Submitted by Adm on 29 July, 2009 - 19:23
महाराष्ट्राचा आजचा आवाज नंतर झी मराठी ने सा रे ग म प चं पुढचं पर्व जाहिर केलयं. हे पर्व नवोदित गायकांसाठी असणार आहे. परवाच ह्याची निवडचाचणी मुंबई ला पार पडली. ह्या पर्वाचे बाकीचे डिटेल्स जजेस वगैरे (बहूतेक) अजून जाहिर झालेले नाहियेते. ( Black and white कार्यक्रमाच्या काही भागांमधे गायलेली गायिका स्वरदा गोडबोले हीची ह्या पर्वासाठी निवड झाली आहे).
हे पान ह्या पर्वातल्या गाण्यांविषयी गप्पा मारण्यासाठी.....
http://www.youtube.com/view_play_list?p=96710707C1C304CA ह्या लिंकवर सगळी गाणी पहायला मिळतील..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पल्लवी
पल्लवी सारेगमपची producer आहे बहुतेक, तेंव्हा तिला तर घेतलेच पाहिजे, नाही का?
डी-जे >>
डी-जे >> नुकतीच शारिब्-तोशी नी पण संगीतकार जोडी म्हणून जबरदस्त सुरवत केलीये
कुठल्या पिक्चर्स ना त्यांची गाणी आहेत?
~~
वाटत होता ब्रम्हदेव अक्कल जेव्हा ,
काय होता साईझ माझ्या चाळणीचा तेव्हा ?
नकुल, राझ २
नकुल,
राझ २ मधलं ' आजा मेरे माही' बर्या पैकी पॉप्युलर झालं त्यांच आणि त्यानंतर त्यांना अजुन चांगल्या संधी मिळाल्यायेत !( Upcmonig projects include Samir Karnik’s Roshan, including its title-track, two films with Vikram Bhatt’s ASA Films, Phirr, doing three songs, and Bhaag Johnny directed by Deepak Tijori, which is a solo assignment again, 'Jail ' by Madhur Bhandarkar)
ऐक,' आजा मेरे माहि '(राझ २)
http://www.youtube.com/watch?v=TPcq2ZQbXWc
ऑरकुट असेल तर शारीब तोशी ची मुलाखतः
http://www.orkut.com/Main#CommMsgs.aspx?cmm=32167513&tid=535673340693655...
थँक्स
थँक्स डीजे. चांगला ब्रेक दिलाय की भट्ट काकांनी जोडीला.
~~
वाटत होता ब्रम्हदेव अक्कल जेव्हा ,
काय होता साईझ माझ्या चाळणीचा तेव्हा ?
पल्लवी
पल्लवी सारेगमपची producer आहे बहुतेक
मला नाही वाटत.. ती फक्त 'असंभव' ची निर्माती आहे.
सुनिल बर्वे मराठी सारेगमप चा अँकर म्हणून कसा वाटेल? तो बर्यापैकी गातो आणि दिसतोही चांगला.. स्वप्नील बांदोडकरसारखा अगदीच ठोकळाही वाटणार नाही. पण त्याच्यात सळसळता उत्साह आणि उत्स्फुर्तता ह्याम्चा नक्कीच अभाव आहे.
अँकर
अँकर म्हणून कसा वाटेल>> आपण इथे मत मांडतोय खर..पण उपयोग काय ? परत पल्लवी, परत परत पल्लवी, परत परत पल्लवी जोशी च येइल असे वाटतेय महाबोर करायला
खरंतर
खरंतर आपल्याला ती तिच्या इन्ग्रजी-मिश्रीत अधूनमधून मराठीमुळे आणि अचाट कपड्यांमुळे बोअर वाटते, पण पल्लवी प्तचंड लोकप्रिय आहे, सामान्य लोकांमध्ये! तुम्हाला कल्पना आहे की नाही, माहीत नाही, पण ती कार्यक्रमात 'आज ह्यांची जयंती/ पुण्यतिथी/ वाढदिवस/ चित्रपट-गाण्याचा इतिहास सांगते, तेव्हा लोकांना वाटतट- वा! काय पाठांतर आहे हिचं, काय अभ्यास आहे!
