हितगुज ग्रूप: रसग्रहण स्पर्धा - ऑगस्ट २०११

रसग्रहण स्पर्धा - ऑगस्ट २०११

krushival-maayboli-big.jpg

स्पर्धेचं स्वरूप -

१. या स्पर्धेसाठी 'रसग्रहण स्पर्धा - ऑगस्ट २०११' हा नवीन ग्रूप १ ऑगस्टला उघडण्यात आला आहे. या ग्रूपचं सभासदत्व घेतल्यावर तुम्हांला तिथे रसग्रहण लिहिता येईल. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट, २०११, या कालावधीत तुम्ही या स्पर्धेच्या ग्रूपमध्ये नवीन लेखनाचा धागा उघडून रसग्रहण लिहू शकता.

तुमच्या प्रवेशिका सर्वांना वाचता याव्यात म्हणून हा धागा सार्वजनिक करण्यास कृपया विसरू नका.

२. धाग्याच्या शीर्षकात पुस्तकाच्या आणि लेखक/लेखिकेच्या नावाचा उल्लेख असावा. उदाहरणार्थ, भालचंद्र नेमाड्यांच्या 'हिंदू' या कादंबरीचं रसग्रहण करणार असाल, तर धाग्याचं शीर्षक - रसग्रहण स्पर्धा - 'हिंदू' - ले. भालचंद्र नेमाडे - असं असावं.

३. स्पर्धेचा निकाल सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात जाहीर केला जाईल.

नियम व अटी -

१. ही स्पर्धा फक्त मायबोली.कॉमच्या सभासदांसाठीच आहे. आपण मायबोलीचे सभासद नसाल तर इथे नवं खातं उघडून आपण मायबोली.कॉमचे सभासद होऊ शकता. हे सभासदत्व विनामूल्य आहे.
२. एक व्यक्ती (आणि एकच आयडी स्मित ) जास्तीत जास्त दोन प्रवेशिका पाठवू शकते. मात्र, यांपैकी एकाच प्रवेशिकेचा बक्षिसासाठी विचार केला जाईल.
३. फक्त मराठी पुस्तके या रसग्रहणासाठी स्वीकारली जातील.
४. रसग्रहणासाठी निवडलेल्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १ जानेवारी, २००८नंतर प्रकाशित झालेली असावी.
५. रसग्रहणासाठी विषयाचं व साहित्यप्रकाराचं बंधन नाही. मात्र, अनुवादित साहित्याचं रसग्रहण स्वीकारलं जाणार नाही.
६. एखाद्या काव्यसंग्रहातल्या एकाच कवितेचं, कथासंग्रहातल्या एकाच कथेचं, किंवा पुस्तकातल्या एका प्रकरणाचं / वेच्याचं रसग्रहण ग्राह्य धरलं जाणार नाही. रसग्रहण संपूर्ण पुस्तकाचंच असावं.
७. रसग्रहणासाठी शब्दमर्यादा - किमान ७५० शब्द आणि जास्तीत जास्त १५०० शब्द.
८. रसग्रहणासोबत पुस्तकाचं, लेखकाचं व प्रकाशकाचं नाव, तसंच प्रकाशनाची तारीख देणं आवश्यक आहे.
९. रसग्रहणात संपूर्ण कविता अथवा एखाद्या कवितेचा / कथेचा मोठा भाग असू नये.
१०. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

लेखन प्रकार शीर्षक प्रतिसाद शेवटचा प्रतिसाद
लेखनाचा धागा रसग्रहण स्पर्धा - अकथीत सावरकर - लेखक मदन पाटील 94 21 October, 2011 - 11:47
लेखनाचा धागा रसग्रहण स्पर्धा - 'आर्यांच्या शोधात' लेखक : मधुकर केशव ढवळीकर 29 14 October, 2011 - 01:53
लेखनाचा धागा रसग्रहण स्पर्धा- 'समुद्र' : लेखक- श्री. मिलिंद बोकील 47 13 October, 2011 - 15:09
लेखनाचा धागा रसग्रहण स्पर्धा - ऑगस्ट २०११ - निकाल 77 11 October, 2011 - 06:19
लेखनाचा धागा रसग्रहण स्पर्धा - 'मृगजळीचा मासा' कवयित्री- कविता महाजन 24 4 October, 2011 - 02:04
लेखनाचा धागा रसग्रहण स्पर्धा -सुनीताबाई - मंगला गोडबोले आणि अरुणा ढेरे 26 29 September, 2011 - 07:57
लेखनाचा धागा रसग्रहण स्पर्धा - वास्तव नावाचं झेंगट - लेखक : सुमित खाडिलकर 16 26 September, 2011 - 12:12
लेखनाचा धागा रसग्रहण स्पर्धा - वाचणार्‍याची रोजनिशी - लेखक सतीश काळसेकर 15 25 September, 2011 - 04:52
लेखनाचा धागा मायबोली - कृषीवल रसग्रहण स्पर्धा - २०११ 26 19 September, 2011 - 03:28
लेखनाचा धागा रसग्रहण स्पर्धा - 'गोष्टीवेल्हाळ' - ले. मधुकर धर्मापुरीकर. 32 17 September, 2011 - 09:49
लेखनाचा धागा रसग्रहण स्पर्धा: अंत ना आरंभ ही. लेखिका अंबिका सरकार 29 17 September, 2011 - 01:26
लेखनाचा धागा रसग्रहण स्पर्धा- 'त्या वर्षी' लेखिका: शांता गोखले 44 17 September, 2011 - 01:16
लेखनाचा धागा रसग्रहण स्पर्धा: स्मरणसाखळी- ले. वसंत बळवंत आगाशे 7 16 September, 2011 - 12:04
लेखनाचा धागा रसग्रहणस्पर्धा--वृकोदर--लेखक-राजेंद्र देशपांडे 9 16 September, 2011 - 12:01
लेखनाचा धागा रसग्रहण स्पर्धा - 'चुनाव रामायण' - लेखक ह मो मराठे 7 16 September, 2011 - 11:55
लेखनाचा धागा रसग्रहण स्पर्धा: 'हिंदू' -भालचंद्र नेमाडे 56 8 September, 2011 - 08:06
लेखनाचा धागा रसग्रहण स्पर्धा - 'जनांसाठी जेनेटिक्स - वैद्यकीय अनुवंशशास्त्राची ओळख' - ले. डॉ. कौमुदी गोडबोले 8 7 September, 2011 - 09:57
लेखनाचा धागा रसग्रहण स्पर्धा - परत मायभूमीकडे - डॉ. संग्राम पाटील 12 6 September, 2011 - 08:36
लेखनाचा धागा रसग्रहण स्पर्धा : ' मास्तरांची सावली ' - कृष्णाबाई नारायण सुर्वे. 14 1 September, 2011 - 14:17
लेखनाचा धागा रसग्रहण स्पर्धा - "अर्थात" - ले.अच्युत गोडबोले 18 1 September, 2011 - 10:40