Submitted by पनू on 10 September, 2009 - 07:51
आठवणी शाप असतात की वरदान कळत नाही.
पण जेव्हा तुझी आठवण येते........
वाटतं आठवणी म्हणजे वठलेल्या, वयोवृद्ध पिंपळावरचं एकुलतं एक, हिरवं, झाडाच्या शेंड्यावर उभं असलेलं सदाच हिरवं कंच रहाणारं पान.
रोजच्या छोट्या, छोट्या घटनांचही हलकसं वारं, श्वासांचे अविरत झोत यांनी फडफडून लुसलूसणारं, आपल्या इवल्याशा अस्तित्वाची जाणीव करून देणारं, हिरवं चुटूक पिंपळपान म्हणजे आठवण.
खरं तर त्या अवढव्य झाडामध्ये आता जगण्याचं त्राण उरलेलं नसतचं. एकुणएक काडी मोजून घावी इतकं खुडूक झालेलं ते झाड. पण शेन्ड्यावर सळसळणार्या त्या एकाच पानाकडे पाहून ते झाड तोडायला कोणाचा जीवच धजत नाही.
असं एक गोंडस, निरागस पान म्हणजे तुझी आठवण.

गुलमोहर:
शेअर करा
लगे रहो.
लगे रहो.
क्या बात है! आठवणीचं इतकं
क्या बात है! आठवणीचं इतकं आशादायी चित्रं... अन तेही इतक्या कमी शब्दांत. सुंदर, पनूजी!
लिहा... अजून लिहा... वाचायला आवडेल.
धन्स विप्रा, दाद. तुमचे
धन्स विप्रा, दाद. तुमचे मनापासून आभार.
आज खरोखर अर्ध्या हळकूंडाने पिवळे झाल्यासारखे वाटते आहे.
जबरदस्त पनु.. खूप आवडलं...
जबरदस्त पनु.. खूप आवडलं...
क्या बात है... हेच शब्द तोंडी
क्या बात है... हेच शब्द तोंडी आले. अगदी दाद यांच्यासारखंच म्हणतोय.
क्या बात है पनू!!!
क्या बात है पनू!!!
वाह! सुंदर..
वाह! सुंदर..
पनु मस्त लिहितेस गं ( हे
पनु मस्त लिहितेस गं ( हे मनापासुन बरं का) . आवड्लं
पनू, वाह! छान लिहिलंय अगदी..
पनू,
हे चित्र पण तुम्हीच काढलंय काय?
वाह! छान लिहिलंय अगदी.. आवडलं..
लिहायचं बंद केलंय का आता?
सर्वांना धन्यवाद. लिहिणं चालू
सर्वांना धन्यवाद.
लिहिणं चालू आहे. पोस्ट्णं होत नाहीय. आता एकदा निवांत वेळ काढेन.
पने,छान लिहिलयस
पने,छान लिहिलयस
पने छान लिहिलय्स , ही पनी
पने छान लिहिलय्स , ही पनी गेली कुठे पण ?