला तो थोडा वेळ घेत होता. ती चं ही clg routine व्यवस्थीत चालु होतं. परिक्षा तर मस्त दिली होती, त्यामुळे result तर मनासारखाच लागणार याची खात्री होतीच.. नेहमीप्रमाणे..!! या सगळ्यातुनही वेळ काढुन दोघं एकमेकाना फोन करायाचे. अन तो जुनियरलाही फोन करायचा. जुनियर ला मात्र त्याचं फोन घेणंही नकोसं वाटायचं. अन ते त्यालाही कळायचं ..!! पण तरीही तो फोन करायचा थांबला नव्हता.
१३ सप्टेंबर २००८.. तो चा result out होणार होता.
cad/cam राहणार की निघणार याचंच tension तो ला सतावत होतं. cad/cam निघाला तर first-class नक्की होता. ११ वाजता result हातात आल्यावर तो चाटच पडला होता. शेवटच्या sem मधे त्याने ७० % score केला होता..!! अन aggregate ६५.२७%..!! फक्त ११ मार्क्स ने distinction हुकला होता... अन cad/cam मधे ४० नाही तर ५० चा score घेतला होता. B.E. MARK LIST वर orals सोडुन कुठेच ४० हा आकडा दिसत नव्हता..!! तो खुपच खुष होता. आयुष्यातलं आणखी एक स्वप्न पुर्ण झाल्याचं समाधान त्याच्या चेहर्‍यावर झळकत होतं. तो ने लगेच ती ला फोन करत ही आनंदाची गोष्ट कळवली.
ती ही ते ऐकुन सुखावली होती.. अन त्याच्या आणखी एका पुर्ण झालेल्या स्वप्नाची सा़क्षीदार होत होती.
त्याच्या त्या आनंदात तितकीच सामील होत त्याला ती म्हणाली
"वेळ मिळेल तेव्हा आठवणीने थेऊरला जाऊन ये..!!"
"का..?" नेहमीच्याच style मधे त्याचा आडवं लावण्याचा प्रयत्न..!!
"मी म्हटल होतं त्याला, पोराला चांगल्या मार्काने पास कर त्याला घेऊन येइल तुझ्या दारी.. मला जमेल की नाही पण तु नक्की जाऊन ये बप्पाकडे..!!!!"
"कोण..? मी जाऊ..? एकटा..? शक्य नाही..!! आजवर कधीच स्वताहुन मी कुठल्याही मंदीरात गेलेलो नाही.. गेलो तर तुझ्याबरोबरच जाईन..!!" तो चा नेहमीप्रमणेचा आडमुठेपणा.
"कसं शक्य आहे ते..? तुला कुठे वेळ असतो..?" ती चा तितकाच संमजसपणाचा स्वर.
"गेलो तर तुझ्याबरोबरच जाईन नाहीतर जाणारच नाही.. बघ बाबा नवस तु केला होता मी नाही..!! माझा हट्ट समज नाहीतर दुसरं काही समज..!!"
"ठीक आहे रे जाऊ आपण..!!" ती ही त्याच्या त्या हट्टापुढे अखेर नमली.
५ ऑक्टोबर २००८.. हा दिवस तो कधीच विसरणार नव्हता.
हा दिवस तसं पाहिलं तर खुप आधी यायला हवा होता,पण तो च्याच अनाठायी हट्टापुढे तो जरा लांबला होता.
आजही तो ने जुनियरला फोन केला होता. जुनियर त्याच्या सततच्या येणार्‍या फोन्स मुळे खुपच वैतागली होती. आज तर तिच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. तो ला तिनं असं काही झिडकारलं होतं की आपण का आलो इथं याचाच त्याला प्रश्न पडला होता..!! तिचं ते निष्ठुर बोलणं तो च्या जिव्हारी लागलं होतं.
बस्स आता कुठल्याच मुलीला फोन करणार नाही.. कुणालाच माझ्या जवळ येऊ देणार नाही.. कधीच नाही..!! रागाच्या त्या आवेषात तो ने जुनियर ला लगेच तसा sms केला. तो त्यावेळी इतका भावनाविवश झाला होता की आपल्या mbl च्या recently sent item मधे शेवटाचा sms कोणाला पाठवला होता ते ही त्यान पाहिलं नाही. अन चुकुन तो sms ती ला send झाला. तो sms बघुन ती खुपच disturb झाली होती. ती ला राहवल नाही. ती न लगेचच तो ला फोन केला. रात्रीचे ११.३०. अन कोणाचा फोन..? तो नंबर बघुन तो ला वाटलं असाच केला असेन हिने फोन..!! असं मनात पुट्पुटुन त्याने तो फोन कट केला. ती अजुनच विचलीत...!! पुन्हा फोन लावला!! कट!! दोन तीन वेळा फोन येऊन गेल्यावर काहीतरी serious असेल म्हणून तो ने ती चा फोन एकदाचा उचलला.
"कोण समजतोस रे तु स्वताला..? तुला जेव्हा हवं तेव्हा एखाद्याला जवळ करतोस अन वाटलं तेव्हा झिडकारतोस.. काय msg पाठवलायस..? " पलीकडुन एकदम आर्त स्वर.
घरात सगळेच झोपले असल्याने तो ला काहीच बोलता आलं नाही.
"उद्या lunch break मधे १ वाजता फोन कर ...!! " एव्हढच बोलुन तो ने फोन ठेवला. दोघंही उद्याच्या १ वाजण्याची आतुरतेने वाट पाहत होते. दोघांची ही रात्र कशीबशी विचार करत संपली. तो आपल्या कामात busy असल्याने ती च्या फोन बद्दल काहीच लक्षात नव्हतं. दुपारी सव्वाला कामातुन थोडी उसंत मिळाल्यावर तो ला ती ची प्रकर्षाने आठवण येऊ लागली पण ती ने अजुनही तो ला फोन केला नव्हता..!! फोनवरच त्याची नजर खिळली होती. शेवटी दुपारी १.३५ ला ती चा फोन आला..!!
"ठीक आहे तुला असच वाटतं तर.. मी ही तुला फोन करुन त्रास नाही देणार..!! बोल कशाला करायला लावला होतास फोन..?" ती चा तक्रारयुक्त स्वर..!!
