स्लेजिंगवाल्या प्राण्यांची

Submitted by देवा on 8 January, 2008 - 01:45

मूळ गाणे:
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=34&post=311341#POST3...

स्लेजिंगवाल्या प्राण्यांची भरली होती सभा
पॉंटींग होता सभापती मधोमधी उभा
पॉंटींग म्हणाला, मित्रांनो, बना हो धोंड
आपल्या सर्वांना एक एक तोंड
ह्या तोंडाने कराल काय?

क्लार्क म्हणाला, भारतीय की किवी, सगळ्यांना देइन शिवी
हेडन म्हणाला, ह्याला बोलेन त्याला बोलेन
मीही माझ्या तोंडाने, असेच करेन असेच करेन
हॉग म्हणाला, मनात येइल तेंव्हा, तोंड चालवत राहिन
गिली म्हणाला, नाही रे बाबा! हॉग सारख माझं, मुळीच नाही
स्टंप मागे उभा राहिन, तेंव्हा तोंड चालवीन तोंड चालवीन
सायमंड्स म्हणाला, माझे काय तुझे काय, तोंड म्हणजे गटार हाय
बकनर म्हणाला, अपिल अपिल उचलून धरेन, मी धरेन
भारतियांना आऊट मी करेन, आऊट मी करेन
बेन्सन म्हणाला, तुम्ही दिलेला पैसा खात
चघळत राहिन आरामात
पॉंटींग म्हणाला, छान छान आपल्या तोंडाचा उपयोग करा
नाहितर काय होइल, आपला विक्रम स्वप्नच राहिल
-देवदत्त

गुलमोहर: 

देवा, हे विडंबन एकदम झक्कास ... मुख्य म्हणजे योग्य वेळी तुम्हाला सुचलं आणि इथे उतरलं.... सही!!

खुप सु॑दर लिहिले आहेस.

मजा आली वाचता॑ना.

अगदि योग्य वेळी आलय.
हे इन्ग्रजीत ट्रान्सलेट करुन ऑसिजना पाठवायला पाहिजे
मग त्याना फक्त माकड म्हणालेले बरे वाटेल Happy

देवा, खासच लिहिलयस!
~ पन्ना ~

सहीच झालय विडम्बन.

हे पण छान होईल विडम्बन :

नाही खर्चली मेहनत आणिक नाही दमवला जीव
विकत घेतला स्टीव, बाई मी विकत घेतला स्टीव

आय सी सी म्हणे ही असेल चोरी, कूणा वाटते असे लाचारी
जन्मभरींच्या शिव्यांइतके मोजियले ' बक' नाम

बाई मी विकत घेतला स्टीव......

बाळ बेन्सन हा सैतानाचा, बकनर काळा हा आणिक कूठचा
हाच इतरांचा रावण आणिक आमूचा परी हा राम

बाई मी विकत घेतला स्टीव......

जीतूकी अपील तीतकी बोटे. विक्रमास मग कसले तोटे.
कूणी न अडवे तरीही याला, देऊ मोठे ईनाम.

बाई मी विकत घेतला स्टीव......

(कल्पना करा हॉग भाऊ पेटी वाजवताहेत आणि रीकी भाऊ गाण म्हणताहेत आणि बाकी कांगारू रन आणि विकेटी गोळा करताहेत)

लोकहो..:)
केदार चांगल जमतय रे..:) थोडा बदल करून वेगळ्या धाग्यावर टाक की..:)

देवदत्त, केदार,
खासच उतरवली आहे त्यांची.

हे असच लीहीलय रे.

थ्रेड वर टाकण्याईतक काही खास नाहीये.

केदार मस्त रे...

स्टीव्ह च्या जागी 'श्याम' घातलेस तरी चालेल रे... स्टीव आणि 'श्याम' एकच Happy

म्हणजे यमक पण जुळतील Happy

हे कसे वाटतेय बघ

नाही शिणवली गोरी चमडी, नाही गाळला घाम
विकत घेतला 'श्याम', बाई मी विकत घेतला 'श्याम'

चु. भु. दे. घे.

http://milindchhatre.blogspot.com

नाही शिणवली गोरी चमडी, नाही गाळला घाम
विकत घेतला 'श्याम', बाई मी विकत घेतला 'श्याम' >>>>>>>

हेच खर तर छान वाटतय.

आणि चूक भूल कसली हो. तूम्हाला 'दादा' म्हणतोय म्हणजे तूम्ही 'अधिकार वाणी' ने सांगायच मला.

देवदत्त एकदम मस्त जमलय, मूळ गाण्याचे विडंबन आणि त्या मॅच मधे झालेल्या भानगडी वर भाष्य दोन्ही. फक्त मूळ चालीत बघितले तर 'मोर म्हणाला...' आणि 'मासा म्हणाला...' या ओळी पुढे मागे झाल्यात. पण ते क्षुल्लक आहे.

केदार तुझे ही मस्त जमलेय.

मिल्या 'स्टीव्'च राहुदेत, नाहीतर केदार ला हरभजन प्रमाणे racist रिमार्क मारला म्हणून प्रॉक्टर पुढे बोलवायचे Happy

देवा,
मस्तच जमलंय रे !
मूळ गाणं माझ्यासाठी स्पेशल आहे कारण माझ्या लहानपणी माझी आई ते म्हणायची. आता मी किंवा ती माझ्या अडीच वर्षांच्या मुलाला झोपवताना म्हणतो Happy
तुझं विडंबन मस्तच जमलंय. कीप इट अप !!

अरे केदार.. ते दादा वगैरे नको बाबा.. आपला तेवढा अधिकार नाही..

(तो अधिकार दादा अधिकारींचा Happy )

बर आता थांबतो.. नाहीतर देवाच्या टी.आर.पी. वर आपण आपलीच पोळी भाजतोय असे व्हायचे Happy

http://milindchhatre.blogspot.com

आवरा रे आवरा ह्याला... लाज काढली.. कांगारु शेम शेम....

मत्त लिवलय मत्त....

जबरा यार. पॉंटिंग म्हणाला...पॉंटिंग म्हणाला.
हे लोकसत्ता, सकाळ ला पठवुन दे.... लोल आहे!!!

ते विडंबन वगैरे ठीक आहे , पण एवढया सुंदर विडंबनाला ' काळे गालबोट ' लावायची खरच गरज होती कां ?
त्या बकनरच्या अंपायरींग वर टीका करा ना, रंगावर का घसरता ?
एका काळ्यानी दुसर्‍या काळ्याला ' काळ्या ' म्हणून हिणवण्याने काय साध्य करतोय आपण ?
गंमतीत सुध्दा रंगभेदाची छाया आपल्यावर नको रे पडु देऊ.

परत एकदा सर्वांचे धन्यवाद..:)