करीअर

बी ई (आय टी) असलेल्या मुलीस करीअरच्या कोणत्या संधी आहेत?

Submitted by रॉबीनहूड on 23 August, 2012 - 08:07

मायबोली परिवारात संगणक व अनुषंगिक क्षेत्रात देश विदेशात काम करणारी अनेक मंडळी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याकरता मी माहिती देण्याचे आवाहन करीत आहे.
आमच्या जवळचा नात्यातील मुलगी गेल्यावर्षी बी ई -आय टी पास झालेली आहे व ती पुण्यातच एका चांगल्या सॉफ्ट्वेअर्/आय टी कंपनीत जॉब करीत आहे. अलिकडच्या काळात कॉम्प्युटर इंजि./सायन्स, आय टी क्षेत्रात पुष्कळ मनुष्य बळ कंपन्याना उपलब्ध झाल्याने साहजिकच ५-७ वर्षापूर्वी इतके पगार या क्षेत्रात उपलब्ध नाहीत हीही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अधिकचे शिक्षण अथवा कोर्सेस घेणे आवश्यक आहे अथवा स्पेशलाय्झेशन करणे आवश्यक वाटते.

Career shift -- नोकरीच्या एका टप्प्यावर

Submitted by हर्ट on 15 June, 2010 - 06:31

मी सुरवातीला परमाणू अभियंता म्हणून बिघडलेले संगणक दुरुस्त करायचे काम करायचो. ते काम की २ वर्ष केले. मग संगणक अभियंता म्हणून काम केले. आता दोन प्रोजेक्टवर काम करतो आहे. एकाचे project leadership करतो आहे तर दुसर्‍यामधे senior s/w develoeper म्हणून काम करतो आहे. हे मी इथे एक उदाहरण म्हणून सांगतो आहे म्हणून लिहिले जेणेकरुन मला माझा विषय नीट मांडता येईल. तर ना.. आत्ता माझ्या वेळेसचे सगळे .. बहुतेक सगळे मित्र कुठले ना कुठले मॅनेजर होत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मी software development life cycle च्या सगळ्या फेजेसमधून गेलो आहे. माझा आता SDLC वर काम करण्याचा कल कमी होतो आहे. पण नाईलाज!!!!

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - करीअर