सौदा

Submitted by tilakshree on 21 January, 2008 - 15:29

मुंबई या महानगरीला लक्ष्मीचे वरदान आहे; आणि अलक्ष्मीचा शापही!!! देशाच्या कानाकोपर्‍यातून माणसं इथे येतात आणि इथे कुणाची निराशा क्वचितंच होत असेल. बौध्दिक, शारिरिक कष्ट करणार्‍यांना इथे बर्‍यापैकी पैसे मिळतात. गैरमार्गाने काळा पैसा मिळवणार्‍यांचीही इथे चंगळ आहे.
इथे रेल्वेच्या डब्यातून जाता येता लाखोंचे व्यवहार होतात. कुठेतरी फूटपाथवर भेटूनही लाखोंची देव-घेव होते. मुंबईकर माणसांमधे पैसा मिळवण्या; आणि खर्च करण्याबाबंतंही एक सजगता आढळते. मुंबईकर खुल्या दिलाने पैसा खर्च करतात; तसंच पैसा मिळवण्याची एकही संधी गमावंत नाहीत. पैसा कमवण्याच्या आणि गमवण्याच्या अनेक संधी या महानगरांत उपलब्ध आहेत. या संधी गमावणारा कुणी विरळांच! अशाच एका अस्सल व्यापारी वृत्तीचा हा एक आदर्श किस्सा...
वाशीच्या सेक्टर १७ या उच्चभ्रू परिसरांतल्या एका उंची हॉटेलमधे तीन मित्र मद्याचे घोट घेत होते. तिघेही व्यापारी असावेत. एकूण पेहेरावावरून चांगले गब्बर पैसावाले असावेत असा अंदाज करता येत होता. तरीही आपला व्यवसाय कसा नुकसानीत सुरु आहे हेंच प्रत्येक जण एकमेकांना चढाओढीनं सांगत होता. चर्चेच्या प्राथमिक फेरीत एकमेकांच्या कुटुंबियांच्या वगैरे चौकशा झाल्यावर पुढची सगळी चर्चा केवळ रोडावणार्‍या व्यवसायाभोवतीच फिरंत होती. जसजसां मद्याचा अंमल वाढत होता; तसतसा चर्चेत रंग भरंत होता. आवाज वाढत होता. आपलांच व्यवसाय कसा अधिक घाट्यांत आहे; हे सांगण्याची ईरी- शिरी वाढंत होती. अ़खेर त्यातल्यां एकानं सांगितलं; " मै तो अब इतना परेशान हो चुका हूं ; की मलबार हिल वाला मकान बेचने का सोच रहा हूं!"
"क्या बात कर रहे हो? सही में बेचना हैं?" दुसर्‍याने उत्सुक स्वरात विचारलं.
"हां भाई; अब कोई चारा ही नहीं दिखाई देता। वो मकान बेच दूं तो कुछ पैसा हाथ में रहेगा। वरना हालात बडे मुश्कील होते जा रहे हैं।" पहिला काहीशा त्रासिक स्वरात बोलला. मात्र यावेळी दुसर्‍याच्या चेहर्‍यावर एक उत्सुक चमक उमटून गेली. त्याने ती लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही ती स्पष्टपणे दिसून गेली. मात्र आपल्या मित्राला आर्थिक अडचणींनी ग्रासल्यमुळे नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला आहे; याबाबत पुरेपुर सहानुभूती व्यक्त करण्याचा त्याचा प्रयत्न होता. आपला आवाज शक्य तेवढा मृदू ठेवत तो म्हणाला; "भाई अगर सही में बेचना हैं; और इससे तुम्हारा कारोबार सम्हाला जा सकता हैं तो बोल दो कितने में बेचना हैं वो मकान!"
"क्यों; कोई हैं लेनेवाला?"
"अरे भाई मैं खुद खरीदता हूं। इसी वास्ते तुम्हारा काम भी बन जायेगा। और वो मकान मेरा हैं या तुम्हारा; एक ही बात हैं! मकान भी अपने में ही रहेगा।" आपण त्याचे घर घेवून मोठे उपकार करत आहोत; मित्रप्रेम, मित्रकर्तव्य निभावत आहोत हे पटवण्याचा त्याचा प्रयत्न सुरु होता! तोही जीभेवर साखर पेरून!!! त्याच्या या प्रयत्नांना पहिल्याकडून अपेक्षित प्रतिसादही मिळत असल्याचं दिसून येत होतं. त्याने एकदम भारावल्या स्वरात विचारलं;"सही में ले रहा हैं क्या तुम भाई? अगर तू ले रहा है तो उसमें भाव क्या करनेका! तुम्हे तो सब मालूम हैं। वैसे मैं आराम से बेचूं तो उसका सव्वा दो करोड तो आराम से मिलेगा। लेकीन तू ले रहा है, तो बन गई बात! एक अस्सी दे दे और मकान अपने नाम करवा ले।" आपला दोस्त दोस्ती निभावतोय अशी त्याची समजूत झाल्याचं त्याच्या बोलण्यातून दिसून येत होतं. तो मनापासून बोलत होता. त्याच्या बोलण्यात खूप भावनिक ओलावा होता. त्याचं मन भरून आलं होतं. तो खरंच मित्राच्या