मुलुंडकरांच्या मनातली भावना (मोनाच्या सहकार्याने)

Submitted by यशवर्धन on 1 February, 2008 - 02:13

अनेक दिवस मुलंडवर वर्दळ कमी झालीये. अनेकदा गोड बोलून विनंती करुन, प्रसंगी ओरडून सुध्दा अगदी तुरळक लोकं नजरेस पडतात. ह्याची कारणं काय असतील बरं??????

कदाचित खालील मंडळी असे तर विचार करण्यात गुंतली नसतील ना की ज्यामुळे इथे येणे त्यांना जमत नसेल????

कृ: छ्या, हिला काय जातंय इकडे या सांगायला??? किल्ल्याचं रक्षण करणं म्हणजे काय चहा बनवण्यासारखं सोप नाहीये.

भ्रमा: आधीच पाय मोडून बसलोय आता इकडे यायचं म्हणजे किबोर्ड बडवून हात पण मोडून घेउ की काय माझा????

नंदिनी: माझ्यामागे आधीच भरपूर कामं पडलियेत. बॉस पण नेमका दांड्या मारत असतो. आता रोज रोज नवीन बकरा शोधायचा म्हणजे वेळ जाणारच ना? तो रणबीर झाला आता जुना. आता कोणाला बरं पकडू???

स्वा: गेले कांताच्या घरी, म्हटली सूर्यासवे गाणी, कांता ऐकेचना, कांता सोडीचना, म्हणूनी मला माबोवर यायला जमेना आ आ आ आSSSS

मंजू: आयला आता कुठे नवीन नवीन कथांचा रतीब घालायला सुरुवात केलीये तर म्हणे इकडे या. जाऊदे मी बाई आपली माझ्या कथाच पूर्ण करते कश्या.

इंद्रा: जल्ला, एकतर गड चढून चढून तंगड्या दुख़ायला लागया त्यातऊन घरी आलं की सगळी घरातली कामं करावी लागतात. आणि म्हणे इकडे या.

योगी: अरे मी केवढा बिजी आहे माहितीये का? केवढ्या कोंबड्या पकड्यायच्या आहेत मला. मला अजिब्बात जमणार नाही इकडे यायला.

यश्: गड काय किंवा मुलुंड काय सगळीकडे चहा कॉफीची मलाच व्यवस्था करावी लागते. ही मोना पण आयत्या वेळेला टांग देते. असूदे म्हणा मला माझ्या बायकोला रोज चहा करुन द्यायची सवय होईल हे ही नसे थोडके.

नीलू: हू हू हूSSSS काय थंडी पडलीये. ह्यांना येववतं तरी कसं इकडे. जाऊदे मी आपली मस्त गोधडीत शिरून गप गुमान झोपूनच जाते कशी

शैलू: ही सगळी लोकं ना बंगळुरुतल्या लोकांप्रमाणे आळशी झालीयेत. एखादा पानंच लिहून टाकते यांच्यावर म्हणजे ते वाचण्याच्या निमित्तने तरी येतील इकडे.

झकास्: छे काहीच काम नाहीये आज, एखादी छानशी कविता करुया माझा ससुला माझा सोनुला......

मी स्वत्: : च्यायला एवढं लिहून सुध्धा कोणी वाचायला आलं नाही, जाऊदे मी आपली डॉसातच जाते कशी
------------

(हे सुचण्याची प्रेरणा: गडावरील एक आदरणीय व्यक्ति श्रीयुत अ. आ. यांचा गडावरील हुतात्मा दिन हे लिखाण. )

गुलमोहर: 

मोना, मस्तच :):)

धन्यवाद. मुलुंडकर

अगदी सगळ्यांच्या मनातले टिपलय की! छान!! :):)

मी आणि कविता. शक्यच नाही... Happy
बाकी सगळ्यांच्या मनातील भावना टिपल्या आहे छान.

हो हो मोना.. माझ्या मनातल तर एकदम पर्फेक्ट Lol
तुला १०० पैकी १०० गुण आणि एक कॅडबरी पण बक्षीस :)))
आणि यशा एवढे काम केल्याबद्द्ल तुला पण कॅडबरी बक्षीस :))

नीलुताय कॅडबरी बद्दल धन्यवाद