तो ने ती च सगळ म्हणन ऐकुन घ्यायच्या आधीच "तो msg मी तुला पाठवला नव्हता..!! चुकुन गेला तो तुला..!! पण हे खरयं की मी नाही करणार कुठल्याच मुलीला फोन.. कधीच नाही..!! मी फक्त त्रास देऊ शकतो एखाद्याला.. म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय.. माझी मी स्वताला दिलेली ही commitment आहे..!! अन ती कोणीच नाही तोडु शकत..!! "
पण आज तो च्या बोलण्यात काहीच आक्रमकता दिसत नव्हती. फरच down वाटत होता. पण तरीही तो आपला हेकेखोरपणा काही सोडायला तयार नव्हता. त्याला खरी गरज होती ती कुणाच्या तरी सांत्वनाची..!! पण "मला कुणाचीच गरज नाही.. मी माझा समर्थ आहे..कारण माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत.. मला पटणारी..!! " या त्याच्या igo मुळे तो आणखीनच स्वताला त्रासवत होता. अन ती ला तर त्याहुन जास्त..!! शेवटी कसबस त्याचं ते बोलण ऐकुन "ok तु नको करुस मला फोन, पण मी तर करु शकते ना तुला..? तुझी एक चांगली मैत्रीण म्हणुन..!! " असं म्हणत तिनं त्याला सावरुन घेतलं.
पहिल्यांदाच त्याला कुणाच्या तरी बोलण्याचा फरक पडत होता.
"तुला त्रास द्यायचा नव्हता रे..!! पण मी आता स्वताला शब्द दिलाय रे..!! अन तो बदलण खुप अवघड आहे रे..!! ठीक आहे पण मी तुला sms नक्की करत जाईन..!! माझी एकुलती एक मैत्रीण म्हणून..!! " तो चा स्वताभवती ती अभेद्य चौकट उभारण्याच्या फुटकळ प्रयत्नांना आत्ताच कुठे सुरुंग लावायला ती ने सुरुवात केली होती. झालं दोघही आता समाधानी होते. अन पुन्हा पहिल्यासारखच त्यांच daily routine चालु झालं. आता तो त्याच्या project मधे involve होत होता. सुरवातीला त्याला इथं settle व्हायला खुप त्रास झाला. त्याच्याबद्दल बर्‍याच complaints ही वर पर्यंत जात होत्या. पण एव्हढं सगळ होऊन सुध्दा तो चिकाटीने काम करत होता. दरम्यान त्यान त्याचं आणखी एक स्वप्न पुर्ण केलं होतं..!! clg संपलयापासुन त्यान त्याची bike सोडली होती. आता चालावायची ती स्वताच्या पैशाने घेतलेलीच गाडी..!! अन तीही त्याची dream bike ROYAL ENFIELD 350 CC BULLET ELECTRA..!! तब्बल पाच महिने पी एम. टी चे धक्के खाल्ल्यावर त्यानं ते त्याच स्वप्न पुर्ण केलं होतं. त्याचं प्रत्येक स्वप्न तो एक ध्यास म्हणुनच पुर्ण करत होता. अन ती तो च्या प्रत्येक स्वप्नांची साक्षीदार होत चांगल्या मार्कांचे ओझे घेऊन बेरोजगारीशी एकहाती लढत होती. आतापर्यंत ती ने जवळ्पास clg ला आलेल्या प्रत्येक company ची apti crack करत H.R. ROUND पर्यंत मजल मारली होती. पण प्रत्येकवेळी तिच्या पदरी निराशाच येत होती. त्या अपयशापेक्षा ती ला लोकांकडुन मिळणार्‍या सहनभुतीचा अन नकोश्या सल्ल्यांचा , interview tips चा अन त्या चांगल्या मार्कांच्या ओझ्याचाच जास्त त्रास होत होता. हे सगळ तो निरखुन पाहत होता. तटस्थपणे..!! ती च्या ह्या problem वर काहीतरी solution काढलच पाहिजे. अन असच काहीतरी तो ठरवत होता. त्यानं ती ला कधीच तिच्या अपयशाबद्दल सांत्वना दिली नाही. कारण त्याला माहित होतं ती ला सात्वंनापेक्षा inspiration ची गरज होती, पण कुणाकडुन उसनी घेतलेली नाही तर स्वताच्या आतुन आलेली अंतप्रेरणा..!! ती जागवण्यासाठी तो ती ला मुद्दामच desperate करायचा. ती प्रत्येक interview ला जाताना तो चा एक मस्त inspiration वाला sms ती च्या mbl inbox मधे असायचा. अन interview झाल्यावर कारल्याहुन कडु शब्दातल त्याच ते desperate करणारं बोलण.
"काय मग आज कुठं दिला interview..? काय यार लावलयस तु..? रोज सकाळी मस्त तयार होऊन जायचं अन संध्याकाळी तोच टवटवीत चेहरा पाडुन यायचं..!! यार तुला इतके interview face करायला मिळतायत.. अन आम्हाला आमचा basic criteria च नसल्याने बर्‍याच कंपन्या सोडाव्या लागल्या..!! " असच काहीतरी ती रडवेला करणार तो बोलायचा..!! अन ती निमुटपणे सर्व काही ऐकुन घ्यायची. त्याच्या बोलण्यावर खुप रडायची. अन तो फक्त म्हणायचा
"प्रयत्नांती परमेश्वर..!! बस प्रयत्न करत रहा मनापासुन..!! मी नाही तुला कुठलीच सहानभुती देणार कारण तुला ती द्यायला खुप जण तुझ्या कृष्णाने तुझ्या आयुष्यात पाठवलेत.. अन मला त्या अश्रुंमागची हजारों कारणं शोधायला..!!"
