मायबोलीवरचे वेगवेगळ्या विषयाचे ग्रूप, बातमी फलक अथवा चर्चा एकत्र कुठे बघायला मिळतील?

Submitted by मदत_समिती on 24 September, 2009 - 12:20

मायबोलीवर हितगुज विभागात वेगवेगळ्या विषयावर ग्रूप, बातमी फलक, बुलेटीन बोर्ड आहेत. ते बघण्यासाठी प्रत्येक पानाच्या डोक्यावर निळ्या रंगात 'हितगुज' टॅब आहे त्याचा वापर करावा. हितगुजवर टिचकी मारल्यावर 'माझ्या गावात' या टॅबचा वापर करून वेगवेगळ्या गावांच्या गप्पांची पाने बघता येतील. तसच 'हितगुज-विषयानुसार' या टॅबचा वापर करून सगळे ग्रूप, त्यातील बातमी फलकांचे धागे एकत्रित बघता येतील. काही ग्रूप मधील काही धागे फक्त सदस्यांसाठीच असतात ते त्या ग्रूपचे सदस्यत्व घेतल्याशिवाय इतरांना दिसणार नाहीत.

मी मध्यंतरी माझा आयडी 'दीपा माने ' हा बदलून 'निशदीप' हा घेतला पण त्यामुळे की काय माझे साठवलेले 'निवडक १०' गायब झालेत ते मला नव्या 'निशदीप' आयडीवर परत मिळू शकतील काय? कृपया मदत करा.
ताक: सघ्याचे 'निवडक१०' मी नवीनच नव्या आयडीवर घातलेले आहेत.

'संयुक्ता बखर' ग्रूप कुठे हरवला? माझ्या ग्रूपच्या लिस्ट्मधून तो ग्रूप गायब झालाय. Sad
प्लीज डिलीट-बिलीट करू नका त्या ग्रूपला... मायबोलीशी माझं नातं घट्ट बनवणारा फार महत्वाचा वाटा या ग्रूपचा होता.

संयुक्ता बखर हा ग्रूप बॅककप घेऊन तात्पुरता डिलीट करावा लागला आहे. आमच्या नाईलाजाने हे थोडे आणिबाणीसारखे तातडीने करावे लागले.

मायबोलीच्या उर्ध्वश्रेणीकरणाचे (अपग्रेड) काम सुरु आहे. पहिल्या चाचणीत असे दिसले की सॉफ्टवेअर मधल्या एका त्रुटीमुळे संयुक्ता बखरीमधले अनेक धागे अचानक सार्वजनिक होत आहेत. चाचणीचे काम सुरु असताना , आणि मायबोली प्रशासनाबाहेरील सभासद या चाचणीत भाग घेणार असल्याने ते धागे ठेवणे धोक्याचे होते,

संयुक्ता बखर झाल्यापासून त्यातले अनेक धागे लेखिकांनी स्वतःच संपादित करून त्यातला मजकूरही काढला आहे.
ज्या पानांवर सार्वजनिक च्रर्चा होऊ शकते असे संयुक्तामधले धागे २ वर्षांपूर्वीच संयुक्ता या सगळ्यांसाठी उघडलेल्या ग्रूपमधे आहेत.

फक्त याच नव्हे तर पुढच्या प्रत्येक अपग्रेडला हा धोका पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या लेखिकांना त्यांचे धागे ओपन संयुक्ता ग्रूपमधे असण्याची हरकत नाही ते धागे ( इतरांच्या प्रतिक्रिया काढून) लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू.

फक्त याच नव्हे तर पुढच्या प्रत्येक अपग्रेडला हा धोका पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या लेखिकांना त्यांचे धागे ओपन संयुक्ता ग्रूपमधे असण्याची हरकत नाही ते धागे ( इतरांच्या प्रतिक्रिया काढून) लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू.

>>>> अ‍ॅडमिन, with all due respect, आतापर्यंत मायबोलीचं अनेकवेळा अपग्रेडेशन झालं असेलच त्यावेळी हा प्रॉब्लेम आला नव्हता का? आताच का येऊ लागला?

आणि संयुक्तातील धागे सार्वजनिक करण्याबद्दल संयुक्तात अत्यंत विस्तृत चर्चा झालेली आहे. त्यानंतरही तुम्ही संयुक्तातील धागे सार्वजनिक करण्याचा विचार करत आहात हे वाचून सखेद आश्चर्य वाटले.

जे विषय संयुक्तात मांडले गेले होते, त्या विषयांवर मायबोलीवर वेगळे धागे काढता येऊ शकतातच की. पण तरीही संयुक्तातीलच धागे सार्वजनिक करण्याचा आग्रह का आहे?