प्रेमानं भावनाविवश झाला होता की त्याला आर्थिक संकटातून बाहेर पडायला वाट दिसली म्हणून; हे त्याचं त्यालांच माहित!!! पण त्याच्या नजरेतून आसवं गळू पहात होती आणि तो पापण्यांचा बांध घालून ती थोपवू पहात होता. पण दुसरा पक्का व्यापारी! आवाजातला ओलावा आणि मित्रावर उपकार करत असल्याचा अप्रत्यक्ष पण थेट जाणवणारा सूर कायम ठेवून तो म्हणाला; "भाई मेरा क्या हाल हैं ये तो मैने अभी बता ही दिया हैं। ये सौदा करना मेरे लिए भी कोई आसान बात नही हैं। लेकीन इस से तुम्हारा काम भी बन जाएगा और प्रॉपर्टी भी अपनो में रहेगी इस लिए मैं ये बोला। लेकीन एक अस्सी तो मेरे लिये अभी मुमकीन नही है। अगर डेड में होता हैं तो देखो! वैसे भी अपने में सौदा कैसा? मकान के कागज पर मेरा नाम रहे या तुम्हारा! क्या फर्क पडता है? सिर्फ तुम्हारा प्रॉब्लेम निपटाने के लिये ये अपना लेन देन....." त्यानं पटवायचा प्रयत्न केला.
"भाई अगर डेड में सौदा करू तो मेरे हाथ कुछ भी नही बचता। मेरा प्रॉब्लेम है; कर कें मै ये मकान बेच रहा हूं। वरना अपनों में सौदा कैसा?" पहिला अजीजीने म्हणाला.
"तो तुम क्यां बोलते हो? तुम्हारा प्रॉब्लेम कितने मे सॉल्व्ह हो जाएगा?" दुसर्‍यानं आपली उपकाराची भावना दाखवणं चालू ठेवत; पण साळसूद आव आणंत विचारलं.
"अगर एक सत्तर मिलेगा तो मेरे हाथ में कुछ तो रहेगा भाई।" पहिला बोलला.
'देखो; मेरी भी छोडो और तुम्हारी भी... एक पच्पन मे सौदा पक्का कर दो..." दुसर्‍यानं सुचवलं. अखेर हो- ना करंत करंत सौदा एक करोड साठ लाखावर पक्का झाला. या निर्णयाचं सेलिब्रेशन म्हणून चिकन लॉलिपॉप बरोबर एक एक वाढीव पेग रिचवला गेला. मंडळी खुशीत बाहेर पडली. चकचकीत पितळी डब्यांचा संसार भल्या मोठ्या पितळी ताटात मांडून बसलेल्या पानवाल्या भैय्याकडे मोर्चा वळला. कुणाची बनारस एकशे वीस तीनशेची ऑर्डर; तर कुणाची कलकत्ता फूलचंदची... !!!
पानाचे तोबरे भरून झाल्यावर दुसरा त्याच्या गाडीकडे गेला. त्याने सीटवर असलेली ब्रीफकेस उघडून हजारच्या नोटांची काही बंडल काढून पहिल्याच्या हातावर टेकवली... "भाई ये ऍडव्हान्स"।
"अरे तुम ने बोला तो सौदा पक्का हो गया। इसकी क्या जरूरंत थी...?" अशी उगाचंच औपचारिकता दाखवंत त्याने नोटा खिशात ढकलल्या. तो आपल्या गाडीकडे वळला आणि आपलं 'लेटर-हेड' काढलं आणि त्याला तिकीटं चिकटवून इसार पावती ही तयार करून दिली. दुसर्‍यानेही तशीच औपचारिकता दाखवंत ती खिशात सरकवली. हातात हात मिळवून सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. पहिला गाडींत बसून निघून गेला. दुसरा आणि तिसरा बरोबर होते. पहिला गेल्यावर दुसरा तिसर्‍याकडे बघत हसून म्हणाला; "इस मकान के लिए मेरे पास कस्टमर रेडी है। एक पछत्तर तो पक्का देगा।" आत्तापर्यंत गप्प असलेल्या तिसर्‍याने विचारलं;" उस पार्टी से बात कब करोगे?" "कल सुबह बात करता हूं।" दुसरा उत्तरला.
" बात कर लेना; मगर कुछ फिक्स मत करना।" तिसरा म्हणाला.
"क्यूं भाई?"
तिसर्‍याला कंठ फुटलेला बघून चकीत झालेल्या दुसर्‍याने प्रश्न केला. तिसरा म्हणाला;
"अपने पास भी एक पार्टी हैं। दो करोड भी दे सकती है। उनसे बात कर लेता हूं। अगर बात बन गयी तो उपर का माल बाट लेंगे। सिक्स्टी- फॉर्टी!!!
दोघंही गाडीत बसून झोकदार वळण घेऊन रस्त्याला लागले...!

गुलमोहर: 

मुंबईच्या नसानसात भिनलेल्या व्यापारी मनोवृतीचे दर्शन घडतय यातुन... खरय.. मुंबईत जागोजागी आपल्याला अशी उदाहरणे पहायला
मिळतात...
तुमची लिहिण्याची पध्दत छान आहे... लगे रहो..:)

Kharach katha changli ahe. Ya kathemule asa sidha hote ki maitri madhe sudha profit pahanari practical manasa ahet.