ते तिला लिहून दिलेलं असतं हेही भाबड्या लोकांना कळत नाही! आता काय बोलणार
आदेशचंही तेच. सामान्य लोकांमध्ये मिसळतो, म्हणून त्याचा टीआरपी प्रचंड हाय आहे. म्हणूनच तो वाट्टेल ते बोलतो, आगाऊपणा करतो, हे नजरेआड केलं जातं.
डीजे, बेला, निहिरा, स्वप्निल, अगदी अमेय दातेनेही अँकरींग केले आहे. पण समहाऊ ते 'आम्ही गायक आहोत' यातून बाहेर पडत नाहीत कधी. ते पूर्ण मनाने अँकरीम्ग करूच शकत नाहीत, आणि त्यामुळेच ते तिथे ऑड वाटतात. गाण्याची थोडी जाण, स्पर्धकांना दिलासा देणारी वागणूक, परिक्षकांना योग्य तो मान द्यायचे भान आणि स्टेज प्रेझेन्स हे सगळं एका उत्तम अँकरकडे हवं. हे सगळं एका मराठी व्यक्तीकडे असणं अवघडच न
मंजु, सुनील
मंजु,
सुनील बर्वे नी ई टी.व्ही. च्या सारेगमप स्टाइल प्रोग्रॅम चे अँकरींग केले होते पण अगदीच सामान्य .. उस्फुर्त बोलायची कला नाहीये फारशी त्याच्या कडे , शिवाय तो पण बर्या पैकी बाळु टाइप च आहे !
गाण्याची
गाण्याची थोडी जाण, स्पर्धकांना दिलासा देणारी वागणूक, परिक्षकांना योग्य तो मान द्यायचे भान आणि स्टेज प्रेझेन्स हे सगळं एका उत्तम अँकरकडे हवं. हे सगळं एका मराठी व्यक्तीकडे असणं अवघडच न
!
<< तसे अँकर अत्ता पर्यंत फ्क्त २ झालेत्..अर्थात 'सोनु निगम' आणि शान, त्यांना तर पर्याय च नाही
पण कदाचित राहुल वैद्य-अभिजीत सावंत बरं करु शकतील अँकरींग.
प्रशांत
प्रशांत दामले किंवा अतुल परचुरे ला बोलवा.. सह्याद्रीवर अॅंकरिंग करायचा :)..
प्रशांत
प्रशांत दामले सह्याद्रीवर कुठल्यातरी शो चं अँकरिंग करायचा तेंव्हा उगाचच हेडफोन-माईक लाऊन यायचा... फारच बावळट दिसायचं ते...
दामलेंचं अँकरिंग आ.सा.ख. मधे मात्र लाजवाब...
_______
...हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते...
दामलेंचं
दामलेंचं अँकरिंग आ.सा.ख. मधे मात्र लाजवाब...>> अगदी अगदी अँकी...
जल्ला पण
जल्ला पण आपली मतं कोण विचारतंय का?
आपली मतं
आपली मतं कोण विचारतंय का? >>
दामलेंचं
दामलेंचं अँकरिंग आ.सा.ख. मधे मात्र लाजवाब...
असणारच.. अगदी अंतरीच्या उमाळ्याचा विषय आहे तो.. :).
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
सा रे ग म प
सा रे ग म प मराठी : पुढचे पर्व केव्हापासून सुरू होणार आहे, सध्या तरी फक्त ऑडिशन्स दाखवतायत ना?
**************************
ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमुची!
महावंदनीय अतिप्राणप्रिय ही मायमराठी आमुची!!
त्या
त्या पल्लवी जोशीला आधि मराठी बोलण्याची शिकवणी लावा!
काय दळभद्री धेडगुजरी इन्ग्रजी मिश्रित बोलत अस्ते! किळस येते अगदी!
झक्की नेहेमी म्हणतात ती ही असलीच भारतातली लोक, मातृभाषा विसरलेली, अन अशा कार्यक्रमान्ना सुत्रधार म्हणून........ बहिष्कार घातला पाहिजे, निषेध केला पाहिजे!