त्याच हे विचित्र वागण ती ला पटायचं म्हणुनच तर ती त्याला आता आपला true friend मानायला लागली होती. हळुहळु तो आता आपल्य project वर रुळत होता. पुर्वी जो project त्याचे ३ seniors पहायचे आता तिथं तो एकटाच सगळं पाहत होता. project execution, planning, estimation,material management,billing,measurement, on site R&D, vendor development,installation , commissioning, client feedback ही सगळीच कामं तो मोठ्या शिताफीने करत होता. मागच्या ३ महिन्यात त्याची झालेली ती negative image तो हळुहळु पुसत होता. त्याचीच पावती म्हणून company च्या first quarter मधे तो च नाव सगळेच best performer म्हणून घेत होते. पण सुरवातीच्या negative reporting मुळे त्याला third best performer म्हणून समाधान मानाव लागल होत. recession असुन सुद्धा तो ने तिथं चांगलाच जम बसवला होता. तो एकटाच २.७५ करोड चा project handle करत होता. त्याच्यासाठी त्याचं caliber दाखवण्याचीच ही संधी होती. इथं तो त्याचं ते caliber expose करत होता अन ती तिथं बेरोजगाराशी लढत होती. recession मुळे ती ला म्हणावी तशी संधी मिळत नव्हती. तो हे सर्व पाहत होता. ती ची चाललेली तडफड पाहुन त्याला खुप वाईट वाटायचं. आपण काहीतरी करायलाच पाहिजे, अस सारखच वाटायचं. पण अस वाटुनही काहीच होत नव्हतं. तो ची अंतप्रेरणा जागवण्यात त्याला म्हणाव तितक यश येत नव्हतं. त्याच कारण म्हणजे ती न तिच्याभवती बनवलेली ती अभेद्य चौकट..!! तो तस तिला बोलुनही दाखवायचा. अन ती प्रत्येक वेळी "मला life भरभरुन जगायला आवडत..!! कुठल्याही चौकटीशिवाय..!! अन ती मी जगते up to max limit..!!" असं म्हणत सारवा सारव करायची. ती च्या या वाक्यावर तो खुप हसायचा अन म्हणायचा "infinitely long cylinder माहिती आहे का रे तुला..? त्याच्या height ला कुठलच limit नसतं.. पण त्याच्या width च काय..? तुझंही तसच आहे रे..!! तुझ उभ्या चौकटतीतल जगणं..!! तुला ती उंचीची चौकट नाही म्हणत..!! त्या आडव्या चौकटच्या बाहेर येऊन बघ..!! life up to max खरं तिथ मिळेल रे तुला.. त्या उभ्या चौकटीत नाही..!!"
अन सगळ कळुनही ती त्याला फक्त म्हणायची "ऐ आडवी चौकट..!!"
अन मग तो ही कधीच ती चौकट तोडायचा प्रयत्न नाही करायचा..!!!
बघता बघता दोघांच्या मैत्रीला आता वर्ष होत आल होतं..!! पण त्यांच्या बोलण्यावरुण ते दोघंही बालपणापासुन एकमेंकाचे मित्र असावेत असच काही ती च्या सर्व मैत्रीणींना वाटायचं..!!
सततच्या येणार्‍या अपयशापेक्षा ती ला तिच्यासाठी येणार्‍या लोकांच्या सहनभुतीचा खुप ताप व्हायचा..!!
तो ला सतत ती ला भेटुन inspire करावस वाटायचं. पण ती तो ला भेटायचं टाळायची..!! त्या चौकटीच्या आत रहाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्नच ती करायची. त्यामुळे दोघांच्यातही खुप वाद व्हायचे.
असच एकदा तो च्या एका निष्फळ प्रयत्नावरुन दोघांच्यात खुप भांडण झालं. भांडणाच्या शेवटी तो तिला सहज बोलता बोलता ती चौकट कोण तोडु शकतो हे सांगत होता.
"तु मला ती चौकट कधीच तोडु नाही देणार..!! का माहिती आहे..? कारण ती तोडण्याचा हक्क तु फक्त एका माणसाला दिलाय..!! अन ते फक्त त्यालाच जमु शकतं..!! तो म्हणजे तुझा life partner..!!" ती ही त्याच्या बोलण्यात हो ला हो मिळवत होती. तो बोलतच होता, ती ऐकत आहे का नाही याची तमा न बाळगता..!! "तुझा life partner कसा असावा ना या बद्दल मी तुला सांगतो.. बघ तुला पटतय का..? तो प्रत्येक गोष्टीत तुझ्या पप्पांची बरोबरी करणारा असायला पाहिजे..!! अन तुही तुझ्या नकळत आपल्या life partner ची तुलना तुझ्या पप्पांशी करतेस.. हा.. पण हे सर्व तुझ्याबाजुने..!! माझं मत म्हणशील तर तु ना mechanical engineer चं बघं..!! अ‍ॅ.. मी पण mechanical engineer आहे म्हणून असं म्हणतोय अस नाही रे..!! पण प्रत्येक mechanical engineer self made, self contend असतो..!! एक वेगळीच आग असते त्यांच्यात.. वेगळाच spark..!! RHTDM पाहिलास ना..? मग तुला जास्त काही सांगायची गरज नाही..!! पण मला असं वाटत याचं कारण फार वेगळ आहे तुलाही पटेल..!! mechanical म्हणजे definitely male.. !! no females in our branch..!! बस्स सगळेच साले भुक्कड..!! पण आतुन फार हळवे..!! अन कुणाची तरी वाट पाहणारे..!! अन तुलाही असच कोणीतरी पाहिजे. स्वतापेक्षाही जास्त जीव लावणारा. अरे आम्हाला फक्त कुणीतरी जीव लावणारं पाहिजे असतं..!! मग तिच्यासाठी आपला जीव ओवाळुन टाकण्याची सुध्दा तयारी असते रे..!! नेहमी मला काय वाटतं यापेक्षा माझ्या partner ला काय वाटतं याचाच ते जास्त विचार करतात..!! कारण ते फक्त आपल्या terms वर life जगत असतात.. अन फक्त आपल्या partner साठी ते बदलण्याचीही त्यांची तयारी असते..!! अगदी हसत हसत..!! पप्पांना सांग माझ्यासाठी mechanical engineer च बघा..!!"
त्याची ही वायफळ बडबड ती मात्र तल्लीन होऊन ऐकत होती.
