शिव-मानस-पूजा स्तोत्र- (श्रीमत् शंकराचार्य-विरचित )- मराठी भावानुवाद

शिव-मानस-पूजा स्तोत्र- (श्रीमत् शंकराचार्य-विरचित )- मराठी भावानुवाद

Submitted by भारती.. on 17 February, 2015 - 04:15

शिव-मानस-पूजा स्तोत्र- (श्रीमत् शंकराचार्य-विरचित )- मराठी भावानुवाद

श्रीशंकर शिवप्रभो बसावे रत्नखचित मानससिंहासनी
मनोमनी स्नानार्थ आणले हिमगिरीचे सुखशीतल पाणी
दिव्य वस्त्र मग वेढून घ्यावे संध्यारंगासम झळझळते
कस्तुरीचंदन तुला लावतो सुगंधात त्या विश्व नाहते
पापनाशनी धूप जाळुनी राशी रचली बिल्वदलांची
कितीक सुंदर अर्धोन्मीलित फुले जाईची अन चाफ्याची
स्वामी मंगलदीप लावतो दीपोत्सव होऊ दे अंतरी
नमननमन तुज पार्वतीपते मानसपूजा ही स्वीकारी ||

सुवर्णपात्रही मनी कल्पिले रत्नांची त्यावरती दाटी
दह्यादुधातील पंच पाककृती खीर तूप सारे तुजसाठी

Subscribe to RSS - शिव-मानस-पूजा स्तोत्र- (श्रीमत् शंकराचार्य-विरचित )- मराठी भावानुवाद