आजपासुन
आजपासुन शुट सुरु होणार होते. म्हणजे १५ ऑगस्ट्च्या दरम्यान सुरु करतील.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा
पुणे ऑडिशन मधले व्हिडिओ
पुणे ऑडिशन मधले व्हिडिओ पाहिले, if I'm not wrong, 'आपकी नजरोने समझा प्यार के काबील मुझे' म्हणणारी मुलगी 'मानसी भिडसगावकर' आहे, आमच्या कॉलनीत रहायची कोथरुड ला
आधीच्या राउंड ला तिनी ' भय इथले संपत नाही' गायलं होतं !
ती जर मानसी च असेल तर सहीच तयार झालीये, त्या वेळी कॉलनी च्या गणेश उत्सवा च्या प्रोग्रॅम्स मधे गाणी म्हणायची .
http://www.youtube.com/watch?v=znxIbZhrj-A&feature=related
(आपकी नजरोने समझा starts @ 1:11)
http://www.youtube.com/watch?v=4wGJXMUW-Jw&feature=related
(भय इथले संपत नाही starts @ 4:30)
स्पर्धा सुरु झाली की नाही, की
स्पर्धा सुरु झाली की नाही, की अजुन ऑडिशन्स चालली आहेत ?
माझ्या चुलतभावाची बायको गेली
माझ्या चुलतभावाची बायको गेली होती दुसर्या का तिसर्या राउंडपर्यंत. पण पुढच्या राउंडच्या नंतर एक दिवसांनी ती ३० पुरी होणार होती त्यामुळे ते लोक ऑब्जेक्शन घ्यायची शक्यता होती. तसं काही बोलणं झालं होतं बहुतेक आधी. त्या टेन्शनमधे गाणं खूप छान नाही झालं म्हणे. त्यामुळे पुढे गेली नाही.
नी... अरेरे.. खरं तर तसे
नी... अरेरे..
खरं तर तसे टेन्शन घेण्यासारखे काही नसायला पाहिजे.. कारण. जर आज स्पर्धेचा फॉर्म भरताना वय २९ वर्षे ३४० दिवस आहे.. आणि जशी जशी स्पर्धा पुढे जाईल तशी ३० वर्षे पूर्ण होणार आहेत तरी पण जेव्हा स्पर्धा सुरु झाली तेव्हा वय २९ च होते म्हणल्यावर ऑब्जेक्शन घेण्यासारखे काही नसावे
अट स्पर्धा सुरू होईल तेव्हा वय १५ ते ३० मध्ये असावे अशी आहे ना..
तेवढं काही टेक्निकल मला माहीत
तेवढं काही टेक्निकल मला माहीत नाही. पण त्या सगळ्या चर्चेमुळे ती टेन्शनमधे आली आणि गाण्यावर परिणाम झाला असं भावाने सांगितलं मला. मलाही वाईट वाटलं कारण ती खरंच खूप उत्तम गाते. शिवाजी युनिव्हर्सिटीत एम. ए. संगीतात पहिली आली होती ती.
आपकी नजरोने समझा गंडलय, भय
आपकी नजरोने समझा गंडलय, भय इथले चांगले म्हंटले आहे.
तोशा प्ले बॅक सिंगर? केवढी
तोशा प्ले बॅक सिंगर? केवढी बेसूर गायची शोमध्ये. पण जावेद अख्तरना आवडायची हे कारण पुरेसं असेल.
तोषा प्ले बॅक देतेय ? कुठे,
तोषा प्ले बॅक देतेय ? कुठे, कधी ? अत्यन्त बेसूर अन वर भयंकर अॅटिट्युड असलेली पोरगी होती ती!
कोण तोशा/ तोषा ?? कुठे गायची
कोण तोशा/ तोषा ?? कुठे गायची ???
अडम, ती आयडॉल ४ मधे टॉप ३ मधे
अडम, ती आयडॉल ४ मधे टॉप ३ मधे होती.
आर्च, वर उल्लेखलेला तोशी अन तोषा यात गोंधळ तर नाही ना करत आहेस तू?
झी मराठी ची अधिकृत वाहिनी
झी मराठी ची अधिकृत वाहिनी youtube वर
अरे ग्रेट !!! ह्याच्यावर ABK
अरे ग्रेट !!!
ह्याच्यावर ABK पण आहे..
Pages