शेवटी कसबस त्यांच भांडण आटोपत होत. तो ने आपल्या mobile चे incoming calls पाहिले..!! ती तब्बल दोन तास तो शी फोन वर बोलत होती. आपल्या त्या महत्वकांक्षी commitment मुळे.. "मी कुठल्याच मुलीला फोन करणार नाही.. कधीच नाही..!!" ही बोच तो ला फरच सलत होती. आपण कुठतरी चुकलोय अस त्याला पहिल्यांदा वाटत होतं.पण ती सगळच सांभाळुन घेत होती आपल्या मुळच्या "संमजसणामुळे"..!!
एप्रिल महिना जवळ येत होता.. अन तो ला त्याचा मागचा birth-day आठवत होता. किती विचित्र वागला होता ती शी तो..!! त्याची काहीही करुन भरपाई करायची असाच काहीसा तो चा plan होता.
ती चा फोन आल्यावर त्याने ती ला तिन तो साठी केलेल्या नवसाची.. थेऊरच्या चिंतामणीला जाण्याची आठवण करुन दिली अन तो चा जवळ येणार्‍या birth-day ची ही..!! पण ती काही केल्या तो बरोबर वाटत असुनही जायला तयार नव्हती. पण आपल्या birth-day gift च्या नावाखाली तो नं तिला कसबस तयार केलं. तो च्या project चं आता काम थोड थंडावलेल होतं. पण site-in-charge असले कारणाने तो ला रविवार शिवाय सुट्टी मिळणं तस खुपच अवघड होतं. कशीबशी त्यान रविवारी सुट्टी मिळवण्याची तजवीज केली.
रविवार ५ एप्रिल २००८..!!
ती पहिल्यांदाच तो बरं कुठ बाहेर जाणार होती..!! एकटीच..!! तो चा हट्ट म्हणून..!!
तो त्याची intense-desire (आपली बुलेट) घेऊन ती ला भेटायला मोठ्या ऐटीत निघाला.
दोघांनीही चिंतामणीच व्यवस्थीत दर्शन घेतल. दर्शन झालं. आता ती ला परत होस्टेलवर सोडायच होतं. पण तो ला ती अजुन थोडावेळ आपल्या बरोबर असावी असच वाटत होतं. तस तो तिला म्हटलाही. अन चांदणी चौकात जाऊ म्हणून गळ घालत होता.अन ती त्याला नको म्हणत होती. पण तो ऐकेल तर शप्पथं..!! गाडी सरळ ८० च्या स्पीड वर घेत fly-over अवघ्या १० मिनिटातच त्याने क्रॉस केला. ती चा काहीच ईलाज नव्हता. अन तो आपल्याच धुंदीत..!! त्याच्या या असल्या अंतरंग वागण्यामुळे ती ला तो आपल्यापासुन दुर जाईल याचीच भिती वाटायची. आणी म्हणुनच ती त्याला एका चौकटीत बांधायचा प्रयत्न करायची. good friend, best friend या चौकटीही आता तो साठी अपुर्‍या पडु लागल्या होत्या.तिन तो साठी बनवलेल्या प्रत्येक चौकटीला तो शिताफीन तोडत होता.अवघ्या २५ मिनिटात दोघांनीही चांदणी चौक गाठला होता. तिथल्या प्रत्येक होटेलची खासियत तो तिला मोठ्या कौतुकाने सांगत होता. जुनियर ला जिथ तो ने propose केला होता ते "निवांत" ही दाखवत होता. अन जुनियर ला इथ कस आणल होतं त्याचीही स्टोरी ही सांगत होता. तो एकटाच बडबडत होता. त्या नादात त्याने पौड गावाच्याही पुढे मजल मारली होती. कसं काय पण तो च लक्ष गाडीच्या मीटर कडे गेलं. तब्बल १०० किमीचा टप्पा दोघांनीही काहीच न खाता गाठला होता. अन त्याचाच परिणाम म्हणुन ती ला चक्कर येऊ लागली होती. तो न लगेच गाडी वळवली अन पुन्हा ८० च्या स्पीड ने निवांत गाठलं. पण आज ७ एप्रिल नव्हता. तो तिला इथल्या सगळ्या आठवणी सांगत होता. त्या दिवशी दोघं बसलेली जागा, south Africa आणी Bangladesh ची world cup मधली match, milk shake. Chinese.. सगळ जसंच्या तसं तो च्या डोळ्यांसमोर तराळत होतं. पण त्यान लगेच स्वताला आवरल अन ती कडे मागच्या birth-day च्या वेळेसच्या वागण्याची माफी मागितली. ती ला मात्र याच्या इतकं लक्षात राहु शकत म्हणुन कुतुहुल वाटत होतं. तो तिला आपल्या job tension बद्दलही बोलत होता पण बेतानं..!! पण मी सगळ tension handle करेन..!! निदान एका वर्षा साठी तरी..!! कोणाला तरी दिलेली commitment म्हणुन..!! त्याच्या चेहर्‍यावरचा तो निर्भेळ आनंद पाहुन ती पुर्ण blank झाली होती.
"आता ह्याच्यासाठी कुठली चौकट बनवायची..?" याचच ती ला tension आलं होतं.
अन याच दरम्यान ती job साठी जंगजंग पछाडत होती. पण कुठेच यश मिळत नव्हतं. पण बिचारी सगळच निमुटपणे सहन करत होती. तो ला हे सहन होत नव्हतं. ती ला फोन करावं असच त्याला वाटायचं..!! पण ती ला सहानुभुतीची गरज नाही हे त्याला माहीत होतं. पण ती च्या जास्तीत जास्त जवळ जाऊन धीर देण तेही ती ला ते जवळ येणं म्हणजे सहाननभुती दाखवण्यासारख न वाटता, हे खरोखरच अवघड होतं. पण त्यानं तेही करुन दाखवलं. job tension च्या नावाखाली "मला कुणाच्या तरी support ची गरज आहे" अशीच जाणीव ती ला करुन देऊन त्यान आपला शब्द मोडण्याचं समर्थण केलं. त्यान ती ला फोन केला. स्वताला दिलेला शब्द मोडला. फक्त आपल्या एकुलत्या एक मैत्रीणींसाठी..!! पण त्याचा तो एक जाणीवपुर्वक प्रयत्न होता ती भोवतालची ती अभेद्य चौकट तोडायचा..!! आता सगळच पुर्ववत चालु झालं होतं. ती ची B.E. final exam ही आता संपली होती. ती घरी जायच्या आधी दोघही मनोसोक्त बोलत होते. "आता नाही एव्हढं बोलण होणार पहिल्यांसारख..!! तु माझी आयुष्यभराची मैत्रीण नाही रे राहु शकत..!!" हे वाक्य तसं तिन या आधीही त्याच्याकडुन ऐकलं होतं. तेव्हा ती तो वर जाम उखडली होती."