भारतातील इंटरनेट कनेक्शन - काही प्रश्न

Submitted by mansmi18 on 4 October, 2009 - 19:38

नमस्कार,

भारतातील इंटरनेट कनेक्शन बद्दल काही प्रश्न..(गूगल करुन पाहिले पण जी माहिती मिळाली त्याने नीट कळले नाही).

१.केबल इंटरनेट पुण्यात उपलब्ध आहे का? असल्यास त्याचे चार्जेस किती आहेत?
२.(ते फक्त काही भागात उपलब्ध आहे काहीत नाही असे असते का?)

३.कृपया ही साईट पहा
http://www.rcom.co.in/Communications/rcom/broadband/broadband_con_postpa...
त्यावरील प्लॅन मला नीट कळले नाहीत.
हे डाउनलोड लिमिट किंवा डेटा ट्रान्स्फर प्लॅन पर एम बी हे काय असते?
(इंटरनेट वर चित्रपट स्ट्रीमींग मधे पाहिले तर ते डाउनलोड मधे मोडतात का?)
आणि किती डाउनलोड केले याचा ट्रॅक कसा ठेवणार/ठेवतात?
नॉर्मली लोक कुठला प्लॅन घेतात(घ्यावा)?

४.जर घरुन काम करत असाल तर ब्रॉडबँड्चा स्पीड पुरेसा असतो का (वीपीएन थ्रु कनेक्ट करायला)?

५.इथे केबलविजन ची जी सर्विस आहे त्यात $४९.९५ फ्लॅट फी असते.या प्लॅनचा समांतर एखादे तिथे आहे का?

धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केबल इंटरनेट पुण्यात उपलब्ध आहे का? असल्यास त्याचे चार्जेस किती आहेत -
होय्..पुण्यात BSNL , TATA, AIRTEL आणी ईतरही बरेच केबल इंटरनेट आहेत..
त्यान्चीच wi-fi करुन देण्याची सोयहि आहे.
याचे वेगवेगळे प्लान्स आहेत..unlimited usage साठी साधारण महिना ८०० - १००० रु चे प्लान आहेत..

२.(ते फक्त काही भागात उपलब्ध आहे काहीत नाही असे असते का?)
यान्चे काहि boxes असतात त्यांची पर box २० वगैरे ची limits असतात्..त्यामुळे काहि वेळा तुमच्या भागात उपलब्ध नाहि असे सांगतात ..पण साधारण पणे सर्व मोठ्या भागात हा प्रशन येणार नाहि..

३) (इंटरनेट वर चित्रपट स्ट्रीमींग मधे पाहिले तर ते डाउनलोड मधे मोडतात का?)हो..
किती डाउनलोड केले याचा ट्रॅक कसा ठेवणार/ठेवतात? - ते माहित नाहि..पण यात साधे गुगल उघडले तरि डाउनलोड काउंट होते..
नॉर्मली लोक कुठला प्लॅन घेतात(घ्यावा)? घरुन काम करणार असाल तर unlimited usage मस्त आहे...
साधारण महिना ८०० - १०००

३) जर घरुन काम करत असाल तर ब्रॉडबँड्चा स्पीड पुरेसा असतो का (वीपीएन थ्रु कनेक्ट करायला)?

हो..मी रोज वीपीएन थ्रु oracle काम करते..

४) इथे केबलविजन ची जी सर्विस आहे त्यात $४९.९५ फ्लॅट फी असते.या प्लॅनचा समांतर एखादे तिथे आहे का? - बहुदा unlimited usage असावा..

BSNL चं ब्रॉडबॅन्ड उत्तम आहे. सर्व्हिस सुरू व्हायला फारसा वेळ लागत नाही. ३-४ दिवसात सगळं सेटप होऊ शकतं. तुम्ही जिथे रहाणार तिथला लॅन्डलाइन घेतानाच/ अ‍ॅक्टिव्हेट करतानाच हे ही घेऊन टाका. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ते लोक खरंच व्यवस्थित देतील.

मी रिलायंस ३G (वायरलेस ब्रॉडबँड) व BSNL च्या ३जी यांच्यात कशाची निवड करू?
मला वायरलेस ब्रॉडबँडच हवे आहे. सध्या ३G स्पेक्ट्रम बद्दल ज्या हालचाली सुरू आहेत, त्यानुसार भारतात जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत खाजगी मोबाईल कंपन्यांना पण ३G सेवा पुरवता येवू शकते असे चित्र आहे.
मग तोपर्यंत थांबावे (कारण तोपर्यंत ३G स्वस्त होईल व सहज उपलब्ध असेल असे ऐकिवात आहे) का वरील पैकी (रिलायंस ३G किंवा BSNL )सेवेचा लाभ घ्यावा?

आत्ताच्या या वायरलेस सेवा व ३G आल्यानंतरच्या सेवा-सुविधा यात फरक असेल काय?

भारतात (इंटरनेट वर चित्रपट स्ट्रीमींग मधे पाहिले तर ते डाउनलोड मधे मोडतात का?)------

भारतात घरच्या इंटर्नेट कनेक्शन वर चित्रपट पहायला तो चित्रपट बनवयला लागला त्यपेक्षा जास्त वेळ लागेल...

>>भारतात घरच्या इंटर्नेट कनेक्शन वर चित्रपट पहायला तो चित्रपट बनवयला लागला त्यपेक्षा जास्त वेळ लागेल...>> Lol