बॅकअप घेतलाय ना? हुश्श...
काल रात्रभर फार वाईट वाटत राहिले की संयुक्ता आता रेफरंसलाही नसणार... तुमचा प्रतिसाद पाहून खूप बरं वाटलं... थॅंक्यु! Happy

आता घेतलेला बॅकअप नव्या अपग्रेडेड सिस्टीममध्ये उशिराने का होईना, मर्ज करता येईल ना? कारण संयुक्तामध्ये बर्‍याचदा मूळ धाग्यांच्या मजकूराहून जास्त त्यावरच्या प्रतिक्रिया/चर्चाच लक्षणीय असायच्या.. त्यातच त्या ग्रूपची खरी ओळख - 'सक्षम आधारगट असणे', टिकून होती, आहे.

तेव्हा कृपया, माबोचं अपग्रेड पूर्ण झाल्यावर तो बॅकअप रिस्टोअर करणार का?
धन्यवाद. Happy

विषय संयुक्तात मांडले गेले होते, त्या विषयांवर मायबोलीवर वेगळे धागे काढता येऊ शकतातच की. पण तरीही संयुक्तातीलच धागे सार्वजनिक करण्याचा आग्रह का आहे?>>>> + १

धारा, +1 अगेन
अगदीच शक्य नसेल तर गुगल ड्राईव्ह वगैरेवर ते बीबी ठेऊन त्याची लिंक फक्त संयुक्तांना देता येईल. असे काही करता येईल का? अशी काही सोय झाली तर मग पुढेही अपग्रेडेशन करताना अडचण येणाार नाही, मायबोलीवरचा ताणही कमी होईल. तज्ज्ञांनी अजून काही सुचवावे. पण तिथल्या अनेक बीबींवरील चर्चा खरच जपली जावी असे मनापासून वाटते.
धन्यवाद __/\__

डिलिट करु नका त्या ग्रुपला..मायबोलीशी नातं घट्ट बनवणारा या ग्रूपचा वाटा फार महत्त्वाचा होता.... +१

अवलताई... गुगल ड्राईव्ह...+१

मामी,

>>>आतापर्यंत मायबोलीचं अनेकवेळा अपग्रेडेशन झालं असेलच त्यावेळी हा प्रॉब्लेम आला नव्हता का? आताच का येऊ लागला?
शेवटचं major upgrade आपण २००९ मध्ये केलं होतं. http://www.maayboli.com/node/9740. त्यामुळे हा प्रश्न मध्ये पडण्याची शक्यता नव्हती.

>>आणि संयुक्तातील धागे सार्वजनिक करण्याबद्दल संयुक्तात अत्यंत विस्तृत चर्चा झालेली आहे. त्यानंतरही तुम्ही संयुक्तातील धागे सार्वजनिक करण्याचा विचार करत आहात हे वाचून सखेद आश्चर्य वाटले.
मला वाटतं वर वेबमास्तरांनी पुरेसं स्पष्ट लिहिलं आहे. पुन्हा देतो "फक्त याच नव्हे तर पुढच्या प्रत्येक अपग्रेडला हा धोका पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या लेखिकांना त्यांचे धागे ओपन संयुक्ता ग्रूपमधे असण्याची हरकत नाही ते धागे ( इतरांच्या प्रतिक्रिया काढून) लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू."

@मामी
मायबोली ड्रूपल या प्रणालीवर आधारीत आहे. यापूर्वी ड्रूपलच्या डेवलपमेंट मधे आपण भाग घेतला आहे. त्यामुळे ४.५->५; ५->६ या सगळ्या अपग्रेडच्या वेळेस आलेल्या अडचणी ड्रूपलच्या टीमला सांगून आपण दुरुस्त करून घेतल्या आणि आपणही काही दुरस्त केल्या त्याचा जगातल्या सगळ्यां ड्रूपलवर आधारीत वेबसाईटना फायदा झाला.
मायबोलीच्या आकारामुळे आपण जितके टोकाला जाऊन चाचणी घेऊ तितके सगळ्या वेबसाईटना जमेलच असे नाही,

गेल्या काही वर्षात ६-७.१ आणि ७.१-७.२ यात खूप काही बदल झालेत हे बदल गेले २-३ वर्षे चालू आहेत. आपण या वेळेस ड्रूपलच्या डेवलपमेंट/टेस्टींगमधे भाग घेऊ शकलो नाही त्यामुळे आपल्याला आलेल्या सगळ्याच अडचणींवर उपाय शोधले गेले नाहीत. अजूनही या अपग्रेडशी संबंधीत ४९ त्रुटीवर अजून उपाय सापडले नाहीत.
हे पहा
https://www.drupal.org/project/issues/og?text=Og+upgrade&status=Open&pri...

विशेष करून हे पहा. हा प्रॉब्लेम असलेली मायबोली एकटीच वेबसाईट नाही. धागे गोपनीय ठेवणार्‍या इतरही काही वेबसाईटना हा प्रश्न आला आहे आणि पुन्हाही येऊ शकतो.
https://www.drupal.org/node/2049755

Pages