तुला हे आधी नव्हतं का रे माहित.. एक मुलगा अन मुलगी कधीच आयुष्यभर मित्र मैत्रीण म्हणुन नाही राहु शकत..!! मैत्री करायच्या आधी नाही कधी असं वाटल तुला..?" असच काहीसं तेव्हा तिन तो ला झापलं होतं. पण आज ती ला तो च्या त्या बोलण्यातली बोच समजु लागली होती. किती सरळ बोलायचा तो. पण ती ला व्यक्त व्हायला कधी जमायचच नाही. पण तो ला ती च्या मौन रहाण्यातुनही बरच काही उमजायच. पण ती नं व्यक्त व्हावं म्हणुन तो जाणुन बुजुन न कळल्यासारख वागायचा. अन ती "तुला सगळचं कसं रे सांगायला लागतं रे..!!" म्हणुन तो ची फिरकी घ्यायची.
तो आता company त बर्‍यापैकी settle झाला होता. company चा सगळ्यात critical project तो ने व्यवस्थीत handle केल्यामुळे तो आता पुढच्या मोठ्या project साठी नवीन site वर जाणार होता. खुप खुष होता तो. त्याच्या hard work अन dedication ची पावती म्हणुन तो या मोठ्या project कडे पाहत होता. पण तो ला याही पेक्षा काहीतरी मोठं मिळणार होतं. नवीन project वर त्यान २ आठवड्यातच छान पकड मिळवली होती. त्याचं ते skill पाहुन senior project manager आणी branch head दोघांनी त्याला नवीन service manager म्हणुन पुण्यासाठीच offer दिली होती. वर्षभर केलेल्या कष्टाची यापेक्षा कुठली मोठी पावती मिळणार होती..? पुणे branchचा service manager..!! ते ही वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी..!! अतिशय खराब academics असुनसुध्दा..!! त्याच्या आनंदाला तर आता पारावर उरला नव्हता..!! आता उद्यापासुन office बाहेर ford fusion (branch head ची, वय ४९ वर्षे,), santro (senior project manager ची, वय ५६ वर्षे ) या दोन गाड्यांबरोबर royal enfield bullet 350 cc (नवीन service manager ची.. वय २३ वर्षे..!!) मोठ्या ऐटीत लागणार होती. सगळ्यात आधी ही बातमी तो ने ती ला कळवली होती. अन त्याच वेळीस ती त्याच्या current project building समोरुन कुठल्याश्या company त interview देऊन परत होस्टेलला चालली होती, त्या दोघांच्या common friend बरोबर.ती खबर ऐकुन ती ही खुप सुखावली होती. त्याचा आनंद आपला म्हणुनच ती celebrate करत होती. आपलं सगळ दुख घेऊन..!! तो पासुन लपवुन..!! recession खरच खुप लांबल होतं...!! त्याचाच ती ला फटका बसत होता. अन तो ला आपल्या आनंदातही ती च ते दुख अगदी ठळक पणे दिसत होतं. गेली वर्षभर ती न तब्बल १२ हुन अधिक interview देऊनही ती ला नशीब काही साथ देत नव्हतं. यशाच्या त्या शिखराहुन त्याला तिला समजावण खुपच अवघड जात होतं. आपल यश ती ला त्रास देणारं नसावं असच त्याला मनोमन वाटायचं. पण तो आपल्या एकुलत्या एक मैत्रीणीला खुप चांगल ओळखत होता..!! आपलं यश ती ला कधीच खुपणार नाही याचा तो ला ती पेक्षा ही जास्त विश्वास होता. त्याच ते यश ती आपलच मानुन त्यात सामील होत होती.
४ august २००९ तो आपल्या मुबंई branch ला पुण्यातला charge घेण्यासाठी जाणार होता.
आदल्या दिवशी ती ने तो ला दोन blank msg पाठवले होते. त्याला हे खुपच अनपेक्षित होतं.
"ती ची अवस्था फारच अनाकलनीय अशीच झालीय की ती न मला blank msg करावेत?" ती घरी असल्याने फोन वर बोलण शक्य नव्हतं..!! आणी नेमकं त्याच दिवशी तो च्या घरी एक छोटेखाणी कर्यक्रम असल्याने ती च्या त्या blank msg reply करायला त्याला थोडावेळ लागला. ती न लगेच त्या blank msg ला reply करत तो ला झापलं.
"काही तरी बोलायच होतं.. पण म्हटल जाऊ दे..!! वाटलं माझ्या मित्राने मला इतकच ओळखल का..? I am so depressed ..!! माझ्या शिक्षणाचा काय उपयोग जर मी एक job मिळवु शकत नाही तर..!! डोक्याचा भुगा झालाय विचार करुन. माझा स्वतावरचा विश्वास कमी व्हायला लागलाय..!! मला वाटल तुला एकदा तरी कळेल.. पण नाही.. म्हणुन ते blank msg केले होते..!! "
तिच्या या msg ला तो ने मुद्दामच थोडा अतरंग अन तिला अनपेक्षीत असाच reply पाठवला..
"come on dear.. you are a mature girl now.. you can handle this situation very well.. त्यात एव्हढ् blank होण्यासारख काय आहे..? "
