Submitted by अमितव on 9 April, 2026 - 12:33
'डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!' धाग्याचे २००० प्रतिसाद झाले म्हणून नवा धागा.
पहिल्या धाग्याची लिंक : https://www.maayboli.com/node/86200
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
इलॉन मस्क ओल्ड ट्विट डिलीट
इलॉन मस्क ओल्ड ट्विट डिलीट करत सुटला आहे .
शेंडे कसे आहेत ?
शेंडे कसे आहेत ?
७६ वर्षांने दिसणार..
७६ वर्षांने दिसणार..
Dems want to put brakes on
Dems want to put brakes on Advanced AI and put tigher controls. Will this really benefit USA or it will just help China / India (if at all India is in the race of AI) more. I am asking my genuine doubts. Nothing political.
Musk already tweeted about this as brave new world.
>>>>>Dems want to put brakes
>>>>>Dems want to put brakes on Advanced AI and put tigher controls.
गार्डरेल्स हवेच आहेत. ए आइ मुळे सगळे कॉर्पोरेट वर्ल्ड 'हेडलेस चिकन' झालेले आहे. जो तो ए आय एआय करत सुटलाय. गार्डरेल्स, सुरक्षितता याबदाल काय? ते स्टँडर्डस निर्माण होणे आवश्यक आहेत.
करु देत चायनाला ए आय - गिनी पिग्ज!
त्यांच्या चूकांमुळे आपल्याला शिकता येइल.
जे.डी. वान्सचा घरचा आहेर . इ
जे.डी. वान्सचा घरचा आहेर . "इराण युद्ध चालू ठेवणे हेच नडले. आणि इराणने होर्मूझ खाडी बंद केली. तेल बंद. महागाई वाढली. होर्मूझ काही मोकळी करता आलीच नाही. ज्यांनी '२४ च्या निवडणुकीत पाठिंबा दिला तेच फिरले."
[ वोट चोरी वगैरे न बोलता सरळ परीक्षणच मांडले हे राहूलबाबा कधी शिकणार?]
Vance is as dangerous if not
Vance is as dangerous if not more!
"Was the war worth losing senate for next six years" म्हणाला.
त्याच्या मनात वॉरची हायेस्ट कॉस्ट ती आहे!
आपले ट्रूप्स मेले, महिनोन्महिने लढले, इथे किमती वाढल्या हे सगळं परवडणारं होतं, पण मिड टर्म लॉस??! नोऽनो नो नो नो नो! दॅट वॉज टू मच टु हॅन्डल!
न्यु यॉर्क पाठोपाठ लॉस एंज
न्यु यॉर्क पाठोपाठ लॉस एंज ल्समध्ये भारतीय वंशाची डेमोक्रॅटिक सोशलिस्ट मेयर - नित्या रामन / रमन
[ वोट चोरी वगैरे न बोलता सरळ
[ वोट चोरी वगैरे न बोलता सरळ परीक्षणच मांडले हे राहूलबाबा कधी शिकणार?] >> हा जोक आहे ना?
व्होट चोरी आणि पराभव मान्य न करण्याने जानेवारी-६ घडले. इतका काळाकुट्ट दिवस लोकशाहीला बघायला लागला. अजुनही टाको व्हान्स पराभव मान्य करत नाहीतच. उगाच राहुलला नावं ठेवायची असतील तर ठेवा, त्यात काही अर्थ नाही इतकं आहे.
शाळेवर बॉंंब टाकून कोवळ्या मुलींना मारलंय या लोकांनी. वर युद्धात असं होतंच हे स्पष्टीकरण! त्या नेत्यनाहूच्या कच्छपी लागून इतकी नृशंस हत्या करुन ते का केलं आणि हाती काय लागलं? आणि टाकोने केलंय म्हणजे सोचसमझके केलं असणार अशी धारणा. सगळ्या जगाशी, मित्रांशी वैर्यासारखं वागल, अॅनिमॉसिटी ठेवली आता भोगा! सेनेट मिळाल्याने आता किमान आणखी दोन जज रिटायर होणार नाहीत. रो वि. वेड रिओव्हरटर्न करायला आता कायदा करणारेत का डेम्स?!
<< बॉंंब टाकून कोवळ्या
<< बॉंंब टाकून कोवळ्या मुलींना मारलंय या लोकांनी. वर युद्धात असं होतंच हे स्पष्टीकरण! >>
——— १-२ नाही तर तब्बल दोनशे पेक्षाही जास्त लहान जिव होते.
गाझा मधेही तसेच अगदी इस्पितळेही सोडली नाहीत.
ट्रम्पच्या धाग्यावर
ट्रम्पच्या धाग्यावर राहुलजींना मधे कशाला ओढताय? ते वोटचोरी म्हणताय तो मुद्दा समस्त भारतीयांसाठी महत्वाचा आहे. Sir च्या नावाखाली करोडो वोटर डिलीट करणे बरोबर वाटत असेल तर अंधभक्तिचा इलाज करून घ्या.
अमेरिकेत वोक असल्याचे दाखवणारे पण भारतात संघभाजपावादी असलेले नमुने लगेच आता भारतितलं राजकारण इथे आणु नका चं रडगाणे चालु करतील. त्याआधीच सान्गते- मी आणलं नाही. वर एकानी आणलंय. मी केवळ प्रत्युत्तर दिलं.
टेक्सास फ्लिप केले हे जबरदस्त
टेक्सास फ्लिप केले हे जबरदस्त मह्त्वाचे आहे . मोठे स्टेट असल्यामूळे एकंदर लीगल स्टाफ अधिक आहे. त्याच कारणामुळे फेडरल पॉलिसी मधले मधले जवळजवळ प्रत्येक कलम टेक्सासमधे कुठे ना कुठे तरी लागू होते. ह्या दोन्हीचा फायदा घेऊन रिप. काँट्रोव्हर्शियल ठरतील अशा किंवा मागा धोरणांशी सुसंगत अशा सगळ्या केसेस टेक्सास स्टेट अॅटर्नीच्या मार्फत इथल्या सर्किट कोर्टामधे चॅलेंज करत होते. त्यावरचे कोर्ट जे परत स्टेट सुप्रीम कोर्ट तेही पूर्ण रिप पॅक केलेले . त्यामूळे परत वरतीही तीच कथा. दोन राऊंड मधे प्रचंड वेळ काढता येतो नि परत धार्जीणे (खर तर पक्षपाती म्हणायला हवे) असे जजेस ह्याचा फायदा घेऊन इंजक्शन आणून सोयीस्कर पॉलिसीज फोर्स करणे सर्रास सुरू होते. उदा. फायझरच्या मॉर्निंग अॅफ्टर पिलला केले गेलेले चॅलेंज वगैरे.
हा प्रकार बंद होईल दोन वर्षे तरी.
व्हॅन्स नामानिराळा राहण्याचा
व्हॅन्स नामानिराळा राहण्याचा प्रयत्न करतोय.
He is just as culpable as Trump is.
सहा महिन्याचं सीनेट गेलं हेही
सहा महिन्याचं सीनेट गेलं हेही तो म्हणाला. केवढं नुकसान!
राहूलला यात ओढलं, सॉरी.
Pages