त्याचा तो अभद्र reply पाहुन ती ला वाटल याला काहीच फरक नाही पडत. पण तस नव्हतं तो ला त्याचा खुप फरक पडत होता. तसे ती ला आता बरेच मित्र मिळालेले होते. प्रत्येक जण वेगळा..!! अन त्या सर्वांमधे हा नमुना..!! ती च्या मैत्रीच्या अंगणात तो सारखे कैक तारे चमकत होते, अन त्याचवेळेस आपल्या तो कडे मात्र जिवाभावाची त्याच्या आयुष्यातली एकुलती एक मैत्रीण त्याच्या मैत्रीच ते सुनं आभाळ आपल्या अस्तित्वामुळे उजळवुन टाकत होती , अन मग त्याला फरक पडणार नाही अस कसं होईल..? पण त्याला इतर तार्‍यांसारख राहताच येत नव्हतं. आपली ती originality जपताना तो ती ला कमीत कमी त्रास होईल याची नेहमीच काळजी घ्यायचा. ज्याचा जन्म फक्त इतरांना त्रास द्यायलाच झाला होता तो त्या व्यतिरिक्त तरी काय करणार होता म्हणा..? पण प्रत्येक वेळी ती तो ला सांभाळुन घ्यायची, आपल्या मुळच्याच संमजसपणामुळे..!! पण खरं तर ती या संमजसपणाला कंटाळाली होती..!! अन हे सर्व तो ला माहीत होतं. पण इतका प्रयत्न करुनही ती च्या आत दडलेला तो न्युनगंड बाहेर काढुन त्याला ठेचणं तो ला काही केल्या जमत नव्हतं..!! आता त्याच्याकडे शेवटचा पर्याय उरला होता. ती भवतीची ती महत्वकांक्षी चौकट तोडण्याचा..!! पण तो फार सावध होता, कदाचित त्यामुळे तो ची एकुलती एक मैत्रीण तो पासुन कायमची दुरावण्याची शक्यता होती. फार विचारांती तो न हा धाडसी निर्यण घेतला होता होणार्‍या सर्व परिणामांची जाणीव असुनही..!! service manager होऊन तो ला आता महिना होत आला होता. तो चा pick-up ही चांगला होता. पण तो समाधानी नव्हता..!!
१६ august २००९ ती चा आज B.E. चा RESULT लागणार होता. पण ती घरी होती.
result छान लागला होता. ती च्या आधीच तो ला तिचा result आपल्या network through कळाला होता..!! तो जाम खूष होता..!! आपली एकुलती एक मैत्रीण college topper झाली होती.
या आनंदात त्याने आपल्या सार्‍या office staff ला पेढे वाटले होते. ती चा आनंद तर गगनात मावत नव्हता. सततच्या येणार्‍या नोकरी शोधण्याच्या अपयशात हे सुख नक्कीच ती ला सुखावत होतं. सगळ दुख ती विसरली होती. सगळ्यात आधी ती न तो ला हे कळवल अन मी उद्या पुण्यात येणार आहे असही..!! तो न त्याचा उद्याचा सगळा plan reshuffle केला. मुद्दामच आपल्या college जवळच्या आपल्या client असलेल्या software company च्या facility manager बरोबर tender आणी billing संदर्भातली meeting ठेवली. तशी meeting दीड -दोन तासातच उरकायला हवी होती, पण ती लांबली. ती ला त्याच दिवशी संध्याकाळी परत घरी जायच होतं. पण तो ने मला भेटल्याशिवाय जाऊ नकोस मी clg च्या जवळच meeting मधे आहे अस म्हणत ती ला गळ घातली होती.३.३० झाले तरी तो चा पत्ता नव्हता. ती अन त्या दोघांचा common friend जाम वैतागले होते, अन भरीस भर म्हणुन पावसाने ही आगीत तेल ओतल होतं. कसाबसा पावसात भिजत आपली intense desire (bullet) घेत तो ४.०५ ला ते दोघ थांबलेल्या त्या होटेलात पोहचला. सगळ्या शिव्या मोठ्या निर्लज्ज पणे ऐकुन तो ने "आजच जाणं गरजेच आहे कारे ..?" म्हणत ती ला जाऊ नकोस अस indirectly सांगितल. पण "आई-पप्पांनी लगेच यायला सांगितलय , मगाच पासुन ४ फोन झालेत स्वारगेट ला पोहचलीस का म्हणुन." असं म्हणत तिनं जानं किती गरजेचं आहे हेच त्याला पटवुन दिलं. त्यानं ती चा result अगदी निरखुन पाहिला."११२८/१५०० first-class with distinction. 75.23% माझा guess फक्त ३ % ने चुकला..!! ठीक आहे याचा अर्थ ट्रीट मला द्यावी लागणार.. आठवतय का तसं आपल ठरलं होतं..!! " त्याची ती sharp memory ती ला चांगलीच ठाऊक होती. त्याच ती ला फार कौतुक वाटायचं. अन तो मात्र प्रत्येक गोष्टीत आपलच घोडं पुढ दामटावयाच म्हणुन "माझी memory खुप strong आहे..कुणीच तिला challenge करु शकत नाही..!!" असं म्हणत तिला खिजवायचा. ५ वाजले होते तरी पावसाचा जोर काही थांबत नव्हता. ती ला खुपच उशीर झाला होता. तो ने मी सोडतो तुला स्वारगेटला म्हणत तिला आपल्या intense desire वर बसायला सांगितलं. दोघही त्या common friend चा निरोप घेत भर पावसात निघाले. स्वारगेटला लगेचच तिला कराडची गाडी मिळाली. त्यात ती ला त्यानं बसवल खरं पण तो चा पाय काही केल्या तिथुन निघत नव्हता. त्याला पहिल्यांदाच track change करणं अवघड जात होतं. अन तिलाही हे सगळ जाणवत होतं. खरतर माझ्याकडे इतका चांगला मित्र आहे याची जाणीव तिला सुखावत होती. पण तो चे डोळे आज खुपच गहिर्‍या विचारात गुंतले होते.त्याला त्याचाच त्रास होत होता.
"आज जशी ही मला सोडुन चालली आहे तशीच कधीतरी कायमची जाणार आहे,पुन्हा कधीच न परतण्यासाठी, अन मी तिला नाही थांबवु शकणार..!! मी जे करणार आहे त्यामुळे..!! पण माझा स्वतावर विश्वास आहे.. ती जेव्हा माझ्या आयुष्यातुन जाईल तेव्हा मी तिच्या अगोदरच्या त्या दोन मित्रांसारखाच निघालो असं ती नक्कीच म्हणणार नाही. कारण मी तिचा true friend आहे. अन तिच्यासाठी माझ्या एकुलत्या एक मैत्रीणीसाठी मी काहीही करु शकतो.अगदी मनापासुन. तिच्या इतकच pure राहुन. पण कदाचित तिला हे सार कळण्यापलिकडे असेल..!" तिचं आजच जाणं अन तिच "तेव्हाच" जाण हेच जणु तो च्या डोळ्यासमोर तराळत होतं. अन त्याचमुळे त्याचं track change करण तो ला अवघड जात होतं.
अन ती ही त्याला सांभाळुन घेत "मी कायमची नाही चललिए.. परत येणार आहे रे.. नको एव्हढा senti होऊस रे.. " कुठतरी शुन्यात नजर लावत "माझा मित्र किती येडा आहे.. आतुन हळवा आहे..अन ते हळवपण किती बेमालुमपणे आपल्या रुक्षपणाच्या कातडी खाली लपवतोय..!! कसं होणार रे देवा याचं..!!" असाच विचार करत होती. कसबस स्वताला आवरत तो न तिचा निरोप घेतला. ती आज जाम खुष होती. तिच्या त्या एकमेवव्द्वितीय सख्याने , तिच्या कृष्णाने, तिच्या आयुष्यात किती छान मित्र दिले होते म्हणुन..!! अन सगळ्यांच्या सोबतीला एक शापित तारा जो सदैव देवाच्या अस्तित्वाला आपल्या खराब ATTITUDE अन POTENTIAL च्या जोरावर नेहमीच CHALLENGE करणारा..!! सारं कसं balanced होतं. एका बाजुला तिन मिळवलेले सगळे छान मित्र मैत्रीणी अन दुसर्‍या बाजुला तो..!! सगळ्यांपेक्षा वेगळा अन pure..!!
पुन्हा दोघांच routine सुरु झालं. त्या दिवसा नंतर तो ला आपल्या job च खुपच tension येऊ लागलं होतं. २.५ करोडचा project handle करणारा आज १० करोडचे 40 छोटे मोठे projects एकटाच पाहत होता. work load खुपच वाढला होता. अन त्यामुळेच तो खुप tension मधे असायचा. तो हे सर्वकाही तिला sms through कळवत होता,मुद्दामच ..!! तो आता job सोडण्याच्या गोष्टी करत होता. पण इतकं potential असणार्‍या आपल्या मित्राच हे वागण ती ला काही पटत नव्हतं. तिचा B.E. चा result लागल्या नंतर तर तो रोजच तिला "मी हा job सोडतोय.. कारण इथ मला मझ्यासाठी वेळच मिळत नाही, अन इथं राहुन तो मला कधीच मिळणार नाही" अस म्हणत आपल्या त्या गोष्टीच समर्थण करायचा. अन ती "दुसरा job मिळाल्याशिवाय हा सोडु नको " असच त्याला समजावयचा प्रयत्न करायची. पण तो मात्र "मी इथं किती uncomfortable आहे..!!" हेच तिला दाखवण्याचा प्रयत्न करत होता. या दरम्यान तिचा नोकरी मिळवण्याचा आटापिटा चलुच होता. तो ही मिळेल तिथुन ती साठी job openings ची माहिती काढुन तिला कळवत होता. पण म्हणावं तस काहीच घडत नव्हत. तो तिला धीर देत होता.यात तिला तोचा possessiveness ठळकपणे जाणवयचा. अन त्याच्या या अचानकपणे आलेल्या possessiveness मुळे हा आपल्या पासुन कायमचा दुर जाईल याची भिती तिला वाटायची. त्याच्या या possessiveness मुळे दोघांत खुप भांडण होऊ लागली होती. ती ला सतत हा मैत्रीची प्रत्येक limit cross करतोय असच वाटयचं. तो ला या सर्वाचीच जाणीव होती.. अन हे सगळ तो जाणुनबुजुन करत होता. एकदा अशाच त्याच्या बेबंद वागण्यामुळे दोघांनी ही आपली मैत्री थांबवण्याचा निर्यण घेतला होता. त्याच्या त्या extra attitude अन possessiveness मुळे ती न तो ला अगदी कडक शब्दात सुनावल होतं.
"don`t you think you are expecting more in our friendship..? कुठतरी तु चुकतोयस..!! मला हल्ली असं वाटायला लागलय की तु आपल्या मैत्रीकडुन जरा जास्त अपेक्षा ठेवतोय.तुला आपण भेटावं अस वाटतं.. पण मैत्री असायाला सारखं भेटणं गरजेच आहे हे मला नाही पटत. तुझ्या बोलण्यातला तो possessiveness मला आवडत नाही. मी तुला इथपर्यंतच समजुन घपर्यंतच, यापेक्षा जास्त नाही..!! you are not comfortable in our relationship. you are not stable..!! माझ्या मनात तुझ्याबद्दल असलेला respect कमी होईल अस वागु नकोस..!! plz i beg you my friend..!! मी म्हटल होतं मैत्री करण खुप सोप्पं असत रे पण ती निभावन खुप अवघड असतं रे..!!" तिच हे आतापर्यंतच सर्वात कटु बोलण होतं. त्याच्या काळजावर तर अक्षरशा घर्रे पडत होते. पण हे सर्व घडणं त्याला अपेक्षित असच होतं. पण तरीही तो आपल वागण काही बदलत होता. कारण तिची ती अभेद्य चौकट तोडल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हती. पण आज ती च ते बोलण तो ला खुपच लागल होतं. त्या बोलण्याचा तो ला खुपच त्रास होत होता,तो त्याला सहन होत नव्हतं. अन त्यामुळेच तो ने ती पासुन दुर रहण्याचा निर्यण घेतला होता. तो घेताना त्याला होत असलेला त्रास कदाचित ती ला जाणवतही नव्हता की की तो दाखवत नव्हती, हेच त्याला कळत नव्ह्तं. अन ती ही त्याच्या निर्णयावर काहीच आक्षेप घेत नव्हती.

क्रमश :

गुलमोहर: 

थिक... पन वाचाय्ला अव्घद!! पुधचा भाग शुदह मराथित टाय्पा म्हन्जे वाचाय्ला सोप जाइल... Sad

ठिक... पण वाचायला अवघड!! पुढचा भाग शुद्ध मराठीत टायपा म्हणजे वाचायला सोपं जाईल.... Happy

थिक... पन वाचाय्ला अव्घद!! पुधचा भाग शुदह मराथित टाय्पा म्हन्जे वाचाय्ला सोप जाइल... >>हरकत नाही.
लेख खरच छान आहे.

महेश मला ही तुमचीच म्हणजे तुमच्या स्वत: च्या आयुष्यातली गोष्ट वाटते आहे.....;) ........माहीत नाही का मला असे वाटते ते?..... खरे आहे ना?.....

T.E. त आला campus placement च्ने वारे clg मधे वाहु लागले..
-----------------------------------------------------
कँपस प्लेसमेंट टी ई त होते का बी ई त??

महेश, कथा मी पूर्णं वाचूच शकले नाही. शुद्ध मराठीत लिहा वगैरे माझं मागणं नाही...
पण जे लिहाल ते वाचता येईल असं तरी?
तुमच्या प्रतिक्रियांवरून तुम्हाला सरळ वाचता येण्यासारखं लिहिता येतय हे दिसतय. मग मनापासून लिहिलेल्या मूळ कथेच्या बाबतीत नक्की काय झालय?
वेळ नाही?
लिहून अप्रकाशित अवस्थेत लिखाण ठेवण्याची सोय आहे इथे. बरहा सारखं (baraha - it is free) सॉफ्ट्वेअर वापरून तुम्ही सावकाश लिहून मग एकसंध इथे पेस्ट करू शकता.
"ती"ची कथा लिहायला वेळ नसल्याबद्दल क्षमा मागताय... ती करते. पण "तो" च्या ह्या कथेचं काय? कृपया वेळ काढून तिला सरळ करा... वाचता येण्याजोगी करा.
तुमच्या स्वतःच्या कलाकृतीबद्दल तुम्हीच इतके "उदास" राहिलात तर वाचणार्‍यांनी त्याला किती आणि कसं सिरिअसली घ्यायचं?
माफ करा. तुम्हाला दुखवण्याचा उद्देश नाही पण तुम्ही लिहिलेलं कुणी वाचावं अशी इच्छा असल्यास... तरच... तुम्ही हे कराल असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
तुमच्या पुढल्याच काय पण ह्या लेखनासाठीही शुभेच्छा!

daad pudhachaa bhaag lavakarach prakashit kartoy tehi shudh marathit..
dilelyaa pratikriyechaa kuthalach anaadar karnyaachaa hetu navhtaa..
baryaach lokanaa vatal asel tas..
pan mi pudhacha bhaag agadi shudh marathit lavakarach prakashit kartoy..

kay aahe kathechaa shevat kaay asaavaa yababat jara sandigd hoto..
pan aataa shevat milalay..

punshch...
ushiraabaddal kshamasva... manaapaasun...

अरेच्चा मला ही इथं काहीच नाही दिसत..!! ओह admin वाले जरा मदत करा राव आम्हाला..!!
आमची गोष्ट दिसत नाही ये राव इथं..!!

..हो मलाही.......

अरेच्चा मला ही इथं काहीच नाही दिसत..!! ओह admin वाले जरा मदत करा राव आम्हाला..!!
आमची गोष्ट दिसत नाही ये राव इथं..!!

..हो मलाही.......

महेश
तुम्हाला तुमच्या प्रोफाईल मध्ये गेल्यावर पाऊलखुणा >> लेखन इथे ही कथा दिसतेय का? तिथे संपादन हा टॅब असेल तिथे जा. तिथे कथेच्या सुरुवातीला १ ओळ मोकळी सोडा. कधी कधी पॅरा न पाडल्याने पण असे होते. ते करून मग परत प्रकाशित करा अणि पहा दिसतेय का कथा ते.